The Buddha and His Contemporaries

The Buddha and His Contemporaries

Part VI — The Buddha and His Contemporaries

The Buddha and His Contemporaries PDF in English

प्रथम खंड : सिद्धार्थ गौतम – बोधिसत्व बुद्ध कसे झाले

भाग सहावा: बुद्ध आणि त्यांचे समकालीन

The Buddha and His Contemporaries

  Previous page                                                      Next page

१. बुद्धाचे समकालीन

१. ज्या काळात बुद्धाने परिव्रजा  घेतली त्या काळी देशात फार मोठी ठा बौद्धिक  खळबळ माजली होती. ब्राम्हण तत्वज्ञानांखेरीज तत्वज्ञानाचे निरनिराळे बासष्ट पंथ त्या वेली अस्तित्वात होते; त्या सर्वांचा ब्राम्हण तच्चज्ञानाला विरोध होता. यापैकी निदान सहा पंथ तरी लक्षात घेण्यासारखे होते. 

२. या पंथांपैकी एक पंथ पूर्ण काश्यप याच्या नेतृत्वाखाली होता. त्याच्या तत्त्वज्ञानाला ‘अक्रियावाद’ असे म्हणत असत. त्याचे म्हणणे असे की, कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. कुणीही स्वतः काही काम करावे किंवा ते दुसर्याकडून करवून घ्यावे; स्वतः हत्या करावी किंवा दुसर्याकडून हत्या करवावी; स्वतः चोरी किंवा किंवा व्यभिचार किंवा दरोडेखोरी करावी वा कवा दुसर्याकडून ती करवून घ्यावी; स्वत: व्यांभचार करावा क दुसर्याकडून तो करवावा; स्वतः खोटे बोलावे किंवा दुसर्याला खोटे बोलावयास लावावे. आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही. एखादे कृत्य कितीही दुराचारी असले तरी आत्म्याला त्याचे पाप लागत नाही. एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला पुण्य लाभत नाही. आत्म्यावर कशाचीच ‘क्रिया( परिणाम ) होत नाही. ज्या वेळी मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकांचा तो बनलेला असतो ते आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात. मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहात नाही-शरीर राहात नाही आणि आत्माही राहात नाही. 

३. दुसर्या एका पंथाचे नाव ‘नियतिवाद’ असे होते. त्याचा मुख्य प्रणेता मक्‍खली गोसाल हा होता. त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एकप्रकारचा दैववाद किंवा निश्चवयवाद होता. कोणीही काहीही घडबवू शकत नाही, किंवा बिघडवू वू शकत नाही. घटना घडतात त्या कोणीही घडवीत वात नाहीत, दुःख कुणालाही नष्ट करता येत नाही, वाढविता येत नाही किंवा कमी करता येत नाही. जगाच्या अनुभवांचा आपला वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे, हे त्याचे तत्वज्ञान होते. 

४. तिसर्या पंथाचे नाव ‘उच्छेदवाद’ असे होते. अजित केशकंबल हा त्याचा मुख्य प्रणेता होय. त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा ‘विनाशवाद’ होता. यज्ञ किंवा होम याला काहीही अर्थ नाही. आत्म्याला स्वतःच्या कृत्यासाठी भोगावी लागणारी किवा उपभोगयास मिळणारी सुखदुःखाची फळे किंवा परिणाम-असला काहीही प्रकार नाही. स्वर्ग नाही की, नरक नाही. जगातील दुःखाच्या काही मूल तत्त्वांपासून मनुष्य बनला आहे. आत्मा ते टाळू शकत नाही. हा. जगातल्या कोणत्याही दु:खातून आत्म्याची सुटका होऊ  शकत नाही. हो. या दु:खाचा अंत आपोआप होणार आहे. महाकल्पांतील जन्ममरणाच्या चौर्यांशी लक्ष योनीच्या फेर्यांतून आत्म्याने गेलेच पाहिजे. त्यानंतरच आत्म्याच्या दुःखाचा अंत होईल, त्यापूर्वी होणार नाही, किंवा दुसया कोणत्या उपायानेही होणार नाही. 

५. चवथ्या पंथाचे नाव ‘अन्योन्यवाद’ असे होते. या पंथाचा प्रमुख “पकुध कच्चायन’ हा होता. त्याचे म्हणणे असे की, जीव हा पृथ्वी, आप, तेज, वायु, सुख, दुःख आणि आत्मा या सप्त महाभूतांचा बनलेला असतो. यांपैकी कोणतेही दुसर्यावर अवलंबून नसते; त्यांचा एकमेकांवर परिणामही होत नाही. ती स्वयंभू आणि  शाश्वत आहेत. त्यांचा कशानेही नाश होऊ शकत नाही. जर, एखाद्याने माणसाचे डोके उडविले तर तो त्याला ठार करीत नाही. शस्त्र सप्तमहाभूतात त प्रवेश वश करते. त, एवठाच त्याचा अर्थ समजावयाचा. 

६. ‘संजय बेलपुत्ता’ चा स्वतःचा एक पंथ होता. त्याचे नाव ‘विक्षेपवाद’ हा एक प्रकारचा संशयवाद होता.  संजय बेलपुत्त म्हणतो, “जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले आणि तो आहे असे मला वाटले तर मी होय म्हणेन. पण तो नाही असे मला वाटले तर मी नाही म्हणेन. मानवप्राणी निर्माण केले गेले काय, माणसाला  त्याच्या  बऱ्या -वाईट कृत्यांची फळे भोगावी लागतात काय, आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात आहे काय? असे जर कोणी मला विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईन. कारण त्याचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही.” याप्रमाणे संजय बेल्पुत्ताने आपल्या तत्त्वज्ञानाचे सार सांगितले. 

७. सहाव्या पंथाचे नाव ‘चतुर्यामसंवरवाद’. या पंथाचा प्रमुख महावीर. हा गौतम नव्या प्रकाशाच्या शोधत असतांना जीवंत होता. त्याला निगंठ नाथपुत्त म्हणत. महावीराने असे संगितले आहे की, पूर्वजन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुंनर्जन्म घ्यावा लागतो. म्हणून माणसाने तपश्चर्येने दुष्कर्मातीत व्हावे असे त्याने सुचविले. या जन्मात दुष्कर्म टाळण्यासाठी चातुर्याम धर्माचे म्हणजे चार नियमांचे पालन करावे असे महावीराने संगितले. ते चार नियम पुढीलप्रमाणे: (१) हिंसा न करणे, (२) चोरी न करणे, (३) खोटे न बोलणे, आणि (४) मालमत्ता न करणे किंवा ब्रम्हचर्य पाळणे. 

 

२. समकालीनांविषयी बुद्धाची वृत्ती

१. नव्या तत्त्ववेत्त्यांची शिकवण बुद्धाने स्वीकारली नाही.

२. त्यांच्या शिकवणुकीला त्याने दिलेली अमान्यता अकारण नव्हती. तो म्हणतो:- 

३. “पूर्ण काश्यप किंवा “पकुध कच्चायन” यांचे तत्त्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव देऊ शकेल. एखादा मनुष्य तर कोणतीही सामाजिक जवाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसर्याची हत्या करण्याइतकीही मजल मारू शकेल.” 

४. “जर ‘मक्‍खली गोसला चे तत्त्वज्ञान खरे मानले तर मनुष्य दैवाचा गुलाम बनेल. तो स्वतःला मुक्‍त करू शकणार नाही.” 

५. “ अजित केशकंबला? चे तत्त्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त खाणे, पिणे व मजा करणे एवढ्याच गोष्टी करू शकेल.” 

६. “ “संजय बेलपुत्ता’ चे तत्त्वज्ञान खरे मानले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनचे निश्चित तत्त्वज्ञानच असणार नाही.” 

७. “ ‘निगंठ नायपूत्ता’ चे तत्त्वज्ञान खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच वाहावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सहजप्रवृत्ती व कामना यांचा बीमोड होऊन त्याला संपूर्ण दास्य पत्करावे लागेल.” 

८. याप्रमाणे तत्त्वज्ञान्यांनी सुचविलेल्या कोणताही जीवनमार्ग बुद्धला पटला नाही. हताश, असहाय्य आणि अविचारी माणसांचे हे विचार आहेत असेच त्याला वाटले; म्हणून त्याने या बाबतीत अन्यत्र प्रकाशचा शोध घेण्याचे ठरविले.

Previous page                                                      Next page


The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!