Enlightenment and the Vision of a New Way
Enlightenment and the Vision of a New Way PDF in English
प्रथम खंड : सिद्धार्थ गौतम – बोधिसत्व बुद्ध कसे झाले
भाग ४ : ज्ञानप्राप्ती व नव्या मार्गाची दृष्टि
Enlightenment and the Vision of a New Way
१. नव्या प्रकाशासाठी चिंतन
१. अन्नभक्षण करून ताजातवाना झात्यानतर गौतम आपत्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्याला दिसून आले.
२. ते अपयश इतके मोठे होते की, कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते. त्याला अर्थातच वाईट वाटले. पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही.
३. एखादा मार्ग सापडेल अशी त्याला नेहमीच आशा वाटे. त्याला इतकी आशा वाटे की, सुजाताने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी रात्री त्याला पाच स्वप्ने पडली; आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा व्हा आपणाला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्याने ने त्या स्वप्नांचा अर्थ लावला. त्याने आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला. सुजाता दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र नैरंजना नदीत फेकून तो म्हणाला, “जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊ दे! नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे!” आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहु लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले.
५. आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर येऊन त्याने उरुवेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाला लागला. तेथे त्याने एक पिपळवृक्ष पाहिला. आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्याने विचार केला.
६. चारही दिशांची परीक्षा केल्यावर त्याने पूर्व दिशेची निवड केली. कारण, सर्व प्रकारची अपवित्रता घालविण्यासाठी मोठ मोठे ऋषी नेहमी याच दिशेची निवड करतात.
७. गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळवृक्षाखाली बसला. ज्ञान प्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वत:शीच म्हणाला, “कातडी, स्वायु आणि हाडे हवी तितकी सुकून गेली अणि माझ्या शरीरातील रक्तमांस शुष्क झाले तरी चालेल परंतु पूर्ण ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही.”
८. नंतर गर्जेद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघे वटवृक्षांखाली बसलेत्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाली आणि तो पूर्ण ज्ञानप्राप्ती निश्चित करून घेणार दशा खत्रीने त्यांनी
त्याची पुढीलप्रमाणे स्तुती केली-
९. “हे मुनी, ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच!”
१०. “हे कमलनयना, ज्या अर्थी आकाशात, पंख फडफडवीत असलेले पक्ष्यांचे थवे आपल्याला आदराने वंदन करीत आहेत आणि आकाशात मंदमंद वायुलहरी वाहात आहेत, त्या अर्थी आपण आपले ईप्सित साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चित!”
११. चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना ज्यांना पुराणांतरी माराची (कामाची) मुले असे म्हणतात त्यांनी त्याच्या मनावर आक्रमण केले.
१२. कदाचित माराची ही अवलाद आपल्याला पराभूत करतील आणि आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भीती वाटली.
१३. दुष्ट वासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राम्हण बळी पडले हे प्याला माहीत होते.
१४. म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे धैर्य एकवटून तो माराला म्हणाला- “माझ्यामध्ये श्रद्धा आहे, शौर्य आहे आणि शहाणपण आहे. तुम्ही दुष्ट वासनांनी माझा पराभव कसा करू शकाल? नद्याचे प्रवाह देखील वाऱ्या कोरडे पडतील. . पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही. जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते!”
१५. एखादा गोड घास मिळेल, या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केले.
१६. गोड पदार्थ न आढळल्यामुळे कावळा तिथून निघून जातो. त्याचप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी निराशेने गौतमाला सोडून दिले.
२. ज्ञानप्राप्ती
१. चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी चाळीस दिवस पुरेल इतके अन्न गौतमाने गोळा केले होते.
२. मनाची चलबिचल करणारे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर गौतमाने अन्न सेवन केले व तो ताजातवाना झाला आणि त्याच्या अंगी शक्ती आली. अशाप्रकारे ज्ञान प्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने ह त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली.
३. ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. चार पायऱ्या नी त्याने संपूर्ण ज्ञान प्राप्ती करून घेतली.
४. पहिल्या पायरीच्या वेळी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण याचा उपयोग केला. त्याच्या एकांतवासामुले पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली. दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याने त्यात एकाग्रतेची भर टाकली.
६. तिस-या पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोलपणा व सावधानता याचे सहाय्य घेतले.
७. चवथ्या व शेवटच्या पायरीच्या वेळी मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि सावधानतेत समतोलतेची अवस्था आणली.
८. अशा प्रकारे एकाग्र, पवित्र, निष्कलंक, निर्दोष, नग्न, चतुर, खबीर आणि वासनाविरहित अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले.
९. चवथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याचा मार्ग प्रकाशित झाला. त्याला स्पष्टपणे दिसून आले की, जगात दोन समस्या आहेत. जगामध्ये दुःख आहे, ही पहिली समस्या; आणि हे दुःख कसे नाहीसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे, ही दुसरी समस्या.
१०. याप्रमाणे शेवटी, चार अठवडे चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला; अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले. त्याला एक नवा मार्ग दिसला.
३. नव्या धम्माचा शोध
१. नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी र गौतम जेव्हा चिंतनास बसला तेव्हा सांख्य तत्वज्ञानाची पकड त्याच्या मनावर होती.
२. त्याच्या मते जगातील व्यथा आणि दुःख याचे अस्तित्व ही एक निविवाद वस्तुस्थिती होती.
३. तथापि दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास गौतम उत्सुक होता. सांख्य तत्वज्ञानाने ह्या प्रश्नाचा विचार केला नव्हता.
४. आणि म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्याने आपले चित्त केंद्रित केले.
५. स्वाभाविकपणे त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला की, “व्यक््तिमात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती?”
६. त्याचा दुसरा प्रश्न असा होता की; “दुःख नाहीसे कसे करता येईल?”
७. या दोन्ही प्रश्नांचे बिनचूक उत्तर त्याला मिळाले, ते उत्तर म्हणजे, सम्यक् संबोधी (खरी ज्ञानप्राप्ती).
८. याच कारणामुळे त्या पिंपळवृक्षाला ‘बोधिवृक्ष’ असे नाव मिळाले.
४. बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर ‘बुद्ध’ होतात
१. ज्ञानप्राणीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता. ज्ञानप्राप्तीनंतर ते ‘बुद्ध’ झाले.
२. बोधिसत्व कोणाला म्हणावे? आणि बोधिसत्व म्हणजे काय?
३. बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व!
४. बोधिसत्व बुद्ध कसा होतो?
५. बोधिसत्व हा क्रमाने जीवनची दहा स्थित्यंतरे बोधिसत्व राहिला पाहिजे. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे?
६. बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत ‘मुदिता’ (आनंद) प्राप्त करून घेतो. सोनार ज्याप्रमाणे चांदीतले गतल कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो की, प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. हे जाणत्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणिमात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते.
७. जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला ‘विमलता’ (शुद्धता) प्राप्त होते. या वेळी बोधिसत्वाने कामवासनेचे सर्च विचार मनातून काढून टाकलेले असतात. तो दयाशील होतो. तो सर्वांना दया दाखवितो. तो लोकांच्या दुर्गुणाची खुशामत करीत नाही किंवा त्याच्या सद्वणाविषयी त्यांना नाउमेद करीत नाही.
८. जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत ‘प्रभाकारी’ अवस्था (तेजस्विता) प्राप्त करून घेतो. या वेळी बोधिसत्वाची बुद्धी आरणशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. अनात्म व अनित्यता यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते. आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळविण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो.
९. जीवनाच्या चवथ्या अवस्थेत तो ‘अर्चिष्मती’ (अग्नीप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता) प्राप्त करून घेतो. या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग, चतुर्विध ध्यान, चतुविध व्यायाम, चतुर्वीध इच्छाशक्ती आणि पंचशील यांच्यावर आपले चित्त केंद्रित करतो.
१०. जीवनाच्या पाचव्या अवस्थेत तो ‘सुदुर्जया’ (जिंकण्यास कठीण अशी स्थिती) प्राप्त करून घेतो. सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील सबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते.
११. जीवनाच्या सहाव्या अवस्थेत तो ‘अभिमुखी’ होती. या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण याची ‘बारा निदाने’ पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते; आणि ‘अभिमुखी” नावाच्या त्या ज्ञानामुने अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणिमात्रांविषयी त्याच्या अंत:करणात अगाध करुणा उत्पन्न होते.
१२. जीवनाच्या सातव्या अवस्थेत बोधिसत्व ‘दूरग्डमा’ (दूर जाणे) ही अवस्था प्राप्त करतो. बोधिसत्व आता दिक्कालातीत असतो; तो अनंताशी एकरूप झालेला असतो. तथापि, सर्व प्राणिमात्रांविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नाम-रुप अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत मात्र तो इनरांच्यापेक्षा अगदी निराळा असतो. कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही त्याप्रमाणे जगातीर मोह त्याला चिकटून राहात नाही. तो आपल्या सहचारांतील तृष्णा शांत करतो. परोपकारबुद्धी, सहनशीलता, व्यवहारचातुर्य, शक्ती, शांत वृत्ती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा याची तो जोपासना करतो.
१३. या अवस्थेत असतांना त्याला धर्माचे ज्ञान होते, परंतु लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्याची त्यांना ओळख करून देतो आपण व्यवहारचातुर्याने
आणि सहनशीलतेने वागने पाहिजे हे त्याला कळते. लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो; कारण केवल अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतुबद्दल गैरसमज करुन घेतळे आहेत हे त्याच्या कळत असते. परंतु त्याच वेळी प्राणिमत्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह यत्किचितही कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडेही तो पाठ फिरवीत नाही, म्हणून दुर्देव त्याला सन्मार्गावरून कधीही च्युत करू शकत नाही.
१४. जीवनाच्या आठव्या अवस्थेत तो ‘अचल’ होतो. या अढल अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात. जे जे चांगले आहे ते ते तो स्वाभाविकतःच अनुसरतो; तो जी जी गोष्ट करील त्या त्या गोष्टीत तो यशस्वी होतो.
१५. जीवनाच्या नवव्या अवस्थेत तो ‘साधुमति’ होतो. ज्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत, आणि त्यांचे त्याला पूर्ण आकलन झालेले असून जो कालातीत होतो अशाची ‘साधुमति’ ही अवस्था असते.
१६. जीवनाच्या दहाव्या अवस्थेत तो ‘धर्ममेध’ होतो. बोधिसत्वाला बुद्धाची दिव्यदृष्टी प्राप्त होते.
१७. बोधिसत्व ही दहा सामर्थ्ये प्राप्त करून घेतो; कारण बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता असते.
१८. बोधीसत्वाची स्थित्यंतरे होत असताना त्याने ही दहा सामर्थ्ये मिळविली पाहिजेत, इतकेच नव्हे तर त्याने “दहा पारमितां” चाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे.
१९. एक ‘परमिता’ ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे. पारमितांचा खास व्यासंग पायरीपायरीने केला पाहिजे. एका जीवनावस्थेत एकच पारमिता असली पाहिजे. एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये.
२०. अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो ‘बुद्ध’ होतो. ‘बुद्ध’ हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय.
२१. बोधिसत्वाच्या या जीवनावस्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धांत देवांच्या अवतारवादाच्या ब्राम्हणोक्त सिद्धांतासारखा वाटतो.
२२. जातकसिद्धांत हा बुद्धाच्या अत्युच्च शुद्धावस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे.
२३. अवतारवादात देवाच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही. अवतारवादी ब्राम्हणोक्त कल्पनेचा अर्थ इतकाच की, देव निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्ताचे रक्षण करतो; मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते.
२४. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व आवश्यक अशा दहा जीवनावस्थांतूनच गेला पाहिजे या सिद्धांताला दुसऱ्या कोणत्याही धर्मावर तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आन्हान देत नाही.