Conversion of the Criminals

CONVERSION OF THE FALLEN AND THE CRIMINALS

Part VIII – Conversion of the Fallen and the Criminals

Conversion of the Fallen and the Criminals PDF in English

खंड २ : धम्म दीक्षेची मोहीम

भाग आठवा: पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा

Conversion of the Criminals

Previous page                                      Next Book

 

१. एका उडाणटप्पूची धम्मदीक्षा

१. प्राचीनकाळी राजगृहात एक गुंड राहात होता. तो आईवडिलांना आणि वरिष्ठांना मुळीच मान देत नसे. आपल्या हातून काही चूक झाली तरी पुण्यप्राप्तीच्या आशेने तो यज्ञयाग आणि सूर्य, चन्द्र व अग्नी यांची पूजा करी आणि मगरमस्त राही. 

२. परंतु, पूजा आणि बलिदान यांसारखे शारीरीक कष्टाचे विधी कितीही केले तरी, सतत तीन वर्षे दीर्घोद्योग करूनही त्याच्या मनाला शांती लाभेना.

३. शेवटी श्रावस्तीला जाऊन भगवान बुद्धांची चौकशी करण्याचे त्याने ठरविले. तेथे पोहोचल्यावर बुद्धाचे तेजस्वी व्यक्‍तीमत्व पाहुन त्याने त्यांच्या पायांवर लोटांगण घातले आणि आपल्याला किती आनंद झाला आहे, हे सांगितले.

४. नंतर भगवंतांनी त्याला पशुंना बळी देण्यातील मूर्खपणा आणि ज्या विधीचा हृदयावर काहीही परिणाम होत नाही, आणि ते ज्यांच्यासाठी करावयाचे त्यांच्याविषयी कसलाही आदरभाव किंवा कर्तव्यबुद्धी यांची जाणीव होत नाही, अशा विधींचा निरुपयोगीपणा समजावून सांगितला. आणि शेवटी भगवंतांनी अशा काही तेजस्वी गाथा म्हटल्या की, त्यांच्या मुद्रेवरील तेजामुळे आजूबाजूच्या सर्व प्रदेशासह ते स्थान प्रकाशमान झाले. 

५. तेव्हा ग्रामस्थ आणि विशेषत: मुलाचे आईबाप त्यांची पूजा करण्यासाठी तेथे आले. 

६. मुलाच्या त्या मातापित्यांना पाहुन आणि आपल्या मुलाच्याविषयी त्यांनी सांगितलेली हकीकत ऐकून बुद्धांनी स्मित केले आणि पुढील गाथा म्हटल्या. 

७. “थोर पुरुष हा संपूर्णपणे निरिच्छ असतो. तो स्वतः स्वयंप्रकाशित असतो आणि तो प्रकाशातच राहतो. जर एखाद्या वेळी त्याच्यावर दु:खाचा आघात झाला तरी तो विचलित होत नाही. निर्भयपणे तो आपली बुद्धिमत्ता व्यक्‍त करतो.” 

८. “शहाणा मनुष्य (भद्र) ऐहिक व्यवहाराशी आपला संबंध ठेवीत नाही; संपत्ती, संतती, जमीनजुमला यांची त्याला इच्छा नसते. नेहमी शीलाचे सावधानतेने पालन केल्यामुळे आणि प्रज्ञेचा मार्ग अनुसरल्यामुळे तो भलत्याच सिद्धान्ताच्या (संपत्तीच्या किवा मानाच्या) नादी लागत नाही.”

९. “अस्थिर जीवन हे वाळवंटातील वृक्षाप्रमाणे असते. हे ओलखून प्रज्ञावान मनुष्य अस्थिर मनाच्या आपल्या मित्राला सुधारण्याचा आणि अपवित्रतेतून सद्वणाकडे (पावित्र्याकडे ) त्याला वळविण्याचा प्रयत्न करीत असतो.” 

२. अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्मदीक्षा

१. कोशल देशाचा पसेनदी ( प्रसेनजित ) नावाचा राजा होता. त्याच्या राज्यात अंगुलीमाल नावाचा एक आडदांड दरोडेखोर होता. खून आणि रक्‍तपात यामुळे त्याचे हात नेहमी रक्‍ताने बरबटलेले असत आणि तो कुणालाही कधी दया दाखवीत नसे. त्याच्यामुळे गावे ओसाड झाली होती; नगराची चा नासधूस झाली होती आणि प्रदेश उद्धवस्त झाले होते. 

२. ठार मारलेल्या प्रत्येक माणसाचे एक एक बोट कापून घेऊन तो त्यांची माळ गळ्यात घालीत असे आणि म्हणूनच त्याचे नाव “अंगुलीमाल” असे पडले. 

३. एकदा भगवन्त श्रावस्ती येथे जेतवनात राहात असताना त्यांनी अंगुलीमालाने केलेल्या नासधुशीविषयी ऐकले. तथागतांनी त्याला सदाचरणी मनुष्य बनविण्याचे ठरविले. म्हणून एके दिवशी भोजन झाल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवला आणि आपले चीवर व भिक्षापात्र घेऊन ते दरवडेखोर अंगुलीमाल याला शोधण्यासाठी निघाले. 

४. ते त्या बाजूला प्रवास करीत चाललेले पाहून गुराखी, मेंढपाळ, शेतकरी आणि वाटसरू मोठयाने ओरडले. “श्रमण, त्या वाटेने जाऊ नका! त्या वाटेने तुम्ही डाकू अंगुलीमालाच्या हाती पडाल.” 

५. “दहा, वीस, तीस, इतकेच नव्हे तर चाळीस माणसे देखील जरी एकत्र जमुन त्या वाटेने गेली तरी तो सगळा जथा त्या डाकूच्या हाती सापडतो.” परंतु एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालू लागले. 

६. दुसर्यांदा आणि पुन्हा तिसर्यांदा जवळपास असलेल्या लोकांनी त्यांना पुन्हा इशारा दिला. तरीदेखील एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालतच राहिले. 

७. काही अंतरावरून त्या दरवडेखोराने भगवंतांना येत असताना पाहिले आणि जेथे चाळीस पन्नास  प्रवाश्यांचा जथा देखील त्याच्या वाटेने जाण्यास धजत नसे तेथे हा तपस्वी त्या वाटेने एकटाच येत असलेला पाहून त्याला फार आश्चर्य वाटले.  आणि या तपस्व्याला  ठार मारण्याचा विचार चार त्याच्या मनात आला. म्हणून ढाल-तलवार आणि धनुष्यबाण घेऊन तो भगवंताचा पाठलाग करू लागला. 

८. भगवंत जरी आपल्या नेहमीच्याच चालीने चालत होते. तरी सर्व प्रयत्न करूनही तो दरोडेखोर त्यांना गाठू शकला नाही. 

९. तो विचार करू लागला की, “ही मोठी आश्चर्याची आणि विचित्र गोष्ट आहे. यापूर्वी हत्ती, घोडा, गाडी किवा हरीण भरवेगात धावत असताना देखील मी त्यांना पकडीत असे आणि आता हा तपस्वी आपल्या नेहमीच्या चालीने चालत असताना सर्व प्रयत्न करूनही मी त्याला गाठू शकत नाही!” म्हणून तो थांबला आणि मोठ्याने ओरडून त्याने भगवन्तांना थांबण्यास सांगितले. 

१०. दोघांची भेट झाल्यावर भगवंत म्हणाले, “अंगुलीमाला, मी तुझ्यासाठी थांबलो आहे. दुष्कर्म करण्याचा आपला व्यवसाय तू सोडून देशील काय? तुला आपलासा करावा, सदाचरणाच्या मार्गावर तुला आणावा  म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो आहे. तुझ्यातील साधुत्व अजून मेलेले नाही. जर त्याला तू संधी देशील तर त्यामुळे तुझ्यात बदल घडून येईल.” 

११. भगवतांच्या शब्दांनी भारल्यासारखे अंगुलीमालाला वाटले आणि तो म्हणाला, “अरेरे, या ऋषीने माझा माग काढलाच.” 

१२. त्याने उत्तर दिले, “आपण आपल्या दिव्य वाणीने मला आपल्या दुष्कर्माचा त्याग करावयास सांगता आहात म्हणून मी तसा प्रयत्न करावयास तयार आहे.”

१३. स्वतः ठार केलेल्या लोकांच्या बोटाची आपल्या गळ्यातील माळ त्याने एका खोल खडूयात फेकून दिली  

आणि भगवंताचे पाय धरून संघप्रवेशाची इच्छा व्यक्‍त केली. 

१४. देवांचे आणि मानवांचे मार्गदर्शक भगवान बुद्ध म्हणाले, “हे भिक्खू, माझ्या मागोमाग ये.” आणि ही आज्ञा झाल्यापासून अंगुलीमाल भिक्खु बनला. 

१५. आपल्या परिवारातील एक भिक्खु म्हणून अंगुलीमालाला बरोबर घेऊन भगवंत श्रावस्तीला आपल्या सुखनिवासाकडे निघाले. त्या वेळी राजा पसेनदीच्या अन्त:प्रासादाच्या दाराशी लोकांचा प्रचंड समुदाय जमला होता आणि “आपण जिंकलेल्या प्रदेशात अंगुलीमाल या नावाचा एक दांडगा डाकू अत्याचार करुन निरुपद्रवी लोकांना ठार करतो आहे, किंवा जखमी करतो आहे आणि स्वतः मारलेल्या लोकांच्या बोटांची एक माळ आपल्या गळ्यात घालण्यात धन्यता मानतो आहे, त्याचा निःपात करा” असे तो समुदाय ओरडत होता. पसेनजिताने त्याला मारण्याचे आश्वासन दिले; पण त्यात प्याला यश आले नाही. 

१६. एके दिवशी सकाळी राजा प्रसेनजित भगवंताना भेटण्यासाठी जेतवनात गेला. भगवंतानी विचारले, “राजा, काय झाले? मगधाच्या सेनीय बिबिसाराचा, वैशालीच्या लिच्छवींचा किवा दुसर्या एखाद्या शत्रूचा त्रास सुरू झाला आहे काय?”

१७. “नाही भगवन्‌; तशा प्रकारचा कोणताही त्रास नाही. माझ्या राज्यात अंगुलीमाल या नावाचा एक दरोडेखोर खार आहे. त्याने माझ्या राज्यात घुडगूस घातला असून तो माइ्या प्रजाजनांवर अतिशय अत्याचार करीत असतो. त्याचा मला निःपात करावयाचा आहे; पण मी त्यात अयशस्वी ठरलो आहे.” 

१८. “राजा, मुंडन केलेला काषायवस्त्र धारण करून भिक्खुसारखा दिसणारा, जो कोणाला मारीत नाही, जो चोरी करीत नाही, खोटे बोलत नाही, जो दिवसातून एक वेळच जेवतो आणि श्रेष्ठ जीवन जगतो, अशा अंगुलीमालाला तू पाहिलेस तर तू काय करशील?”

१९, “भगवन, मी त्याला वंदन करीन, त्याला भेटण्यासाठी उठून उभा राहीन, किंवा त्याला बसण्याचे  आवाहन करीन अथवा वस्त्रे व इतर आवश्यक वस्तु स्वीकारण्या विषयी त्याला विनंती करीन किंवा त्याच्या रक्षणाची आणि सुरक्षितेची व्यवस्था करीन. परंतु असल्या दुष्ट आणि पापी माणसावर सद्रणाची छाया तरी पडणे कधी शक्‍य आहे काय?” 

२०. त्या क्षणी आपल्या अगदी जवळ बसलेल्या अंगुलीमालाकडे आपला उजवा हात दाखवून भगवंत म्हगाले, “राजा, हा पहा अंगुलीमाल!” 

२१. हे ऐकताच राजा भयाने निःशब्द झाला आणि त्याच्या अंगावरील केस न्‌ केस ताठ उभे राहिले. हे पाहून भगवंत म्हणाले, “भिऊ नकोस, राजा. भिऊ नकोस. या ठिकाणी भिण्याचे काही कारण नाही.” 

२२. त्यामुळे राजाची भीती कमी झाली आणि तो स्थविर अंगुलीमालाजवळ जाऊन म्हणाला, “आपण खरोखर अंगुलीमाल आहात काय?” होय, “महाराज!” 

२३. “महाशय, आपल्या पित्याचे गोत्र कोणते होते? आणि आपल्या मातेचे कोणते?” “माइया पित्याचे गोत्र गार्ग्य होते आणि माझ्या मातेचे गोत्र मंत्राणी (मैत्रायणी) होते. 

२४. “गार्ग्य मैत्रायणीपुत्रा, सुखी हो, आपल्या सर्व गरजा पुरविण्याची मी काळजी घेईन.” 

२५. परंतु आता अंगुलीमालाने वनवासाची, भिक्षेवर जगण्याची व तिहीपेक्षा अधिक चिवरे न वापरण्याची प्रतिज्ञा केली होती. म्हणून आपल्याला तीन वस्त्रे वापरायला मिळाली आहेत या कारणास्तव त्याने राजाने देऊ केलेले साहाय्य नाकारले.

२६. नंतर राजा भगवंताच्या जवळ गेला आणि त्यांना वंदन करून एका बाजूला बसल्यावर म्हणाला, “आश्चर्य आहे भगवंत, खरोखर हे आश्चर्य आहे. अमानुषाला माणसाळविण्याची, अपराजिताला पराभूत करण्याची आणि अशांताला शांत करण्याची भगवंतांची केवढी ही किमया! हा असा पुरुष आहे. ज्याला काठीने किंवा तरवारीने मी जिंकू शकलो नाही, परंतु काठी किंवा तरवार यांचा मुळीच उपयोग न करता भगवन्तांनी त्याला जिंकले! भगवंत, मला आता गेलेच पाहिजे. कारण बरीच कामे मला अद्याप उरकावयाची आहेत. 

२७. “राजन, आपल्या मर्जीप्रमाणे होऊ द्या.” नंतर आपल्या आसनावरून उठून राजाने भगवंतांना अत्यंत आदराने अभिवादन केले व तो निघून गेला. 

२८. एके दिवशी चीवर परिधान करून आणि हातात भिक्षापात्र घेऊन अंगुलीमाल भिक्षेसाठी श्रावस्तीत गेलाअसताना एका माणसाने त्याला वीट फेकून मारली, तर दुसर्याने सोटा मारला; तिसर्याने खापरीचा तुकडा त्याच्यावर फेकून मारला. . त्यामुळे त्याचे डोके रक्‍तबंबाळ झाले. त्याच्या भिक्षापात्राचे तुकडे तुकडे झाले व त्याची वस्त्रे फाटून गेली आणि तशा स्थितीत तो भगवंताच्या समोर येऊन उभा राहिला. तो जवळ येत असताना भगवंत त्याला म्हणाले, “हे सगळे सहन कर. हे सगळे सहन कर.”

२९. याप्रमाणे भगवान बुद्धाची शिकवण स्वीकारून डाकू अंगुलीमाल एक संतपुरुष बनला.

३०. मुक्‍तीचा आनंद व्यक्‍त करीत तो म्हणाला, “ज्याच्या ठायी पूर्वी अनास्था होती तो आता आस्था दाखवू लागतो, आपले पूर्वजीवन जो सद्रणांनी झाकून टाकतो आणि आपल्या तारुण्यात जो बुद्धाला शरण जातो तो वादळातून मुक्‍त झालेल्या चंद्राप्रमाणे सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो.”

३१. “माझ्या शत्रूंनी ही शिकवण समजून घ्यावी व या मार्गाचा अवलंब करावा आणि सतत त्या मार्गाने अवलंबन करणार्या प्रज्ञापुत्रांना त्यांनी अनुसरावे. माझ्या शत्रूंनी विनम्रता आणि क्षमाशीलतेचा संदेश वेळीच ऐकावा आणि आपल्या जीवनात तो आचरणात आणावा.”

३२. “स्वत:ला अंगुलीमाल? म्हणवून व प्रवाहपतित होऊन मी दरोडेखोराचे जीवन जगत होतो, पग भगवंतांनी त्या प्रवाहातून मला किनार्याला आणले. ‘अंगुली माल’ म्हणून मी रक्‍ताने माखलेला होतो; आता माझा उद्धार झाला आहे.”

 

३. इतर गुन्हेगारांची धम्मदीक्षा

१. राजगृहाच्या दक्षिणेस शुमारे २०० योजने दूर एक पर्वत होता.

२. या पर्वतात एक घोर आणि निर्जन अशी दरी होती आणि तिच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता.

३. पाचणे दरवडेखोर या ठिकाणी काणा राहात असत अरणि त्या वाटेने न जाणार्या प्रवाश्यांची लूटमार मार आणि खून करीत. 

४. त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवीत असे; परंतु ते नेहमी निसटून जात. 

५. जवळच राहात असलेल्या भगवान बुद्धांनी या लोकांच्या स्थितीचा विचार केला. त्यांना स्वत:च्या वर्तनाचे स्वरूप कळत नव्हते आणि जरी भगवंत त्यांना शिकविण्यासाठी त्या जगात आले होते तरी ते त्या लोकांच्या दृष्टीस पडले नव्हते. किंवा त्यांच्या धम्माची माहितीही त्यांच्या कानांवर पडली नव्हती म्हणून भगवंतानी त्यांच्याकडे जाण्याचे ठरविले. 

६. आपल्या निश्चयानुसार त्यांनी श्रीमंत माणसाचा वेष धारण केला. खड्ट आणि धनुष्य यांसह, उत्तम झूल घातलेल्या उमद्या घोड्यावर ते स्वार झाले. त्याच्या जीनाला सोन्या-चांदीच्या पिशव्या लटकत ठेवल्या होत्या व घोड्याचा लगाम मौल्यवान जडजवाहीर जवाहार लावून सजविला. 

७. दरीत शिरल्याबरोबर त्यांचा घोडा जोराने खिंकाळला; तो आवाज ऐकल्या बरोबर ते पाचशे दरवडेखोर निघाले आणि त्या प्रवाशाला पाहुन उद्गारले : “ लूट करण्याची अशी संधी आपल्याला कधी मिळाली नव्हती;चला, जल्दी करून आपण त्याला पकडू या.” 

८. तो प्रवासी निसटून जाऊ नये म्हणून ते त्याला घेरू लागले. पण त्याला पाहाता क्षणी ते जमिनीवर पडले. 

९. ते जमिनीवर पडल्यानंतर उद्गारले, “ अरे देवा हे काय आहे? अरे देवा हे काय आहे?”

१०. त्यावर त्या प्रवाश्याने त्या डाकूंना समजावून सांगितले की, ह्या सर्व संसाराला घेरून टाकगारे दु:ख एवढे प्रचंड आहे की, त्याच्या मानाने ते डाकू दुसर्याला जे दु:ख देतात किंवा स्वत: सोसतात त्याच्या यातना काहीच नाहीत. अश्रद्धा आणि संदेह यामुळे ज्या जखमा आणि यातना निर्माण होतात, त्या, ते डाकू दुसर्यांना ज्या जखमा आणि यातना करतात किंवा स्वत: सोसतात त्यापेक्षा अधिक आहेत. धर्मोपदेश एकाग्रतेने ऐकण्याने जी प्रज्ञाजागृती होते त्यांनीच ह्या अश्रद्धा व संदेहाच्या जखमा भरुन येऊ शकतात. दुसर्या कशाने त्या भरु शकत नाहीत. नंतर तो प्रवासी पुढे म्हणाला: 

११. “ दु:खासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणतीही नाही. दुष्कृत्या सारखा खोलवर रुतणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही. धार्मिक शिकवणुकीच्या एकनिष्ठ परिपालनाखेरीज यावर दुसरा कोणताही उपाय नाही. या शिकवणुकीमुळे आंधळ्याला दुष्टी मिळते, भ्रांत झालेल्यांना ज्ञान प्राप्त होते.” 

१२. “आंधळ्यांना दृष्टी मिळावी त्याप्रमाणे या शिकवणुकीमुळे लोकांना या प्रकाशामुळे मार्गदर्शन होते.”

१३. “ म्हणुन, अश्रद्धा दूर करण्यास, दु:ख नाहीसे करण्यास आणि आनंद मिळवून देण्यास ही धम्माची शिकवण समर्थ आहे. जे ती ऐकतात त्यांनाच ही सर्व श्रेष्ठ प्रज्ञा प्राप्त होते.” 

१४. “ ज्याने सर्वांत अधिक पुण्य संपादिले आहे तोच ह्या पदवीला पात्र ठरतो.” 

१५. हे ऐकल्यावर त्या दरोडेखोरांना आपल्या दुष्ट जीवनाचा पश्चात्ताप झाला. त्यांच्या अंगात रुतलेले बाण गळून पडले आणि त्यांच्या जखमा भरून निघाल्या. 

१६. नंतर ते भगवंतांचे शिष्य झाले. आणि त्यांना स्वास्थ व शांति यांचा लाभ झाला. 

 

४. धम्मीक्षेची जोखीम

१. पूर्वी भगवान बुद्ध राजगहापासून ५०० योजने अंतरावर असलेल्या एका पर्वतमय प्रदेशात राहात होते. त्या पर्वतमय प्रदेशात १२२ लोकांची एक टोळी राहात होती. हे लोक शिकार करून मारलेल्या जनावरांचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करीत.

२. भगवान बुद्ध त्या ठिकाणी जातात आणि नवरे शिकारीला गेले असताना तेथे दिवसा घरी एकट्याच राहिलेल्या स्त्रियांना ते धम्मदीक्षा देतात. त्या वेळी ते पुढीलप्रमाणे उपदेश करतात. 

३. “जो दयाळू आहे तो प्राण्याची हत्या करीत नाही. (किंवा प्राण्याची हत्या न करणे हा दयाळू माणसाचा धर्म होय. ) तो प्राण्यांच्या जीवाचे रक्षण करण्यास नेहमी समर्थ असतो.”

४. धर्म अमर आहे; या धर्माचे पालन करणार्यांवर कधीही संकट कोसळणार नाही.”

५. “विनयशीलता, ऐहिक भोगाविषयीची उपेक्षा, कोणाला कष्ट न देणे, कोणाला क्रोध येईल असे न करणे, हे ब्रम्हलोकाचे लक्षण आहे.”

६. दुर्बलाविषयी कणव, बुद्धाच्या शिकवणुकीनुसार शुद्ध जीवन, किती आवश्यक आहे याची जाणीव, आवश्यक ते मिळाल्यावर थांबणे जन्ममरणाच्या फेर्यातून सुटण्याचे हे साधन आहे. हे शब्द ऐकताच त्या स्त्रियांचे परिवर्तन झाले. आणि पुरुष परत आल्यानंतर भगवंतांना ठार मारण्याची जरी त्या पुरुषांची इच्छा होती तरी त्यांच्या स्त्रियांनी त्यांना आवरुन धरले आणि हे मैत्रीचे सूक्त ऐकताच त्यांचेही परिवर्तन झाले.

७. आणि भगवन्तांनी पुढील उद्गार काढले. 

८. “जो प्राणिमात्रांशी मैत्रीभावाने वागतो आणि त्यांच्याविषयी दयाशील असतो अशा माणसाला अकरा गोष्टींचा लाभ होतो.” 

९. “त्यांचे शरीर नेहमी निरोगी (सुखी) असते; त्याला शांत झोप येते आणि तो अभ्यासमग्न असतो. त्या  वेळीही त्याला एकाग्रता लाभते.” 

१०. “त्याला वाईट स्वप्ने पडत नाहीत. देव त्याचे रक्षण करतात आणि माणसे त्याच्यावर प्रेम करतात. विषारी वस्तूंचा त्याला त्रास होत नाही. आणि युद्धातील नाशापासून त्याचा बचाव होतो; अग्नी व पाणी यांचा उपसर्ग त्याला पोहोचत नाही.”

११. तो जिथे जिथे राहातो तिथे तिथे यशस्वी होतो आणि मेल्यानंतर ब्रम्ह लोकात जातो. हेच ते अकरा लाभ होत. 

१२. हा उपदेश ऐकल्यावर भगवंतांनी त्या स्त्रिया आणि पुरुषांना संघात प्रवेश दिला आणि त्यामुळे त्यांना शांती लाभली.

Previous page                                      Next Book


The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!