Tributes to the Buddha

Tributes to the Buddha

Tributes to the Buddha

Tributes to the Buddha PDF in English

बुद्ध आणि त्यांचा धम्म

उपसंहार

Tributes to the Buddha

Previous page                                    Home Page

 

१. भगवान बुद्धांच्या महत्तेची प्रशंसा

१. भगवान बुद्धांचा जन्म दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी झाला.

२. आधुनिक विचारवंत आणि शास्त्रज्ञ त्यांच्या विषयी आणि त्यांच्या धम्माविषयी काय म्हणतात ? ह्या विषयावरील त्यांच्या विचारांचा हा संग्रह उपयुक्‍त व्हावा.

३. प्रा. एस. एस. राघवाचार म्हणतात :

४. “भगवान बुद्धांच्या जन्मापूर्वीचा काळ हा इतिहासातील तमोयुगापैकी एक होता.”

५. “ प्रज्ञेच्या दृष्टीने ते एक मागासलेले युग होते. धर्म ग्रन्याविषयी निविवाद पूज्यभाव, हे तत्कालीन विचारांचे वैशिष्ट्य होते.”

६. “नैतिकतेच्या दृष्टीने ते एक तमोयुग होते.”

७. “श्रद्धाळू हिंदूंच्या मते नैतिकतेचा अर्थ म्हणजे धर्मग्रंथांनुसार आचारविधींचे यथातथ्य आचरण.”

८. “आत्मत्याग किंवा संकल्पाची पवित्रता ह्यांसारख्या खर्या नैतिक विचारांना तत्कालीन नैतिक अभिज्ञतेत यथायोग्य स्थान नव्हते.”

 

९. श्री. आर. जे. जॅकसन म्हणातात : 

१०. “भगवान बुद्धांच्या शिकवणीचे अपूर्व स्वरूप भारतीय धार्मिक विचार धारांच्या अध्ययनात प्रतीत होते.” 

११. “क्रग्वेदाच्या त्रचांत मानवाचे विचार बहिर्मुख, स्वपरोक्ष आणि देवलोकाभिमुख असल्याचे आपणास आढळते.”

१३. “बौद्धधर्माने मानवात प्रच्छन्न असलेल्या अंत:सामर्थ्याच्या शोधाकडे मानवाचे लक्ष वेधले.” 

१३. “वेदांमध्ये आपणास प्रार्थना, प्रशंसा आणि पूजा आढळते.” 

१४. “बौद्धधम्मातच प्रथम सदाचारास प्रवृत्त होण्यासाठी मानसिक संस्कारांचे महत्व सांगितलेले आढळते.”

१५. श्री. विनवुड रीड म्हणतात : 

१६. “जेव्हा आम्ही निसर्गाचा ग्रंथ उघडतो, जेव्हा कोट्यावधी संवत्सरांतील रक्‍त आणि अश्रूंनी लिहिलेली उत्क्रांतीची कथा आपण वाचतो, जेव्हा जीवन-नियंत्रणाचे नियम आणि विकासाच्या उत्पत्तीस कारणीभूत होणारे नियम आपण अभ्यासतो, तेव्हा परमेश्वर प्रेमरूप असल्याचे मत किती भ्रामक आहे ह्याची आपणास स्पष्ट जाणीव होते.”

१७. “प्रत्येक वस्तुत दुष्ट भ्रष्टता आणि स्वछंदी अपव्यय आढळतो. प्राणिसृष्टीत जितके जन्मास येतात त्यांपैकी फक्त अल्पांशच जगतात.” 

१८. “भक्षण करा आणि भक्ष्य व्हा हा अर्णव, आकाश आणि अरण्याचा नियम आहे. हत्या हा विकासाच नीतिनियम आहे.”

१९, श्री. रीड आपल्या ‘मानवाचे होौतात्म्य ( Martyrdom of Man ) ह्या ग्रंथात असे म्हणतात : “भगवान बुद्धांचा धम्म किती तरी निराळा आहे.” 

२०. डॉ. रंजन रॉय असे म्हणतात : 

२१. “एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरक्षेचे तीन सिद्धान्त प्रभुत्वे करून प्रचलित होते. कोणीही त्यांना आव्हान देऊ शकला नाही.” 

२२. “ते म्हणजे पदार्थ, वस्तुमान आणि कार्यशक्ती ह्यांचे सिद्धान्त होत.

२३. “हे तीनही अविनाशी आहेत असा विचार जोपासणार्या आदर्शवादी तत्वज्ञांची ती हुकमी पाने होती.”

२४. “एकोणिसाव्या शतकातल्या वैज्ञानिकांच्या मते हे तीन सिद्धान्त म्हणजे सृष्टीच्या नियंत्रणाचे कारक होत.”

२५. “एकोणिसाव्या शतकातल्या वैज्ञानिकांच्या मते हे तीन सिद्धान्त म्हणजे विश्वाचे स्वाभाविक घटक होत.”

२६. “त्यांची कल्पना अशी : विश्व हे अविनाशी अणूंनी भरलेले आहे.”

२७. “एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस श्री. जे. जे. थॉम्पसन आणि त्यांचे अनुयायी ह्यांनी अणुभंजनास प्रारंभ केला.”

२८. “आणि आश्चर्य असे की, अणूंचे तुकडे होऊ लागले.”

२९. “ह्या तुकड्यांना क्रणविद्युत्कण असे संबोधण्यात येऊ लागले. ते सर्व समस्वरूप आणि त्रट्रणविद्युतजागृत होते.”

३०. “मॅक्सवेलने ज्या अणूंना विश्वाचे अथवा वास्तवतेचे अविनाशी आधारस्तम्भ मानले होते ते खण्डित झाले.”

३१. “त्यांचे सूक्ष्म कणांत विभाजन झाले-धनविद्युत्‌ जागृत असे धनविद्युत्कण व क्रणविद्युत्‌ जागृत असे त्रणविद्युत्कण.”

३२. “निश्चित न बदलणार्या वस्तुमानाची कल्पना विज्ञानास कायमची अंतरली. चालू शतकात जगात अस समज आहे की, प्रतिक्षणी पदार्थाचा उच्छेद होत आहे.”

३३. “भगवान बुद्धांचा अनित्यतेचा सिद्धान्त खरा ठरला आहे.”

३४. “विज्ञानाने असे सिद्ध केले आहे की, विश्वाची गती संधीकरण, विभाजन, आणि पुनर्संधीकरण ह्या प्रक्रियांनुसार होत असते.”

३५. “आधुनिक विज्ञानाची प्रवृत्ती म्हणजे अन्तिम सत्य, ऐक्य आणि अहंतेची विभिन्नता ह्यांची प्रवृत्ती.”

 ३६. “आधुनिक विज्ञान म्हणजे बौद्धधम्मातील अनित्य आणि अनात्मवादाचा प्रतिध्वनी होय.”

३७. श्री. इ. जी. टेलर आपल्या ‘बौद्धधर्म आणि आधुनिक विचारधारा” ( Buddhism and Modern Thought ) ह्या ग्रंथात म्हणतात :

३८. “बराच काळ मानवावर बाह्य शक्‍तींनी अधिकार गाजविला आहे. जर तो खरोखरच सुसंस्कृत व्हावयाचा असेल तर त्याने स्वत:च्या तत्त्वांनी आत्मनियमन करण्यास शिकले पाहिजे. बौद्धधम्म हीच जगातील सर्वप्रथम नैतिक विचारपद्धति आहे की, जिच्यामध्ये मानवास आत्मनियमन करण्याची शिकवण दिलेली आहे.”

३९. “ह्यासाठी प्रगतिशील जगाला ही सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्धधम्माची आवश्यकता आहे.” 

४०. यूनिटेरिअन ख्रिश्चन पाद्री, रेव्हरण्ड लेस्ली बोल्टन म्हणतात :

४१. “बौद्ध धम्माचे आध्यात्मिक तत्वज्ञान हीच फार सामर्थ्यशाली देणगी आहे, असे मला दिसते.”

४२. “बौद्धधम्माप्रमाणे यूनिटेरिअन ख्रिस्ती बांधवही धर्मग्रंथ किंवा मतप्रणालीची बाह्य शक्‍ती नाकारून मानवाच्या अंतर्यामी तयामा असलेल्या सलल्या मार्गदीपाचा ]गैदोपाचा आधार मान्य करतात.”

४३. “यूनिटेरिअन मताचे अनुयायी येशू ख्रिस्त आणि गौतम बुद्ध हे जीवनाचे उच्च भाष्यकार आहेत, असे मानतात.”

४४. प्रा. ड्राइट गोडार्ड म्हणतात :

४५. “जगातल्या सर्व धर्मसंस्थापकांत भगवान बुद्धच फक्त एक असे थोर होते, की जे आपली मुक्‍ती साध्य करण्याच्या मानवी सामर्थ्याचा  स्वाभाविक मोठेपणा बरोबर ओळखू शकले. ”

४६. “मानवतेची योग्यता उंचावण्याच्या कर्तृत्वात जर खर्या थोर माणसाचे मोठेपण सामावलेले असेल तर खरा थोर असा तथागताशिवाय दुसरा कोण असू शकेल ?”

४७. “त्यांनी मानवाच्या वर दुसरे कोणी संस्थापित करून त्याला हीन न करता प्रज्ञा व मैत्रीच्या शिखरावर (त्याला ) प्रस्थापित करून उच्च्चत्व प्राप्त करून दिले आहे.”

४८. “बौद्धधर्म” ( Buddhism ) ह्या ग्रंथाचा कर्ता श्री. ई. जे. मिल्स म्हणतो :

९, “बौद्धधम्माइतका तका दुसर्या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या मूल्यावर आणि अज्ञानाच्या हीनतेवर भर देण्यात आलेला नाही.”

५०. “आपले डोळे उघडे राखण्याबाबत दुसर्या कोणत्याही धर्मात इतका भर देण्यात आलेला नाही.”

५१. “दुसर्या कोणत्याही धर्मात मनोविकासासाठी इतकी सखोल योजना आखलेली नाही.” ५२. प्रा. डब्ल्यू. टी. स्टेस आपल्या ‘बौद्धधर्मीय नीतीशास्त्र ( Buddhist Ethics )ह्या ग्रंथात म्हणतात :

५३. “बौद्धधम्मातील नैतिक आदर्श पुरुष जो अर्हतू, तो नैतिक आणि बौद्धिक अशा दोन्ही दृष्टींनी महान असला पाहिजे.”

५४. “तो तत्वज्ञ, तसाच सदाचारीही असला पाहिजे.”

५१. “ज्ञान हे मुक्तीसाठी आवश्यक आहे आणि ते प्राप्त करण्यास अपयश येण्याची जी दोन कारणे आहेत त्यांपैकी अज्ञान हे एक आहे, असे बौद्धधम्माने आग्रहपूर्ण सांगितले आहे ( तृष्णा किंवा लोभ हे दुसरे ).”

५६. “ह्या उलट ख्रिस्ती आदर्श पुरुषाच्या घडणीत ज्ञानाला अजिबात स्थान नाही.”

५७. “संस्थापकाच्या अतात्विक स्वरूपामुळे ख्रिस्तधर्मी विचारधारेत मानवाच्या नैतिक आणि बौद्धिक बाजूत दूरावा निर्माण झाला आहे.”

५८. “जगातल्या दु:खापैकी पुष्कळशी दु:खे दुष्टपणापेक्षा मूर्खत्वाने आणि अंधश्रद्धेने निर्माण झाली आहेत.”

५९. “भगवान बुद्धांनी ह्याला स्थान दिले नाही.”

६०. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म किती श्रेष्ठ आणि अपूर्व आहे हे स्पष्ट करण्यास एवढेसे पुरेसे आहे.

६१. असे हे भगवान बुद्ध आपले गुरू असावेत असे कोण बरे म्हणणार नाही ?

 

२. त्यांच्या धम्माचा प्रसार करण्याची प्रतिक्षा

१. प्रतिज्ञा आपण करू या– जीवसृष्टी आहे असीम; ती भवसागरपार नेण्याची;

२. प्रतिज्ञा आपण करू या– आपणात दोष असंख्य; ते नष्ट करण्याची;

३. प्रतिज्ञा आपण करू या– आहेत सत्ये अनंत, पूर्ण आकलण्याची;

४. प्रतिज्ञा आपण करू या– भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची.

 

३. भगवान बुद्धांच्या स्वदेशप्रत्यागमनासाठी प्रार्थना

१. “हे पुरुषोतम, मी मनापासून निष्ठा ठेवतो.

तथागतांवर,ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त

अनिर्बंध दशदिशांत

आणि माझी निग्रही मनीषा

तुझ्या भूमीत जन्म घेण्याची

 

२. मनःचक्षूंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन

तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत

तिची श्रेष्ठता जाणतो

 

३. आकाशासमान सर्वसमावेशक ती

अनन्त आणि असीम

 

४. सन्मार्गानुसारी तुझी करुणा मैत्री

सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ

जन्मजन्मान्तरीच्या पुण्यसंचयाचा परिपाक

 

५. आणि तुझा प्रकाश सर्वव्यापी

जणू चंद्रसूर्याचा रुपदर्पण

 

६. माझी अशी प्रार्थना :

तिथे जन्म घेतलेले प्राणिमात्र

तुझ्यासम करोत सत्यघोष

हे बुद्धा !

 

७. मी लिहतो आहे इथे लेख हा

आणि गातो गीते ही

तुझे व्हावे साक्षात दर्शन

हीच करतो प्रार्थना

 

८. अखिल प्राणिमात्रासहित

ह्या धन्य भूमीत

होवो मला जन्म प्राप्त.

Previous page                                    Home Page


The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!