Friends and Admirers

Friends and Admirers

Part IV—Friends and Admirers

Friends and Admirers PDF in English

षष्ट खंड: भगवान बुद्ध आणि त्यांचे समकालीन

भाग चवथा: भगवान बुद्धाचे मित्र आणि चाहते

Friends and Admirers

Previous page                                    Next book

 

१. धनंजनी ब्राम्हणीची भक्‍ती

१. तथागतांचे पुष्कळ मित्र आणि चाहते होते. त्यांत धनंजनी होती.

२. ती एका भारद्वाज ब्राम्हणाची पत्नी होती. तिचा पती तथागतांचा तिरस्कार करीत असे; पण धनंजनी ही भगवान बुद्धांची भक्‍त होती. तिच्या भक्‍तीचा उल्लेख करणे योग्य आहे. 

३. एकदा भगवान बुद्ध राजगृहाजवळील वेळूवनातील कलन्दकनिवाप विहारात रहात होते. 

४. त्या वेळी एका भारद्वाज कुळातील ब्राम्हणाची धनंजनी नावाची ब्राम्हणी पत्नी आपल्या पतीसमवेत राजगृहात राहात होती.

५. तिचा पती तथागतांचा तीव्र विरोधक होता; पण धनंजनीची मात्र बुद्ध, धम्म आणि संघ ह्यावर दृढ श्रद्धा होती. ह्या त्रिरत्नांची स्तुती करण्याचा तिचा प्रघात होता. जेव्हा जेव्हा ती असे स्तवन करू लागे तेव्हा तिचा पती कान झाकून घेत असे.

६. एकदा त्याच्याकडे पुष्कळ ब्राम्हण भोजनास यावयाचे होते. तेव्हा त्याने तिला विनंती केली की, दुसरे काय हवे ते कर; पण भगवान बुद्धांची स्तुती करून अभ्यागतांना दुखवू नकोस. 

७. असले वचन देण्यास धनंजनी तयार नव्हती. तेव्हा खंजिराने केळ्याचे तुकडे करतात तसे तुझे करीन अशी धमकी त्याने तिला दिली. ती आत्मबलिदान करण्यास तयार झाली आणि अशा प्रकारे आपले वाक्‍्स्वातंत्र्य राखून तिने बुद्धस्तवनाच्या पाचशे गाथा म्हणावयास प्रारंभ करताच त्या ब्राम्हणाने गन बिनशर्त पराजय मान्य केला. 

८. भोजनपात्रे आणि सोनेरी चमचे ठेवण्यात आले व अतिथी भोजनास बसले. अतिथिंना भोजन वाढताना तिची प्रभावी भावना जागृत झाली आणि मध्येच वेळूवनाकडे तोंड करून तिने त्रिरत्नन-स्तवन म्हटले. 

९. अपमानित अतिथी पानावरून उठले आणि एका नास्तिकेच्या उपस्थितीने अपवित्र झालेले अन्न थुंकून टाकून ते चालते गलत झाले. गाल. मेजवानीचा जवानाचा बेरंग रंग झाल्यामुळे ब्राम्हणाने म्हणान ब्राम्हणीची आम्हणाचा खरडपट्टी काढली.

१०. आपल्या पतीला भोजन वाढताना तिने त्रिरत्नाचे स्तवन केले; ‘बुद्धांना वंदन असो, धम्माला वंदन असो, संघाला वंदन असो.’

११. तिने असे स्तवन केल्यावर भारद्वाज ब्राम्हणास फार राग आला व तो म्हणाला, ‘चांडाळणी, प्रत्येक वेळी त्या बोडक्या बैरागड्याची स्तुती गात असतेस. थांब चांडाळणी, तुझ्या त्या गुरूला जाऊन चांगला धडा शिकवतो.” 

१२. धनंजनी म्हणाली, “ हे ब्राम्हणा ! सदेव, समार, सत्रम्ह अशा ह्या लोकात त्या अर्हत, सम्यक्‌ सम्बुद्ध तथागतांना अशा तर्हेने बोलू शकेल असा कोणी श्रमणब्राम्हण, देव अथवा पुरुष असेल असे मला वाटत नाही. तरीसुद्धा हे ब्राम्हणा, तु त्यांच्याकडे जा म्हणजे तुला समजेलच.” 

१३. तेव्हा तो गांजलेला व अप्रसन्न झालेल ब्राम्हण तथागतांचा शोध घेण्यास निघाला. त्यांच्या समोर आल्यावर त्याने मित्रत्वाने व विनयशीलतेने त्यांना अभिवादन केले व कुणलाची पृच्छा करून तो एका बाजूला बसला. 

१४. अशा रीतीने बसल्यावर त्याने तथागतांना पुढील प्रश्‍न विचारले, “ सुखी जीवनासाठी कशाची हत्या करावी ? अधिक रडावे लागू नये म्हणून कशाची हिंसा करावी ? गौतमा ! असे काय आहे की, ज्याच्या हत्येचे तू सर्वात अधिक समर्थन करतोस?”

१५. तथागतांनी उत्तर दिले, “ सुखप्रद जीवनासाठी क्रोधाची हत्या केली पाहिजे. अधिक रडावे लागू नये यासाठी क्रोधाची हिंसा केली पाहिजे. हे ब्राम्हणा, ज्याचे मूळ विषारी आहे, ज्याची परिणती संतापात आहे आणि ज्यात प्राण घातकी माधुर्य आहे अशा क्रोधाची ! श्रेष्ठ जनांनी अशा प्रकारच्या हिंसेची प्रशंसा केली आहे. भविष्यकाळात अधिक शोक करावा लागू नये म्हणून त्या क्रोधाची तू हिंसा  कर.” 

१६. “ तथागताच्या ह्या उत्तराचे महत्व जाणून तो भारद्वाज ब्राम्हण बोलला, “ भगवान ! खरोखर अद्भूत, खरोखर अद्णूत ! जशी पडलेली वस्तू कोणी उभी करावी, किंवा जे प्रच्छन्न आहे ते प्रकट करावे, अथवा मार्गभ्रष्टाला योग्य मार्ग दाखवावा, किंवा ज्यांना नेत्र आहेत त्यांना बाह्य वस्तु दिसाव्यात म्हणून अंधारात दीप प्रज्थ्जलीत करावा- तसा नाना प्रकारांनी भगवान बुद्धांनी आपला सद्धर्म मला सांगितला आहे. भगवान ! मी बुद्ध, धम्म संघ ह्यांचा आश्रय स्वीकारतो. मी गृहस्थाश्रमाचा त्याग करून प्रत्रज्यित होण्याची इच्छा व्यक्‍त करतो.” 

१७. अशा प्रकारे धनंजनीच केवळ भगवान बुद्धांची भक्‍त राहिली नाही. तिने आपल्या पतीलाही भगवान बुद्धांचा भक्‍त बनविले.

 

२. विशाखेची दृढ श्रद्धा

१. अंग देशातील भहीय नगरीत विशाखा जन्मली होती.

२. तिच्या पित्याचे नाव धनंजय आणि मातेचे नाव सुमना होते.

३. एकदा सेल ब्राम्हणाच्या निमंत्रणावरून पुष्कळ भिक्खुंसह तथागत भद्दीय नगरीत गेले. विशाखा ही ह्या ब्राम्हणाची नात असून ती त्या वेळी सात वर्षाची होती. 

४. जरी विशाखेचे वय केवळ सात वर्षाचे होते तरी तिने आपले पितामह मेण्डक याजकडे भगवान बुद्धाच्या दर्शनाची इच्छा प्रकट केली. मेण्डकाने तिला अनुज्ञा देऊन  पाचशे सहचारिणी, पाचशे दासी व पाचशे रथ सोबत देऊन बुद्धांच्या दर्शनासाठी तिला पाठवले.

५. आपला रथ काही अंतरावर थांबवून ती भगवान बुद्धांजवळ पायीच गेली. 

६. भगवान बुद्धांनी तिला धर्मोपदेश केला आणि ती त्यांची उपासिका बनली. 

७. त्यानंतरच्या पंधरवड्यात मेण्डकाने भगवान बुद्ध व त्यांचे अनुयायी ह्यांना दररोज आमंत्रित करून भोजन  दिले. 

८. कालांतराने प्रसेनजित राजाच्या विनंतीनुसार बिबिसाराने धनंजयाला जेव्हा कोशल देशात पाठवले तेव्हा विशाखाही आपल्या मातापित्यांसह गेली आणि साकेत येथे तिने वास्तव्य केले.

९. श्रावस्तीचा एक धनिक नागरिक मिगार आपला पुत्र पुण्यवर्धन ह्याचा विवाह करण्याच्या विचारात होता. त्याने अनुरूप वधूच्या शोधासाठी काही लोकांना पाठविले होते. 

१०. हे लोक फिरत फिरत साकेतला येऊन पोहोचले. एका सणाच्या दिवशी विशाखा सरोवरावर स्थान करण्यास जात असताना त्यांच्या दृष्टीस पडली. 

११. त्या समयी पावसाची मोठी सर येताच विशाखेच्या सहचारिणी आश्रयासाठी धावल्या; पण विशाखा मात्र नेहमीच्या गतीने चालत ज्या स्थानी हे दूत उभे राहिले होते तिथे पोहोचली. 

१२. त्यांनी विचारले की, तू धावत जाऊन आपले कपडे का बचावले नाहीस ? ती म्हणाली की, तिच्याजवळ भरपूर कपडे आहेत; पण ती जर धावली असती तर कदाचित तिच्या अवयवाला अपाय झाला असता आणि तो अवयव बदलणे असाध्य ठरले असते. विक्रीसाठी असलेल्या मालासारखी अविवाहित कन्यांची स्थिती असते. त्यांना विद्रूप राहून चालत नाही.”

१३. तिच्या सौंदर्याने आधीच प्रभावित झालेली ती मंडळी तिच्या बुद्धिमत्तेने आणखी भारावून गेली. त्यांनी तिला दिला. विवाहाच्या तिने  पुष्पगुच्छ  दिला. विवाहाच्या प्रस्तावाचे स्तावाच प्रतीक म्हणून तिने तो स्वीकारला. 

१४. विशाखा घरी परतल्यावर ती मंडळी तिच्या मागून तिथे आली व त्यांनी धनंजयाकडे पुण्यवर्धनाबद्दल शब्द टाकला. त्यांची सूचना स्वीकारली गेली आणि नंतर पत्रव्यवहाराने बेत पक्का ठरविला गेला. 

१५. प्रसेनजितला जेव्हा हे समजले तेव्हा अपूर्व सन्मानार्थ पुण्यवर्धनासह साकेतला जाण्याची त्याने इच्छा दर्शविली. धनंजयाने राजा व त्याचा परिवार, मिगार, पुण्यवर्धन आणि त्याचे सहकारी ह्यांचे भव्य स्वागत केले, आदरातिथ्याच्या सर्व बाबतीत त्याने स्वत: लक्ष घातले. 

१६. वधूचे अलंकार करण्यासाठी पाचशे सुवर्णकारांची योजना केली गेली. धनंजयाने आपल्या कन्येच्या विवाहाप्रीत्यर्थ धनाच्या पाचशे गाड्या, सुवर्णपात्रे व पणुधन इत्यादिकांच्या पाचशे-अशा अर्पण केल्या. 

१७. जेव्हा विशाखेला निरोप देण्याचा समय आला तेव्हा धनंजयाने उपदेशार्थ तिला दहा सूचना सांगितल्या – ज्या पलीकडच्या खोलीत असलेल्या मिगारानेही ऐकल्या. ह्या सूचना अशा होत्या: घरातील अग्नी बाहेर न देणे; बाहेरचा अग्नी घरात येऊ न देणे, जो कोणी परत काही देईल त्यालाच काही देणे, जो कोणी देणार नाही त्याला काही न देणे; जो देईल त्याला देणे आणि न देईल त्यालाही देणे, प्रसन्नतापूर्वक बसणे, प्रसन्नतापूर्वक खाणे पिणे; अग्नी प्रज्वलित राहील अशी खबरदारी घेणे; आणि गृहुदेवतांना आदर दर्शविणे.

१८. दुसर्या दिवशी धनंजयाने आपल्या कन्येच्या पुरस्कारार्थ आठ गृहस्थांची नियुक्‍ती केली. तिच्यावर कसला आरोप आला तर त्याची चौकशी करण्याचे काम त्यांच्यावर सोपविले होते. 

१९. आपली सून श्रावस्तीच्या जनतेने पाहावी अशी मिगाराची इच्छा होती. आपल्या रथात उभी राहुन विशाखेने जेव्हा श्रावस्तीत प्रवेश केला तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा जनता उभी होती. जनतेने विशाखेवर उपहारांचा वर्षाव केला; पण तिने त्या सर्व वस्तू जनतेत वाटून टाकल्या.

२०. मिगार निगण्ठांचा उपासक होता. विशाखा घरी आल्यावर लवकरच त्याने निगण्ठांना पाचारण केले आणि त्यांचे स्वागत करण्यास तिला सांगितले; पण त्यांची नग्नमावस्था पाहून तिला घृणा आली आणि तिने त्यांचा सन्मान करण्याचे नाकारले.

२१. निगण्ठांनी हट्ट धरला की तिला परत पाठवून द्यावे. पण मिंगाराने काल-हरण करण्याचे योजिले. 

२२. एके दिवशी मिगार भोजनास बसला होता व विशाखा त्याला पंख्याने वारा घालीत होती. इतक्यात घराबाहेर एक भिक्खू उभा असल्याचे तिच्या दृष्टोत्पत्तीस आले. मिगाराची त्याच्याकडे नजर जावी म्हणून विशाखा बाजूला झाली; पण भिक्खूकडे न पाहता मिगाराने भोजन सुरू ठेवले. 

२३. हे पाहताच विशाखा त्या भिक्खूला बोलली, “कृपा करून पुढे जा. माझे श्वशूर शिळे अन्न खात आहेत.” 

मिगाराला राग आला. त्याने तिला माघारी पाठवण्याची धमकी दिली. पण तिच्या विनंतीनुसार ही बाब त्या अष्टपंचांसमोर मांडण्याचे मान्य केले. 

२४. त्यांनी तिच्याविरुद्ध केलेल्या सर्व आरोपांची चौकशी केली आणि तिला दोषमुक्त ठरविले. 

२५. त्यावर विशाखेने आज्ञा दिली की, तिला माहेरी पाठविण्याची सिद्धता केली जावी. मिगार आणि त्याच्या पत्नीने त्यावर तिची क्षमा मागितली. भगवान बुद्ध आणि त्यांचा भिक्खू परिवार ह्यांना आमंत्रण दिले जावे, अशी अट घालून विशाखेने त्यांना क्षमा केली. 

२६. त्याने तसे केले; पण निगण्ठांच्या दडपणामुळे सरबराई करण्याचे काम त्यांनी विशाखेवर सोपविले व फक्‍त भोजनाच्या अखेरीस होणारे र भगवान बुद्धांचे प्रवचन पडद्याआडून श्रवण करण्यास मान्यता दिली. 

२७. पण प्रवचनाचा प्रभाव त्याजवर एवढा पडला की, तो उपासक बनला. 

२८. विशाखेबद्दल त्याला असीम कृतज्ञता वाटली. ह्यानंतर तो तिला मातेसमान मानू लागला. आणि त्याप्रमाणे तिचा आदरसत्कार करू लागला. ह्या नंतर तिला मिगार-माता असे संबोधण्यात येऊ लागले. 

२९. अशा रीतीची विशाखेची दृढ श्रद्धा होती.

 

३. मल्लिकेची श्रद्धा

१. एकदा जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनारामात राहिले होते तेव्हा एका गुहस्थाचा एकुलता एक प्रिय पुत्र निधन पावला. ह्यामुळे त्या गृहस्थाने आपला व्यवसाय व खाणेपिणे सोडून दिले.

२. तो दररोज स्मशानभूमीत जाई आणि मोठमोठ्याने विलाप करी, “ हे लाडक्या  मुला, तू कुठे आहेस ? तू कुठे आहेस?” ३. तो शोकग्रस्त पिता भगवान बुद्धांकडे आला व अभिवादन करुन एकीकडे बसला. 

४. शून्यमनस्क, निविकार व आगमनाचे प्रयोजन न जाणणार्या त्याच्या अवस्थेकडे पाहून तथागत त्याला म्हणाले, “ तुझी अवस्था ठीक नाही, तुझे मनही स्थिर नाही.” 

५.“ माझा एकुलता एक लाडका पुत्र मरण पावला असता माझे चित्त कसे स्थिर राहू शकेल ?”

६. “ होय, सदगृहस्था ! आपले प्रियजन दु:ख, शोक, वेदना, व्यथा व कष्ट ह्यास कारणीभूत होतात.”

७. तो गृहस्थ रागावून बोलला, “ असे कोण म्हणू शकतो ? छे, छे; आपले प्रियजन आपल्याला आनंद आणि सुख देतात.”

८. आणि असे बोलून भगवान बुद्धांच्या शब्दांचा धिक्कार करून तो रागाने उठला आणि निघून गेला. 

९. जवळपास काही जुगारी द्यूत खेळत होते. तो गृहस्थ त्यांच्याकडे गेला आणि श्रमण गौतमास आपली शोककथा आपण कशी सांगितली, त्यांनी त्यावर काय उत्तर दिले, व आपण रागाने तिथून कसे निघालो हे त्यांना निवेदन केले.

१०. जुगारी म्हणाले, “ तुमचे म्हणणे बरोबर आहे. आपले प्रियजन हे आपल्या आनंदाचे व सुखाचे उगमस्थान आहे.” त्या गृहस्थाला ते जुगारी आपल्याच मताचे असल्याबद्दल बरे वाटले. 

११. हळूहळू ही गोष्ट पसरत पसरत राजाच्या अंत:पुरापर्यंत जाऊन पोहोचली. राजाने मल्लीकेला सांगितले की, तुझे श्रमण गौतम म्हणत की, प्रियजन दु:ख, शोक, वेदना, व्यथा व कष्ट ह्यांस कारणीभूत होतात. 

१२. “ महाराज ! जर तथागत असे म्हणाले असतील तर ते रास्तच आहे.”

१३. “मल्लिके ! जसा एखादा शिष्य गुरूच्या प्रत्येक वचनाला ‘होय, बरोबर आहे.’ असे म्हणून मान्यता दर्शवितो तसेच श्रमण गौतम जे जे बोलतात ते ‘ जर तथागत असे म्हणाले असतील तर ते रास्तच आहे.’ असे बोलून तू मान्यत दर्शवितेस. जा, चालती हो !”

१४. तेव्हा मल्लिकेने नलिध्यान ब्राम्हणास पाचारण केले आणि सांगितले की, भगवान बुद्धांच्याकडे जा, आपल्या वतीने त्यांना शिरसाष्टांग प्रणिपात कर, त्यांचे कुणल विचार आणि ते म्हणतात असे जे सांगितले जाते ते खरे आहे काय ह्याची चौकशी कर.

१५. “आणि ते जे काय बोलतील ते तसेच मला नीट सांग.” ती म्हणाली. 

१६. राणीच्या आज्ञेच्या परिपालनार्थ ब्राम्हण निघाला आणि तथागतांकडे जाऊन त्यांना ते तसे बोलले की काय  असे त्याने विचारले.

१७. “ होय, ब्राम्हणा ! आपले प्रियजन आपल्याला दु:ख, शोक, वेदना, व्यथा व कष्ट देतात. हा पहा पुरावा.” 

१८. “ एकदा ह्या श्रावस्तीत एका स्त्रीची माता मरण पावली, शोकविव्हल होऊन वेड्यासारखी ती रस्त्यातून  भटकू लागली, आणि ‘माझी आई तुम्ही पाहिलीत का ? माझी आई तुम्ही पहिलीत का?” असे प्रत्येकाला विचारु  लागली.

१९. “ दुसरा पुरावा, श्रावस्तीतील एका स्त्रीचा पिता, बंधू, भगिनी, पुत्र, कन्या व पति निधन पावले. शोकविव्हल होऊन वेड्यासारखी ती गल्लोगल्ली भटकायला लागली आणि “आपले प्रियजन कुणी पाहिले का ?” असे प्रत्येकाला विचारु लागली.

२०. “ तिसरा पुरावा. श्रावस्तीतील एका गृहस्थाची माता, पिता, बंधू, भगिनी, पुत्र, कन्या, व पत्नी निधन पावली. शोकविव्हल होऊन वेड्यासारखा तो गल्लोगल्ली रस्तोरस्ती भटकू लागला आणि ‘ आपले प्रियजन कुणी पाहिले का?” असे प्रत्येकाला विचारू लागला. 

२१. “ आणखी एक पुरावा. श्रावस्तीतील एक स्त्री आपल्या माहेरी गेली. तिच्या घरची मंडळी पतीपासून तिला विभक्त करून तिला न आवडणार्या दुसर्या एकाबरोबर तिचा विवाह करून देण्याच्या विचारात होती.” 

२२. “ तिने आपल्या पतीस हे सांगितल्यावर त्याने तिच्या देहाचे दोन तुकडे केले आणि मग स्वत: आत्महत्या केली. जेणेकरून त्या दोघांचे एकत्र निधन व्हावे.” 

२३. नलिध्यान ब्राम्हणाने हे सर्व राणीला यथातथ्य कथन केले. 

२४. तदनंतर राणी राजाकडे गेली आणि म्हणाली, “ आपली एकुलती एक कन्या वजिरा आपणास प्रिय आहे काय?” “होय, प्रिय आहे.” राजाने उत्तर दिले. 

२५. “ आपल्या लाडक्या वजिराला काही झाले तर आपणाला दुःख होईल की नाही?” “जर तिला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार परिणाम होईल.” 

२६. “महाराज मी आपणास प्रिय आहे काय?” मल्लिकेने विचारले. “होय. प्रिय आहेस.” 

२७. “मला जर काही झाले तर आपणास दु:ख होईल की नाही?” “ जर तुला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार परिणाम होईल.”  

२८. “ महाराज, काशीकोशल नागरिक आपणास प्रिय आहेत काय?” “ होय.” राजाने उत्तर दिले. “जर त्यांना काही झाले तर आपणास दु:ख होईल की नाही?” 

२९. “ जर त्यांना काही झाले तर त्याचा घोर परिणाम होईल. आणखी निराळे कसे बरे होईल?” 

३०. “ तर मग तथागत ह्याशिवाय निराळे काही बोलले का?” “ नाही, मल्लिके !” राजा पश्चात्तापदग्ध स्वराने बोलला.

 

४. गर्भवती मातेची तीव्र अभिलाषा

१. एकदा भगवान बुद्ध भग्ग देशी भेसकलावनातील सुसुमार पर्वतावरील मृग-उपवनात राहात होते. राजकुमार बोधीचा पद्मनामक प्रासाद त्या वेळी नुकताच तयार झाला होता, पण त्यात श्रमण ब्राहम्हणाचे किवा कुणा दुसर्याचे वास्तव्य झाले नव्हते.

२. राजकुमाराने संकिकपुत्त नामक ब्राम्हणाला सांगितले, ‘ तथागतांकडे जा; माझ्यातर्फे त्यांना अभिवादन कर, त्याचे कुशल वृत्त विचार आणि भिक्खुसंघासहित त्यांना माझे भोजनाचे आमंत्रण दे.! 

३. निमंत्रण भगवान बुद्धांना दिले गेले. मौनाद्वारे त्यांनी मान्यता दर्शविली आणि हे वृत्त राजकुमाराला निवेदन केले गेले.

४. रात्र झाल्यावर राजकुमाराने आपल्या पद्म नावाच्या प्रासादात उत्तम भोजन सिद्ध केले आणि प्रासादाच्या पायर्यावर शुभ्र वस्त्र आच्छादित करून सर्व सिद्धता असल्याचे वर्तमान भगवान बुद्धास कळविण्यास त्या तरुण ब्राम्हणास सांगितले.

५. तसे केल्यावर लवकरच तथागत चीवर परिधान करून भिक्षापात्र हातात घेऊन प्रासादापाशी आले. तिथे दरवाजापाशी वाजापाशा राजकुमार त्यांची ची प्रतीक्षा करीत रात उभा होता. 

६. तथागत येताना पाहून राजकुमार त्यांना सामोरा गेला आणि अभिवादन करून त्यांच्या परिवारासह प्रासादाकडे परतला.

७. पायर्यांच्या पायथ्याशी तथागत नि:स्तब्धपणे उभे राहिले. राजकुमार बोलला, “ तथागतांनी बिछायतीवर पदार्पण करण्याची कृपा करावी. कृपा करून तथागतांनी माझ्या विनंतीप्रमाणे करावे म्हणजे ते मला चिरकाल हितावह होईल.” पण तथागत नि:स्तब्धपणे उभे राहिले. 

८. पुन्हा एकदा राजकुमाराने त्यांना विनंती केली आणि तरी तथागत स्तब्धच उभे राहिले. तिसर्यांदा त्याने विनंती केली आणि मग तथागतांनी आनंदाकडे दृष्टिक्षेप टाकला. 

९. अडचण काय होती ते आनन्द समजला आणि त्याने पायर्यावरचे आच्छादन गुंडाळून काढून ठेवावे असे त्याने सांगितले. आपल्या अनुयायांचा विचार करत तथागत त्या वस्त्रावर पाय ठेवतील असे शक्‍य नव्हते. 

१०, राजकुमाराने गन ते वस्त्राच्छादन गुडाळून ळून ठेवण्याची आज्ञा केली व प्रासादाच्या वरच्या मजल्यावर आसनांची सिद्धता करण्यास सांगितले.

११. तथागत भिक्खूसंघासहित पायर्या चढून वर गेले आणि त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर स्थानापन्न झाले.

 १२. राजकुमाराने आपण स्वत: तथागत आणि भिक्खूसंघास यथेच्छ भोजन वाढले. 

१३. तथागतांचे भोजन समाप्त झाल्यावर राजकुमार बोधी एका बाजूस आसनावर बसला आणि त्यांना 

म्हणाला, “ भगवान, मला वाटते की, सुखद साधनांनी नव्हे तर अप्रिय साधनांनीच खरे कल्याण प्राप्त केले पाहिजे.” 

१४. तथागत म्हणाले, “ राजकुमारा, फार पूर्वी जेव्हा मला संबोधी प्राप्त झाली नव्हती तेव्हा तुझ्यासारखेच माझे मत होते. त्या वेळी मी अगदी तरुण होतो, माझे केस काळेभोर आणि भरदार होते आणि तारुण्याच्या ऐन बहरात मात्यापित्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या दु:खशोकाला न जुमानता मी केस व दाढी कापून पीतवस्त्र परिधान करून संसाराचा त्याग करून गृहहीन संन्यास पत्करला. सत्यान्वेषण करण्यासाठी आणि अनुपम शांतीचा मार्ग शोधण्यासाठी मी संन्यास स्वीकारला होता.”

१५. “ पण आता माझे मन निराळे झाले आहे. जर एखाद्याला धम्म समजला तर सर्व दु:खांचा नाश कसा करावा हे त्याला समजेल.” 

१६. राजकुमार बोलला, “ किती अद्भत हा धम्म ! किती अद्भूत ह्या धम्माचे स्पष्टीकरण ! हा समजण्यास किती सुलभ !” 

१७. तेव्हा तरुण ब्राम्हण संकिकपुत्त राजकुमाराला म्हणाला, “राजकुमार ! आपण हे मान्य केलेत खरे; पण आपण बुद्ध, धम्म आणि संघ ह्यांचा आश्रय ग्रहण करण्याची तयारी दर्शविली नाहीत !” 

१८. “असे म्हणू नकोस, मित्रा ! असे म्हणू नकोस.” राजकुमार बोलला. “कारण मी माझ्या मातेकडून असे ऐकले आहे की, ज्या वेळी भगवान बुद्ध कोसम्बीच्या घोसितारामात राहात होते त्यावेळी गर्भवती अवस्थेत ती त्यांच्याकडे गेली व त्यांना अभिवादन करून त्यांच्याजवळ एका बाजूस बसली. ती त्यांना म्हणाली की, पुत्र अथवा कन्या-जो काही गर्भ माझ्या उदरात ह्या क्षणी आहे तो अजातजर्भ बुद्ध, धम्म आणि संघ ह्यांचा आश्रय स्वीकारीत आहे. भगवान बुद्धांनी अनुग्रह करून त्या गर्भाला यावज्जीव आपला शरणागत उपासक म्हणून स्वीकारावे.”

१९. “आणखी एकदा भगवान बुद्ध ह्या भग्गदेशातच सुंसुमार पर्वतावरील भेसकलावनात राहात होते. माझ्या दाईने मला त्या वेळी तथागतांकडे नेले आणि त्यांच्या समोर उभी राहून ती म्हणाली, “हा राजकुमार बोधी बुद्ध, धम्म आणि संघ ह्यांचा आश्रय स्वीकारीत आहे.” 

२०. “आता मी स्वत: तिसर्या वेळी आश्रय स्वीकारत आहे आणि तथागतांना विनंती करीत आहे की, मला याज्जीव उपासक म्हणून त्यांनी स्वीकृत करून घ्यावे.”

 

५. केनियाचे स्वागत

१. आप्पण येथे सेल नावाचा एक ब्राम्हण रहात होता. तो तीन वेदांत पारंगत होता. तसेच व्याख्यांसहित कर्मकाण्डाचा पण्डित, शब्दशास्त्र व व्युत्पत्तिशास्त्राचा तज्ञ, व पाचवी विद्या जो इतिहास त्यात निष्णात होता. तो व्याकरण जाणत असे. कूटतर्कशास्त्र तसेच महापुरुषांची लक्षणे ओळखणे ह्यांतही तज्ज्ञ होता. त्याच्यापाशी तीनशे तरुण ब्राम्हण होते; -ज्यांना तो वेदमन्त्र शिकवत असे.  

२. केनिय नावाचा अग्निपूजक ब्राम्हण ह्या सेलाचा अनुयायी होता. आपल्या तीनशे शिष्यांसह सेल त्याच्याकडे गेला. त्या वेळी तिथे अग्निपूजक निरनिराळ्या उपक्रमात व्यग्न होते व स्वत: केनिय मेजवानीची खास व्यवस्था करण्यात गुंतला होता.

३. ते पाहताच ब्राम्हण केनियाला म्हणाला, “ हे सर्व काय चालले आहे ? ही विवाहभोजनाची तयारी आहे की यज्ञाची सिद्धता ? मगधनरेण बिम्बिसार सपरिवार उदईक भोजनास य्रेणार आहेत की काय?” 

४. “सेल ! ही विवाहभोजनाची तयारी नाही किंवा राजाच्या मेजवानीचीही नाही. पण मी एक मीठा यज्ञ आयोजिला आहे. कारण श्रमण गौतम आपल्या भिक्षाटन यात्रेत बाराशे पन्नास भिक्खुंसह आप्पण येथे आले आहेत.”

५. “ श्रमण गौतमांच्या बाबतीत अशी कीर्ती प्रसृत आहे की, ते सम्यक्‌ संबुद्ध आहेत.”

६. “ त्यांनाच भिक्खूसंघासह मी उदईक भोजनास निमंत्रित केले आहे. ही जी मेजवानीची सिद्धता दिसते आहे ती त्यांच्यासाठी आहे.” 

७. सेल म्हणाला, “ केनिय, तू त्यांना सम्यक्‌ संबुद्ध असे संबोधिलेस काय?” “ होय.” केनिय बोलला. “ केनिय, तू खरोखरच असे म्हणालास?” “ होय, मी तसे म्हणालो.” 

 

६. राजा प्रसेनजितची स्तुती

१. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीत अनाथपिण्डिकाच्या जेतवनारामात राहात होते.

२. त्या वेळी कोशलनरेश प्रसेनजित एका लुटुपुटूच्या युद्धात विजय मिळवून आपला हेतू साध्य करून परतला होता. उद्यानाजवळ पोहोचल्यावर तो तिथे वळला. जिथपर्यंत रथ जाऊ शकत होता तिथपर्यंत रथातून जाऊन नंतर पुढे तो पायाने उद्यानात चालत गेला. 

३. त्या वेळी काही भिक्खू खुल्या हवेत शतपावली करीत होते. कोशल-नरेश प्रसेनजित त्या भिक्‍्खुंकडे गेला आणि म्हणाला, “ भन्ते, ह्या समयी अर्हत सम्यक्‌ संबुद्ध तथागत भगवान बुद्ध कोणत्या स्थळी आहेत ? मी त्यांचे दर्शन घेऊ इच्छितो.”

४. “ महाराज ! त्यांचा निवास पलीकडे आहे. दरवाजा बंद आहे. आपण न घाबरता शांतपणे तिकडे जा. व्हरांड्यात प्रवेश करा, खाकरल्यासारखे करा व दरवाज्याची कडी वाजवा. तथागत दरवाजा उघडतील.” 

५. त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजा प्रसेनजित त्या निवासात गेला. खाकरला, व त्याने दरवाजाची कडी वाजवली. तथागतांनी दार उघडले. 

६. मग प्रसेनजितने निवासात प्रवेश केला आणि तथागतांना त्याने शिरसाष्टांग वंदन केले. त्यांच्या पदकमलांचे चुंबन घेतले व हातांनी ते स्पर्शीले, आणि आपल्या आगमनाची सुचना दिली, “ भगवान ! मी कोसल-नरेश प्रसेनजित आलो आहे.”

७. भगवान बुद्धांनी विचारले, “ पण महाराज ! ह्या देहात असे काय वैशिष्ट्य आहे की, आपण इतक्या गाढ मानवतेने ह्या देहास भावपूर्ण वंदन करीत आहात?”

Previous page                                    Next book


 The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!