Part III—Critics of His Doctrines
Critics of His Doctrines PDF in English
षष्ट खंड: भगवान बुद्ध आणि त्यांचे समकालीन
भाग तिसरा: भगवान बुद्धाच्या धम्माचे टीकाकार
Critics of His Doctrines
१. संघातील मुक्त प्रवेशाचे टीकाकार
१. कोणत्याही उपासक गृहस्थाला सदस्य म्हणून स्वीकृत करणे संघाला सुलभ होते.
२. संघरुपी मंदिराचे द्वार खुले ठेवून त्यात कुणालाही प्रवेश करू दिल्याबद्दल भगवान बुद्धांवर कही लोक टीका करीत असत.
३. त्यांचे म्हणणे असे होते की, अशा योजनेमुळे असे घडेल की, काही लोकांना संघात प्रवेश मिळाल्यानंतर संघ सोडून ते पुन्हा गृहस्थाश्रमात जातील आणि ह्या त्यांच्या माघारीमुळे लोक असे म्हणू लागतीनल, ‘ह्या लोकांनी व्यक्त केलेला श्रमण गौतमांचा धर्म फोल असला पाहिजे.
४. ही टीका यथातथ्य नव्हती. ज्या हेतूने तथागतांनी अशी. योजना केली होती तो हेतू टीकाकारांना समजला नव्हता.
५. तथागनांचे म्हणणे होते की, हा धर्म स्थापून उपकारक अशा मुक्तीजलाने परिपूर्ण व स्वानासाठी योग्य असा जलाशय त्यांनी निर्माण केला होता-सद्धम्माचा जलाशय.
६. तथागतांची इच्छा होती की, पापाच्या कलंकानी जर कोणी भ्रष्ट झाला असेल तर ह्या जलाशयात त्याने स्नान केल्याने त्याची पापे धुवून जातील.
७. आणि जर कोणी ह्या सद्धर्माच्या जलाशयाकडे गेला आणि स्थान न करताच पूर्वीप्रमाणे कलंकित अवस्थेत मागे फिरला तर त्याबद्दल तोच दोषी आहे, सद्धम्म नव्हे.
८. तथागत म्हणाले, “लोकांना आपली पापे धुवून टाकणे साध्य व्हावे म्हणून हा जलाशय निर्माण केल्यानंतर जर मी असे म्हटले, ‘जो कोणी मलिन आहे त्याने जलाशयात प्रवेश करू नये. ज्यांची धूळ आणि चिखल धुवून गेला आहे व जे शुद्ध व निष्कलंक आहेत त्यांनीच फक्त जलाशयाकडे जावे’ तर ते योग्य ठरेल काय?
९. “ अशा अटी घातल्या असत्या तर माइया सद्धम्माचा उपयोग तो काय होता?”
१०. आपल्या धम्माने होणारे हित हे फक्त निवडक लोकांपुरतेच मर्यादित करावे ही तथागतांची इच्छा नव्हती, हे टीकाकार विसरले होते. आपला धम्म हा सर्वांनी पडताळून पाहावा यासाठी तो सर्वांना खुला असावा अशी त्यांची इच्छा होती.
२. व्रत-नियमाचे टीकाकार
१. “पंचशील पुरेसे नाही काय ? व्रतग्रहणाची काय आवश्यकता आहे ?’ असे प्रश्न नेहमी विचारले जात असत.
२. ‘ जर औषधाशिवाय रोग बरे हाऊ शकतात तर वांतीच्या, जुलाबाच्या आणि तत्सम औषधांनी देह दुर्बल करण्याचा फायदा काय? असे मतप्रदर्शन केले जात असे.
३. तसेच गृहस्थ उपासकाला संसारात राहून, वासनोपभोग भोगूनही पंचशीलाने शान्ती व श्रेष्ठ निर्वाण प्राप्त होऊ शकते तर भिक्खुंना ब्रतग्रहण करण्याची रण्याची आवश्यकता काय?
४. तथागतांनी ही व्रते त्यातील स्वाभाविक गुणवत्तेसाठी योजिली आहेत.
५. व्रतस्थ जीवनामुळे आपोआपच सत्वाची वृद्धी होते व अधपातापासून रक्षण होते.
६. जे व्रतग्रहण करतात आणि स्वावलंबनाने त्याची जोपासना करतात त्यांना मुक्ति प्राप्त होते.
७. व्रतग्रहण म्हणजे वासना, असूया अहंकार ह्यांचे नियमन व कुविचारांचे निर्मूलन.
८. जे व्रतग्रहण करतात आणि त्याची जोपासना करतात ते सुरक्षित असतात व त्यांचे आचार विचार सर्वस्वी पवित्र असतात.
९. फक्त पंचशील ग्रहणाने मात्र हे साध्य होत नाही.
१०. व्रतग्रहणाने नैतिक अधपतनापासून जसे संरक्षण होते तसे पंचशील ग्रहणाने होत नाही.
११. व्रतस्थ जीवन अत्यंत कठीण असते, पंचशील ग्राहकाचे मात्र तसे नसते. मानवजातीच्या हितासाठी काहींनी व्रतस्थ जीवन पत्करणे आवश्यक असते. म्हणून तथागतांनी दोन्हींची योजना केली होती
३. अहिसा-तत्वाचे टीकाकार
१. अहिंसा-तत्वाला ज्यांचा विरोध होता असे काही लोक होते. त्यांचे म्हणणे होते की, त्यामुळे पापाचा अप्रतिकार व शरणागती पत्करावी लागते.
२. तथागतांनी शिकवलेल्या अहिसा-तत्वाचा हा पूर्ण विपर्यास होता.
३. संदिग्धता व गैरसमज राहू नयेत म्हणून तथागतांनी आपली भूमिका अनेक वेळा स्पष्ट केली आहे.
४. ह्यांपैकी पहिला उल्लेखनीय प्रसग म्हणजे सैनिकाला नियम प्रवेश देण्याबाबत नयम केला तो.
५. एकदा मगध देशाच्या सीमाभूमीत आंदोलन सुरू झाले. तेव्हा मगधनरेश सेनीय बिबिसाराने आपल्या सेनापतीस आज्ञा केली की, “ जा, आणि आपल्या सेनाधिकार्यांना सीमाप्रदेशातील बंडखोरांना हुडकून काढण्यास, त्यांना शिक्षा करण्यास आणि तिथे शांतता प्रस्थापित करण्यास आदेश द्या.” सेनापतीने तसे केले.
६. सेनापतीचा आदेश ऐकून सेनाधिकार्यांची द्विधा मन:स्थिती झाली. जे युद्धावर जातात आणि लढण्यात ज्यांना आनंद प्राप्त होतो ते पाप करतात आणि पुष्कळ अवगुण प्राप्त करतात अशी तथागतांची शिकवण होती हे त्यांना माहीत होते. याउलट बंडखोरांना पकडा आणि त्यांचा निप्पात करा अशी राजाज्ञा होती; अशा परिस्थितीत काय करावे असा स्वत:शी ते विचारू करू लागले.
७. सेनाधिकार्यांनी विचार केला की, जर आपण तथागताच्या भिक्खूसंघात प्रवेश केला तर ह्या समस्येतून आपली सुटका होईल.
८. त्यासाठी ते सेनाधिकारी भिक्खुंकडे गेले आणि त्यांनी प्रत्रज्येची याचना केली. भिक्खुंनी त्यांना प्रत्रज्या व उपसम्पदा दिली. सेनाधिकारी सैन्यातून लुप्त झाले.
९. जेव्हा सेनाधिकारी कुठे दिसेनात तेव्हा सेनापतीने सैनिकांना विचारले, “ सेनाधिकारी कुठेच दिसत नाहीत हे कसे काय?” “ सेनापतीमहाशय, सेनाधिकार्यांनी भिक्खुंची धम्मवृत्ती अंगिकारिली.” सैनिकांनी उत्तर दिले.
१०. हे ऐकून सेनापती संतप्त झाला. “ राजसैनिकांना भिक्खू प्रवज्या कशी देऊ शकतात ?”
११. सेनापतीने घडलेली हकीकत राजाच्या कानावर घातली. राजाने न्यायाधिकार्यांना विचारले, “ महाशय, राजसेवेतील लोकांना प्रत्रज्या देणारा कोणत्या शिक्षेला पात्र ठरतो ते सांगा.”
१२. “ महाराज, उपाध्यायाचा शिरच्छेद करावा; कम्मावाचा म्हणणार्याची जीभ उपटून टाकावी. आणि इतर संघसदस्यांच्या अर्ध्या बरगड्या तोडून टाकाव्यात.”
१३. नंतर तथागत जिथे राहात होते तिथे राजा गेला आणि त्यांना अभिवादन करून सर्व हकीकत कथन केली.
१४. “ भगवान, आपणास ज्ञात आहे की, कित्येक राजे धम्माच्या विरुद्ध आहेत. हे विरोधक राजे क्षुल्लक निमित्तासाठीसुद्धा भिक्खुंना छळण्यास सदैव सिद्ध आहेत. जर त्यांना आढळले की, सैन्य सोडून संघाचे सदस्य बनण्यासाठी भिक्खू सैनिकाना प्रवृत्त करत आहेत तर भिक्खुंचा छळ करण्यात ते कोणत्या टोकाला जातील त्याची कल्पनाही करवत नाही. ही आपत्ती टळावी म्हणून तथागतांनी योग्य ते करावे अशी विनंती आहे.”
१५. तथागतांनी उत्तर दिले, “सैनिकांनी अहिसेच्या नावाखातर किवा अहिंसेच्या अवगुंठनाचा आश्रय घेऊन आपल्या राजनिष्ठा किवा देशनिष्ठेचा त्याग करावा असा माझा कधीच हेतू नव्हता.”
१६. त्याप्रमाणे तथागतांनी राजसेवेतील लोकांना संघात प्रवेश न देण्याबाबत एक नियम जाहीर केला व भिक्खुंना तसे सांगितले, “भिक्खूहो, राजसेवेतील लोकांना प्रत्रज्या देण्यात येऊ नये. जो कोणी अशा लोकांना प्रवज्या देईल त्याने दृष्कृत्याचा गुन्हा केल्यासारखे होईल.”
१७. दुसऱ्या एका वेळी श्रमणमहावीराचा अनुयायी सिंह सेनापती याने अहिंसेच्या विषयाबाबत तथागतांशी वादविवाद केला.
१८. सिंहाने विचारले, “तथागतांच्या तत्वाबाबत माझ्या मनात अजून एक आशंका आहे. तथागत सांगतात तो धम्म मला यथातथ्य समजावा म्हणून माझ्या मनावरचे नावरचे अभ्रपटल दूर करण्यास तथागत अनुमती नतुमता देतील [ल काय?”
१९. तथागतांनी अनुमती देताच सिंह म्हणाला, “तथागत, मी एक सैनिक आहे; आणि राज्यात कायद्याचे पालन नीट व्हावे आणि वेळप्रसंगी युद्धाची कार्यवाही करावी म्हणून मला राजाने नियुक्त केले आहे. दु:खितांबद्दल करुणा आणि असीमित दयेची शिकवण देणार्या तथागतांना गुन्हेगाराला शासन करणे मान्य आहे काय? दुसरे म्हणजे, आपली घरे, बायकामुले व चीजवस्तु ह्यांचे रक्षण करण्यासाठी युद्धाचा मार्ग पत्करणे हे चूक आहे असे तथागत सांगतात काय? तसेच तथागत संपूर्ण आत्मसमर्पणाची शिकवण देतात काय की जेणेकरून अत्याचारी लोकांनी काहीही केले तरी मी सहन करावे, आणि जे माझ्या मालकीचे आहे ते बळजबरीने कोणी नेत असेल तरी नेऊ द्यावे? तसेच सर्व संघर्ष-मग ते न्याय कारणासाठी असले तरी ते निषिद्ध आहेत असे तथागत मानतात काय?”
२०. तथागतांनी उत्तर दिले: “जो दण्डनीय आहे त्याला शासन झालेच पाहिजे; आणि जो उपकारार्ह आहे त्याला लाभ हा मिळालाच पाहिजे. ह्याबरोबरच कोणत्याही प्राणिमात्राला अपाय करू नये, उलट त्याला प्रेमाने आणि दयेने वागवावे. हे आदेश परस्परविरोधी नाहीत. कारण ज्या कोणाला अपराधाबद्दल शासन करणे इष्ट आहे तो न्यायाधिशाच्या द्रेषबुद्धीने सजा भोगत नसून आपल्या अपराधाचे फळ म्हणून भोगत असतो. न्यायाधिशाने दिलेली सजा ही त्याज्या स्वतःच्याच कुकर्माची परिणती असते. जेव्हा न्यायाधिश सजा देतो तेव्हा त्याच्या हृदयात द्रेषबुद्धी असता कामा नये. तरीसुद्धा जेव्हा खुनी माणसाला देहान्ताची सजा मिळते तेव्हा ती त्याच्या कुकर्माचे फळ आहे असे त्याने मानले पाहिजे. शिक्षेमुळे आपला आत्मा शुद्ध होणार आहे असे जेव्हा त्याला समजेल तेव्हा आपल्या भोगाबद्दल शोक न करता उलट तो प्रसन्नच होईल.”
२१. ह्या गोष्टी नीट समजून घेतल्या तर असे प्रत्ययास येईल की, तथागतांनी शिकवलेली अहिंसा मूलभूत होती पण ती निरपेक्ष नव्हती.
२२. त्यांची शिकवण होती की, चांगल्या गोष्टीने परतफेड करून पापावर उपचार करावा; पण चांगल्या गोष्टींना निर्बल करण्यास पापाला सवड द्यावी असे त्यांनी कधीच सांगितले नव्हते.
२३. ते अहिसेचे समर्थक होते. ते हिंसेचे निदक होते; पण पाप चांगल्या गोष्टीचा नाश करीत असताना ते टाळण्यासाठी हिंसा हा अखेरचा उपाय असू शकेल हे त्यांनी अमान्य केले नव्हते.
२४. ह्यावरून तथागतांनी एखाद्या भयंकर तत्वाची शिकवण दिली नव्हती हे समजून येईल. टीकाकारांना मात्र त्याचा अर्थ आणि व्याप्ती समजू शकली नाही हेच खरे.
४. शीलप्रचार आणि दुःखनिर्मितीबाबत टीका
(१ ): दुःख हे निराशाजनक आहे
१. दुःखाचा कपिलाने सांगितलेला मूळ अर्थ म्हणजे अशांतता, क्षोभ.
२. सुरवातीला त्याला आध्यात्मिक अर्थ होता.
३. नंतर त्याला यातना व खेद असा अर्थ प्राप्त झाला.
४. हे दोन अर्थ एकमेकांहून फार भिन्न नव्हते. ते निकटसंबंधी होते.
५. अशांततेमुळे यातना व खेद निर्माण होतो.
६. लवकरच ह्या शब्दाचा अर्थ सामाजिक व आर्थिक कारणामुळे होणार्या यातना व खेद असा झाला.
७. भगवान बुद्धांनी खेद व यातना ह्या शब्दांचा उपयोग कोणत्या अर्थी केला ?
८. भगवान बुद्धाच्या एका प्रवचनावरून असे स्पष्ट दिसते की, दारिद्र हे दुःखाचे कारण आहे ह्याची त्यांना पूर्ण जाणीव होती.
९. त्या प्रवचनात ते म्हणतात, “भिक्खूहो, ह्या जगातील स्वच्छंदी माणसांना दारिद्र ही दुःखकारक गोष्ट वाटते काय ?”
१०. “होय, भगवान?”
११. “आणि जेव्हा मनुष्य गरीब असतो, गरजू असतो, विपत्तीत असतो तेव्हा तो कर्ज काढतो. हे सुद्धा दु:खद आहे काय?”
१२. “होय, भगवान ?
१३. “आणि जेव्हा तो कर्जबाजारी होतो तेव्हा तो उसनवारी करतो. हे सुद्धा दु:खद आहे काय?”
१४. “भगवान, खात्रीने.”
१५. “आणि जेव्हा रक्कम चुकती करण्याचा समय येतो तेव्हा तो ती देत नाही आणि म्हणून धनको त्याला तगादा लावतात; हेही दुःखद काहे काय?”
१६. “भगवान, नक्की.”
१७. “आणि तगादा लावूनही तो देत नाही तेव्हा ते मारपीट करतात; हे पण दुःखद आहे काय?”
१८. “खात्रीने, भगवान!”
१९, “आणि मारपीट करूनही तो रक्कम देत नाही तेव्हा ते त्याला बांधतातही हे पण दु:खद आहे काय?”
२०. “होय भगवान!”
२१. “अशा तर्हेने, भिक्खूहो, गरीबी, कर्ज, उधारी, तगादा लावला जाणे, मारपीट होणे, आणि बंधनात पडणे ही सर्व इहलोकातील स्वच्छंदी माणसाची दु:खे आहेत.”
२२. “ह्या जगात गरिबी आणि कर्ज ह्या फार दुःखद गोष्टी आहेत.”
२३. ह्यावरून असे ध्यानात येते की, भगवान बुद्धांची दुःखाची कल्पना ही भौतिक स्वरूपाची होती.
(२): अशाश्वतता हे निराशेचे कारण
१. जे जे मिश्रित स्वरूपाचे आहे ते ते अशाश्वत आहे. ह्या सिद्धान्तामुळे आलेल्या आरोपाचे आणखी एक कारण आहे.
२. ह्या सिद्धान्ताची सत्यता कोणीही नाकारत नाही.
३. सर्व अशाश्वत आहे हे सर्वांनी मान्य केले होते.
४. ज्याप्रमाणे सत्य हे कितीही अप्रिय असले तरी ते कथन केले पाहिजे. त्याप्रमाणे हा सिद्धान्ही खरा असेल तर तो जाहीर केला पाहिजे.
५. पण मग निराशाजनक तात्पर्य का काढले जावे?
६. जर जीवन अल्पजीवी असेल तरते अल्पजीवी असणारच. त्याबद्दल कुणी निराश गश होण्याचे कारण नाही.
७. ही फक्त दृष्टि कोणाच्या भिन्नतेची बाब आहे.
८. ब्रम्ही लोकांचा दृष्टिकोण फारच निराळा होता.
९. कुटुंबातील कोणाचे निधन झाले तर ब्रम्ही लोक तो आनंददायक सोहळा म्हणून साजरा करतात.
१०. ज्या दिवशी निधन होते त्या दिवशी कुटुंबप्रमुख सार्वजनिक मेजवानी आयोजित करतो आणि नंतर लोकनृत्य करीत तो मृतदेह स्मशानात नेतात. मृत्यू हा अपरिहार्य होता हे जाणून कोणी त्याची पर्वा करत नाही.
११. अशाश्वतता ही निराशाजनक असेल तर त्याचे कारण शाश्वतता ही खरी नसतानासुद्धा खरी मानली गेली हे होय.
१२. भगवान बुद्धांची शिकवण ही निराशाप्रसारक आहे असा आरोप म्हणूनच करता येत नाही.
(२ ) बौद्ध धम्म निराशावादी आहे काय?
१. भगवान बुद्धांचा धम्म निराशा निर्माण करतो असा आरोप केला गेला आहे.
२. हा आरोप केला जाण्याचे कारण प्रथम आर्य-सत्य आहे, जे सांगते की जगात दुःख आहे.
३. ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे की, दुःखाचा उल्लेख होताच असला आरोप बौद्ध धम्मावर केला जावा.
४. कार्ल मार्क्सही असे म्हणाला होता, ‘जगात शोषण सुरू आहे, आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात आहेत, व गरीब अधिक गरीब केले जात आहेत.
५. आणि तरी कार्ल मार्क्सचा सिद्धान्त निराशावादी आहे असे कोणी म्हणत नाही.
६. तर मग भगवान बुद्धांच्या सिद्धान्ताबाबत निराळा दृष्टीकोण का?
७. असे समजते की, भगवान बुद्ध आपल्या प्रथम प्रवचनात म्हणाले होते की, जन्म हा दुःखद, वृद्धत्व दु:खद, व मृत्यू हा दुःखद आहे. ह्याचमुळे कदाचित त्यांच्या धम्माला हा निराशेचा गहिरा रंग दिला गेला असेल.
८. पण ज्यांना अलंकारशास्त्र अवगत आहे ते जाणू शकतील की, हा एक अतिशयोक्तीचा प्रकार आहे, आणि परिणाम साधण्यासाठी चतुर साहित्यिक तो वापरतात.
९, ‘जन्म हा दुःखद आहे’ ही अतिशयोक्ती आहे हे भगवान बुद्धांच्या एका प्रवचनाचा संदर्भ देऊन सिद्ध करता येईल-की ज्यात त्यांनी सांगितले आहे की, मानव जन्म ही एक अमोल वस्तू आहे.
१०. आणि शिवाय भगवान बुद्धांनी दु:खाचा नुसता उल्लेख केला असता तर हा आरोप मान्य होऊ शकला असता.
११. पण भगवान बुद्धांच्या दुसर्या आर्य-सत्यात दु:खाचा नाश केला पाहिजे ह्यावर विशेष भर देण्यात आला आहे. दु:खाचा नाश करण्याच्या कर्तव्यावर तेव्यावर भर देण्यासाठीच ण्यासाठीच त्यांना दुः खाचे गच अस्तित्व स्ति त्व सांगावे गावे लागले.
१२. दुःख नाहीसे करावे ह्या गोष्टीला भगवान बुद्धांनी फार महत्व दिले आहे. कपिलाने दुःखाचे फक्त अस्तित्व जाहीर करून त्याविषयी अधिक काही स्पष्ट केले नाही असे जेव्हा त्यांना आढळले तेव्हा असंतुष्ट होऊन त्यांनी आलार कालाम मुनींचा आश्रम सोडला.
१३. मग हा धम्म निराशावादी आहे असे कसे म्हणता येईल?
१४. दुःखाचा नाश करण्यास जो उत्सुक आहे अशा गुरूवर निराशावादाचा आरोप करता येत नाही.
५. ‘आत्मा’ आणि ‘पुनर्जन्म’ तत्त्वांचे टीकाकार.
१. भगवान बुद्धांनी सांगितले की, आत्मा नाही. त्यांनी सांगितले की, पुनर्जन्म आहे.
२. ज्यांना भगवान बुद्धांच्या ह्या दोन तत्त्वांची शिकवण परस्परविरोधी वाटली असे टीकाकार कमी नव्हते.
३. ते म्हणाले, “जर आत्मा नसेल तर पुनर्जन्म कसा असू शकेल?”
४. ह्यात परस्परविरोध नाही. आत्मा नसला तरी पुनर्जन्म असू शकतो.
५. आंब्याची कोय असते. कोयीतून आंब्याचा वृक्ष निर्माण होतो. आंब्याच्या वृक्षाला आंब्याची फळे येतात.
६. हा आंब्याचा पुनर्जन्म आहे.
७. पण इथे आत्म्याचे अस्तिस्व नाही.
८. म्हणजे आत्मा नसला तरी पुनर्जन्म असु शकतो.
६. विनाशवादी असल्याबद्दल टीका
१. एकदा श्रावस्तीतील जेतवनात भगवान बुद्धांचे वास्तव्य होते. तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले की, अरिठ्ठ नावाचा एक भिक्खू, जी तथागतांची मते नाहीत ती त्यांची मते आहेत असे मानीत आहे.
२. भगवान बुद्ध हे विनाशवादी आहेत किंवा काय हे अरिठ्ठाच्या त्यांच्या संबंधीच्या अनेक गैर मतापैकी एक होते.
३. तथागतांनी अरिठ्ठाला पाचारण केले. अरिठ्ठ आला. त्याला विचारल्यावर तो गप्प बसला.
४. तेव्हा तथागतांनी त्याला सांगितले, “काही श्रमणब्राम्हण चुकीने, गैरतर्हेने, खोटेपणाने सत्याला झुगारून मी विनाशवादी . विनाशवादी असल्याचा आरोप करतात; आणि विच्छेदाची, प्राणिमात्रांच्या समूळ नाशाची शिकवण देतो असा मजवर दोषारोप करतात.”
५. “मी असा मुळीच नाही आणि माझी अशी शिकवणही नाही.”
६. “मी पूर्वी आणि आता सतत सांगत आलो आहे की, दुःखाला अस्तित्व आहे आणि अखेरही आहे.”