In Search of New Light

HE AND HIS CONTEMPORARIES

In Search of New Light

In Search of New Light PDF in English

प्रथम खंड : सिद्धार्थ गौतम – बोधिसत्व बुद्ध कसे झाले

In Search of New Light

Previous page                                                Next page

१. भृगुऋषींच्या  आश्रमात

१. इतर मार्गाचे अनुसरण करण्याच्या इच्छेने आलारकालाम यांची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले. 

२. मार्गात त्याने भृगु क्रषींचा आश्रम पाहिला व तो पाहण्याच्या इच्छेने त्याने आश्रमात प्रवेश केला.

३. सरपणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राम्हण हातांत सरपण, फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते. तपस्येत अग्रगण्य आगि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपापल्या पर्णकुटीत न जाता ते गौतमास पाहण्यासाठी जमा झाले.

४. आश्रमवासीयांच्या आदरसत्काराचा स्वीकार केल्यावर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले.

५. मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या  सूज्ञ सिद्धार्थाणे स्वर्गप्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या  तपस्व्यांनी भरलेला तो आश्रम पाहिल्यावर तो पलीकडे गेला. 

६. त्या सौजन्यशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवनात तपस्व्यांनी चालविलेल्या तपश्चर्येचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले. 

७. त्यानंतर तपश्चर्येचे तंत्र आत्मसात केलेल्या भूगुऋषींनी गौतमाला तपश्चर्येचे निरनिराळे सर्व प्रकार व त्यांची फले समजावून सांगितली. 

८. “पाण्यातून उत्पन्न होणारे, न शिजवलेले अन्न, कंदमुले आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधुतपस्व्यांचे अन्न होय; परंतु तपश्चर्येचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात.”

९. “काही जग पक्ष्याप्रमाणे दाणे टिपून आपली गुजराण करतात, काही जण हरणाप्रमाणे गवत खातात, तर काही जण सर्पाप्रमाणे हवेवर जगतात. जणू काय ते मुंग्यांची वारळेच झाली आहेत.” 

१०. ‘दुसरे काही जण महत्प्रयासाने दगड खाऊन आपली भूक भागवितात. तर काही जण आपल्याच दातानी भरडलेले धान्य खातात. इतर काही जण दुसर्यांच्यासाठी अन्न शिजविल्यावर जर काही उरले तिक ते स्वत:साठी ठेवतात.”

११. “दुसरे काही जण आपल्या जटांचे भारे पाण्याने सतत भिजवून स्तोत्रे गाऊन अग्नीला दोनदा अर्ध्य अर्पण करतात. आणखी काही जण माशांप्रमाणे पाण्यात बुडी मारून राहतात. त्यांच्या शरिराला कासवे ओरबाडून काढतात.” 

१२. “अशी तपश्चर्या काही काळ केल्यावर उच्च तपश्चर्येने स्वर्गप्राप्ती, तर कमी प्रतीच्या तपश्चर्येने मृत्युलोक मिळतो. दु:खमार्ग अनुसरत्यामुलळेच शेवटी त्यांना सुखप्राप्ती होते. असे म्हणतात की, दुःख हेच पुण्याचे मूळ आहे.”

१३. हे ऐकल्यावर गौतम म्हणाला, “अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहात आहे. तुमचा हा तपश्चर्येचा नियमही मला समजलेला नाही.”

१४. “या वेळी मी इतकेच सांगू शकतो की, ही आपली तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे. तर ऐहिक जीवनातील दु:खाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे. आपण मला जाण्याची आज्ञा द्या. सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करावा, स्वत: समाधि मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्‍न सोडविण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होते किंवा काय ते पाहावे अशी माझी इच्छा आहे.” 

१५. “याप्रमाणे तपश्चर्येत गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला व आत्यंतिक दया दाखविली, परंतु आपणाला मला सोडून दूर जावे लागणार आहे, असा जेव्हा मी विचार करतो तेम्हा माझ्या आप्तस्वकीयांना सोडताना मला जसे दुःख झाले तसेच मला दुःख होते.

१६. “मला येथे राहने आवडत नाही किंवा येथील एखाद्याच्या वर्तनात काही चूक झाली आहे म्हणून मी हे तपोवन सोडून जात आहे, असे नव्हे. कारण पूर्वीच्या ऋषीनी सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ ऋषी  आहात.” 

१७. “या विषयावर ज्यांचे प्रभुत्व आहे त्या आलारकालाम मुनीकडे जाण्याची माझी इच्छा आहे.” 

१८. त्याचा निश्चय पाहून, आश्रमप्रमुख भृगुऋषी  म्हणाले, “राजपुत्रा, तुझे ध्येय हे खरोखरच शूराचे ध्येय आहे. तू तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्‍ती यांचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्‍तीचा मार्ग अवलंबिला आहेस व ध्येयाने प्रेरित झाला आहेस. तू खरोखर शूर आहेस!” 

१९. “तू जे म्हणालास तेच जर तुझे निश्चित उद्दिष्ट असेल तर तू ताबडतोब विध्यकोष्ठास जा. आलारकालाम ऋषी  तेथे राहात आहेत. शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळविले आहे.” 

२०. “त्यांच्याकडून तुला त्या मार्गाचे ज्ञान होईल; परंतु माझी अशी कल्पना आहे की, त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्याच्याही पलीकडील आहे, असे तुला दिसून येईल.” 

२१. गौतमाने त्यांचे आभार मानले आनले मुनिजनांना वंदन करून तो निघाला. त्या मुनींनीही त्याला सन्मानपूर्वक निरोप देऊन ते आपल्या तपोवनात परत गेले. 

 

 २.सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास

१. भृगुऋषीचा आश्रम सोडल्यावर गौतम आलारकालाम मुनींचे वसतिस्थान शोधावयास निघाला. 

२. आलारकालाम त्या बेळी वैशालीस राहात होते. गौतम तेथे गेला. वैशालीस पोहोचल्यावर तो त्यांच्या आश्रमात गेला. 

३. आलारकालामांकडे जाऊन तो म्हणाला, “आपल्या सिद्धान्ताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे.”

४. त्यावर आलारकालाम म्हणाले, “तुझे स्वागत असो. माझा सिद्धान्त असा आहे की, तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोड्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धान्तानुसार वर्तनही करता येईल.” 

५. “खरोखर हे उच्चतम ज्ञान संपादण्यास  तू अगदी पात्र आहेस.” 

६. आलारकालाम मुनीचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले- 

७. “मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण ही जी पराकाष्ठेची दयाशीलता माझ्यावर दाखवीत आहात तिच्यामुळे मी अगदीच पूर्णत्वास पोहोचलो आहे असा मला भास होत आहे.” 

८. “म्हणून आपला सिद्धान्त काय आहे हे कृपा करून आपण मला सांगाल काय?” 

९. आलारकालाम म्हणाले, “तुझ्या मनाची थोरवी, तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझा निश्चय यांच्यामुळे मी इतका उत्साहित झालो आहे की, तुझ्या पात्रेतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही.” 

१०. “हे श्रोतृश्रेष्ठा, आमची तत्वे ऐक!”

११. नंतर त्यांनी गौतमाला सांख्य तत्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करून सांगितली.

१२. आपल्या प्रवचनाचा समारोप मारोप करताना आलारकालाम म्हणाले. 

१३. “गौतमा, ही आमच्या तत्वज्ञानातील मूलतत्वे आहेत. मी तुला ती सारांशरूपाने सांगितली आहेत.”

१४. आलारकालामांनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदित झाला.

 

३ सभाधि-मार्गाचे शिक्षण

१. आपल्या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गाचे परीक्षण करीत असताना ध्यानमार्गाची (समाधीची ) माहिती करून घ्यावी असे त्याला वाटले.

२. ध्यानमार्गाचे तीन पंथ होते.

३. या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ध्यान-साधनेसाठी श्वासोच्छञासावर नियंत्रण ठेवणे. 

४. एका पंथाने ‘अनापानसति” नावाची श्वासनियंत्रणाची पद्धती अनुसरली होती.

५. दुसर्या पंथाने ‘प्राणायाम’ नावाची पद्धती अवलंबिली होती. या पद्धतीत श्वासोच्छास प्रक्रियेचे तीन भाग पडतात :

 (१) श्वास आत घेणे (पूरक), 

(२) श्वास रोखून धरणे (कुंभक), आणि

 (३) श्वास बाहेर सोडणे (रेचक).

तिसरा पंथ समाधी या नावाने ओळखीला जात होता. 

६. आलारकालाम ध्यानमार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते. आलारकालामांच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यानमार्गाचे शिक्षण मिलाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले. 

७. म्हणून तो आलारकालामांशी त्याविषयी बोलला आणि मला ध्यानमार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय? असे त्याने त्यांना विचारले.

८. “मोठ्या आनंदाने!” आलारकालामांनी उत्तर दिले.

९. आलारकालामांनी ध्यानमार्गाचे तंत्र त्याला शिकविले. त्याच्या एकूण सात सिद्धी होत्या.

१०. गौतम त्या तंत्राचा दररोज अभ्यास करू लागला.

११. त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळविल्यावर ‘आणखी शिकण्यासारखे काही आहे काय?’ असे गौतमाने आलारकालामांना विचारले. 

१२. आलारकालामांनी उत्तर दिले, “नाही. मित्रा, माझ्याजवळ शिकविण्यासारखे जे होते ते एवढेच.” नंतर गौतमाने आलारकालामांचा निरोप घेतला. 

१३. उद्दक रामपुत्त नावाचा  दुसऱ्या  एका योग्याविषयी गौतमाने ऐकले होते. आलारकालामांनी जे ध्यानतंत्र संशोधिले होते त्याच्यापेक्षा वरची एक पायरी ध्यानी पुरूषाला गाठता ग्रेई असा एक ध्यानविधी शोधून काढण्याबदूल त्याची ख्याती होती. 

१४. त्याचा तो ध्यानविधी शिकवण्याचा आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला. म्हणून तो उद्दक रामपुत्ताच्चा आश्रमात गेला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला. 

१५. थोडक्याच क्‍याच काळात उद्द्काच्या ध्यानविधीची आठवी वा पायरी त्याने आत्मसात केली. उद्दक रामपुत्ताच्चा ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळविल्यावर गौतमाने आलारकलामांना जो प्रश्‍न विचारला होता तोच प्रश्‍न उद्दक रामपुत्तालाही विचारला की,“आणखी काही शिकण्याजोगे आहे काय?” 

१६. आणि उद्दक रामपुत्ताने तेच उत्तर दिले, “नाही, मित्रा! तुला शिकविता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ काही नाही.” 

१७. आलारकालाम आणि उद्दक रामपुत्त हे ध्यानमार्गावरील प्रभुत्वासाठी कोशल देशात प्रसिद्ध होते. पण गौतमाने असे ऐकले होते की, मगध देशातही अशा प्रकारे ध्यानमार्गसंपन्न योगी आहेत. त्यांच्या पद्धतीचेही शिक्षण मिळवावे असा त्याने विचार केला. 

१८. त्याप्रमाणे गौतम मगध देशात गेला. 

१९, त्याला असे आढळून आले की, त्याची ध्यानमार्गाची प्रक्रिया जरी श्वासोच्छवास नियंत्रणावरच आधारलेली होती तरी कोशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती. 

२०. ही प्रक्रिया श्वासोच्छवास करण्याची नव्हती तर श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती.

२१. गौतम ही प्रक्रिया शिकला. श्वासोच्छास थांववून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्याने प्रयत्न केला तेव्हा त्याला टोचणारे तीव्र आवाज आपल्या कानांतून बाहेर पडत आहेत आणि जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुरीने आपले डोके टोचले जात आहे असे आढळून आले.

२२. ती दुःखदायक प्रकिया होती. तरी पण ती आत्मसात करण्यात गौतम यशस्वी झाला. समाधि-मार्गाचे त्याचे शिक्षण अशा प्रकारचे होते.

 

४. वैराग्याची कसोटी

१. गौतमाने सांख्य आणि समाधिमार्ग याची कसोटी घेतली होती. परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने भृगुऋषींचा आश्रम सोडला होता.

२. त्याला असे वाटले की, त्या मार्गाचीही कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा. म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल.

३. त्याप्रमाणे गौतम गयानगरीस गेला. तेथून सभोवतालज्या प्रदेशाची त्याने पाहणी केली, आणि उरूबेला येथे गयेचे राजर्षी नेगरी यांच्या आश्रमात वैराग्यमार्गाचा अभ्यास करण्यासाठी वसती करण्याचे त्याने निश्चित केले. वैराग्यमार्गाच्या अम्यासासाठी नेरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकान्तातील स्थल होते. 

४. राजगृहात असताना त्याला जे परिव्राजक  भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती ते पाच  परिव्राजक त्याला उरुवेला येथे आढळले. ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते.

५. त्या भिक्षूंनी त्याला तेथे पाहिले आणि त्याने आपणाला बरोबर घ्यावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. गौतमाने त्यांची विनंती मान्य केली.

६. नंतर त्याचा आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्याची आदरभावाने सेवा केली. ते नम्रतेने त्याच्या बरोबर राहू लागले. 

७. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश याचे स्वरूप अत्यंत उग्र होते. 

८. काही वेळ तो भिक्षेसाठी दोन घरी जाई; पण दर दिवशी सातापेक्षा अधिक घरी तो जात नसे. प्रत्येक घरी केवल दोन घासाची भिक्षा घेई; पण सातापेक्षा अधिक घासाची भिक्षा तो स्वीकारीत नसे. 

९. दररोज तो फक्त एक वाटीभर अन्नावर जगत असे. पण सात वाट्यांपेक्षा अधिक अन्न तो स्वीकारीत नसे.

१०. काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच किंवा दर दोन दिवसांनी एक वेळ याप्रमाणे जेवत असे. कधी आठवड्यातून एकदा तर कधी पंधरवड्यातून एकदा याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्नभक्षण करण्याचा त्याचा कडक नियम असे. 

११. त्याचा वैराग्यमार्गाचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पति किंवा रानातले ज्वारी-बाजरीसारखे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आंत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेलबियांचे पीठ एवढाच त्याचा आहार असे. 

१२. रानटी फळे व कंदमुळांवर किंवा वार्याने झाडांवरून पडलेल्या फळावर तो आपली गुजराण करीत असे. 

१३. त्याचे कपडे तागाचे, धुळीच्या ढिगात सापडलेल्या तागासारख्या चिंध्यांचे, झाडांच्या सालींचे, काळविटाच्या सबंध किंवा अर्ध्या कातड्याचे, गवताचे, झाडाच्या सालीचे किंवा लाकडाच्या पट्टयांचे, माणसांचे किंवा जनावरांचे केस विणून केलेल्या घोंगडीचे किवा घुबडाच्या पंखांचे असत. 

१४. त्याने आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले. उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही  सोडून देत नसे. मांडी घालून बसल्यानंतर तो कधी उठत नसे. तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच तो हालचाल करीत असे. 

१५. अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करून तो वैराग्याच्या इतक्या पराकोटीला गेला की, आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या रायातना आणि वेदना देण्यासाठीच तो जगू लागला. 

१६. शेवटी तो इतक्या किळसवाण्या अवस्थेला येऊन पोचला की, त्याच्या अंगावर चिखल आणि घाण याचे थरच्या थर इतके साचले की, शेवटी ते आपोआप पडू लागले.

१७. अरण्याच्या भयाण अशा अंतर्भागात त्याने आपली वस्ती केली होती. तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल ल इतका भयाण होता. त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता. 

१७. जेव्हा हिवाळ्यात रात्री  अत्यंत कडक थंडी पडत असे तेन्हा कृष्णपक्षाच्या रात्री तो उधड्या हवेत राहात असे आणि दिवसा तो काळ्याकुट्ट गर्द झाडीत राहात असे. 

१८. परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना येई तेव्हा दिवसा तो अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राही आणि रात्री गुदमरवून  टाकणाऱ्या गर्द झाडीत राही. 

१९. जळलेल्या हाडांची उशी करून तो स्मशानात झोपे. 

२०. त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखाद्या दाण्यावर, एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजराण करू लागला. 

२१. ज्या वेळी दररोज तो फक्त एक फळ खाऊन राहू लागला त्या वेळी त्याचे शरीर अत्यंत क्षीण झाले. 

२२. तो आपले पोट चाचपू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हाताला लागे. आणि जर तो पाठीचा कणा चाचपू लागला तर त्याचे पोट त्याच्या हाती लागे. इतके त्याचे पोट त्याच्या पाठीच्या कण्याला चिकटले होते. आणि याचे कारण तो अत्यंत कमी खात होता. 

५. वैराग्याचा त्याग

१. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश याचे स्वरूप अत्यंत उग्र असे होते. अशा प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्तेश सहा वर्षेपर्यंत चालले होते.

२. सहा वर्षानंतर त्याचे शरीर इतके क्षीण झाले होते की, त्याला हालचालही करता येत नव्हती.

३. तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता, आणि ज्या प्रश्‍नावर त्याचे मन केन्द्रित झाले होते त्या ऐहिक दु:खाविषयीच्या प्रश्‍नाचा त्याला यकिंचितही उलगडा झाला नव्हता. 

४. तो स्वतःशीच विचार करू लागला, “हा मार्ग वासनामुक्‍त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्‍तीचा नाही.”  “काही जण इहलोकासाठी दुःख भोगतात तर इतर लोक स्वर्गलोकासाठी कष्ट सहन करतात. आशेच्या पाठीमागे लागल्यामुलळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणिमात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखात पडतात.” 

६. “माझ्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले नाही काय?” 

७. “मी जो दोष देतो तो प्रयत्न नव्हे. कारण हा प्रयत्न हीन दर्जाचा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे.” 

८. “माझा प्रश्‍न असा आहे की, शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय?” 

९, “ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते, त्या अर्थी विचारावर ताबा ठेवणे हेच योग्य होय. विचाराखेरीज शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे.” 

१०. “जर केवळ शरीराचाच विचार करावयाचा असता तर अन्नशुद्धीने पावित्र्य लाभले असते, पण मग कर्त्यामध्येही पावित्र्य असतेच; पण त्याचा काय उपयोग?” 

११. “ज्याची शक्‍ती नष्ट झाली आहे, भूक, तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला आहे, थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही.” 

१२. “जे ध्येय मनाच्या सहाय्याने गाठावयाचे आहे ते ज्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही तो ते कसे गाठू शकेल?” 

१३. “खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते.” 

१४. त्या वेळी उरुवेळा  येथे सेनानी  नावाचा एक गृहस्थ राहात होता. सुजाता नावाची वाचा त्याला मुलगी  होती. 

१५. सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यास दर वर्षी तो नवस फेडण्याचा तिने संकल्प केला होता. 

१ ६. तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या दासीला नवस फेडण्याची जागा तयार करण्यासाठी पाठविले. 

१७. त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले की, तो वृक्षदेवच अवतरला आहे. 

१८. सुजाता आली आणि स्वतः शिजविलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले.

१९. ते पात्र घेऊन तो नदीकाठी गेला. सुप्पतीठ्ठ नावाच्या घाटावर त्याने आंघोळ केली आणि मग त्या अन्नाचे भक्षण केले. 

२०. याप्रमाणे त्याची वैराग्यमार्गाची कसोटी संपली. 

२१. तपश्चर्या आणि आत्मक्‍तेश यांचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्याच्याबरोबर असलेले ते पाच तपस्वी त्याच्यावर रागावले आणि तिरस्काराने ते त्याला सोडून गेले.

Previous page                                                Next page


The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!