Renunciation for Ever

THE BUDDHA AND HIS PREDECESSORS

प्रथम खंड : सिद्धार्थ गौतम – बोधिसत्व बुद्ध कसे झाले

भाग २ कायमचा संसार त्याग

Renunciation for Ever

Previous page                                            Next page

कपिलवस्तूहून राजगृहाकडे प्रयाण

१. कपिलवस्तु सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थ गौतमाने विचार केला.

२. राजा बिंबिसार हा तेथे राज्य करीत होता. मोठमोठे तत्त्वज्ञ आणि विचारवंत यांनी राजगृह हे आपले मुख्य निवासस्थान बनविले होते.

३. हा विचार मनात ठेवून गंगेच्या वेगवान प्रवाहाची तमा न बाळगता तो तिचे पाल ओलांडून पलीकडे गेला.

४. वाटेत तो प्रथम साकी नावाच्या एका ब्राम्हण योगिनीच्या आश्रमात थांबला, नंतर तो पुढे पद्या नावाचा दुसऱ्या एका ब्राम्हण योगिनीच्या आश्रमात गेला; आणि मग रैवत नावाच्या ब्राम्हण ऋषी च्या आश्रमात जाऊन राहिला. त्या सर्वांनी त्याचे आदरातिथ्य केले.

५. त्याचे आकर्षक व्यक्तिमत्व, उदात्त वागणूक आणि इतर सर्व पुरुषांना मागे टाकणारे त्याचे विलोभनीय सौंदर्य पाहिल्यावर त्या प्रदेशातील लोक त्याने अंगावर संन्याशाचे कपडे घातलेले गतलल पाहून आश्चर्य करू लागले.

६. त्याला पाहिल्यावर दुसरीकडे जात असलेला मतुष्य निश्चल उभा राही. तर उभा असलेला मनुष्य त्याच्या मागोमाग चालू लागे. सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य धावू लागे, तर बसलेला मनुष्य कदम उठून उभा राही.

७. काही लोक त्याला दोन्ही हातानी वंदन करीत. काही पूज्य बुद्धीने मस्तक नमवून त्याला अभिवादन न करीत. काही जण प्रेमळ शब्दांनी त्याला संबोधीत. कोणीही मनुष्य त्याला अभिवादन केत्याखेरीज जात नसे.

८. ज्यांनी रंगबेरंगी कपडे घातले होते अशा लोकांना त्याला पाहून लाज वाटे. वाटेल त्या विषयावर गप्पा मारणारे लोक गप्प होत. त्याला पाहिल्यावर कुणाच्याही मनात वाईट विचार येत नसत.

९. त्याचा भुंवया, त्याचा भालप्रदेश, त्याचे मुख, त्याचे शरीर, हात-पाय किंवा त्याची चालण्याची ढब यांपैकी त्याच्या कोणत्याही भागाकडे एखाद्याची नजर गेली की त्या क्षणीच त्याची दृष्टी तेथे खिळून राही.

१०. दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर, पाच टेकड्यांनी वेढलेल्या पर्वतराजींन रक्षिलेल्या व सुशोभित केलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळांनी पुनीत झालेल्या राजगृह नगरीत गौतम येऊन पोहोचला.

११. राजगृहास आल्यावर पांडव टेकडीच्या पायथ्याशी एक जागा त्याने निवडली व तेथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानशी पर्णकुटी त्याने तयार केली.

१२. राजगृहापासून कपिलवस्तु पायवाटेने जवळजवळ ४०० मैल अंतरावर आहे.

१३. हा सगळा दीर्घ प्रवास गौतमाने पायीच केला.

राजा बिंबीसाराचा उपदेश

१. दुसऱ्या दिवशी तो उठला आणि भिक्षेकरिता शहरात जाण्यासाठी निघाला. फार मोठा जमाव त्या वेळी त्याच्याभोवती जमला.

२. त्या बेळी मगधाधिपती श्रेणीय बिबीसार राजाने राजवाड्याच्या बाहेर लोकांचा तो प्रचंड जनसमुदाय पाहिला आणि त्याने हे एवढे लोक जमण्याचे कारण काय याची विचारणा केली. तेव्हा एका राजसेवकाने त्याला पुढीलप्रमाणे हकीकत सांगितली.

३. “ज्याच्याबद्दल ब्राम्हणांनी असे भविष्य वर्तीवले होते की, ‘हा एक तर उच्चतम ज्ञान प्राप्त करून घेईल किंवा या पृथ्वीचा सम्राट होईल’ तोच हा शाक्‍यांच्या राजाचा पुत्र आहे, त्यालाच पाहण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत.”

४. हे ऐकून आणि त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आज्ञा दिली की, “जा! तो कुणीकडे जात आहे ते पाहून मला येऊन सांग!” तो सेवक राजाची आज्ञा होताच त्या राजपुत्राच्या मागोमाग जाऊ लागला.

५. स्थिर नेत्रांनी आपल्या पुढील केवळ जोखडभर अंतरापर्यंतच पाहात शरीराचे अवयव आणि मनात भरकटणारे विचार कह्यात ठेवून तो याचक श्रेष्ठ सावकाश आणि मोजून पावले टाकीत हळू आवाजात भिक्षा मागत चालला होता.

६. मिळेल ती भिक्षा स्वीकारून तो पर्वताच्या एका निवान्त कोपर्यात जाऊन बसला आणि तेथे अन्नसेवन करून तो पांडव टेकडीवर चढून गेला.

७. लोधरवृक्षांनी दाटलेल्या आणि मयूरांच्या केकारवांनी निनादलेल्या त्या अरण्यात रक्‍तरंगाची वस्त्रे धारण केलेला तो मानवजातीचा सूर्य पूर्वदिशेच्या शच्या पर्वतराजीवरील आजावराल बालसूर्यासारखा तळपू लागला.

८. याप्रमाणे त्याला लक्षपूर्वक पाहिल्यावर त्या राजसेवकांनी राजाला सर्व हकीकत सांगितली आणि राजाने जेव्हा ती ऐकली तेव्हा अति आदराने आणि मोजकाच लवाजमा घेऊन तो स्वतः तिकडे जाण्यास निघाला.

९. पर्वताप्रमाणे धिप्पाड असा तो राजा टेकडी चढून गेला.

१०. त्या ठिकाणी आसनस्थ आणि जितेंद्रिय असा तेजस्वी गौतम त्याच्या दृष्टीस पडला. जणू काही तो पर्वत हलत असून स्वतः गौतम हा त्या पर्वताचे शिखर आहे, असा त्याला भास झाला.

११. शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मन:शांति यामुळे वैशिष्यपूर्ण दिसणार्या गौतमाला त्या नराधिपाने पाहिले

आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्ण आदरभावाने तो त्याच्याजवळ गेला.

१२. बिबिसाराने मोठ्या आदराने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या शरीरस्वास्थ्या विषयी विचारपूस केली आणि गौतमाने तितक्‍याच ममत्वाने आपले मन स्वस्थ व शरीर सर्व व्याधींपासून मुक्‍त असल्याची खात्री दिली.

१३. त्यानंतर तो राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपल्या मनःस्थितीची कल्पना देण्याच्या हेतूने तो म्हणाला,

१४. “बाळ, तुझ्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे. ती वंशपरंपरागत असून तिची दृढता चांगली सिद्ध झालेली

आहे. म्हणूनच तुला काही सांगावे अशी इच्छा माइया मनात निर्माण झाली आहे. माझे प्रेमाचे शब्द तू नीट ऐक.”

१५. “सूर्यापासून ज्याचा प्रारंभ झाला आहे असा तुझा वंश, नवतारुण्य, डोळ्यांना भुरळ घालणारे सौंदर्य याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला अचंबा वाटतो की, इतर सर्व गोष्टींशी इतका विसंगत असा, राजोपभोगापेक्षा सर्वस्वी सन्याशाचे जीवन जगण्याचा हा तुझा निर्धार तुझ्या मनात कसा निर्माण झाला?”

१६. “तुझ्या अवयवांना रक्‍तचंदनाचा सुगंधच योग्य आहे. रक्‍तवर्णाची ही जाडीभरडी वस्त्रे त्यांना शोभत नाहीत. या तुझ्या हाताने प्रजाजनांचे रक्षण करावे; दुसर्याने दिलेले अन्न धारण करणे त्याला शोभत नाही.”

१७. “म्हणून सौजन्यशील युवका, जर तुला तुझ्या वडिलांचे राज्य नको असेल तर माझ्या अर्ध्या राज्याचा तू औदार्याने स्वीकार कर.”

१८. “या प्रमाणे तू केलेस तर तुझ्या आप्तस्वकीयांना दुःखाचे कारण उरणार नाही. कालांतराने सार्वभौम सत्तादेखील अखेरीस धीरगंभीर अशा पुरुषाच्या आश्रयासाठी धाव घेते. म्हणून या बाबतीत तू मला उपकृत कर. सज्जनांच्या साहाय्या-मुळे सज्जनांचा उत्कर्ष जास्त प्रभावी ठरतो.”

११. “परंतु तुझ्या वणशाभिमानामुळे जर तुला माइयाविषयी विश्वास वाटत नसेल तर अगणित अशा सज्ज असलेल्या सैन्यात आपल्या बाणासह सामील हो. आणि मला मित्र मानून आपल्या शत्रूंना जिंकण्याचा प्रयत्न कर.”

२०. “म्हणून तू यांपैकी एका गोष्टीचा स्वीकार कर. धर्म, संपत्ती आणि सुख यांच्या नियमांना अनुसरून तू वाग. प्रेम आणि इतर गुण यांना तू अनुसर. जीवनाची ही तीन उद्दिष्टे आहेत. जेव्हा माणसे मरतात तेव्हा केवळ या जगापुरताच त्यांचा अंत होतो.”

२१. “म्हणून जीवनाच्या या तीन उद्दिष्टांना अनुसरून त्यांची फलप्राप्ती करून घेण्यास तुझे हे व्यक्तिमत्वकारणीभूत होऊ दे. असे म्हणतात की, धर्म, संपत्ती आणि सुख यांची ज्या वेळी संपूर्ण प्राप्ती होते त्याच वेळी मानवी जीवनाचा हेतू पूर्ण होतो.”

२२. “धनुष्याची दोरी खेचण्यास लायक असलेले हे तुझे दोन बलवान बाहू निरुपयोगी राहू देऊ नकोस. ते ही पृथ्वीच काय पण त्रैलोक्य जिकण्यास अधिक समर्थ आहेत.”

२३. “मी तुला हे प्रेमामुळे सांगत आहे. सत्ता किंवा उद्धटपणामुळे नव्हे. तुझा हा याचकवेष पाहून माझे मन अनुकपेने भरून आले आहे आणि मी अश्रू ढाळीत आहे.”

२४. “याचकाचे जीवन जगू इच्छिणाऱ्या गौतमा, नामवंत अशा तुझ्या वंशाला साजेसे तुझे सौंदर्य, वार्धक्य येऊन नष्ट होण्यापूर्वी वेळ गेली नाही तोपर्यन्त, आताच सर्व सुखाचा उपभोग घे.”

२५. “वृद्ध मनुष्य धर्माने पुण्य मिळवू शकतो. सुखोपभोगाच्या दृष्टीने वृद्धा पकाळ असह्य असतो. म्हणून असे म्हणतात की, सुखे ही तरुणांसाठी असतात. संपत्ती मध्यम वयस्कर पुरुषांसाठी असते, आणि धर्म वृद्धांसाठी असतो.”

२६. “आजच्या या जगात यौवन हे धर्म व संपत्ती याचा शत्रू आहे. आपण स्वत:ला सुखोपभोगापासून दूर ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यांना टाळू शकत नाही. म्हणून जिथे जिथे सुखे सापडतील तिथे तिथे तुझ्या यौवनाने त्याचा उपभोग घ्यावा.”

२७. “वृद्धत्वाची प्रवृत्ती चिंतनाकडे असते. ते गंभीर आणि शांत राहण्याच्या बाबतीत तत्पर असते. फारसे आयास न करता अपरिहार्यपणे ते विकारविरहित होते. लज्जा हेही त्याचे कारण आहे.”

२८. “म्हणून चंचल, बाह्य वस्तूंकडेच आकर्षित होणार्या निष्काळजी, उतावळ्या आणि दूरदृष्टी नसलेल्या यौवनाच्या फसव्या कालखंडामधून बाहेर पडल्यावर लोक अरण्यातून सुरक्षितपणे सुटका झालेल्या माणसांप्रमाणे सुटकेचा निःश्वास टाकतात.”

२९. “म्हणून अविचारी आणि भ्रामक असा हा यौवनाचा चंचल काल जाऊ दे. आपल्या आयुष्यातील पूर्व भागातील वर्षे सुखाकरिता राखून ठेवलेली असतात. इंद्रियांच्या आसक्तीपासून आपण त्यांना दूर ठेवू शकत नाही.”

३०. “किंवा धर्म हे जर खरोखर तुझे ध्येय असेल तर यज्ञ कर. यज्ञ करून सर्वोच्च अशा स्वर्गात आरोहण करणे ही तुझ्या कुटुंबाची अति प्राचीन अशी प्रथा आहे.”

३१. “मोठ्यामोठ्या ऋषींनी जे ध्येय आत्मक्लेशाने गाठले त्याच ध्येयाची प्राप्ती, सुवर्णकंकणांनी ज्यांचे हात भरलेले असत आणि ज्यांचे चित्रविचित्र मुकुट रत्नांच्या प्रकाशामुळे चकाकत असत अशा राजर्षीनी यज्ञाच्या मार्गाने करून घेतली आहे.”

                         गौतमाचे बिबिसारास उत्तर (पूर्वार्ध)

१. याप्रमाणे मगध राजाने गौतमाला इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दांत उपदेश केला. परंतु तो ऐकल्यावर राजपुत्र डळमळला नाही. तो पर्वताप्रमाणे अचल राहिला.

२. मगध राजाने याप्रमाणे उपदेश केल्पावर गौतमाने आपल्या शांत आणि स्नेहपूर्ण चेहर्यात बदल न करता खंबीर शब्दाने व खणखणीत वाणीने पुढीलप्रमाणे उत्तर दिले.

३. “आपण जे सांगितलेत त्यात आपल्या दृष्टीने चमत्कारिक असे काही नाही. महाराज, सिंह हे ज्याचे राजचिन्ह आहे अशा थोर कुलात ज्या अर्थी आपण जन्मला आहात, आणि ज्या अर्थी आपण आपतल्या मित्रांवर प्रेम करणारे आहात, त्या अर्थी आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण या मार्गाचा अवलंब करावा हे अगदी स्वाभाविक आहे.”

४. “दुष्ट मनाच्या माणसांच्या बाबतीत त्याच्या कुळाला योग्य असा स्नेहभाव खंडित होतो आणि विलयास जातो. फक्त चांगली माणसेच स्रेहशील कृत्यांची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजांपासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ करतात.”

५. “आपल्या मित्रांचे दैव फिरले तरी त्यांच्याशी वागताना जे आपत्या वर्तनात बदल करीत नाहीत त्यांनाच मी माझ्या अंतःकरणात खरे मित्र म्हणून स्थान देतो. भाग्यशाली पुरुषाला वैभवकाळ प्राप्त झाला असता त्याच्याशी कोण मैत्री करीत नाही?”

६. “या जगात संपत्ती मिळविल्यानंतर आपले मित्र आणि धर्म यांच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्यांच्या संपत्तीलाच खरे स्थैर्य प्राप्त होते आणि शेवटी जेव्हा ती नष्ट होते तेव्हा ती दुःख निर्माण करीत नाही.”

७. “महाराज, माझ्याविषयीच्या आपल्या सूचनेला शुद्ध औदार्य आणि मित्रत्व यांचीच प्रेरणा आहे. मी आपल्याला नम्रतेने आणि शुद्ध मित्रभावाने भेटेन. मी माझ्या उत्तरात दुसर्या कशाचाही उच्चार करणार नाही.”

८. “मला ह्या ऐहिक वस्तूंची जितकी भीती वाटते तितकी सर्पाची, आकाशातून होणाऱ्या वज्त्राघाताची किंवा वाऱ्याने भडकणाऱ्या ज्वालांचीही वाटत नाही.”

९. “आपतल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लूटमार करणारी ही क्षणभंगूर सुखे जगभर भ्रामक कल्पनांप्रमाणे निरर्थक तरंगत असतात. त्यांची नुसती आशा केली तरीही माणसांची मने ती मोहून टाकतात आणि त्यांच्या अंत:करणात त्यांनी जर घर केले तर ती त्यांना अधिकच मोहून टाकतात.”

१०. “सुखाला बळी पाडलेल्या देवांच्या स्वर्गात देखील आनंद मिळत नाही आणि मानवाच्या जगात तर आनंद मुळीच मिळत नाही. वार्याला मित्र असलेला अग्नि ज्याप्रमाणे कितीही इंधन मिळाले तरी संतुष्ट होत नाही त्या प्रमाणे जो तृष्णार्त आहे त्याला कितीही सुखे मिळाली तरी तो तृप्त होत नाही.”

११. “या जगात सुखासारखी दुसरी आपत्ती नाही. लोक भ्रमामुळे सुखासक्‍त होतात. सत्य म्हणजे काय हे समजले आणि असत्याची भीती वाटू लागली तर कोणता शहाणा मनुष्य स्वतःहून असत्याची इच्छा धारील?”

१२. “समुद्राने वेढलेली पृथ्वी ताब्यात घेतल्यावर राजे लोकांना त्या महासागरची दुसरी बाजुही जिंकण्याची इच्छा होते. सागराला मिळणाऱ्या पाण्याने तो कधी तृप्त होत नाही. तद्वतच कितीही सुखे मिळाली तरी मानवजात तृप्त होत नाही.”

१३. “मंधत्र्याला आकाशातून सुवर्णमय पर्जन्यवृष्टी लाभली, त्याने सर्व खंड जिंकले व शक्राचे देखील अर्धे राज्य पादाक्रांत केले. तरीही त्याची ऐहिक पदार्थाविषयीची आसक्ती कमी झाली नव्हती.”

१४. “इन्द्र जेव्हा वृत्ताच्या भयाने लपून बसला होता तेव्हा जरी स्वर्गातील देवांच्या राज्याचा नहुषाने उपभोग घेतला आणि आपल्या गविष्ठपणामुळे जरी त्याने आपली शिबिका मोठ्यामोठ्या ऋषींनी वाहावयास लावली, तरीही तो संतुष्ट झाला नव्हता.”

१५. “इतर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले, चिंध्या हेच ज्यांचे कपडे होते, कंदमुळे, फळे आणि पाणी हेच ज्यांचे अन्न होते आणि सर्पाप्रमाणे लांब आणि पिळलेल्या जटा ज्यांनी धारण केल्या होत्या अशा ऋषी मुनींना देखील ज्याने जिंकले त्या या सुख नामक शत्रूसाठी कोण प्रयत्न करील?”

१६. “सुखासाधी जे धडपडत आहेत आणि ऐहिक सध्याच्या जे पाठीस लागले आहेत, त्यांच्या दु:खविषयी आत्मसंयमी लोक जेव्हा ऐकतात तेव्हा सुखाचा त्याग करणेच त्यांना योग्य वाटते.

१७. “सुखप्राप्तीतील यश म्हणजेच सुखी माणसांवरील विपत्ती समजली पाहिजे. कारण त्याने इच्छिलेली सुखे त्याला मिळाली म्हणजे तो उन्मत होतो; उन्मत्त्पानामुळे जे करू नये ते तो करतो व जे करावे ते तो करत नाही. आणि अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे त्याला शेवट अघ:पातात होतो.”

१८. “कष्ट करून मिळवून ठेवलेली, तुम्हाला फसवून जिथून आली तिथे परत जाणारी व काही काळापुरती उसनी घेतलेली ही सुखे, या सुखांत कोणता आत्मसंयमी मनुष्य तो जर शहाणा असेल तर रममाण होईल?”

१९. “ ज्यांचा शोध करून ती प्राप्त करीत असताना तुमच्या वासना भडकतात, अशा गवताच्या चुडीप्रमाणे असलेल्या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल?”

२०. जी सुखे दूर भिरकावून दिलेल्या मांसच्या तुकड्याप्रमाणे आहेत आणि जी राजे लोकांकडून उपभोगली गेल्यामुळे विपत्ती निर्माण करतात, अशा सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल?”

२१. “ज्या सुखात रममाण होणाऱ्या माणसावर अनेक बाजूंनी संकटे कोसळतात आणि जी वासनांप्रमाणे विनाशकारी आहेत, अशा या सुखांत कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल?”

२२. “ज्यांच्या अंतःकरणाचा यासुखांनी चावा घेतला आहे अशा आत्मसंयमी पुरुषांचाही नाश होतो. त्यांना आनंद मिळत नाही. संतापलेल्या क्रूर सर्पाप्रमाणे असलेल्या ह्या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल?”

२३. “हाड चघळीत उपाशी मरण्यार्या कुत्र्याप्रमाणे जरी त्या सुखांचा उपभोग माणसांनी घेतला तरी त्यांचे समाधान होत नाही. मेलेल्या हाडांचा सापळ्याप्रमाणे असलेल्या ह्या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल?”

२४. “अशा सुखांच्या आसक्तीमुळे ज्यांची बुद्धी आंधळी झाली आहे; जो कपाळकरंटा सुखोपभोगांच्या आशेचा दरिद्री गुलाम आहे, त्याने या जिवसृष्टीत मृत्युचे दुःख भोगावे हेच योग्य होय.”

२५. “गाण्यावर लुब्ध होऊन हरिणी स्वतःचा नाश ओढवून घेतात. तेजावर भाळून पतंग अग्नीत झेप घेतात. आमिषाला भुलून मासा लोखंडाचा गळ गिळतो. म्हणून ऐहिक सुखे अंती दु:ख निर्माण करतात.”

२६. “सुखे म्हणजे उपभोग, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. कसोटीला लागल्यास त्यांपैकी एकही उपभोगण्याच्या योग्यतेचे आहे असे आढळत नाही. सुंदर वस्त्रे आणि इतर सुखे म्हणजे पदार्थाचे केवळ सोबती होत. दुः:खावरील उपाय एवढेच त्यांचे महत्व मानले पाहिजे.”

२७. “तहान भागविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे भूक शमविण्यासाठी अन्न पाहिजे असते. वारा, ऊन आणि पाऊस यांच्या निवारणासाठी घर हवे असते आणि आपली नग्नता झाकण्यासाठी व थंडीवार्यापासून संरक्षण करण्यासाठी कपड्यांची आवश्यकता असते.”

२८. “याचप्रमाणे झोपेची गुंगी घालविण्यासाठी बिछाना असतो; प्रवासाचा शीण होऊ नये म्हणून वाहन असते; उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन असते; तसेच शरीराची शुद्धी, आरोग्य आणि शक्‍ति यांच्यासाठी स्थान हे एक साधन असते.”

२९. “म्हणून बाह्य वस्तु म्हणजे मानवाच्या दुःखनिवारणाची साधने होत. ते आनंदाच्या उपभोगाचे मार्ग नव्हते.केवळ प्रतिबंधक उपाय म्हणून ज्यांचा उपयोग केला जातो अशा त्या बाह्य वस्तूंपासून आपल्याला आनंदाचा उपभोग मिळतो, असे कोणता शहाणा मनुष्य मान्य करील?”

३०, “पित्तप्रकोपाच्या च्या तापाने फणफणल्यामुळे शीतलतेच्या उपाययोजानांनी दुःख कमी करण्यात गुंतला असताना, जो त्या उपाययोजना म्हणजेच आनंदाचा उपभोग असे समजतो, तोच सुखांना आनंद हे नाव देतो.”

३१. “ज्या अर्थी सर्व सुखांमध्ये चंचलता आढळून येते त्या अर्थी मी त्यांना आनंद हे नाव देऊ शकत नाही. कारण सुखामागून दुःख येणे हेच मुळी त्याचे वैशिष्ट्य आहे.”

३२. “भरपूर कपडे आणि सुंगधी कोरफड या वस्तु हिवाळ्यात सुखदायक असतात. परंतु उन्हाळ्यात त्रासदायक ठरतात आणि चंद्रकिरण व चंदन उन्हाळ्यात सुखदायक असतात पण हिवाळ्यात दु:खदायक ठरतात.”

३३. “सर्वांना माहीत असलेला फायदा आणि तोटा, या आणि इतर अनेक परस्परविरोधी जोड्यांचा जगातील प्रत्येक वास्तुशी अविभाज्य संबंध आहे. म्हणून जगात कोणताही मनुष्य संपूर्ण सुखी नाही किंवा संपूर्ण दुःखी नाही.”

३४. “सुख आणि दुःख यांचे स्वरूप संमिश्र आहे असे जेव्हा मला दिसून येते तेव्हा राजपद आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे मी समजतो. राजा नेहमीच हसत नसतो किंवा गुलाम नेहमीच दु:खांत नसतो.”

३५. “राजा होणे म्हणजे अधिक व्यापक अश जबाबदार्या स्वीकारणे होय. आणि म्हणून राजाची दु:खे मोठी असतात. कारण राजा हा खुंटीसारखा आहे. तो जगासाठी त्रास सहन करीत असतो.”

३६. “जे राजपद जाण्याची भीती असते आणि ज्याला कपटीपणाचे वर्तन आवडते ते अशा राजपदावर जर राजाची निष्ठा असेल तर तो राजा दुदैंवी होय; आणि याउलट जर त्यावर त्याची निष्ठा नसेल तर असल्या भित्र्या राजाला सुख तरी कसे मिळणार?”

३७. “आणि सबंध पृथ्वी जिंकल्यानंतर जर फक्त एकाच शहराचा उपयोग वसतिस्थान म्हणून होऊ शकतो आणि त्यातही जर फक्त एकच घर हे निवासस्थान होऊ शकते तर मग राज्यपद म्हणजे केवल इतरांसाठी केलेले कष्टच नव्हेत काय?”

३८.“आणि राजपद स्वीकारल्यावर सुद्धा वस्त्रांच्या एका जोडीपेक्षा अधिक कपड्यांची त्याला आवश्यकता नसते; आणि केवळ भूक शमविष्याइतके अन्न त्याला पुरेसे असते. त्याचप्रमाणे फक्त एक बिछाना आणि एक आसन एढ्यांचीच राजाला गरज असते. याखेरीज इतर वस्तु या केवल अभिमानाने मिरविण्यासाठी असतात.”

३९. “आणि समाधान लाभावे म्हणून जर या सर्व फलांची अपेक्षा असेल तर राज्याशिवायही मी संतुष्ट राहू शकेन; आणि जर माणसाला या जगात एकदा समाधान लाभले तर मग बाकी सगळ्या गोष्टी अनावश्यक नाहीत काय?”

४०. “म्हणून समाधानाचा मंगल मार्ग ज्याला सापडला तो सुखाच्या वाबतीत कधी फसणार नाही. आपण व्यक्‍त केलेली मैत्री लक्षात धेऊन मी विचारतो की, सुखांना काही किमत आहे काय?”

४१. “मी गृहत्याग केला तो रागाने नव्हे किंवा शत्रूच्या बाणाने माझा मुकुट धुळीस मिळाला म्हणून नव्हे; किवा अधिक उच्च्च असे हेतू साध्य करून घेण्याची माझी आकांक्षा आहे म्हणून मी आपली सूचना नाकारतो असेही नव्हे.”

४२. “अत्यंत विषारी आणि क्रोधाविष्ठ सर्पाला एकदा सोडून दिल्यावर जो पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करील किंवा ‘एकदा पेटविलेल्या गवताची चूड ती पुन्हा धरण्याच्या जो प्रयत्न करील, असाच मनुष्य सुखाचा त्याग एकदा केल्यावर पुन्हा त्यांच्या पाठीमागे लागेल.”

४३. “डोळस असून जो आंधळ्याचा हेवा करील, स्वतंत्र असून बंधनात असलेल्याचा हेवा करील, श्रीमंत असून कंगाल माणसाचा हेवा करील, शहाणा असून वेड्याचा हेवा करील, तोच मी म्हणतो, फक्त तोच मनुष्य, ऐहिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाचा हेवा करील!”

४४. “माझ्या सन्मित्रा, जो भिक्षेवर गुजराण करतो त्याची कींव करण्याचे कारण नाही. त्याला या जगात उत्कृष्ट समाधान लाभते, संपूर्ण शांती मिळते आणि त्याच्या दृष्टीने परलोकातील सर्व दुःखे नाहीशी झालेली असतात.”

४५. “परंतु संपत्तिमान असूनही जो लोभौष्ट आहे, त्याला या जगात शांतीचे समाधान लाभत तर नाहीच, पण परलोकी मात्र दुःख अनुभवावे लागते, त्याची मात्र कींव केली पाहिजे.”

४६. “आपण जे मला सांगितले ते आपले चरित्र्य, आपला जीवनमार्ग आणि आपले कुळ यांना शोभेल असे आहे आणि माझा निश्चय पार पाडणे हे देखील माझे चारित्र्य, माझा जीवनमार्ग आणि माझे कुळ यांना शोभेल असेच आहे.”

गौतमाचे उत्तर (उत्तरार्ध)

१. “जगातील कलहामुळे मी घायाळ झालो आहे आणि शांतता मिळविण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे. या दु:खाचा अंत करण्याऐवजी या पृथ्वीचेच राज्य काय पण स्वर्गलोकाच्याही राज्याची अपेक्षा मी करणार नाही.”

२. “आणि महाराज, तीन पुरुषार्थाचा पाठपुरावा करणे हा मानवाचा सर्वोच्च उद्देश होय, हे जे आपण मला सांगितले आणि जे इष्ट आहे असे मला वाटते ते दुःख होय, असे आपण म्हणता, त्याविषयी बोलावयाचे म्हणजे आपले ते तीन पुरुषार्थ शाश्वत नाहीत आणि संतोषदायकही नाहीत.”

३. “आणि आपण म्हणता वृद्धापकाळ येईपर्यंत थांब, कारण यौवन हे नेहमी बदलणारे असते. याविषयी बोलावयाचे म्हणजे, हा निर्णयाचा अभावच अनिश्चित आहे. कारण वृद्धावस्थेतही अस्थिरता असू शकते.”

४. “परंतु ज्या अर्थी दैव आपल्या कलेत इतके कुशल आहे की, ते जगाला कोणत्याही काळी आपल्या कह्यात ठेवू शकते, त्या अर्थी ज्याला शांततेची इच्छा आहे आणि मुत्यू केव्हा येईल हे ज्याला माहिती नाही, असा कोणता शहाणा मनुष्य वृद्धाप- काळाची वाट पाहात बसेल?”

५. “वृद्धत्वरूपी शस्त्राने आणि जिकडे तिकडे पसरलेल्या रोगरूपी बाणांनी दैवाच्या अरण्यात हरणाप्रमाणे धाव घेणाऱ्या प्राणिमात्रावर प्रहार करीत मृत्यु ज्या वेळी एखाद्या शिकार्याप्रमाणे तत्परतेने उभा असतो, त्या वेळी दीर्घायुष्याची इच्छा कुणाच्या मनात निर्माण होऊ शकेल?”

६. “ज्याचे अतःकरण दयेने पूर्णपणे भरलेले आहे अशा धार्मिक माणसाच्या मार्गाची निवड करणे हेच तरुण, वृद्ध, किंवा लहान मूल यांना योग्य ठरेल.”

७. “आणि आपण म्हणता की, ‘तुझ्या वंशाला. शोभणारे आणि उत्कृष्ट फळ देणारे असे यज्ञ तू धर्मासाठी नेहमी करीत राहा’ अशा यज्ञांना माझा नमस्कार! दुसर्यांना दुःख देऊन मिळणारे कोणतेही फळ मिळविण्याची माझी इच्छा नाही.”

८. “भावी फळाच्या आशेने असहाय्य पशूला ठार करण्याने यज्ञाचे फळ जरी शाश्वत मिळणारेही असले तरीदेखील दयाशील आणि सहूदय माणसाच्या दृष्टीने ती अयोग्यच कृती ठरेल,”

९. “आत्मसंयमन, नैतिक आचरण आणि वासनेचा संपूर्ण अभाव हा खरा धर्म जरी दुसर्या एखाद्या अगदी निराळ्या नीतिनियमात बसत नसला, तरी देखील केवळ हत्या करून सर्वोत्कृष्ठ फल मिळते असे म्हटले जाते, त्या यज्ञाच्या नियमानुसार वागणे योग्य होणार नाही.”

१०. “दुसर्याला दुःख देऊन मिळविलेले जे समाधान माणसाला या जगात असताना लाभते, ते देखील शहाण्या, दयाशील अत:करणाला तिरस्करणीय स्करणाय वाटते. *तिरसण अदृश्य श्य असलेल्या दुसर्या जगातल्या माणसाला सुख मिळते हे म्हणणे त्याला किती तिरस्करणीय वाटेल?”

११ “भावी फळासाठी कृती करण्याचा मोह मला पडत नाही. महाराज! पुढच्या जन्माच्या कल्पनेत माझे मन रमत नाही. असल्या कृती अनिश्चित असतात आणि ढगातून कोसळणार्या पावसाने मारा होत असलेत्या रोपट्याप्रमाणे त्या आपल्या मार्गावर हेलकावे खात असतात.”

१२. स्वतः राजाने आपले हात जोडून उत्तर दिले, “तुझी इच्छा तू पूर्ण करण्यास माझी हरकत नाही. तुला जे जे काही करावयाचे आहे ते ते सिद्धीस गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर.”

१३. पुन्हा भेटण्याचे निश्चित आश्वासन गौतमाकडून घेतल्यावर राजा आपल्या सेवकासह राजवाडयाकडे परतला.

शांततेची वार्ता

१. गौतम राजगृहात असताना तेथे आणखी पाच परिव्राजक आले आणि त्यांनीदेखील गौतमाच्या झोपडी शेजारीच आपली झोपडी बांधली.

२. हे पाच परिव्राजक म्हणजे कौण्डिण्य, अश्वजित, .कण्यप, महानाम आणि भद्रिक हे होत.

३. ते देखील गौतमाचे रूप पाहून थक्क झाले आणि त्याने परिब्रज्या कां स्वीकारली असावी याचा त्याना प्रश्‍न पडला.

४. राजा बिंबिसाराने त्याला याविषयी जसे विचारले, तसेच त्यांनीही विचारले.

५. आपल्याला परित्रज्या कोणत्या स्थितीत स्वीकारावी लागली हे जेव्हा त्याने त्यांना समजावून सांगितले तेव्हा ते म्हणाले, “आम्ही त्याबद्दल ऐकले आहे; परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले ते तुम्हाला माहीत आहे काय?”

६. सिद्धार्थ म्हणाला, “नाही.” नंतर त्यांनी त्याला सांगितले की, त्याने कपिलवस्तू सोडल्यानंतर कोलीयांशी युद्ध पुकारण्याविरुद्ध शाकयांनी फार मोठी चळवळ केली.

७. स्त्री-पुरुषांनी, मुलांमुलींनी निदर्शने केली आणि “कोलीय हे आमचे भाऊ आहेत.” “भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे.” “सिद्धार्थ गौतमाच्या हद्दपारीचा विचार करा” अशा प्रकारच्या घोषणांचे फलक हातात घेऊन त्यांनी मिरवणुका काढल्या.

८. या चळवळीचा परिणाम असा झाला की, शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवावी लागली आणि या प्रश्‍नाचा फेरविचार करवा लागला. या बेळी कोलियांशी समेट घडवून आणण्याच्या बाजूने बहुमत होते. कोलियांशी शांततेच्या वाटाघाटी घाटा करण्यासाठी आपले दूत म्हपून पाच शाक्‍याची निवड करण्याचे ण्याच सघाने ठरविले.

१०. कोलियांनी जेव्हा हे ऐकले तेन्हा त्याना फार आनंद झाला. त्यांनी शाक्‍्यांच्या दूतांशी वाटाघाटी करण्यासाठी पाच कोलियांची निवड केली.

११. दोन्ही बाजूंच्या दृतांची सभा झाली आणि एक कायम स्वरूपाचे लवादमंडळ नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले. रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबतीतील प्रत्येक वाद मिटविण्याचा या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्याचा निर्णय दोन्ही बाजूना बंधनकारक ठरविण्यात आला. याप्रमाणे भेडसावणार्या युद्धाचा शेवट शांततेत झाला.

१२. कपिलवस्तु येथे काय घडले हे गौतमाला सांगितल्यानंतर ते परिव्राजक म्हणाले, “आता यापुढे तुम्ही परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर का राहत नाही?”

१३. सिद्धार्थ म्हणाला, “ही शुभ वार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे. हा माझा विजय आहे. परंतु मी घरी जाणार नाही. मी जाता कामा नये. यापुढेही मी परिव्राजक च राहिले पाहिजे.”

१४. त्या पाच परिव्राजक चा पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमाने त्यांना विचारले. त्यांनी उत्तर दिले, “आम्ही तपस्या करण्याचे ठरविले आहे. तुम्ही आमच्या बरोबर का येत नाही?” सिद्धार्थ म्हणाला, “लवकरच येईन; पण प्रथम मला इतर मार्गांची परीक्षा केली पाहिजे.”

१५. नंतर ते पाच परिव्राजक निघून गेले.

नव्या परिस्थितीतील समस्या

१. कोलीय आणि शाक्य यांनी केलेल्या समेटाची त्या पांच परिव्राजक नी जी बातमी आणली तिने गौतम फार अस्वस्थ झाला.

२. एकटाच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीविषयी तो विचार करू लागला आणि आपली परित्रज्या पुढे चालू ठेवण्याचे काही कारण आहे किंवा काय हे तो ठरवू लागला.

३. त्याने स्वकीयांचा त्याग कशासाठी केला होता? त्याने स्वतःलाच विचारले.

४. युद्धाला त्याचा विरोध असल्यामुले त्याने घर सोडले होते. “आता ज्या अर्थी युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्यापुढे काही प्रश्‍न शिल्लक राहिला आहे काय? युद्ध संपले याचा अर्थ माझ्यापुढील प्रश्‍न सुटला असा होतो काय?”

५. खोल विचार केल्यावर तो सुटला नाही असेच त्याला वाटले.

६. “युद्धसमस्या ही मूलत: कलहसमस्या आहे. एका अधिक विशाल समस्येचा तो केवल एक भाग आहे.”

७. “हा कलह फक्त राजे आणि राष्ट्रे यांच्यातच चालत आहे असे नव्हे; तर क्षत्रिय आणि ब्राम्हण यांच्यात, कुटुंब- प्रमुखात, मातापुत्रात, पितापुत्रात, भावाबहिणीत आणि सहकार्यांत देखील चालू आहे.”

८. “राष्ट्रा-राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोपात्त असतो; परंतु वर्गावर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो. हा संघर्षच जगातील सर्व दुःखांचे मूळ होय.”

९. “युद्धामुळे मी घर सोडले हे खरे. पण शाक्य व कोलीय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की, माझ्यापुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे. या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे.”

१०. “जुन्या प्रस्थापित तत्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल. ?”

११. “त्या सामाजिक तत्वज्ञानापैकी एखाद्याचा स्वीकार करणे त्याला शक्‍य आहे काय?”

१२. प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहण्याचा त्याने निश्चय केला.

Previous page                                            Next page


The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!