Part II—His Enemies
His Enemies PDF in English
षष्ट खंड: भगवान बुद्ध आणि त्यांचे समकालीन
भाग दुसरा: भगवान बुद्धाचे विरोधक
His Enemies
१. मोहाकर्षणाने धम्मदीक्षा देण्याचा आरोप
१. एकदा वैशालीच्या महावनातील कूटागारामध्ये भगवान बुद्ध वास्तव्यास होते. भद्दीय लिच्छवी तथागतांकडे त्या वेळी आला आणि म्हणाला, “ भगवान, लोक म्हणतात की, श्रमण गौतम हा जादूगार आहे आणि दुसर्या धर्माच्या लोकांना भुलविण्याचा जादूटोणा त्याला अवगत आहे.”
२. “ जे असे म्हणतात ते तथागताबद्दल विपर्यस्त प्रचार करण्यास हेतू अमान्य करतात. आम्ही लिच्छवीचे लोक ह्या आरोपावर पाव विश्वास ठेवत नाही; पण तथागतांना ह्याबाबत काय म्हणायचे आहे ते ऐकण्याची आमची इच्छा आहे.”
३. तथागत म्हणाले: ‘ भद्दीय, अफवा, परंपरा किंवा लोकप्रवाद ह्यांवर विसंबून राहु नये. एखादी गौष्ट धर्मग्रंथात सांगितली आहे म्हणून ती मान्य करू नका. अमूक एक गोष्ट तर्कसिद्ध किंवा अनुमानावर आधारित किंवा बाह्य स्वरूपाने प्रतीत किंवा स्वमतानुकूल वाटली ला तर तेवढ्यानेच ती स्वीकारू नका. तुम्हाला ती न्याय वाटते. , म्हणून ती मान्य करू नका. श्रमणाच्या मताचा आदर केला पाहिजे ह्या भावनेने भारून जाऊनही एखादी गोष्ट स्वीकारू नका.
४. “ पण भद्दीय, अमूक एक कृत्य पापकर्म आहे असे सर्व घटना स्वत: निरीक्षून तुम्हाला आढळेल किंवा अनुभवी विद्वानांनी ते गर्ह्म आहे असे सांगितले आणि त्यामुळे हानी किंवा अन्याय होण्याचा संभव आहे असे आढळले, तर त्याचा तुम्ही त्याग करा.
५. “ आता तुझ्या प्रश्नाबद्दल बोलायचे म्हणजे, भद्दीय, जे मजवर जादूटोणा करून धर्मपरिवर्तन करण्याचा आरोप करतात ते स्वत: महत्वाकांक्षी लोक नाहीत काय?” भहीय बोलला, “ होय, भगवान, ते महत्वाकांक्षी आहेत.”
६. “मग भद्दीय, लोभाने जिंकले गेलेले महत्वाकांक्षी लोक आपली महत्वाकांक्षा साध्य करण्यासाठी खोटे बोलण्यास किंवा पाप करण्यास कधी कचरतील काय?” “ नाही भगवान. ते कचरणार नाहीत.” भद्दीय बोलला.
७. “ आणि भद्दीय, जेव्हा कुविचार आणि सूडभावना अरा माणसांच्या मनात उत्पन्न होते तेव्हा. त्यांच्या महत्वाकांक्षेच्या आड येणार्यावर आरोप करण्यास ते दुसर्यांना चिथावणी देणार नाहीत काय?” “ होय, भगवान, देतील.” भद्दीय बोलला.
८. “भद्दीय, माझ्या शिष्याला मी फक्त असा उपदेश करतो: ‘प्रिय शिष्य, लोभयुक्त विचारांचे नियमन करून तू राहात जा. असे केल्याने कोणतेही लोभमूलक कार्य मन, वचन, किवा कृत्य ह्यांद्रारे तुझ्याकडून घडणार नाही. द्वेष आणि अज्ञान ह्यांवर नियंत्रण ठेवून तू वाग.!
९. “भद्दीय, जे श्रमण-ब्राम्हण माझी निदा करतात की, “श्रमण गौतम जादूगार आहे आणि त्याला जादूटोणा अवगत आहे, ज्यामुळे परधर्मातील लोकांना तो भूलवतो’ ते लबाड व खोटे बोलणारे आहेत.”
१०. “भगवान, आपली ही जादू मोठी अजब गोष्ट आहे. ह्या आपल्या जादूटोण्याने माझ्या प्रिय नातेवाइकांना भूल पडली असती तर किती बरे झाले असते ! खात्रीने त्यामुळे त्यांना हित आणि सुख प्राप्त झाले असते. भगवान जर सर्व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आपल्या ह्या जादूटोण्याने मोहून जातील तर दीर्घकालपर्यंत त्याना हित आणि सुख नक्की प्राप्त होईल.”
११. “खरे आहे. भहीय, खरे आहे. ह्या जादूटोण्याने जिंकलेल्या सर्व लोकांनी पापकर्माचा त्याग केला तर ते जगाच्या हिताचे आणि सुखाचे ठरणार आहे.”
२. परोपजीवी असल्याचा आरोप
१. भगवान बुद्ध हे परोपजीवी असल्याचा आरोप केला जात असे. ते कष्ट करून स्वतःची उपजीविका न करता दुसऱ्या वर आपल्या जीवनाचा भार टाकतात असे म्हणण्यात येत असे. आरोप आणि तथागतांचे त्यावर उत्तर खालीलप्रमाणे आहे.
२. एकदा भगवान बुद्ध मगध देशातील दक्षिणगिरी प्रांतातील एकनाला नामक ब्राम्हणाच्या गावात राहात होते. त्या वेळी कृषिभारद्वाजाचे पाचशे नांगर शेतीसाठी जोडले जात होते.
३. पहाटे लवकर चीवर घालून आणि भिक्षापात्र घेऊन ज्या ठिकाणी ब्राम्हण काम करीत होता त्या ठिकाणी तथागत गेले. त्या वेळी तिथे भोजनही आणण्यात आले होते. तथागत एका बाजूला उभे राहिले.
४. ते भिक्षेसाठी उभे राहिले आहेत असे पाहून ब्राम्हण म्हणाला, “श्रमण, मी नांगरतो, बी पेरतो आणि मगच मी खातो. तुम्ही सुद्धा प्रथम नांगरले पाहिजे, बी पेरले पाहिजे आणि मग खाल्ले पाहिजे.”
५. “ब्राम्हणा, मीही खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो.”
६. “श्रमण गौतमाचा नांगर, जू, फाळ, पराणी किंवा बेलजोडी कधी मी पाहिली नाही. तरीही आपण म्हणता की, मी खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो.
७. “ तुम्ही कुषीवल असल्याच दाव करता; पण तुम्ही कसलेली जमीन तर कुठे दिसत नाही. तुम्ही कशी शेती करता ते मला ऐकायचे आहे.”
८. “ श्रद्धा हे माझे बीज, तपस्व ही वर्षा, प्रज्ञा हे जू आणि नांगर, पापभीरुता हा दण्ड, विचार ही जू बांधण्याची दोरी आणि दक्षता हा नांगर फाळ आणि पराणी.” तथागतांनी उत्तर दिले.
९. « वचन आणि कर्म ह्यांमध्ये दक्षता व भोजनात संयम ठेवून, निरुपयोगी गवतापासून मी शेतीला जपतो आणि अन्तिम आनंदाचे पीक उगवेपर्यंत मी सतत खपत असतो. प्रयत्न हा माझा पुष्ट बैल आहे जो खडबडीत जमिनीला कचरत नाही आणि सरळ शान्तीच्या मार्गाने जिथे दु:खाचा लवलेशही नसतो त्या अंतिम स्थानी मला तो घेऊन जातो.”
१०. हे ऐकल्यावर ब्राम्हणाने काश्याच्या पात्रात खीर घालून ती भगवान बुद्धांना अर्पण केली आणि तो बोलला, “ श्रमण गौतम, हिचा स्वीकार करा. खरोखरच आपणच कृषीवल आहात, आपण अमृताचे पीक काढता.”
११. तथागत त्यावर बोलले, “ पुरोहितासारखी मी दक्षिणा घेत नाही. सिद्ध पुरुष अशा वृत्तीचे समर्थन करीत नाहीत. तथागतांना तर ती सर्वस्वी निषिद्ध आहे. जोपर्यंत धर्म विद्यमान आहे तोपर्यंत ही प्रथा टिकलीच पाहिजे. एखाद्या पवित्र, शांत प्रवीण, सत्प्रवृत्त श्रमण ब्राम्हणास ते दे, त्याने तुला पुण्यलाभ होईल.”
१२. तथागतांचे हे शब्द ऐकून तो ब्राम्हण त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्या चरणी मस्तक ठेवून बोलला, “ श्रमण एकून गौतम, अद्भत; खरोखरच हे अद्भत आहे ! जसा एखादा माणूस एखादी पडलेली वस्तु पुन्हा उभी करतो किंवा एखादे गुह्य प्रकट करतो किंवा एखाद्या अध:पतित पुरूषाला उपदेश करतो किंवा एखादी गुह्य गोष्ट सागतो किंवा एखाद्या पथभ्रष्ट माणसाला योग्य मार्गदर्शन करतो किंवा डोळस माणसाला सभोवतालचे जग दिसावे म्हणून अंधारात दीप पेटवून आणतो, तसेच तथागतांनी नाना प्रकारांनी आपला धर्म स्पष्ट करून सांगितला.”
१३. “ बुद्ध, धम्म आणि संघ ह्यांचा आश्रय मी स्वीकारतो. तथागतांनी मला प्रत्रज्या आणि उपसम्पदा देण्याचा अनुग्रह करावा.” अशा प्रकारे कृषीवल भारद्वाजाने प्रत्रज्या व उपसम्पदा ग्रहण केली.
३. सुखी संसार उध्वस्त केल्याचा आरोप
१. मगध देशातील पुष्कळ थोर तरुण सरदारपुत्र तथागतांचे शिष्य झालेले पाहून लोक रागावले आणि चिडले. ते बोलू लागले, “ श्रमण-गौतम मातापित्यांना नि:संतान बनवीत आहेत; श्रमण गौतम विवाहित स्त्रियांना विधवा बनवीत आहेत. श्रमण गौतम कुटुंबांचा नाश करीत आहेत.”
२. “त्यांनी एक सहस्त्र जटिलांना दिक्षा दिली. संजयाच्या अडीचशे अनुयायांना त्यांनी दीक्षा दिली. मगध देशातील पुष्कळ थोर तरुण कुलवंत श्रमण गौतमांच्या नादी लागून पवित्र जीवन व्यतीत करीत आहेत. आता पुढे काय होईल ते सांगता येणार नाही !”
३. आणि जेव्हा त्यांच्या दृष्टीस भिक्खू पडतात तेव्हा ते त्यांना असे चिडवतात, “महाश्रमण मगधदेशी राजगृहात संजयाच्या सर्व अनुयायांसह आले आहेत. आता आणखी कोणाच्या वाटेला ते जाणार?”
४. भिक्खूच्या कानी हे आरोप पडले आणि त्यांनी ते तथागतांना निवेदित केले.
५. तथागत म्हणाले, “हा गदारोळ फार दिवस टिकणार नाही; फक्त एक सप्ताहच तो टिकेल सप्ताहानंतर सर्व काही शांत होईल.
६. “आणि जर ते तुम्हाला चिडवू लागले तर त्यांना सांगा की, जे महावीर आहेत, जे तथागत आहेत ते सद्धर्माच्या मार्गाने जातात. जर विद्वान पुरुष लोकांना सन्मार्गाने नेऊ लागले तर त्यात तक्रार करण्यासारखे काय आहे ? माझ्या धम्मात कसल्याच जबरदस्तीला स्थान नाही. वाटल्यास कुणी गृहत्याग करावा किंवा गृहस्थ राहून परिव्रज्या घ्यावी.”
७. भिक्खुंनी जेव्हा टीकाकारांना तथागतांचे हे शब्द सांगितले तेव्हा त्यांना समजून चुकले की, शाक्यपुत्र श्रमण लोकांना सन्मार्गानेच नेत आहे, कुमार्गाने नव्हे. आणि मग त्यांनी तथागतांना दोष देण्याचे थांबविले.
४. जैन तीर्थक आणि प्राणघाताचा आरोप
१. तीर्थकांना वाटू लागले की, श्रमण गौतमाच्या प्रभावामुळे लोक आता आपणास आदर दर्शवीत नाहीत. एवढेच नव्हे तर आपल्या अस्तित्वाची देखील त्यांना जाणीव दिसत नाही.
२. तीर्थकांनी विचार केला, ‘त्याचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी काही तरी उपाय केला पाहिजे; कुणाचे तरी साहाय्य घेतले पाहिजे. सुंदरीच्या मदतीने हे काम यशस्वी होऊ शकेल.’
३. ते सुंदरीकडे गेले आणि तिला म्हणाले, “भगिनी, तू अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहेस. श्रमण गौतमाबद्दल जर तू कुवार्ता प्रसूत केलीस तर लोक तिच्यावर विश्वास ठेवतील आणि त्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होईल.”
४. दररोज सायंकाळी जेव्हा जेतवनाहून शहराकडे लोक परत येत त्या वेळी हातात पुष्पमाला, कर्पूर आणि सुगंध घेऊन जेतवानकडे सुंदरी जात असे. परतणारे लोक विचारत, “सुंदरी, कुठे जातेस?” त्यावर ती उत्तर देत असे, “मी श्रमण गौतमांकडे त्यांच्या गन्धकुटीत राहण्यास चालले आहे.”
५. तीर्थकांच्या उद्यानात रात्र घालवून प्रात:काल होताच ती तिथून परतत असे. जे कोणी तिला विचारत की, रात्रभर तू कुठे होतीस ?’ त्यांना ती सांगत असे, श्रमण गौतमांच्याकडे.”
६. काही दिवसांनंतर तीर्थकांनी मारेकरी बोलावून त्यांना सांगितले, “ सुंदरीला ठार मार आणि गौतमांच्या गंधकुटीजवळच्या कचरपट्टीत तिचा देह फेकून द्या.” मारेकऱ्यानी त्याप्रमाणे केले.
७. त्यानंतर तीर्थकांनी सरकारी न्यायाधिका ऱ्याकडे तक्रार केली की, सुंदरी जेतवनात जात असे आणि आता ती कुठे दिसत नाही.
८. सरकारी अधिकार्यांच्या मदतीने शोध करताना कचरपट्टीत तिचा देह त्यांना आढळला.
९. आपल्य गुरूची अब्रू वाचविण्यासाठी सुंदरीची हत्या केल्याचा आरोप तीर्थकानी तथागतांच्या शिष्यांवर केला.
१०, सुंदरीची चा ह्त्या केल्याबद्दल ल मिळालेल्य धनाची वाटणी णा मारेकरी करां दारूच्य गुत्त्यात करीत असताना आपापसात भांडू लागले.
११. सरकारी अधिकार्यांनी त्यांना ताबडतोब पकडले आणि त्यांनी गुन्ह कबूल केला. ज्यांच्या प्रेरणेने ही हत्या करण्यास ते प्रवृत्त झाले त्या तीर्थकांचाही त्यांनी उल्लेख केला.
१२. अशा प्रकारे तीर्थकांचा उरलासुरला प्रभावही त्यांनी गमावला.
५. जैन तीर्थक आणि अनैतिकतेचा आरोप
१. सूर्योदयाबरोबर जसे काजवे लुप्त होतात तशी तीर्थकांची दशा झाली. लोक त्यांना आदर किंवा उपहार देईनात.
२. राजरस्त्यावर उभे राहून ते बोलू लागले, “ जर श्रमण गौतम बुद्ध असतील तर आम्हीही आहोत. जर श्रमण गौतमांना दान देऊन पुण्य मिळत असेल तर आम्हालाही दान केल्याने पुण्य प्राप्त होईल. ह्यांस्तव आम्हांस दान द्या.”
३. लोकांनी त्यांच्या ह्या बडबडीकडे दुर्लक्ष केले. तेव्हा श्रमण गौतमांच्या चारित्र्याबद्दल कंडी पसरवून संघाला बदनाम करण्याचा त्यांनी गुप्त कट रचला.
४. त्या वेळी श्रावस्तीमध्ये चिंचा नावाची एक ब्राम्हणी योगिनी राहात असे. तिचा देह आणि रूप आकर्षक हाते. आपल्या अंगविक्षेपांनी ती वासनोत्तेजक प्रभाव निर्माण करू शके.
५. तीर्थकांपैकी एक कुटिल तीर्थकाने सुचवले की, चिंचाच्या सहाय्याने गौतमाबद्दल कंडी उठवून त्याला बदनाम करणे सुलभ होईल. बाकीच्या तीर्थकांनी ह्या सूचनेस सम्मती दर्शवली.
६. एके दिवशी चिंचा तीर्थकांच्या उद्यानात आली आणि अभिवादन करुन ती त्यांच्याजवळ बसली; पण कुणीही तिच्याशी बोलले नाही.
७. ह्यामुळे चकित होऊन ती बोलली, “मी काय अपराध केला आहे? तीनदा मी आपणास अभिवादन केले; पण आपण शब्दही बोलत नाही.”
८. तीर्थक बोलले, “भगिनी! तुला माहीत नाही काय की, आपल्या लोकप्रियतेमुळे श्रमण गौतम आम्हाला बाधक झाला आहे.” “ नाही, मला माहीत नाही! पण ह्याबाबत मी काही करू शकेन काय?”
९. “भगिनी, जर तुला आमचे भले करायचे असेल तर तू स्वत: गौतमाबद्दल काही कंड्या उठव. जेणेकरून त्याची लोकप्रियता नष्ट होईल.” “ठीक आहे; ह्या बाबतीत आपण नि:शंक राहा आणि सर्व मजवर सोपवा.” असे म्हणून ती तिथून निघून गेली.
१०. स्त्री-सुलभ आकर्षणकलेत आणि नैसर्गिक सौंदर्यविशेषात चिंचा कुशल होती. श्रावस्तीचे नागरिक जेतवनाहून प्रवचन ऐकून परत येत. त्या वेळी रक्त-वस्त्र परिधान करून, सुगंध लेवून हातांत पुष्पमाला घेऊन चिंचा जेतवनाकडे जाण्यास निघे.
११. जर कुणी तिला विचारले, “तू कुठे निघालीस?” तर त्यावर ती उत्तर देई, “तुम्हाला काय करायचे !” जेतवनाजवळील तीर्थिकारामात रात्र घालवून ती प्रात:काळी शहराकडे परत येई. त्या वेळी भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी नागरिक जेतवनाकडे जात असत.
१२. जर कुणी तिला विचारले, “तू रात्र कुठे व्यतीत केलीस ?” तर ती उत्तर देई, “तुम्हाला काय करायचे ? मी जेतवनात श्रमण गौतमांच्या गन्धकुटीत त्यांच्याबरोबर रात्र घालवली !” काही लोकांच्या मनात ह्या तिच्या उत्तरामुळे संदेह निर्माण होई.
१३. चार महिन्यांनंतर आपल्या पोटावर जुनी चिरगुटे गुंडाळून त्याचा आकार वाढवून तिने सांगायास सुरुवात केली की, श्रमण गौतमापासून आपल्याला गर्भप्राप्ती झाली आहे. काही लोकांनी तिच्या ह्या शब्दांवर विश्वास ठेवला.
१४. नवव्या महिन्यात तिने एक लाकडाची फळी आपल्या पोटावर बांधली आणि कीटकदंशांनी हात सुजवून घेऊन ज्या स्थानी भगवान बुद्ध, भिक्खू व गृहस्थांसमोर प्रवचन करीत होते तिथे जाऊन ती म्हणाली, “हे महान् उपदेशक ! आपण पुष्कळ लोकांना धर्मोपदेश करता. आपली वाणी मधुर आहे आणि आपले ओठ फार नाजूक आहेत. आपल्याशी संबंध येऊन मी गर्भवती झाले आहे आणि माझा प्रसूतीसमय समीप आला आहे.
१५. “आपण माझ्या प्रसूतीची काहीच व्यवस्था केलेली नाही. तसेच अडीअडचणीसाठी औषधपाण्याचीही काहीच सोय केलेली दिसत नाही. जर स्वतः तुम्हाला ही व्यवस्था करणे शक्य नसेल तर आपल्या शिष्यांपैकी-कोशल देशाचा राजा, अनाथ- पिण्डिक किंवा विशाखा अशा कोणाला तरी ती करण्यास का सांगत नाही?
१६. “ कुमारिकांना वश कसे करावे हे आपणास माहीत आहे; पण त्यापायी होणाऱ्या अर्भकाचा परिपाल कसा करावा हे मात्र आपणास माहीत नाही.” उपस्थित श्रोतृवर्ग तटस्थ झाला होता.
१७. आपले प्रवचन अर्धवट सोडून अत्यंत संयमाने गंभीर स्वरात भगवान बुद्ध बोलले, “हे भगिनी, तू जे काही आता सांगितलेस त्याची सत्यासत्यता फक्त आपणा दोघासच माहीत आहे.”
१८. चिंचा जोरजोराने खोकत म्हणाली, “ होय, गुरुवर्य, असली गोष्ट फक्त आपणा उभयतासच माहीत असणे संभाव्य आहे.”
१९, तिच्या खोकल्यामुळे पोटावर बांधलेल्या फळीच्या दोराची गाठ सैल होऊन ती फळी सरकून तिच्या पायाशी पडली. चिंच ह्यामुळे अस्वस्थ झाली.
२०. लोकांनी तिला काठ्यांनी आणि दगडांनी मारुन तिथून हाकलून दिले.
६. देवदत्त, चुलत भाऊ आणि शत्रू
१. देवदत्त हा भगवान बुद्धांचा चुलत भाऊ होता; पण प्रथमपासूनच तो भगवान बुद्धांचा द्रेष करीत असे आणि त्याला त्यांच्याबद्दल तीव्र घृणा वाटत असे.
२. भगवान बुद्धांनी गृहत्याग केल्यानंतर यशोधरेशी लगट करण्याचा त्याने प्रयत्न केला.
३. एकदा यशोधरा झोपण्याच्या तयारीत असता दरवाजावरच्या सेवकांना चुकवून भिक्खूच्या वेषाने तिच्या शयनागारात त्याने प्रवेश केला. यशोधरेने विचारले, “ श्रमणा, तुला काय हवे आहे ? माझ्या स्वामीकडून माझ्यासाठी काही निरोप आणला आहेस काय?
४. “ तुझा स्वामी, त्याला काय तुझी पर्वा ! तूला ह्या सुखनिवासात निर्दयपणे एकटी टाकून तो निघून गेला.”
५. “ पण पुष्कळ लोकांच्या कल्याणासाठीच त्याने हे केले.” यशोधरेने उत्तर दिले.
६. “ते काहीही असो; पण त्याच्या निर्दयतेचा सूड तू आता घे.”
७. “ श्रमणा, गप्प बस. तुझी वाणी आणि विचार दुर्गंधीने भरलेले आहेत.”
८. “ यशोधरे ! तू मला ओळखले नाहीस ? मी तुझा प्रियकर देवदत्त !”
९. “ देवदत्त ! तू फसवा आणि दुष्ट आहेस हे मला माहीत होते. तू कधी श्रमण झालास तरी वाईटच होशील असे मला वाटत होते; पण तू इतका अधम वुत्तीचा असशील असा मात्र संशय आला नव्हता.”
१०. “यशोधरे, यशोधरे, माझे तुझ्यावर प्रेम आहे.” देवदत्ताने विनवणी केली. “आणि तुझा पती तुझा तिरस्कार करतो तो तुझ्याशी दुष्टपणे वागला आहे. माझ्यावर प्रेम कर आणि त्याच्या दुष्टतेचा सूड घे.”
११. यशोधरेच्या फिकट आणि कृश चेहर्यावर रक््तिम्याची छटा आली. तिच्या गालावर अश्रू ओघळू लागले.
१२. “देवदत्त, तूच माझ्याशी दुष्टपणाने वागत आहेस. तुझे प्रेम जरी निःसीम असते तरी तो माझा अपमान ठरला असता. ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ असे सांगतानाही तू खोटे बोलतो आहेस.
१३. “जेव्हा मी तरुण आणि सुंदर होते तेव्हा तू माझ्याकडे दुंकूनही पाहिले नाहीस. आता मी वयस्क शोकमग्न झाले आहे आणि अशा रात्रीच्या अनुचित समयी तू विश्वासघातकी आणि अपराधी प्रेमाची घोषणा करण्यास आला आहेस. तू दुष्ट-भ्याड पुरुष आहेस.”
१४. आणि ती ओरडली, “देवदत्त, चालता हो इथून.” आणि देवदत्त तिघून निघून गेला.
१५. आपल्याला संघप्रमुख न करता सारिपुत्त आणि मोग्गलायनांना ते स्थान दिले ह्याबद्दल देवदत्ताचा भगवान बुद्धांवर रोष होता. देवदत्ताने भगवान बुद्धांवर तीनदा प्राणघाताचे प्रयत्न केले; पण तो एकदाही यशस्वी झाला नाही.
१६. एकदा भगवान बुद्ध गृधकूट पर्वताच्या पायथ्याशी सावलीत येरझारा करीत होते.
१७. देवदत्त वर चढला आणि तथागताचे प्राणहरण करण्याच्या हेतूने त्याने एक मोठा दगड खाली लोटून दिला; पण तो एका खडकावर आदळला आणि तिथल्या तिथे गाडला गेला. फक्त त्याचा एक लहान तुकडा तथागतांच्या पायावर येऊन आदळला आणि त्यामुळे थोडे रक्त आले.
१८. त्याने दुसर्यांदा भगवान बुद्धाचे प्राणहरण करण्याचा प्रयत्न केला.
१९, ह्या वेळी देवदत्त राजकुमार अजातशत्रूकडे गेला आणि म्हणाला, “मला थोडे लोक दे.” आणि अजातएशत्रूने आपल्या लोकांना आज्ञा केली, “देवदत्त तुम्हाला सांगेल तसे करा.”
२०. मग देवदत्ताने एकास आज्ञा केली, “जा मित्रा; श्रमण गौतम अमुक जागी आहेत. त्यांची हत्या करा.” आणि तो मनुष्य परत आला आणि त्याला म्हणाला, “मी तथागतांचे प्राणहरण करण्यास असमर्थ आहे.”
२१. त्याने तथागतांचे प्राणहरण करण्याचा तिसरा प्रयत्न केला.
२२. ह्या समयी राजगृहात नलगिरी नावाचा एक क्रूर, नरघातक हत्ती होता.
२३. देवदत्त राजगृहातील हत्तीच्या तबेल्यात गेला आणि रक्षकांना म्हणाला, “मी राजाचा नातेवाईक आहे आणि मी कुठल्याही नीचपदस्थ व्यक्तीला उच्चपदी चढवू शकतो. मी त्याचा शिधा किंवा पगार वाढवू शकतो.”
२४. “तेव्हा, माझ्या मित्रांनो, जेव्हा श्रमण गौतम ह्या सडकेवर येतील तेव्हा नलगिरीला मुक्त करा आणि सडकेवर जाऊ द्या.”
२५. देवदत्ताने भगवान बुद्धांना मारण्यासाठी धनुर्धरांची नियुक्ती केली होती. त्याने पिसाळलेल्या नलगिरी हत्तीला त्यांच्या मार्गात सुटे सोडले होते.
२६. पण तो यशस्वी झाला नाही. जेव्हा हे प्रयत्न उघडकीस आले तेव्हा देवदत्ताला प्राप्त झालेल्या सर्व सार्वजनिक नेमणुका रद्द झाल्या आणि नंतर अजातशत्रूनेही त्याला भेटीगाठी नाकारल्या.
२७. उपजीविकेसाठी त्याला दारोदार भीक मागावी लागली. देवदत्ताला अजातशत्रूकडून पुष्कळ नजराणे प्राप्त झाले होते; पण ते फार टिकू शकले नाहीत. नलगिरी प्रकरणानंतर देवदत्ताचा प्रभाव संपूर्ण नष्ट झाला.
२८. आपल्या कृत्यामुळे अप्रिय झाल्यामुले देवदत्त मगधदेश सोडून कोशलदेशात गेला. राजा प्रसेनजित आपले स्वागत करील अशी त्याची अपेक्षा होती; पण प्रसेनजितने त्याला तुच्छतेने वागवून हाकलून दिले.
७. ब्राम्हण आणि भगवान बुद्ध
(१)
१. एकदा पुष्कळ भिक्खुंसमवेत तथागत कोशलदेशात परिभ्रमण करीत असता ते थून नामक ब्राम्हणग्रामात जाऊन पोहोचले.
२. थून गावातील ब्राम्हण गृहस्थांच्या कानांवर बातमी आली की, ‘श्रमण गौतम आपल्या गावातील शेतात येऊन पोहोचले आहेत.
३. हे ब्राम्हण गृहस्थ स्वभावाने लोभी, असत्य मताचे आणि अश्रद्ध होते.
४. ते म्हणाले, “जर श्रमण गौतम ह्या गावात प्रवेश करतील व दोन तीन दिवस वास्तव्य करतील तर सर्व ग्रामस्थ त्यांचे उपासक बनतील. मग ब्राम्हण धर्माला आधार राहणार नाही. ह्यासाठी त्यांचा ग्रामप्रवेशाला प्रतिबंध केला पाहिजे.”
५. गावात प्रवेश करण्यापूर्वी नदी ओलांडावी लागे. तथागताच्या ग्रामप्रवेशाला प्रतिबंध करण्यासाठी त्या ब्राम्हणांनी नदीतल्या सर्व होड्या किनार्यापासून काढून घेतल्या आणि पूल आणि बांध निरपयोगी करून टाकले.
६. त्यांनी एक सोडून इतर सर्व विहिरीत पालापाचोळा भरला आणि पाणवठे, आरामगृहे आणि पडव्या झाकून अदृश्य केल्या.
७. तथागतांना त्यांची ही दुष्कृत्ये समजली आणि त्यांची दया येऊन भिक्खू-वर्गासह त्यांनी नदी पार केली आणि मार्ग कापीत कापीत ते थून ब्राम्हणग्रामी येऊन पोहोचले.
८. तथागत सडक सोडून एका बाजूस झाडाखाली जाऊन बसले. त्या समयी पुष्कळ स्त्रिया पाणी घेऊन तथागतांच्या जवळून जात होत्या.
९, त्या गावाने निश्चय केला होता की, “श्रमण गौतम तिथे आले तरी त्यांचे आगतस्वागत करायचे नाही आणि जर ते एखाद्या घरी गेले तर त्यांना किंवा त्यांच्या शिष्यांना अन्न किंवा पाणी द्यायचे नाही.
१०. एका ब्राम्हणाची दासी पाण्याचा घडा घेऊन जात असता तिच्या नजरेस तथागत आणि भिक्खू पडले. ते थकलेले व तहानेलेले आहेत हे जाणून ती भाविक दासी त्यांना पाणी देणार होती.
११. ती मनाशी म्हणाली की, ‘जरी गावच्या लोकांनी श्रमण गौतमांचे स्वागत करू नये किंवा त्यांना काही देऊ नये असे ठरवले तरी ह्या पुण्यक्षेत्र व दानपात्र लोकांना पाहून त्यांना थोडे पाणी देऊन माझ्या मुक्तीचा पाया जर मी घातला नाही तर मी दु:खातून कशी बरे मुक्त होऊ शकेन?”
१२. “काय वाटेल ते होवो. ह्या गावचे सर्व लोक मला मारोत किंवा बांधून घालोत, ह्या पुण्यक्षेत्रांना मी पाणी दिल्यावाचून राहणार नाही.”
१३. दुसर्या स्त्रियांनी तिला थांबवण्याचा यत्न केला ; पण एकदा निश्चय केल्यावर जीवाची पर्वा न करता तिने आपल्या डोक्यावरचा घडा खाली ठेवला व ती तथागतांच्या जवळ गेली आणि तिने त्यांना पाणी दिले. त्यांनी आपले हातपाय धुतले व पाणी प्राशन केले.
१४. तथागतांना तिने पाणी दिल्याची हकीकत तिच्या ब्राम्हण धन्याला समजली. “तिने गावच्या ठरावाचा भंग केला आहे आणि लोक मला दोष देत आहेतः अशा विचाराने संतप्त होऊन दातओठ खाऊन तो तिच्या अंगावर धावला आणि खाली पाडून लाथाबुक्कयांनी त्याने तिला मारले. ह्या मारामुळे ती मरण पावली.
(२)
१. द्रोण नामक एक ब्राम्हण तथागतांजवळ गेला आणि त्याने त्यांना अभिवादन केले व कुणलसमाचारविचारून तो त्यांच्याजवळ बसला. असे बसल्यावर द्रोण तथागतांना म्हणाला :
२. “श्रमण गौतम ! मी असे ऐकले आहे की, तथागत वयोवृद्ध आदरणीय ब्राम्हणांना अभिवादन करीत नाहीत. त्यांना उत्थापन देत नाहीत किंवा आसनही देत नाहीत.
३. “श्रमण गौतम ! हे खरे आहे काय, की आपण असे करता ? तसे असेल तर ते बरे नव्हे.”
४. “श्रमण गौतम ! जर कुणाच्या बाबतीत खरे बोलताना जर म्हटले की ‘कुलशीलवान मातापित्यांपासून त्याचा जन्म झाला, पूर्वीच्या सात पिढ्यांपर्यंत त्याचे कुल पवित्र आणि निष्कलंक होते, त्याचा जन्म निर्दोष होता, अभ्यासू, वेद-मन्त्रज्ञ, अक्षर आणि प्रभेदासह तीन वेदांत तो पारंगत होता. तसेच शब्दशास्त्र, इतिहासपुराणे,काव्य आणि व्याकरणाचा तो ज्ञाता होता. महापुरुषलक्षणाच्या अभ्यासात कुशल व विश्वतत्वज्ञ असा तो होता.’ तर श्रमण गौतम ! माझ्या बाबतीत हे संपूर्णपणे यथातथ्य ठरेल. कारण माझा जन्म… माझे कुलशील इत्यादी हे असे आहे.”
५. “द्रोण ! जे प्राचीन मन्त्रनिर्माते, मन्त्रउद्वाते ब्राम्हणक्र्रषी होते, ज्यांना आपल्या मन्त्राची प्रत्येक ओळ, वाक्य व शब्द अक्षरश: ज्ञात होता–उदाहरणार्थ, अठ्ठक, वामक, वामदेव, विश्वामित्र, जमदग्नी, अंगीरस, भारद्वाज–त्यांनी असे म्हटले आहे की, ब्राम्हण पाच प्रकारचे असू शकतात. ब्रम्हसदृश, देवसदृश, बन्धनयुक्त, बन्धनभंजक व जातिश्रष्ट. द्रोणा, ह्या पाचांपैकी तू कोणत्या प्रकारचा ब्राम्हण आहेस ?
६. “श्रमण गौतम ! आम्हाला हे ब्राम्हणांचे पाच प्रकार माहीत नाहीत तरी पण आम्हाला माहीत आहे की, आम्ही ब्राम्हण आहोत. आपण आम्हाला धर्मोपदेश करावा म्हणजे मला हे पाच प्रकार समजतील.”
७. “ब्राम्हणा, तर लक्ष देऊन ऐक. मी सांगतो.”
८. “ठीक आहे.” तो बोलला आणि मग तथागत सांगू लागले-
९. “द्रोण ! ब्राम्हण ब्राम्हणसदृश केव्हा होतो ?
१०. “हे द्रोण, एखादा ब्राम्हण कुलशीलवान मातापित्यांपासून जन्म घेतो, सात पूर्व-पिढ्यांकडून त्याला पावित्र्याचा वारसा प्राप्त झालेला असतो, जन्माच्या दृष्टीने तो सर्वथा निर्दोष असतो. अठ्ठेचाळीस वर्षे ब्रम्हचर्याचे तो पालन करतो आणि आचार्यांनी शिक्षण दिल्याबद्दल अधर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार त्यांची दक्षिणा पूर्ण करण्याबद्दल तो झटतो.”
११. “आणि द्रोण ! धर्मानुसार म्हणजे काय ? तर शेतकरी, व्यापारी, गुराखी, धनुर्धर, राजसेवक, किंवा दुसराकोणताही व्यावसायिक न होता, भिक्षापात्राचा तिरस्कार न करिता फक्त भिक्षा मागून तो आपली उपजीविका करतो.”
१२. “तो आपली गुरुदक्षिणा देऊन टाकतो. शमश्रूशीर्षाचे मुंडन करतो, काषायवस्त्र परिधान करतो आणि गृहहीन जीवनासाठी गृहत्याग करतो.”
१३. “आणि असे केल्यावर एका, दुसर्या, तिसर्या, चौथ्या, ऊर्ध्व व अधर अशा सर्व दिशांत मैत्रीयुक्त, दूरगामी, व्यापक, तसेच असीमित वृत्तीने आणि घृणा किंवा कुविचाराविना तो संचार करीत राहतो.”
१४. “आणि असे केल्यावर तो करुणायुक्त वृत्तीने विहार करतो. मुदितायुक्त वृत्तीने विहार करतो. उपेक्षायुक्त वृत्तीने विहार करतो. एका, दुसर्या, तिसर्या,चौथ्या, ऊर्ध्व, अधर अशा सर्व दिशांत करुणा, मुदिता, उपेक्षापूर्ण विचारांनी सर्वत्र दूरगामी, व्यापक, असीमित आणि घृणा किंवा कुविचाराविना तो सर्वत्र संचार करीत राहतो.
१६. “अशा प्रकारे ह्या चार ब्रम्हविहारांत विहार करून, मृत्यूनंतर देहविच्छेद झाल्यानंतर तो हितकर ब्रम्हलोकात उदय पावतो. हे द्रोण! अशा प्रकारे ब्राम्हण ब्रम्हसदृश होतो.”
१७. “द्रोण ! ब्राम्हण देवसदृश कसा होतो?”
१८. “द्रोण ! अशाच प्रकारच्या सुजात आणि सुचरित ब्राम्हणाचे उदाहरण घेऊ. तो शेती, व्यापार इत्यादी मार्गांनी आपली उपजीविका न करता भिक्षा मागून जीवन व्यतीत करतो. तो आपली गुरुदक्षिणा चुकती करतो, आणि अधर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार पत्नीचा स्वीकार करतो.”
१९. “इथे धर्मानुसार म्हणजे तरी काय ? तर क्रयविक्रयाने प्राप्त न करता जिच्या हातावर विधियुक्त उदकघातले गेले आहे अशाच ब्राम्हणीचा तो स्वीकार करतो. ब्राम्हणीकडेच जातो, अन्त्यज, व्याध, वेळू-कारागीर, रथकार किंवा आदिवासी ह्यांच्या कन्यकांकडे नव्हे. किंवा सन्तानवती, स्तनपानक्षम किंवा क्रवतू प्राप्त न झालेल्या कन्यकांकडेही नव्हे.”
२०. “द्रोण ! तो गर्भवती कन्येकडे का जात नाही? तर तसे केल्यास होणारी संतती कलंकित ठरेल. तो स्तनपानक्षम कन्येकडे का जात नाही? तर त्यामुळे संततीचे स्तनपान अपवित्र होईल.”
२१. “आणि जी क्रतुरात नाही त्या कन्येकडे तो का जात नाही ? हे द्रोण जर तो अशा कन्येकडे गेला तर कामतृप्ती, क्रीडा अथवा सौख्य ह्यांचे निधान न होता केवळ सन्तानोत्पत्तीचे साधन एवढेच त्या ब्राम्हणीला महत्व उरेल.”
२२. “आणि वैवाहिक जीवनात त्याला संतानप्राप्ती झाली तर तो मुंडन करून घेतो आणि गृहत्याग करूनगृहहीन जीवन पत्करतो.”
२३. “आणि अशा प्रकारे गृहहीन झाल्यानंतर कामविकारापासून अलिप्त होऊन तो प्रथम, द्वितीय, तृतीय, ध्यान प्राप्त करीत चतुर्थ ध्यानाची साधना करीत सिद्ध होतो.”
२४. “आणि अशा रितीने चारही ध्यानांची धारणा केल्यानंतर मृत्यूनंतर देहविच्छेद झाल्यानंतर तो हितकर ब्रम्हलोकात उदय पावतो.”
२५. “हे द्रोण ! अशा प्रकारे ब्राम्हण देवसदृश होतो.”
२६. “आणि हे द्रोण, ब्राम्हण बन्धनयूक्त ब्राम्हण कसा होतो ?”
२७. “हे द्रोण, अशाच एका सुजात आणि सुचरित ब्राम्हणाचे उदाहरण घेऊ. तोही असाच विवाहित होतो.”
२८. “आणि वैवाहिक जीवनात संतानप्राप्ती झाल्यानंतर तो संतानप्रेमाने भारून जाऊन संसारातच मग्न होतो.गृहजीवनाशी निगडित होऊन राहतो, गृहहीन जीवनात प्रवेश करण्याचा विचारहां त्याला शिवत नाही.
२९. “आपल्या परंपरागत बन्धनात तो जीवन व्यतीत करतो. यांचे उल्लंघन करीत नाही. त्याच्या बाबतीत असे म्हणता येईल, “तो बन्धनांचा मर्यादेतच जीवन व्यतीत करतो, सीमोल्लंघन करण्याचा कधी प्रयत्न करीत नाही आणि म्हणूनच ह्या ब्राम्हणाला ‘बन्धनयुक्त ब्राम्हण म्हणतात.”
३०. “द्रोण, अशा प्रकारे ब्राम्हण बन्धनयुक्त होतो.”
३१. “आणि हे द्रोण! ब्राम्हण ‘बन्धनभंजक’ कसा होतो?”
३२. “हे द्रोण, अशाच एका सुजात आणि सुचरित ब्राम्हणाचे उदाहरण घेऊ. तो गुरुदक्षिणा चुकती करतो आणि धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करण्याचे ण्याच योजतो. क्रयविक्रयाने प्राप्त झालेली, अथवा ब्राम्हणी, अथवा जिच्या हातावर विधियुक्त उदक सोडले गेले आहे अशी.”
३३. “तो एखाद्या ब्राम्हणीकडे जातो, किंवा क्षत्रिय, अन्त्यज, भूदासी कन्येकडे किंवा जातिभ्रष्ट, व्याध, वेळूकारागीर, रथकार, आदिवासी ह्यांच्या कन्यांकडे, किंवा सन्तानवती, स्तनपानक्षम, क्र्तुमती, अप्राप्तक्रतू अशा स्त्रियांकडे जातो. कामतृप्ती, क्रीडा, सौख्य आणि सन्तानोत्पत्तीचे साधन ह्या दृष्टीनेच केवळ त्याला ब्राम्हणीचे महत्व वाटत असते.”
३४. “तो परंपरागत बन्धनांचे पालन करत नाही. तो त्यांचे उल्लंघन करतो आणि असे म्हटले जाते, ‘तो बन्धनांचे पालन करीत नाही तर बन्धनांचे उल्लंघन करतो’ आणि म्हणूनच त्याला ‘बन्धनभंजक’ ब्राम्हण म्हणतात.”
३५. “अशा प्रकारे, द्रोण ! ब्राम्हणाला ‘बन्धनभंजक’ म्हणतात.”
३६. “आणि द्रोण, ब्राम्हण ‘जातिभ्रष्ट ब्राम्हण’ कसा होतो?”
३७. “हे द्रोण, अशाच एका सुजात ब्राम्हणाचे उदाहरण घेऊ. तो अठ्ठेचाळीस वर्षेपर्यंत ब्रम्हचर्यपालन करून वेदमंत्रांचा अभ्यास करतो. शिक्षणक्रम पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणेच्या परिपूर्तीसाठी ( धर्मानुसार किंवा अधर्मानुसार उपजीविका करीत ) तो कृषिबल, व्यापारी, गुराखी, धनुर्धर, राजसेवक किंवा इतर व्यवसाय पत्करतो; किंवा भिक्षापात्राचा तिरस्कार न करता भिक्षा मागूनच तो उपजीविका करतो.”
३८. “गुरुदक्षिणा चुकती केल्यावर तो धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करतो. क्रयविक्रयातून प्राप्त झालेली, किंवा जिच्या हातावर विधियुक्त उदक सोडलेले आहे अशी एखादी ब्राम्हणी किंवा दुसरी एखादी स्त्री. सन्तानवती, स्तन-पानक्षम इत्यादी. कामतृप्ती क्रीडा, किंवा सन्तानोत्पत्तीचे साधन म्हणूनच गणली गेलेली. अशा प्रकारे तो जीवन व्यतीत करतो.”
३९. “तेव्हा ब्राम्हण त्याच्याबद्दल बोलतात, ‘हा श्रेष्ठ ब्राम्हण आपले जीवन असे कसे बरे व्यतीत करतो?
४०. आणि त्यावर तो उत्तर देतो, ‘अग्नी स्वच्छ व घाणेरड्या वस्तू जाळून टाकतो; पण त्यामुळे तो स्वत: अशुद्ध होत नाही. तसेच ब्राम्हणाने अशा प्रकारे जीवन व्यतीत केले तरी त्यामुळे तो अपवित्र ठरत नाही.’
४१. “ आणि असे म्हणतात, तो ब्राम्हण अशा प्रकारे जीवन व्यतीत करतो आणि म्हणूनच त्याला ‘जातिभ्रष्ट ब्राम्हण’ असे म्हणतात.”
४२. “ हे द्रोण, अशा प्रकारे एखादा ब्राम्हण ‘जाति भ्रष्ट ब्राम्हण’ होत असतो.”
४३. “ द्रोण, प्राचीन मन्त्रनिर्माते, मन्त्रउग्दाते, ब्राम्हणक्रषी ज्यांना आपल्या मंत्राची प्रत्येक ओळ, वाक्य व शब्द अक्षरश: ज्ञात आहे त्यांनी असे म्हटले आहे की, ब्राम्हण पाच प्रकारचे असू शकतात. ब्रम्हसदृश, देवसदृश, बंधनयुक्त, बंधनभंजक आणि जातिभ्रष्ट.”
४४. “ द्रोण! ह्या पाचांपैकी तू कोणत्या प्रकारचा ब्राम्हण आहेस?”
४५. “ श्रमण गौतम ! जर असे ब्राम्हणांचे प्रकार खरोखर असतील तर निदान आम्ही ‘ जातिभ्रष्ट ब्राम्हण’ तरी नक्की नाही.
४६. “ पण श्रमण गौतम ! आपले निवेदन अद्गत आहे. आपण मला उपासक म्हणून स्वीकृत करण्याची कृपा करावी. येणेकरुन आपल्या आश्रयाचा अनुग्रह मला प्राप्त होईल.