His Humanity

His Humanity

Part II—His Humanity

His Humanity PDF in English

अष्टम खंड: बुद्धांचे व्यक्तिमत्व

भाग दुसरा: त्यांची मानवता 

His Humanity

Previous page                                    Next Page

 

१. त्यांची करुणा- महाकारुणिकता

१. एकदा तथागत श्रावस्तीमध्ये राहिले होते तेव्हा काही भिक्खुंनी त्यांच्याकडे येऊन तक्रार केली की, त्यांच्या ध्यानधारणेत ॥रणत काही हा देवगण वगण सतत उपद्रव देत असतात. 

२. ह्या त्याच्या च्या अडचणी चणां श्रवण करून तथागतांनी गगतांनी त्यांना खालीलप्रमाणे [लालप्रमाण सूचना दिल्या. 

३. “जो परमार्थविषयात कुशल आहे, जो शांतिपदाची आकांक्षा करीत आहे त्याने असे वागले पाहिजे: तो समर्थ, न्यायी, सुवच, तसेच मृदू आणि विनम्र असला पाहिजे.”

४. “तो संतुष्ट असला पाहिजे; त्याच्या गरजा अधिक असू नयेत. त्यांची कर्तव्ये कमी, त्याची जीवनवृत्ती साधी असावी. तो इंद्रियनिग्रही व विवेकी असला पाहिजे. उद्धट असता कामा नये. त्याला कुटुंबपरिवाराची आसक्ती असू नये.”

५. “सुज्ञजन नावे ठेवतील अशा क्षुल्लक गोष्टींचा नाद त्याने धरू नये. ‘सर्वांचे मंगल होवो, सर्वांचे कुशल होवो, सर्वांची हृदये निरामय होवोत’ अशी इच्छा त्याने धारण केली पाहिजे.” 

६. “कसेही प्राणिमात्र असोत-सबल किंवा दुर्बल, उंच, सुदृढ किंवा मध्यम, बुटके, मोठे किवा लहान.” 

७. “दृष्ट किवा अदृष्ट, दूरवर वास्तव्य करणारे किवा निकटवासी, जात किंवा अजात-सर्व प्राणिमात्र सुखी होवोत.”

८. “कोणी कुणास फसवू नये; कुठेही असणार्या कुणाचाही द्वेष करू नये; किंवा रागाने व वाईट भावनेने कुणाचेच अनिष्ट चिंतू नये.” 

९. “आपले प्राण पणाला लावून माता आपल्या एकमेव अपत्याला जशी जपते तशीच त्याने सर्व प्राणिमात्रांबद्दल भावना बाळगली पाहिजे.” 

१०. “त्याच्या असीम मित्रत्वाच्या भावना जगात सर्वत्र-वर, खाली, आसमंतात, अनिर्बंधपणे, द्रेषविरहित प्रसृत झाल्या पाहिजेत.” 

११. “तो उभा असो, बसलेला असो, चालता असो, निजलेला असो, जोपर्यंत तो जागा असेल तोपर्यंत त्याने असे जागरूक राहिले पाहिजे. हेच सर्वांनुमते उच्च जीवन आहे. 

१२. “मोहात न पडणारा, सद्वणी, ज्ञानी, इंद्रियसुखाबाबत अनासक्त असा तो असल्यामुळे त्याच्या नशिबी पुन्हा कधी गर्भवास येत नाही.” 

१३. सारांश, भगवान बुद्धांनी त्यांना उपदेश केला, “आपल्या शत्रुंवरही प्रेम करा.”  

 

२. दु:खितांचे दुःखहरण-दुःखांचा उपशमनकर्ता

(१ ): विशाखेचे सान्त्वन

१. विशाखा ही एक उपासिका होती. भिक्खुंना भिक्षा देणे हा तिचा प्रघात होता.

२. एके दिवशी तिच्याबरोबर रहात असलेली तिची नात सुदत्ता आजारी पडली आणि तिचे निधन झाले. 

३. विशाखेचा शोक अनावर झाला.

४. तिच्या अंत्यविधीनंतर विशाखा भगवान बुद्धांपाशी गेली आणि साश्रू नयनांनी एका बाजूस जाऊन बसली.

५. तथागतांनी विचारले, “विशाखे, दुःखी, शोकमग्न आणि अश्रुसिंचन करीत तू अशी बसलीस ह्याचे कारण काय?”

६. तिने आपल्या नातीच्या मृत्यूची वार्ता सांगितली व ती म्हणाली, “ती अत्यंत आज्ञाधारक मुलगी होती. तिच्या सारखी दुसरी सापडणे कठीण!”

७. “विशाखे ! श्रावस्तीमध्ये एकूण किती मुली असतील ?”

८. “भगवान ! लोक म्हणतात कित्येक कोटी आहेत !”

९.&ह्या सर्व तुझ्या नातीसारख्या असतील तर त्यांच्यावर तू प्रेम करणार नाहीस काय ?”

१०. “भगवान ! खात्रीने करीन.”

११. “आणि दर दिवशी श्रावस्तीमध्ये किती मुलींचे निधन होत असेल ?”

१२. “भगवान ! पुष्कळ.”

१३. “मग कुणासाठी तरी शोक केल्यावाचून तुझा एक क्षणही सुना जाणार नाही!”

१४. “भगवान ! खरे आहे.”

१५. “तर काय दिवसरात्र रडत तू तुझे जीवन कंठणार ?”

१६. “भगवान ! आपण ठीक सांगितलेत. समजले मला !”

१७. “तर मग आता शोक पुरे !”

 

(२ )- किसा-गौतमीचे सान्त्वन

१. किसा गौतमीचा विवाह श्रावस्तीच्या एका व्यापार्याच्या पुत्राशी झाला होता.

२. विवाहानंतर थोड्या कालाने तिला एक पुत्र झाला.

३. तो चालताफिरता होतो न होतो तोच त्याला सर्पदंश होऊन तो मृत्यू पावला.

४. आपला पुत्र मृत्यू पावला ह्यावर तिचा विश्वासच बसेना. कारण पूर्वी तिने कधी मृत्यू पाहिला नव्हता.

५. सर्पदंश जिथे झाला तिथे दिसत असलेला लहान लाल डाग हा पुत्राच्या मृत्युचे कारण असेल असे तिला वाटले नाही.

६. म्हणून आपल्या पुत्राचे कलेवर घेऊन विचित्र मन:स्थितीत ती घरोघर फिरत असताना पाहून लोकांना वाटले की, तिला वेड लागले असावे.

७. अखेरीस एका वृद्ध गृहस्थाने तिला सुचविले की, श्रावस्तीत राहात असलेल्या श्रमण गौतमांकडे तिने जावे. 

८. म्हणून ती तथागतांकडे आली आणि आपल्या मृत पुत्रासाठी काही औषध तिने मागतिले.

९. तथागतांनी तिची हकीकत आणि विलाप ऐकला.

१०. तथागतांनी तिला सांगितले, “तू नगरात जा आणि ज्या घरी एकही मृत्यू झालेला नाही त्या घरातून थोडी मोहरी घेऊन ये. तिने मी तुझा पुत्र जिवंत करीन.”

११. तिला वाटले ही फार सोपी गोष्ट आहे. आणि म्हणून मुलाचे कलेवर घेऊन नी नगरात गेली. 

१२. पण लवकरच तिचा भ्रम दूर झाला. कारण जिथे जिथे ती गेली त्या घरी कुणाचा ना कुणाचा तरी मृत्यू झालेला होता.

१३. एका गृहस्थाने तिला सांगितले, “जे जिवंत आहेत ते थोडे आणि जे निधन पावले ते अधिक आहेत.” 

१४. ती तथागतांकडे निराश होऊन रिकाम्या हाताने परत आली.

१५. तेव्हा तथागतांनी तिला विचारले की, मृत्यू हा सर्वेनच्या नशिबी असतोच हे तुला समजले की नाही ? तिच्याच बाबतीत ही दुर्देवी घटना घडली म्हणून तिने शोक का करावा?

१६. तिने मग आपल्या पुत्राचे अन्त्यविधी केले. ते करताना ती म्हणाली, “सर्व नश्वर आहे; हा सृष्टिनियम आहे.” 

 

३. रुग्णांबद्दल चिंता

(१)

१. एकदा एक भिक्खू अतिसाराने आजारी होता आणि आपल्या मलमूत्रातच पडून राहिला होता.

२. स्थविर आनन्दाबरोबर फिरत फिरत तथागत त्या भिक्खूच्या निवासस्थानी आले.

३. आपल्या मलमूत्रात लोळत पडलेल्या भिक्खूला तथागतांनी पाहिले. ते त्याच्यापाशी गेले व म्हणाले, “भिक्खु ! तुला काय होते आहे?” 

४. “भगवान ! मी अतिसाराने आजारी आहे.”

५. “तुझी सेवा करण्यास कोण आहे काय?”

६. “भगवान ! कोणी नाही.”

७. “भिक्खू ! तुझी कोणी दुसरे भिक्खू सेवा करीत नाहीत, असे का?”

८ .“भगवान ! मी कुणाच्या उपयोगी पडत नाही. म्हणून कुणी माझी पर्वा करीत नाहीत.”

९ .मग तथागत आनन्दाला म्हणाले, “आनन्द ! जा आणि पाणी घेऊन ये. ह्या भिक्खूला मी स्वच्छ करतो.”

१० .“होय महाशय !” आनन्द त्यांना म्हणाला. त्याने पाणी आणल्यावर तथागतांनी पाणी ओतले व आनंदाने त्या भिक्खूचा देह स्वच्छ केला. नंतर तथागतांनी त्याचे डोके व आनन्दाने पाय धरून त्याला उचलून बिछान्यावर ठेवला.

११. नंतर तथागतांनी त्या क्षणी सर्व भिक्खूगणांना पाचारण केले व ते म्हणाले :

१२. “अमुक एका निवासात कोणी भिक्खु आजारी आहे काय?”

१३. “होय, भगवान !”

१४. “तो कशामुळे आजारी आहे?

१५. “भगवान! त्या भिक्खूला अतिसार झाला आहे.”

१६. “भिक्खूवर्गहो, त्याची कुणी सेवा करीत आहे काय ?”

१७. “नाही, भगवान !”

१८. “का नाही ? त्याची सेवा का करत नाहीत?

१९. “तो भिक्खु कुणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून भिक्खु त्याची सेवा करीत नाहीत.”

२०. “भिक्खूहो, तुमची काळजी वाहण्यास तुमचे मातापिता नाहीत. तुम्ही जर परस्परांची सेवा केली नाहीत तर दुसरे कोण करणार ? भिक्खूहो, जो माझी सेवा करू इच्छितो त्याने रुग्णाची सेवा करावी.”

२१. “त्याला जर गुरू असेल तर तो जिवंत असेपर्यंत गुरूने त्याची काळजी वहावी आणि रुग्ण बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी. जर आचार्य अथवा सहनिवासी भिक्खु असेल, अथवा शिष्य सहवासी किंवा गुरुबंधू असेल तर त्याने त्याची काळजी घ्यावी आणि बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी. जर कुणी रुग्णाची सेवा करणार नसेल तर तो त्याचा गुन्हा समजला जावा.”

 

(२)

१. एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या महावनात कलन्दक निवासामध्ये राहात होते.

२. त्या वेळी स्थविर वक्कली रुग्ण, पीडित व व्याधिग्रस्त अशा स्थितीत एका कुंभाराच्या झोपडीत राहात होता.

३. स्थविर वक्कलीने आपल्या सेवकांना बोलाविले व तो म्हणाला, “मित्रहो, तथागतांकडे जा आणि माझ्या वतीने त्यांच्या चरणी वंदन करूत त्यांना सांगा, “भिक्खू वक्‍्कली रुग्ण, पीडित व व्याधिग्रस्त आहे व तो तथागतांच्या चरणी वंदन करीत आहे.’ आणि असेही सांगा, ‘वक्कलीवर दया करा आणि त्याला पाहण्यास या.”

४. भगवानांनी मौनानेच सम्मती दर्शवली. नंतर वस्त्रे लेवून भिक्षापात्र चीवरासह स्थविर वक्कलिला पाहण्यासाठी तथागत गेले.

५. स्थविर वक्कलीने तथागतांना येताना पाहून आपल्या बिछान्यावर तो सावरून बसला.

६. तेव्हा तथागत स्थविर वक्कलिला म्हणाले, “वक्कली, उठू नकोस. ह्या इथल्या आसनावर मी बसतो.” त्याप्रमाणे तिथे असलेल्या आसनावर तथागत बसले व ते स्थविर वक्कलीला म्हणाले, 

७. “वक्कली, मला दिसते आहे की तू सर्व सहन करीत आहेस. तू धीराने दिवस कंठीत आहेस. तुझी पीडा न वाढता कमी होत आहे ना? ती कमी होण्याची लक्षणे आहेत की वाढण्याची ?

८. “नाही, भगवान. मला आता सहन होत नाही. मला धीरही उरला नाही. तीव्र कळांनी मी हैराण झालो आहे. त्या कमी होत नाहीत. त्या कमी होण्याची लक्षणे दिसत नाहीत. उलट वाढण्याचीच दिसतात.”

९. “तुझ्या मनात काही संदेह आहे, वक्कली ? काही दुःख ?”

१०. “भगवान, माझ्या मनात काही संदेह किवा दुःख नाही !”

११. “वक्कली, तुझ्या शीलाबाबत काही दोषार्ह आहे काय ?”

१२. “भगवान, नाही. माझ्या शीलाबाबत लज्जा वाटण्यासारखे काही घडलेले नाही.” 

१३. “वक्कली, असे आहे तर तुला काही तरी दुःख होत असले पाहिजे. कसला तरी तुला पश्चात्ताप होत असला पाहिजे !”

१४. “भगवान ! आपले दर्शन व्हावे अशी फार दिवसांची इच्छा होती; पण त्यासाठी आपल्याकडे येण्याचे त्राण देहात नव्हते.”

१५. “वक्कली ! ह्या माझ्या घाणेरड्या देहात पाहण्यासारखे काय आहे ? जो धम्माला पाहतो तो मला पाहतो,वक्कलि ! जो मला पाहतो, तो धम्माला पाहतो. धम्माचे दर्शन करणार्याला मी दिसू शकतो आणि वक्‍्कली, माझे दर्शन करण्यात धम्माचेही दर्शन घडते.”

 

(३)

१. असे मला समजले की, एकदा भगवान बुद्ध भग्गी देशातील मृगवनात भेसुकला वाटिकेत मकर समाश्रयावर राहात होते. तेव्हा गृहपती नकुलपिता तथागतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला.

२. बसल्यानंतर नकुलपिता तथागतांना म्हणाला, “भगवान, मी एक जरा-जर्जर, वयोवृद्ध गृहस्थ आहे. माझे वय होत आले आहे. मी आजारी असून नेहमी कष्टी असतो आणि भगवान, मला क्वचितच आपले व संघाचे दर्शन घडते. भगवान, आपण सान्त्वनाचे व उत्तेजनाचे दोन शब्द जर मला सांगितलेत तर दीर्घकालपर्यंत ते मला हितकारक व सुखदायी होतील.”

३. “गृहपती, तुमचे शरीर जर्जर आणि पीडित झाले आहे हे खरे आहे. असा देह धारण करून वावरणार्याने क्षणभरही आरोग्याची अपेक्षा करणे मुर्खपणाचे आहे. गृहपती, ह्यासाठी तुम्ही आपल्या मनास अशी शिकवण दिली पाहिजे की, ‘माझा देह दुर्बल असला तरी माझे मन रोगट होणार नाही.’ गृहपती, असे तुम्ही मनाला शिकवले पाहिजे.”

४. गृहपती नकुलपिताने तथागतांचा हा उपदेश प्रसन्न मनाने श्रवण केला. आपल्या आसनावरून तो उठला आणि तथागतांना अभिवादन व प्रदक्षिणा करून तो निघुन गेला. 

 

(४)

१. एकदा तथागत शाक्‍यांच्या कपिलवस्तुमधील अंजिरोद्यानात राहात होते.

२. त्या वेलळी पुष्कळसे भिक्खू तथागतांसाठी चीवर तयार करण्यात दंग होते. त्यांना असे वाटत होते की, तीन मास पूर्ण होताच तयार झालेले चीवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील.

३. महानाम शाक्‍्याने असे ऐकले की, पुष्कळसे भिक्खू तथागतांसाठी चीवर तयार करण्यात गुंतले आहेत. त्यांना असे वाटते की, तीन मास पूर्ण होताच तयार झालेले चीवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील आणि म्हणून तो तथागतांकडे गेला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला, बसल्यावर तथागतांना महानाम शाक्य म्हणाला,

४. “मी असे ऐकले आहे की, बरेचसे भिक्खू तथागतांसाठी चीवर तयार करण्यास गुंतले आहेत त्यांना असे वाटते की, “तीन मास पूर्ण होताच तयार झालेले चीवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील.’ पण भगवान ! समजूतदार गृहस्थाने आपल्या रुग्णपीडित व दुःखी सहकार्यांचे कशा प्रकारे सान्त्वन करावे व त्याला प्रसन्न ठेवावे ह्याबाबत आपल्या मुखातून काहीच आम्ही ऐकलेले नाही.” 

५. “महानाम, समजूतदार गृहस्थाने आपल्या रुग्णपीडित व दु:खी सहकार्यांचे सान्त्वत करून त्याला प्रसन्न करण्यासाठी चार सुखदायक आश्वासनांचा अबलंब केला पाहिजे. बंधू ! धर्म आणि संघ ह्यांच्याठिकाणी श्रद्धा बाळग. तसेच मन निश्चल राखणार्या व धर्माला प्रिय असणार्या अखण्डित व अकलंकित शीलाबाबतही श्रद्धा राख.”

६. “महानाम, एका समजूतदार गृहस्थाने दुसर्या रुग्ण, पीडित व दुःखी गृहस्थाला ह्या प्रकारे उपदेश केल्यानंतर मग असे बोलावे.” 

७. “जर तो रुग्ण आपल्या मातापित्यांच्या दर्शनासाठी व्याकूळ झाला असेल तर त्याला म्हणावे, ‘हे सद्वहस्था, तू आपल्या मातापित्यांच्या दर्शनासाठी व्याकूळ अस किंवा नस, तुझे मरण समीप आहे. तू जर आपल्या मातापित्यांच्या लोभापासून मुक्‍त झालास तर ते बरे होईल.” 

८. “आणि जर तो रुग्ण त्यावर म्हणाला की, ‘मातापित्याच्या लोभाचा आता त्याग केला आहे.’ तर त्या दुसर्या गृहस्थाने म्हणावे, ‘पण अजून तुझा मुलाबाळांचा लोभ शिल्लक असेल. काही झाले तरी तू मरणार. मग हा मुलाबाळांचा लोभ सोडलास तर बरे होईल.”

९. “अशा तर्हेने मग इन्द्रियसुखाच्या पाच प्रकारांबाबत सांगावे. समज, जर तो रुग्ण म्हणाला की, ‘इन्द्रियसुखाची मला अभिलाषा आहे. तर दुसर्याने म्हणावे, ‘इन्द्रियसुखापेक्षा दिव्य लोकातील सुख अधिक श्रेष्ठ आणि सरस आहे; मानवी सुखाकडून तुझी दृष्टी दिव्य लोकाच्या सुखाकडे वळव.” 

१०. आणि जर तो रुग्ण म्हणाला, ‘माझी दृष्टी तशी स्थिर झाली आहे.’ तर दुसर्याने म्हणावे, ‘तुझे चित्त ब्रम्हलोकावर स्थिर कर.’ आणि जर तो म्हणाला, ‘तसे केले आहे.’ तर दुसर्याने म्हणावे, 

११. “प्रिय मित्रा, ब्रम्हलोकसुद्धा अनित्य, अस्थिर व ममत्वपूर्ण आहे म्हणून तुझे चित्त ब्रम्हलोकापलीकडे उच्च करून स्वत्वाची विरक्ती साधण्यावर केंद्रित कर.” 

१२. “आणि जर तो रुग्ण म्हणाला की, ‘तसे केले आहे’ तर महानाम, जीवनमुक्‍तीचा विचार करताना, स्वत्वाचात्याग करू पाहणारा हा सद्वहस्थ आणि आसवापासून ज्याने आपले चित्त विरक्‍त केले आहे तो श्रावक ह्यांत काहीच फरक नाही.” नं

 

४. असहिष्णुंच्या बाबतीत त्यांची उदारता

१. एकदा भगवान बुद्ध आलवक यक्षाच्या राज्यात आळवी नगरीत राहात होते. तेव्हा आलवक तथागतांकडे आला व म्हणाला, “श्रमण, चालता हो.”

२. “मित्रा, ठीक आहे.” असे म्हणून तथागत तिथून निघाले.

३. तेव्हा यक्ष बोलला. “श्रमण, आत ये.”

४. तथागत आत आले व म्हणाले, “मित्रा ठीक आहे.” 

५. पुन्हा यक्ष त्यांना म्हणाला, “श्रमण, चालता हो.

६. “मित्रा, ठीक आहे.” असे म्हणून तथागत बाहेर गेले.

७. पुन्हा यक्ष त्यांना म्हणाला, “श्रमण, आत ये.”

८. तथागत आत येता येता म्हणाले, “मित्रा ठीक आहे.”

९. पुन्हा तिसर्यांदा यक्ष म्हणाला, “श्रमण, चालता हो.

१०. तथागत जाता जाता म्हणाले, “मित्रा, ठीक आहे.”

११. “श्रमण आत ये.” पुन्हा यक्ष म्हणाला.

१२. तथागत आत येता येता म्हणाले, “मित्रा, ठीक आहे.”

१३. पुन्हा चौथ्यांदा यक्ष त्यांना म्हणाला, “श्रमण, चालता हो !”

१४. त्यावर तथागत म्हणाले, “मित्रा, मी मुळीच जाणार नाही. तुला काय वाटेल ते कर.”

१५. यक्ष रागावून म्हणाला, “श्रमण ! मी एक प्रश्‍न विचारतो. तू जर माझ्या प्रश्‍नाचे उत्तर दिले नाहीस तर तुला मी वेडा करीन किंवा तुझे हृदय फाडून टाकीन किंवा तुला पायाने उचलून नदीपलीकडे फेकून देईन.”

१६. “मित्रा, ह्या जगात मला वेडा करू शकेल किंवा माझे हृदय फाडू शकेल किंवा मला पायाने उचलून नदीपलीकड फेकू शकेल असा कुणी असेलसा दिसत नाही. तरी पण तुला काय प्रश्‍न विचारायचा असेल तो विचार !”

१७. तेव्हा आलवक यक्षाने तथागतांना पुढील प्रश्‍न विचारले-

१८. “ ह्या जगात मानवाचे सर्वोच्च धन कोणते ? कोणत्या सत्कर्माने सुख प्राप्त होते ? सर्वांत अत्यंत स्वादिष्ट चव कोणती ? कोणत्या प्रकारचे जीवन सर्वश्रेष्ठ आहे?”

१९. तथागतांनी उत्तर दिले, “श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे. धर्माचे यथार्थ आचरण केल्यास सुख प्राप्त होते. सत्याची चव ही सर्वांत अत्यंत स्वादिष्ट आहे. प्रज्ञापूर्ण जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे.”

२०. आलवकाने मग विचारले, “ मानवाला पूर ( पुनर्जन्म ) कसा ओलांडता येतो ? मानव ( भव ) सागर कसा ओलांडतो ? मानव दु:ख कसे जिंकू शकतो ?”

२१. तथागतांनी उत्तर दिले, “मानव श्रद्धेच्याद्वारे पूर पार करू शकतो. मानव दक्षतेने सागर ओलांडू शकतो. मानव प्रयत्नाने दु:खावर विजय मिळवू शकतो. मानव प्रज्ञेने शुद्ध होऊ शकतो.”

२२. आलवक यक्षाने विचारले, “मानवाला ज्ञान कसे प्राप्त होते ? मानवाला धन कसे प्राप्त होते ? मानवाला कीर्ती कशी लाभते ? मानवाला मित्रप्राप्ती कशी होते ? इहलोकातून परलोकात जाताना मानवाला पश्चात्ताप का होत नाही ?” 

२३. तथागतांनी उत्तर दिले, “निर्वाणाच्या प्राप्तीसाठी अर्हत तसेच धर्म ह्यावर श्रद्धा ठेवून आणि आज्ञापालन करून दक्ष व तत्पर मनुष्याला ज्ञान प्राप्त करता येते.”

२४. “जो उचित तेच करतो, जो दृढनिश्चयी असतो, तो जागृत असतो, त्यालाच धन प्राप्त होते. जो दान करतो त्यालाच मित्र प्राप्त होतात.”

२५. “ज्या श्रद्धावान उपासकाशी सत्य, सदाचार, सहनशीलता आणि औदार्य असते त्याला मृत्यूनंतर पश्चात्ताप होत नाही.”

२६. “इकडे ये ! दुसरे श्रमण ब्राम्हण इथे आहेत. त्यांनाही विचार की, सत्य, संयम, दानशीलता आणि सहनशीलता ह्यापेक्षा अधिक उच्च गुण आहेत काय ?”

२७. आलवक यक्ष म्हणाला, “आता दुसर्या श्रमण ब्राम्हणांना कशाला विचारायला हवे ? आज माझ्या भावी सुखाची मला जाणीव झाली.”

२८. “खरोखरच माझे भाग्य म्हणून तथागत आले. आज मला समजले की, कोणाला दान दिल्याने सर्वाधिक फल प्राप्त होते.”

२९ “आजपासून तथागत व त्यांचा धम्माला वदन करून एका गावाहून दुसर्या गावाला, एका नगराहून दुसर्या नगराला मी फिरत जाईन.” 

 

५. समता आणि समान व्यवहाराचे समथर्न

१. तथागतांनी भिक्खू संघासाठी जितके नियम तयार केले होते त्यांचा त्यांनी स्वखुशीने स्वीकार केला होता व ते आपणालाही बंधनकारक मानले होते. 

२. आपण संघाचे प्रमुख आहोत आणि आपल्यावरील असीम प्रेमाने आणि आदराने नियमपालनाबाबत आपणास सहज सवलती मिळू शकतील, अशी परिस्थिती असतानाही तथागतांनी काही खास सवलती किंवा नियम-विमुक्‍ती हक्काने उपभोगिल्या नाहीत.”

३. भिक्खू दिवसातून फक्त एकदाच अन्नाशन करतात हा भिक्खूवर्गासाठी केलेला नियम तथागतांनीही स्वीकृत केला आणि त्याचे पालनही केले. 

४. भिक्खूची काही खाजगी मालमत्ता असता कामा नये हा नियमही तथागतांनी स्वीकृत केला आणि त्याचे पालन केले.

५. भिक्खूपाशी फक्त तीनच चीवरे असली पाहिजेत हा नियमही सर्व भिक्खुंप्रमाणे तथागतांनी स्वीकृत केला व त्याचे पालनही केले. 

६. एकदा भगवान बुद्ध शाक्‍यदेशात कपिलवस्तुमधील वटवाटिकेत राहात होते. त्यावेळी तथागतांची मावशी प्रजापती गौतमी स्वत: हाताने कातलेली व विणलेली नवीन वस्त्र जोडी घेऊन आली व तिचा स्वीकार करण्याची तिने तथागतांना विनंती केली.

७. तथागतांनी तिला सांगितले, “प्रजापती ! ती संघाला अर्पण कर.” 

८. तिने दुसर्यांदा आणि तिसर्यांदा पुन्हा तशी विनंती केली आणि तिला तेच उत्तर मिळाले. 

९, नंतर आनन्दाने आग्रह केला. “भगवान ! गौतमीने आणलेल्या वस्त्रांचा आपण स्वीकार करावा. आपल्या मातेच्या निधनानंतर प्रजापती गौतमीनेच दाई आणि दत्तक माता होऊन आपली फार सेवा केली होती.” पण वस्त्र संघालाच अर्पण करण्यात यावी हा आपला आग्रह तथागतांनी सोडला नाही.

१०. प्रारंभी भिक्खूसंघाचा असा नियम होता की, भिक्खूंची वस्त्रे उकिरड्यावर पडलेल्या चिंध्यातूनच तयार करण्यात यावीत. धनिक लोकांना संघाचे सदस्य होण्यापासून परावृत्त करता येईल. म्हणून हा नियम केला होता.

११. एकदा जीविकाने नव्या कापडाचे तयार केलेले चीवर स्वीकारण्याचा तथागतांना आग्रह केला. जेव्हातथागतांनी त्या चीवराचा स्वीकार केला तेव्हा तथागतांनी मूळ नियमात तसा बदल केला आणि भिक्खुंनाही ती सवलत जाहीर केली.

Previous page                                    Next Page


 The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!