FROM BIRTH TO PARIVRAJA

FROM BIRTH TO PARIVRAJA

FROM BIRTH TO PARIVRAJA

From Birth to Parivraja PDF in English

खंड १ : सिद्धार्थ गौतम – बोधिसत्व बुद्ध कसे झाले ?

FROM BIRTH TO PARIVRAJA

Previous page                                 Next page

कूळ

१. सहाव्या शतकामध्ये उत्तर भारतात एकही सार्वभौम असे एकहि राज्य नव्हते .

२. देश बर्‍याच राज्यांमध्ये विभागला गेला होता, काही मोठी, काही लहान. यापैकी काही होते ,राजेशाही आणि काही राजेशाही नसलेले होती .

३.राजाची सत्ता असलेली राज्ये एकूण सोळा होती. ते अंग, मगध, कासी, कोसला, वृजी, मल्ला, चेडी, वत्स, कुरु, पंचला, मत्स्य, सौरसेना, अस्माका, अवंती, गंधारा आणि कंबोजा या नावाने परिचित होते .

४. राजशाही नसलेल्या राज्ये कपिलवत्सुचे शाक्य, पावाचे मल्ला आणि त्यांची होती .कुशीनारा, वैशालीचे लिच्छवी, मिथिलाचे विदेह, रामगमचे कोलिया, बुलिस अल्लाकपा, रेसपट्टाचे कलिंगस, पिप्फल्वानाचे मौर्य आणि भाग्स सुमसुमारा टेकडीवर त्यांची राजधानी होती.

५. राजशाहीवादी राज्ये जनपद म्हणून ओळखली जात होती आणि राजाची सत्ता नसणारे गण. किंवा संघ म्हणून ओळखले जात असे.

६.कपिलवस्तु येथील शाक्‍यांच्या शासनपद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. या राज्याची शासनव्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची लोकांची सत्ता होती हे समजत नाही.

७. तथापि, हे मात्र निश्चित की, शाक्‍यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीनेन राजसत्ता चालवीत होते.

८. अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला ‘राजा’ अशी संज्ञा होती.

९ . सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी ळा राजपद धारण करण्याची रण्याचा पाळी गळा शुद्धोधनाची होती.

१०. शाक्‍यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱयात बसले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते. परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्‍यांवर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळविले.

११. कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते.

१२. तत्कालीन राज्यात कोशलराज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते. कोशल देशाचा राजा पसेनदी (प्रसेनजित) व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते.

 पूर्वज

१. शाक्‍यांच्या राजधानीचे नाव ‘कपिलवस्तु’ हे होते. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिलमुनी याच्या नावावरुन पडलेले असावे.

२. कपिलवस्तुमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहात होता. सिनहु (सिंहहनु ) नावाचा त्याला एक मुलगा होता. सिंहहनूचा विवाह कच्चनाशी झाला होता. त्याला शुद्धोदन, धौतोदन, शुक्छकोदन, शाक्‍योदन, व अभितोदन असे पाच पुत्र होते. या पाच पुत्रांशिवाय सिंहहनूला अमिता व प्रमिता या नावांच्या दोन कन्या होत्या.

३. त्याच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते.

४. शुद्धोदनाचा विवाह महामायेशी झाला होता. तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. अंजन हा कोलिय वंशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहात होता. शुद्धोदन हा मोठा योद्धा होता. जेन्हा शुद्धोदनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायेची वडील ल बहीण होती.

६. शुद्धोदन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमि विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर-चाकर होते. असे म्हणतात की, त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर चालत असत.

७. तो ऐषारामात राहात होता. त्याचे अनेक महाल होते.

जन्म

१. शुद्धोदनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. त्याच्या जन्माची कथा अशी आहे.

२. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत.

३. हा महोत्सव सात दिवस साजरा करण्याची पद्धत होती.

४. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात, पुष्पमाला,सुगंधादि वस्तूंचा उपयोग करून परंतु मद्यपानादि उत्तेजक वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरविले.

५. उत्सवाच्या सातव्या दिवशी ती भल्या पहाटे उठली, सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली, दानधर्मार्थ चार लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या, मौल्यवान अलंकार घालून साजशृंगार केला, आवडीच्या पदार्थाचे सेवन केले निद्रेसाठी सजविलेल्या शयनमंदिरात व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजवलेल्या शयनमंदिरात ती गेली.

६. त्या रात्री शुद्धोदन व महामाया याचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोपी गेली. निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले.

७. स्वप्नात तिला असे दिसले की, चतुर्दिक्पालांनी आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत.

८. नंतर चतुर्दिक्पालांच्या स्त्रिया तिच्या जवळ आल्या व त्यानी तिला मानससरोवराकडे नेले.

९. त्यांनी तेथे तिला अभंग्यस्वान घालून तिची वेषभूषा केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव्ये लावून फुलांनी असे सजविले की, ती कुणा दिव्यशक्‍तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे असे वाटले.

१०. इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्यापुढे प्रकट झाला व तिला म्हणाला, “मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का?” तिने उत्तर दिले, “मोठया आनंदाने”. त्याच क्षणी महामायेला जाग आली.

११. दुसरे दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धोदनास सागितले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोदनाने स्वप्नविद्येत विद्येत पारंगत असलेल्या सलल्या सुप्रसिद्ध सि द्ध आठ ब्राम्हणाना बोलावून लावून घेतले.

१२. त्याची नावे-राम, धन, लख्खण, मन्ती, यण्ण, सुयाम, भोग व सुदत्त अशी होती. शुद्धोदनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली.

१३. त्याने सेवकांकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राम्हणांसाठी उच्चासने मांडली.

१४. त्याने त्या ब्राम्हणांची पात्रे सोन्याचांदीने भरून घृतमधुयुकक्‍त व साखरमिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यांस संतुष्ट केले. याशिवाय त्याना नवी वस्त्रे, गायी इत्यादींचे दान दिले.

११. ब्राम्हण संतुष्ट झाल्यावर शुद्धोदनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला, “या स्वप्नाचा अर्थ मला सांगा!”

१६. “राजा, चिन्ता करू नकोस”. ब्राम्हण म्हणाले, “तुला एक असा पूत्र होईल की, जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण संसारत्याग करून जर तो सन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंध:कार नाहीसा करणारा भगवान बुद्ध हाईल!”

१७. पात्रांतील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्त्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाल जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्‍त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, “माझ्या पित्याच्या देवदहनगरील मी जाऊ इच्छिते.”

१८. “तुझ्या इच्छेप्रमाणे होईल.” राजाने उत्तर दिले. सोन्याच्या पालखीत बसवून शुद्धोदनाने मोठया लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले.

१९. देवदहला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुरष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते. तेच लुंबिनी वन होय.

२०. लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी स सुशोभित केलेल्या मंडपा-सारखे भासत होते.

२१. बुंध्यापासून फांद्यांच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फूलाफळांनी ओथंबलेले होते. त्यावर नानारंगांचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराळया प्रकारचे पक्षिगण मंजुळ स्वरालाप काढीत होते.

२२. तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहनार्‍या सेवकास आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले.

२३. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंध्याशी चालत गेली. त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळुकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यांपैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल ल एवढी खाली आली. इतक्‍यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली; आणि अशा प्रकारे हलल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. शालवृक्षाची फांदी हातत धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला.

२५. त्या मुलाचा जन्म खिस्तपूर्व ५६३ व्या वर्षी वैशाखी पोणिमेला झाला.

२६. शुद्धोदन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती. परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते. आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोदनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्‍यांनी पुत्रन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्हासाने थाटामाटात साजरा केला.

२७. पुत्रजन्माच्या या वेळी कपिलवस्तूचे राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोदनाची होती. अर्थातच त्यामुळे बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले.

असितमुनीचे आगमन

१. ज्या वेळी या बालकाचा जन्म झाला त्या वेळी असित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहात होता.

२. असित ऋषी ने पाहिले की, अंतरिक्षातील देव ‘बुद्ध’ या शब्दाचा ध्वनी करीत आहेत व त्याचा प्रतिध्वनी चोहोकडे उमटत आहे. त्याने पाहिले की, ते आपली वस्त्रभूषणे मिरवित इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत. त्याने विचार केला, की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये?

३. त्याने आपल्या दिव्यदृष्टीने सर्व जंबूद्रीपाचे निरीक्षण केले. तेव्हा शुद्धोदनाच्या गृही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षनिर्भर झाले आहेत असे त्याला दिसले.

४. म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धोदनाच्या गृही आला व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभा राहिला

५. तेथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले. तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि त्याला म्हणाला,

“अरे ! राजाला जाऊन सांग की, दाराशी एक तपस्वी उभा आहे.”

६. तेव्हा तो द्वारपल शुद्धोदनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला, “महाराज, दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहेत. ते आपणाला भेटण्याची इच्छा करीत आहेत.” राजाने असितमुनीकरता ता एका आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला, “त्या ऋषी ला आत येऊ दे!” तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल असितमुनीला म्हणाला, “कृपा करून आत चला.”

८. असितमुनी शुद्धोदन राजाजवळ गेला व त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, “विजय असो ! राजा, तुझा विजय असो ! तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सद्धर्माने चालव.”

९. तेव्हा शुद्धोदनाने असितमुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरिता आसन दिले. असितमुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धोदन म्हणाला, “ हे तपस्विन ! यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही. आपल्या आगमनाचा काय हेतू असावा बरे ? आपण इथे येण्याचे काय कारण?”

१०. असित ऋषी शुद्धोदनाला म्हणाला, “राजा तुला पुत्रप्राप्ती झाली आहे. तुझ्या पूत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथे आलो आहे.”

११. शुद्धोदन म्हणाला, “मुनिवर, बालक आता झोपला आहे. थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का ?” ऋषी म्हणाला, “ राजा, असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत. हे थोर महात्मे स्वभावत:च जागृत असतात.”

१२. इतक्यात त्या महान ऋषी वर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली.

१३. बालक जागे झालेले पाहताच शुद्धोदनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन ऋषी च्या समोर आणले.

१४. असित ऋषी ने त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा ते महापुरुषाच्या बत्तीस लक्षणांनी व एंशी शुभ चिन्हांनी युक्‍त असलेले त्यास दिसले. त्याने पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रम्हा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याच तेजोमंडल त्यांच्यापेक्षा शतसहस्त्र पटींने अधिक दैदिप्यमान आहे. असित ऋषी च्या मुखातून त्वरीत उदगार निघाले, “निस्संदेह, या पृथ्वीतलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे !” असे म्हणून असीतमुनी आपल्या आसनावरून उठले व आपल दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातांत घेऊन ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले.

१५. असितक्रतषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती. गौतमप्रमाण महापुरुषांच्या बत्तीस लक्षणांनी युक्‍त असलेल्यांच्या पुढे दोनच मार्ग असतात, तिसरा नाही. “जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल; पण जर गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक्‌ सम्बुद्ध असा बुद्ध होईल!”

१६. असितऋषी ला खात्री होती की, हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही.

१७. त्या बालकाकडे पाहून अश्रु ढाळीत दीर्घ नि:श्वास टाकून तो ऋषी रडू लागला.

१८. असितमुनी अश्रु ढाळीत व दीर्घ निःश्वास टाकीत रडत आहे हे शद्धोदनाने पाहिले.

१९. असितमुनी रडत असलेला पाहून शुद्धोदनाच्या अंगावार रोमांच उभे राहिल आणि त्यांनी व्याकुळतेने असितमुनीला विचारले, “हे मुनीवर, अशा रीतीने का रडत आहात? अश्रु का ढाळीत आहात? दीर्घ निःश्वास का टाकीत आहात? माझ्या बालकाचे भविष्य निविघ्न आहे ना?”

२०. हे ऐकून ऋषी म्हणाला, “राजा, मी बालकासाठी रडत नाही. त्याचे भविष्य अगदी निविघ्न आहे. मी रडतो आहे तो माझ्यासाठी!”

२१. “का बरं?” शुद्धोदनाने विचारले. क्रषी उत्तरला, “मी वयोवृद्ध झालो आहे. माझं आयुष्य आता संपत आलं आहे, निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च व सम्यक सम्बोधी प्राप्त करून घेईल. तदनंतर आजवर या पृथ्वीतलावर जे कोणी करू शकले नाही, ते धर्मचक्रप्रवर्तन हे बालक करील. जगताच्या सुखसमृद्धीसाठी तो आपल्या महान तत्त्वाचा उपदेश करील.”

२२. “ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक, मध्ये कल्याणकारक आणि अन्ती कल्याणकारक असंच असेल. ते शब्द व शब्दाचा भावार्थ यांनी परिपूर्ण, शुद्ध आणि पवित्र असंच असेल.”

२३. “ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमललेले दिसते, त्याचप्रमाणे असंख्य पर्वकालानंतर या जगतात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय ‘बुद्ध’ उदयास येतात. त्याचप्रमाणे, राजा ! हा मुलगा सुद्धा नि:संशय परमज्ञान प्राप्त करून सम्बोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःखसागरातून तरून नेऊन परमसुखाची स्थिति प्राप्त करून देईल.

२४. “परंतु मी त्या बुद्धाला पाहु शकणार नाही म्हणून मी रडतो आहे आणि या दुःखामुळेच हा असा दीर्घ निःश्वास टाकीत आहे. कारण मला या बुद्धाची पूजा करावयास मिळणार नाही.”

२५. तदनंतर राजाने त्या थोर असित ऋषी ला व त्याचा पुतण्या नरदत्त याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले. त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले.

२६. तेव्हा असितमुनी त्याचा पुतण्या नरदत्त याला म्हणाला, “नरदत्ता ! जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर. ते तुला सुखशांतीचे व कल्याणप्रद ठरेल.” असे म्हणून असितमुनीने राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला.

महामायेचा मृत्यू

१. पाचव्या दिवशी नामकरणविधि करण्यात आला. मुलाचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. त्याचे गोत्रनाम गौतम होते. म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले.

२. मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरणविधी-समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले.

३. आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोदनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलाविले आणि म्हटले, “माझ्या मुलाबद्दल असितमुनिनं जे भविष्य वर्तविलं आहे ते खरं होईल, याचा मला विश्वास वाटत आहे. मला दुःख एवढंच वाटतं की, ते खरं ठरलेलं पाहाण्यासाठी मी जीवंत राहणार नाही.”

४. “माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल ! परंतु माझ्या मागे माझ्या मुलाच काळजीपूर्वक लालनपालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अनुलक्षून त्याची योग्यप्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही, याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही.”

५.“प्रजापती, माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करते आहे. त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही.”

६. “आता कष्टी होऊ नका. मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या. देवाचं बोलावणं आलं आहे, त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत!” असे म्हणून महामायेने प्राण सोडला. शुद्धोदन व प्रजापती या दोघांनाही दु:खावेग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला.

७. सिद्धार्थाच्या मातेचे देहावसान झाले तेव्हा तो अवघा सात दिवसांचा होता.

८. सिद्धार्थाचा नन्द नावाचा एक धाकटा भाऊ होता. शुद्धोदनाचा महाप्रजापति पासून झालेला तो पुत्र होता.

९. सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते. महानाम व अनुरुद्ध हे त्याचा चुलता शुक्कोदन याचे पुत्र. आनंद हा त्याचा चुलता अमितोदन याचा पुत्र व देवदत्त हा त्याची मावशी अमिता हिचा पुत्र होत. महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता.

१०. त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला.

बालपण आणि शिक्षण

१. जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्‍यांतील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोदनाला सांगितले की, मुलाला ‘अभया” या ग्राम देवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे.

२. शुद्धोदन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले.

३. ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले. जेव्हा त्याला समजले की, आपल्याला देवळात नेले जात आहे, तेव्हा तो हसला. तथापि शाक्‍यांच्या रीतीरिवाजानुसार तो देवळात गेला.

४. वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासास सुरुवात झाली.

५. महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोदनाने ज्या आठ ब्राम्हणांना बोलविले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले.

६. त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धोदनाने उदिच्च देशातील थोर कुळात जन्मलेल्या व उच्च्च परंपरा असलेल्या सब्बमित्ताला बोलावून घेतले. सब्बमित्त हा भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद, वेदांगे आणि उपनिषदे या सर्वांत पारंगत होता. शुद्धोदनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले. हा त्याचा दुसरा गुरु.

७. त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शन-शास्त्रे आत्मसात केली.

८. याशिवाय त्याने आलारकालामचा शिष्य भारद्वाज याजकडून ध्यानधारणेची विद्या संपादिली. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तु येथे होता.

सुरुवातीची लक्षणे

१. जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्या वेळी तो एकान्त स्थळी जाऊन समाधी लावण्याचा यत्न करीत बसे.

२. त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते.

३. कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्धोदन घेत असे.

४. सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता. माणसाने माणसाची पिळवणूक करावी, हे त्याला आवडत नसे.

५. एकदा तो आपल्या काही मित्रांच्याबरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला. तेथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रांनिशी अंग भाजून काढणार्‍या उन्हात जमीन नांगरणे, बांध घालणे, झाडे तोडणे ण इत्यादी कामे करीत असलेले मजूर पाहिले.

६. ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला.

७. तो आपल्या मित्रांना म्हणाला, “एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी हे योग्य ठरते काय? मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकेल?”

८. त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना. कारण ते जुन्या परंपरेच तत्वज्ञान मानणारे होते. त्यांच्या मते मजुराचा जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच स आहे आणि आपल्या धन्याची चाकरी करण्यातच त्याच्या जीवनाची कर्तव्यता आहे.

९. शाक्य लोक वप्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत. हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करावयाचा उत्सव होता. शाक्य लोकांच्या प्रथेनुसार ह्या दिवशी प्रत्येक शाक्‍याला स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे.

१०. सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे. तो स्वतः नागर धरीत असे.

११. जरी तो विद्वान होता तरी त्याने शीरीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही.

१२. तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्वीय्येचे आणि इतर शस्त्रे चालविण्याचे शिक्षण मिळाले होते; परंतु दुसऱयाला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नसे.

१३. शिकार करणाऱ्यांच्या मंडळांत सामील होण्यास तो तयार नसे. त्याचे मित्र त्याला म्हणत, “तुला वाघांची

भीती वाटते काय!” तेव्हा तो उत्तर देई, “मला माहीत आहे, तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तेथे हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्याना मारण्यासाठी जात आहात.”

१४. “निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये.” त्याचे मित्र त्याला आग्रह करीत. सिद्धार्थ अशा प्रकारचा आमंत्रणालाही नकार देई आणि म्हणे, “मला निरुपद्रवी प्राण्याना मारताना पाहाणे आवडत नाही.”

१५. सिद्धार्थाच्या ह्या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे.

१६. त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे, “तू विसरतोस की, तू क्षत्रिय आहेस. लढणे हा तुझा धर्म आहे. शिकारीच्या मार्गानेच युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते. कारण शिकारीने अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते. शिकार हे क्षत्रियांचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे.”

१७. सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारीत असे, “पण आई, क्षत्रियांना लढावे तरी का लागते?” आणि गौतमी उत्तर देई, “तो त्याचा धर्म आहे म्हणून!”

१८. तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे. तो गौतमीला विचारी, “मला असे सांग की, माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो?” गौतमी उत्तर देई, “ही प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला योग्य आहे. पण क्षत्रियाने लढलेच पाहिजे. जर ते लढणार नाहीत तर राज्याचे संरक्षण कोण करील?”

१९. “पण आई, जर सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्यांचे रक्षण करू शकणार नाहीत काय?” यावर गौतमी निरुत्तर होई.

२०. तो आपल्या मित्रांना आपत्याबरोवर बसवून समाधी लावण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करी. त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी. तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी. “मी सुखी व्हावे, माझे आप्तेष्ट सुखी व्हावेत, सर्व प्राणिमात्र सुखी व्हावेत” अशा प्रकारच्या विचारांची ध्यानाकरिता निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश करी.

२१. परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्व देत नसत. ते त्याची हसून थट्टा करीत.

२२. ते डोळे बंद करीत; पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत. उलट त्याच्या दृष्टीपुढे शिकारीची हरिणे किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत असत.

२३. त्याच्या पित्याला व मातेला त्याचा हा ध्यानधारणेचा ध्यास आवडत नसे. तो क्षत्रियाच्या जीवनाच्या सर्वथा विरुद्ध आहे, असे त्याना वाटे.

२४. योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्यमात्रावरील प्रेमभावना वृद्धिंगत होते, यावर सिद्धार्थाचा विश्वास होता. या संबंधीची खात्री देताना तो म्हणे, “आपण जेव्हा प्राणिमात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदाभेद व असमानता यापासून सुरुवात करतो. आपण मित्रांना शत्रूपासून वेगळ करतो. आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्यप्राण्यापासून भिन्न समजतो. आपण मित्र व पाळीव जनावरे यांवर प्रेम करतो आणि शत्रू व हिस्त्र पशूंचा द्रेष करतो.”

२५. “ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादेपलीकडे जातो तेव्हांच हे करू शकतो.” अशा प्रकारची त्याची विचारधारणा होती.

२६. त्याचे बालपन परमोच्च प्रेमभावनेने व्यापलेले होते.

२७. एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला. विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शान्ति व सौंदर्याचा आस्वाद घेत होता. इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्यासमोर पडला.

२८. त्या पक्ष्याला बाण लागला होता व तो त्याच्या शरीरात रुतला होता. त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता.

२९. सिद्धार्थ त्या पक्ष्याला वाचविण्यासाठी पुढे झाला. त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला. त्याच्या जखमेवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले. त्याने त्या पक्ष्याला उचलले व ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला त्याने त्या पक्ष्याला आपत्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले. आणि ऊब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले.

३०. सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की, “या निष्पाप पक्ष्याला कोणी मारले असावे?” थोड्याच वेळात त्याचा चुलत भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधांनिशी तेथे आला. त्याने सिद्धार्थाला सांगितले की, “आकाशात उडत असलेल्या एका पक्ष्याला आपण बाण मारला आहे. तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठे तरी पडला असावा. तो तू पाहिलास काय?” सिद्धार्थाला त्याने विचारले.

३१. सिद्धार्थ ‘होय’ म्हणाला व घायाळ स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखविला.

३२. देवदत्ताने मागणी केली की, “माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर.” पण सिद्धार्थाने ते नाकारले, त्यामुळे त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला.

३३. देवदत्ताचे म्हणणे होते की, “या पक्ष्याचा मालक मी आहे. कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो.”

३४. सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली. तो म्हणाला, “जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्‍क प्राप्त होतो. ता. ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यावयाचा असतो सता तो त्याचा मालक कसा होऊ शकतो ?”

३५. या वादात दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार होईना. .शेवटी हा प्रश्‍न लवादाकडे नेण्यात आला.लवादाने सिद्धार्थ गौतमाचा दृष्टिकोणच योग्य असल्याचा निर्णय दिला.

३६. यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला; परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की, आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्ष्याचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले.

३७. सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीच प्रकट झालेली त्याची स्वभावलक्षणे ही अशी होती.

विवाह

१. दंडपाणि नावाचा एक शाक्य होता. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती.

२. यशोधरेने सोळाव्या वर्षात पदार्पण केले होते व दंडपाणि तिच्या लग्नाच्या चिंतेत होता.

३. त्या वेळच्या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रणे धाडली.

४. सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठविण्यात आले होते.

५. सिद्धार्थ गौतमालाही सोळा वर्षे पूर्ण झाली होती. त्याच्या मातापित्याला देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती.

६. त्यांनी त्याला त्या स्वयंवरास जाण्यास आणि यशोधरेचे पाणिग्रहण करण्यास सांगितले. त्याने आपल्या मातापित्याच्या इच्छेला मान दिला.

७. जमलेल्या सर्व युवकांतून यशाधरेने सिद्धार्थ गौतमालाच वरिले.

८. दंडपाणि विशेष प्रसन्न नव्हता. या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो साशंक होता.

९. त्याला वाटले,’सिद्धर्थाला साधुमुनींच्या सहवासाचे विशेष वेड आहे. त्याला एकलकोंडे राहणे आवडते. तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल?”

१०. सिद्धर्थाखेिरीज कुणालाही वरणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले, “साधूंच्या व तपस्व्यांच्या सहवासात राहणे हा काय अपराध आहे?” यशोधरेला तसे मुळीच वाटत नव्हते.

११. सिद्धार्थ गौतमाखेरीज कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास संमति देण्यास दंडपाणीला सांगितले. दंडपाणीने तशी संमती दिली.

१२. गौतमाच्या प्रतिस्पर्ध्यांची यामुळे निराशा तर झालीच, परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले.

१३. त्यांना वाटले की, त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती, पण तिने तसे काही केले नाही.

१४. त्या वेळी ते स्वस्थ बसले. त्यांना वाटले दंडपाणि यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल.

१५. परंतु दंडपाणि जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली की, धनुर्विद्येचे कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेतली जावी. दंडपाणीला त्यांच्या मागणीला कबूल व्हावे लागले.

१६. सुरूवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता. तेव्हा त्याने असा नकार दिल्यास त्याचा पिता, त्याचे कुळ व सर्वात अधिक यशोधरा यांना लाजेने खाली मान घालण्याचा कसा प्रसंग येईल, हे त्याचा सारथी छन्न याने त्याच्या निदर्शनाला आणून दिले.

१७. त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले.

१८. स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखविले.

१९. गौतमची पाळी सर्वांच्या शेवटी आली ; परंतु त्याची बिनचूक निशाणबाजी सर्वश्रेष्ठ ठरली.

२०. तदनंतर विवाह समारंभ झाला. शुद्धोदन व दंडपाणि ह्या दोघांनाही आनंद झाला. त्याचप्रमाणे यशोधरेला व महाप्रजापतीलाही अत्यानंद झाला.

२१. विवाह होऊन अनेक वर्षे लोटल्यावर यशोधरेला एक पुत्र झाला. त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले.

पुत्राला वाचविण्याच्या पित्याच्या योजना

१. आपल्या पुत्राचा विवाह होऊन व त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला. तथापि याबरोबरच असितमुनीची भविष्यवाणी त्याचा सारखा पिच्छा पुरवीत होती.

२. ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैषयिक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार ठरविला.

३. हा उद्देश दृष्टीपुढे ठेवून शुद्धोदनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी तीन राजमहाल बांधले, एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी. हे तिन्ही राजमहाल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते.

४. प्रत्येक महालाभोवती विविध जातींच्या वृक्षांची आणि फुलांची मनोहारी रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते.

५. आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदयीन याच्याशी सल्लामसलत करून राजाने राजपुत्रासाठी अतिसुंदर युवतींनी युक्‍त अशा अंतःपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठरविला. तेव्हा शुद्धोदन राजाने जीवनातील सुखोपभोगासाठी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याचा त्या सुंदरीना सल्ला देण्यास उदयीनास सांगितले.

७. अंतःपुरात ठेवावयाच्या स्त्रियांना एकत्रित करून उदयीनाने त्यांनी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याची त्यांना प्रथम माहिती दिली.

८. त्यांना उद्देशून तो म्हणाला, “तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलांत कुशल आहात, तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात, तुमच्या ठायी सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे. तुम्ही तुमच्या कसबात वाकबगार आहात.”

९. “तुमच्या या कलागुणांनी, ज्यांच्या ठायी काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योग्यांचेसुद्धा तुम्ही चित्त अस्वस्थ करू शकता, आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सराच भुलवू शकतात अशा देवांनासुद्धा तुम्ही आपल्या मोहपाशात गुरफटू शकता!”

१०. “हृदयातील यातील भावना व्यक्‍त करण्याच्या तुमच्या कौशल्याने, तुमच्या नखरेलपणाने, तुमच्या शरीरसौष्ठवाने आणि कृत्रिम अशा लावण्याने तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करू शकता तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज अंकित कराल?”

११. “आपापल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून त्याला तुमचा बंदी करणे व प्रेमरज्जूंनी बांधून त्याला तुमचा अंकित करून ठेवणे असाध्य नाही.”

१२. “या बाबतीत तुमच्या हातून घडलेली एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे मिटणाऱ्या एखाद्या नववधूला शोभेल, पण तुम्हाला ती शोभणार नाही.”

१३. “ निसंशय, हा वीर पुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे! परंतु तुम्हाला त्याचे काय? ‘स्त्रिचे सामर्थ्य त्यापेक्षाही मोठे आहे!’ हाच तुमचा दृढनिश्चय असू द्या!”

१४. “प्राचीन काळी, ज्याला जिंकणे देवांनाही कठीन होते अशा एका महान तपस्व्याला काशीतील एका सौंदर्यवती वेश्येने लाथा मारून झिडकारून आपल्या पायी लोळण घेत ठेवले होते.”

१५. “आणि महान तपस्वी विश्वामित्राला तो तपश्चर्येत निमग्न असतानाही घृताची नावाच्या अप्तरेने दहा वर्षे जंगलात आपला बंदी करून ठेविला होता.”

१६. “यासारख्या अनेक तपस्वयांना जेथे स्त्रियांनी कवडीमोल केले तेथे ज्याचे यौवनपुष्प प्रथमच उमलत आहे अशा कोमल राजकुमाराची काय कथा ?”

१७. “हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने असे प्रयत्न करा की, राजकुळाची वंशपरंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही.”

१८. “सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात, परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की, ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषांना जिंकतात.”

राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश

१. उदयीनाचे हे शब्द त्या स्त्रियांच्या हृदयाला लागले व राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्य पणास लावण्याचा त्यांनी निश्चय केला.

२. तथापि, त्यांच्चा भूकुटी, त्यांचे कटाक्ष, त्यांचे नखरे, त्यांचे हसणे, त्यांच्या नाजुक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठायी असून सुद्धा त्या अंत:पुरवासिनी युवतींना आपण राजपुत्राला वश करू शकू अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती.

३. परंतु पुरोहित उदयीनाच्या प्रेरणेमुळे, राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व कामभावना यांच्या प्रभावाच्या जाणीवेमुळे गणा वे मुळ थोड्याच वेळात ळात त्यांचा आत्मविश्वास त वि स जागृत झाला.

४. नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या. हिमालयाच्या अरण्यात हत्तिणींच्या कळपासमवेत हत्ती जसा फिरत असतो तशा त्या उपवनात त्या आपल्या समवेत राजपुत्रास हिंडावयास वयास लावू लागल्या.

५. स्त्रियांच्या समवेत तो राजपुत्र त्या मनोहर उद्यानात सूर्य जसा अप्सरांना घेऊन आपल्या राजोद्यानात फिरावा तसा शोभून दिसत होता. त्यांच्यापैकी काही जणींनी कामाकुल होऊन सहज लागलेल्या धक्क्यात त्याला आपल्या भरदार व पीनस्तनांशी दाबून धरले.

७. तर दुसऱ्यांनी ठेच लागून पडत असल्याचा बहाणा करून त्याला घट्ट आलिंगन दिले व आपले वेलीसारखे गोंडस हात त्याच्या खांद्यावर लोंबकळत सोडून त्या त्याच्यावर वाकल्या. तोंडाला शला मद्याचा वास येत असलेल्या दुसर्‍या सा जणी आपल्या ताम्र रंगाच्या अधरोष्ठांनी त्याच्या कानात पुटपुटल्या, “माझं गुपित ऐकावं बरं का !”

९. ज्यांची शरीरे उटण्यांनी ओली झाली होती, अशा काही जणी त्याचे दोन्ही हात आतुरतेने घट्ट धरून, जणू काय त्याला हुकूमच करीत म्हणत होत्या, “आमचा पूजाविधी येथेच करा !”

१०. मद्य पिऊन झिंगल्याचे सोंग करणारी दुसरी एक तिचे निळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकत असताना आपली जीभ दाखवीत अशी उभी होती की, रात्री चमकणाऱ्या विद्युलतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरत होती.

११. काही जणी आपल्या सोन्याच्या पैंजणांचा आवाज करीत रा तलम वस्त्रात झाकलेली आपली अंगे त्याला दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या.

१२. दुसऱ्या काही जणी आम्रवृक्षाची फांदी हातात धरून सुवर्णकलशांप्रमाणे दिसणारे आपले उरोज मुद्दाम दाखवीत उभ्या होत्या.

१३ कमलांच्या ताटव्यातून आणलेली कमलपुष्पे हातात धरलेली एक कमलनयना कमलावती पद्मादेवीसारखी त्या कमलमुख राजपुत्राशेजारी उभी होती.

१४. दुसरी एक सहज समजू शकेल असे मधुर गीत हावभावपूर्वक गात त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोमुक करण्याचा प्रयत्न करीत होती आणि आपल्या नेत्रकटाक्षाने जणू काय म्हणत होती, “तुम्ही भ्रमात आहात बरं का महाराज!”

१५. दुसरी एक जण आपल्या तेजस्वी चेहऱयावर आपल्या भूकुटीची कमान ताणून वीर पुरुषाचा आविर्भाव आणून त्याची नक्कल करीत होती.

१६. जिच्या कानांतील कुंडले वार्‍याने सारखी हलत होती अशी उत्फुल्ल उरोज असलेली दुसरी एक यौवना त्याच्याकडे पाहत मोठमोठ्याने हसून जणू काही संगत होती, “जमत असेल तर पकडा मला !”

१७. दुसरीकडे जात असताना दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेविले; तर बाकीच्या काही जणी मधुर पण हत्तीच्या मस्तकावरील अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दाचा मारा करून त्याला जणू काय शिक्षाच करीत होत्या. त्याच्याशी वाद घालण्याची |ड्च्छा बाळगणाऱ्या दुसर्‍या व एकीने आंब्याच्या मोहोराची डहाळी हातात धरून विषयवासनेने बेभान झालेल्या स्थितीत त्याला विचारले, “हे कुणाचे फूल आहे ?”

१९. दुसरी एक जण पुरुषी आव आणून त्याला म्हणाली, “स्त्रिकडून जिंकला गेलेला तू आता जा, ही पृथ्वी पादाक्रांत कर.”

२०. दुसरी एक चंचलनयना आपले नीलकमल हुंगीत उत्तेजित त्तेजित अवस्थेत काहीशा अस्पष्ट शब्दात राजपुत्राला उद्देशून म्हणाली-

२१. “नाथ, मधु-सुगंधी मोहोराने बहरलेला हा आम्रवृक्ष पहा! यावर बसून सोन्याच्या पिंजर्‍यात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा येथे गात आहे.”

२२. “इकडे या आणि हा अशोकवृक्ष पहा ! प्रेमिकांची दु:खे तीव्र करणार्‍या या वृक्षावर बसून हे भ्रमर असा गुंजारव करीत आहेत की, जणू काय ते कामाय्रीने होरपळून निघाले आहेत.”

२३. “या, हा आम्रवृक्षाच्या कोमल डहाळीने आलिंगिलेला ‘तिलक’ वृक्ष तर पहा ! जणू काय हळदीची उटी लावलेल्या युवतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषास आलिंगन दिले आहे!”

२४. “हा फुललेला ‘कुरवक’ पहा! रक्‍तचंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काय रमणींच्या नखाच्या रंगापुढे आपण फिक्के आहोत असे वाटून खाली वाकला आहे !”

२५. “या ! आणि सभोवार अंकुरलेला हा तरुण ‘अशोक’ बघा! जणू काय आमच्या हाताच्या सौंदर्यापुढे लज्जित होऊन तो उभा आहे!”

२६. “ज्याच्या काठावर सभोवार ‘सिंदूरवराचे’ चे कुंज उगवलेले आहेत असे हे सरोवर पहा ! जणू काय शुभ्र व तलम वस्त्रांकित अशी रूपसुंदरीच आराम घेत पहुडावी असे ते दिसत आहे.”

२७. “स्त्रि जातीचे सार्वभौम सामर्थ्य पहा! पलिकडे पाण्यात जी चक्रवाकी पुढे पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक्‌ पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे.”

२८. “आपल्याच तंद्रीत गात असलेल्या कोकिळाचे ते स्वरलाप ऐका! दुसरी कोकिळा जणू काय त्याला निर्भयपणे रुकार दिल्यागत गात आहे असे वाटते.”

२९. “वसंत ऋतूत पक्ष्यांत निर्माण होणारा उन्माद आपणातही निर्माण झाला असता व आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडितांचा विचार आपणात नसता, तर किती चांगले झाले असते!”

३०. अशा प्रकारे प्रेमासक्‍त झालेल्या प्रमदांनी प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या कृपत्यांनी राजपुत्रावर हल्ला केला.

३१. तथापि, अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमुदित झाला नाही किवा हंसलाही नाही.

३२. त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहुन तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला.

३३. “या स्त्रियांत अशा कोणत्या गोष्टिंची उणीव आहे की, त्यांना इतकेही दिसू नये की, यौवन हे चंचल आहे ? कारण, वार्धक्य हे सौंदर्यात जे जे काही आहे ते ते सर्व नष्ट करणारे आहे.”

३४. अशा प्रकारे ह्या स्तुतीसुमनांचा वर्षाव अनेक महिने व वषें सारखा चालला होता. परंतु तो सकल झाला नाही.

महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत

१. त्या तरूण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयीनाच्या लक्षात आले.

२. राजनीतीत जनातात कुशल असलेल्या सल॑ल्या उदयीनाने दयांनाने स्वतःच शेवटी वर्टा राजपुत्राशी आजजपुत्राशा बोलण्याचे ठरविले.

३. राजपुत्रास एकांतात भेटून उदयीन त्याला म्हणाला, “तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंत:करणपूर्वक मित्रभावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे.” असे म्हणून उदयीनाने सुरुवात केली.

४. “जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे, जे हितकारक आहे त करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे ही मित्राची तीन लक्षण आहेत.”

५. “ मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो असे होईल.”

६. “कपटानेसुद्धा स्त्रिला वश करणे हे योग्यच आहे. त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते व त्याचे रंजनही होते.”

७. “आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती यांनीच स्त्रिचे हृदय बांधले जाते. सदगुणच खर्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात. कारण, स्त्रिला आदरभाव आवडतो.”

८. “मग, हे विशाल नयनांच्या राजपुत्रा, जरी तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौंदर्याला साजेशा शालीनतेने तू त्या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न नाही का करणार?”

९. “विनय हा स्त्रियांना सुगंधी उटण्याप्रमाणे सुखकर वाटतो. विनय हा एक बहुमोल अलंकार आहे. विनयावाचून सौंदर्य हे पुष्पविहीन उद्यानासारखे आहे !”

१०. “पण केवळ विनयाचा काय उपयोग ? त्याच्याबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे. मोठया कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुझ्या मुठीत आहेत. मग खात्रीने तू त्यांचा तिरस्कार का करावा?”

११. “काम हाच सर्वप्रथम पुरुषार्थ मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिचे प्रियाराधन केले.”

१२. “अशाच प्रकारे अगस्ती ऋषीसुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रममाण झाला; आणि श्रुती सांगतात, लोपामुद्रेचीही तीच गत झाली.”

१३. “महान तपस्वी बृहस्पतीने औतथ्याची पत्नी व मरुताची कन्या ममता हिला भोगून भारद्वाजाला जन्म दिला.”

१४. “श्रेष्ठ दाता अशाचन्द्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती अर्ध्यप्रदान करीत असताना ग्रहण करून तिच्या ठायी दिव्य बुधाला जन्म दिला.”

१५. “अशाच प्रकारे प्राचीन काळी विषयासक्त झालेल्या पराशर ऋषीने सुद्धा यमुनानदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला.”

१६. “कामातुर वशिष्ठ ऋषी ने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील हीन स्त्रिशी रत होऊन कपिंगलाद नावाच्या पुत्रास जन्म दिला.”

१७. “आणि वार्धक्याने गलितगात्र झालेला असताही राजर्षी ययाती चैत्ररथ वनात विश्वाकी अप्सरेबरोबर रममाण झाला.”

१८. “आणि पत्नीशी संभोग केल्यानेने आपला मृत्यु ओढवेल हे जाणत असूनसुद्धा कौरवनरेश पंडू माद्रीच्या सौंदर्यगुणावर मुग्ध होऊन विषयसुखाच्या आधीन झाला.”

१९, “यासारख्या अनेक महान पुरुषांनी सुखासाठी निंदनीय कामोपभोगाचा अवलंब केला, तर मग जे भोग प्रशंसनीय आहेत अशाचा अवलंब करणे किती सुखद हाईल!”

२०. “आणि असे असताना तुझ्यासारख्या शक्‍ती व सौंदर्यसंपन्न युवकाने ज्या सुखाच्या आधीन सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभावतःच तुझा हक्‍क आहे त्या सुखाची उपेक्षा करावी हे आश्चर्य आहे !”

 

राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर

१. पवित्र परंपरेने समथिलेली व योग्य वाटणारी महामंत्र्याची ही वचने ऐकून मेघगर्जनेसारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले.

२. “माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्‍त करणारी तुझी ही भाषा तुला योग्यच आहे. परंतु माझ्यासंबंधी तुझी चूक कुठे होत आहे, हे मी तुला पटवून देईन.”

३. “मी ऐहिक विषयांची अवहेलना करीत नाही; सर्व मानवमात्र त्यात गुरफटलेला आहे, हे मला माहीत आहे. पण हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही.”

४. “यद्यपि हे स्त्रिसौंदर्य कायम राहिले तरीसुद्धा विषयोपभोगातच आनंद मानून राहाणे सूज्ञ माणसाला शोभणारे नाही.”

५. “आणि जरी तू म्हणत असलास की थोर थोर महात्मे सुद्धा विषयवासनेला बळी पडले, तरी त्यांच्या त्या उदाहरणांना भुलू नकोस. कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे.”

६. “जेथे सर्वनाश आहे, किंवा जेथे ऐहिक विषयाचा मोह आहे अथवा जिथ आत्मसंयमनाचा अभाव आहे, अशा ठिकाणी खरीखुरी महात्मता असूच शकत नाही.”

७. “आणि स्त्रियांशी वरकरणी प्रेम करुन वागावे’ असे जेव्हा तू म्हणतोस, तेव्हा ते वरकरणी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही.”

८. “जेथे खरेपणा नसेल तेथे स्त्रिची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही. जर संयोग मनापासून व नैसर्गिक नसेल तर ‘त्या संयोगाचा धिक्कार असो’, असेच मी म्हणेन.”

९. “मन विषयाधीन झाले असेल, मिथ्यत्वावर विश्वास ठेवणारे असेल, विषयवस्तूंचे दोष न पाहणारे असेल तर मग अशी वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे?”

१०. “आणि विषयवासनेचे बळी जर एकमेकांची फसवणूक करू लागले तर ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकाकडे पाहण्यासही अपात्र आहेत, असेच नाही का?”

११. “या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे की, अशा नीच विषयभोगाच्या कुमार्गाकडे तू मला नेणार नाहीस.”

१२. राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदयीन निरुत्तर झाला, आणि त्याने ही सर्व हकीकत त्याच्या पित्याला – राजा शुद्धोदनास निवेदन केली.

१३. आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगापासून परावृत्त असल्याच जेव्हा शुद्धोदनाला समजले तेव्हा त्याला त्या सबंध रात्री झोप लागली नाही. हृदयात बाण रुतलेल्या तल॑ल्या हत्तीसारखा तो विव्हल झाला.

१४. राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी देण्याचा संभव होता त्यापासून प्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुद्धोदनाने आपल्या मंत्र्यासह विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला, पण आतापर्यंत योजिलेल्या उपायांखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही.

१५. आणि ज्यांच्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले, ज्यांचे हावभाव व लाडीगोडी निष्फळ ठरली, अशा आपले रतिभाव हृदयांत लपवून ठेवलेल्या युवतींचे ते अंत:पुर विसर्जित करण्यात आले.

शाक्य संघात प्रवेश

१. शाक्‍यांचा एक संघ होता. वयाची वीस वर्षे झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे.

२. सिद्धार्थ गौतमाला वीस वर्षे पूर्ण झाली होती. संघाचीं दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते.

३. शाक्‍यांचे एक सभागृह होते. त्याला ते ‘संथागार’ म्हणत. ते कपिलवस्त नगरात होते. संघाच्या सभाही ह्याच संथागारात होत असत.

४. सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोदनाने शाक्‍यांच्या पुरोहिताला संघाची सभा बोलाविण्यास सांगितले.

५. त्यानुसार कपिलवस्तु येथील शाक्‍यांच्या संथागारात संघाची सभा झाली.

६. सिद्धार्थाला संघाचे सभासद करुन घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेत ठराव मांडला.

७. तेव्हा शाक्‍यांचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला. संघाला उद्देशून त्याने पुढीलप्रमाणे भाषण केले : “शाक्य वंशातील शुद्धोदनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो. त्याचे वय वीस वर्षाच असून तो सर्व दृष्टींनी ह्या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे. म्हणून त्याला ह्या संघाचे सदस्य करून घ्यावे, असे मी सुचवितो. माझी अशी प्रार्थना आहे की, या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्‍त करावे.”

८. या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही. सेनापती पुन्हा म्हणाला, “मी दुसऱ्यांदा सांगतो की, जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे.”

९. ठरावाविरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही. सेनापतीने पुन्हा म्हटले, “मी तिसर्‍यांदा सांगतो की, जे कोणी या ठरावाविरुद्ध असतील .त्यांनी बोलावे.”

१०. तिसऱ्या वेळी सुद्धा कोणीही ठरावाविरुद्ध बोलले नाही.

११. शाक्‍यांचा असा नियम होता की, एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव तीन वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते.

१२. सेनापतीने मांडलेला ठराव तीन वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले.

१३. तदनंतर शाक्‍याचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहावयास सांगितले.

१४. सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, “तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला हे तू मानतोस ना?”

“होय महाराज.” सिद्धार्थ उत्तरला.

१५. “संघाच्या सभासदत्वाची बंधने तुला ठाऊक आहेत काय?” “नाही महाराज ! पण ती जाणून घेतल्याने मी सुखी होईन.” सिद्धार्थ म्हणाला.

१६. पुरोहिताने म्हटले, “प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची कर्तव्ये काय” आहेत ती सांगतो. असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे एक एक कर्तव्य सांगू लागला-

  • (१) “तू संघाच्या हितसबंधांचे संरक्षण तनमनधनपूर्वक केले पाहिजे.

  • (२) संघाच्या सभांमधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये.

  • (३ ) कोणत्याही शाक्‍याच्या वर्तनात तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखविले पाहिजेत.

  • (४) तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये. परंतु तू जर अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे. अथवा निरपराधी असशील तर तू तसे सांगितले पाहिजे.”

१७. पुरोहित पुढे म्हणाला, “यानंतर मी तुला संघाच्या सभासदत्वाला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सागतो.

  • (१) “तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाहीस.

  • (२) तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस.

  • (३) तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाहीस.

  • (४) तू खोटी साक्ष दिल्याचा तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाहीस.”

१८. सिद्धार्थाने म्हटले, “महाराज, शाक्य संघाच्या शिस्तपालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. मी त्या नियमांचे त्यांच्या शब्द व आशयासहित पालन करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करीन अशी मी आपणास खात्री देतो.”

संघाशी संघर्ष

१. सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर आठ वर्षे लोटली.

२. संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदार असा सभासद होता. स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात घालीत असे. संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते व त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला होता.

३. तो संघाचा सभासद झाल्यापासून आठव्या वर्षी एक अशी घटना घडली की, जी शुद्धोदनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली.

४. या दुःखान्तिकेचा आरंभ असा आहे-

५. शाक्‍यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती.

६. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपापल्या शेतीकरिता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे. या वादाची परिणती भांडणात व काही प्रसंगी मारामारीतही होत असे.

७. सिद्धार्थाच्या वयाला अठ्ठावीस वर्षे झाली. त्या वर्षी शाक्‍यांच्या व कोलियांच्या सेवकांत नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजुंच्या लोकांना दुखापती झाल्या.

८. जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलीय यांना मिळाली तेव्हा हा प्रश्‍न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्याना वाटले.

९. म्हणून शाक्‍यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्‍नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलाविले.

१०. संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, “आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे. अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहेत. आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहेत. पण यापुढे हे चालू देणे शक्‍य नाही. हे थांबलेच पाहिजे आणि हे थांबविण्याचा एकच मार्ग म्हणजे कोलियांच्याविरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय. कोलियांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो. ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे.”

११. सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला, “या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्‍न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतु सफल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील. जो दुसर्‍याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसऱयाला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो.”

१२. सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला, “संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये, असे मला वाटते . प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो. हे जर खरे असेल तर आपणसुद्धा निर्दोष नाहीत हे सिद्ध होते.”

१३. सेनापतीने उत्तर दिले, “होय, आपल्या लोकांनी अतिक्रमण केले, तथापि आपण हे विसरता कामा नये की, प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती.

१४. सिद्धार्थ गौतम म्हणाला, “यावरुन स्पष्ट होते को, आपण दोषापासून पूर्णपणे मुक्‍त नाही. म्हणून मी असे सुचवितो की, आपण आपल्यातून दोन माणस निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी दोन माणसे निवडावयास सागावे आणि या चौघांनी मिळून पांचवा मनुष्य निवडून घ्यावा आणि या पांच जणांनी हे भांडण मिटवावे.”

१५. सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले. परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला. तो म्हणाला, “माझी खात्री आहे की, कोलियांचा हा उपद्रव जोपर्यंत त्त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही.”

१६. यामुळे मूळ ठराव व त्याला सुचविलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली. सिद्धार्थ गौतमाने सुचविलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली. ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले.

१७. सेनापतीने त्यानंतर आपला स्वत:चा प्रस्ताव मतास टाकला. त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला. तो म्हणाला, “हा प्रस्ताव मान्य करू नये, अशी मी संघाला विनंती करतो. शाक्य आणि कोलीय यांचा निकटचा संबंध आहे. त्यांनी परस्पराचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही.”

१८. सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले. त्याने जोर देऊन सांगितले की, “क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करू शकत नाहीत. , आपल्या राज्याकरिता त्यांनी आपत्या सख्ख्या भावाशी देखील लढले पाहिजे.”

१९, “यज्ञयाग करणे हा ब्राम्हणांचा धर्म आहे, युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे, व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे, तर सेवा चाकरी करणे हा क्षुद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्णाला आपला धर्म पालन करण्यात पुण्य आहे. हीच आपल्या शास्त्रांची आज्ञा आहे.”

२०. सिद्धार्थाने उत्तर दिले, “धर्म याचा अर्थ मी असा समजतो की, वैराने वैर शमत नाही. वैरावर प्रेमानेच मात करता येते.”

२१. अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला, “या तत्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा हा आहे की, सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. यासंबंधी संघाचे काय म्हणणे आहे हे हा प्रस्ताव मतास टाकून याची खात्री करून घेऊ या.” त्यातुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला. फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले.

देशत्यागाची तयार

१. दुसरे दिवशी, युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हगून सेनापतीने शाक्‍य संघाची दुसरी सभा बोलाविली.

२. संघाची सभा भरल्यावर, कोलियांशी युद्ध करण्यासाठी २० ते २५ वर्षे वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल म्हावे. व, अशी घोषणा करण्यास संघाने घाने मला परवानगी द्यावी. असा सेनापतीने ठराव मांडला.

३. संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते व ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूकडचे लोक या सभेत उपस्थित होते.

४. ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काही एक अडचण नव्हती. त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता.

५. परंतु ज्या अल्पसंख्यांकांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्‍त केले होते त्यांच्यापुढे प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यांच्यापुढे प्रश्‍न होता-बहुसंख्यांकांच्यापुढे नमावे की नमू नये?

६. अल्पमतवाल्यांनी निश्च्य केला होता की, बहुमतवाल्यांच्या पुढे नमावयाचे नाही आणि याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यानी निर्णय घेतला होता. दुर्दैवाने त्यांच्यापैकी कुणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते. कदाचित त्यांना बहुमतवाल्यांना विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामाची जाणीव असावी.

७. जेव्हा सिद्धार्थाने पाहिले की, आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत तेव्हा तो उभा राहिला व संघाला उद्देशून म्हणाला, “मित्रहो ! तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा. तुमच्या बाजुला बहुमत आहे परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की, सैन्यभरतीच्या तुमच्या निर्णयाचा मी विरोध करीन. मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भाग घेणार नाही.”

८. सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले, “संघाचा सदस्य होताना तू घेतलेल्या शपथेची आठवण कर. तू त्यांपैकी एका जरी शपथेचा भंग केलास तरी तुला लोक निंदेला तोंड द्यावे लागेल.”

९. सिद्धार्थाने उत्तर दिले, “होय, मी माझ्या तनमनधनाने शाक्‍यांचे हितसंक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. पण हे युद्ध शाक्‍यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही. शाक्‍यांच्या सूहितापपुढे मला लोकनिंदेची काय पर्वा?”

१०. कोलियांबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणांवरून शाक्य हे कोशालाधिपतींच्या हातचे कसे खेळणे बनले आहेत याची आठवण करून देऊन सिद्धर्थाने संघाला सावधगिरीचा इशारा दिला. तो म्हणला, “हे समजणे कठीण नाही की, कोशल राजाला हे युद्ध शाक्यांचे स्वातंत्रय अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल.”

११. सेनापतीला ला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशुन तो म्हणाला, “तुझे हे भाषणकौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजे. कदाचित तुला असे वाटत असेल की, कोशल राजाच्या अनुज्ञेवाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहान्ताची कींवा देशत्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही आणि जर ह्यापैकी कोणतीही एक शिक्षा तुला संघाने जरी फर्मावली तरी कोशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही.”

१२. “पण लक्षात ठेव तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहेत. संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि सघ तुझ्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल. याकरिता कोशल राजाची अनुमती मिळविण्यची संघाला आवश्यकता नाही.”

१३. कोलीयांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली. त्याला तीन पर्याय विचारात घ्यावे लागले. एक सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे; दुसरा, देहान्तणासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे; आणि तिसरा, आपल्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन त्याच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे.

१४. पहिला पर्याय न स्वीकारण्याबहूल त्याचा निर्धार होता. तिसऱ्या पर्याया विषयीचा विचारच त्याला असह्य झाला. या स्थीतीत तात त्याला दुसरा पर्यायच यायच अधिक योग्य वाटला.

१५. त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला, “कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका. सामाजिक बहिष्कराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका. त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांची उपासमार करू नका. ते निरपराध अहेत. अपराधी मीच आहे. माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या. मला देहान्ताची वा देशत्यागाची यांपैकी तुम्हांला योग्य वाटेल ती शिक्षा द्या, ती मी खुषीने स्वीकारीन. याविषयी कोशलाधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही याचे मी आपणांस अभिवचन देतो.”

मार्ग सापडला-परिव्रज्या

१. सेनापती म्हणाला, “तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे. कारण, जरी तू देहान्ताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झालास तरी ही गोष्ट कोशलाधिपतीस समजणारच; आणि तो असाच निष्कर्ष काढील की, ही शिक्षा संघानेच दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारील.”

२. सिद्धार्थ गौतम म्हणाला, “हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवितो. मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकाराचा देशत्यागच होय.”

३. सेनापतीला वाटले की, हा एक चांगला मार्ग आहे. तथापि, सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरविता येईल किवा काय याबद्दल त्याला अद्यापही शंका होती.

४. म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले, “तुझ्या आई-वडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्यावाचून तुला परिव्राजक कसे होता येईल?”

५. “आपण त्यांची संमती मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करू,” असे सिद्धार्थाने त्याला अभिवचन दिले आणि तो म्हणाला, “त्यांची संमती मिळो वा न मिळो, हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो.”

६. सिद्धर्थाने सुचविलेला मार्ग हाच या बिकट समस्येसून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे असे संघाला वाटले आणि त्याने तो मान्य केला.

७. सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसजिंत होण्यापूर्वीच एक तरुण शाक्य आपल्या जागेवर उठून उभा राहिला आणि म्हणाला, “कृपा करून माझ म्हणणं ऐका मला काही महत्वाची गोष्ट सांगावयाची आहे.

८. बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला, “ सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळील आणि त्वरित देशत्याग करील याबद्दल मला शंका नाही. तथापि एकच प्रश्‍न आहे की, ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही.”

९. “आता, ज्या अर्थी सिद्धार्थ येथून लवकरच दृष्टीआड होणार आहे त्या अर्थी कोलियांविरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय?”

१०. “या प्रश्‍नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे. काहीही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची त्यागाचा माहिती कोशलाघपतीला कळणारच आहे. जर कोलीयांविरुद्ध शाक्‍यांनी यांनी इतक्यात युद्ध पुकारले रले तर कोलियांशी युद्ध करण्याच्या विरुद्ध सिद्धार्थ असल्यामुलेच त्याला देशत्त्याग करावा लागला असे कोशलाधिपतीला वाटेल. हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही!”

११. “म्हणून मी पुन्हा सुचवितो की, सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग व कोलियांशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ यांच्यात काही काळ जाऊ द्यावा, म्हणजे कोशलाधिपतीला या दोन घटनांनमध्ये संबध जोडण्यास वाव मिळणार नाही.”

१२. संघाला पटले की, ही फारच महत्वाची सूचना आहे; आणि तात्कालिक निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केले.

१३. अशा प्रकारे शाक्य संघाची दु :खपर्यवसायी सभा संपली आणि ज्यांचा युद्धाला विरोध होता, परंतु तसे परतु सांगण्याचे ज्यांना धैर्य नव्हते अशा अल्पसंख्य सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडत्याबद्दल सुटकेचा निःश्वास सोडला.

निरोप

१. शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता.

२ कारण, घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की, त्याचे मातापिता रडत आहेत व ते फार दुःखमग्न झाले आहेत.

३. शुद्धोदन म्हणाला, “आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो. पण तू या थरापर्यंत जाशील हे मला कधींच वाटले नाही.”

४. सिद्धार्थाने उत्तर दिले, “मला सुद्धा गोष्टी या थराला जाऊन पोहोचतील असे वाटले नव्हते. शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्‍यांची मने वळवू शकेन अशी मला आशा होती.”

५. “दुर्देवाने आपल्या सेनाधिकार्‍याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतविल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही एक परिणाम झाला नाही.”

६. “तथापि, मी परिस्थीतीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आले असेलच. सत्य आणि न्याय यापासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती मी माझ्या स्वत:वरच ओढवून घेण्यात यशस्वी झालो.”

७. शुद्धोदनाचे या योगाने समाधान झाले नाही. तो म्हणाला, “आमचे काय होणार याचा तू विचारच केला नाहीस.” “पण मी याच कारणामुळे परिव्राजक होण्याचे स्वीकारले,” सिद्धार्थाने उत्तर दिले. शाक्‍यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा.”

८. “पण तूझ्याशिवाय आम्हांला या जमिनीचा काय उपयोग आहे?” शुद्धोदन आंक्रदून म्हणाला, “सगळ्या कुटुंबानेच हा शाक्‍यांचा देश सोडून तुझ्याबरोबर अज्ञात वासात का जाऊ नये?”

९. रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोदनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली, “हेच बरोबर आहे. तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस?”

१०. सिद्धार्थ म्हणाला, “आई, तू क्षत्रियाची माता आहेस हे तू आजपर्यंत नाही का सांगत आलीस? हे खरे नाही का? मग तू धैर्य धरले पाहिजेस. हा दुखावेग तुला शोभत नाही. मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असतेस? तू अशीच रडत बसली असतीस काय?”

११. “नाही”! गौतमी उत्तरली, “ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते; पण तू आता अरण्यात जात आहेस. लोकांपासून अगदी दूर, हिंस्त्र पशूच्या सोबत राहण्याकरिता जात आहेस. आम्ही इथे शांततेने कसे राहणार? मी तुला सांगते, तू आम्हाला तुझ्यासोबत घेऊन चल.”

१२. “मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर नेऊ? नंद अगदीच लहान मूल आहे. माझा पुत्र राहुल नुकताच जन्मला आहे. त्यांना येथे ठेवून तू येऊ शकतेस काय?” सिद्धार्थाने गौतमीला विचारले.

१३. याने गौतमीचे समाधान झाले नाही. तिचे म्हणणे होते की, “आपण सर्वजण शाक्‍यांचा देश सोडून कोशलाधपतीच्चा संरक्षणाखाली राहण्याकरिता कोशल देशात शात जाऊन राहू शकू.

१४. “पण आई, सर्व शाक्यजन काय म्हणतील?” सिद्धार्थाने प्रश्‍न केला, “याला ते देशद्रोह नाही का समजणार? शिवाय माझ्या परित्रज्येचे कारण कोशलाधिपतीला समजेल असे मी वाचेने वा कृतीने काहीही करणार नाही, असे मी वचन दिले आहे.”

१५. मला अरण्यात एकटयालाच राहावे लागेल हे खरे आहे, पण यात कुठल श्रेयस्कर? अरण्यात राहणे की कोलियांच्या हत्येत सहभागी होणे?

१६. “पण ही घाई कशाला?” शुद्धोदन मध्येच म्हणाला. “शाक्य संघान काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.”

१७. “कदाचित युद्ध सुरूच होणार नाही. मग तू परिव्रज्या का स्थगित कुरू नये? कदाचित तुला शाक्‍यांत राहण्याकरिता संघाकडून अनुज्ञा मिळण्याचेही शक्‍य आहे.”

१८. सिद्धार्थाला ही कल्पना रुचली नाही. तो म्हणाला, “मी परिव्रज्या घेण्याचे वचन दिल्यामुळेच तर संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे.”

१९, “मी परिव्रज्या घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला उद्युक्त करणे शक्‍य आहे. हे सर्व मी प्रथम परिव्रज्या घेण्यावर अवलंबून आहे.”

२०. “मी वचन दिले आहे आणि ते मी पुरे केलेच पाहिजे. वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील.”

२१. “आई, आता माइया मार्गात आड येऊ नकोस. मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे. जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे.”

२२. गौतमी व शुद्धोदन स्तब्ध राहिले.

२३. सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेला. तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला. काय बोलावे व कसे बोलावे हे त्याला सुचेनासे झाले. यशोधरेनेच स्तब्धता भंग केली. ती म्हणाली, “कपिलवस्तु येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे.”

२४. सिद्धार्थाने विचारले, “यशोधरा, मला सांग, परिव्रज्या घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते?”

२५. त्याला वाटले की ती मूच्छित होऊन पडेल; पण तसे काही झाले नाही.

२६. आपल्या भावनावर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उत्तरली, “मी आपल्या जागी असते तरी आणखी दुसरे काय करू शकले असते! कोलियांविरुद्ध यूद्धकरण्याच्या कामी मी निश्चितपण भागीदारीण झाले नसते!”

२७. “आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे. माझी आपणाला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे. मी सुद्धा आपल्याबरोबर परिव्रज्या घेतली असती. मी परिव्रज्या घेत नाही याचे एकच कारण, मला राहुलचे संगोपन करावयाचे आहे.”

२८. “असे झाले नसते तर फार बरे झाले असते; पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे. आपल्या मातापित्यांविषयी व आपल्या पुत्राविषयी आपण मुळीच काळजी करू नका. माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांची देखभाल करीन.”

२९. “ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढा की, तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल. हीच एक केवळ माझी इच्छा आहे.”

३०. याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला. यशोधरा किती शूर, धैर्यवान, उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचीति त्याला आली आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत आणि अशा पत्नीचा व आपला वियोग दैवाने कसा घडवून आणला याची त्याला प्रथमच कल्पना आली. त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले. पित्याच्या वात्सल्यदृष्टीने त्याने त्याच्याकड पाहिले आणि तो निघुन गेला.

 

गृहत्याग

१. सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्रज्या घेण्याचा विचार केला. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तुमध्ये होता. त्याप्रमाणे तो दुसरे दिवशी आपला आवडता घोडा कंठक यावर आरूठ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला.

२.तो जसजसा आश्रमाच्या जवळ आला तसतसे एखाद्या नवीनच येणार्‍या नवरदेदाला पाहण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री-पुरुषांनी बाहेर येऊन त्याला भेटण्यासाठी दारापाशी एकच गर्दी केली.

३. आणि जेव्हा ते त्याच्याजवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडपाहु लागले व त्यांनी अस्फुट कमलाप्रमाणे हात जोडून त्याला वंदन केले.

४. ते त्याच्या सभोवती उभे राहिले. त्यांची अंत:करणे भावाकूल झाली होती. जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निश्चल नयनांनी ते त्याला प्राशन करीत होते.

५. काही स्त्रीयांना वाटले की, तो साक्षात कामदेवाचा अवतारच आहे. कारण तशा सुंदर लक्षणांनी तो जात्याच सालंकृत होता.

६. काहीना तर त्याची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्‍त असा चंद्रच पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरलेला आहे असा तो भासला.

७. दुसऱ्या काही जणी त्याच्या सौंदर्याला भाळून जणू काय त्याला गिळून टाकावे म्हणून जांभया देत होत्या आणि एकमकींकडे नजरा रोखून हलकेच नि:श्वास टाकीत होत्या.

८. अशा प्रकारे स्त्रिया त्याच्याकडे नजरा लावून केवळ पाहात राहिल्या होत्या. त्यांच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्यांच्या चेहरयावर स्मित येत नव्हते. परिव्रज्या घेण्याच्या त्याचा निर्णयाचा विचार करीत दिडमूढ स्थितीत त्याच्या भोवती त्या उभ्या राहिल्या.

९. मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्याने आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला.

१०. आपण परिव्रज्या घेत असताना शुद्धोदनाने व प्रजापती गौतमीने तेथेउपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही. कारण त्याला ठाऊक होते की, दुःखावेगाने ती स्वतःला सावरून धरू शकणार नाहीत; परंतु ती त्याच्या न कळत अगोदरच आश्रमात येऊन पोहोचली होती.

११. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकांत आपले मातापिता असल्याचे त्याने पाहिले.

१२. आपल्या मातापित्यास पाहताच तो प्रथम त्यांच्याजवळ गेला आणि त्याने त्यांचा आशीर्वाद मागितला.त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की,त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. त्यांनी रडरडून त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रुंनी न्हाऊन काढले.

१३. छन्नाने कंठकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधून तो तेथे उभा होता. शुद्धोदन व प्रजापती रडत असलेली पाहून त्यालाही भरून आले आणि तो रडू लागला.

१४. मोठचा कष्टाने सिद्धार्थ आपल्या मातापित्यांपासून दूर झाला व छन्न जेथे उभा होता तेथे गेला. त्याने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले.

१५. त्याने परिव्राजक ला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले. त्याचा चुलतभाऊ महानाम याने परिव्रजकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते. सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले.

१६. अशा प्रकारे परिव्राजकां च्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्व तयारी करून सिद्धार्थ परिव्रज्येची दीक्षा घेण्याकरिता भारद्वाजापाशी गेला.

१७. भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्चा सहाय्याने आवश्यक तो संस्कारविधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजकां झाल्याचे जाहीर केले.

१८. परिव्रज्या घेण्याची व विलंब न लावता शाक्य राज्याच्चा सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्चा समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिव्रज्येचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला.

१९. जो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता. कारण गौतमाला परिव्रज्या ध्यावयास लागणारी परिस्थितीच मोठी असाधारण हाती. राजपुल आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्याच्या मागोमाग जाऊ लागला.

२०. त्याने कपिलवस्तु सोडले आणि तो अनोभा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदायही अद्याप त्याच्चा मागोमाग येत असलेला त्याने पाहिला.

२१. तो थांबला आणि त्या समुदायास उद्देभून म्हणाला, “बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही. मी शाक्य आणि कोलियांच्यामधील झगडा मिटविण्यात अयशस्वी ठरलो आहे; परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल म्हणून तुम्ही परत जाण्याचीची कृपा करा.” ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला.

२२. शुद्धोदन व गौतमी राजवाड्याकडे परतले.

२३. सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे व अलंकार पाहाणे गौतभीला असह्य झाले. तिने ती कमळानी भरलेतल्या एका तळ्यात टाकली.

२४. परिव्रज्या (संन्यास ) ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे एकोणतीस वर्षाचे होते.

२५. लोक त्याची आठवण करून त्याची प्रशंसा करून म्हणत, “हाच तो श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य, थोर मातापित्यांच्या पोटी जन्मलेला, विपुल धनसंपन्न व नवयौवन-शाली, बुद्धीने व शरीराने सुसंपन्न असून राजविलासांत वाढलेला; पृध्वीवर शांती नंदावी म्हणून लोककल्याणासाठी तो स्वकीयांशी लढला!”

२६. “तो असा शाक्य युवक होता की, ज्याने स्वकीयांच्या बहुमतापुढे आपलेशीर झुकविले नाहीच; पण स्पेच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्करले. त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याएवजी दारिद्म, सुखसमृदीऐवजी भिक्षापात्र, गृहसौख्याऐवजी गृहहीन स्थिती असा होता; आणि तो अशा तर्हेने जात आहे की, त्याची काळजी वाहणारे जगात कोणी नाही आणि जगात स्वत:ची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तु त्याने सोबत घेतलेली नाही.”

२७. “हा त्याचा स्वेच्छेने केलेला महान असा त्याग होय. हे त्याचे शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे. जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही. त्याला शाक्‍यमुनी अथवा शाक्‍यसिंह असेच म्हणावे लागेल.”

२८. शाक्‍यकुमारी किसा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते. सिद्धार्थ गौतमाच्यासंबंधी तिने म्हटले होते. “धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला. धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला!”

राजपुत्र आणि त्याचा सेवक

१. कंठकाला घेऊन छन्नानेही घरी परतले पाहिजे होते; पण त्याने परत जाण्याचे नाकारले. त्याने राजपुत्राला कंठकासह अनोभा नदीच्या तीरापर्यंत तरी पोहोचविण्याचा आग्रह धरला. छन्नाचा आग्रह इतका होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार ध्यावी लागली.

२. शेवटी ते सर्वजण अनोभा नदीच्या तीरावर येऊन पोचले.

३. तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाला, “मित्रा, माझ्या पाठोपाठ येण्याने तुझी माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे. क्या स्वामिभकतीने तू माझे हृदय जिंकिले आहेस.”

४. “तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे.”

५. “ज्याच्याकडून आपणाला लाभ होणार आहे त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखविणार नाही? पण दैव फिरले की, आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परक्‍यासारखी वागतात.”

६. “कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते. पित्याचा सन्मान पुत्र करतो तो त्याच्या भावी पोषणासाठी. जग आशेसाठी माया करते. काही एक हेतूशिवाय स्वार्थनिरपेक्षता असूच शकत नाही.”

७. “तूच एक याला अपवाद आहेस. आता हा घोडा घे आणि परत जा!”

८. “महाराज जरी आपल्या प्रेमल आत्मविश्वासामुळे अद्याप डळमळले नसले तरी ते आपले दुःख आतल्या आंत गिळण्याची पराकाष्ठा करीत असतील.”

९. “त्यांना सांग की, मी त्यांना सोडून आलो तो स्वर्गप्राप्तीच्या तृष्णेमुळे कींवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही.”

१०. “घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये. सहवास हा कितीही दीर्घ काल टिकला तरी कालावधीने त्याचा शेवट हा होतोच.”

११. “जर वियोग अटल आहे तर स्वजनांपासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाहीत?”

१२. “माणसाच्या मरणसमयी त्याच्या संपत्तीचा नि:संशय वारसाहक्क सांगणारे लोक असतात; परंतु त्याच्या सद्गुणांचे चे वारस जगात सापडणे कठीण असते, किंबहुना ते नसतातच.”

१३. “महाराजांची-माझ्या पिताजींची-सेवा-शुश्रूषा होणे अगत्याचे आहे. महाराज म्हणतील की, मी अवेळी निघून गेलो; पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते.”

१४. “ह्या आणि अशाच शब्दांत मित्रा, महाराजांना सांग आणि जेणेकरून ते माझी आठवणही करणार नाहीत असाच प्रयल करीत राहा”

१५. “आणि होय, माझ्या मातेलाही पुन्हापुन्हा सांग की, तिच्या वातल्यप्रेमाला मी किती तरी अपात्र आहे. ती फार थोर स्त्री आहे. तिची थोरबी शब्दानी सागता येण्यासारखी नाही.”

१६. हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्न हात जोडून भावनातिरेकाने कंठ दाटून येऊन उत्तरला :-

१७. “स्वामी, चिखलाने भरलेल्या नदीच्या पत्रात हत्ती जला रुतून बसावा, तशी तू तुझ्या आप्तानां ज्या मानसिक वेदना देत आहेस ते पाहून माझ्या मनाची स्थिती होत आहे.”

१८. “तुझ्यासारखा निग्रह पाहुन, एखाद्याचे अंत:करण लोखंडासारखे कठीण असले तरी कोणाच्या डोळ्यात अश्रु आल्याशिवाय राहाणार नाहीत? ज्यांचे अंत:पारण प्रेमाने उचंबळले आहे त्यांची तर गोष्टच बोलावयास नको.”

१९. “कुठे तुझा तो प्रासादात लोळणाऱया शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कुशाग्रांनी भरलेली तपस्व्यांच्या अरण्यातील ती भूमि!”

२०. “हे राजपुत्रा, तुझा हा निर्णय माहीत असताना-हा घोडाघेऊन कपिलवस्तु नगरीला दुःखात लोटण्यास मी आपणहुन कसा जाऊ?”

२१. एखादा धर्मनिष्ठ माणुस आपल्या सद्धर्माला सोडून देईल काय? त्याचप्रमाणे स्वत:च्या मुलासाठी सतत झटणान्या आपण्या वयोबृद्ध पित्याला सोडून तूजाणार काय?”

२२. “आणि तुझी सावत्र आई-जिने तुला लहानाचे मोठे करण्यात खस्ता खाल्यातिला एखादा कृतघ्न माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसा तू सोडून जाणार काय?”

२३. “जी सद्रणाची खाण आहे, जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढली आहे, जी पतिभक्तिपरायण असून जिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे अशा तुझ्या त्या पत्नीचा तू त्याग करणार काय?”

२४. “धर्म आणि कीर्तीच्या चाहत्यात सर्वश्रेष्ठ असणारा तू, एखाद्या निगरगट्ट उधळ्या माणसाने स्वतःचे मौल्यवान धन उधळून टाकावे तसे, ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशा यशोधरेच्या त्या लहानग्या बाळाला सोडून जाणार काय?”

२५. “आणि तू तुझे आप्त नातलग व राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धार केला असलास तरी, हे अन्नदात्या, तू मला सोडून जाणार नाहीस असा मला विश्वास आहे. कारण तुझे पाय हेच माझे आश्रयस्थान आहे.”

२६. “अशा प्रकारे माझे अंतःकरण तुझ्यासाठी होरपळून निघत असताना तुला असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊच शकत नाही.

२७. “तुझ्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणतील? आणि कुशल वर्तमान म्हणुन मी तुझ्या पत्नीला काय सांगू?”

२८. “राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तूर सागतोस; पण ते कोण खरे मानील? आणि कोण त्यावर विश्वास ठेवील?’ छन्न पुढे म्हणाला, “आणि जरी निर्लज्ज मनाने आणि जीभ टाळ्याला चिकटवून तसे बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजांना ते पटणार नाही.

२९. “जो नेहमी प्रेमळ आहे आणि जो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही, अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्‍तीस सोडून जाणे मुळीच शोभत नाही. म्हणून मागे फीर आणि माझ्यावर दया कर!”

३०. दुःखाकुल छन्नाचे ते शब्द ऐकून अगदी हळळुवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले,

३१. “छन्ना, माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे, अनेक जन्मांच्या फेर्‍यात सापडलेल्या प्राणांच्या बाबतीत बदल हा अटळ आहे.”

३२. “प्रेमामुळे मी माझ्या आप्तनातलगांना सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला अगतिकपगे एकमेकांस सोडण्यास भाग पाडील.”

३३. “ती माझी आई, जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरी जन्म दिला, तिच्या बाबतीत मी कुठे आहे आणि माझ्या बाबतीत ती आता कुठे आहे?”

३४. “पक्षी जसे आपल्या निवाऱयासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकांपासून दूर जातात तसे प्राणिमात्रांच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो.”

३५. “ढग जसे जवळ जवळ येऊन पुन्हा दूर दूर जातात तसाच मी प्राणीमात्रांचा सहवास व वियोग मानतो.”

३६. “आणि ज्या अर्थी एक दुसऱ्याची फसवणूक करीत हे सर्व जग चालले आहे त्या अर्थी भीतिदायक असणाऱ्या संयोगकाळात हे माझे ते माझे असे मानणे बरोबर नाही.”

३७. “आणि म्हणून, ज्या अर्थी हे सत्य आहे त्या अर्थी माझ्या भल्या मित्रा, तू दु:ख करू नकोस. परत जा. आणि जर तुझ्या प्रेमामुळे तू घोटाळत असशील तर तू आधी जा आणि नंतर परत ये.”

३८. “माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिलवस्तूच्या लोकांना जाऊन सांग की, ‘सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडा व त्याचा निर्धार ऐका.’”

३९. स्वामी आणि सेवक यांच्यामधील हा संवाद ऐकून त्या उमद्या कंठक घोड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टपटप उष्ण अश्रु ढाळले.

४०. ज्याची बोटे एकमेकाशी जुळलेली, ज्यावर स्वस्तिकाचे शुभचिन्ह आणि ज्याचे तळवे मध्ये खोलगट होते अशा आपल्या हाताने तान गौतमाने तमान कंठक घोड्याच्या पाठीवर ठाव थोपटले आणि एखाद्या मित्रासारखा त्रासारखा तो त्याला म्हणाला,

४१. “अश्रु ढाळू नकोस, कंठका! आवर ते अश्रु. तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल.”

४२. त्यांनतर छन्नाने आपापल्या मार्गाला लागण्याची वेळ आली आहे हे जाणून ताबडतोब गौतमाच्या काषाय वस्त्रांना नमन केले.

४३. कंठक आणि छन्न याचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागला.

४४. अशा रीतीने स्वत:च्या राज्याची तमा न बाळगता हलक्‍या वस्त्रांनिशी ऋषीवनाकडे जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून त्या छन्नाने आपले बाहू पसरून मोठा आक्रोश क्राश केला व तो जमिनीवर लोळू लागला.

४५. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहात तो मोठमोठ्याने रडू लागला. आपल्या बाहुंनी कंठक घोड्याला कुरवाळू लागला आणि अशा रीतीने निराशेने सारखा दु:ख करीत तो परत जाण्यासाठी आपल्या प्रवासास निघाला.

४६. मार्गात तो काही वेला आपल्याशीच विचार करीत त राही; काही वेळा चालताना अडखले व काही वेला जमिनावर पडे. आणि अशा रीतीने जात असताना स्वामीभक्तीने विदग्ध झालेला तो छन्न रस्त्यावर अशा काही गोष्टी करीत होता की, आपण काय करीत आहोत याचे त्याला भानच राहिले नव्हते.

छन्न परतला

१. आपला मालक अशा रीतीने अरण्यात गेला यामुले दुःखी कष्टी क्षालेला छन्न मार्गात आपल्या दुःखाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता.

२. त्याचे अंतःकरण इतके जड जले होते की, ज्या रस्त्याने कंठकासह तो एका रात्रीत कूच करीत असे, त्याच रस्त्याने आपला स्वामी आपल्याबरोबर नाही याचा विचार करीत प्रवास संपविण्यात त्याला आठ दिवस लागले.

३. कंठक घोडा जरी मोठया शूराच्या आवेशाने कूच करीत होता तरी तो अगदी गलितगात्र, निस्तेज झाला होता. जरी तो अलंकारभूषणांनी सजविलेला होता तरी बरोबर आपला धनी नाही म्हणून अगदी स्वरूपहीन दिसत होता.

४. आणि ज्या दिशेला त्याचा मालक गेला होता त्या दिशेकडे वळून एकसारखी मान वर खाली करून केविलवाण्या सुरात खिंकाळत होता. तो जरी अतिशय भुकेलेला होता तरी पूर्वीप्रमाणे मार्गात गवत किंवा पाणीयाची त्याने अपेक्षा केली नाही किंवा त्यांना तोंडही लावले नाही.

५. हळूहळू ते शेवटी कपिलवस्तुला येऊन पोहोचले. कपिलवस्तु नगरी तर गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड दिसत होती. ते दोघे कपिलवस्तुला शरीराने पोचले, मनाने नाही.

६. जरी कपिलवस्तु नगरी अधून मधून कमळाच्या ताटव्यांनी भरलेल्या जलाशयामुळे व फुलांनी बहरलेल्या वृक्षांमुळे उल्हसित व शोभायमान दिसणारी होती तरी आज तिच्या नागरिकांचा आनंद पार मावळला होता.

७. निस्तेज चेहर्‍याने व अश्रु ढाळीत त्या दोघांनी जेव्हा हळू हळू शहरात प्रवेश केला तेव्हा त्या शहरातील सर्व लोक त्यांना शोकात बुडालेले दिसले.

८. जेव्हा लोकांनी छन्न आणि घोडा कंठक हे शाक्‍य कुलाच्या कुलदीपकाशिवाय गलितगात्र स्थितीत परत आलेले पाहिले तेव्हा त्यांनी ढळढळा अश्रु ढाळले!

९. “कुठे आहे आमचा राजपुत्र? कुठे आहे या राजकुळाचा व राज्याचा कुलदीप?” असे म्हणून व अश्रु ढाळीत लोक रागाने छन्नाच्या मागोमाग रस्त्याने धावू लागले.

१०. “गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य आहे आणि ज्या अरण्यात गौतम राहात आहे ती नगरी आहे. गौतमाशिवाय या शहराचे आम्हाला काहीसुद्धा आकर्षण वाटत नाही.”

११. इतक्यात “राजपुत्र आला” असा हर्षोद्वार काढीत नगरयुवती रस्त्याच्या बाजूच्या खिडकीसून गर्दी करून पाहू लागल्या. परंतु जेन्हा त्यानी घोड्याची पाठ रिकामी पाहिली तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आकोशाने रडू लागल्या.

 

शोकाकुल कुटुंब

१.शुद्धोदनाची कुटुंबीय मंडळी छन्न परत येण्याची आतुरतेने तेने वाट पाहात होती. त्यांना आशा होती की, छन्न सिद्धार्थ गौतमाला घरी परत येण्यास भाग पाडील.

२. राजाच्या अश्व-शाळेत शिरताच कंठक घोडा आपले दुःख राजमहालातील लोकांना कळण्यासाठी मोठयाने खिंकाळला.

३. राजाच्या अंतःपुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले, “ज्या अर्थी घोडा कंठक खिकाळत आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा.”

४. आणि दु:खाने मूच्छित झालेल्या स्त्रिया हर्षाने बेहोष होऊन डोळे विस्फारीत राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या. परंतु त्यांची मोठी निराशा झाली. राजपुत्राशिवाय केवळ कंठक घोडाच त्यांना दिसला.

५. गौतमीचा तर मनावरचा ताबा सुटून ती मोठमोठ्याने रडू लागली व मूच्छित झाली आणि रडत असतानाच ती ओरडली

६. “जो आजानुबाहू आ हे, ज्याची कमर सिंहाच्या कमरेसारखी बारीक, बैलाच्या डोळ्यासारखे ज्याचे डोळे, ज्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळी धमक ज्याची छाती रुंद व आवाज दुंदुभी किंवा मेघगर्जनेसारखा आहे अशा वीरपुरुषाने वनातील आश्रमात राहावे काय?”

७. “असा सर्वगुणसंपन्न वीर पुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी त्या थोर कार्य करणाऱ्या अद्वितीय पुरुषाच्या बाबतीत राहण्यास खरोखर अयोग्य अशीच झाली आहे?

८. “ज्याची बोटे सुंदर स्रायूंनी जोडलेली आहेत, ज्यांचे घोटे स्रायूखाली लपलेले, नीलकमळासारखे दिसणार्‍या व मध्यावर चक्रचिन्ह धारण करणाऱ्या अशा त्याच्या त्या सुकोमल दोन पायांनी तो त्या खडकाळ प्रदेशात कसा बरे चालू शकेल?”

९. “ज्याच्या शरीराला ऊंची वस्त्रे-प्रावरणे, सुगंधी अत्तरे व चंदनाने सजविलेल्या प्रासादाच्या गच्ची वर पहुडण्याची सवय तो पौरुषसंपन्न देह अरण्यात थंडी-वारा, व ऊन-पावसाच्या माऱ्याला नेहमी मोकळ्या असलेल्या अरण्यात कसा बरे राहु शकेल?”

१०. “ज्याला आपले कुटुंब, चांगुलपणा, सामर्थ्य, शक्‍ती, विद्वत्ता, सौंदर्य व तारुण्य याचा अभिमान वाटतो, जो नेहमी दान करण्यास सिद्ध असतो, पण घेण्यास नसतो, तो दुसर्‌याकडून भिक्षा मागत कसा काय फिरू शकेल?”

११. “जो स्वच्छ सुवर्ण शय्येवर झोपला असताना वाद्यवृंदाच्या नादमाधुर्याने रत्री ज्याला जागे केले जाते, तो माझा संन्याशी उघड्या जागेवर अस्ताव्यस्त पसरलेल्या फाटक्या चिंध्यांवर कसा काय झोपणार? हाय रे दैवा!”

१२. हा असा हृदयद्रावक शोक ऐकून तेथील स्त्रिया एकमेकींच्या गळ्यात गळा घालून, थरथरणाच्या वेली जशा आपल्या फूलांतून मध गाळतात तशा आपल्या डोळ्यांतून अश्रुधारा गाळीत होत्या.

१३. नंतर यशोधरेने आपण सिद्धार्थाला जाण्याची अनुज्ञा दिली आहे हे विसरून जाऊन दिडमूढ अवस्थेत धरणीवर अंग टाकून दिले.

१४. “मी त्यांची धर्मपत्नी असताना ते मला कसे सोडून गेले? त्यांनी मला विधवा करून मागे ठेविले. त्यांनी आपल्या धर्मपत्नीला आपल्या नव्या जीवनक्रमाची भागीदारीण करावयास पाहिजे होते.”

१५. “मला स्वर्गप्राप्तीची अपेक्षा नाही. माझी एकच इच्छा की, माझ्या प्रिय पतीने मला या किंवा दुसऱ्या जगात एकटीला मागे ठेवून जाऊ नये!”

१६. “विशाल डोळे व प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्यास मी जरी अपात्र असले तरी या बिचाऱ्या राहुलाने आपल्या पित्याच्या मांडीवर कधीही खेळु नये काय.

१७. “हाय रे देवा! त्या सुज्ञ पुरुष नायकाचे अंत:करण किती निष्ठुर! त्याच्या सुकोमल सौंदर्याप्रमाणे ते भासत असले तरी किती निर्दय व कूर! शत्रूलाही मोहित करील अशा बोबड्या बोलाच्या ह्या बालकाला आपण होऊन कोण बरे सोडून जाईल?”

१८. “माझे हृदय खरोखर मोठे कठोर आहे, होय! अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे बनलेले असावे! कारण त्या हृदयाचा नाथ सुखोपभोग घेण्यास समर्थ असताना व एखाद्या पोरक्यासारखा आपले सर्व राजवैभव सोडून देऊन अरण्यात गेला असतानाही त्या हृदयाला तडा गेला नाही! पण मी काय करू? आता मला हे दुःख सहनच होत नाही!”

१९. अशा वर्हेने दुःखाने मूच्छित होऊन यशोधरा एकसारखी आक्रंदत होती. स्वभावतः जरी ती संयमशील होती तरी तिच्या या दुःखद स्थितीने तिच्या मर्यादेचा बंधारा फुटला होता.

२०. अशा प्रकारे दु:खाने दिडमूढ होऊन मोठमोठ्याने आक्रंदत जमिनीवर पडलेल्या यशोधरेला पाहून सर्व स्त्रिया मोठ्याने ओरडल्या आणि मोठाल्या कमळांवर पावसाच्या सरींचा मारा व्हावा तसा अश्रूंच्या नद्या त्यांच्या डोळ्यांतून गालावर वाहू लागल्या.

२१. छन्न आणि कंठक परत आले हे ऐकून आणि आपल्या मुलाचा दृढनिश्चय समजताच दुःखित होऊन राजा शद्धोदन धरणीवर पडला.

२२. दुःखविव्हळ झालेल्या शुद्धोदनाला सेवकांनी सावरून धरले. तेवढचात त्यांनी अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून विव्हळून तो रडू लागला.

२३. त्यानंतर शुद्धोदन उठला आणि मंदिरात गेला. त्याने तेथे देवाची प्रार्थना केली आणि पूजाअर्चा करून, आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून देवाची आराधना केली. अशा प्रकारे, “देवा, कधी रे आम्ही त्याला पुन्हा पाहू” असे म्हणत शुद्धोदन, गौतमी आणि यशोधरा दिवस कंठू लागली.

Previous page                            Next page


The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar

error: Content is protected !!