His Sermons

His Sermons

Part IV — His Sermons

His Sermons PDF in English

चतुर्थ खंड: धर्म आणि धम्म

भाग चवथा: बुद्धाची प्रवचने

His Sermons

Previous page                                    Next book

 

गुहस्थासाठी प्रवचन

१. सुखी गुहस्थ

१. एकदा अनाथपिंडक भगवन्ताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून जवळच्या आसनावर बसला. 

२. गुहस्थाचे सुख कशात आहे हे जाणण्याची अनाथपिंडकाला उत्सुकता लागली होती.

३. म्हणून अना्थपिंडकाने गृहस्थाच्या सुखाचे रहस्य सांगण्याची भगवन्तांना विनंती केली.

४. भगवंत म्हणाले, ‘ गृहस्थाचे पहिले सुख स्वामित्वात आहे. गृहस्थाजवळ धन असते. त्याने ते न्यायाने,  भलेपणाने, उद्योगाने, शरीरसामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते. मी हे धन न्यायाने मिळविलेले आहे, या विचाराने गुहस्थाला सुख वाटते.

५. दुसरे सुख उपभोगाचे. गृहस्थाजवळ धन असते ते त्याने न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीरसामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते. त्या धनाचा तो उपयोग घेतो आणि पुण्यकृत्य करतो. न्यायाने मिळविलेल्या माझ्या धनाच्या जोरावर मी पुण्यकृत्य करीत आहे, या विचाराने त्याला सुख लाभते. 

६. तिसरे सुख म्हणजे अन्‌-त्र्रण. गृहस्थ कोणाचेही लहानमोठे त्रण लागत नाही यामुळे तो सुखी असतो. मी कोणाचेच काही हा त्रण लागत नाही. ह्या व अशा विचाराने तो सुखी होतो. 

७. चौथे सुख निर्दोषतेचे. काया, वाचा, मनसा निर्दोष कृत्ये करीत राहिल्याने गृहस्थ सुखी होतो.

८. ‘ अनाथपिंडक, जर गृहस्थ प्रयत्न करील तर खरोखर त्याला ह्या चारही प्रकारचे सुख लाभेल.! 

 

२. पुत्रापेक्षा कन्या बरी

१. एकदा भगवान श्रावस्ती येथे राहात असता कोसलराजा पसेनदी त्यांना भेटण्यासाठी आला.

२. राजा भगवंतांशी संभाषण कर असता, राजवाड्यातून एक दूत आला आणि राजापाशी जाऊन त्याची राणी मल्लिका प्रसूत होऊन तिला कन्या झाल्याचे त्याने वृत्त सांगितले.

३. ते वृत्त ऐकून राजा खिन्न झालेला दिसला. भगवंतांनी राजाला त्याच्या खिन्नतेचे कारण विचारले.  

४. राजाने सांगितले की, राणी मल्लिका प्रसूत होऊन कन्या झाल्याचे वाईट वृत्त नुकतेच कळले आहे.

५. यावर परिस्थिती ओळखून भगवंत म्हणाले, “राजा, कन्या ही पुत्रापेक्षा अधिक चांगली निपजण्याचा संभव आहे. ती शहाणी आणि सद्गूणी कन्या, पत्नी, माता अशा त्रिविध भूमिका करणारी आहे. 

६. ‘तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्ये करील, मोठे राज्य करील. खरोखर अशा थोर पत्नीचा मुलगा आपल्या देशाचा मार्गदाता होईल.’

 

३. पती आणि पत्नी

१. एकदा भगवंत मदुरा आणि निरंजना यांच्यामधील राजरस्त्याने चालले होते. या रस्त्यावर त्यांना पुष्कळ गृहस्थ व त्यांच्या पत्नी भेटल्या.

२. तेव्हा भगवंतांनी रस्ता सोडून एका झाडाखाली आसन स्वीकारले. गृहस्थ आणि त्यांच्या पत्नींनी त्यांना अशा  रीतीने स्थानापन्न झाल्याचे पाहिले.

३. ते सर्व भगवंताजवळ आले. त्यांनी भगवंतांना अभिवादन केले आणि जवळच बसून त्यांना विचारले, ‘पति- पत्नींतील सुयोग्य संबंध कोनता?’ यावर भगवंतांनी त्यांना उत्तर दिले,

४. ‘हे गृहस्थ हो, पती-पत्नींना चार प्रकारे एकत्र राहता येते. दुष्ट पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर राहात असेल. दुष्ट पुरुष देवतेबरोबर राहात असेल. सत्पुरुष द्ष्ट स्त्रीबरोबर राहात असेल आणि कदाचित सत्पुरुष एखाद्या देवतातुल्य स्त्रीबरोबर राहात असेल.

५. ‘गृहस्थ हो! दुष्ट पुरुषाचे जीवन म्हणजे हत्या, चोरी, अपवित्रता, असत्भाषण, मद्यपान, दुष्ट आणि पापी वर्तणूक, मोहाविष्ट मन आणि सत्पुरुषांची निदा याने भरलेले असते आणि त्याच्या दृष्ट स्त्रीचे जीवनही तद्वतच असते. अशा प्रकारे सदगृहस्थहो, दुष्ट पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर जीवन व्यतीत करीत असतो.

६. ‘गृहस्थ हो, दुष्ट पती आणि देवतातुल्य पत्नी यांच्या जीवनात पती वर सांगितल्या प्रमाणे वर्तत असतो. परंतु पत्नी हत्या, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, मद्यपान यांपासून परावृत्त असते. तिची वर्तणूक सद्रणी आणि हितकर असते. अंत:करण मोहाधीन नसते. ती आपल्या कौटुंबिक जीवनात सद्रणी माणसाची निदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही. याप्रमाणे गृहस्थ हो, दुष्ट मनुष्य देवतातुल्य पत्नीसह राहात असतो. 

७. गृहस्थहो सज्जन, देवतुल्य पुरुष आणि दुष्ट पत्नी यांचे जीवन असे असते. या जीवनात पति हत्या, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, मद्यपान यापासून परावृत्त होऊन राहतो. त्याची वागणूक गुणयुक्‍त व हितकर असते. मोहाधीन होऊन आपल्या कौटुंबिक जीवनात तो सद्गणी पुरुषाची कधी निदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत लत नाही. हा. परतु रं तु त्याची चा पत्नी त्नी मात्र वर वणिलेल्या णि लल्या दुष्ट स्त्रीसारखी [सारखा वागत असते. 

८. ‘गृहस्थहो, चौथ्या प्रकारची पति-पत्नी जीवनात जणू काय देव, देवतेबरोबर राहात आहे अशी वागतात. कारण ते दोघेही पति-पत्नी हत्या, चौर्यकर्म, असत्य-भाषण, व्यभिचार, मद्यपान यांचा आपल्या वर्तनाला स्पर्श होऊ देत नाहीत. आणि मोहाधीन होऊन सत्पुरुषांच्या निदेने आपली जीभ विटाळीत नाहीत. 

९. ‘गृहस्थहो, पति-पत्नीच्या एकत्र जीवनाचे असे चार प्रकार आहेत.!

 

शील परिपालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचने

१. माणसाची अधोगती कशाने होते ?

१. एके समयी भगवान श्रावस्ती येथील जेतवनातील अनाथ पिडिकाच्या विहारात राहात होते.

२. त्या वेळी मध्यरात्र उलटल्यानंतर आपल्या तेजाने जेतवन दीप्तिमान करीत एक देव भगवंतांच्या जवळ आला आणि त्यांच्या सन्निध जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि भगवतांना उद्देशून पुढील श्लोक म्हणाला-

३. ‘गौतमा, मी तुला अधःपतन पावणार्या माणसाविषयी काही प्रश्‍न करणार आहे. कृपा करून अधपतनाची कारणे काय असतात ते मला सांग!’ भगवंतांनी ती सांगण्याचे मान्य केले आणि ते म्हणाले-

४. ‘कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखे आहे. धर्मप्रेमी हा उन्नतपथावर, तर धर्मद्वेष्टा हा अधोगतीच्या पथावरील वाटसरू आहे. 

५. ‘अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्रणी माणसे अप्रिय वाटतात. त्याची दुर्गुणी माणसांवर श्रद्धा असते हे त्याच्या अधोगतीचे दुसरे कारण होय. 

६. “झोपाळूपणा, गप्पा मारण्याची आवड, निरुद्योगीपणा, आळस, क्रोधाविष्टता ही सर्व अधोगतीचे तिसरे कारण होय.

७. ‘आईबाप वृद्ध झाले असताना जवळ संपत्ती असूनही त्यांचे पालनपोषण न करणे हे अधपाताचे चौथे कारण होय.

८. ब्राम्हण, श्रमण किंवा अन्य साधूंना असत्य भाषणांनी ठकविणे हे अधोगतीचे पाचवे कारण होय.

९. “जवळ विपुल द्रव्य, सुवर्ण, धनधान्य असूनही त्या सर्वांचा एकट्यानेच उपभोग घेणे हे अध:पाताचे सहावे कारण होय.

१०. ‘आपले कुळ, संपत्ती, जात यांचा अभिमान बाळगून आपल्या आप्तेष्टांचा तिरस्कार करणे हे अध:पाताचे सातवे कारण होय.

११. ‘व्यभिचार, मद्यपान, जुगार यांमध्ये द्रव्याचा अपव्यय करणे हे अध:पाताचे आठवे कारण होय.

१२. स्वस्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्या, गणिका आणि परस्त्रिया यांचा समागम करणे हे अध:पाताचे नववेकारण होय.

१३. ‘असंयमी, उधळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अध:पाताचे अकरावे कारण होय.

१४. ‘जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला, या जोरावर अफाट महत्वाकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा बाळगणे हे अध:पाताचे बारावे कारण होय.! 

१५. ‘ हे कुलोत्तम देवा, ही सर्व अध:पाताची कारणे आहेत. या सर्वांवर विजय मिळवलास तरच तू वाचशील.

 

२. दुष्ट मनुष्य

१. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खुंना खालील प्रमाणे प्रवचन दिले.

२. ‘भिक्खूंनो, दुष्ट मनुष्य कसा ओळखावयाचा हे तुम्हांस माहीत आहे काय?’ भिक्खूंनी ‘नाही’, म्हणताच भगवंत बोलले,

३. ‘ तर मग मीच तुम्हाला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो.

४. “दुष्ट मनुष्य न विचारताच दुसर्याचे दोष दाखवितो आणि त्याला दुसर्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको. तेव्हा तर तो दुसर्याचे दोष किंवा व्यंगे न लपवता रसाळपणे तपशीलवार सांगू लागतो. 

५. ‘जो मनुष्य विचारले असता दुसर्याचे सद्वरण दाखवीत नाही, पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसर्याचे गुण सांगतो.

६. ‘तो मनुष्य विचारले असताही आपले दोष उघड करीत नाही, मग न विचारता तर बोलायलाच नको. वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवितो परंतु त्याचा तपशील छपवितो असा मनुष्य दुष्ट मनुष्य होय.

७. ‘ भिक्खूहो, असाही मनुष्य असतो की, जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो. विचारल्यावर तर सांगायलाच नको. तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणांचे भरमसाट वर्णन करीत असतो. भिक्खुंनो, असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा.’

 

३. सर्वोत्तम पुरुष

१. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खुंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले-

२. भिक्खुंना उदेशून भगवान म्हणले, ‘जगात चार प्रकारची माणसे आढळतात.

३. ‘ पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वत:च्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. दुसर्या प्रकारचा  मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसर्याच्या हितासाठी झटतो. तिसर्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसर्याच्या नाही. चौथ्या प्रकारचा चा मनुष्य स्वत:च्या त्याप्रमाणेच दुसर्यांच्या हितासाठी झटत असतो. 

४. जो स्वतःच्या अथवा दुसर्याच्या हितासाठी झटत नाही तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि मध्ये शेणाने माखलेल्या चितेवरील मशालीसारखी आहे, ती गावात वा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही. त्याप्रमाणेच तो मनुष्य जगाला आणि स्वतःलाही निरुपयोगी आहे.

५. ‘जो स्वत:च्या कल्याणाचा त्याग करून दुसर्याच्या कल्याणासाठी झटतो, तो तिसर्या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला पुरुष होय. 

६. ‘आणि जो स्वत:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा. 

 

४. ज्ञानी पुरुष

१. एके समयी भगवान उकट्ट काणि सेतब्ब ह्या दोन नगरांच्या मधील राजरस्त्यापर्यंत पोहोचले असता, त्यांना द्रोण ण नावाचा एक ब्राम्हण त्याच्यासारखाच ंच्यासारखाच प्रवास करीत रात असता भेटला. 

२. अकस्मात भगवंतांनी रस्ता सोडला आणि एका वृक्षातळी पद्मासन ठोकून ते बसले. भगवंताच्या पावलांमागून जात असणार्या त्या ब्राम्हण द्रोणाला, त्या तेजस्वी, सुंदर, संयमी, शांत आणि संयत मनाच्या आणि सामर्थ्यशाली मनाच्या भगवंताचे ग वं ताच दर्शन झाले. ले. भगवताजवळ वं ताजवळ जाऊन तो म्हणाला,

३. “ आदरणीय महाशय आपण देव तर नाहीत?”

 “ नाही. ब्राम्हणा, मी खरोखर देव नाही.”

 “ आपण गंधर्व तर नव्हेत?”

“ नाही, नाही! ब्राम्हणा मी गंधर्व नाही!” 

“ मग आपण यक्ष तर नव्हेत?”

“ नाही, नाही! ब्राम्हणा, मी यक्ष नव्हे.”

“ तर मग आपण मनुष्य नाही काय?”

“ नाही. ब्राम्हणा, मी मनुष्यही नाही!”

४. भगवंतांची अशी उत्तरे ऐकल्यावर तो ब्राम्हण द्रोण म्हणाला, ‘ तुम्हाला तुम्ही देव आहात का, गंधर्व आहात का, यक्ष आहात किंवा मनुष्य आहात असे विचारले असता आपण नाही म्हणता, तर मग आदरणीय महाशय, आपण आहात तरी कोण?”

५. ‘ ब्राम्हणा, जोपर्यंत मी माझ्या अंगच्या आसवाचा निरास केला नव्हता तोपर्यंत मी खरोखर देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य होतो; पण आता मी आसवापासून मुक्‍त झालो आहे आणि मुळाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या तालवृक्षासारखा झालो आहे. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाहीत त्याप्रमाणे माझेही आहे. 

६. ‘ ज्याप्रमाणे जलात जन्म घेणारी कमललता पाण्यातून वर येते आणि तरी-सुद्धा पाण्याचा कलंक तिला चिकटत नाही. त्याप्रमाणे हे ब्राम्हणा, मी जगात जन्मास आलो, जगात वाढलो आणि जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाला अस्पृष्ट असा राहिलो आहे. 

७. ‘ म्हणून हे ब्राम्हणा, तू मला एक तथागत ( ज्ञानी पुरुष ) असे समज. 

 

५. न्यायी आणि सज्जन असा पुरुष

१. भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले, ‘ माणसे चार प्रकारची असतात. जर तुम्हाला सज्जन आणि न्यायी पुरुष ओळखायचा असेल तर या चार प्रकारचे भेद तुम्ही जाणले पाहिजेत. 

२. ‘ भिक्खुंनो, एका प्रकारची माणसे स्वकल्याणासाठी झटतात; परंतु परकल्याणाचा विचार ही करीत नाहीत. 

३. ‘ अशा प्रकारची माणसे स्वत:मधील विषयवासनेचे निर्मूलन करतात, परंतु दुसर्यांनी विषयवासनेचा त्याग करावा म्हणून त्यांना कधीही आग्रहाने सांगत नाहीत. ते आपल्या मनातील क्रोधाचे निर्मूलन करतात; परंतू दुसर्यांना क्रोधाचा त्याग करण्याबद्दल निक्षून सांगत नाहीत. ते स्वत:मधील अविद्येचे निर्मूलन करतात; परंतु ते दुसर्यांना त्यांच्या अविद्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगत नाहीत. 

४. ‘ असा पुरुष स्वतःच्या कल्याणाचा मार्ग चोखाळीत असतो; परंतु तो दुसर्याच्या कल्याणासाठी झटत नाही. 

५. दुसर्या प्रकारची माणसे ही परहितासाठी झटतात. स्वहितासाठी झटत नाहीत.

६. ‘अशी माणसे आपल्या अंगच्या विषयवासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनाचा प्रयत्नही न करता दुसर्यांना मात्र तसे करण्यासाठी आग्रहाने सांगत असतात. 

७. “भिक्खूहो, अशा प्रकारची माणसे दुसर्याच्या हितासाठी निश्चित झटतात, परंतु स्वत:च्या नाही. 

८. “भिक्खूहो, तिसर्या प्रकारची माणसे स्वहितासाठी अथवा परहितासाठीही झटत नसतात. 

९. ‘असा माणुस स्वतःच्या ठिकाणची विषयवासना, क्रोध आणि अविद्या यांचे निर्मूलन करीत नाही; त्याप्रमाणेच दुसर्यांनाही तसे करण्यास सांगत नाही. 

१०. ‘हा मनुष्य स्वत:चे अथवा दुसर्याचेही हित साधण्यासाठी प्रयत्न करीत नाही.

११. ‘भिक्खूंनो, चौथ्या वर्गाची माणसे स्वकल्याण आणि परकल्याणासाठी झटत असतात. 

१२. “अशी माणसे स्वत:मधील विषयभावना, क्रोध आणि अविद्या यांच्या नाशासाठी झटत असतात. त्याप्रमाणेच दुसर्यांना ते विषयवासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगतात. 

१३. ‘अशी माणसे स्वहित व परहितासाठी झटणारी होत. या शेवटल्या प्रकारच्याच माणसांना न्यायी आणि सज्जन मानावे.)

 

६. शुभकर्मांची (कुशल कर्मांची) आवश्यकता

१. एके समयी भगवान भिक्खूंना म्हणाले,

२. “सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. सौख्य, ईप्सित, प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म. सत्कर्माचा लाभ म्हणजे ईप्सित, प्रिय आणि आनंददायक वस्तूंचा लाभ. या गोष्टीचा मी अनुभव घेतला आहे नि त्याची ग्वाही मी देऊ शकतो.” 

३. “मी वारंवार स्वतःला विचारतो, हे जे मी फळ चाखीत आहे, तो कोणत्या कृत्याचा परिणाम? मला जे सध्या सौख्य आणि शांति लाभली आहे तो कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे?”

४. “आणि त्याचे उत्तर मला असे मिळते की, हे तीन प्रकारच्या सत्कर्मांचे फळ आहे. तो तीन प्रकारच्या सत्कर्माचा परिपाक होय. दान, शील, संयम, ह्या तीन सत्कर्माचा परिपाक होय.

५. “शुभ, उत्सवमय, आनंददायक आणि धन्य ती प्रभात! तोच खरा शुभ दिन. तोच खरा सुखमय क्षण. जेव्हा सत्पात्री दान दिले जाते, ज्या वेळी शुभ कर्मे, शुभ वचन, शुभ विचार आणि शुभ इच्छा ह्या त्यांच्या कर्त्याला शुभ लाभ घडवून देतात. ती वेळ आणि तो दिवस खरोखरच शुभ आणि आनंददायक होय. 

६. ‘ज्यांना असा लाभ होतो, समृद्धी मिळते ते खरोखरच सुखी होत. तुम्हीही त्याप्रमाणेच समृद्ध, निरामय आणि आपल्या आप्तेष्टांसह सुखी व्हावे. 

७. शुभ संकल्पाची आवश्यकता

१. एके समयी श्रावस्तीतील जेतवनात राहात असता भगवान भिक्खूंना उद्देशून म्हणाले, 

२. पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.’

३. ‘कोणते शुभ संकल्प करावेत हे मी तुम्हाला सांगतो ते ऐका.

४. ‘असा शुभ संकल्प करा की, आयुष्यभर मी आपल्या माता-पितरांचे परिपालन करीन. मी माझ्या कुळाच्या कुलपतीचा आदर करीन. माझी वाणी सदैव मृदू राहील. मी कोणासंबंधी वाईट बोलणार नाही. स्वार्थाचा कलंक प्रक्षाळून मी माझे अंतःकरण स्वच्छ करीन. औदार्याने, शुद्ध हस्ताने दान करण्यात आनंद मानीत राहीन. आपल्याला जे लाभेल त्याचा भाग दुसर्याला देण्यात समाधान मानीन. वर मागण्यास योग्य असा मी पुरुष होईन. 

५. “आयुष्यभर शांत राहीन, क्रोध उत्पन्न झालाच तर त्याचा तात्काळ मी निरोध करीन. 

६. ‘भिक्खूंनो, असे हे सात प्रकारचे संकल्प आहेत. जे केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल.! 

 

सदाचरणावरील प्रवचने

१. सदाचरण म्हणजे काय ?

१. एके समयी भगवान एका थोर भिक्खूसंघासह कोसल जनपदात चारिका करीत असता ते कोसलच्या झाला नावाच्या गावी आले.

२. ही वार्ता झालामधील ब्राम्हण कुलपतींच्या कानी आली.

३. त्या भगवान बुद्धाचे दर्शन घेणे बरे असे वाटल्यावरून ते झाला ग्रामचे ब्राम्हण भगवंताकडे आले आणि कुशल विचारून बाजूला स्थानापन्न झाले.

४. त्यांनी भगवंताना सदाचरणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले.  

५. त्या श्रवणोत्सुक व्राम्हणांस भगवंतानी सांगितले, ‘ शारीरिक दुराचरणाचे आणि दुष्टपणाचे तीन प्रकार आहेत. वाचिक आणि वैचारिक दुराचरणाचे अनुक्रमे चार व तीन प्रकार आहेत. 

६. : शारीरिक दुराचरणाचे प्रकार येणेप्रमाणे : यांत मनुष्य पारधी म्हणून आपल्या रक्‍तरंजित हाताने हिंसाधीनतेने सजीव प्राण्याची निर्दयतेने हत्या करीत असतो. दुसर्या प्रकारच्या शारिरिक दुराचरणात मनुष्य जे आपले नाही ते घेतो. गाव आणि जंगल यांमधील लोकांची मालमत्ता चोरून आपलीशी करतो. तिसर्या प्रकारच्या दुराचरणात मातापिता, बंधुभगिनी यांच्या स्वाधीन असलेल्या, वाळझगनिश्वय होऊन वाडगनिश्चयाच्या माला धारण करणार्या कन्येशी व्यभिचार करणे यांचा समावेश होतो.

७. वाचिक दुराचरणात प्रथम खोटेपणा मोडतो. यांमध्ये सभेत अथवा गावाच्या, कुटुंबाच्या, राजाच्या अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीच्या परिषदेसमोर साक्ष देताना जे माहीत नाही ते माहीत आहे, जे माहीत आहे ते माहीत नाही, जे पाहिले नाही ते पाहिले, पाहिले ते पाहिले नाही, अशा तर्हेची स्वार्थासाठी अथवा कुणा माणसासाठी अथवा य:कश्चित लाभाच्या अभिलाषेने मनुष्य जाणूनबुजून साक्ष देतो. दुसर्या वाचिक दुराचरणांत चुगलखोरीचा समावेश होती. या दुराचरणांनी मुक्‍त असलेला मनुष्य, माणसाची मने दुसर्या माणसाविरुद्ध कलुषित करण्यासाठी इथे कानी पडलेल्या गोष्टी तिथे सांगत सुटतो. असा मनुष्य माणसा-माणसांतील ऐक्य मोडणारा. व कलागती लावणारा असतो; कलागती लावण्याची त्याची नियत त्याला बोलायला लावते. कलागती हे त्याचे सुख आणि आनंद होय. तिसर्या प्रकारच्या वाचिक दुराचरणाने युक्‍त असलेल्या मनुष्याची वाणी कडवट असते. त्याचे शब्द असंस्कृत, कठोर, तीव्र, मर्मभेदी, क्रोध आणणारे आणि चित्त विचलित करणारे असतात. चौथ्या प्रकारच्या दुराचरणांनी युक्‍त असलेला मनुष्य म्हणजे सदैव बडबड करणारा माणुस. तो बडबडताना आपण सत्य सांगतो की नाही, काही हितकर बोलतो आहोत किंवा नाही याचा विचार करीत नाही. त्याच्या बोलण्यात धर्मही नसतो. नीतीही नसते. काही तरी क्षुद्र, अनुचित, पोरकट, ज्याला बुंधा नाही, शेंडा नाही अशी निरर्थक बडबड तो नेहमी करीत असतो.

८. ‘ वैचारिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकारात, लोभविकृतीचा समावेश होतो. असा मनुष्य परधनाचा सारखा हव्यास धरीत असतो. दुसर्या प्रकारच्या दुराचरणात दुसर्याचा दु:स्वास, द्वेष यांचा अंतर्भाव होतो. असा मनुष्य दान, त्याग, दक्षिणा अशा काही गोष्टीच नाही असे मानतो. त्याला वाटते सत्कर्म किंवा असत्कर्म यांची फळे भोगावी लागतात हे खरे नव्हे; इहलोक आणि परलोक हे सर्व झूट आहे असे तो मानतो. आईबाप, आप्तेष्ट यांनाही तो मानत नाही. ज्यांनी सम्यक्‌ मार्गाने जाऊन इहपरलोकाचे ज्ञान मिळवले आहे आणि दुसर्यांना ते ज्ञान दिले आहे असे श्रमण आणि ब्राम्हण या जगात आहेत, या गोष्टीवर त्यांचा विश्वास नसतो.

९. ‘ याच्या उलट शारीरिक, वाचिक आणि वैचारिक सदाचरणाचे अनुक्रमे तीन, चार आणि तीन प्रकार आहेत. 

१०. शारीरिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य कोणत्याही जीवाची ह्त्या करण्यापासून पराड्मुख असतो. आपला दंडा किंवा तलवार याचा त्याग करतो. तो निरपराधी व दयामय बनतो. सर्व सजीव प्राण्यांसंबंधी करुणामय असे जीवन जगत असतो. दुसर्या प्रकारचे शारीरिक सदाचरण म्हणजे, दिल्याशिवाय दुसर्याचे न घेणे  आणि प्रामाणिकपणे जगणे. तिसर्या प्रकारात सर्व प्रकारच्या वैषयिक मिथ्याचारांचा त्याग करणे, अव्यभिचारी राहणे यांचा समावेश होतो. असा सदाचरणी मनुष्य आई-बाप, बंधुभगिनी, आप्तेष्ट यांच्या स्वाधीन असलेल्या, जिच्या गळ्यात वाळगनिश्चवयाची माळ आहे अशा कन्येशी तो वैषयिक संबंध ठेवत नाही. 

११. : वाचिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य असत्य भाषण सोडून देतो. असत्याचा त्याग करतो. त्यापासून दूर राहतो. त्याला सभेसमोर किंवा गाव कुटुंब, राजकुल अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीसमोर साक्ष द्यावयास सांगितली असता, जे माहीत नाही ते तो माहीत नाही म्हणून सांगतो, जे माहीत आहे ते माहीत आहे म्हणून सांगतो. जे पाहिले नाही ते पाहिले नाही म्हणून सांगतो आणि जे पाहिले ते पाहिले म्हणून सांगतो. स्वार्थासाठी, दुसर्यासाठी अथवा क्षुद्र लाभासाठी तो कधीही बुद्धीपुरस्सर खोटे बोलत नाही. दुसर्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य चुगलखोरीचा त्याग करतो. निदेपासून परावृत्त होतो. लोकांमध्ये कलागती लावण्यासाठी जे इथे ऐकले ते तिथल्या लोकांना सांगत नाही आणि जे तिथे ऐकले ते इथल्या लोकांना सांगत नाही. तो ऐक्यनिर्माता आणि प्रेमभाव वाढविणारा असतो. माणसामाणसांत सुसंवाद, ऐक्य राखणे हेच त्याचे सूख आणि आनंद होत. तिसर्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य कटु शब्दांचा त्याग करतो. त्यापासून परावृत होतो. तो जे काही बोलतो त्यात खवचटपणा नसतो. त्याचे भाषण आल्हाददायक, मैत्रीचे, कळकळीचे, सुसंस्कृत, हितकर आणि सर्वांना स्वागतार्ह असते. चौथ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य व्यर्थ बडबड  करीत नाही. तो उचित आणि वास्तविक आणि नेहमी लाभदायक असे बोलतो. योग्य, संस्मरणीय, उद्‌बोधक, व्यवस्थित आणि अति हितकर अशा रीतीने तो धर्म आणि नीतीसंबंधी भाषण करतो. 

१२. ‘वैचारिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्याच्याठिकाणि लोभाविष्टपणाचा अभाव असतो.

  • ( १) परधन आपले व्हावे अशी हाव तो कधीही धरीत नाही. 

  • ( २ ) दुसर्यासंबंधी दु:स्वास अथवा द्रेष यांना तो आपल्या विचारात स्थान देत नाही. आपल्या भोवतालचे प्राणी निर्वेर, सुखी, सुरक्षित आणि कोणत्याही प्रकारच्या शत्रुत्वापासून आणि छळापासून दूर रहावे अशी त्याची इच्छा असते. 

  • ( ३ ) त्याची दृष्टि सम्यक आणि संकल्प हे प्रमादरहित असे असतात.

१३. ‘ दुराचरण आणि सदाचरण यांचा मी असा अर्थ लावतो.

 

२. सदाचरणाची आवश्यकता

१. एकदा भगंवतांनी पाटली गावातील आपल्या उपासकांना असा उपदेश केला.

२. ‘ गृहस्थहो, दुष्ट आणि अनीतिमान गृहस्थाला असे दुष्परिणाम सोसावे लागतात. 

३. ‘ दुष्ट आणि अनीतिमान मनुष्याला आळसामुळे द्रव्यहानी सोसावी लागते. 

४. ‘ नंतर त्याची अपकीर्ती जगात पसरते आणि लोक त्याला मान देईनासे होतात.

५. ‘ ज्या लोकांच्या समाजात तो जातो, मग ते क्षत्रिय असोत, ब्राम्हण असोत, गृहपती असोत, अथवा श्रमण असोत, त्यांच्यामध्ये तो लाजतो आणि मनात गोंधळतो. तो निर्भय नसतो. हा त्याचा तिसरा तोटा होय. 

६. ‘ परत त्याला मानसिक शांती लाभत नाही. अशाच मानसिक अणांततेत त्याचे मरण ओढवते. हा त्याचा चौथा तोटा होय.

७. : दुष्ट आणि अनीतीमान माणसाची, हे गृहस्थहो, अशा प्रकारची हानी होते. 

८. ‘याच्या उलट जी माणसे सज्जन, शीलवान आहेत त्यांना काय लाभ होतो याचा विचार करा.

९, ‘ सज्जन, शीलवान मनुष्याला त्याच्या परिश्रमामुळे विपुल द्रव्यलाभ होतो.

१०. ‘ त्याची सत्कीर्ती जगभर पसरते. त्याला सर्वत्र मान मिळतो.

११. ‘ तो क्षत्रियांच्या, ब्राम्हणांच्या, गृहपतींच्या अथवा श्रमणांच्या समाजात जाऊन तेथे निःसंकोच आणि आत्मविश्वासाने प्रवेश करीत असतो. 

१२. त्याला मानसिक शांती लाभलेली असते कधीही, मरतेसमयीही तो शांत चित्ताने देहत्याग करतो. 

१३. ‘ मूर्ख मनुष्याला, तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो त्यातील मूर्खपणा कळत नाही. अग्नीप्रमाणे त्याची पापे त्याचा नाश करीत असतात. 

१४. : जो कोणी निरुपद्रवी, निष्पाप अशा प्राण्याला दुःख देतो त्याच्या वाट्याला महान आपदा, मानसिक अशांति, आप्तेष्टांचा वियोग अरणि द्रव्यहानी येत असते.’ 

 

३. सदाचार आणि जगाचे अधिकार

१. एके समयी भगवान्‌, खारींना जेथे दाणे खायला घालीत त्या राजगृहातील वेळू-वनात राहात होते. त्या वेळी स्थविर सारीपुत्त एका मोठ्या भिक्खु संघासह दक्षिण पहाडामध्ये चारिका करीत होता. 

२. वाटेत राजगृहामध्ये राहिलेला एक भिक्खू सारीपुत्ताला भेटला. औपचारिक अभिवादनादी प्रकार झाल्यावर सारीपुत्ताने त्याला भगवंताचा कुशल समाचार विचारला. भिक्खूने भगवंत व भिक्सूसंघ यांचे कुशल सांगितले. त्याप्रमाणेच सारीपुत्ताने विचारल्यावरुन राजगृह नगरात तंडूलपालदारपालाशी राहणार्या धनंजानी ब्राम्हणाचा कुशल समाचार सांगितला.

३. सारीपुत्ताने त्याला पुढे विचारले. ‘ब्राम्हण धनंजानी अप्रमादपूर्वक वागतो का? 

४. भिक्खूने उत्तर दिले, ‘ धनंजानी कसला अप्रमादपूर्वक राहु शकणार? तो राजाचा उपयोग ब्राम्हण आणि गृहस्थ यांना नागवण्यासाठी आणि ब्राम्हण आणि गृहस्थ यांचा उपयोग राजाला लुबाडण्यासाठी करतो. सुशील कुळातून आलेली त्याची सुशील पत्नीही मरण पावलेली आहे आणि त्याने अलीकडे दुसरी पत्नी केली आहे. ती सुशील कुळातली नाही व स्वतःही सुशील नाही.’ 

५. यावर सारीपुत्त बोलला, धनंजानीची प्रमादशीलता ही फार वाईट वार्ता आहे; फार वाईट. एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी तो मला भेटेल, त्या वेळी यासंबंधी मी त्याच्याशी बोलेन. 

६. दक्षिण पहाडातील आपला वास पुरा केल्यानंतर सारीपुत्ताने आपली चारिका पुढे चालू केली आणि तो राजगृहाला आला. तेथे त्याने वेळूवनात वस्ती केली. 

७. सकाळी वस्त्र परिधान करून,भिक्षापात्र हाती घेऊन तो राजगृहात भिक्षेसाठी गेला. त्या वेळी ब्राम्हण धनंजानी हा त्याच्या गाईचे दूध ज्या कुरणात काढले जात होते तेथे देखरेख करण्यासाठी गेला होता.

८. भिक्षा संपवून परत आल्यावर सारीपुत्ताने भोजन केले आणि नंतर धनंजानीला गाठले. त्यांना येत असलेले पाहून ब्राम्हण त्याला भेटायला पुढे गेला आणि म्हणाला, भोजनापूर्वी आपण दुग्धपान करू या.’

९. सारीपुत्ताने उत्तर दिले, ‘ नको ब्राम्हणा, माझे जेवण झाले आहे आणि दुपारच्या वेळी मी एका झाडाखाली विश्रांती घेणार आहे. तूच तेथे ये.’

१०. धनंजानीने ते मान्य केले आणि आपल्या भोजनानंतर तो सरिपुत्ताला भेटावयाला गेला. सारीपुत्ताला अभिवादन करुन तो त्याच्या बाजूला बसला. 

११. सारीपुत्ताने त्याला विचारले, ‘ सदाचरणासंबंधीचा तुझा उत्साह आणि कळकळ कमी झाली ना? 

१२. तो ब्राम्हण म्हणाला, ‘ ती कशी कायम राहणार? कारण मला आता माझे आईबाप, पत्नी, कुटुंबदास, कामकरी यांचे पालनपोषण करावयाचे असते. याशिवाय ओळखीचे लोक, मित्र, आप्त-इष्ट आणि पाहुणे-अतिथी यांना पाहुणचार करावयाचा असतो. माझ्या मृत पूर्वजांचे श्राद्ध करायचे असते. देवदेवतांना बळी द्यायचे असतात. राजाला करभार चुकवयाचा असतो आणि उपरान्त मला स्वत:साठी मांस आणि पेयाची तरतूद करायची असते.’

१३. सारीपुत्ताने विचारले, ‘ धनंजानी, तुला असे वाटते काय की एखाद्या माणसाने आपल्या आईबापासाठी सदाचरण आणि न्याय यांना सोडून वर्तन केले आणि ह्यासंबंधी त्याला जाब विचारला असताना तो अशी सबब सांगू शकेल काय की, मी माझ्या आईबापासाठी हे सर्व केले! त्यांच्यासाठी सदाचरण आणि न्याय यांचे उल्लंघन केले म्हणून मला शिक्षा करू नका.

१४. ‘नाही.’ धनंजानी म्हणाला, “अशा काहीही सबबी दिल्या तरी दैवीचा कारावास चुकणार नाही. 

१५. सारीपुत्त : ‘ तो स्वतः किंवा त्याची पत्नी आणि कुटुंब त्याच्यासंबंधी असे समर्थन करू लागले की, त्याने केलेले न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन हे आमच्यासाठी केले, तर त्याचा काही उपयोग होईल काय?” 

१६. धनंजानी : ‘ नाही.

१७. सारीपुत्त : ‘ त्याचे दास म्हणू लागले की, हे सर्व त्यांनी आमच्यासाठी केले तर त्याचा काही उपयोग होईल का?”

१८. धनंजानी : ‘ नाही. तिळमात्र उपयोग होणार नाही.

१९. सारीपुत्त : ‘ किंवा त्याचे मित्र आणि ओळखीपाळखीचे लोक त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा उपयोग होईल का?

२०. धनंजानी : ‘नाही! तिळमात्रही उपयोग होणार नाही. 

२१. ‘ किंवा त्याचे आप्तेष्ट आणि अतिथी त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का? 

२२. ‘ नाही ! तिळमात्रही नाही.’ 

२३. ‘ किंवा जर त्याचे भूत-पितर देवदेवतांसाठी किंवा राजासाठी त्याने हे केले असे समर्थन करू लागले तर ते चालेल काय?

२४. ‘ नाही! तिळमात्रही चालणार नाही.! 

२५. तो किवा इतर लोक त्याने केलेले सदाचरणाचे आणि न्यायाचे उल्लंघन हे सर्व आम्हाला अन्न आणि पेय मिळवून देण्यापायी केले असे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का?’ 

२६. ‘ नाही! 

२७. सारीपुत्त : ‘ जो आपल्या आईबापासाठी न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन करतो, आणि जो कसलीही वेळ आली तरी न्याय आणि सदाचरणाचा मार्ग सोडीत नाही, यांपैकी धनंजानी, कोणता मनुष्य अधिक चांगला ठरतो?” 

२८. धनंजानीने उत्तर दिले, ‘ दुसर्या प्रकारचा. कारण न्याय आणि सदाचरणाने वागणे हे अर्थात त्याच्या उल्लंघनापेक्षा श्रेयस्कर आहे.’

२९. ‘ धनंजानी, आपल्या आईबापांचे पोषण करण्याचे न्याय आणि सदाचरणाचे असे दुसरे मार्ग आहेत. त्यासाठी दुष्कृत्ये करण्याची आवश्यकता नाही आणि हे मार्ग पत्नी, कुटुंब आणि इतर सर्वांच्याही परिपोषणाला मोकळे नाहीत का?” सारीपुत्ताने विचारले. 

३०. धनंजानी : ‘ सारीपुत्ता ते मार्ग मोकळे आहेत.! 

३१. यानंतर सारीपुत्ताच्या ह्या भाषणाने प्रसन्न होऊन त्याचे आभार मानून धनंजानी उठला आणि आपल्या गृही परत गेला.

 

४. सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल 

१. श्रावस्ती येथील जेतवनात भगवान वास करीत असता त्यांच्याकडे पाचशे उपासक आले. त्यात धाम्मिक हा होता.

२. धाम्मिकाने भगवंतांना विचारले, ‘ कोणत्या तत्वाच्या परिपालनाने आपल्या अनुयायांना सदाचरणात पूर्णता साधता येते?*

३. : मी आपणाला हा प्रश्‍न विचारीत आहे, याचे कारण माणसाचे कल्याण कशात आहे, हे ठरविण्यात आपल्यासारखा दुसरा कोणी नाही.’

४. ‘ सुशिक्षित जैन आणि परिब्राजक यांनाही आपले मतखंडनात यश आले नाही. वयोवृद्ध सुशिक्षित ब्राम्हण आणि ज्यांना आपले मत मांडण्याची फार हौस, त्या सर्वांनी आपला विमोचक सिद्धान्त मान्य केला. आपला विमोचक सिद्धान्त समजायला कठिण असला तरी तो आपण इतका सुलभ करून दाखविता की, तो ऐकण्यासाठी सर्व उत्सुक असतात. भगवान, म्हणून माझ्या प्रश्‍नाचे उत्तर द्या.’ 

५. ही दैवी विद्या आपल्या मुखातून आम्हा उपासकांना ऐकू द्या. 

६. उपासकांच्या संबंधीच्या करुणेने भगवंताने उत्तर दिले, ‘ ऐका तर. मी आपणाला शुद्धाचरणाची तत्वे सांगत आहे; ती ऐकावी आणि तदनुसार वर्तन करावे. 

७. ह्त्या करू नका, देहान्त शासन करु नका. हिसेला अनुज्ञा देऊ नका. कोणत्याही प्रकारच्या जीवाला. , मग तो सबल असो अथवा दुर्बल असो, दुःख देऊ नका. 

८. उपासकांनी स्वतः चोरी करु नये. दुसर्याला चोरी करण्याची परवानगी देऊ नये. अथवा चोरीला संमतीही दर्शवू नये. जे स्वेच्छेने दिले जाते तेवढेच घ्यावे. 

९. ‘अब्रम्हचर्य जणू काय अग्नीची गर्ता आहे असे समजून त्याचा त्याग करावा. ब्रम्हचर्य साधत नसेल तर निदान विवाहित परस्त्रीशी समागम करू नये. 

१०. ‘सभांत, न्यायगृहात अथवा नेहमीच्या संभाषणात असत्य बोलू नये. त्याप्रमाणेच असत्य भाषणाला प्रोत्साहन अथवा संमती देऊ नये. असत्याचा त्याग करावा. 

११. ‘उपासकांनी मद्यपान करू नये. दुसर्याला मद्य पाजू नये. मद्यपानाला संमती देऊ नये. मद्यपानाने बुद्धी भ्रंश होतो. हे लक्षात ठेवा. 

१२. ‘ मद्यपान करणारे मूर्ख पाप करतात आणि आपल्या इतर उपासक बांधवाना पापास प्रवृत्त करतात. तेव्हा हे बुद्धीभ्रंश करणारे व्यसन हा मूर्खपणा, आणि * मूर्खाचा स्वर्ग” ह्यांपासून परावृत व्हा. 

१३. : हत्या करू नका. चोरी करू नका. खोटे बोलू नका. उन्मादक पेय सेवन करू नका. व्यभिचार करू नका. भर रात्री कुग्रास अन्न सेवन करू नका. 

१४. ‘ गंधमाला धारण करू नका. आपला बिछाना भूमीवर पसरा. प्रत्येक उपोषणाच्या दिवशी हे व्रत ग्रहण करा आणि शुद्ध अंतःकरणाने हे अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा. 

१५. ‘प्रात:काळी हे व्रत ग्रहण करून धर्मशाली व श्रद्धायुक्त चित्ताने याचकांना अन्नपाणी दान करा. 

१६. ‘ आपल्या आईबापांचा मान राखा. चांगला व्यवसाय करीत जा. या मार्गाचे एकनिष्ठतेने अवलंब करणारा उपासक उच्च्चपद प्राप्त करील.’ 

 

५. सदाचरणाच्या मार्गावर सहचार्यासाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही

१.  रणसंग्रामातील हत्ती शरप्रहार सहन करतो त्याप्रमाणे या जगात मी माणसाचे कटु शब्द सहन केले पाहिजेत. 

२. हत्तीला माणसाळवून युद्धात नेतात. माणसाळवलेल्या हत्तीवरच च राजा आरोहण हण करतो. त्याप्रमाणेच ज्याला कटु शब्दाने राग येत नाही तोच सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य होय. 

३. ‘ शिकवलेली खेचरे चांगली असतात. सिंधु देशातील जातिवंत अश्व आणि बलवान गजराज हे सर्व खरोखर चांगले असतात; परंतु या सर्वांहून आत्मसंयमी पुरुष श्रेष्ठ होय. 

४. : अश्व, गज ही सर्व वाहने, आपणाला निर्वाणाला नेऊ शकत नाहीत. त्या मार्गावर आत्मसंयमाचे आत्मवाहनच चालू शकते.

५. ‘ अप्रमादी राहण्यात आनंद माना. आपल्या विचारावर अविश्रान्तपणे लक्ष असू द्या. ज्याप्रमाणे चिखलात रुतलेल्या तलल्या हत्तीला मोठ्या ठ्या श्रमाने मान बाहेर हेर काढतात त्याप्रमाणेच आश्रमाणच प्रयासाने यासाने स्वतःचे कुमार्गापासून मागापासून विमोचन माचन करा.  

६. ‘ सद्र्तनी, दृढ मनाचा आणि बुद्धीमान असा सहप्रवासी तुम्हाला आढळला तर आपल्या सर्व चिंता मागे टाकून, आनंदाने त्याच्या मागून चालू लागा. 

७. ‘ सद्र्तनी, दृढ मनाचा आणि बुद्धीमान सहप्रवासी तुम्हाला सापडला नसेल तर शत्रूने पाठलाग चालविलेला राजा ज्याप्रमाणे आपले राज्य सोडून रि वनातील गजराजा प्रमाणे एकटाच पुढे जातो त्याप्रमाणेच तुम्ही आपल्या मार्गावर एकटेच जात रहा.

८. “एकांत पत्करला, परंतु मूर्खाची मैत्री नको. दुष्कृत्ये न करता एकटेच रहा. आपल्या गरजा मर्यादित करून एकटेच रहा. वनातील गजराज एकटाच खात फिरतो, त्याप्रमाणे एकांत पत्करा. 

९. ‘ कुविचार मनातून उखडून टाका.

१०. ‘ ते उखडून टाकण्याचा मार्ग असा आहे.

११. ‘ जरी दुसरे उपद्रव करीत असले तरी मी उपद्रव करणार नाही असा निग्रह करून कुविचार उखडून टाका. 

१२. ‘ जरी दुसरे हत्या करीत असले तरी मी हत्या करणार नाही. 

१३. ‘ जरी दुसरे चोरी करीत असले तरी मी चोरी करणार नाही.

१४. ‘ जरी दुसरे पवित्र जीवन आचरीत नसले तरी मी ते आचरणारच.

१५. ‘ जरी दुसरे खोटे बोलत असले, निंदा करीत असले, विरुद्ध बोलत असले तरी मी तसे करणार नाही. 

१६. ‘ जरी दुसरे लोभाविष्ट असले तरी मी परधनाचा लोभ धरणार नाही.

१७. ‘ जरी दुसरे मत्सरी असले तरी मी इतरांच्याबद्दल सदिच्छा बाळगीन.

१८. ‘जरी दुसर्याची दृष्टी, संकल्प, वाणी, कृती, उपजीविकेचे मार्ग, साधना, स्मृती, समाधी चुकीची असली तरी  तुम्ही मात्र सम्यक्‌ दृष्टी, सम्यक्‌ संकल्प, सम्यक्‌ वाचा, सम्यक्‌ कर्म, सम्यक्‌ उपजीविका, सम्यक्‌ व्यायाम, सम्यक्‌ स्मृती, आणि सम्यक्‌ समाधी — या अष्टांग मार्गाचा अवलंब करा. 

१९. ‘जरी दुसरे आर्य सत्यासंबधी, मोक्षासंबंधी चुकत असले तरी तुम्ही मात्र त्यासंबंधी बरोबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

२०. ‘ जरी दुसरे आळस, सुस्तपणा यांनी पछाडलेले असले तरी तुम्ही मात्र या दोषांपासून मुक्‍त असले पाहिजे. 

२१. ‘ जरी दुसरे गर्वोद्धत असले तरी तुम्ही विनयशील राहिले पाहिजे. 

२२. ‘ जरी दुसरे शंकानी पछाडलेले असले तरी तुम्ही निःशंक राहिले पाहिजे. 

२३. ‘जरी दुसरे क्रोध, दुष्ट बुद्धी, द्वेष, मत्सर, कार्पण्य, लोभ, ढोंग, कपट, निवूंजपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, नीतिहीनता, शिक्षणाचा अभाव, सुस्तपणा, गोंधळ, अज्ञान यांनी युक्‍त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे.’

 

निब्बाणावरील प्रवचने

१. निब्बाण म्हणजे काय ?

१. एके समयी भगवंत श्रावस्ती येथील अनाथपिंडीकाच्या आश्रमात सारीपुत्तासह राहात होते. 

२. तेथे भिक्खुंना उद्देशून  भगवंत म्हणाले, ‘ भिक्खूहो, ऐहिक मालमत्तेऐवजी माझ्या धम्माचे तुम्ही भागीदार व्हावे आणि हे घडून यावे म्हणून तुमच्या संबंधीच्या करुणेने मी काळजीत असतो. 

३. इतके बोलून भगवंत उठले आणि आपल्या गुंफेकडे निघून गेले. 

४. सारीपुत्त मागे राहिला होता. भिक्खुंनी त्याला निब्बाण्णाचा अर्थ सांगावयाची विनंती केली.

५. तेव्हा भिक्खूंना उत्तरादाखल सारीपुत्त म्हणाला, ‘ भिक्खुंनो, लोभ हा अत्यंत अकुशल धर्म आहे. क्रोधही अत्यंत अकुशल धर्म आहे. 

६. हा लोभ आणि हा क्रोध यांचा निरास कसा करावा हे मध्यम मार्ग शिकवतो. तो पाहायला डोळे देतो, दृष्टी देतो आणि ज्ञान देतो. तो आपणास णांती, प्रज्ञा, बोधी आणि निब्बाण यांच्या मार्गाने नेतो. 

७. ‘तो मध्यम मार्ग कोणता? तो अष्टांग मार्गापेक्षा वेगळा नाही. सम्यक्‌ दृष्टी, सम्यक्‌ संकल्प, सम्यक्‌ वाचा, सम्यक्‌ कर्म, सम्यक्‌ उपजीविका, सम्यक्‌ प्रयत्न, सम्यक्‌ स्मृती आणि सम्यक्‌ समाधी हा मध्यम मार्ग होय. 

८. क्रोध, दुष्ट बुद्धी, द्रेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, उद्गटपणा, गर्व, सुस्तपणा हे सर्व अकुशल धर्म आहेत. 

९. गर्व, सुस्तपणा, यांचा निरास करण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. तो पाहायला दृष्टी आणि ज्ञान देतो. शांति, प्रज्ञा आणि बोधी यांकडे नेणारा तो मार्ग आहे.

१०. निब्बाण म्हणजे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग होय.

११. त्या महास्थविर सारीपुत्ताच्या भाषणाने ते भिक्खू आनंदित झाले.  

 

२. निब्बाणाची मूलतत्वे

१. एकदा पूजनीय राधा हा भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून बाजूला बसून भगवंताना त्याने प्रश्‍न केला. ‘ भगवन, निब्बाण म्हणजे काय?”

२. ‘ निब्बाण म्हणजे विकारापासून मुक्‍ती.!

३. ‘ भगवान, परंतु निब्बाणाचे उद्देश काय?”

४. ‘ निब्बाणस्थितीत राहून पुण्यशील जीवन जगता येते. निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय आणि साध्य होय.’ 

(प)

१. एकदा भगवन्त श्रावस्ती येथील अनाथपिण्डकाच्या जेतवनात वस्ती करीत होते, त्या वेळी भिक्खुंना बोलावून ते म्हणाले, ‘ भिक्खूहो, 

२. ‘ नीच लोकांकडे ओढून नेणारी आणि मी तुम्हांस सांगितलेली पाच बंधने तुम्हाला आठवतात काय ?”

३. यावर स्थविर मालुंक्यपुत्त भगवंतास म्हणाला,

४. : भगवंत, ती पाच बंधने मला माहीत आहेत.’

५. ‘ मालुंक्यपुत्ता, ती कोणती ते सांग.

६. : भगवन्त, हे शरीर मी आहे – ही जाणीव, मानसिक अस्थिरता, धार्मिक कर्मे आणि विधी यांवर सर्व काही अवलंबून आहे असे मानणारी नैतिक सदोषता, एंद्रिय सुखाने उद्भवणारा उन्माद, आणि दृष्ट बुद्धी, ही भगवंतानी सांगितलेली माणसाला नीच जगाशी जखडणारी पाच बंधने होत; आणि ही पाच बंधने भगवान, मला माहीत आहेत.

७. मालुंक्यपुत्ता, कोणाच्या अनुषंगाने ही पाच बंधने मी सांगितली हे तुला माहीत आहे काय ? अन्य मार्गाचे अनुयायी अर्भकाचे उदाहरण देऊन पुढीलप्रमाणे बोलून तुला नाव ठेवणार नाहीत काय?”

८. ‘ मालुंक्यपुत्ता, अर्भकावस्थेत आपल्या पाठीवर लोळणार्या अबोध बालकाचे शरीर अविकसित असते. मग त्याच्या ठिकाणी शारीरिक जाणीव कशी निर्माण होईल?

९. त्याप्रमाणेच आपल्या पाठीवर लोळणार्या या अबोध अर्भकाचे मन अविकसित असते. त्याच्या ठिकाणी मानसिक अस्थिरतेची अवस्था कशी उद्भवणार? हे खरे की, तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी अस्थिरतेची वृत्ती सुप्तावस्थेत असते.’ 

१०. ‘ मालुंक्यपुत्ता, त्याप्रमाणेच ते अर्भक नैतिक आचार कसा करणार? त्याच्या ठिकाणी धार्मिक विधी आणि कर्मे यांवर अवलंबून राहण्याची नैतिक सदोषता कशी असणार ? तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी ती वृत्ती सुप्तावस्थेत असते.

११. ‘मालुंक्यपुत्त त्या अर्भकाच्या ऐंद्रिय वासना अविकसित असतात. मग एंद्रिय सुखापासून उद्भवणारा उन्माद ते कसा जाणणार ? परंतु तशी वृत्ती सुप्तावस्थेत त्याच्या ठिकाणी असते.! 

१२. ‘शेवटी, हे मालुंकयपुत्ता, त्या अर्भकाच्या दृष्टीने दुसर्या जीवांना अस्तित्व नाही. मग ते प्राणिमात्रांसंबंधी आपल्या मनात दृष्ट बुद्धी कशी धरणार? परंतु तशी वृत्ती त्याच्या ठिकाणी सुप्तावस्थेत असते.’ 

१३. ‘ मालुंक्यपुत्ता, ते अन्य पंथाचे अनुयायी अशा रीतीने लहान अर्भकाचे उदाहरण देऊन तुला नावे ठेवणार नाहीत काय?”

 १४. भगवंताचे हे भाषण संपताच पूज्य आनंद त्यांना म्हणाला, ‘ भगवंत आता वेळ आली आहे. सुगत आता आपली विश्रांती घेण्याची वेळ आलेली आहे.’

 

धम्मावरील प्रवचने

१. सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का ?

१. अष्टांग मार्गांपैकी सम्यक्‌ दृष्टी हे एक थोर तत्व आहे.

२. सम्यक्‌ दृष्टी ही श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि गुरुकिल्लीच आहे.

३. सम्यक्‌ दृष्टीचा अभाव हे सर्व पापाचे मूळ होय.

४. सम्यक्‌ दृष्टीची वाढ व्हायला सर्व सृष्ट चमत्कार हे कार्यकारणभावांची प्रक्रिया आहे, असे पाहायला शिकले पाहिजे. सम्यक्‌ दृष्टी म्हणजे कार्यकारणभावाची ओळख. 

५. भिक्खूहो, ज्यांची दृष्टी, संकल्प, वाणी, कर्म, उपजीविका, साधना, स्मृती आणि समाधी मिथ्या आहेत, ज्यांचे ज्ञान आणि मुक्‍ती ही मिथ्या आहेत, ज्याचे प्रत्येक कार्य, वचन, विचार, ऐच्छिक कार्य, आकांक्षा, निग्रह आणि सर्व व्यापार ही सर्व अशा मिथ्या दृष्टीने साधलेली असल्यामुळे ती तिरस्करणीय, दुःखकर, जुगुप्सा उत्पन्न करणारी आणि हानिकारक असतात. आणि हे सर्व का? तर त्याची दृष्टी मिथ्या असल्यामुळे. 

६. आपला मार्ग बरोबर असणे एवढेच पुरेसे नाही. एखादे बालकही योग्य मार्ग स्वीकारते; परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की, त्या बालकाला मार्गाच्या योग्यायोग्यतेची जाणीव आहे. योग्य मार्गाचे अवलंबन करायचे म्हणजे योग्य मार्गाचे ज्ञान पाहिजे.

७. हे आनंदा, यथार्थ भिक्खू कुणाला म्हणता येईल ? बुद्धिपूर्वक कोणते शक्‍य आहे कोणते अशक्य आहे, ह्या ज्ञानावर ज्याने प्रभुत्व मिळवले आहे त्यालाच यथार्थ भिक्यू म्हणता येईल. 

 

२. मृत्यूत्तर जीवनाची चिंता कशाला करा ?

१. एके समयी स्थविर महाकश्यप आणि स्थविर सारीपुत्त हे बनारसजवळच्या इसिपत्तनमधील मृगदायामध्ये राहात होते.

२. त्या वेळी स्थविर सारीपुत्त सायंकाळी आपला एकांत संपवून अर्हत स्थविर महाकश्यप यांच्याजवळ जाऊन बसले.

३. अशा रीतीने बसल्यावर स्थविर सारीपुत्ताने महाकश्यपाला प्रश्‍न केला, ‘ मित्रा, कश्यपा, मृत्यूत्तर तथागतांना अस्तित्व असते काय?’ 

४. : तथागतांना मृत्यूत्तर अस्तित्व असते किंवा नाही यासंबंधी भगवंतांनी काहीच सांगितलेले नाही.’ 

५. मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व असते आणि अस्तित्व नसते अशा दोन्हीही गोष्टी मानावयाच्या काय?” 

६. ‘ मित्रा, हे सुद्धा भगवंतानी म्हटलेले नाही.! 

७. ‘ तर मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व नाही. अथवा नाही असेही नाही असे म्हणावयाचे काय ?’ ‘ हे सुद्धा भगवंतानी म्हटले नाही.’ 

८. ‘ मित्रा, हे भगवंतानी का म्हटलेले नाही ?’ 

९, ‘ कारण हा प्रश्‍न मानवतेच्या हिताशी किंवा श्रेष्ठ जीवनाच्या तत्वाशी संलग्न नाही. तो प्रश्‍न आपणाला प्रज्ञा किंवा निब्बाण यांपैकी काहीच साधून देत नाही. आणि म्हणूनच भगवंतांनी या प्रश्‍नाचे उत्तर दिलेले नाही. 

 

३. देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे

१. एकदा भगवंत वसिष्ठाला उद्देशून म्हणाले,

२. ‘ ही अचिरवती नदी पुराने भरून दुथडी भरून वाहात असली आणि ज्याला पैलतीरावर काही काम आहे तो येथे आला आणि त्याला पलीकडे जावयाचे असले.’ 

३. ‘ आणि तो ह्या काठावर उभा राहुन पैलतीराला उद्देशून बोलू लागला, ‘ हे पैलतीरा, इकडे ह्या बाजूला ये. 

४. : तर हे वसिष्ठा, अचिरवतीचे पैलतीर त्या माणसाच्या प्रार्थनेने आणि आवाहनाने, अशा करण्याने आणि स्तुती करण्याने त्याच्या जवळ येईल काय?” 

५. त्याचप्रमाणेच हे वसिष्ठा, तीन वेदांत पारंगत असलेले ब्राम्हण ज्या गुणांच्या आचरणाने मनुष्य ब्राम्हणत्वाला पावतो, त्या गुणांचे परिपालन करणे सोडून उलट ज्यांच्या योगाने मनुष्य अब्राम्हण बनतो असले आचार करीत म्हणत राहिले की:

६. इंद्रा, तुला आम्ही आवाहन करीत त आहोत; ब्रह्मा, तुला आम्ही आवाहन करीत गत आहोत; ईशान तुला आम्ही आवाहन करीत आहोत; प्रजापती, तुला आम्ही आवाहन करीत आहोत.

७. ‘ तर वसिष्ठा, हे ब्राम्हण आपल्या आवाहनाने, प्रार्थनेने अशा करण्याने आणि स्तुती करण्याने आपल्या मृत्यूत्तर ब्रम्हाबरोबर एकरूप होतील काय? खरोखर असे कधीच होणार नाही.’

४. विशिष्ट अन्नसेवनाने मनुष्य पवित्र होत नाही

१. एकदा एक ब्राम्हण भगवन्ताना भेटला आणि त्याने त्यांज्याजवळ अन्नाचा माणसाच्या शीलावर होणार्या परिणामाचा प्रश्‍न काढला. 

२. तो ब्राम्हण म्हणाला, ‘ ज्वारी, ताड आणि माड यांची फळे, डाळी, कंदमुळे, आणि अंकुर हे अन्न सदाचरणाने 

मिळवून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. ‘मृतमांस’ खाणे हे वाईट आहे.’

३. यावर भगवन्तानी उत्तर केले, ‘ तू म्हणतोस की, आपण पक्ष्याच्या मांसाची निवडक पक्वाने खातो आणि मृतमांसाला स्पर्श करीत नाही. तर मग तू मृतमांसाची व्याख्या कशी करतोस? 

४. हत्या करणे, शरीर विद्रूप करणे, मार देणे, बांधून ठेवणे, चोरी करणे, खोटे बोलणे, बनावट गोष्टी करणे, कपट. व्यभिचार करणे ही सर्व मृतमांस भोजनेच आहेत; मांस भोजन नव्हे. 

५. कामभोगाची लालसा, खाण्याबाबत वखवख, अस्वच्छ जीवन, परमत असहिष्णुता ही सर्व मृत-मांस भोजनेच आहेत, मांस भोजने नव्हेत.

६. कोणाचीही त्याच्या मागून निदा करणे, क्रौर्य, विश्वासघात, अनिवार्य सर्वशूद्र, कृपणता ही मृत-मांस भोजने आहेत. मांस भोजने नव्हेत.

७. राग, लुच्चेगिरी, विद्रोह, कपट, द्वेष, फुशारकी, गर्व, कुसंगती ही मृत-मांस भोजने आहेत. मांस भोजने नव्हेत.

८. नीच जीवन, निदा, अफरातफर, फसगत करणे, लांडीलबाडी करणे, दुष्टपणे दुसर्याची दुष्कीर्ती करणे ही मृत- मांस भोजनेच आहेत. मांसभोजने नव्हेत. 

९. हत्येस, चौर्यकर्मास प्रवृत्त करणारे सर्व अपराध शेवटी माणसाला नरकात ओढतात. ते सर्व मृत-मांस भोजनेच आहेत. मांस भोजने नव्हेत.

१०. शंका घेणे हाच ज्याचा स्वभाव, असा माणुस मांसमत्स्यसेवनापासून परावृत्त झाला. वस्त्राचा त्याग करून दिगंबर अवस्थेत राहू लागला, शिरावर जटामुकुट वाढवू लागला किंवा शिरोमुंडण करू लागला, वस्तत्राऐवजी कातडी परिधान करू लागला यज्ञयाग करू लागला, पुण्यार्जनासाठी तपश्चर्येचा अवलंब करू लागला, तीर्थात निम्मज्जन करू लागला, आहुती देऊ लागला आणि दुसरेही क्रियाविधी करू लागला- तरी तो कधीही पापरहित होऊ शकणार नाही. 

११. आपल्या इंद्रियावर प्रभुत्व मिळवा, आपल्या सामर्थ्याने संयम करावयास शिका, सत्याची कास धरा आणि करुणामय व्हा. जो सत्पुरुष सर्व बंधनाचा त्याग करून दु:खावर विजय मिळवितो, त्याने काहीही ऐकले – पाहिले तरी त्याला दोष लागत नाही. 

१२. भगवंन्तांची ही उच्च विमोचक सत्ये, मृतमांस म्हणजे काय याचे केलेले निरूपण, आणि दु:खनिरोधाची शिकवण ऐकून तो ब्राम्हण भगवंतांपुढे नम्र झाला आणि भिक्खू संघात आपणाला समाविष्ट करून घ्यावे अशी त्याने विनंती केली.

 

५. अधोगतीचे कारण दुष्कर्मे, अन्न नव्हे

१. आमगंध नावाचा एक ब्राम्हण हिमालयात आपल्या शिष्यगणांसह राहात असे. तो आणि त्याचे शिष्य मत्स्यमांस खात नसत. प्रतिवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आम्ल पदार्थाच्या शोधार्थ वाली उतरत असत. 

२. ज्या गावात ते उतरत तेथील रहिवासी चार महिनेपर्यंत मोठ्या सन्मानाने त्याचे आदरातिथ्य करीत असत. 

३. एकदा भगवंतांनी त्या गावाला भेट दिली. भगवंतांचे धम्मनिरूपण ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले. 

४. त्या वर्षी आमगंध आणि शिष्यगण प्रतिवर्षाप्रमाणे त्या गावात आले असताना ग्रामवासियांनी त्यांच्यासंबंधी फारसा उत्साह दाखविला नाही. 

५. भगवंत मत्स्यमांसाच्या सेवनाचा निषेध करीत नाहीत हे ऐकून तो खिन्न झाला. या गोष्टीचे खरे खोटे करून  घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेतवनात भगवन्त राहात होते तेथे त्यांच्याकडे जाऊन तो म्हणाला. 

६. ‘जे बाजरी, चिंगुलाचे दाणे, वाटाणे, खाद्य पालेभाजी आणि कंद, कोणत्याही वेलीची फळे, ही सुमार्गाने मिळवून सेवन वन करतात, ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करीत नाहीत.  

७. “परंतु तू तर लोक जे काही देतात असे चांगल्या प्रकारे शिजविलेले, माल-मसाला लावलेले स्वच्छ आणि उत्कृष्ट  अन्न खातोस. जो कोणी तांदुळाचे असले बनविलेले पदार्थ खातो तो आमगंध खातो. पक्ष्याच्या मांसास निश्चित अन्न खाताना मजवर आमगंध सेवनाचा वनाचा आरोप राप येत नाही हा असे म्हणतोस. 

८. ‘मी तुला विचारतो ह्याचा अर्थ काय ? ज्याला तू आमगंध म्हणतोस ते आहे तरी काय?” 

९. भगवंतांनी उत्तर दिले, ‘जीवहिंसा करणे, ताडन, बंधन, चौर्यकर्म, असत्य भाषण, अफरातफर, फसवगूक, क्षुल्लक गोष्टींचे ज्ञान आणि व्यभिवार ही आमगंध होत. मांस सेवन आमगंध नव्हे. 

१०. या जगात जे पुरुष आपल्या सुखोपभोगात संयमरहित असतात, ज्यांना मधूर वस्तूंचा लोभ असतो, अपवित्र 

कार्याशी ज्यांचा संबंध असतो, जे विचाराने उच्छेदवादी च्छदवादा आणि कपटी 1 असतात. ज्याची वर्तणूक समजायला कठीण गण असते, ते आमगंध असतात. मांससेवनाने त्यांना आमगंधाचा दोष लागत नाही.

११. या जगात जे उद्धट, कर्कश, निदाप्रिय, विश्वासघातकी, निर्दय, अतिशय अहंकारी व अनुदार असतात, आणि दुसर्यांना काहीच देत नाहीत ते लोक आमगंध दोषाने युक्‍त होत. मांसाशनाने मनुष्य आमगंध दोषयुक्त होत  नाही. 

१२. राग, गर्व, हटवादीपणा, शत्रुत्व, कपट, द्वेष, फुशारकी मारणे, आत्यंतिक अहंकार, पापी मनुष्याची संगत, यांच्या योगाने मनुष्याला आमगंधाचा दोष जडतो. मांसाशनाने नव्हे. 

१३. ज्यांची नीती वाईट, जे घेतलेले कर्ज देण्याचे नाकारतात, जे निदा करीत असतात, आपल्या व्यवहारात जे लुच्चेगिरीने वागतात, जे ढोंगीपणा करतात, अशी दुष्कृत्ये करणारी नीच माणसे ही आमगंध दोषाने युक्‍त होत. मांसाशनाने आमगंध दोष लागत नाही. 

१४. जी माणसे सजीव प्राण्याशी संयम राखून वागत नाहीत, जे परधन हिरावून परपीडा करावयास सदैव सिद्ध असतात, जे अनीतिमान, क्रूर, कर्कश असतात आणि दुसर्याचा उपमर्द करण्याची ज्यांची वृत्ती असते ते सर्व आमगंधदोषयुक्‍त होत. मांसाशनाने आमगंध दोष जडत नाही. 

१५. जे लोभाने अथवा शत्रूत्वाने सजीव प्राण्यावर छापा घालतात ते सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात, ने आमगंधी होत. मांसाशनाने आमगंधाचा दोष जडत नाही. 

१६. मत्स्यमांस सेवनापासून परावृत्ती, नग्नता, शिरोमुंडन, जटा, सर्वांगी भस्मार्चन, मृगाजिन परिधान,अहिताग्री व्रत इत्यादी जगातील सर्व तपांचे अमरपदासाठी केलेले परिपालन आणि मंत्रोच्चार, बलिदान,नैमित्तिक यज्ञ, यांपैकी कशानेही सदैव शंका घेणारा मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही.

१७. ज्याने आपली इंद्रिये जिंकली आहेत, जो त्याचा संयम करतो, जो धर्मनिरत आहे, सरळपणा, मार्दव यात ज्याला आनंद वाटतो, ज्याच्या ठिकाणी विषयासक्ती नाही, ज्याने दु:खनिरोध केला आहे तो सूज्ञ मनुष्य जे पाहतो किंवा वा ऐकतो. त्यापैकी कशाच्याही आहारी जात नाही. 

१८. आमगंधाचा दोष दुष्कृत्यामुळे जडतो; मत्स्यमांसाच्या सेवनाने नव्हे.

 

६. देहप्रक्षालन पुरेसे नाही

१. एकदा भगवंत श्रावस्ती येथे राहात होते. संडगाख नावाचा ब्राम्हणही तेथे राहात होता. तो स्वानवादी 

होता आणि जलप्रक्षालनाने स्वत:ला शुद्ध करण्याच्या आचाराचे तो अवलंबन करीत असे. रात्रदिवस स्वान करणे हा त्याचा स्वभावच झाला होता. 

२. एकदा महास्थविर आनंद सकाळच्या प्रहरी चीवर धारण करून भिक्षापात्र आणि एक चीवर घेऊन श्रावस्तीत भिक्षेसाठी निघाला. श्रावस्तीत फिरून मिळविलेली भिक्षा खाल्ल्यावर तो भगवंताच्या बाजूला अभिवादन करून बसला आणि म्हणाला,

३. “भगवान! ह्या श्रावस्तीत संडगाख नावाचा स्तरानवादी ब्राम्हण असून स्तरानाने स्वत:ला शुद्ध बनविण्याच्या कर्मांत तो मग्न असतो. रात्रंदिवस स्वानापलीकडे त्याला काही दिसत नाही. भगवंतांनी करुणा करून त्या संडगाख ब्राम्हणाची भेट घेतली तर बरे होईल.

४. भगवन्तानी आपल्या मौनाने त्याला संमती दर्शविली.

५. दुसर्या दिवशी सकाळी भगवन्त चीवर चढवून व एक चीवर आणि भिक्षापात्र हाती घेऊन त्या संडगाख ब्राम्हणाच्या घराकडे निघाले. तेथे जाऊन ते आसनावर बसले. 

६. संडगाख ब्राम्हण भगवंतांजवळ आला. त्याने त्यांचे स्वागत केले आणि कुशल प्रश्‍न झाल्यावर त्यांच्या बाजूला बसला.

७. तो स्थानापन्न झाल्यावर भगवंतांनी त्याला विचारले, ‘ब्राम्हणा, लोक म्हणतात तू स्वानवादी असून रात्रंदिवस स्थान करून स्वतःला शुद्ध बनविण्याचा प्रयत्न करीत आहेस. हे खरे आहे का? 

८. श्रमण गौतम, हे सर्व खरे आहे.’

९, “मग, हे ब्राम्हणा, हे खानव्रत धरून तू काय मिळवणार आहेस?”

१०. ‘गौतमा, हे व्रत अशासाठी आहे ; – दिवसा जे काही पाप मी करतो ते त्याच संध्याकाळी मी धुवून टाकतो. अशा रीतीने माझ्या या स्थानव्रताने मी स्वतःला शुद्ध राखण्याचा प्रयत्न करीत आहे.

११. भगवान म्हणाले,

१२. ‘धर्म हा एक तडाग आहे. तो स्वच्छ व निर्मल आहे. 

१३. ‘जे या तडागात निमज्जन करतात ते सर्व धर्मज्ञ, आणि सर्वांग शुद्ध होऊन पैलतीराला जातात.’ 

१४. यावर तो संडगाख ब्राम्हण म्हणाला, ‘वा: छान, श्रमण गौतम, मला आपला शरणागत उपासक करा.आजपासून मरेपर्यंत मी आपलाच आश्रय करणार.

 

७. पवित्र जीवन म्हणजे काय?

१. एकदा चारिका करीत असता आपल्याबरोबर असलेल्या भिक्खुंना उद्देशून भगवान बुद्धांनी खालील प्रवचन केले –

२. भिक्खूंनो, पवित्र जीवन हे लोकांना फसविण्यासाठी, त्यांची कृपा साधण्यासाठी, काही लाभासाठी, काही कीतींसाठी, किंवा वादविवादाच्या जटिल प्रश्‍नांतून सुटका करून घेण्यासाठी, किंवा लोकांमध्ये आपले नाव व्हावे यासाठी जगायचे नसते. भिक्खुहो, शरीर आणि वाणी यांचे नियंत्रण करण्यासाठी, कोणत्याही प्रकारची अशुद्धता, आसक्ती आणि तृष्णा यांपासून विमोचन करण्यासाठी हे पवित्र जीवन जगावयाचे असते. सामाजिक व राजकीय प्रश्‍नांवरील प्रवचने

१. राजकृपेवर अवलंबून राहू नका 

१. एकदा भगवान राजगृह येथील वेळूवनात कलंदक-निवासात राहात होते.

२.त्या वेळी भगवंतांविरुद्ध उलटलेल्या ल लर देवदत्ताचा त्ताचा पक्ष राजा अजातशत्रूने घेतला होता. 

३. सकाळ-संध्याकाळ पाचशे गाड्यांतून अन्नपात्रे पाठवून तो देवदत्ताच्या शिष्यगणांना पोशीत होता.

४. तेव्हा काही भिक्खु भगवंतासमोर आले आणि साभिवादनपूर्वक त्यांच्या शेजारी बसले. त्यांनी भगवंतांना देवदत्तासंबंधाची वार्ता सांगितली.

५. तेव्हा भगवंत भिक्खुंना म्हणाले, “राजाकडून कृपेची, खुशामतीची, कोणत्याही प्रकारच्या लाभाची आशा धरू नये; जोपर्यंत अजातशत्रू राजा देवदत्ताला सकाळ-संध्याकाळ पाचशे गाड्यांत अन्नपात्रे भरून अन्न पुरवीत आहे तोपर्यंत देवदत्ताची अधोगतीच होत राहणार. सन्मार्गात त्याच्या प्रगतीची अपेक्षा करणे ण व्यर्थ होईल. 

६. ‘भिक्खूंनो, ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काळीज चुरडून थापले तर तो कुत्रा अधिकच पिसाळतो. त्याप्रमाणे जोपर्यंत राजा अजातशत्रू दवदत्ताला अशा रीतीने पोशीत आहे, तोपर्यंत तो देवदत्त अधोगतीलाच जात राहणार; त्याची सुधारणा होणार नाही. बंधूंनो, राजाची खुशामत, कृपा, त्यापासून होणारे लाभ हे भयदायक आहेत. 

७. ‘सर्वोच्च अशी अढळ शांती साधण्याच्या मार्गातील ते कटु आणि दुःखदायक असे अडसर आहेत. 

८. ‘म्हणून भिक्खुंनो, तुम्ही स्वत:ला हे शिकविले पाहिजे की, आमच्यावर लाभ, कृपा, खुशामत याचा वर्षाव होणार असेल तर आम्ही त्याचा निषेध करू आणि त्याचा वर्षाव होऊ लागलाच तर त्याला आमच्या मनावर पकड घेऊ देणार नाही, प्रभुत्व मिळवू देणार नाही, त्याच्या लालसेने आम्हाला राजाचे दास बनवू देणार नाही.’   

 

२. जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा धार्मिक होते

१. एकदा भिक्खुंना उद्देशून भगवंत म्हणाले, ‘भिक्खूहो,’

२. जोपर्यंत राजा हा धर्मशील नाही, तोपर्यंत त्याचे प्रधान आणि कर्मचारी धर्मशील होऊ शकत नाहीत. प्रधान आणि कर्मचारी अधार्मिक झाले की, ब्राम्हण आणि गृहस्थही अधार्मिक होतात. ब्राम्हण आणि गृहस्थ हे धर्मरहित असल्यावर नगरवासी आणि ग्रामवासी हेही धर्मरहित होतात. 

३. परंतु जेव्हा राजे धार्मिक असतात तेव्हा हे भिक्खुंनो, त्याचे प्रधान आणि कर्मचारीही धार्मिक होतात. जेव्हाराजे आणि त्याचे प्रधान आणि कर्मचारी धार्मिक असतात तेव्हा ब्राम्हण आणि गृहस्थ हेही धार्मिक होतात. जेव्हा ब्राम्हण आणि गृहस्थ धार्मिक असतात तेव्हा नगरवासी आणि ग्रामवासी हेही धार्मिक होतात. 

४. गुरांचा तांडा नदी ओलांडीत असताना त्यांच्यामधील वयोवृद्ध असलेला वृषभ चुकला की त्याच्यामागून येणारी सर्व गुरेही चुकतात. त्याप्रमाणेच माणसामध्येही ज्याला प्रमुख मानतात तो वाममार्गाने जाऊ लागला तर इतरेजनही त्याच मार्गाचा अवलंब करतात. 

५. त्याप्रमाणेच राजाने कुमार्ग धरला तर सर्व राज्याला हानी पोचते. गुरे नदी ओलांडीत असता जर मुख्य वृषभ सरळ मार्गाने गेला तर मागील गुरांचा तांडा त्याच सरळ मार्गाने जातो. याप्रमाणेच जो प्रमुख असेल तो जर सन्मार्गाने चालू लागला तर इतरही त्याचे अनुकरण करतात आणि सन्मार्गाने जातात. जर राजे चांगले असतील तर सारे राज्य सुखाने राहते.’

 

३. राजकीय आणि लष्करी शक्‍ती समाजव्यवस्थेवर अवलंबून असते

१. एकदा भगवान राजगृह येशील गृधकूटावर गहात होते.

२. त्या वेळी वैदेही पुत्र मगधराजा अजातशत्रू विज्जीवर आक्रमण करण्याच्या विचारात होता. तो स्वत:शीच म्हणाला, हे विज्जीकुल सामर्थ्यशाली असले तरी मी त्यांचा पुरेपूर नाश करीन. 

३. म्हणून आपल्या मगध देशाचा शाचा मुख्यप्रधान, वस्सकार नावाचा ब्राम्हण याला बोलावून तो म्हणाला, 

४. ‘हे ब्राम्हणा, भगवंताकडे जा आणि नम्रतेने माझ्यातर्फे त्यांचे पायवंदन करून त्यांना विचार, “आपली प्रकृती ठीक आहे ना ? आपण स्वास्थ्य, सुख आणि आरोग्य उपभोगीत आहात ना?” . “नंतर त्यांना सांग की, मगधराजा, अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करण्यास उत्सुक आहे. वज्जीकुल कितीही सामर्थ्यशाली असले तरी त्याचा पुरेपूर नाश करण्याचा त्याचा विचार आहे.”

६. अजानशत्रू पुढे म्हणाला, “भगवान, जे काही पुढले भविष्य होईल ते सांगतील. ते नीट लक्षात ठेव आणि त्यातला शब्द न्‌ शब्द मला निवेदन कर. कारण भगवान बुद्ध कधीही खोटे बोलत नसतात.” 

७. राजाचे शब्द ऐकून तो ब्राम्हण वस्सकार म्हणाला, “ठीक आहे.” आणि अनेक उत्कृष्ट रथ जोडून तो गुधकूटाकडे  निघाला.

८. तेथे पाहोचल्यावर भगवंतांना कुशल प्रश्‍न विचारून राजाने आज्ञा केल्याप्रमाणे राजाचा संदेश त्याने निवेदन केला.

९. त्या वेळी स्थविर आनंद भगवन्ताच्यामागे उभा होता. भगवंत त्यास म्हणाले. “आनंद, वज्जी वारंवार सार्वजनिक सभा भरवतात हे तू ऐकले आहेस काय?” 

१०. आनंदाने उत्तर दिले, “होय भगवंत, मी ऐकले आहे.”

११. यावर भगवंत पुढे म्हणाले, “आनंद, जोपर्यंत वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवीत असतात तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाहीत. उलट त्यांची भरभराट होत राहील. 

१२. ‘आनंद, जोपर्यंत वज्जी एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे ठाकतात, एकोप्याने आपापली उद्दिष्ट कार्ये  करतात.

१३. ‘जोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय तदनुसार वर्तन करीत नाहीत, ज्या उद्दिष्टाला एकदा सर्वमान्यता मिळाली आहे ते वर्ज्य समजत नाहीत आणि गतकाळात वज्जीकुळाने जे नियम केले आहेत त्या नियम-परंपरेप्रमाणे आचरण करतात.

१४. ‘जोपर्यंत ते वज्जी आपल्यामधील वृद्धांना मान देतात, त्यांची वाहवा करतात, त्यांचा आदर करतात आणि त्यांची सल्लामसलत ऐकणे हे आपले कर्तव्य मानतात, 

१५. ‘जोपर्यंत आपल्या कुळांतील कोणत्याही स्त्रीला अथवा कन्येला ते बळ-जबरीने डांबून ठेवीत नाहीत आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचे अपहरण करीत नाहीत, 

१६. ‘जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात आणि त्याचे परिपालन करतात.

 १७. ‘तोपर्यंत, हे आनंदा, वज्जीकुळाची अधोगती होणार नाही. उलट त्यांची भरभराटच होत राहील आणि कोणीही त्यांचा नाश करू शकणार नाही. 

१८. ‘सारांश, जोपर्यंत वज्जी प्रजातंत्रावर विश्वास ठेवतील, प्रजातंत्रकाप्रमाणे आचरण करतील तोपर्यंत त्यांच्या राज्याला संकट स्पर्श करू शकणार नाही, असे भगवन्तांनी स्पष्ट केले.’ 

१९. नंतर भगवन्त वस्सकाराला उद्देशून म्हणाले,

२०. ‘हे ब्राम्हणा, मी वैशाली येथे वज्जीकुळात राहात असताना त्यांच्या कल्याणास ह्या वरील अटी कशा आवश्यक आहेत हे त्यांना शिकविले.!

२१. तेव्हा तो ब्राम्हण म्हणाला, “तर मग वज्जी जोपर्यंत ह्या वहिवाटीचे परिपालन करीत आहेत तोपर्यंत त्यांची अधोगती न होता त्यांचे कल्याणच वृद्धिगत होणार असे आम्ही मानायचे तर ? हे गौतमा, मगधराजाला वज्यीचा पाडाव करता येणार नाही असे तुझे म्हणणे दिसते.’

२२. असे बोलून वस्सकार उठून राजगृह येथे आपल्या राजाला भगवंताचे शब्द सांगायला निघुन गेला. 

 

४. युद्ध हा चुकीचा मार्ग आहे

१. एकदा मगध राजा अजातशत्रू याने आपले अश्वदळ, पायदळ गोळा करून पसेनदी राजाच्या काशी विभागावर स्वारी केली. पसेनदीनेही स्वारीचा वृत्तान्त ऐकून घोडदळ पायदळाचे सैन्य जमविले आणि तो अजातएशत्रूला तोंड द्यावयास निघाला.

२. त्या दोन्ही सैन्यांचे युद्ध झाले. अजातशत्रूने राजा पसेनदीचा पराभव केला आणि पसेनदी शेवटी आपली राजधानी श्रावस्ती येथे माघार घेऊन राहिला. 

३. श्रावस्तीमध्ये राहणारे भिक्खु भिक्षाटण करून परत आले आणि त्यांनी भगवंतांना त्या दोन राजांचे युद्ध आणि पसेनदीची माघार यासंबंधीचे वृत्त सांगितले. 

४. भगवंत म्हणाले, “भिक्खूहो, मगध राजा अजातशत्रू म्हणजे जगातील सार्या दुष्टपणाचा ठेवा आहे. उलट राजा पसेनदी हा जगातील चांगुलपणाचा मित्र आहे. सध्या तरी पसेनदी राजाला पराभूत मनुष्य म्हणून दुःखात रात्र काढावी लागगार आहे.

५. ‘विजयातून द्वेष जन्मास येतो. जिताला दु:खात काळ कंठावा लागतो. परंतु जो शांत आहे आणि क्रोधरहित आहे तो सुखात राहतो. कारण अशा माणसाच्या गावी जय आणि पराजय याची वार्ताच नसते.’ 

६. पुन्हा असे घडले की, त्या दोन राजांचे पुन्हा युद्ध जुंपले. परंतु त्या युद्धात कोसलराजा पसेनदी याने  अजातएशत्रूचा पराभव करुन त्याला जिवंत पकडले. तेव्हा राजा पसेनदीने स्वत:शी विचार केला की, मी ह्याच्या वाटेस गेलो नसतानाही हा राजा माझा पुतण्या असूनही मला त्रास देतो. आता मी त्याचे सर्व सैन्य, हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ ताब्यात घेऊन त्याला केवळ आपल्या जीवनिशी सोडून दिले तर ? आणि त्याप्रमाणे पसेनदी राजाने केले.

७. श्रावस्तीमध्ये भिक्षाटण करून परतलेल्या भिक्खुंनी ही वार्ता भगवंताच्या कानी घातली. त्यावर भगवंत म्हणाते, “ माणूस आपल्या स्वार्थासाठी दुसर्याला लुटतो, परंतु जेव्हा दुसरे त्याला लुटतात तेव्हा तो लुटला गेलेला मनुष्य परत दुसर्यांना लुटण्याची ईर्षा धरतो.” 

८. ‘जोपर्यंत पापाचे फळ पक्व झाले नाही तोपर्यंत मूर्खाला सदैव वाटते, मला पाहिजे ती सुवर्णसंधी आता येणार. परंतु जेव्हा कर्माचे फळ भोगण्याची वेळ येते तेव्हा केल्या पापाबद्दल भय वाटू लागते. 

९. “हिंसकालाही त्याची हिंसा करणारा कोणी तरी भेटतोच. जेत्याला जिंकणारा कोणी तरी निपजतो. निंदकाला निंदक सापडतो.

१०. ‘अशा रीतीने कर्मविपाकाने जो मनुष्य दुसर्याला लुटतो त्यावरही आपण स्वतः लुटला जाण्याची पाळी येते.’

 

५. शान्ती स्थापन करणार्या जेत्याची कर्तव्ये

१. जेव्हा जेता शांती स्थापन करण्याची सत्ता मिळावतो , वेळी जितावर गुलामगिरी लादण्याचा नसला, तरी त्याची अधिकाधिक मानखंडना करण्याचा अधिकार सांगू लागतो. ह्या विषयावर बुद्धाचे मत अगदी वेगळे  आहे. त्यांच्या मते शांती स्थापन करणे याला काही अर्थ असेल, तर जेत्याने जित्याच्या शांततेच्या काळाचा जित्याच्या कल्याणासाठी उपयोग करणे, हे त्याचे कर्तव्य ठरते. ह्या विषयावर बुद्धाने भिक्खुंना उद्देशून असे म्हटले आहे,-

२. ‘ युद्धविद्येत पारंगत असलेल्या माणसाने युद्धविराम झाल्यावर आपल्या अंगच्या क्रजुता, अनुग्रहणपूर्ण वाणी, उद्धरटपणाविरहित दयाळू वृत्ति, ह्या गुणांचा आविष्कार केला पाहिजे. आपण कोणी आडदांड, आक्रमक नसून घरच्यासारखे वागणारे पाहुणे आहोत, इंद्रिय सुखाच्या आहारी न जाणारे, कुशाग्र बुद्धीचे, वायफळ बडबड न करणारे, हाव धरून परधन हिरावून न घेणारे असे आहोत, असे आपल्या वर्तणुकीने सिद्ध केले पाहिजे. लोक शाप देतील असे क्षुद्र आणि नीच वर्तन करून त्याने आपल्याला कमीपणा आणू नये.

३. ‘ सर्व प्राणिमात्रांना सुखसमृद्धी आणि शांतता लाभो. सबळ-दुर्बळ, लहान-मोठे, प्राणिमात्र शांततेचा सदैव उपभोग घेत राहोत. दुश्य-अदृश्य, जवळचे-दूरचे, जात आणि अजात जीव शांतीचा उपभोग घेवोत अशी वृत्ती जेत्याने राखली पाहिजे.

४. ‘ कोणालाही आपल्या बांधवाची खुशामत करण्याची अथवा त्यांचा उपमर्द करण्याची आणि कोणाला तुरुंगात डांबविण्याची अथवा द्वेष करण्याची पाळी जेत्याने येऊ देऊ नये. 

५. : ज्याप्रमाणे माता आपल्या एकुलत्या एक मुलाला इजा पोहचू नये म्हणून जपते, त्याप्रमाणे जेत्याने सर्व जीवमात्रांसंबंधी विवेक धरावा. विश्वातील वरच्या खालच्या, भोवतालच्या सार्या देशांच्या प्राणिमात्रावर अंत:करणपूर्वक प्रेम करावे, त्यांच्याविषयी मनाला द्वेषाचा स्पर्श होऊ देऊ नये. कोणत्याही प्रकारे दुसर्याच्या अंत:करणात शत्रुत्व भावना निर्माण होईल असे काहीही कृत्य करू नये. 

६. ‘ म्हणजे तुम्ही उभे असताना, चालत असताना, बसताना, उठताना, आपल्या संपूर्ण मानसिक सामर्थ्याने असा विचार करीत राहा, ‘ हा ब्रम्हविहारच आहे.’

Previous page                                    Next book


 The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!