Call from Home

Call from Home

Part IV — Call from Home

Call from Home PDF in English

खंड  २  : धम्म दीक्षेची मोहीम 

भाग चवथा : घरचे निमंत्रण

Call from Home

   Previous page                                   Next page

१. शुद्धोदनाची शेवटची भेट

१. सारिपुत्त आणि मोग्गलान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध दोन महिने राजगृहात राहिले. 

२. भगवंत राजगृहात रहात असल्याचे ऐकल्यावर शुद्धोदनाने निरोप पाठविला की, “मरणापूर्वी माझ्या  मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे. त्याच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळाला परंतु त्याच्या पित्याला किंवा त्याच्या नातलगांना तो मिळाला नाही.” 

३. निरोप देणाऱ्या  दूताचे नाव कालुदायिन्‌ असे असून तो शुद्धोदनाच्या एका दरबारातील मनुष्याचा मुलगा होता. 

४. तेथे पोचल्यावर तो दूत म्हणाला, “जगद्नदनीय तथागता, कमलपुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी उत्सुक असते, त्याप्रमाणे आपले पिताजी आपली वाट पाहात आहेत.” 

५. तथागतांनी आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्या बर्याच शिष्यांसह ते पित्याच्या घरी जावयास निघाले. 

६. भगवंत अधून मधून मुक्काम करीत चालले होते. परंतु ते येण्यासाठी निघाल्याची वार्ता शुद्धोदनाला सांगण्यासाठी कालुदायिन्‌ पुढे निघून गेला.

७. लवकरच ही बातमी सर्व शाक्य जनपदात पसरली; “संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी गृहत्याग केल्यावर गृहहीन होऊन फिरत असताना सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे कपिलवस्तुला आपल्या घरी परत येत आहे.” ज्याच्या त्याच्या तोंडी हेच शब्द होते. 

८. आपले नातलग आणि मंत्री यांच्यासह शुद्धोदन आणि महाप्रजापती ही दोघेही आपल्या पुत्राला  भेटण्यासाठी निघाली. आपला मुलगा दुरूनच त्याना दिसला तेव्हा त्याचे सौंदर्य, गांभीर्य आणि तेज पाहून ते थक्क झाले आणि त्यांचे अंत:करण अत्यानंदाने भरून तो आनंद व्यक्‍त करण्यास त्याना शब्द सापडेनात. 

९. हा खरोखरच त्यांचाच पुत्र होता. हेच ते सिद्धार्थाचे रूप ! तो महान श्रमण त्यांच्या हृदयाच्या किती जवळ होता आणि तरीही त्यांच्यातील अंतर किती दूर होते! तो मुनीश्रेष्ठ आता त्यांचा पुत्र सिद्धार्थ नव्हता. तो बुद्ध, भगवान, अर्हत, सत्यविद्‌ आणि सगळ्या मानवजातीचा गुरु होता. 

१०. आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शुद्धोदन रथातून खाली उतरला आणि प्रथम त्याला वंदन करून म्हणाला, “आम्ही तुला पाहिल्याला आता सात वर्षे लोटली. या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहात होतो !” 

११. नंतर भगवान बुद्ध आपल्या पित्यासमोर बसले. राजा आपल्या पुत्राकडे टक लावून पाहु लागला. त्याच्या नावाने त्याला हाक मारण्याची त्याची फार इच्छा होती. पण तसे धैर्य त्याला होईना. “सिद्धार्था,” तो मनातल्या मनात उद्गारला, “सिद्धार्था, आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा त्याचा पुत्र हो !” परंतु आपल्या पुत्राचा निश्चय पाहून हून त्याने ने आपत्या भावना दाबून टाकल्या. तो आणि महाप्रजापती हाश्रजापता दोघेही उदास झाली. 

१२. याप्रमाणे पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि दु:खात आनंद आणि आनंदात दुःख मानू लागला. त्याला आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता. तरी पण आपला थोर पुत्र कधीही आपला वारस होणार नाही  या कल्पनेमुळे त्याचा अभिमान लोप पावला.

१३. “मी तुला माझे राज्य देईन,” राजा म्हणाला, “पण जर तुला ते दिले तर तू ते मातीमोल मानशील.” 

१४. आणि भगवन्त म्हणाले, “ राजाचे अंतःकरण प्रेमाने भरलेले आहे व आपल्या पुत्राबद्दल त्याला अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो. पण ज्या पुत्राला आपण मुकलात त्याच्याशी ज्या प्रेमबंधनानी आपल्याला जखडले आहे त्या बंधनांनी आपण स्वतःला सर्व मनुष्यमात्रांशी जखडून टाका. म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्याच्यापेक्षाही थोर पुत्र असल्याचे आढळून येईल. सत्य आणि सदाचार शिकविणारा पुत्र आपल्याला लाभेल आणि शांती व निर्वाण याचा प्रणेता आपल्या हृदयात प्रवेश करील.” 

१५. आपला पुत्र बुद्ध याची तो मधुर वाणी ऐकून शुद्धोदन आनंदाने बेहोष झाला आणि आपले हात घट्ट आवळून अश्रुपूर्ण नेत्रांनी तो उद्गारला, “ हे अद्भत परिवर्तन आहे! दु:खातिरेक आता नष्ट झाला आहे. प्रारंभी माले हृदय दुःखाने जड झाले होते; पण आता तुझ्या महान त्यागाचे फळ मला चाखावयास मिळत आहे. समर्थ अशा अनुकंपेने प्रेरित होऊन गेल्यामुळे आपले धर्मविषयक उदात्त असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्तेची अभिलाषा तू सोडून द्यावीस हे योग्यच होते. मार्ग सापडल्यावर आता मुक्‍तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तू आपल्या धम्माची शिकवण देऊ शकशील.”

१६. शुद्धोदन स्वगृही परतला आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसह वनातच राहिले. 

१७. दुसऱ्या  दिवशी सकाळी भगवंत आपले भिक्षापात्र घेऊन कपिलवस्तुमध्ये भिक्षेसाठी निघाले. 

१८. त्या वेळी पुढील बातमी पसरली; “ज्या नगरातून सिद्धार्थ रथात बसून आपल्या सेवकांसह जात असे त्याच नगरात तो आता भिक्षा मागण्यासाठी घरोघर फिरत आहे. त्याने लाल मातीच्या रंगाचे चीवर परिधान केले असून त्याच्या हातात मातीचे एक भिक्षापात्र आहे!” 

१९. ही विचित्र वार्ता ऐकून शुद्धोदन घाईघाईने गेला व भगवंताला म्हणाला, “तू माझ्या नावाला असा काळिमा का फासतोस? तुला आणि तुझ्या भिक्खुंना मी सहज अन्न पुरवू शकेन हे तुला माहीत नाही काय?” 

२०. भगवन्त उत्तरले, “ही माझ्या संघाची प्रथा आहे.” 

२१. “पण हे कसे शक्‍य आहे ? अन्नासाठी भिक्षा मागणार्यांपैकी तू नाहीस.” 

२२. “होय पिताजी,” भगवंत म्हणाले, “आपण राजाचे वंशज आहोत असे तुम्ही व तुमच्या वंशीयांनी वाटल्यास म्हणावे ; परंतु मी प्राचीन बुद्धांचा वंशज आहे. ते आपले अन्न भिक्षा मागून मिळवीत असत आणि भिक्षेवरच ते नेहमी आपला निर्वाह करीत असत.” 

२३. शुद्धोदन निरुत्तर झाला तेव्हा तथागत पुढे म्हणाले, “जेव्हा एखाद्याला गुप्त धन मिळते तेव्हा त्यातील मौल्यवान रत्नाची भेट त्याने पित्याला द्यावी अशी रीत आहे म्हणून माझ्या या धम्मरूपी धनाची भेट मला आपल्याला देऊ द्या.” 

२४. भगवंत पित्याला पुढे म्हणाले, “जर आपण आपल्या सुख स्वप्नांतून मुक्‍त व्हाल, आपले अंतःकरण सत्यासाठी उघडे कराल, आपण सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि सत्धम्माचा मार्ग स्वीकाराल तर आपल्याला शाश्वत असा आनंद लाभेल.” 

२५. शुद्धोदनाने हे सर्व शांतपणे ऐकले व म्हटले, “बाळ ! तू जे म्हणतोस त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करीन.” 

 

२. यशोधरा व राहुल यांची भेट

१. शुद्धोदनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी त्याचे आदराने स्वागत केले.

२. पण राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही. शुद्धोदनाने यशोधरेला बोलावणे पाठविले; परंतु ती म्हणाली “खरोखर, जर माझा काही मान ठेवावयाचा असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील.”

३. आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यावर भगवन्तांनी विचारले, ‘यशोधरा कुठे आहे ?’ आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात गेले. 

४. आपले शिष्य सारिपुत्त आणि मोग्गलान यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या दालनात येण्याची भगवन्तांनी आज्ञा दिली. ते त्यांना म्हणाले, “मी मुक्‍त आहे परंतु यशोधरा अद्याप मुक्‍त नाही. बरीच वर्षे मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी झाली आहे. तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होतील. पवित्र तथागताला तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नये.” 

५. यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसली होती. भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ  भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेमनिर्भर झाली की, तिला स्वत:ला सावरुन धरणे शक्‍य झाले नाही. 

६. ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगद्वंदनीय भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्याचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली. 

७. परंतु तेथे शुद्धोदन आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली. 

८. यशोधरेच्या वतीने क्षमा मागून शूद्धोदन म्हणाला, “हे तिचे वागणे तिच्या प्रेमातिशयामुळे असून ही काही क्षणिक भावनाविवशता नाही. पतिविरहाच्या सात वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केशपवन केल्याचे तिने ऐकले तेव्हा तिनेही केशपवन केले. जेव्हा तिने ऐकले की, आपत्या पतीने सुगंधी द्रव्ये व अलंकार याचा त्याग केला आहे, तेव्हा तिनेही ती वापरण्याचे सोडून दिले. आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्न सेवन करीत असते.” 

९, “हे केवळ तात्पुरत्या भावनाविवशतेमुळे नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण होय.” 

१०. भगवंतानी परिब्रज्या घेतली त्या वेळी यशोधरेने दाखविलेल्या महान धैर्याची व तिच्या अलौकिक महान गुणांची भगवंतानी प्रशंसा केली. ते बोधिसत्व असताना व मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय जे बुद्धत्व ते प्राप्त  करण्यासाठी प्रयत्तशील झाल्यावर, यशोधरेचे पावित्र्य कोमलता आणि तिची भक्‍ती हे तिचे गुण त्याना अमोल व उपकारक ठरले होते. हे तिचे ‘कर्म’ होते आणि तिच्या थोर पुण्याचाच तो परिणाम होता. 

११. तिचे दुःख शब्दातीत होते. आणि तिच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे तिच्या आध्यात्मिक पुण्याईच्या कीर्तीत भर पडली होती आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते. 

१२. नंतर यशोधरेने सात वर्षे वयाच्या राहुलाला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली.

१३. “महान ब्रम्हाप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहर्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे. मी अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्याचा मोठमोठचा खाणी याच्याजवळ आहेत. त्याच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्याला विनंती कर. कारण पित्याची मालमत्ता वारसाहक्काने पुत्राकडेच आली पाहिजे.” 

१४. राहुल उत्तरला, “कोण माझा पिता? शूद्धोदनाखेरीज दुसरा पिता मला माहीत नाही.” 

१५. यशोधरेने मुलाला उचलून घेतले आणि तेथून जवळच भिक्खुंच्या बरोबर अन्न सेवन करीत असलेल्या भगवंताच्याकडे खिडकीखनू बोट दाखवून ती त्याला म्हणाली, “तो पहा तुझा पिता, तुझा पिता शुद्धोदन नव्हे.”

१६. राहुल भगवंताकडे गेला आणि त्यांच्या चेहर्याकडे पाहुन निर्भयपणे आणि प्रेमाने म्हणाला, 

१७. “आपण माझे पिता आहात ना ?” आणि त्यांच्याजवळ उभा राहून तो पुढे म्हणाला, “श्रमणा, आपली छायादेखील आनंदमय आहे!” भगवंत शांतच राहिले. 

१८. भोजन आटोपल्यावर तथागतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले. परंतु राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा मागू लागला. 

१९. कोणीही त्याला अडविले नाही. स्वत: भगवंतानीही त्याला प्रतिबंध केला नाही. 

२०. सारिपुत्ताकडे वळून भगवंत म्हणाले, “माझा पुत्र आपला वारसा मागतो आहे. चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही. परंतु ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मात्र मी त्याला देऊ शकेन.” 

२१. राहुलला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले, “सोने, रुपे आणि रत्ने यांपैकी माझ्याजवळ काहीही नाही, परंतु आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील आणि ते वाहून नेण्याइतका व जतन करून ठेवण्याइतका तू समर्थ असशील तर असले धन माझ्याकडे विपुल आहे. माझे आध्यात्मिक धन म्हणजे धम्माचा मार्ग. परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले आहे अशांचा संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय?” 

२२. “होय,” राहुलाने निश्चयपूर्वक उत्तर दिले. 

२३. राहुल भिक्खुसंघात सामील झाल्याचे जेव्हा शुद्धोदनाने ऐकले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले. 

३. शाक्‍यांनी केलेले स्वागत 

१. भगवान बुद्ध शाक्य देशी परतले तेव्हा आपल्या देशबांधवांत दोन तट पडलेल त्यांना आढळून आले. एक त्यांच्या बाजूने होता व दुसरा त्याचा विरुद्ध होता. 

२. मागे शाक्य व कोलिय यांच्यातील युद्धाच्या प्रश्‍नाबाबत जो वाद माजला होता आणि ज्यात त्यांनी फार महत्त्वाचा भाग घेतला होता, त्या वेळी शाक्य संघात झालेल्या मतभेदांची त्यांना आठवण झाली. 

३. त्या वेळच्या त्यांच्या विरोधकांनी या वेळी सुद्धा त्यांना प्रणिपात करण्याचे किंवा त्यांचा मोठेपणा मान्य करण्याचे नाकारले. त्यांना अनुकूल असलेल्यांनी त्यांच्या अनुयायी वर्गात सामील होण्यासाठी प्रत्येक  कुटुंबातून एकेक मुलगा अर्पण करण्याचे अगोदरच ठरविले होते. त्यांनी आता भगवंताच्या संघात प्रवेश करण्याचे व ते राजगृहाला परततांना त्यांच्याबरोबर जाण्याचे ठरविले. 

४. ज्या कुटुंबांनी एकेक मुलगा संघाला अर्पण करण्याचे ठरविले होते त्यात अमितोदनाचे कुटुंब होते.

५. अमितोदनाला दोन मुलगे होते. एकाचे नाव अनुरुद्ध. त्याला अगदी लाडात वाढविले होते. दुसर्याचे नाव होते महानाम.

६. महानाम अनुरुद्धाकडे जाऊन म्हणाला, “तू तरी संसारत्याग कर किंवा मी करतो.” आणि अनुरुद्धाने उत्तर दिले. “माझी प्रकृती नाजूक आहे. कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहणे मला अशक्‍य आहे. म्हणून तूच तसे कर.”

७. “परंतु प्रिय अनुरुद्धा, कौटुंबिक जीवनात कोणत्या गोष्टी घडत असतात ते मी तुला सांगतो ऐक. पहिल्या प्रथम तुला शेत नांगरावे लागेल. ते झाल्यावर पेरणी करावी लागेल. ते झाल्यावर तुला शेताला पाणी द्यावे लागेल. नंतर शेतातील पाण्याचा निचरा करावा लागेल. नंतर लावणी करावी लागेल. लावणीनंतर कापणी करावी  लागेल. मगते बाहेर न्यावे लागेल व त्याच्या जुड्या बांधाव्या लागतील. एवढे झाल्यावर त्याची मळणी करावी लागेल. मग  पेंढा वेगळा करावा लागेल. नंतर त्यातील तूस काढून टाकावे लागेल. मग धान्य पाखडावे व लागेल. नंतर ते कोठारात साठवून ठेवावे लागेल. आणि त्याच्या पुढल्या वर्षी पुन्हा या सगळ्याची पुनरावृत्ती करावी लागेल, आणि हे वर्षानुवर्षे असेच करावे लागेल.”

८. “हे काम कधीच संपत नाही, आपल्या श्रमांना कधी अंतच नसतो. काम कधी संपेल? श्रमाचा शेवट केव्हा होईल. आपल्या पंचेंद्रियांच्या सुखोपभोगांना न मुकता आपल्याला विश्रांती कशी मिळेल? प्रिय अनुरुद्धा, काम हे कधीच संपत नाही; आपल्या श्रमांना कधी अंतच नसतो.” 

९. “मग कोटुंबिक कर्तव्ये करण्याचा विचार तू कर. मीच कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहण्यास जातो,” अनुरुद्ध म्हणाला. 

१०. आणि शाक्य अनुरुद्ध आपल्या आईकडे जाऊन म्हणाला, “आई कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहाण्यास जाण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मला परवानगी दे.” 

११. शाक्य अनुरुद्धाने म्हटल्यावर त्याची त्याला म्हणाली; “लाडक्‍या अनुरुद्धा, तुम्ही दोघे माझे लाडके पुत्र आहात आणि तुमच्यात कोणताही दोष मला दिसत नाही. माझ्या इच्छेविरुद्ध केवळ मृत्यूमुळे एके दिवशी तुमची व माझी ताटातूट होईल. परंतु मी जिवंत असताना तुम्ही कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत जावे याला मी कशी समती देऊ?”

१२. पुन्हा एकदा अनुरुद्धाने तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले. अनुरुद्धाने आपल्या आईला तिसऱ्यांदा  तीच विनंती केली. 

१३. त्या वेळी शाक्य राजा भद्दीय याची शाक्‍यांवर सत्ता होती आणि तो अनुरुद्धाचा मित्र होता. त्यामुळे राजा संसारत्याग करणार नाही असे वाटून ती अनुरुद्धाला म्हणाली, “लाडक्या अनुरुद्धा, जर राजा शाक्य भहीय याने संसारत्याग केला तर तूही त्याच्याबरोबर जा.” 

१४. नंतर अनुरुद्ध भद्दीयाकडे गेला आणि त्याला म्हणाला; “प्रिय मित्रा, माझ्या संसारत्यागात तुझ्यामुळे अडथळा येतो आहे.” 

१५. “मग प्रिय मित्रा, मी तो अडथळा दूर करतो. मी तुझ्याबरोबरच आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तू संसारत्याग कर.”

१६. “प्रिय मित्रा, आपण दोघेही संसारत्याग करू या!” 

१७. “प्रिय मित्रा, संसारत्याग करण्यास मी असमर्थ आहे. तू दुसरे काहीही करावयास मला सांगितलेस तरी मी ते करीन. हु एकटाच संसारत्याग, कर.” भद्दीय म्हणाला. 

१९, “प्रिय मित्रा, जर तू संसारत्याग केलास तरच मीही करावा असे आईने सांगितले आहे. आणि तूही आत्ताच म्हणालास की ‘जर तुझ्या संसारत्यागात माझ्यामुळे अडथळा येत असेल तर तो अडथळा दूर करतो. मी देखील संसारत्यागास तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्याबरोबर आहे. म्हणून प्रिय मित्रा, आपण दोघेही संसारत्याग करु या!” 

१९. शाक्य राजा भद्दीय अनुरुद्धाला म्हणाला: “प्रिय मित्रा, सात वर्षे थांब, सात वर्षांनतर आपण बरोबरच संसारत्याग करू.” 

२०. “प्रिय मित्रा, सात वर्षे हा फार दीर्घ काळ आहे. मी सात वर्षे थांबू शकत नाही.” 

२१. भद्दीयाने ती मुदत सहा वर्षांवर आणली आणि क्रमाक्रमाने ती एका वर्षावर आणली. मग सात महिन्यांवर आणि क्रमाक्रमाने ती एक महिन्यावर आणि मग एका पंधरवड्यावर आणली. प्रत्येक वेळी अनुरुद्ध म्हणाला : “इतका दीर्घकाळ मी थांबू शकत नाही.” 

२२. मग राजा म्हणाला, “मित्रा, माझ्या पुत्रावर व भावांवर राज्य सोपवीपर्यंत सात दिवस थांब.”

२३. “सात दिवस म्हणजे काही फार नव्हते. तितका वेळ थांबण्यास मी तयार आहे.” अनुरूद्धाकडून त्याला तसे उत्तर मिळाले. 

२४. याप्रमाणे शाक्य राजा भहीय, अनुरुद्ध, आनंद, भगु, किंबिल आणि देवदत्त हे पूर्वी जसे क्रीडोद्यानावर चतुरंगसेनेसह मिळून जात असत तसे या वेळीही चतुरंग सेनेसह ते सहा जण आणि त्यांच्याबरोबर उपाली नावाचा न्हावी असे सगळे मिळून सात जण बाहेर पडले. 

२५. काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांनी आपल्या सेनेला परत पाठवले आणि शेजारच्या जनपदात त्यांनी प्रवेश केला. आपल्या चांगल्या चांगल्या वस्तु त्यांनी काढल्या आणि त्या आपल्या वस्त्रात गुंडाळून त्यांनी त्याचे एक गाठोडे बांधले आणि ते उपाली न्हाव्याला म्हणाले, “मित्रा, तू आता कपिल वस्तुला परत जा. तुझ्या उदरभरणासाठी या वस्तु तुला पुरतील. आम्ही आता भगवान बुद्धाकडे जातो.” आणि मग ते पुढे गेले.

२६. ते पुढं चालू लागले आणि उपाली घरी जाण्यासाठी परतला. 

 

४. बुद्धाला गृहस्थाश्रमी बनविण्याचा शेवटचा प्रयत्न 

१. आपला मुलगा आता जात आहे आणि आपल्याला तो पुन्हा कधीही भेटणार नाही या विचाराने शुद्धोदन खूप रडला.

२. नंतर शुद्धोदनाने आपला मंत्री व आपल्या कुटुंबाचा पुरोहित यांच्याशी विचारविनिमय केला आणि कुटुंबात परत येऊन राहाण्याविषयी आपल्या पुत्राचे चे मन ते वळवू शकतील कतील काय याबद्दल त्यांना  विचारले. 

३. राजाच्या इच्छेला मान देण्यासाठी तो पुरोहित मंत्र्याला बरोबर घेऊन निघाला आणि त्याने भगवान बुद्धास वाटेतच गाठले.

४. त्यांनी त्यास यथोचित अभिवादन केले आणि त्यांची संमती मिळविल्यावर ते त्यांच्याजवळ बसले. 

५. झाडाच्या सावलीत बसलेल्या भगवंतांना उद्देशून पुरोहित म्हणाला : 

६. “राजकुमार, आपला वियोगरुपी बाण हृदयात रुतल्यामुळे ज्यांच्या नेत्रातून अश्रूंचा पूर वाहात आहे त्या महाराजांच्या भावनांचा आपण क्षणभर विचार करा. त्यांनी आपल्याला घरी परतण्याची विनंती केली आहे. आपण घरी परतलात तर त्यांना शांतपणे मृत्यू येईल.”

७. “आपला निश्चय धर्मावर केंद्रित आहे हे मला माहीत आहे आणि मला हेही माहीत आहे की, आपला हा संकल्प बदलणारा नाही. परंतु आपणही गृहहीन अवस्था पत्करल्यामुळे मानसिक यातनांच्या ज्वाला मला अग्नीप्रमाणे भाजून काढीत आहेत.”

८.  आपण कर्तव्यावर प्रेम करीत असता म्हणून कर्तव्यासाठी या संकल्पाचा त्याग करा.”

९. “काही काळ पृथ्वीच्या सार्वभौमत्वाचा उपभोग घ्या. शास्त्रानुसार योग्य वेळी आपण वानप्रस्थास जाऊ शकालच. आपल्या दुःखी नातलगांविषयी अनादर दाखवू नका. सर्व प्राणिमात्राविषयी करुणा हाच धर्म आहे.”

१०. “धर्माची साधना काही केवळ अरण्यातच जाऊन होते असे नाही. नगरात राहून देखील साधूपुरुषांना मोक्षसाधना करता येते. विचार आणि प्रयत्न ही खरी साधने होत. अरण्य आणि श्रमणवेष ही केवळ भित्र्या माणसांची लक्षणे होत.”

११. आपल्यामुळे निर्माण झालेल्या यातनांच्या लाटांनी भरलेल्या खोल दुःख सागरात शाक्‍याचा राजा बुडून गेला आहे. म्हणून समुद्रात बुडणाऱ्या  बैलाप्रमाणे असहाय आणि अनाथ झालेल्या राजाला आपण सोडवावे.”

१२. “जिने आपणाला लहानाचे मोठे केले आणि जिने अगस्त्य लोकांत अजून प्रवेश केला नाही, अशा त्या राणीचा देखील विचार करा. वासरू हरवलेल्या गाईप्रमाणे ती सतत शोक करीत आहे, तिची आपण थोडी देखील चिंता करणार नाही काय?”

१३. “ नराचा वियोग झालेल्या हंसीप्रमाणे किंवा सहचराने अरण्यात टाकून दिलेल्या हत्तिणीप्रमाणे, पती जीवंत असतानाही विधवेप्रमाणे दु:खी-कष्टी असणाऱ्या  आपल्या पत्नीला आपण आपल्या दर्शनाने निश्चित संतुष्ट केले पाहिजे.”

१४. पुरोहिताच्या तोंडचे शब्द ऐकल्यावर गुणीजनांचे गुण लक्षात घेणाऱ्या  भगवंतांनी क्षणभर विचार केला आणि नंतर शांतपणे पुढीलप्रमाणे उत्तर दिले.

 

५.भगवान बुद्धाचे उत्तर

१. “महाराजांच्या मनातील पित्याची माया, विशेषत: त्यांनी माझ्यावर केलेली माया मी जाणतो. तरी देखील दु:खाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे याचा प्रत्यय आल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून जाणे मला भाग पडत आहे.” 

२. प्रियजनांचा वियोग अनिवार्य नसतो, तर आपत्या आवडत्या नातलगांना भेटण्याची कोण इच्छा करू  शकणार नाही? परंतु एकदा वियोग झाला तरीही तो पुन्हा होणारच आहे. म्हणूनच माझे पिताजी प्रेमळ असूनही मी त्यांना सोडून जात आहे.” 

३. “ परंतु महाराजांच्या दुःखाला मी कारण आहे असे जे आपल्याला वाटते ते मला मान्य नाही. कारण स्वप्नवत भेटीमुळे भविष्यांतील वियोगाच्या विचारांनी त्यांना दु:ख होत आहे.”

४. “ यासाठी याबाबत आपले मत निश्चित झाले पाहिजे. वियोगाची विविध स्वरूपे पाहिल्यावर तुम्हाला हे समजले पाहिजे की, पुत्रकिंवा नातलग हे दुःखा चे कारणनाही, तर अज्ञान हेच दु:खाचे कारण आहे.” 

५. “ वाटेत एकमेकांना भेटणाऱ्या  प्रवाश्यांप्रमाणे सर्व प्राणिमात्रांच्या बाबत केव्हा ना केव्हा वियोग होणारच. हे जर अपरिहार्य आहे तर कोणता शहाणा मनुष्य आपल्या प्रियजनांची ताटातूट झाली तर दु:ख करीत बसेल?”

६. “ माणुस स्वजनांना दुसऱ्या  जगात सोडून तो या जगात येतो आणि त्यांना सोडून येथे आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे जातो; ही मानवजातीची कहाणी आहे. जे मुक्‍त आहेत त्यांना भेटणारे आणि सोडून जाणारे याची काय खंत असणार?” 

७. “ प्राणी गर्भ सोडून जन्माला येतो त्या क्षणापासून मृत्यु जर ठरलेलाच आहे, तर मग माझे अरण्यात जाणे अवेळी होत आहे असे तुम्ही का म्हणता?” 

८. ऐहिक वस्तु साध्य करून घेताना एखादी वेळ-अवेळ असेलही. काळ हा सर्व वस्तूंशी अविभाज्यतेने संलग्न असतो असे वर्णन केले जाते. काळ हा जगाला आपल्या विविध परिवर्तनात नेत असतो; परंतु स्तुत्य अशा परमोच्च सुखप्राप्तीसाठी कुठलाही काळ अनुकूलच असतो.” 

९. “ महाराजांनी आपले राज्य मला देण्याची इच्छा दर्शवावी हा पित्याला शोभणारा उदात्त विचार आहे. परंतु आजारी माणसाने हावरटपणाचे अपथ्यकारक अन्न स्वीकारण्या इतकेच मी हा विचार मान्य करणे अनुचित आहे.” 

१०. “ जो राज्याधिकार आभासमय आहे, जेथे चिंता आहे, द्रेष आहेत, थकवा आहे, जेथे सेवेच्या भक्‍तीमुळे अन्याय उद्भवतो तो प्रज्ञावंताने स्वीकारणे कसे उचित ठरेल?” 

११. “ सोनेरी प्रासाद मला आगीने पेटल्यासारखा वाटतो. मिष्टान्न भोजन विष कालवल्यासारखे वाटते. कमलफुलांनी आच्छादलेली शय्या मगरींनी  ग्रासल्यासारखी वाटते. 

 

६ मंत्र्याचे प्रत्युत्तर

१. भगवान बुद्धाच्या सद्वणाला व ज्ञानाला अनुरूप असे निरिच्छ, तर्कशुद्ध व भारदस्त प्रवचन ऐकल्यानंतर मंत्र्याने उत्तर दिले. 

२. “ आपला हा निश्चय अति उत्तम आहे, तो अयोग्य नसला तरी या वेळी मात्र योग्य नव्हे. आपल्या पित्याला त्याच्या वृद्धापकाळी दुःखात लोटून त्याला अशा प्रकारे सोडून जाणे हे आपले कर्तव्य होऊ शकत नाही.”

३. “ आपले मन सूक्ष्मदर्शी निश्चित नाही. ते कर्तव्य, संपत्ती आणि सुख यांची सूक्ष्मदृष्टीने मीमासा  करण्याइतके कुशल नाही. कारण अदृश्य अशा उद्दिष्टासाठी आपण दृश्य अशा उद्दिष्टाचा त्याग करीत  आहात.” 

४. “ दुसरे असे की, काहीजण पुनर्जन्म आहे असे मानतात, बाकीचे लोक पुनर्जन्म नाही असे  आत्मविश्वासपूर्वक सांगतात; म्हणून ज्याअर्थी ह्या प्रश्‍नाबाबत संदेह आहे त्या अर्थी हाती आलेल्या भोगांचा उपभोग घेणे हेच योग्य होय.” 

५. “जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात असेल तर ते आपल्याला जसे मान्य होईल तसा आपण त्याचा उपभोग घेऊ; पण जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात नसेल तर सर्व जगाला निश्चितपणे विनासायास मुक्‍ती मिळाली आहे.” 

६. “ काही लोक पुनर्जन्म आहे असे मानतात. परंतु ते मुक्तीची शक्‍यता मानीत नाहीत. अग्नी ज्याप्रमाणे स्वभावतःच उष्ण असतो आणि पाणी प्रवाही असते त्याप्रमाणे आपल्या क्रियाशक्तीचाही एक विशिष्ट स्वभाव असतो असे ते मानतात.” 

७. “काही लोक म्हणतात की, सर्व वस्तू चांगल्या आणि वाईट व सत्‌ आणि असत्‌ अशा स्वाभाविक  गुणधर्मातून उत्पन्न होतात आणि ज्या अर्थी हे सर्व जग स्वाभाविकपणेच उत्पन्न झाले त्याअर्थी आपले सर्व श्रम व्यर्थ होत.”

८. “ ज्याअर्थी इंद्रियांची क्रिया निश्चित आहे आणि बाह्य वस्तूंचीही अनुकूलता किंवा प्रतिकूलता निश्चित  झालेली असते, त्याअर्थी वृद्धापकाळ आणि दुःख यांच्याशी ज्या गोष्टी निगडीत झालेल्या आहेत त्या कितीही प्रयत्न केले तरी कशा बदलता येतील? त्या सर्व गोष्टी स्वाभाविकपणेच निर्माण होत नाहीत काय?”

९. “पाण्यामुळे अग्नि विझतो आणि अग्नि पाण्याची वाफही करतो ही निरनिराळी तत्वे एकजीव होऊन ती या जगाची निर्मिती करतात.” 

१०. “गर्भाशयातील गर्भ, हात, पाय, पोट, पाठ आणि डोके यांच्या सहित साकार होतो. तो आत्म्याशी संलग्न असतो. हे स्वाभाविकरित्या होते, असे प्राज्ञ सांगतात.” 

११. “काट्यांचा अणकुचीदारपणा कोण उत्पन्न करतो? पशुपक्ष्यांचे निरनिराळे स्वभाव कोण बनवतो? हे सर्व स्वभावत:च उत्पन्न होते; त्यांत इच्छेकडून कोणतीही क्रिया घडत नाही; मग इच्छाशक्ती या नावाची चीज  कशी असू शकेल?” 

१२. “ इतर काहीजण म्हणतात की ईश्वर सृष्टी निर्माण करतो तर मग आत्म्याने जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहाण्याची आवश्यकता काय आहे? जो जगाला गतीमान करतो तोच त्या गतीला विरोध करतो.” 

१३. “ काही लोक म्हणतात की जन्मास येणे आणि नाश पावणे या दोहोंचेही कारण आत्मा आहे; परंतु ते असे म्हणतात की, जन्मास येणे हे विनासायास होते, पण मोक्ष प्राप्ती मात्र प्रयासानेच लाभते.”

१४. “ मनुष्य संपत्ती निर्माण करून पूर्वजांचे त्रण फेडतो. तसेच तो विद्यार्जनाने क्रषींचे आणि यज्ञ करून  देवांचे त्र्घ्ण फेडतो. . मनुष्य ह्या तीन क्रणाचे ओझे घेऊनच जन्माला येतो. या क्रणांतून मुक्‍त होतो त्यालाच खरी मुक्‍ती मिळते.” 

१५. अशा प्रकारे सुज्ञांच्या मते जो या नियमक्रमानुसार प्रयत्न करतो त्यालाच मोक्षप्राप्ती होते; परंतु ते आपल्या सर्व शक्तीने प्रयत्न करण्यास तयार असले तरी त्यांना मोक्ष मिळत नाही. व्यर्थ सायास मात्र त्याच्या पदरी पडतात.”

१६. म्हणून तरुण पुरुषा, तुला मुकतीचीच तळमळ असेल तर विहित नियमांचा अवलंब कर. याप्रमाणे तुला मुक्‍ती मिळेल आणि महाराजांच्या दु:खाचाही अंत होईल.” 

१७. “ अरण्यातून स्वगृही पुनरागमन केल्यामुळे जीवनात निर्माण होणाऱ्या  दोषाविषयी जे चिन्तन करतोस त्याविषयी सांगायचे म्हणजे तू तो विचारच तूर्त सोडून द्यावा. प्राचीन काळीदेखील काही जण अरण्यातून घरी परतले होते.” अंबरीश, द्रुमकेश, राम इत्यादींची उदाहरणे त्याने या बाबतीत दिली.

 

७. भगवान बुद्धाचा मनोनिग्रह

१. राजाचा जणू काय डोळा असलेल्या त्या मंत्र्याचे ते प्रेमळ व राजनिष्ठ उद्गार ऐकल्यावर त्या राजपुत्राने आपला निश्चय जरासुद्धा न डळमळू देता ठामपणे उत्तर दिले. त्याचे उत्तर सुसंबद्ध होते. ते कंटाळवाणे किंवा उतावळेपणाचे नव्हते. 

२. “ एखादी वस्तु अस्सित्वात आहे की नाही या शंकेचे निरसन माझ्या दृष्टीने दुसर्यांच्या शब्दांनी होणार  नाही. तपश्चर्येने किंवा चिंतनाने सत्य निश्चित केल्यावर त्या वस्तूविषयीच्या सत्याचे मी स्वतःच आकलन करीन.” 

३. “अज्ञेय व वादग्रस्त असा सिद्धांत आणि शेकडो पूर्वग्रहांनी युक्‍त असा कोणताही युक्तिवाद मी मान्य करू शकत नाही. कोणता सूज्ञ मनुष्य दुसर्याच्या श्रद्धेवर विसंबून राहील? मानवजात ही अंधारात आंधळ्याने दाखविलेल्या मार्गाने जाणाऱ्या आंधळ्याप्रमाणे आहे.” 

४. “ परंतु सत्य जरी स्पष्टपणे समजले नाही किंवा चांगल्या व वाईटा विषयी संदेह असेल, तरी माणसाने आपले मन चांगल्या गोष्टीवरच केंद्रित करावे. सत्पवृत्तीच्या माणसाला काही व्यर्थ श्रम सुद्धा शेवटी  कल्याणकारक ठरतात.” 

५. “परंतु ही पवित्र परंपरा अनिश्चित आहे हे पाहिल्यानंतरही विश्वसनीय व्यक्‍तींनी जे सांगितले तेच बरोबर होय हे लक्षात घ्या. आणि विश्वसनीयता म्हणजेच निर्दोषता हे लक्षात ठेवा. जो सर्वस्वी निर्दोष आहे तो सत्याचा अपलाप करणार नाही.” 

६. “आणि घरी परतण्याविषयी आपण मला जे सांगितले त्याविषयी बोलावयाचे म्हणजे आपण दिलेली उदाहरणेही प्रमाण होऊ शकत नाहीत. कारण, कर्तव्य ठरविताना ज्यांनी प्रतिज्ञा-भंग केला आहे, अशांची उदाहरणे प्रमाण म्हणून कशी धरता येतील?” 

७. “म्हण्न, सूर्यही कदाचित पृथ्वीवर पडेल, हिमालय पर्वतही आपले स्थान सोडील, परंतु इंद्रियसुखोपभोगासाठी संसारी मनुप्य बनून मी कधीही घरी परत जाणार नाही.”

८. “मी भडकलेल्या अग्नीत प्रवेश करीन, पण माझे उद्दिष्ट साध्य केल्याविना मी घरी परत जाणार नाही.” एवढे बोलून तथागत उठले आणि आपल्या वैराग्ययुक्‍त दृढनिश्चयानुसार पुढे चालू लागले. 

९. त्यांचा अविचल निश्चय ऐकल्यानंतर दुःखाने भारावून विषण्ण नजरेने थोडा वेळ त्याच्या मागोमाग जाऊन तो मंत्री आणि ब्राम्हण अश्रु ढाळीत हळूहळू कपिलवस्तुला परतले. 

१०. राजपुत्राविषयीच्या प्रेमामुळे आणि राजावरील त्याच्या भक्‍तीमुळे ते परत येताना पुन:पुन्हा थांबून मागे वळून पाहू लागले. गले. आपल्या तेजाने जान तळपणार्या, कुणाच्याही हाती न गवसणाऱ्या  त्या तथागताकडे ते पाहूही शकत नव्हते किवा त्यांच्यावरुन दृष्टीही काढू शकत नव्हते. 

११. घरी परतण्यासाठी त्याचे मन वळविण्यात अयशस्वी झाल्यावर तो मंत्री आणि तो उपाध्याय अडखळत्या पावलांनी परत फिरले आणि एकमेकांना विचारू लागले, “आपण्या प्रिय पुत्रासाठी झुरत असलेल्या  राजासमोर आपण जावे तरी कसे आणि त्याची भेट तरी कशी घ्यावी?”

Previous page                                   Next page


The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!