Part III—His Likes and Dislikes
His Likes and Dislikes PDF in English
अष्टम खंड: बुद्धांचे व्यक्तिमत्व
भाग तिसरा: त्यांची आवड-नावड
His Likes and Dislikes
१. त्यांना दारिद्र नापसंत होते
१. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये अनाथपिण्डिकाच्या जेतवनारामात राहात होते. त्या वेळी गृहपती अनाथपिण्डिक त्यांच्या दर्शनासाठी आला व तथागतांना अभिवादन करून एकीकडे बसला. नंतर त्याने तथागतांना विचारले की, ‘मानवाने धनार्जन का करावे?”
२. “तू विचारतोस म्हणून तुला मी सांगतो.”
३. “ज्याने मेहनतीने धन मिळवले आहे, ज्याने हातांनी कष्ट करून धन मिळवले आहे, ज्याने घाम गाळून धन मिळविले आहे; तसेच ज्याने न्याय मार्गाने धन कमावले माहे अशा एखाद्या आर्यश्रावकाचे घेऊ. त्या धनामुळे तो स्वत: सुखी व आनंदी होतो आणि ते सुख व आनंद तो टिकवू शकतो; तो आपल्या मातापितरांना सुखी व आनंदी करतो, आणि तसे राखतो; त्याप्रमाणेच आपली पत्नी, मुले, दास व कामगार ह्यांनाही. धन प्राप्त करण्याचा हा पहिला हेतू आहे.”
४. “अशा प्रकारे बंधन प्राप्त केल्यानंतर तो आपल्या स्त्रेह्यासोबत्यांना सुख आणि आनंद देतो. तसेच सुखी आणि आनंदी राखतो. हा दुसरा हेतू आहे.”
५. “अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर अग्नी व पाणी, राजा तसेच चोर, शत्रू आणि वारस ह्यांपासून होणारी हानी तो टाळू शकतो. तो आपली मालमत्ता सुरक्षित ठेवू शकतो. हा तिसरा हेतू.”
६. “अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो कुलयज्ञ, अतिथियज्ञ, पितृयज्ञ, राजयज्ञ व देवयज्ञ असे पंचयज्ञ करू शकतो हा धन प्राप्त करण्याचा चौथा हेतू.”
७. “अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो गृहपती उच्च्च हेतूचे, स्वर्गीय सुखाप्रत नेणारे, स्वर्गलोकाच्या दिशेस प्रवृत्त करणारे असे दान, अहंकार व आळस ह्यांपासून मुक्त असलेल्या सर्व गोष्टी धीराने व विनम्रतेने सहन करणार्या, स्वतंत्र, शांत व परीपूर्ण होण्याचा यत्न करणार्या सर्व श्रमणांना आणि संतजनांना देतो. हा धन प्राप्त करण्याचा पाचवा हेतू”
८. अनाथपिण्डिकाला समजले की, गरिबीचा गौरव करून तथागतांनी गरिबांचे सान्त्वन केले नाही किंवा मानवाने प्राप्त करावी अशी सुखी जीवनवृत्ती म्हणून गरिबीला श्रेष्ठत्वही दिले नाही
२. त्यांना संग्राहक वृत्ती नापसंत होती
१. भगवान बुद्ध एकदा कुरुदेशात कम्मासदम्म नगरीत राहात होते.
२. स्थविर आनन्द त्यांच्याकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला.
३. तसे बसल्यावर तो म्हणाला, “तथागतांनी शिकविलेला प्रतीत्य- समुत्पादाचा नियम अजब आहे. तो फार गहन आहे. तरी पण मला तो अगदी स्पष्ट समजला आहे.”
४. “आनन्द, असे म्हणू नकोस. असे म्हणू नकोस. हा प्रतीत्य-समुत्पादाचा नियम गहन आहे. हा नियम न समजल्यामुळे, त्याचे आकलन न झाल्यामुळे चालू पिढी गोंधळात, गडबडगुंड्यात सापडली आहे. तिला दु:खाचा मार्ग ओलांडून जाणे असाध्य झाले आहे.”
५. “मी सांगितले आहे की, तृष्णा ही लोभाचे कारण आहे. जिथे कोणत्याही प्रकारचा किंवा जातीचा लोभ कोणालाही कशासाठी नसतो तिथे लोभाचा संभव कसा असेल ?”
६. “भगवान, असणार नाही.”
७. “तृष्णेमुळे लोभाची ओढ लागते.”
८. “लोभाच्या मागे लागल्याने काम व लालसा उत्पन्न होतात.”
९. “काम व लालसेमुळे दृढता निर्माण होते.”
१०. “दृढतेमुळे स्वामित्वाची निर्मिती होते.”
११. “स्वामित्वामुळे लोभ आणि अधिक स्वामित्व निर्माण होते.”
१२. “स्वामित्वामुळे मालमत्तेवर पहारा ठेवणे आवश्यक होते.”
१३. “मालमत्तेवर पाहारा ठेवण्याच्या वृत्तीमुळे अनेक वाईट व दृष्ट प्रसंग निर्माण होतात, जसे मारामारी, जखम, संघर्ष, भांडण, निदा व असत्य.”
१४. “आनन्द, ही प्रतीत्य-समुत्पादाची साखळी आहे. जर तृष्णाच नसली तर लोभाची ओढ लागेल काय ? लोभाची ओढ नसेल तर विकार निर्माण होतील काय ? विकार नसतील तर दृढता निर्माण होईल काय ? दृढता नसेल तर स्वामित्वाचा लोभ निर्माण होईल काय ? स्वामित्व नसेल तर अधिक स्वामित्वाची हाव निर्माण होईल काय?”
१५. “भगवान, नाही होणार,”
१६. “जर स्वामित्वाचा लोभ नसेल तर शान्ती नाही का टिकणार ?”
१७. “भगवान, टिकू शकेल.”
१८. भगवान म्हणाले, “मी पृश्चीला पृथ्वीच मानतो; पण माझ्या मनात तिच्याबद्दल तृष्णा नाही.”
१९. “म्हणून मी सांगतो की, सर्व तृष्णा समूळ निपटून, त्यांची लालसा न धरून उलट त्यांचा त्याग, नाश व परित्याग करूनच मी ‘बुद्धत्व’ प्राप्त केले आहे.”
२०. “भिक्खूहो, भौतिक मालमत्तेचे नव्हे तर माझ्या धर्माचे हिस्सेदार होण्यासाठी झटा. कारण तृष्णेमुळे आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीने मानसिक दास्यत्व येते.”
२१. अशा रीतीने भगवान बुद्धांनी स्थविर आनन्दाला आणि अन्य भिक्खूवर्गाला संग्राहक वृत्तीचे दुष्परिणाम समजावून सांगितले.
३. त्यांची सौंदर्याची आवड
१. भगवान बुद्धांना सौंदर्याची एवढी आवड होती की, त्यांना सौंदर्यप्रिय बुद्ध असे म्हटले तर शोभून दिसेल.
२. त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले होते, “सौंदर्याच्या सहवासात राहा.”
३. भिक्खुंना उपदेश करताना ते म्हणाले,
४. “भिक्खूहो, अनुदित सद्धर्माचा उदय किवा उदित अधर्माचा लोप करण्यास समर्थ ठरेल अशी सौंदर्याच्या सहवासाइतकी दुसरी कोणतीही गोष्ट नाही.”
५. “जो सौंदर्याचा खरेही आहे त्याच्या ठायी अनुदित सद्धर्माचा उदय होतो आणि उदित अधर्माचा लोप होतो. अधर्म आणि अधर्माची भक्ती लोप पावते, सद्धर्माबद्दल अप्रीती नाहीशी होते, सद्धर्माबद्दल भक्ती निर्माण होते; अधर्माबद्दल अप्रीती वृद्धिंगत होते.”
६. “भिक्खूहो, अनुदित ज्ञानशाखा उदित न व्हावी म्हणून किंवा उदित ज्ञानशाखा पूर्णत्वाप्रत जाऊ नये म्हणून उपयुक्त ठरणारी बेशिस्त दृष्टीसारखी दुसरी समर्थ गोष्ट मला माहीत नाही.”
७. “भिक्खूहो, ज्याची दृष्टी बेशिस्त आहे त्याच्या ठायी अनुदित ज्ञानगाखा उदित होत नाहीत आणि जर उदित झाल्या तर त्यांची योग्य जोपासना झाल्यामुळेपूर्णत्वास पोचत नाहीत.
८. “भिक्खूहो, सग्यासोयर्यांचा अभाव ही क्षुल्लक गोष्ट आहे. पण विद्वत्तेचा अभाव ही मात्र फार हानिकारक गोष्ट आहे.”
९. “भिक्खूहो, सग्यासोयर्यांची बुद्धी ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेची वृद्धी ही मात्र सर्वोच्च महत्त्वाची गोष्ट आहे.”
१०. “भिक्खूहो, म्हणून तुम्ही अशी शिकवण अंगी बाणली पाहिजे की, “आम्ही प्रज्ञेचा विकास करू.’ ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे.
११. “भिक्खुहो, धनवृद्धी ही क्षुल्लक महत्वाची गोष्ट आहे. सर्व वृद्धींमध्ये श्रेष्ठ म्हणजे प्रज्ञावृद्धी. म्हणन तुम्ही अशी वृत्ती बाळगली पाहिजे की, “आम्ही प्रज्ञेचा विकास करू.’ ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे.”
१२. “कीर्तीचा लोप ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेचा लोप ही खरोखरीच दुःखद गोष्ट आहे.”
४. त्यांची सौंदर्याबद्दल आसक्ती
१. एकदा शाक्य देशातील सक्कर ह्या नगरात तथागतांचे वास्तव्य होते.
२. त्या समयी स्थविर आनन्द तथागतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूस बसला. अशा रीतीने आसनस्थ झाल्यावर स्थविर आनन्द बोलला.
३. “भगवान, जीवनात अर्धे महत्व सौंदर्याशी मैत्री जोडण्यात आहे, सौंदर्याचा सहवास जोडण्यात आहे, सौंदर्याशी दाट खेह जोडण्यात आहे.”
४. “आनन्द, असे म्हणू नकोस, असे म्हणू नकोस. सौंदर्याशी मैत्री, सहवास व निकट स्त्रेह ह्यांचे जीवनात सर्वस्वी महत्व आहे.”
५. “जो सौंदर्याचा मित्र, सहवासी आणि निकट परिचित आहे अशा भिक्खूकडून अशी अपेक्षा आहे की, तो आर्य-अष्टांगिक मार्गाचा विकास करील, तो आर्य- अष्टांगिक मार्गाचा जास्तीत जास्त लाभ घेईल.”
६. “आणि आनन्द, असा भिक्खू आर्य-अष्टांगिक मार्गाचा विकास कसा करील किंवा त्यापासून अधिकाधिक लाभ कसा घेऊ शकेल?
७. “अशा वृत्तीने तो सम्यक् दृष्टी प्राप्त करील; जी त्याग, विराग, विराम ह्यांवर आधारित असून जिची परिणती आत्मसमर्पणात होते. तो सम्यक् संकल्प, सम्यक् वाणी, सम्यक् कर्मान्त, सम्यक् आजीविका, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृती, तसेच सम्यक् समाधीचीही प्राप्ती करील. ज्यांची परिणती आत्मसमर्पणात होते.”
८. “आनन्द, जो भिक्खु सौंदर्याचा मित्र, सहवासी आणि दाट स्नेही आहे तो अशा रीतीने आर्य-अष्टांगिक मार्गाचा विकास करतो आणि त्यापासून जास्तीत जास्त लाभ घेतो.”
९. “सौंदर्याशी मैत्री, सहवास आणि निकट स्नेह ह्यांचे जीवनात सर्वस्वी महत्व कसे आहे हे तुला समजण्यास आनन्द, हाच मार्ग आहे.”
१०. “आनन्द, खरोखर जे प्राणी नाशवंत, मर्त्य, दु:ख शोक व आपत्तीग्रस्त आहेत त्यांना सौंदर्याशी मैत्री केल्याने मुक्ती मिळू शकते.”
११. “सौंदर्याशी मैत्री, सहवास व निकट स्नेह ह्यांचे जीवनात कसे सर्वस्वी महत्व आहे ते तुला आता समजू शकेल.”