His Benefactors

HIS BENEFACTORS

Part I—His Benefactors

His Benefactors PDF in English

षष्ट खंड: भगवान बुद्ध आणि त्यांचे समकालीन

भाग पहिला: भगवान बुद्ध व त्यांचे समर्थक

His Benefactors

Previous page                                    Next Page

 

१. बिम्बिसार राजाचे दान

१. बिम्बिसार राजा हा तथागतांचा फक्त अनुयायीच नव्हता; तो त्यांचा परम भक्‍त आणि त्यांच्या धम्माचा एक प्रमुख आधार होता. 

२. उपासक झाल्यावर बिम्बिसाराने विचारले- “ भिक्खूसंघासह भगवान उद्या मजकडे भोजन घेण्यास सम्मती देतील काय ?”

३. तथागतांनी मुग्ध राहून सम्मती दर्शविली.

४. आपले निमंत्रण स्वीकृत केले गेले आहे असे समजल्यावर बिम्बिसार राजा आपल्या आसनावरून उठला. त्याने तथागतांना अभिवादन केले आणि त्यांच्याभोवती प्रदक्षिणा घालून तो निघून गेला. 

५. रात्र संपताच बिम्बिसाराने उत्तमोत्तम भोजनाची सिद्धता केली आणि वेळ होताच तथागतांना तो म्हणाला, “ भगवान, वेळ झाली. भोजन तयार आहे.”

६. तथागतांनी दोन प्रहर होण्यापूर्वी चीवर परिधान केले, उत्तरीय आणि भिक्षापात्रासह पूर्वजटिल भकक्‍खुंसमवेत त्यांनी राजगृहात प्रवेश केला. 

७. तथागत बिम्बिसार राजाच्या महालाकडे निघाले. तिथे गेल्यावर त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्य असणावर भिक्खुंसह ते बसले. बिम्बिसार राजाने पंक्‍तीचा प्रमुखस्थानी असलेल्या तथागतांना व उपस्थितत भिक्खु वर्गांना स्वत:च्या हातांनी भोजन वाढले आणि तथागतांनी भोजन झाल्यावर आपले भिक्षापात्र धुऊन स्वच्छ करताच बिम्बिसार राजा त्यांच्या जवळ बसला. 

८. त्यांच्याजवळ बसल्यावर बिम्बिसार राजा विचार करू लागला : “तथागतांसाठी निवासाची जागा कुठे बरे निवडावी, गावापासून फार दूर नको आणि अगदी जवळही नको. त्यांना भेटण्यास ण्यास जाणार्या लोकांना सोयीस्कर आणि सुगम अशी असावी. दिवसा गजबजलेली नाही अशी शांत, रात्री जनसंमर्दापासून दूर एकान्तात आणि निवृत्तवासास अनुकूल अशी.”

९. बिम्बिसार राजाला मग आठवले, “ माझे वेळूवन उद्यान गावापासून फार दूरही नाही आणि जवळही नाही.  शिवाय येण्याजाण्यास सोयीस्कर. बुद्ध प्रमुख असलेल्या भिक्खूंसंघास मी ह्या वेळूवन उद्यानाचे दान केले तर…?” 

१०. मग बिम्बिसार राजाने पाण्याने भरलेले सुवर्णपात्र घेऊन भगवान बुद्धांना दान देताना तो म्हणाला, “आपण ज्याचे प्रमुख आहात त्या भिक्खूंसंघास माझे वेळूवन उद्यान मी दान देत आहे.” तथागतांनी उद्यानाचा स्वीकार केला.

११. तथागतांनी नंतर प्रवचन करून बिम्बिसार राजाला उत्साहित, उद्युक्त आणि आनंदित केले, व आपल्या स्थानावरून उठून ते निघून गेले. 

१२. ह्या प्रसंगानंतर तथागतांनी प्रवचन करताना भिक्खुंना सांगितले, “भिक्खूंनो ! ह्या उद्यानाचा स्वीकार करण्यास मी तुम्हांस अनुमती देत आहे.”  

 

२. अनाथपिण्डिकाचे दान

१. अनाथपिण्डिक दीक्षा घेतल्यानंतर एकदा तथागतांकडे गेला. त्यांच्या उजव्या बाजूस आसनस्थ झाल्यावर तो म्हणाला;

२. “भगवान्‌, आपणास माहीत आहे की, धनधान्यसमृद्ध आणि शान्तिपूर्ण अशा श्रावस्तीत मी वास्तव्य करीत आहे. तिथे प्रसेनजित राजा अधिकारावर आहे. 

३. “तिथे एक विहार बांधावा अशी माझी मनीषा आहे. आपण कृपा करून श्रावस्तीत यावे, आणि विहाराच्या दानाचा स्वीकार करावा.”

४. तथागतांनी मुग्ध राहून दानग्रहणास सम्मती दर्शविली. 

५. निराधारांचा मित्र आणि अनाथांचा आश्रयदाता असा तो अनाथपिण्डिक घरी परतताना राजकुमार जेताचे हरित वृक्षवाटिकांनी आणि निर्मल जलप्रवाहांनी परिपूर्ण असलेले उद्यान त्याच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्याने विचार केला, “हे रमणीय स्थान तथागतांच्या भिक्खूंसंघासाठी योजिलेल्या विहारासाठी अनुरूप आहे.” आणि मग तो राजकुमाराकडे गेला आणि ते उद्यान विकत घेण्याची अनुज्ञा मागितली. 

६. राजकुमार ते उद्यान विकण्यास तयार नव्हता. कारण त्याचे त्याला फार मोल वाटे. प्रथमत: त्याने नकार दशविला; पण अखेरीस तो म्हणाला “या सर्व भूमीवर जर तू सुवर्णमुद्रा पसरशील तरच फक्त तुला ते मिळेल.”

७. अनाथपिण्डिक आनंदित झाला आणि सुवर्णमुद्रा पसरण्यास त्याने सुरुवात केली; पण जेत म्हणाला: “तू तसदी घेऊ नकोस. मला जमीन विकायची नाही;” पण अनाथपिण्डिकाने आग्रह धरला. त्यांच्यात वादावादी सुरू होऊन प्रकरण न्यायाधिशाकडे गेले.

८. मध्यंतरी लोकांत ह्या असामान्य न्यायप्रकरणाची चर्चा सुरु झाली आणि राजकुमाराच्या च्या कानी पडणाऱ्या  गोष्टीत अनाथपिण्डिकाच्या श्रीमंतीची तसेच प्रामाणिकपणाची आणि निष्ठेची हकिकतही आली. म्हणून त्याने त्याच्या योजनेची चौकशी केली. तथागतांचे नाव ऐकताच विहाराच्या संस्थापनेत भाग घेण्यास तो उत्सुक झाला आणि फक्त अर्ध्या सुवर्णमुद्रा स्वीकारून तो म्हणाला, “जमीन तुझी आहे; पण वृक्ष माझे आहेत तथागतांच्या दानात माझा हिस्सा म्हणून ते वृक्ष मी अर्पण करीत आहे.”

९. विहाराचा पाया तयार झाल्यावर तथागतांच्या आदेशानुसार प्रमाणबद्ध असा भव्य विहार बांधण्यास त्यांनी प्रारंभ केला. अनुरूप अशा शिल्पकामाने त्याला शोभिवंत करण्यात आले. 

१०. ह्या विहाराला ‘जेतवन’ असे नाव दिले गेले आणि अनाथपिण्डिकाने तथागतांना श्रावस्तीस त्याचे दान स्वीकारण्यास पाचारण केले. तथागत कपिलवस्तूहुन श्रावस्तीस त्यासाठी आले. 

११. जेव्हा तथागतांनी जेतवनात प्रवेश केला तेव्हा अनाथपिण्डिकाने पुष्पवर्षाव केला आणि सुगन्धित धूप जाळला. सोन्याच्या झारीतून तथागतांच्या हातावर उदक सोडताना तो म्हणाला, “अखिल जगातील भिक्खुसंघाच्या उपयोगासाठी हा जेतवन विहार मी आपणास दान देत आहे.” 

१२. तथागतांनी दानाचा स्वीकार करताना उत्तर दिले, “सर्व अमंगलावर विजय प्राप्त होवो; ह्या दानाने दात्याचे आणि अखिल मानवजातीचे कल्याण होवो आणि सर्वत्र न्यायाचे वास्तव्य वधित होवो.”

१३. अनाथपिण्डिक हा तथागताच्या ऐंशी प्रमुख शिष्यांपैकी एक होता. त्याला ‘प्रमुख धर्मदाता’ अशी पदवी  होती.

 

३. जीवकाचे दान 

१. जेव्हा तथागत राजगृहात असत तेव्हा भिषग्वर जीवक दिवसातून दोन वेळा त्यांच्याकडे जात असे. 

२. बिम्बिसार राजाने दान केलेले वेळूवन फार दूर असल्याचे त्याला जाणवले. 

३. राजगृहात जीवकाच्या निवासानजीक त्याच्या मालकीचे “आम्रवन’ नावाचे उद्यान होते. 

४. तिथे एक सर्वांगपरिपूर्ण विहार बांधावा आणि आम्रवनासहीत तथागतांना त्याचे दान करावे असे त्याला  वाटले.

५. ह्या कल्पनेने प्रेरित होऊन तो तथागतांपाशी गेला आणि आपली इच्छा परिपूर्ण करण्याची त्याने अनुज्ञा मागितली.

६. तथागतांनी मुग्ध राहून सम्मती दर्शविली. 

 

४. आम्रपालीचे दान

१. तथागत नादिकामध्ये राहिले असताना त्यांना दुसर्या ठिकाणी जावेसे वाटले. त्यांनी आनन्दाला हाक मारली आणि म्हटले, “चल आनन्दा, आपण वैशालीला जाऊ या.” 

२. “ बरं तर.” सम्मती दर्शवून तथागतांना आनन्द म्हणाला. 

३. नंतर महाभिक्खू संघासहित तथागत वैशालीकडे निघाले. तिथे आम्रपालीच्या आम्रवनात तथागत वास्तव्यास गेले.

४. तथागत वैशालीस आले असून आपल्या आम्रवनात राहिले आहेत असे गणिका आम्रपालीला समजले. तिने पुष्कळ शासकीय वाहने मागवून त्यांपैकी एकात स्वत: आरूढ होऊन वैशालीहून आपल्य परिवारासह ती आम्रवनाकडे निघाली. जिथपर्यंत रथ जाऊ शकला तिथपर्यंत ती रथातून गेली. मग खाली उतरून तथागत जिथे होते त्या स्थानापर्यंत पायाने चालत जाऊन जवळ गेल्यावर तिने त्यांना अभिवादन केले आणि ती एका बाजूस  बसली. सला. ती तशी शी बसल्यानंतर तथागतांनी गगतांनी तिला ला धर्मोपदेश मापदश केला.  

५. नंतर तथागतांना उद्देशून ती बोलली, “ भगवान भिक्खूसंघासहित उदईक मजकडे भोजनास येतील काय?” ६. तथागतांनी मुग्ध राहून सम्मती दर्शविली. आपल्या आमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला हे पाहत आम्रपाली आपल्या आसनावरून उठली आणि तिने त्यांना अभिवादन केले. नंतर प्रदक्षिणा घालून ती तिथून निघाली. 

७. वैशालीच्या लिच्छवींना समजले की, तथागत वैशालीला आले असुन आम्रपालीच्या आम्रवनात त्यांचे वास्तव्य आहे. त्यांना सुद्धा आपल्या घरी भोजनासाठी तथागतांना आमंत्रित करावयाचे होते. म्हणून त्यांनीही बरीचशी शासकीय वाहने सिद्ध करून प्रत्येकात एक एक जण आरूढ होऊन ते परिवारासह वैशालीला गेले. 

८. आम्रपालीची आणि व्यांची परस्परविरुद्ध दिशेने येताना गाठ पडली. 

९. त्या तरुण लिच्छवींच्य रथांना आग्रपालीचे रथ चाकाला चाक, आसाला आस आणि जूला जू असे जोराने घासत गेले. तेव्हा ते तिला म्हणाले, “ आम्रपाली, आमच्या रथांना अशी टक्कर देत तू का बर निघाली आहेस?” 

१० . “ महाराज, आताच मी तथागतांना भिक्खूसंघासहित उद्या भोजनास येण्याचे आमंत्रण दिले आहे.” आम्रपाली बोलली.

११. “ हे सौभाग्य आम्हांस प्रदान कर. आम्ही तुला एक लक्ष देऊ करतो.” 

१२. “ महाराज! वैशाली आणि इतर नियंत्रणाखालील प्रदे जरी आपण मला देऊ केला तरी हा विक्रय मी करणार नाही.”

१३. लिच्छवी हातवारे करीत बोलले, “ ह्या आमग्रपालीने आम्हांस हरविले.” आणि ते आम्रपालीच्या आम्रवनाच्या दिशेने निघून गेले.१४. आपल्यावर कुरघोडी झाली हे जाणूनही तथागतांना भेटून फेरविचाराने त्यांच्याकडून आपल्या आमंत्रणालाअग्रक्रम मिळवावा ह्या आशेने ते आम्रपालीच्या आम्रवनात गेले.

१५. लिच्छवी दुरून येत दिसताच तथागत भिक्खुंना म्हणाले. “ आपल्यापैकी ज्या कोणी कधी देव पाहिले नसतील त्यांनी ह्या लिच्छवींकडे पहावे. ह्या लिच्छवींच्या समुदायाकडे पहावे आणि तुलनेने त्यांचे निरीक्षण करावे- हे परलोकातील जणू देवच आहेत.” 

१६. रथ जाऊ शकतील तिथपर्यंत गेल्यावर लिच्छवी रथातून उतरले आणि तथागत आसनस्थ होते त्या स्थानी जाऊन नम्रतेने त्यांच्या शेजारी ते बसले. 

१७. नंतर तथागतांना उद्देशून ते बोलले, “ तथागतांनी भिक्खूसंघासह उदईक आमचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारून आमच्यावर कृपा करावी.” 

१८. “ हे लिच्छवीजनहो, उद्याचे भोजनाचे आमंत्रण स्वीकारल्याचा मी आम्रपालीला आधीच शब्द दिला आहे.”ते म्हणाले.

१९. आम्रपालीने आपल्याला हरविल्याची लिच्छवींची आता खात्री पटली. तथागतांचे आभार मानून आणि त्यांच्या वचनाला मान्यता दर्शवून ते आपल्या आसनांवरून उठले आणि तथागतांना अभिवादन करून प्रदक्षिणा घालून ते निघून गेले.

२०. रात्र होताच गणिका आम्रपालीने आपल्या प्रासादात साखरभातादी मिष्टान्ने तयार करून ती तथागतांना म्हणाली, “ महाराज! वेळ झाली. भोजन तयार आहे.” 

२१. पहाटे वस्त्रपरिधान केलेल्या तथागतांनी आपले उत्तरीय व भिक्षापात्र घेतले आणि भिक्खूसंघासह आम्रपालीच्या प्रासादात ते गेले. त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर ते बसले. मग आम्रपालीने त्यांना व भिक्खुंना साखरभात व मिष्टान्ने वाढली आणि पोट भरेतो त्यांना जातीने आग्रह केला. 

२२. भोजन संपल्यावर तथागतांनी आपले भिक्षापात्र स्वच्छ केले आणि हात धुतले. आम्रपाली नंतर त्यांच्या शेजारी चौरंग रं ठेवून त्यावर बसल्यावर त्यांना उद्देशून म्हणाली 

२३. “ भगवान्‌! आपणास व आपल्या संघास माझे उद्यान मी अर्पण करीत आहे.” तथागतांनी त्या दानाचा स्वीकार केला आणि धर्मोपदेश केल्यानंतर ते तिथून निघाले.

 

५. विशाखेची दानशूरता

१. विशाखा ही श्रावस्तीची धनीक महिला होती. तिला बरीच मुले व नातवंडे होती.

२. जेव्हा तथागत श्रावस्तीत राहात होते तेव्हा त्यांच्या निवासस्थानी विशाखा गेली आणि तिने त्यांना भोजनाचे आमंत्रण दिले. त्यांनी ते स्वीकारले.

३. त्या रात्री आणि दुसऱ्या  दिवशी सकाळीही सारखा पाऊस पडला. भिक्खूंनी अंग ओले राहू नये म्हणून आपली चीवरे काढून ठेवली आणि आपल्या उघड्या देहावर पाऊस पडू दिला. 

४. दुसऱ्या दिवशी तथागतांचे भोजन संपल्यावर त्यांच्याजवळ बसून विशाखा त्यांना म्हणाली, “भगवान, मला आपणाकडून आठ वर हवे आहेत.”

५. भगवान म्हणाले, “विशाखा, वर कोणते आहेत ते समजल्यावाचून तथागत वर देऊ शकत नाहीत.” 

६. विशाखा बोलली, “मी मागणार आहे ते वर उचित आणि निरुपद्रवी असेच आहेत.” 

७. तथागतांनी अनुज्ञा देताच विशाखा बोलली, “भगवान, आयुष्यभर वर्षा-कालात भिक्खूसंघाला चीवरे द्यावी अशी माझी मनीषा आहे. तसेच विहारात दाखल होणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या  भिक्खुंना व आजारी तसेच त्यांची शुश्रूषा करणार्या भिक्खुंना भोजन द्यावे. आजारी भिक्खुंना औषधे आणि भिक्खूसंघाला खीर तसेच भिक्खुणींना स्थानासाठी वस्त्रे पुरवावीत अशी माझी इच्छा आहे.”

८. तथागत म्हणाले, “पण विशाखा, तथागतांकडून हे अष्ट वर मागण्यात तुझा काय हेतू आहे?”

९. आणि विशाखा बोलली, “भगवान, मी सेविकेला आज्ञा केली की, ‘जा, आणि भोजन तयार आहे असे भिक्खूसंघाला सांग.’ माझी सेविका त्याप्रमाणे गेली, पण ती विहारात पोचली तेव्हा पाऊस पडत असल्यामुळे भिक्खुंनी आपापली वस्त्रे उतरून ठेवली असल्याचे तिच्या दृष्टोत्पत्तीस आले. तिला असे वाटले की, ते भिक्खू  नसून पावसात देह भिजवून घेणारे कुणी नग्न तपस्वी आहेत. म्हणून ती परतली. तिची समजूत घालून मला पुन्हा तिला पाठवणे प्राप्त ठरले.

१०. “भगवान, नग्नता अपवित्र आणि किळसवाणी असते. ह्यामुळेच संघाला आजन्म वर्षावासास उपयुक्‍त अशी वस्त्रे द्यावी अशी मी इच्छा प्रकट केली.

११. “माझ्या दुसऱ्या  वराबद्दल सांगावयाचे म्हणजे, दुरून येणारे भिक्खू सरळ मार्ग अपरिचित असल्यामुळे आणि भिक्षा उपलब्ध होईल असे गाव माहित नसल्यामुळे भिक्षा मिळविताना वाटेत थकून जातात. भगवान, ह्यामुळेच विहारात येणार्या भिक्खू ची आजन्म भोजनाची व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे.

१२. “तिसरे म्हणजे, बाहेर जाणारा भिक्खू भिक्षा मिळवता मिळवता कदाचित मागे पडेल अथवा जाण्याच्या ठिकाणी उशीरा पोहोचेल. साहजिकच मार्ग काटता काटता तो थकून जाईल.”

१३. “चौथे म्हणजे, रुग्ण भिक्खूला आवश्यक अन्न मिळाले नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्याचा अंतही होईल.

१४. “ पांचवे म्हणजे, रुग्णाची शुश्रुषा करणाऱ्या  भिक्खूला बाहेर जाऊन भिक्षा मिळवण्यास सवड मिळणार नाही.

१५. “ सहावे म्हणजे, रुग्ण भिक्खूला आवश्यक औषध प्राप्त झाले नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्याचा अंतही होईल. 

१६. “ सातवे म्हणजे, भगवान ! आपण खिरीची प्रशंसा केली आहे की, तिच्यामुळे बुद्धी तल्लख होते, भूकतहान शमते; निरोगी माणसास ती पौष्टिक आणि रुग्णास पथ्यक ठरते. म्हणून आजन्म संघास खीर पुरवावी अशी माझी मनीषा आहे. 

१७. “ शेवटचे म्हणजे, भगवान, अचिरावती नदीत भिक्खुणी गणिकांसमवेत विवस्त्रावस्थेत तटापाशी स्थान करीत असतात. गणिका त्या वेळी त्यांना खिजवतात आणि बोलतात, ‘ तारुण्यात पावित्र्य राखण्यात काय  फायदा ? वृद्धापकाली पावित्र्य राखा म्हणजे दोन्ही साधेल.’ भगवान ! नग्नता ही स्त्रीच्या बाबतीत अपवित्र, किळसवणी आणि तिटकार आणणारी गोष्ट ठरते. 

१८. “ माझ्या वर मागण्याचे हे प्रयोजन आहे.” 

१९, तथागत म्हणाले, “ पण विशाखा, तथागतांकडून हे आठ वर मागण्यात तुझा स्वत:चा काय लाभ आहे ?” 

२०. विशाखा म्हणाली, “ वर्षावासासाठी ठिकठिकाणी राहणारे भिक्खू तथागतांना भेटण्यासाठी श्रावस्तीला येतील आणि तथागतांकडे आल्यावर ते विचारतील, ‘अमूक अमूक भिक्खू निधन पावला. आता त्याला काय गती मिळेल ?’ त्यावर जशी त्याची गती असेल त्याप्रमाणे तथागत सांगतील की, * त्याला मार्गफल प्राप्त झाले आहे किंवा त्याला निर्वाण प्राप्त झाले आहे किंवा त्याला अर्हतत्व प्राप्त झाले आहे.! 

२१. “ आणि मग मी त्यांच्यापाशी जाऊन त्यांना विचारीन की, ‘ प्रस्तुत भिक्खू श्रावस्तीत कधी पूर्वी होता काय ?’ आणि होकार मिळाला तर मला जाणवेल की, * नक्की वर्षावासासाठी त्याला चीवरे प्राप्त झाली असतील किंवा बाहेर जाणार्या अथवा आत येणार्या त्या भिक्खूला भोजन मिळाले असेल किंवा त्या रूग्णाइताला किंवा त्याची शुश्रूषा करणार्याला अन्न मिळाले असेल किंवा त्याला आजारपणात औषध आणि खीर सतत मिळाली असेल.” 

२२. ‘ आणि मग माझ्या मनास प्रसन्नता वाटेल आणि प्रसन्नतेमुळे आनंद प्राप्त होईल आणि आनंदामुळे सर्व देहाला शान्ती प्राप्त होईल. शान्तीच्या प्राप्तीने सुखकर तृप्तीची अनुभूती मिळेल आणि त्या अनुभूतीने माझ्या हृदयात शांती निर्माण होईल. एक प्रकारे माझ्या नैतिक सामर्थ्याचा किंवा सप्त संबोधीचा उपयोग केल्यासारखे होईल. भगवान, हे आठ वर मागण्यात माझा हा लाभ होणार होता.”

२३. त्यावर तथागत म्हणाले, “ विशाखे, हे फार बरे; हे फार बरे की, हे लाभ ध्यानात घेऊन तू हे आठ वर मागितलेस. जे पात्र आहेत त्यांना दान करणे हे सुपीक फल देणार्या मातीत सुबीज पेरण्यासारखे आहे. उलट जे रागलोभादी मनो- विकाराच्या आधीन आहेत त्यांना दान करणे हे खराब भूमीत बीज पेरण्यासारखे आहे. दानाचा स्वीकार करणार्यांचे मनोविकार गुणविकासास कुंठित करून टाकतात.” 

२४. त्यानंतर तथागतांनी पुढील शब्दात विशाखेचे आभार मानले : “शीलसंपन्न उपासिका श्रद्धायुक्त मनाने आणि नि:स्वार्थी वृत्तीने जे काही दान देईल ते दान दिव्य, दु:खनाशक आणि सुखकारक ठरेल. अपवित्रता आणि कलंक ह्यापासून मुक्‍त असलेल्या मार्गाने जीवन कंठीत असताना सुखी जीवन तिला प्राप्त होईल. सत्परवृत्तीमुळे तिला सुख मिळेल आणि आपल्या दातृत्वाने तिला आनंद प्राप्त होईल.” 

२५. विशाखेने पूर्वाराम विहार संघास दान दिला आणि उपासिकांमध्ये व्यवस्थापिका होण्याचा बहुमान तिला लाभला.

Previous page                                    Next Page


 The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!