His Personality

HIS PERSONALITY

Part I—His Personality

His Personality PDF in English

अष्टम खंड: बुद्धांचे व्यक्तिमत्व

भाग पहिला: त्यांचे व्यक्तिमत्व

His Personality

Previous page                                    Next Page

 

१. त्यांची देहाकृती

१. त्यांच्या सर्वत्र वर्णनांवरून असे कळते की, तथागत हे एक आकर्षक स्वरूपाचे पुरुष होते.

२. त्यांची देहाकृती ही सुवर्ण पर्वताच्या शिखराप्रमाणे होती. ते उंच आणि सुदृढ असून त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते.

३. त्यांचे आजानुबाह व सिंहगती, त्यांचे वृषभसम नेत्र आणि सुवर्णकांती, त्यांची भरदार रुंद छाती सर्वांना आकपिंत करीत असे.

४. त्यांच्या भुवया, कपाळ, तोंड, डोळे, देह, हात, पाय आणि त्यांची गती; त्यांचा जो जो देहविशेष कुणाच्या दृष्टिक्षेपात येई त्या त्या अवयवांवर दृष्टी खिळून जाई.

५. ज्याने कोणी त्यांना पाहिले असेल त्याच्यावर त्यांच्या तेजाचा, सामर्थ्याचा आणि त्यांच्या सर्वोत्तम सौंदर्याचा प्रभाव पडत असे.

६. त्यांचे दर्शन होताच अन्यत्र जाणारा खिळून उभा राही; जो उभा असे तो त्यांच्यामागे चालू लागे. जो हळूहळू आणि शांतपणे चालत असे तो जलद धावू लागे; आणि जो बसलेला असे तो एकदम उभा राही. 

७. जे त्यांच्या दर्शनार्थ येत त्यांपैकी काही हात जोडून त्यांना अभिवादन करीत. काही आदराने नतमस्तक होत, काही स्नेहार्द्र शब्दांनी त्यांच्याशी संभाषण करीत. कोणीही आदर व्यक्‍त केल्याशिवाय निरोप घेत नसे.

८. सर्वांना त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर वाटत असे. 

९, स्त्रिया आणि पुरुष-सर्व त्यांचे भाषण श्रवण करण्यास उत्सुक असत. 

१०. त्यांची वाणी अत्यंत मधुर, गंभीर, आकर्षक, कंपनात्मक आणि सुस्पष्ट अशी होती. त्यामुळे त्यांचे भाषण हे जणू दिव्य संगीतासारखे वाटायचे. 

११. त्यांचा स्वर ऐकणार्यास आश्वासनपूर्ण वाटे आणि त्यांचे रूप पाहणार्यास पूज्यभाव वाटे. 

१२. त्यांचे व्यक्तिमत्त्व त्यांना लोकनेता होण्यासच नव्हे तर आपल्या अनुयायांची हूदयदेवता होण्यासही पुरेसे होते.

१३. जेव्हा ते बोलत तेव्हा श्रोते सहजच जमत असत. 

१४. ते काय बोलत ह्याला विशेष महत्व नसे. पण ते बोलत तेव्हा ऐकणार्यांच्या भावना हेलामून जात; आणि त्यांची मने आपल्या इच्छेप्रमाणे वळवली जात. 

१५. श्रोत्यांच्या मनावर त्यांच्या शब्दांचा एवढा प्रभाव पडे की, जे काही ते सांगत ते सत्य आहे एवढेच नव्हे तरतो मुक्‍तीचा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होई. 

१६. त्यांचे भाषण ऐकणार्यांना गुलामांना स्वतंत्र करण्याचे सामर्थ्य असणारे सत्य त्यांच्या शब्दांत असल्याची जाणीव होई. 

१७. जेव्हा ते स्त्री-पुरुषांबरोबर बोलत तेव्हा त्यांचे गंभीर रूप लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण करीत असे आणि त्यांचा मधुर स्वर त्यांना आश्चर्यचकित व हर्षनिर्भर करीत असे.

१८. डाकू अंगुलीमाल आणि आळवीचा नरमांसभक्षक ह्यांना धर्मदीक्षा देणे दुसर्या कोणाला साध्य झाले असते काय ? राजा प्रसेनजित व राणी मल्लिका ह्यांचे एका शब्दाने सख्य करून देणे दुसर्या कोणाला जमले असते काय? कोणावर त्यांचा प्रभाव एकदा पडला की तो त्यांचा कायमचा अंकित होत असे. इतके त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते.

 

२. प्रत्यक्ष पाहिलेल्यांची साक्ष

१. भगवान बुद्धांना त्यांच्या जीवनकालात ज्यांनी पाहिले किंवा ज्यांना ते भेटले त्यांचे मत ह्या परंपरागत समजुतीचे समर्थन करतात.

२. साल नावाच्या एका ब्राम्हणाची अशी साक्ष काढता येईल की, भगवान बुद्धांना समोर प्रत्यक्ष पाहून त्याने त्यांच्या गौरवार्थ अशा भावना व्यक्‍त केल्या. 

३. भगवानांच्या समोर आल्यावर अभिवादन करून तो ब्राम्हण बसला. त्या वेळी महापुरुषाची बत्तीस लक्षणे त्यांच्या ठायी आहेत किंवा काय ह्यासाठी त्याने त्यांच्या देहाचे निरीक्षण केले आणि त्याला ती आढळलीही. 

४. ही बत्तीस लक्षणे असल्याची खात्री झाल्यावर त्यांना संबोधी प्राप्त झाली आहे किंवा नाही ह्याबाबत त्याला सन्देह वाटला; पण त्याला स्मरले की, वृद्ध ब्राम्हण किंवा आचार्य प्राचार्य ह्यांच्या मते जे अर्हत व सम्यक-सम्वुद्ध असतात त्यांची स्तुती केल्याने ते प्रकट होतात म्हणून खालील शब्दांनी त्याने त्यांची स्तुती करण्याचे योजिले. 

५. “भगवान, आपला देह निर्दोष आहे, परिपूर्ण आहे, आकर्षक आहे, सुवर्णवर्णी आहे. आपले दात चमकदार आहेत. महापुरुषाच्या ठायी असणारे प्रत्येक लक्षण ह्या सुविकसित देहात प्रतीत होत आहे.” 

६. “स्पष्ट दृष्टी, सुंदर, उंच सरळ देहयष्टी असणारे आपण आपल्या अनुयायांत सूर्याप्रमाणे तळपळणारे आहात; आपण इतके आनंदी, सुवर्णवर्णी असून आपले तारुण्य एखाद्या गृहहीन श्रमणाप्रमाणे का फुकट घालवीत आहात?

७.“ आपण चक्रवर्ती नरेशाप्रमाणे थाटामाटाने संचार केला पाहिजे. आपली राज्यसत्ता सातासमुद्रापर्यन्त त असली पाहिजे. अभिमानी माना राजे जे तुमच्या च्या पदरी रा ग्रामप्रमुख गमश्रमुख म्हणून असायला पाहिजेत. सार्वभौम चक्रवर्ती नरेणशाप्रमाणे शाशत्रमाण अखिल जगताचे शास्ते म्हणून आपण असायला पाहिजे.” 

८. आनन्दाने वर्णन केल्याप्रमाणे तथागतांची देहकांती इतकी निर्मळ आणि तेज:पुंज होती की, त्यावर सुवर्णवर्णी वस्त्राची जोडी ठेवली की क्षणात ती फिकट वाटू लागे. 

९. तथागतांच्या विरोधकांनी त्यांना ‘ देखणा पोर’ असे म्हटले. त्यात नवल ते कसले?

 

३. त्यांचे नेतृत्व-सामर्थ्य

१. संघाला कोणी अधिकृत नेता नव्हता. तथागतांचाही संघावर काही अधिकार नव्हता. संघ ही एक स्वायत्त संस्था होती.

२. तर मग संघ आणि त्याचे सदस्य ह्या बाबतीत तथागतांचे स्थान काय होते? 

३. ह्याबाबत तथागतांचे समकालीन सकलुदायी व उदाई ह्यांची साक्ष उपलब्ध आहे.

४. एकदा भगवान राजगृहातल्या वेळूवनात वास्तव्यास होते.

५. एके दिवशी सकाळी भिक्षाटनासाठी भगवान राजगृहात गेले; पण नेहमीपेक्षा फार अगोदर आल्याचे जाणवून 

परिव्राजकारामात सकलुदायीकडे जाण्याचा त्यांनी विचार केला आणि त्या दिशेने ते निघाले.

६. त्या वेळी पुष्कळ परिव्राजकांच्या समुदायात सकलुदायी बसलेला होता. अस्तित्व व नास्तित्वाबाबत त्यांची जोरदार चर्चा चालली होती. 

७. दुरून भगवान येत असल्याचे सकलुदायीला दिसताच त्याने सर्वांना सूचना दिली, “गप्प रहा ! गडबड करू नका. शांतताप्रिय श्रमण गौतम येत आहेत !” 

८. त्याबरोबर ते सर्व गप्प झाले. इतक्यात भगवान आले. त्यांना सकलुदायी म्हणाला, “ या, या भगवान! आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो. दीर्घकालानंतर आज आपले आगमन होत आहे. भगवानांनी आसनस्थ व्हावे.” 

९. भगवान आसनस्थ झाले. कसल्या विषयावर चर्चा चालली होती आणि काय निष्कर्ष निघाले ह्याची त्यांनी चौकशी केली.

१०. त्यावर सकलुदायी बोलला, “जाऊ द्या. काही विशेष नाही. पुढे कधी तरी समजेलच ते !” 

११. काही दिवसांपूर्वी जेव्हा नाना मतांचे श्रमण बाम्हण संथागारामध्ये एकत्र जमले तेव्हा त्यांच्यात चर्चा चालली की, अंगदेशातील मगध पौरजन किती भाग्यवान आहेत की, जितके गणाचार्य आहेत, जितके विख्यात श्रमण आहेत, जितके निरनिराळ्या मतांचे संस्थापक आहेत, जितके जनसंमर्दाने आदरणीय मानले आहेत ते सर्व राजगृहात वर्षावासासाठी आलेले आहेत. 

१२. त्यामध्ये पूर्णकाश्यप आहे. मख्खली गोशाल आहे. अजितकेशकम्बल आहे. सन्जय वेलठिठपुत्र आहे, निगंठनाथपुत्र आहे. सर्व प्रतिष्ठावंत आहेत आणि सर्व वर्षावासासाठी इथे आले आहेत. त्यात श्रमण गौतमसुद्धा आहेत, जे संघनायक आहेत, सुविख्यात धर्मगुरू आहेत, धर्मसंस्थापक आहेत, अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहेत. 

१३. ह्या अधिपतींपैकी ह्या सुविख्यात श्रमण ब्राम्हण आचार्यांपैकी असा कोण आहे की, जो आपल्या शिष्यांना पूज्य, आदरणीय व सन्मान्य वाटतो ? आणि ते आपल्या गुरूपाशी किती पूज्यबुद्धीने आणि आदराने राहात होते? 

१४. काही म्हणाले, “पूर्णकाश्यपांना कोणी आदर किंवा सन्मान दर्शवीत नाहीत. त्यांचे शिष्य त्यांच गौरव करीत नाहीत. त्यांच्याजवळ राहताना त्यांना त्यांच्याबद्दल काही विशेष पूज्यभाव वाटत नाही.”

१५. अशी वेळ एकदा आली होती, जेव्हा पूर्णकाश्यप आपल्या शेकडो अनुयायांना उपदेश करीत होते. तेव्हा मध्येच एक शिष्य बोलला, “पूर्णकाश्यपांना काही विचारू नका. त्यांना ह्या विषयात काही समजत नाही. मला विचारा. मी आपणास सर्व काही समजावून देऊ शकेन.” 

१६. तेव्हा पूर्णकाश्यप अश्रुपूर्ण नेत्रांनी व हात वर उचलून म्हणाले, “आपण शांत रहा. गडबड करू नका !”

Previous page                                    Next Page


 The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!