Part III – Conversion of the High and the Holy
Conversion of the High and the Holy PDF in English
द्वितीय खंड: धम्मदीक्षेची मोहीम
भाग तिसरा: उच्चकुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा
Conversion of High and Holy
१. यशसची धम्मदीक्षा
१. वाराणशी नगरात यशस नावाचा एक राजपुत्र राहात होता. तो वयाने तरुण आणि दिसावयास सावयास अत्यंत देखणा होता. तो आपल्या आईवडिलांचा अत्यंत आवडता होता. त्याच्याजवळ विपुल संपत्ती होती. त्याच्याजवळ मोठा लवाजमा असून त्याचे अंत:पुरही मोठे होते. तो आपला सर्व वेळ फक्त नृत्य, मद्यपान आणि विलासात घालवी.
२. काही काळ लोटल्यानंतर त्या सर्वाची त्याला शिसारी आली या गर्तेतून कसे बाहेर पडावे? असल्या जिण्यापेक्षा जीवनाचा अधिक चांगला असा एखादा मार्ग आहे काय? काय करावे हे न कलल्यामुळे आपल्या पित्याचे घर सोडून जाण्याचे त्याने ठरविले.
३. एका रात्री त्याने पित्याचे घर सोडले आणि तो इकडे तिकडे भटकू लागला.फिरता फिरता तो ऋषीपतनाच्या दिशेने वळला.
४. थकवा आल्यावर तो खाली बसला आणि स्वतःशीच मोठंमोठ्याने म्हणू लागला; “मी कुठे आहे? यातून आता मार्ग कोणता? अरेरे! काय ही दुर्दशा! केवढे हे संकट!”
५. ज्या दिवशी तथागताने पंचवर्गीय भिक्खुंना ऋषीपतन येथे पहिले प्रवचन दिले त्याच दिवशी रात्री हा प्रकार घडला. यशस ऋषी पतनला येत असतानाच तेथे राहात असलेले तथागत भगवान बुद्ध पहाटे उठून उघड्या हवेत इकडून तिकडे फेऱ्या घालीत होते. आपल्या भावना व्यक्त करीत येणाऱ्या त्या उमद्या तरुण यशसला भगवंतानी पाहिले.
६. आणि त्याचा तो नैराश्याचा आक्रोश ऐकून भगवंत म्हणाले, “काही दुःख नाही की काही संकट नाही; ये, मी तुला मार्ग दाखवितो” आणि भगवंतानी त्याला आपल्या धम्माचा उपदेश दिला.
७. आणि यशसने जेव्हा तो उपदेश ऐकला तेन्हा तो हर्षभरित झाला. मग त्याने आपली सोनेरी पादत्राणे काढली व तो भगवंताच्या सन्निध जाऊन बसला आणि आदराने त्याने त्यांना वंदन केले.
८. भगवान बुद्धाचे शब्द ऐकून तथागतांनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्याने विनंती केली.
९. नंतर भगवंतांनी त्याला बोलावूनं भिक्खु होण्याविषयी सांगितले. यशसने ते मान्य केले.
१०. आपला पुत्र नाहीसा झाल्याचे समजल्यावर यशसच्या आईवडिलांना अत्यंत दुःख झाले. पित्याने त्याचा शोध लावण्यास सुरुवात केली. ज्या ठिकाणी भगवंत आणि यशस भिक्खुच्या वेषात बसले होते त्या ठिकाणी यशसचा पिता आला आणि त्याने भगवंतांना विचारले, “भगवान, माझा मुलगा यशस याला आपण पाहिले काय?”
११. भगवंत म्हणाले, “महाराज, आत या; आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल. “तो आत गेला आणि आपल्या पुत्राजवळ बसला; पण त्याने त्याला ओळखले नाही.
१२. यशस आपल्याला कसा भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यावर तो भिक्खु कसा झाला हे भगवंतांनी त्याला सांगितले, तेव्हा पित्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्याला फार आनंद झाला.
१३. “बाळ यशस,” पिता म्हणाला, “तुझी आई शोकाने आणि दु:खाने व्याकुळ झाली आहे. घरी परत ये आणि आपल्या आईला पुन्हा सुखी कर.”
१४. नतर यशसने तथागताकडे पाहिले आणि तथागत यशसच्या पित्याला म्हणाले, “यशणने पुन्हा त्या संसारी जीवनात जावे आणि पूर्वीप्रमाणेच ऐहिक सुखाचा उपभोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे काय?”
१५. आणि यशसच्या पित्याने उत्तर दिले, “जर माझा पुत्र यशस याला आपल्याबरोबर राहण्यात फायदा आहे असे वाटत असेल तर त्याला राहू द्या.” यशसने भिक्खु म्हणून राहणेच अधिक पसंत केले.
१६. निरोप घेण्यापूर्वी यशसचा पिता म्हणाला, “भगवान् तथागताने माझ्या घरी माझ्या कुटुंबियांसमवेत भोजन करण्यास समती द्यावी.”
१७. तथागतांनी आपली वस्त्रे परिधान करून भिक्षापात्र घेतले आणि यशसवरोबर ते त्याचा पित्याच्या घरी गेले.
१८. तेथे पोहोचल्यावर यशसची आई आणि त्याची पूर्वायुष्यातील पत्नी यांना ते भेटले. भोजनानंतर तथागतांनी त्या कुटुंबातील सर्व मंडळींना आपल्या धम्माचा उपदेश दिला. तो ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्या उपदेशाचे पालन करण्याचे वचन दिले.
१९. वाराणशीतील एका श्रीमंत कुटुंबात यशसचे चार मित्र होते. विमल,सुबाहु, पुण्यजित आणि गवांपती अशी त्यांची नावे होती.
२०. यशसने बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा आश्रय घेतला आहे असे जेन्हा त्यांना समजले तेम्हा जे त्यांना यशसच्या हिताचे ते आपल्याही हिताचे आहे असे वाटले
२१. म्हणून ते यशसकडे गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी त्याने भगवान बुद्धाला प्रार्थना करावी असे त्यांनी त्याला सांगितले.
२२. यशसने ते मान्य केले आणि भगवान बुद्धाकडे जाऊन तो म्हणाला, “तथागतांनी माझ्या या चार मित्रांना आपला धम्मोपदेश ददेण्याची कृपा करावी.” तथागतांनी ते मान्य केले आणि यशसच्या त्या मित्रांनी धम्मदीक्षा ग्रहण केली.
२. काश्यप बंधूंची धम्मदीक्षा
१. वाराणशीमध्ये काश्यप या नावाचे एक कुटुंब राहात होते. या कुटुंबात तीन पुत्र होते. ते उच्च विद्याविभूषित असून कर्मठ धार्मिक जीवन जगत होते.
२. काही काळानंतर मोठ्या मुलाने संन्यास घेण्याचा विचार केला. त्याप्रमाणे त्याने घर सोडले व संन्यास घेतला, आणि उरूवेला येथे जाऊन त्याने आपला आश्रम स्थापन केला.
३. त्याच्या धाकट्या दोन भावांनी त्याचे अनुकरण केले आणि तेही संन्याशी बनले.
४. ते सगळे अग्निहोत्री किवा अग्निपूजक होते. त्यांनी लांब केस ठेवले असल्यामुळे त्यांना जटिल असे म्हणत.
५. हे तीन भाऊ उरुवेला काश्यप, नदी काश्यप ( निरांजना नदीचा काश्यप ),आणि गया काश्यप ( गया या गावचा काश्यप), या नावाने ओळखले जात.
६. यांपैकी उरुवेला काश्यपाचे पांचशे जटिल अनुयायी होते; नदी काश्यपाचे तीनशे जटिल शिष्य होते; आणि गया काश्यपाचे दोनशे अनुयायी होते. उरुवेला रुवेला काश्यप हा त्याचा प्रमुख होता.
७. उरुवेला काश्यपाची कीर्ती फार दूरवर र पसरलेली होती. तो जीवनमुक्त असल्याचे मानले जात होते. लोक दूरदूरच्या ठिकाणाहून फल्गु नदीवरील त्याच्या आश्रमात येत असत.
८.उरुवेला काश्यपाचे नाव आणि कीर्ती ऐकल्यामुळे तथागतांनी त्याला उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास त्याला आपल्या धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला.
९. त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यावर तथागत उरूवेला येभे गेले.
१०. तथागतांनी त्याची भेट घेतली आणि त्याला उपदेश व दीक्षा देण्याची संधी मिळावी म्हणून ते म्हणाले, “काश्यप, जर तुमचा विरोध नसेल तर मला तुमच्या आश्रमात एक रात्र राहू द्या.”
११. काश्यप म्हणाला, “आपली विनंती मला मान्य नाही. या प्रदेशावर राज्य करणारा मुचलिंद नावाचा एक रानटी नागराजा आहे. तो भयंकर शक्तीमान आहे.अग्नीपूजा करणानऱ्या सर्व सन्याश्यांचा तो कट्टा शत्रू आहे. तो रात्री आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो. तो मला जसा त्रास देईल तसाच तो आपणाला त्रास देईल असे मला वाटते.”
१२. नागलोक तथागतांचे मित्र आणि अनुयायी झाले आहेत हे काश्यपाला माहीत नव्हते, परंतु तथागतांना ते माहीत होते.
१३. म्हणून तथागत पुन्हा विनंती करीत म्हणाले, “तो मला त्रास देण्याची शक्यता नाही. काश्यप, कृपा करा आणि आपल्या अग्रनिशाळेत मला एक रात्र राहाण्यासाठी जागा द्या.”
१४. काश्यप अनेक अडचणी सांगू लागला आणि तथागत त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले.
१५. नंतर काश्यप म्हणाला, “वाद करष्याची माझी इच्छा नाही. मला फक्त काहीशी भीती वाटते, इतकेच. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणेच करू शकता.”
१६. तथागतांनी ताबडतोब अग्रनिशाळेत प्रवेश केला. व तेथे ते जाऊन बसले.
१७. नागराज मुचलिंद नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला. परतु काश्यपाऐवजी तथागत त्या ठिकाणी काणा बसलेले त्याला दिसले.
१८. भगवंत बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांती आणि प्रसन्नता झळकत आहे हे पाहून मूचलिंदाला वाटले की, आपण एका महान विभूतीच्या सान्निध्यात आलो आहोत, आणि तो नतमस्तक होऊन त्यांची पूजा करू लागला.
१९. आपल्या अभ्यागताचे काय झाले असेल या काळजीने अस्वस्थ झाल्यामुलळे काश्यपाला त्या रात्री झोप आली नाही. बहुधा त्याला भस्मसात केले असेल या शंकेनेच तो भीत भीत उठला.
२०. नंतर उजाडल्यावर काश्यप आणि त्याचे एकूण एक अनुयायी काय घडले असावे हे पाहण्यासाठी आले. मुचलिंदाकडून भगवन्तांना काही दुःखापत झालेली तर त्यांना दिसली नाहीच, उलट मुचलिंद भगवन्ताची पूजा करीत असत्याचे त्यांना आढळले.
२१. ते दृश्य पाहुन काश्यपाला वाटले की, आपण एक महान चमत्कार पाहात आहोत.
२२. या चमत्काराचा परिणाम होऊन काश्यपाने तथागतांना आपल्याजवळ राहाण्याची आणि आश्रम स्थापन करण्याची विनंती केली. त्यांची काळजी घेण्याचे त्याने आश्वासन दिले.
२३. तथागतांनी तेथे राहाण्याचे मान्य केले.
२४. त्या दोघांचे हेतू निरनिराळे होते. काश्यपाचा हेतू मुचलिंद नागापासून आपणास संरक्षण मिळावे हा होता. तथागतांना वाटले की, एके दिवशी काश्यपाला आपला धम्मोपदेश देण्याची आपल्याला संधी लाभेल.
२५. पण काश्यपाने त्याविषयी काहीच अनुकूलता दाखविली नाही. तथागत केवळ चमत्कार करणारे आहेत, बाकी काही नाही, असे त्याला वाटले.
२६. एके दिवशी आपण स्वतःच त्या बाबतीत पुढाकार घ्यावा असे तथागतांना वाटले आणि त्यांनी काश्यपाला विचारले, “तुम्ही अर्हन्त आहात काय?”
२७. “जर तुम्ही अर्हन्त नसाल तर या अग्नीहोत्रामुळे तुमचे काय हित होणार आहे?”
२८. काश्यप म्हणाला, “अर्हन्त होणे म्हणजे काय हे मला माहीत नाही. आपण ते मला स्पष्ट करून सांगाल का?”
२९. नंतर भगवंत काश्यपाला म्हणाले, “अष्टांग मार्गापासून च्युत करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अर्हन्त. अग्नीहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही.”
३०. काश्यप हा एक अहंमन्य पुरुष होता. परंतु तथागताच्या विधानांतील सामर्थ्य त्याला जाणवले. प्रथम मनाची नम्रता व शालीनता व्यक्त करून आणि शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करून त्याने हे मान्य केले की, भगवंताच्या बुद्धिमत्तेशी आपल्या क्षुल्लक बुद्धिमत्तेची तुलना करता येणे शक्य नाही.
३१. आणि शेवटी खात्री पटल्यावर अत्यंत नम्रतेने भगवन्ताचा सिद्धांत मान्य करून उरुवेला काश्यप त्याचा अनुयायी झाला.
३२. गुरुला अनुसरून काश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली. काश्यप आणि त्याचे अनुयायी यांना याप्रमाणे पूर्णपणे दीक्षा देण्यात आली.
३३. नंतर उरुवेला काश्यपाने आपल्या सर्व वस्तु आणि यज्ञपात्रे नदीत फेकून दिली. त्या सर्व वस्तु प्रवाहाच्या पृष्ठभागावरून तरंगत खाली वाहात गेल्या.
३४. प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहात असलेत्या नदी काश्यप आणि गया काश्यप यांनी त्या वस्त्रादी सर्व वस्तु अस्ताव्यस्त स्थितीत प्रवाहातून वाहात येत असलेल्या पाहिल्या. तेव्हा ते म्हणाले, “या आपल्या बंधूच्या वस्तु आहेत; त्याने त्या का फेकून दिल्या? काही तरी असाधारण स्थित्यंतर घडले असावे.” ते अतिशय दुःखी आणि अस्वस्थ झाले. ते दोघेही आपल्या पाचशे अनुयायांसह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले.
३५. त्याला आणि त्याच्या अनुयायांना श्रमण वेषात पाहन चमत्कारिक विचार त्यांच्या मनात आले आणि त्याच्या कारणांची त्यांनी चौकशी केली. बुद्धाच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत उरुवेला काश्यपाने त्यांना सांगितली.
३६. “आपल्या भावाने जर असे केले आहे तर आपणही त्याचे अनुकरण करावे” असे ते म्हणाले.
३७. त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केली. नंतर त्या दोन भावांना त्यांच्या सर्व अनुयायांसह धम्म आणि अग्निहोत्र यांविषयी भगवन्ताचे तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरिता आणण्यात आले.
३८. त्या बंधुद्रयाला दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले, “लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नि बाहेर पडतो तसा विचारांच्या गोंधळामुळे अग्नि निर्माण होतो,आणि अज्ञानाचा काला धूर वर येतो.”
३१. “काम, क्रोध व अविज्ञा हे अग्नीप्रमाणे जगातील दुःखाला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टींना भस्मसात् करतात.”
४०. “एकदा हा मार्ग सापडला आणि काम, कोध व अविज्ञा यांचा नाश झाला की त्यांच्याबरोबरच नवी दृष्टी, ज्ञान आणि सदाचरण यांचा जन्म होतो.”
४१. “म्हणून एकदा माणसाच्या अंतःकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की तिच्यामुळे तृष्णा नाहीशी होते, आणि तृष्णा नाहीशी झाली की मनुष्य श्रमण बनतो.”
४२. भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षीचा, अग्नीपूजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि बुद्धाचे शिष्य होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.
४३. काश्यपांची धम्मदीक्षा हा तथागतांचा महान विजय होता. कारण लोकांच्या मनावर त्यांचा जबरदस्त प्रभाव होता.
३. सारीपुत्त आणि मोग्गलान यांची धम्मदीक्षा
१. तथागत राजगृहांत राहात असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहात होता. सुमारे अडीचशे परिव्राजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहात होते.
२. त्याच्या या शिष्यवर्गात सारीपुत्त आणि मोग्गलान या नावाचे दोन तरुण ब्राम्हण होते.
३. संजयाच्या उपदेशाने सारीपुत्त आणि मोग्गलान याचे समाधान झाले नव्हते आणि ते यापेक्षा चांगल्या तत्वज्ञानाच्या शोधात होते.
४. एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खुंपैकी स्थविर अश्वजित आपले एक चीवर परिधान करून आणि भिक्षापात्र व दुसरे चीवर हाती घेऊन राजगृह नगरात भिक्षेसाठी आला.
५. अश्वजिताची धीर-गंभीर चालचलणूक पाहून सारीपुत्त चकित झाला. वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारीपुत्त स्वतःशीच विचार करू लागला. “खरोखर हा पुरुष म्हणजे जगातील एक महान योग्यतेचा भिक्खू आहे. जर मी या भिक्खूकडे गेलो आणि, मित्रा, तू कुणामुळे हे वैराग्य प्राप्त करून घेतलेस? तुझा गुरु कोण? तू कोणता धम्म मानतोस, असे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे?”
६. परंतु, मग सारीपुत्त मनाशी म्हणाला, “ह्या भिक्खुला हे विचारष्याची ही वेळ नव्हे. तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरला आहे. याचकांना उचित अशा पद्धतीने मी जर याच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे?”
७. आणि राजगृहातील आपली भिक्षायात्रा संपविल्यावर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरला. नंतर ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारीपुत्त गेला. त्याच्यासमोर जाऊन त्याने त्याला अभिवादन केले आणि अदबीने त्याच्याशी बोलून तो त्याच्याजवळ उभा राहिला.
८. अश्वजिताच्या जवळ उभा राहून परिव्राजक सारीपुत्ताने त्याला विचारले, “मित्रा, आपली मुद्रा शांत आहे; आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे. आपण कुणामुळे हे वैराग्य धारण केले आहे? आपला गुरु कोण? पण कोणता धम्म मानता?
९. अश्वजित म्हणाला, “मित्रा, शाक्य कुळात जन्मलेला एक महान श्रमण आहे. त्याच्या नावाने मी ही परिव्रज्या धारण केली आहे. तोच माझा गुरु आहे, आणि त्याच्याच धम्माला मी अनुसरले आहे.
१०. “वंदनीय महाराज, आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश दिला आहे?”
११. “मित्रा, मी केवळ एक तरुण शिष्य आहे; मी नुकतीच दीक्षा घेतली आहे, आणि त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे. मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही. पण त्याचा अर्थ काय हे मी तुला थोडक्यात सांगेन.”
१२. नंतर परिव्रज्या सारीपुत्त स्थविर अश्वजितास म्हणाला, “ठीक आहे. आपणाला योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किवा थोडक्यात सांगा. परंतु मला त्याचा अर्थ सांगा. मला फक्त त्याचा अर्थ हवा आहे. शब्दाचे अवडंबर कशाला?”
१३. नंतर अश्वजिताने सारीपुत्ताला भगवान बुद्धाच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला. त्याने सारीपुत्ताचे संपूर्ण समाधान झाले.
१४. सारीपुत्त आणि मोग्गलान हे जरी सख्ये भाऊ नव्हते तरी ते सख्ख्या भावाप्रमाणे राहात असत. त्यांनी एकमेकांना तसे वचन दिले होते. ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुसन्याला सांगावे असे त्यांचे परस्परात ठरले होते.
१५. ठरल्याप्रमाणे मोग्गलान जेथे होता तेथे सारीपुत्त गेला. सारीपुत्ताला पाहुन मोग्गलान म्हणाला, “मित्रा,तुझी मुद्रा शांत आहे. तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे; सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय?”
१६. “होय मित्रा, मला सत्याचे ज्ञान झाले आहे.” “मित्रा, ते ज्ञान तुला कसे झाले?” नंतर सारीपुत्ताने त्याला अश्वजिताबरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगितला.
१७. नंतर मोग्गलान सारीपुत्ताला म्हणाला, “मिता, चल, आपण जाऊ आणि तथागताला भेटू. भगवान तथागतच आपले गुरु होतील.”
१८. सारीपुत्त उत्तरला, “मित्रा, हे अडीचशे परिव्राजकआपल्यामुळेच येथे राहात आहेत, आणि ते आपल्यालाच मानतात. त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू; मग त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते करतील.”
१९, नंतर सारीपुत्त आणि मोग्गलान हे ते परिव्राजक जेथे होते त्या ठिकाणी गेले. त्यांच्या जवळ जाऊन ते त्यांना म्हणाले, “मित्रहो, आम्ही तथागत भगवान बुद्धांना शरण जाणार आहोत. तेच आमचे गुरु अहेत.”
२०. ते उत्तरले, “महाराज, आम्ही आपल्यामुळेच येथे राहतो आणि आम्ही आपल्यालाच मानतो. महाराज, जर आपण त्या थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही तोच मार्ग पत्करू.”
२१. नंतर सारीपुत्त आणि मोग्गलान जेथे संजय होता तेथे गेले. त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले, “मित्रा, आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत. तेच आमचे गुरु आहेत.”
२२. संजय उत्तरला, “छे, छे; मित्रांनो, जाऊ नका. आपण तिघेही ह्या सर्वांची काळजी घेऊ.” दिलि.
२३. सारीपुत्त आणि मोग्गलान यांनी दुसऱ्यादा व तिसर्यादा हेच सांगितले आणि संजयने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले.
२४. नंतर अडीचशे परिव्राजकांना बरोबर घेऊन सारीपुत्त आणि मोग्गलान भगवान बुद्ध जेथे राहात होते त्या राजगृहातील वेळु-वनात गेले.
२५. सारीपुत्त आणि मोग्गलान दुरूनच येत असताना तथागताने पाहिले. त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले,” ते पाहा, भिक्खूहो, दोन सोबती येत आहेत.” सारीपुत्त आणि मोग्गलान यांच्याकडे वोट दाखवून ते म्हणाले, “हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्यद्रय होतील.”
२६. वेळु-वनात पोहोचल्यावर जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते गेले. त्यांच्यासमोर जाऊन त्यांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि आपले मस्तक भगवंताच्या चरणांवर ठेवून ते भगवन्तास म्हणाले, “भगवन्तांनी आम्हाला दीक्षा द्यावी.”
२७. नंतर “एहि भिक्खवें” (भिक्खूंनो, या) हा मंत्र भगवन्तांनी उच्चारला आणि सारीपुत्त, मोग्गलान आणि अडीचशे जटिल बुद्धाचे शिष्य झाले.
४. राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा
१. राजगृह ही मगधराजश्रेणीय बिबिसाराची राजधानी होती.
२. एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षान्तर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येक जण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागला.
३. अशा प्रकारे राजा बिबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले.
४. राजा बिबिसाराने मनात विचार केला, “अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर करावयास लावणे ही साधी गोष्ट- नव्हे. निश्चित तो अर्हत आणि सम्यक् सम्बुद्धच असला पाहिजे. तो विद्वान्, सद्र्तनी, जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला, यात्रिक लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष, आणि देव व मानव यांचा गुरु असला पाहिजे. जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशाच सत्याचा उपदेश तो करीत असला पाहिजे.
५. “ज्याचा आदी, मध्य आणि अंत कल्याणकारक आहे, ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहेत, असाच धम्म तो शिकवीत असला पाहिजे. संपूर्ण निर्दोष, शुद्ध आणि पवित्र जीवनाचाच तो प्रसार करीत असला पाहिजे. त्याच्या सारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य होय.”
६. म्हणून राजा बिबिसार मगधातील द्वादश दशसहतस्त्र ब्राम्हण आणि गुहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तेथे गेला. भगवंताच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांचाजवळ बसला. मगधातील ते दहा ब्राम्हण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागतास आदराने वंदन केले आणि त्यांच्याजवळ बसले. काहींनी तथागतास कुशलक्षेत्र विचारून त्याज्याजवळ जाऊन विनम्रपणे बसले. काही जण हात जोडून तथागतापुढे बसले. काहींनी तथागतास आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्याच्याजवळ बसले. काही जण काही एक न बोलता जवळ बसले.
७. मगधातील त्या द्वादश दशसहस्त्र ब्राम्हणांनी आणि गृहस्थांनी भगवान बूद्धाच्या बरोबर आलेल्या भिक्खुंमध्ये उरुवेला काश्यपाला पाहिले. त्यांच्या मनात विचर आला, “हे कसे काय? हा थोर श्रमण उरुवेला काश्यपाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे, की उरुवेला काश्यप ह्या थोर श्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे?”
८. त्या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून तथागत उरुवेला रुवेला काश्यपाला म्हणाले,उरुवेलवासी, तुला लोक महापुरुष म्हणतात. तुला असे काय आढळले की ज्यामुळे तू अग्नी-पूजा सोडून दिलीस? अग्नीहोत्राचा त्याग केलास, हे कसे काय घडले?”
९. काश्यपाने उत्तर दिले, “रूप, शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया, या वस्तूंचीच यज्ञयागापासून प्राप्ती होऊ शकते. या वस्तू अशुद्ध आहेत हे मला समजल्यामुळेच मला यज्ञयाग आणि आहुती यात गोडी वाटली नाही.”
१०. “पण तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा.”
११. नंतर उरुवेल काश्यप आपल्या आसनावरून उठला. आपले उत्तरीय वस्त्र त्याने एका खांद्यावर नीट ठेवले. भगवंतांच्या चरणी नतमस्तक होऊन त्याने साष्टांग प्रणिपात केला आणि भगवंतांना तो म्हणाला, “तथागत माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे.” तेव्हा मगधातील त्या ब्राह्मणांना आणि गृहस्थांना समजले की उरुवेल काश्यप हा या महाश्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे.”
१२. नंतर त्या द्रादण दशसहतस्त्र ब्राह्मणांच्या आणि गृहस्थांच्या मनांत उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धाने त्यांना आपला धम्माचा उपदेश दिला. एकही काळा डाग न पडलेल्या लेल्या स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो, त्याप्रमाणे बिबिसार ज्यांचा अधिपती आहे अशा त्या मगधवासीय हजारो ब्राम्हण गृहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला. एक हजार लोकांनी तर आपण बुद्धाचे उपासक झाल्याची घोषणा केली.
१३. ते दृश्य पाहुन, धम्म समजल्यावर व त्याचे आकलन झाल्यावर, अनिश्चितता नष्ट झाल्यावर, सर्व शंकांचे निरसन झाल्यावर, आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगधराज श्रेणीय बिबिसार भगवतांना म्हणाला, “भगवान्, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या पाच इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत.”
१४. “भगवन्, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला, मला राज्याभिषेक झाला तर काय बर होईल ! भगवन्, ती माझी पहिली इच्छा होती, ती आता पूर्ण झाली आहे. आणि नंतर, एखादा अर्हत सम्यक्- सम्बुद्ध माझ्या राज्यात आला तर ती किती चांगली गोष्ट होईल ! ही माझी दुसरी इच्छा होती. हे भगवान्, ती आता पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंताची सेवा करणे मला शक्य झाले तर किती बरे होईल! ही माझी तिसरी इच्छा होती. आणि हे भगवान्, ती आता पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंताने मला आपला धम्म शिकवावा अशी माझी चवथी इच्छा होती. हे भगवन्, तीही आता पुरी झाली आहे. आणि त्या भगवंताचा धम्म मला कळावा अशी माझी पाचवी इच्छा होती. हे भगवन्, तीही आता पूर्ण झाली आहे. भगवन् पूर्वी मी राजपुत्र असताना या अशा माझ्या पांच इच्छा होत्या.
१५. “आश्चर्य, हे भगवन् आश्चर्य जे विस्कळित झाले आहे त्याची घडी नीट बसवावी, किंवा जे गुप्त होते ते प्रकट करावे, किंवा वाट चुकलेल्याला मार्ग दाखवावा, किंवा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा आणावा त्याप्रमाणे भगवंतानी अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली, हे केवढे आश्चर्य! भगवन्, भगवान बुद्धाला, या धम्माला, आणि त्याच्या भिक्खू संघाला मी शरण येत आहे. भगवंतांनी आजपासून मला आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा.”
५. अनाथपिडकाची धम्मदीक्षा
१. सुदत्त. हा कोसल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एक रहिवाशी होता. या देशात राजा प्रसेनजित् याचे राज्य होते. सुदत्त हा राजाचा कोषाध्यक्ष होता. गरिबांना उदार देणग्या देत असल्यामुळे सुदत्त हा अनाथपिंडक म्हणून ओळखला जात असे.
२. भगवान बुद्ध राजगृह य्रेथे असताना आपल्या काही खाजगी कामानिमित्त अना्थपिंडक तेथे आला होता. राजगृह येथील ज्या व्यापारी संघाच्या श्रेष्टीशी त्याचा बहिणीचा विवाह झाला होता त्याच्याकडेच तो उतरला होता.
३. तो आला त्या वेळी श्रेष्टीकडे भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्खु यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तयारी चालू असष्याचे त्याला आढळले, की येथे एखादा लग्नसमारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आले असावे, असे त्याला वाटले
४. वस्तुस्थिती समजल्यावर भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला आणि तथागतास भेटण्यासाठी तो त्याच रात्री निघाला.
५. आणि तथागतांनी त्याच क्षणी त्थाच्या हृदयातील शुद्ध भाव ओलखून सांत्वनपर शब्दांनी त्यांनी त्याचे स्वागत केले. आसनस्थ झाल्यावर अनाथपिंडकाने एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली.
६. तथागतानी त्याची इच्छा मान्य करून प्रश्न केला, “आपले जीवन कोण घडवितो? तो ईश्वर, वस्तुमात्राचा निर्माता आहे काय? जर तो निर्माता ईश्वर असता तर सर्व प्राणिमात्रांना आपल्या निर्मात्याच्या सत्तेच्या आधीन राहून निमूटपणे त्याच्यापुढ नमावे लागले असते. कुंभाराच्या हाताने घडविलेल्या मडक्याप्रमाणे त्यांची स्थिती झाली असती. जर ईश्वराने जग निर्माण केलेले असते तर दुःख, आपत्ती किवा. पाप अशासारखी कोणतीच गोष्ट असायला नको होती. कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीही गोष्टींचा उद्गव त्याच्यापासूनच झाला पाहिजे. जर असे नसेल तर त्याच्याखेरीज दुसरे एखादे कारण असले पाहिजे आणि मग तो ईश्वर स्वयंभू असणे शक्य नाही. याप्रमाणे ईश्वरविषयक कल्पनांचा पाडाव होतो, हे तुमच्या लक्षात येईल.”
७. “आणखी असे म्हटले जाते की, ब्रह्म हे जगत्कारण असू शकत नाही. बीपासून झाड होते त्याप्रमाणे आपल्या भोवतालच्या सर्व वस्तु कारणामुळे अस्तित्वात येतात. मग ब्रह्म हे सर्वच वस्तूंचे सारखेच कारण कसे असू शकेल? जर ते सर्वव्यापी असेल तर निश्चितपणे ते त्यांचा निर्माता होऊ शकत नाही.”
८. “आणखी असे म्हटले जाते की, आत्मा हा निर्माता आहे. पण जर आत्मा हा निर्माता असेल तर त्याने सर्व वस्तु सुखकर का केल्या नाहीत? दुःख आणि सुख ही वास्तविक सत्य होत. ती आत्म्याने निर्माण केलेली असणे कसे शक्य आहे?”
९. “दुसरे असे की, निर्माता असा कोणी नाही. किंवा दैव असे काहीएक नाही, आणि कार्यकारणभावही नाही हे विधान तुम्ही मान्य केले तर आपली जीवने घडविण्याचा आणि साध्यानुसार साधने जुळवून घेण्याचे काय प्रयोजन?”
१० “म्हणून आमचे म्हणणे असे की, अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तु या कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत. ईश्वर, ब्रह्म, आत्मा आणि कारणरहित असे दैव यांपैकी कोणीही निर्माता नाही; तर आपल्याच कृत्याचे बरेवाईट परिणाम होत असतात.”
११. “सर्व विश्व ‘प्रतीत्य-समुत्पाद’ म्हणजे कार्यकारणभावाच्या सिद्धांतावर आधारलेले आहे. आणि जी कारणे क्रियाशील असतात ती अमानसिक नसतात. उदाहरणार्थ, पेला ज्या सुवर्णाचा केलेला असतो ते अंतर्बाह्य सुवर्णच असते.”
१२. “म्हणून आपण ईश्वरपूजेच्या आणि त्याच्या प्रार्थनेच्या थोतांडाचा त्याग करु या. ज्यांच्यापासून काहीही फायदा नाही अशा गूढ गोष्टीविषयी निष्फळ कल्पना करीत बसून आपण स्वतःचेच नुकसान करून घेऊ नये. आत्मा आणि स्वार्थीपणा यांचा आपण त्याग करु या, आणि कुशल कर्म करु या, म्हणजे त्यांचे फळही पणास चांगले मिळेल.”
१३. अना्थपिडक म्हणाला, “भगवतांनी जे सागितले त्यातील सत्य मला समजले, आणि आपले मन मोकळे करावे अशी माझी इच्छा आहे. माझे .बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी भगवतांनी मला उपदेश करावा.”
१४. “माझ्या आयुष्यांत मला खूप कामे आहेत आणि विपुल संपत्ती मिळविल्यामुळे मी चिंताग्रस्त झालो आहे. तरीही माझ्या कामांत मला आनंद वाटतो आणि मी त्यासाठी खूप परिश्रम करतो. माझ्या पदरी पुष्कळ नोकर- चाकर आहेत. आणि माझ्या उद्योगधंद्याच्या यशावर त्यांचे जीवन अवलंबून आहे.”
१५. “आपले शिष्प परिव्रज्येच्या सुखाची प्रशंसा करताना आणि जगातील अशांतीला दोष देत असताना मी ऐकले आहे. ते म्हणतात, तथागतांनी आपल्या राज्याचा आणि वारसा हक्काचा त्याग केला आहे आणि सदाचरणाचा मार्ग शोधून काढून निर्वाण कसे प्राप्त करावे याचे सबंध जगाला उदाहरण घालून दिले आहे,.”
१६. “जे न्याय्य असेल ते करावे आणि आपल्या बांधवांना सुखी करावे याविषयी माझ्या मनाला उत्कंठा लागून राहिली आहे; म्हणून मला असे विचारायचे आहे की, माझी संपत्ती, माझे घर, माझा व्यापारउदीम याचा मी त्याग केलाच पाहिजे काय? आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळविण्यासाठी गृहहीन झाले पाहिजे काय?”
१७. आणि तथागत म्हणाले, “उदात्त आणि अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो. जो संपत्तीला चिकटून राहतो त्याने तिचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक चांगले. परंतु, जो संपत्तीला चिकटून राहात नाही आणि ती जवळ असूनसुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तर्हेने करतो तो आपल्या बांधवांना वरदान ठरेल.”
१८. “माझे तुम्हांला असे सांगणे आहे की, तुमचा जो जीविनव्यवसाय आहे त्यातच तुम्ही रहा आणि परिश्रमपूर्वक आपल्या धंद्यात लक्ष द्या. जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाहीत तर त्यांची. अभिलाषा त्यांना गुलाम करते.”
१९, “केवळ निष्क्रिय जिणे जगण्यासाठी जो भिक्खू संसारत्याग करतो त्याचा काहीही फायदा होत नाही. कारण आळसाचे जिणे घृणास्पद होय; निष्क्रियतेचा तिरस्कारच केला पाहिजे.”
२० “माणसाने गृहहीन व्हावे किंवा संसारत्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय त्याने संसारत्याग करावा असे तथागताचा धम्म सागत नाही. माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे, आपले चित्त शुद्ध करावे, सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे, असे तथागताचा धम्म सागतो. ”
२१. “आणि लोक काहीही करोत, कारागीर, व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून ते या जगात राहोत, किंवा संसारत्याग करून धार्मिक चिंतनात ते आपले आयुष्य घालवोत, मात्र आपल्या अंगीकृत कार्यात त्यांनी आपले अंतःकरण ओतले पाहिजे. त्यांनी मेहनती आणि उत्साही असले पाहिजे. पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्श न होणाऱ्या कमलाप्रमाणे ते असतील; जीवनसंघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्रेष करीत नसतील, आणि या जगात ते स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील, तर आनंद, शांती आणि समाधान ही खात्रीने त्यांच्या मनात वास करतील.”
२२. अनाथपिंडकाला सत्याचे हे दर्शन सर्वोत्कृष्ट, साधे आणि शहाणपणाचे असल्याचे दिसून आले.
२३. याप्रमाणे खऱ्या तत्वज्ञानात स्थिर झाल्यामुळे त्याने भगवान बुद्धाच्या चरणाशी मस्तक नमविले, आणि हात जोडून त्याने त्यांना उपासकाच्या दीक्षेची विनंती केली.
६. राजा प्रसेनजित याची धम्मदीक्षा
१. नंतर, भगवान बुद्ध आल्याचे ऐकून राजा प्रसेनजित आपल्या राजेशाही इतमामासह जेतवन विहारात गेला. हात जोडून वंदन करीत तो म्हणाला,
२. “माझे हे क्षुद्र आणि अप्रसिद्ध राज्य खरोखर आज भाग्यवान झाले आहे.कारण आपल्यासारखा सत्याचा राजा, धर्मराज, जगन्नायक उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कशी ओढवतील?”
३. “ज्या अर्थी आता मला आपल्या पवित्र चरणांचे दर्शन झाले आहे त्या अर्थी आपल्या धर्मामृताचे प्राशन करू द्या.”
४. ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे, तर धर्मरूपी धन शाश्वत आणि अविनाशी आहे. ऐहिक जीवन जगणार्या राजाचेही जीवन दुःखी असते, परंतु पवित्र जीवन जगणार्या सामान्य माणसालाही मनःशाती लाभते.”
५. सुखाची हाव आणि अभिलाषा ह्यांना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून आणि ही संधी योग्य आहे असे जाणून भगवंत म्हणाले,
६. “हीन स्थितीत जन्माला अलेल्या लोकांनी धर्मपरायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल आदरभाव वाटतो; मग पूर्वपुण्याई लाभलेल्या अशा स्वतंत्र राजाला त्याच्याबद्दल किती आदर वाटत असेल?”
७. “आणि म्हणून मी माझा धम्म थोडक्यात समजावून सांगत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकावे व आत्मसात करावे.”
८. “आपली बरीवाईट कृत्ये त नेहमी छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करतात.
९. “सर्वांत अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हदयाची!”
१०. “आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एका मुलाप्रमाणे माना. त्यांच्यावर जुलूम करु नका; त्यांचा नाश करु नका, आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा. कुमार्गाच्या विचारांचा त्याग करा व सन्मार्गाने जा, दुसर्यांना पायदळी तुडवून स्वतः उच्चपदी चढू नका. दुःखिताला सुख द्या आणि त्याला आपला मित्र माना.”
११. “राजेशाही बडेजावास अधिक महत्व देऊ नका, किंवा तोंडपूजा करणाऱ्याची गोड शब्दांत केलेली स्तुती ऐकू नका.”
१२.“तपश्चर्येने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसतो. म्हणून धम्माचे चिंतन करा व सदाचरणाच्या नियमाचे महत्व ओळखा.”
१३. “दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे पर्वत आपल्याभोवती सर्वत्र उभे आहेत. आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकेल.”
१४. “मग अन्याय करण्यात काय फायदा आहे?”
१५. सर्व शहाणे लोक शारीरीक सुखोपभोगांची उपेक्षा करतात. ते कामवासनांचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनाचा अवलंब करतात.
१६. “झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे राहू शकतील? जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञच मजला पाहिजे.”
१७. “ज्याला हे ज्ञान झाले आहे, त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते. ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच होय.”
१८. “सर्व पंथांची शिकवण याच्यावरच केंद्रित झाली पाहिजे; कारण त्याच्याखेरीज ज्ञान अशक्य आहे.”
१९, “हे सत्य केवळ क्रषीमुनींच्यासाठी नाही. प्रत्येक मानव-प्राण्याशी त्याचा संबंध आहे. व्रतस्थ भिक्खु आणि कौटुंबिक जीवन जगणारा सामान्य मनुष्य यांच्यात या बाबतींत काहीही फरक नाही. क्र्षींचीही अधोगती होऊ शकते, आणि सामान्य कुटुंबवत्सल माणसेही ऋषीपदाला पोहोचू शकतात.”
२० “कामवासनेच्या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो. सगळे जग त्या भरतीत वाहुन जाते. जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा ही नौका आहे, आणि विचार हे तिचे सुकाणू आहे. धम्म तुम्हांला असा आदेश देतो की, तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा.”
२१. “आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे, म्हणून आपण सत्कर्मेच करावीत.
२२. “आपल्या हातून दुष्कृत्ये होऊ नयेत म्हणून आपण आपले विचार तपासून पाहू या. कारण आपण जे पेरतो तेच आपणाला मिळते .”
२३. “प्रकाशातून अंधाराकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. अंधारातून गडद अंधाराकडे आणि संधिप्रकाशातून अधिक उज्वल प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात. सूज्ञ मनुष्याला अधिक प्रकाश पाहिजे असतो, म्हणून तो प्रकाशाचाच उपयोग करील. तो अविरतपणे सत्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच प्रगती करीत राहील.”
२४. “सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा. ऐहिक वस्तूंच्या व्यर्थत्वाविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे समजावून घ्या.”
२५. “मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या. सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका, आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा. असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाल टिकेल.”
२६. भगवान बुद्धाची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात साठविली, आणि त्यांचा उपासक होण्याचे त्यांना वचन दिले.
७. जीवकाची धम्मदीक्षा
१. जीवक हा राजगृहातील जगृहाताल शालवती ग॥लवता नावाच्या वेश्येचा मुलगा होता.
२. अनौरस असल्यामुळे जन्मल्याबरोबरच ते मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगावर टाकून देण्यात आले होते.
३. त्या मातीचा ढिगाऱ्याजवळ बरेचसे लोक त्या मुलाकडे पाहात उभे राहिले होते. राजकुमार अभय त्या बाजूने जात होता. त्याने लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, “ते जिवंत आहे.”
४. म्हणून त्या मुलाला जीवक असे नाव मिळाले. अभयाने त्याला दत्तक घेतले आणि त्याचे पालनपोषण केले.
५. जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांना वाचविण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली.
६. म्हणून अभयाला न कळविता आणि त्याची संमती न घेताच तो तक्षशिला विद्यापीठात गेला आणि तेथे सात वर्षे त्याने वैद्यकीचा अभ्यास केला.
७. राजगृहाला परतल्यावर त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच काळात या व्यवसायात त्याने मोठे नाव कमाविले आणि कीर्ती मिळविली.
८. साकेत येथील एका श्रेष्ठीची बायको ही त्याला मिळालेला पहिला रोगी असून तिला बरी करण्याबद्दल त्याला सोळा हजार कार्षापण, एक गडी, एक मोलकरीण आणि एक घोडागाडी इतका मोबदला मिळाला.
९, त्याचा लौकिक ओळखून अभयाने याने त्याला राहाण्यासाठी आपल्या राजवाड्यातच जागा दिली.
१०. राजगृह येथे त्याने बिबिसाराला त्रासदायक अशा भगंदर रोगापासून मुक्त केले; आणि त्यासाठी बिबिसाराच्या पाचशे राण्यांचे सर्व अलंकार त्याला बक्षीस म्हणून मिळाले असे सांगतात.
११. जीवकाने उल्लेखनीय असे केलेले इतर काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्टीवर केलेली कवटीची, आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्याच्या एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया या होत.
१२. राजा आणि राजस्त्रिया यांचा राजवैद्य म्हणून जीवकाची नेमणूक झाली होती.
१३. परंतु जीवकाचा भगवान बुद्धाकडे फारच ओढा होता. त्यामुळे तो भगवंतांचा आणि त्यांच्या संघाचा वैद्य म्हणूनही काम करीत असे.
१४. तो भगवंताचा शिष्य झाला. तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून भगवंतांनी त्याला भिक्खूची दिक्षा दिली नाही.
१५. बिबिसाराच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा अजातशत्रू याच्या पदरी राहिला; आणि अजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला.
८. रट्टुपालाचे धर्मांतर
१. एकदा बऱ्याचशा भिक्खूंसह कुरु देशात, भिक्षा मागीत फिरत असताना कुरुंची नगरी थुल्लकोठिठत येथे भगवंत राहिले.
२. कुरूंना हे समजल्यावर भगवंताचा आदर करण्यासाठी ते त्यांच्याकडे गेले.
३. ते बसल्यावर भगवंतांनी धम्मोपदेश केला. भगवंताचा उपदेश ऐकल्यावर थुल्लकोठ्ठीत येथील रहिवाशांच्या ब्राह्मण प्रमुखांनी भगवंताचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आणि वंदन करून ते निघून गेले.
४. त्यांच्यामध्ये तेथील एका प्रमुख घराण्यात जन्माला आलेला रट्टपाल नावाचा एक तरुण होता. त्याच्या मनात विचार आला, “माझ्या समजुतीप्रमाणे भगवतांनी दिलेल्या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे उच्च जीवन जगणे ही सोपी गोष्ट नाही.”
५. “मी केस कापून टाकले, दाढी काढली, पीत वस्त्र धारण केले, गृहत्याग करून गृहहीन परिव्राजक झालो तर काय हरकत आहे ?”
६. ब्राह्मण फारसे दूर गेले नव्हते. अशा वेळी रट्टुपाल परत आला आणि भगवंतांना वंदन करून त्याने आपल्या मनातील विचार त्यांना सांगितला, आणि प्रवज्ज्या व उपसंपदा देऊन त्यांच्या संघात आपल्याला प्रवेश देण्याची त्याने विनंती केली.
७.भगवंतांनी विचारले. “असे करण्यास तुला तुझ्या मातापित्याची संमती आहे काय ?
८. “नाही, भगवन्.”
९. “ज्यांना त्यांच्या मातापित्यांची संमती नाही त्यांना मी प्रवज्ज्या देत नाही.”
१०. “महाराज, ती संमती मिळविण्याचा मी प्रयत्न करीन.” तो तरुण मनुष्य म्हणाला आणि उठून मोठ्या आदराने भगवंताचा निरोप घेऊन तो आपत्या आई-वडिलांच्याकडे गेला. त्याने त्यांना आपले विचार सांगितले आणि भिक्खु होण्यासाठी त्यांची परवानगी मागितली.
११. आईवडिलांनी पुढीलप्रमाणे उत्तर दिले, “बाबा रट्टुपाल, तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस, आणि आमचा फार लाडका आहेस. तू सुखाने जगत आहेस आणि सुखातच वाढला आहेस. दुःखाचा तुला मुळीच अनुभव नाही. जा; खा,पी, मजा कर, आणि सुखाने सत्कृत्ये करीत राहा. आम्ही तुला संमती देत नाही.”
१२. “तुझ्या मृत्यूने आम्ही अनाथ होऊ आणि आम्हाला हे जीवन सुखाचे वाटणार नाही; आमच्या जवळ असताना तू गृहत्याग करून भिक्खू व्हावेस याला आम्ही संमती का द्यावी ?”
१३. दुसऱ्यादा आणि पुन्हा तिसऱ्यादा रट्टुपालाने तीच विनंती केली, आणि त्याच्या आईवडिलांनी ती पुन्हा नाकारली.
१४. आईवडिलांची संमती न मिळाल्यामुळे, त्या तरुणाने उघड्या जमिनीवर लोळण घेतली आणि “एक तर मी येथेच प्राण देईन, नाही तर भिक्खू तरी होईन’ असे त्याने स्पष्ट सांगितले.
११. त्याला भिक्खू होण्यास विरोध दर्शवीत त्याचे आई-वडील त्याला उठून बसायला विनवणी करू लागले, पण तो तरुण मतुष्य एक शब्दही बोलला नाही. त्यांनी त्याला पुन्हा दोनदा- -तीनदा विनवणी केली पण तरीही तो एक शब्दही बोलला नाही.
१६. म्हणून रट्टपालाच्या आईवडिलांनी त्यांच्या मित्रांना भेटून सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनी त्याला जे सांगितले होते तेच आग्रहपूर्वक त्याला सांगण्यास त्यांनी त्यांना सांगितले.
१७. त्याच्या मित्रांनी त्याला तीन वेळा विनंती केली पण तो एक शब्दही बोलला नाही. तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आईवडिलांकडे आले आणि म्हणाले, “तिथेच उघड्या जमिनीवर पडून तो सांगत आहे की, ‘मी एक तर मरून जाईन नाहीतर भिक्खु होईन. जर तुम्ही त्याला संमती दिली नाही तर तो कधीही जिवंत उठणार नाही.’ पण तुम्ही संमती दिलीत तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीस तरी पडेल. जर भिक्खु होऊन राहाणे त्याला आवडले नाही तर तो दुसरे काय करू शकेल? तो येथेच परत येईल, म्हणून तुम्ही त्याला संमती द्या?”
१८. “ठीक, आम्ही संमती देतो, पण जेव्हा तो भिक्खू होईल तेव्हा त्याने इथे येऊन आमची भेट घेतली पाहिजे.”
१९. रट्टुपालाचे मित्र त्याच्याकडे गेले आणि त्याच्या आईवडिलांनी संमती दिल्याचे त्यांनी त्याला सागितले. परंतु तो भिक्खू झाल्यानंतर त्याने त्यांना भेटण्यासाठी आले पाहिजे हेही त्यांनी सांगितले.
२०. तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो भगवंताकडे गेला. त्यांना वंदन केल्यावर एका बाजूला बसून तो म्हणाला, “मी भिक्खु होण्याबद्दल आई-वडिलांची संमती मिळिवली आहे, मला संघात प्रवेश द्यावा अशी भगवंतांना माझी विनंती आहे.”
२१. भगवंताच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला. थुल्लकोटीत येथे आवश्यक तितके दिवस राहून पंधरवड्यानंतर भगवान बुद्ध भिक्षा यात्रेसाठी श्रावस्तीस जावयास निघाले आणि त्या ठिकाणी अनाथ पिंडकाच्या सुखदायी जेतवनात त्यांनी वस्ती केली.
२२. ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक गृहत्याग करून गृहहीन भिक्कू होतात तो उपरतींच्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ आदर्श भिक्खु रट्टुपालाला एकान्तवास, कष्ट, दृढता व नि:स्वार्थ यानी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच मिळाला.
२३. नंतर तो भगवंताकडे गेला आगि वंदन केल्यावर एका बाजूला बसून म्हणाला, “भगवंताच्या अनुज्ञेने आई- वडिलांना भेटावयास जाण्याची माझी इच्छा आहे.”
२४. रट्टुपालाच्या मनातील विचारांची आपल्या मनात बारकाईने तपासणी करून आणि आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करुन सामान्य माणसाचे खालच्या पातळीवरील ल जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही हे ओळखून भगवंतानी त्याला केव्हाही जाण्याची अनुज्ञा दिली.
२५. तेव्हा उठून अत्यंत आदराने भगवंताचा निरोप घेतल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवून त्याने आपले चीवर व भिक्षापात्र घेतले आणि भिक्षा यात्रेसाठी तो थुल्ल-कोट्टित येथे गेला. त्या ठिकाणी त्याने कुरुराजाच्या मृगवनात वस्ती केली.
२६. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच चीवर-वस्त्र परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन तो भिक्षेसाठी नगरात गेला आणि तेथे भेदभाव न करता घरोघर फिरत असताना तो आपल्याच वडिलांच्या घरी आला.
२७. त्याचे वडिल घरातील दिवाणखान्यात आपले केस विचरीत होते. त्यांनी रट्टुपालास दुरून येत असताना पाहिले आणि ते म्हणाले, “या बैराग्याच्या कारट्यांनीच माझ्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला भिक्खु करून टाकले.”
२८. याप्रमाणे स्वत:च्या वडिलांच्याच घरी रट्टुपालाला काहीही मिळाले नाही; नुसता नकार तर नाहीच पण शिव्या मात्र मिळाल्या.
२९. त्याच वेळी घरातील तील एक दासी आदल्या दिवशीचा शिळा भात फेकून देण्याच्या बेतात होती; तेव्हा रट्टुपाल तिला म्हणाला; “ताई, ते जर टाकून देणार असशील तर ते माझ्या या पात्रात घाल.”
३०. त्याच्या भिक्षापात्रात भात घालीत असताना त्याचा आवाज, हात आणि पाय तिने ओळखले आणि सरळ मालकिणीकडे जाऊन मोठ्याने म्हणाली, “मालकीणबाई, धाकटे धनी परत आले आहेत.”
३१. “तू म्हणतेस ते खरे असेल तर तू यापुढे दासी राहाणार नाहीस.” आई म्हणाली आणि आपल्या मुलाच्या आगमनाची वार्ता ऐकल्याचे आपल्या पतीला सांगण्यासाठी घाईघाईने निघून गेली.
३२. कुंपणाजवळ बसून रट्टुपाल तो शिळा भात खात असतानाच त्याचा पिता तेथे येऊन उद्गारला, “बाळ, तू शिळा भात खात आहेस हे खरे आहे काय? तू आपल्या स्वत:च्या घरी का येत नाहीस?
३३. “गृहस्था, गृहत्याग करून गृहहीन बनलेल्या आम्हांला घर कसले? मी तुमच्या घरी आलो होतो; पण मला तेथे काहीही मिळाले नाही,नुसता नकारही मिलाला नाही. शिव्या मात्र मिळाल्या.”
३४. “ये बाळ, आपण घरात जाऊ.” “नको गृहस्था, आजचे माझे जेवण झाले आहे.” रट्टठुपाल म्हणाला.
३५. “ठीक आहे; पण बाळ, उद्या तुझे भोजन इथे करशील असे वचन दे.”
३६. भिक्खु रट्टुपालने मौन धारण करून आपली संमती दिली.
३७. नंतर त्याचे वडील घरात गेले. तेथे त्यांनी सोन्यारुप्याच्या लगडी रचून त्यावर गालिचे अंथरण्याची आज्ञा दिली. पूर्वाश्रमीच्या रट्टुपालाच्या स्त्रिया असलेल्या आपल्या सुनांना आपल्या पतीला आवडत असलेला सर्व प्रकारचा साजशृंगार करण्यास सांगितले.
३८. रात्र संपल्यावर घरात भोजनासाठी उत्तम पदार्थ तयार करून ठेवण्याची आज्ञा त्याच्या पित्याने दिली. आणि तयारी झाल्यावर मुलाला कळविले. दुपार झाल्या बरोबर चीवरे परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खू रट्टुपाल स्वतः साठी ठेवलेल्या आसनावर येऊन ऊन बसला.
३१. नंतर त्या सोन्यारुप्याच्या राशीवरून गालीचे काढण्याची आज्ञा देऊन त्याचा पिता म्हणाला, “ हे तुझे मातृधन आहे, ती तुझ्या पित्याची आणि ती तुझ्या पितामहाची संपत्ती आहे. आनंदाचा उपभोग आणि सत्कृत्ये या दोन्हीसाठी तुला भरपूर संपत्ती आहे.”
४०. “ये बाळ, तुझी श्रमणचऱ्या सोडून दे. सामान्य माणसाच्या जीवनाचा पुन्हा अवलंब कर, भोग उपभोग आणि सत्कृत्ये कर.”
४१. “ गृहस्था, तुम्ही माझा सल्ला ऐका आणि या सगळ्या संपत्तीच्या राशी तुम्ही घेऊन जा आणि गंगा नदीत बुडवून टाका. का? कारण तिच्यामुळे तुम्हाला फक्त दु:ख, शोक, संकटे, मानसिक व शारीरीक यातना आणि क्लेशच भोगावे लागतील.”
४२. भिक्खू रट्टुपालाच्या पायाना मिठी मारून त्याच्या पूर्वाश्रमीच्या स्त्रिया विचारू लागल्या,ज्यांच्यासाठी आपण हे उच्च जीवन जगत आहात त्या अप्सरा आहेत तरी कशा?”
४३. तो म्हणाला, “ भगिनींनो कोणत्याही अप्सरांसाठी मी त्या जीवनाचा अवलंब केलेला नाही.”
४४. आपल्याला त्याने भगिनी म्हटल्याचे ऐकल्याबरोबर त्या स्त्रिया मूच्छित होऊन जमिनीवर पडल्या.
४५. रट्टुपाल आपल्या पित्याला म्हणाला, “गृहस्था, मला अन्न द्यावयाचे असेल तर दे. मला त्रास देऊ नकोस.”
४६. “भोजन तयार आहे. बाळ, सुरुवात कर,” पिता म्हणाला. आणि मुलगा पोटभर जेवेपर्यंत त्यांनी त्याला उत्तमोत्तम पदार्थांचे भोजन दिले.
४७. भोजन झाल्यावर कुरु राज्याच्या मृगवनांत तो परतला आणि दुपारच्या भर उन्हात तो तेथे एका झाडाखाली बसला.
४८. आपण पहायला येण्यापूर्वी ते वन स्वच्छ करून ठेवावे अशी राजाने त्याच्या पारध्याला आज्ञा दिली होती. आणि तो आज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना तेथे एका झाडाखाली दुपारच्या भर उन्हात रट्टुपाल बसला असल्याचे त्यानी पाहिले आणि राजाला जाऊन बातमी दिली की, “ वन व्यवस्थित आहे. परंतु ज्याच्याविषयी महाराजांनी अनेक वेळा ऐकले आहे तो रट्टुपाल तेथेच एक झाडाखाली बसला आहे.”
४९. “आज वनाची काळजी करण्याचे कारण नाही.” राजा म्हणाला, “मी आज जाऊन त्या वंदनीय पुरुषाला भेटतो. म्हणून प्रवासासाठी भोजनाची तयारी करण्याची आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही मिरवणुकीने रट्टुपालाला भेटण्यासाठी निघाला.
५०. रथातून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गेल्यावर राजा आपल्या परिवारासह पायी चालू लागला आणि रट्टुपालाकडे आला. परस्परांना अभिवादन केल्यावर राजाने उभे राहूनच रट्ठपालास एका पुष्पराशीवर बसण्याची विनंती केली.
५१. “नाही महाराज, आपण तेथे बसा. माझे हे आसन आहेच.”
५२. आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला, “रट्टुपाल, माणसाने चार हानी भोगाव्या लागतात. की, ज्याच्यामुळे तो आपल्या डोक्याचे व दाढीमिशांचे केस काढून टाकतो. पीतवस्त्रे धारण करतो आणि गृहत्याग करून गृहहीन होतो. त्या चार हानी म्हणजे (१) म्हातारपण (२ ) अनारोग्य (३ ) दारिद्रय (४) आणि नातलगांचा मृत्यू ह्या होत.”
५३. “समजा, एक बऱ्याच वयाचा म्हातारा मनुष्य आहे. वृद्धत्वामुळे थकलेला आणि मरणाच्या पंथास लागलेला आहे. आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपती मिळविण्यात किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची ची त्याला जाणीव आहे, म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच म्हातारपणाची हानी म्हणतात. परंतु तू तर भर ज्वानीत आहेस, तुझे केस काळेभोर असून वृद्धत्वाचा त्यांना स्पर्शही झालेला नाही. तू रूपयौवनसंपन्न आहेस. तुझा वृद्धत्वामुळे होणारा कोणताही तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की, ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास ?”
५४. “किवा समजा की, रोगी यातना भोगणारा किंवा अतिशय आजारी असा मनुष्य आहे. तो आपली स्थिती ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळविण्याकरिता किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची याला जाणीव आहे. म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच अनारोग्याची हानी म्हणतात. परंतु तू आजारी नाहीस की, यातनाही भोगीत नाहीस. तुझ्या नेमस्त प्रकृतीमुळे तुझी पचनशक्ती चांगली राहिली आहे; म्हणून अनारोग्यामुळे जो तोटा होतो तसा तुझा झालेला नाही. मग तुला असे काय समजले? किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की, ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करावा?”
५५. “किंवा तिसऱ्या एका माणसाचे उदाहरण घेऊ. श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यानंतर आणि क्रमाक्रमाने ते वैभव गमावल्यानंतर तो आपली स्थिती ओळखतो. अधिक संपत्ती मिळविण्यातील किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव होते. म्हणून तो परिव्राजक होण्याचे ठरवितो. याला नातलगांच्या मृत्यूमुळे झालेला तोटा म्हणतात. परंतु तुला तर मित्र आणि नातलग खूप आहेत. नातलगांच्या मृत्यूमुळे जो तोटा होतो तसा सुझा तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा यू काय पाहिलेस किंवा ऐकलेस की, ज्यामुळे गृहत्याग करण्याचा मार्ग तू पत्करलास?”
५६. रट्टुपाल उत्तरला, “महाराज, मी गृहत्याग करून गृहहीन झालो याचे कारण असे की, ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक् सम्बुद्धांनी सांगितलेली चार तत्त्वे मी समजावून घेतली, पाहिली आणि ऐकली. ती चार तत्वे अशी-
(१) जग अनित्य असून सतत बदलत आहे.
(२) जगाला रक्षणकर्ता किंवा पालनकर्ता असा कोणीही नाही.
(३) आपली कशावरही मालकी नाही, प्रत्येक वस्तु मागे ठेवूनच आपणाला गेले पाहिजे.
(४) तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे. आणि त्यामुळे जगात अनेक उणीवा असून ते सारखे धडपडत आहे.”
५७. “विलक्षण! खरोखरच उत्कृष्ट!” राजा उद्गारला. “ भगवंतांनी सांगितले ते किती बरोबर आहे!”