The Buddhist Way of Life

THE BUDDHIST WAY OF LIFE

Part III—The Buddhist Way of Life

The Buddhist Way of Life PDF in English

चतुर्थ खंड: धर्म आणि धम्म

भाग तिसरा: बौद्ध जीवन मार्ग

The Buddhist Way of Life

Previous page                                    Next Page

 

१. सत, असत्‌ आणि पाप

१. शुभ कार्य करीत राहा. अशुभ कर्मात सहयोगी बनू नका. पापकर्म करू नका.

२. हा बौद्ध जीवनमार्ग आहे.

३. माणसाने एकदा शुभ कर्म केले की, परत परत शुभ कर्म करीत राहिले पाहिजे. शुभ कर्म इतके अविरत करीत राहावे की, त्यायोगे अंतकरणातील सर्व इच्छाही शुभ कर्माकडे लागाव्यात. शुभ कर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे.

४. शभ कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका. थेंबाथेंबाने पात्र भरते. थोड्याथोड्या शुभ कर्माने शुभकर्म वाढत राहते.

५. जे केल्यानंतर खंत किंवा खेद वाटत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे. 

६. जे कर्म केल्याने पश्चात्तापाची पाळी येत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते ते काम चांगले झाले समजावे. 

७. जर मनुष्य शुभ कर्म करीत असेल तर ते त्याने वारंवार करीत राहावे, त्यांत त्याने आनंद मानावा. शुभ कर्माचा संचय आनंदकारक असतो. 

८. जोपर्यंत शुभ कर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दु्दिन भोगावे लागतात; परंतु त्यांचे शुभ कार्य परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात. 

९. ‘ते मला बरोबर साधणार नाही’ असे माणसाने शुभ कर्मासंबंधी कधीच बोलू नये. थेंब पडून पात्र भरते. सुज्ञ मनुष्य जरी थोडे थोडे शुभ कर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगुलपणाने भरून जातो. 

१०. चंदन, धूप, कमळ, मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शीलाचा (सदाचाराचा ) सुगंध अधिक असतो.

११. धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो. परंतु शीलाचा सुवास उच्चपदी दरवळत जातो. 

१२. अशुभ हे क्षुद्र समजू नका. ते मजकडून घडणार नाही असे म्हणू नका. थेंबाथेंबाने भांडे भरते. थोडे अशुभ घडता ते वाढत राहते. 

१३. ज्याच्या योगाने मागाहून खेद किंवा खंत वाटते आणि ज्याचे फळ स्वीकारताना अश्रु ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो असे काम करणे बरे नाही. 

१४. जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला किंवा वागू लागला तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या खुरामागून गाडीचे चाक धावत असते सत त्याप्रमाणेच प्रमाणच अशा माणसाच्या मागून दु:ख धावत राहते. 

१५. पापाला अनुसरू नका. या बाबतीत अनवधानी राहू नका. मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका.

 १६. दुविचारांचे दमन करून परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा. जो शुभ कर्मात मागासलेला राहतो त्याचे मन पापामध्ये रममाण होते.

१७. जे कृत्य केले असताना खेद वा खंत वाटते, ज्याचे फळ स्वीकारताना अश्रु ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो ते काम करणे इष्ट नव्हे. 

१८. पापकर्म करणार्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व झाली नाहीत तोपर्यंत सुख दिसत राहते. परंतु ज्या वेळी त्याची पापे परिपक्व होतात त्या वेळी त्याला दु:खाशिवाय काहीच दिसत नाही.

१९. अशुभ मजपर्यंत येऊन भिडणार नादी असे बोलत माणसाने अशुभाला कमी लेखू नये. थेंबाथेंबाने भांडे भरते. अगदी अल्प, अल्प दुष्कृत्ये करता करता, मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो.

२०. माणसाने आपले विचार अशुभ कर्मापासून परावृत्त करून शुभ कर्मासंबंधी प्रवृत्ती वाढविण्याची त्वरा करावी. जर माणुस शुभ कर्म आचरण्यात आळस करू लागला तर त्याचे मन अशुभामध्ये रममाण होते. 

२१. माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत परत पाप करू नये आणि पापात आनंद मानू नये. पापाची वाढ ही दुःखकारक होते.

२२. कुशल कर्म करीत जा, अकुशल कर्म करू नका. कुशल कर्मे करणारे इहलोकी धन्यता पावतात.

२३. कामुकतेने दुःख निपजते. कामुकतेने भय निपजते. कामुकतेपासून मुक्‍त होतो तो दुःख आणि भय यांपासून विमुक्त होतो.

२४. भूक हा सर्वांत वाईट असा रोग आहे. संसार हे सर्वांत मोठे दुःख आहे. हे सत्य उमगले की, निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते. 

२५. ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मौल्यवान रत्नाचा भंग करते तसे स्वनिर्मित, स्वपोषित पाप कर्त्याचा नाश करते.

२६. ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते, त्याप्रमाणेच ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो,तो त्याच्या शत्रुलाही ॥त्र्‍ुलाहा आनद नंद वाटावा अशा अधोगतीला [गताला स्वत:ला नेऊन ऊ पोहचवितो. 

२७. दुष्कृत्ये आणि स्वत:ला मारक ठरणारी कृत्ये माणसाला सहज करता येतात. परंतु जी उपकारक आणि हितकारक कृत्ये असतात ती मात्र करायला कठीण असतात.

 

२. लोभ आणि तृष्णा

१. लोभ व तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका.

२. त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवनमार्ग आहे.

३. धनाचा सारखा वर्षाव होत राहिला तरी कामना शमत नाही. सुज्ञ लोक जाणतात की, कामना ही अशक्य व दुःखकर आहे.

४. जो स्वर्लोकीच्या कामभोगातही आनंद मानीत नाही, जो तृष्णेचा क्षय करण्यात सदैव रत असतो तो सम्यक्‌ सम्बुद्धाचा शिष्य होय. ५. लोभातून दुःख उत्पन्न होते. लोभातून भय निर्माण होते; लोभापासून पूर्णपणे विमुक्‍त झाल्याने दुःख आणि भय यांपासून मुक्‍तता लाभते. 

६. तृष्णेतून दुःख उत्पन्न होते, तृष्णेपासून भय निर्माण होते. तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्‍त झाल्याने दु:ख आणि भय यांपासून मुक्‍तता लाभते. 

७. जो जीवनाचे खरे ध्येय विसरून कामभोगाच्या मागे लागतो आणि अहंकारी बनतो तो ध्यानचिंतनात काळ व्यतीत करणाराचा द्वेष करू लागतो. 

८. जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते म्हणून माणसाने कशासंबंधीही आसक्ती ठेवू नये. ज्यांना कोणतेही अति प्रिय अथवा द्वेष करण्याजोगे वाटत नाही त्यांना कोणतीच बंधने नसतात. 

९. कामभोगापासून दुःख आणि भय उत्पन्न होते. जो कामभोगासक्‍त नाही त्याच्या वाट्याला भय आणि दुःख येत नाही.

१०. आसक्तीमुळे दुःख आणि भय ही उत्पन्न होतात. जो आसक्तीच्या बंधनातून मुक्‍त आहे, त्याला दुःख नाही,भय नाही.

११. कामुकतेपासून दुःख उत्पन्न होते. कामुकतेपासून भय उत्पन्न होते. जो कामुकतेच्या बंधनातून मुक्‍त आहे त्याला दुःख नाही, भय नाही. 

१२. लोभापासून दुःख उत्पन्न होते. लोभापासून भय उत्पन्न होते. जो लोभमुक्‍त आहे त्याला दुःख नाही, भय नाही.

१३. जो शीलवान व प्रज्ञावान आहे, तो न्यायी आणि सत्यवादी आहे. जो आपले कर्तव्य पुरे करणारा आहे अशा पुरुषावर लोक प्रेम करतात. 

१४. पुष्कळ दिवस बाहेर लांब प्रवास केल्यानंतर परत घरी आलेल्या पुरुषाचे आप्त, मित्र आणि हितैषी स्वागत  करतात.

१५. त्याचप्रमाणे ह्या लोकातून परलोकात 0) गेलेल्या पुण्यात्म्याचे सत्कर्म आप्तेष्टाप्रमाणे त्याचे स्वागत करते.

 

३. क्लेश आणि द्वेष

१. कोणालाही क्लेश देऊ नका व दुसर्यांसंबंधी द्रेषभावना बाळगू नका.

२. हा बौद्ध जीवनमार्ग आहे.

३. ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा हा चाबकाचा फटकारा अंगावर पडण्याला संधी देत नाही, त्याप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही असा या जगात दोषरहित पुरुष कोण आहे? 

४. श्रद्धा, शील, वीर्य, समाधी, सत्यशोध, विद्या आणि आचरण यांची पूर्तता आणि जागरूकता यांच्या योगाने महान दु:खाचा अंत करा. 

५. क्षमा परमतप आहे. निर्वाण परमपद आहे असे बुद्ध सांगतात. दुसर्याची हिंसा करणारा व दुसर्यांना त्रास देणारा प्रत्रजित खरा श्रमण होऊ शकत नाही. 

६. कोणाचीही निंदा न करणे, कोणालाही क्लेश न देणे व प्रतिमोक्षांच्या नियमांचे पालन करणे हा बुद्धाचा उपदेश आहे.

७. स्वतः हिंसा करू नका किंवा हिंसा करणार्या दुसर्या लोकांना साहाय्यही करू नका.

८. जो स्वतः सुखाच्या शोधात आहे, त्याप्रमाणेच जो सुखाची इच्छा करणार्या प्राण्याची हत्या करीत नाही किंवा त्यांना कष्ट देत नाही त्याला सुख प्राप्त होईल. 

९. विभग्न झालेल्या घंटेप्रमाणे जो क्रोध जिंकल्यामुळे मूक आहे त्याला निब्बाणपद लाभलेलेच आहे.

१०. जो निष्पाप निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते.

११. जो क्षमारूप वस्त्रपरिधान केल्यामुळे स्तब्ध, शांत, संयत आणि शुद्धाचरणी आहे, जो दुसर्याचे दोष काढत बसत नाही तो खरोखर श्रमण अथवा भिक्खू होय.

१२. चाबकाचा फटकाराही अंगाला लागू नये याची जसा तेजस्वी घोडा काळजी घेतो, त्याप्रमाणे या जगात आपल्याल्या दुसर्याचा शब्द लागू नये म्हणून आपल्या आचरणाचा, लज्जे ने संयम करणारा असा या जगात एक तरी मनुष्य आहे काय?

१३. जर माणसाने निरुपद्रवी, शुद्धाचरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वार्यावर फेकलेली धूळ फेकणार्यावरच येऊन पडते त्याप्रमाणेच त्या माणसाला त्या उपद्रवाचा दुष्परिणाम भोगावा लागतो.

 

४. क्रोध आणि वैर

१. मनात क्रोधभावना ठेवू नका. वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमान जिंका.

२. हा बौद्ध जीवनमार्ग आहे.

३. क्रोधाग्री शमन करा.

४. तो मला अपशब्द बोलला, त्याने मला वाईट रीतीने वागविले, त्याने माझ्यावर कुरघोडी केली, मला लुबाडले असे विचार ज्याच्या मनात वावरत असतात, त्याचा क्रोधविकार कधीही शमत नाही. 

५. ज्याच्या मनात असे विचार उठत नाहीत, त्याचा क्रोध शांत झालेला असतो.

६. शत्रू शत्रूच्या वाईटावर, देष्टा द्वेष्टचाच्या वाईटावर टपलेला असतो.

७. माणसाने अक्रोधाने क्रोधाला जिंकावे, असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे.

८. खरे बोलावे, रागावू नये. मागितल्यानंतर थोडे तरी द्यावे.

९, क्रोध सोडावा, अभिमानाचा त्याग करावा. सर्व बंधनांवर जय मिळवावा- येणेप्रमाणे जो नामरूपाविषयी अनासक्त असतो असा अपरिग्रही दुःख भोगत नाही. 

१०. वाढत्या क्रोधाला जो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबवून धरतो, त्यालाच मी खरा सारथी म्हणतो. बाकीचे नुसते लगाम धरणारेच आहेत. 

११. ज्यामुळे वैर वाढते, पराजित मनुष्य दु:खात मग्न होऊन बसतो; परंतु ज्याने जयापजयाच्या कल्पनेचाच त्याग केला आहे असा शांत पुरुष सुखाने झोप घेतो. 

१२. कामाय्रीसारखा अग्नी नाही आणि द्वेषासारखे दुर्देव नाही. उपादान स्कंधासारखे दुःख नाही. निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही.

१३. वैराने वैर कधीही शांत होत नाही. अवैरानेच ते शांत होते; हा सनातन धर्म आहे.

५. मनुष्य, मन आणि मनोमल

१. मन घडविते तसा मनुष्य होतो.

२. जो सत्‌ आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे, हा संस्कार पुण्यमार्गांतील पहिले पाऊल होय.

३. बौद्ध जीवनमार्गाची ही मुख्य शिकवणूक आहे.

४. मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगमस्थान मन आहे. त्याचे सर्व व्यवहार मन:प्रधान आहेत.

५. मनुष्य जर दृष्ट चित्ताने बोलेल किंवा वागेल तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाचा पाठलाग करते,त्याप्रमाणे दःख अशा दुष्ट चित्ताने वागणार्या मनुष्याच्या मागे लागते.

६. मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलेल किंवा वागेल तर कधी न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्या बरोबरच बरच असते त्याप्रमाणे सुख सदोदित त त्याच्या बरोबर राहते.

७. मन हे ओढाळ, चंचल, दुनिवार व दुर्धर आहे. बाण करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला, एकाग्र व सरळ करतो. 

८. पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तडफडते, फडत, त्याप्रमाणे माराच्या म्हणजे कामदेवाच्या तावडीतून सुटण्यासाठी मन व्याकुळ असते. 

९. ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे, जे फार चंचल आहे, जे सदैव सुखासाठी वखवखलेले असते अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे. कारण दमन केलेले मन फार सुखदायक असते.

१०. तू आपल्या स्वतःस एक द्वीप (बेट ) बनव. परिश्रमाने चित्तमळ नाहीसा होईल. दोषरहित झाल्यावर तू दिव्य भूमीला पोहोचशील.

११. ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने रुप्यातील हिण कणाकणाने जाळून टाकतो त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाने चित्ताचा मळ थोडा थोडा नाहीसा करतो. 

१२. लोखंडापासून निघणारा गंज हा ज्याप्रमाणे लोखंडातून जन्मास य्रेऊन लोखंडाचा नाश करतो त्याप्रमाणेच पापी माणसाचे कर्म त्याला दुर्गतीकडे नेत असते. 

१३. सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अविद्येचा कलंक. भिक्खुंनो, या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंक व्हा.

१४. जो मनुष्य कावळ्यासारखा निर्लज्ज आहे, उचापती करणारा आहे, अपमान करणारा आहे, बेछूट आहे आणि नीच आहे अशा माणसाला जीवन सुकर आहे. 

१५. परंतु जो विनम्र आहे, पवित्र-अपवित्र याचा विचार करतो, अनासक्त आहे, शांत आहे, निर्मल आहे अशा बुद्धियुक्‍त मनुष्याला जीवन कठीण आहे. 

१६. जो हिंसा करतो, असत्य भाषण करतो, जो न दिलेले हिरावून घेतो, जो परदारागमन करतो.

१७. आणि जो मनुष्य उन्मादक मद्यपानात मग्न राहातो. तो मनुष्य इहलोकी आपले थडगे खणीत असतो.

१८. माणसा, हे लक्षात ठेव. संयमहीनांची स्थिती चांगली नव्हे; लोभ आणि पापकर्म तुला चिरकाल दु:खात लोटणार नाही याची काळजी घे. 

१९. जग आपल्या श्रद्धेप्रमाणे किवा इच्छेप्रमाणे फळ देत असते, जर मनुष्य दुसर्याला दिलेल्या अन्नपाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही. 

२०. परंतु ज्याच्या मनातून ह्या असल्या विचाराचे निर्मूलन झाले आहे त्याला दिवसा आणि रात्री केव्हाही विश्रांती लाभते.

२१. कामासारखा अग्नी नाही आणि लोभासारखा लोंढा नाही.

२२. परदोष हे सहज दिसतात. परंतु स्वतःचे दोष क्वचितच दिसतात. ज्याप्रमाणे धान्याचा तूस पाखडावा, त्याप्रमाणे माणुस आपल्या शेजार्याचे दोष पाखडीत असतो. परंतु ज्याप्रमाणे कपटी जुगारी, अपेशी फासा लपवून ठेवतो त्याप्रमाणेच मनुष्य स्वतःचे दोष लपवीत असतो. 

२३. जो मनुष्य परदोषच पाहात राहतो आणि स्वतःचे दोष उघड होताच चिडू लागतो त्याचे दोषविकार वाढतात आणि तो त्या विकारांच्या विनाशापासून दूर दूर जात राहातो. 

२४. पापापासून दूर राहा. पुण्य करीत राहा. स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा ही भगवान बुद्धाची शिकवण आहे. 

६. आपण आणि आत्मविजय

१. जर स्वत:ला स्वत्व असेल तर त्या स्वत्वावर विजय मिळविण्याचा (आत्मविजय ) परिपाठ ठेवावा.

२. हा बौद्ध जीवनमार्ग आहे.

३. मनुष्य हा स्वतःचाच स्वामी आहे. दुसर्या कोणाचा स्वामी असू शकणार? मनुष्य जेव्हा स्वतःचा संयम करू शकतो तेव्हा त्याच्यासारखा स्वामी मिळणे कठीण.

४. जो मुर्ख मनुष्य अर्हत, आर्य, शीलवान माणसाचे शासन उल्लंघितो आणि खोट्या धर्मसिद्धान्ताच्या मागे लागतो, त्याचे ते दुष्कृत्य कथ्थक बोरूच्या फळासारखे त्याच्या स्वत:च्याच विनाशाला कारणीभूत होते.

५. आपणच पाप करतो आणि आपणच त्यामुळे मलीन होतो. आपणच पापाचा त्याग करतो, आपणच आपणाला शुद्ध करू शकतो; शुद्धी आणि अशुद्धी ह्या स्वतःवरच अवलंबून असतात. कोणी दुसर्याला शुद्ध करू शकत नाही. 

६. जो केवळ सुखोपभोगांसाठी हपापलेला आहे, जो असंयमित, खादाड, आळशी आणि दुबळा आहे, तो आपल्याच आतताईपणाने पावेल. ज्याप्रमाणे वार्याने दुबळे झाड नाण पावते त्याप्रमाणे. 

७. ज्याच्या ठिकाणी भोगलालसा नाही, ज्याने इंद्रियदमन केलेले आहे, जो खाण्यात नेमस्त असतो, जो विश्वासार्ह व बळकट असतो तो ज्याप्रमाणे वज्त्रकायपर्वत वार्याने उलथून पडत नाही त्याप्रमाणे तो पतन पावत नाही. 

८. जर माणसाला स्वत:संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे. 

९, प्रथम स्वत: :ची सन्मार्गावर न्मागोवर स्थापना करावी. वा. मग दुसर्याला याला त्याचा उपदेण देश करावा. शहाण्या माणसाने स्वत:ला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये.

१०. स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात. जर माणूस दुसर्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसर्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो. 

११. स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भूर्दंड भरावा लागतो. माणुस स्वतःला स्वत:च शुद्ध करू शकतो. तेथे दुसरा कोणी शुद्ध करण्याला येत नाही. 

१२. युद्धांत शेकडो वीरांना जिंकणारा परमवीर नसून, जो आत्मविजय मिळवितो तोच परमवीर होय. 

१३. प्रथम स्वतः :चीच गच सन्मार्गावर गोवर स्थापना करावी आवा व मग दुसर्याला योला त्याचा उपदेश देश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये.

१४. स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात. जर माणुस दुसर्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसर्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो. 

१५. मनुष्य हा स्वतःच स्वतःचा संरक्षक असतो. त्याला दुसरा कोण संरक्षक असणार? जो स्वतःच स्वतःचे रक्षण करू शकतो त्याला स्वत:सारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे. 

१६. जर माणसाला स्वतःसबंधी प्रेम असेल तर त्याने स्वत:वर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे.

१७. स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भूर्दंड भरावा लागतो. माणुस स्वतःला स्वत:च शुद्ध करू शकतो. तेथे दुसरा कोणी शुद्ध करण्याला येत नाही. 

१८. मनुष्य हा स्वतःच स्वत:चा संरक्षक असतो. त्याला दुसरा कोण संरक्षक असणार? जो स्वत:च स्वत:चे संरक्षण करू शकतो त्याला स्वत:सारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे.  

 

७. प्रज्ञा, न्याय आणि सत्संगती

१. बुद्धिमान व्हा, न्यायी व्हा, आणि सत्संगती धरा.

२. हा बौद्ध जीवनमार्ग आहे.

३. जो मनुष्य काय वर्ज्य करावे हे तुम्हाला दाखवितो, जो तुमच्या दोषाबद्दल तुम्हाला वाक्ताडन करतो आणि जो बुद्धिमान आहे अशा माणसाच्या मागून, ज्याप्रमाणे गुप्त धन दाखविणार्या माणसामागून तुम्ही जाता त्याप्रमाणे तुम्ही जात रहा. अशा सत्पुरुषांचे अनुयायित्व हे तुमचे वाईट करणार नाही. भले करील. 

४. जो चुकल्यास रागे भरतो; जो शिकवितो, अनुचित करण्याचा प्रतिबंध करतो तो सुजनांना प्रिय आणि दुर्जनांना अप्रिय वाटतो.

५. पापी आणि नीच मनुष्याची संगत करू नका. सदाचारी पुरुषाची मैत्री करा. श्रेष्ठ पुरुषाची मैत्री करा.

६. जो धर्मामृताचे सेवन करतो त्याचे मन गंभीर असते आणि जीवन सुखी असते. सज्जन हे श्रेष्ठ पुरुषाने उपदेशिलेल्या धर्माने आनंद पावतात. 

७. पाटकार माळी कालव्यातून आपल्या इच्छेप्रमाणे पाण्याला वळण देतो, बाणाकार वाणाला नीट वळवितो,सुतार लाकडाच्या ओंडक्याला वळण देतो, त्याप्रमाणे शहाणे लोक स्वत:ला नियमानुसार वागण्याचे वळण देतात.

८. ज्याप्रमाणे भरभक्कम कातळ हा वार्याने कंप पावत नाही. त्याप्रमाणे शहाणी माणसे निंदा अथवा स्तुतीने विचलित होत नाहीत. 

९. ज्याप्रमाणे खोल आणि निष्कंप तळे शांत दिसते त्याप्रमाणे धम्म श्रवणानंतर शहाणी माणसे शांत, गंभीर बनतात.

१०, सत्पुरुष कोणत्याही पारास्थतात दक्षतेने चालतात. ते इच्छातृप्तीच्या [नामत्तान बोलत नसतात. सुखाचा स्पर्श होवो अथवा दु:खाचा स्पर्श होवो ते कधीही आनंदाने उन्नत झाले किवा निराशेने पछाडलेले दिसत नाहीत.

११. जोपर्यंत पापाची घडी भरलेली नाही तोपर्यंत मूर्ख माणसाला पाप हे मधासारखे गोड वाटते. परंतु जेव्हा पाप पक्व होते तेव्हा मूर्ख माणसाला दुःखात बुडून जावे लागते. 

१२. मूर्ख मनुष्याला आपण पाप केव्हा करीत आहोत हे कळत नाही; परंतु दुष्ट मनुष्य मात्र आपल्याच दुष्कृत्याने अग्नीप्रमाणे जळत असतो. 

१३. जो जागा आहे त्याला रात्र प्रदीर्घ वाटते. जो थकलेला आहे त्याला एक मैलाचा पल्ला लांबलचक वाटतो. ज्याला धर्माचे माच ज्ञान नाही हा अशा मूर्खाला जीवनही प्रदीर्घ वाटते. 

१४. जीवनप्रवाशाला स्वत:हुन श्रेष्ठ किंवा स्वतःच्या योग्यतेचा पुरुष भेटला नाही तर त्याने निग्रहाने ‘एकलेपणानेच प्रवास करावा. परंतु मूर्खाचा सहवास मात्र कधीही करु नये.

१५. ही माझी दौलत, हे माझे पुत्र, ह्या विचाराने मूर्ख मनुष्याला सारखी पीडा होत असते. तो स्वत:चाच स्वामी नसतो; तर मग स्वत:च्या दौलतीचा आणि पुत्रांचा स्वामी तो कसा होणार? 

१६. मूर्ख ज्या प्रमाणात स्वतःचा मूर्खपणा ओळखतो, त्या प्रमाणात तो शहाणा असतो; परंतु जो मूर्ख स्वतःला शहाणा समजतो तो खरोखर पुरा मूर्ख होय. 

१७. मूर्ख मनुष्याला आयुष्यभर सत्यंगती लाभली तरी ज्याप्रमाणे पळीला आमटीची चव कळत नाही त्याप्रमाणे त्याला लाभलेल्या सत्संगतीचे सत्य समजत नाही. 

१८. बुद्धीमान माणसाला एक पळभर शहाण्या माणसाचा सहवास लाभला तरी ज्याप्रमाणे जिभेला आमटीची चव कळते त्याप्रमाणे त्याला तत्काळ सत्संगतीचे त्सं तांचे सत्य कळून आल्याशिवाय ल्या शिव गय राहणार हणार नाही. 

१९. अल्पबुद्धीचे मूर्ख हे स्वत:चेच शत्रू असतात; कारण ते दुष्कृत्ये करतात आणि त्याची कटु फळे त्यांना चाखावी लागतात.

२०. ज्या कर्माबद्दल पश्चात्ताप करावा लागतो आणि ज्याचे फळ रडत भोगावे लागते ते कर्म नीट झाले नाही असेच समजावे.

२१. जे कर्म केले असता पश्चात्ताप करावा लागत नाही आणि ज्याचे फळ आनंदाने भोगता येते, ते कर्म चांगल्या रीतीने झाले आहे असे समजावे. 

२२. जोपर्यंत दुष्कर्माचे फळ भोगावे लागत नाही तोपर्यंत मूर्खाला ते मधासारखे गोड वाटते; परंतु ते कर्म जेव्हा पतन होते तेव्हा मूर्खाला दुःख भोगावे लागते. 

२३. दुष्कर्म जगतप्रसिद्ध झाले की ते दुःखात पर्यवसित होते आणि ते करणार्या मूर्खाचे सुदैव नष्ट होते. फार काय ते त्याचा शिरच्छेदही करते. 

२४. मूर्खाला खुशाल खोटी प्रसिद्धी, भिक्खूमध्ये अग्रमान, विहारात स्वामित्व, लोकांमध्ये सन्मान याची खुशाल हाव धरू द्या. 

२५. केस पिकले म्हणून काही मनुष्य वडील ठरत नाही. त्याचे वय कितीही होऊ द्या. त्याला लोक पोकळ डौलाचा म्हातारा म्हणुनच म्हणणार. 

२६. जो सत्यवान, सद्वणी, कारुणिक, संयमी, नेमस्त, शुद्धाचरणी आणि शहाणा आहे त्यालाच लोक वडील समजतात. 

२७. कितीही बहुभाषी असला, वर्णाने कितीही सुंदर असला तरीही जो मत्सरी, कृपण, अप्रामाणिक आहे तो सन्मानास पात्र ठरत नाही. 

२८. ज्याच्या ठिकाणी हे सर्व दुर्गुण नाहीत, ज्याचे दुर्गुणाचे आमूलाग्र उच्चाटन झालेले असते, जो दोषमुक्त आणि शहाणा असतो तोच सन्माननीय होय. 

२९. जो मनुष्य एखादी गोष्ट हौसेने तडीस नेतो, जो न्यायी नव्हे, उलट जो सत्‌ आणि असत्‌ यात भेद करतो, जो स्वतः पंडित असून इतरांना मार्ग दर्शवितो, जो स्वतः धर्मरक्षक असून हिंसेऐवजी बुद्धीने आणि धर्माने मार्गदर्शन करतो त्यालाच न्यायी पुरुष म्हणतात. 

३०. फार बोलतो एवढ्यावरूनच कोणीही पंडित ठरत नाही. जो क्षमाशील आहे, जो द्रेष आणि भय यांच्यापासून मुक्‍त झाला आहे तोच पंडित होय. 

३१. फार बोलतो एवढ्यावरूनच कोणी धम्माचा आधारस्तंभ ठरत नाही. जरी माणसाचे ज्ञान अल्प असले तरीजो धम्माला साक्षात पाहतो, जो धम्माची कधीही हेळसांड करीत नाही तोच धम्माचा आधारस्तंभ असतो. 

३२. माणसाला दूरदर्शी, शाहणा, संयमी सहचारी भेटला तर त्याने त्याचा सहवास करावा. त्याच्याबरोबर आल्या संकटावर मात करावी, आनंदाने परंतु विचारीपणाने त्याची संगत धरावी. 

३३. जर माणसाला दूरदृष्टीचा, शहाणा, संयमी सोबती लाभला नाही तर त्याने जसा एखादा राजा जिंकलेला प्रदेश मागे सोडून वनराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो, त्याप्रमाणे त्याने आपला जीवनपथ एकट्यानेच आक्रमावा. 

३४. एकान्त पत्करला; परंतु मूर्खाची संगत नको. पाप करू नये आणि अगदी थोडक्याच इच्छा ठेवून वनराजाप्रमाणे एकटेच आपला जीवनपथ आक्रमीत राहावे. 

३५. प्रसंग पडेल तर मित्र सुखदायक आहेत. कारण काही असले तरी भोगसामग्री सुखदायक आहे. कारण काही असले तरी सत्कर्म हे सुखदायक आहे. मरणाची घडी जवळ आली असताना सत्कर्म सुखदायक आहे. दुःखाचा त्याग सुखदायक आहे.

३६. जगात मातेची अवस्था सुखकर आहे; पित्याची अवस्था सुखकर आहे. श्रमणाची अवस्था सुखकर आहे. 

३७. वार्धक्यातही टिकणारा सद्रण सुखदायक आहे. खोलवर मुळे जाऊन दृढ झालेली श्रद्धा सुखकर आहे. ज्ञानार्जन सुखदायक आहे. पापत्याग सुखदायक आहे. 

३८. मूर्खाचा सहवास दीर्घकाळ दुःख देतो. शत्रूच्या सोबतीप्रमाणे मूर्खाची सोबत दुःखदायक आहे. आप्तेष्टांच्या भेटीप्रमाणे सत्संगतीही सुखकर आहे. 

३९. म्हणून माणसाने शहाण्या, बुद्धिमान, पंडित, क्षमाशील, कर्तव्यदक्ष श्रेष्ठाच्या मार्गाने जावे. ज्याप्रमाणे चन्द्र नक्षत्रांच्या मार्गाने गान जातो ता त्याप्रमाणे प्रमाण अशा प्रज्ञावान्‌ त्‌ सुजनांचे जनांचे अनुयायी तुयाया व्हावे. 

४०. डामडौल, प्रीती आणि आसक्ती ह्यांच्या उपभोगाची कास धरू नका. ज्याच्या ठिकाणी कळकळ आहे त्याच्या वाट्याला पुरेसा आनंद येतो.

४१. आंतरिक तळमळीने पंडित जेव्हा अंगच्या गर्वाचा निरास करतो तेव्हा तो शहाणपणाच्या एकाहून एक उंच अशा शिखरावर चढून मूर्खाकडे तुच्छतेने पाहात असतो. दु:खापासून विमुक्‍त झालेल्या माणसांना पाहात असतो,त्याप्रमाणेच दुःखात मग्न असलेल्या जनसंमर्दाकडे दृष्टिक्षेप करीत असतो.

४२. अविचारी माणसात विवेकशील, निद्रिस्तात जागृत असा तो शहाणा मनुष्य दुबळ्यांना मागे सारून पुढे सरत असतो.

 

८. विवेकशीलता आणि एकाग्रता

१. प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा. सावधान राहात जा. आस्थायुक्‍त आणि धैर्यशील राहात जा.

२. हा बौद्ध जीवनमार्ग होय.

३. आपण जे काही आहोत ते आपल्या विचाराचा परिणाम आहे. ते सर्व आपल्या विचारावर अधिष्ठित आहे आणि आपल्या विचाराचेच बनलेले आहे. जर मनुष्य दुर्विचाराने बोलू लागेल, कृती करु लागेल तर दुःख त्याचा पाठलाग करीत राहते. शुद्ध विचाराने बोलले आणि चालले तर सौख्य चालून येते. म्हणून शुद्ध विचारांनाअतिशय महत्व आहे.

४. अविचारी बनू नका. आपल्या विचारावर लक्ष असु द्या. कर्दमात रुतलेला हत्ती ज्याप्रमाणे आपली मोकळीक करण्यासाठी झटतो त्याप्रमाणे असत्मार्गापासुन आपली मुक्‍तता करा.

५. शहाण्या माणसांनी आपल्या विचाराची राखण करावी. कारण ते कळायला कठीण, अतिशय धूर्त असून, जिकडे वाट मिळेल तिकडे ते सैराटासारखे धावत राहातात. सुरक्षित विचार हे सौख्यदाते आहेत.

६. कशा तरी शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत राहाते त्याप्रमाणे चिंतरहित मनात विकार प्रवेश  करतात.

७. ज्याप्रमाणे व्यवस्थित शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत नाही त्याप्रमाणे चिंतनयुक्‍त मनात विकाराला प्रवेश लाभत नाही. 

८. माझे मन एका काळी वाट मिळेल तिकडे आणि वाटेल तसे भरकटत होते; परंतु ज्याप्रमाणे माहुत अंकुशाने  गजाला वळवीत असतो सता त्याप्रमाणे आश्रमाण मी आता आपल्या मनावर स्वामित्व गाजवीत आहे.

९. दुनिवार आणि सैराट अशा मनाला काबूत ठेवणे ही उत्तम गोष्ट आहे काबूत ठेवलेले मन सुखाचे उगमस्थान आहे.

१०. दूरवर भटकणार्या मनाला लगाम घालणारे काम-बंधनापासून विमुक्‍त होतात.

११. जर माणसाची श्रद्धा अचल नसली, जर सद्धर्म त्यास अज्ञात असेल, आणि जर त्याची मनःशान्ती बिघडलेली असेल तर त्याची प्रज्ञा दोषरहित असु शकत नाही. 

१२. एक द्वेष्टा दुसर्या द्वेष्टट्याला किंवा एक शत्रू दुसर्या शत्रूला जितका उपद्रव देतो त्यापेक्षा वाईट मार्गाकडे वळलेले माणसाचे मन अधिक उपद्रव निर्मिते. 

१३. आईबाप, आप्तेष्टांपेक्षाही चांगल्या मार्गाकडे वळलेले मन आपले अधिक हित करते.

 

९. जागरूकता, कळकळ आणि धर्य (अप्रमाद आणि वीयर्य)

१. शहाणा मनुष्य आपल्या जागरूकतेने निष्काळजीपणा बाजूला सारून प्रज्ञेच्या शिखरावर चढतो आणि दुःखविमुक्‍त होऊन तो तेथून दु:खात सापडलेल्या मानवजातीकडे पाहात असतो. शहाण्या माणसाच्या दृष्टीस मूर्ख हा पर्वतशिखरावरून दरीतील दिसणार्या माणसासारखा आहे. 

२. निष्काळजी लोकांमध्ये जागरूक, निद्रितांमध्ये जागृत असा तो शहाणा मनुष्य उमदा घोडा जसा अडेलतट्टला मागे टाकून पुढे जात असतो तशी प्रगती करीत असतो. 

३. निष्काळजीपणाच्या आधीन होऊ नका. कामभोगापासून दूर राहा. जागरुक मनुष्य चिंतनशील असतो. 

४. दक्षता ( अप्रमाद ) अमर आहे. अविचार (प्रमाद ) मृत्यूचे पद आहे. अप्रमादी हे कधीच मरत नाहीत. उलटप्रमादी हे मृतवतच आहेत. 

५. दुसरा हेतू कितीही मोठा असला तरी आपल्या ठरविलेल्या हेतूपासून विचलित होऊ नये. एकदा ध्येय हाताशी लागले की निग्रहाने ते धरून ठेवा. 

६. सावधान-चित्त राहा. आळस सोडा. सम्यक्‌ मार्गाचा अवलंब करा. जो या जगात सम्यक्‌ मार्गाचा अवलंब करतो तो खरोखरच सुखी असतो. 

७. आळशीपणा म्हणजे अपयश, सुस्तपणा म्हणजे अपवित्रता. सतत प्रयत्न आणि सम्यक्‌ दृष्टी ह्यांच्या साहाय्यानेन शरिरात घुसलेला आळशीपणा-हा विषारी बाण उपटून काढा.

८. प्रमादात फसू नका. विषयोपभोगात आसक्त राहू नका. अप्रमत्त बना व ध्यानात मग्न राहून विपुल सुख संपादन करा.

९. जो अप्रमत्त आणि जागरूक आहे, स्मृतिमान आहे, सुविचारपूर्वक काम करणारा आहे; जो संयमी आहे, जो विचारपूर्वक आचरण करणारा आहे व अप्रमत्त आहे-अशा पुरुषाचे यश सारखे वाढत असते. 

 

१०. दुःख आणि सुख; दान आणि कर्म

१. दारिद्य हे दुःखाचे उगमस्थान आहे.

२. परंतु दारिद्मनाशाने सुख लाभेलच असे नाही.

३. सुख लाभते ते उच्च राहणीवर अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे.

४. हा बौद्ध जीवनमार्ग होय.

५. क्षुधा हा एक भयंकर रोग आहे.

६. आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे. समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. विश्वास हे सर्वश्रेष्ठ नाते आहे आणि निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे.

७. जे आपला द्वेष करतात त्यांचा द्रेष न करता आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे.

८. रुग्णाईत माणसांत आरोग्य राखून आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे.

९. लोभी माणसांत आपण निर्लोभता ठेवून सुखाने राहायला शिकले पाहिजे.

१०. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात दुविकाराने नाश पावते. म्हणून वीतराग पुरुषांना दिलेले दान महान फलदायी होते.

११. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात गर्वाने नाश पावते; म्हणून गर्वरहित पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते. 

१२. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानव जात विषयोपभोगाने नाश पावते. म्हणून विषयानासक्‍त पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते. 

१३. धर्मासाठी केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धर्माचे माधुर्य सर्व माधुर्यात श्रेष्ठ आहे. धर्मापासून होणारा आनंद हा सर्व आनंदात श्रेष्ठ आहे. 

१४. विजयातून द्वेष उत्पन्न होतो. कारण जित हा दु:खी असतो. जय पराजयाची भावना सोडून जो समाधान वृत्तीत राहतो तो सुखी होतो. 

१५. कामासारखा दुसरा अग्नी नाही. द्रेषासारखे चुकीचे निशाण नाही. शरीरासारखे दुसरे दुःख नाही. शान्तीसारखे सुख नाही.

१६. दुसरे काय अपशब्द बोलतात, काय दुष्कृत्ये करतात, काय पूर्ण करतात व काय अपुरे सोडतात यावर दृष्टी ठेवू नका. आपण काय पूर्ण केले आणि काय अपुरे सोडले यावर लक्ष ठेवणे अधिक चांगले. 

१७. जे विनयशील आहेत, जे चित्तशुद्धी व्हावी म्हणून इच्छितात, जे अनासक्त आहेत, एकान्तप्रिय आहेत, ज्यांचे आचरण शुद्ध आहे, जे विवेकशील आहेत. त्यांचे जीवन नेहमीच खडतर असते.

१८. तेजस्वी घोड्याला भरधाव धावण्यासाठी चाबकाचा फटकारा लागत नाही. जगामध्ये त्या तेजस्वी घोड्यासारखा कोणी आहे काय? की, जो दोषास्पद नाही, ज्याला ठपका लावण्याची वेळ पडलेली नाही. 

१९. कोणाशीही कठोरतेने बोलू नका. दुसर्याशी जसे बोलाल तसे प्रत्युत्तर येईल. क्रोधयुक्त भाषण दु:खकारक आहे आणि आघात केला तर प्रत्याघात होईल. 

२०. रथाच्या चाकाला जशी खीळ त्याप्रमाणेच ह्या जीवनाला स्वातंत्र्य, नम्रता, सदिच्छा, नि:स्वार्थीपणा आहेत.

२१. हा बौद्ध जीवनमार्ग आहे.

 

११. ढोंग

१. खोटे बोलू नये. खोटे बोलण्यास दुसर्याला प्रवृत्त करू नये. खोटे बोलण्याच्या कृत्याला संमती देऊ नये. सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे. 

२. तथागत जसे बोलतात तसे वागतात, तथागत जसे वागतात तसे बोलतात. ते यथा भाषी तथाकारी आणि यथाकारी तथाभाषी असल्यामुळे त्यांना तथागत म्हणतात. 

३. हा बौद्ध जीवनमार्ग आहे. 

 

१२. सम्यक मार्गनुसरण

१. सम्यक्‌ मार्ग निवडा आणि त्यापासून विचलित होऊ नका. 

२. मार्ग विपुल आहेत. परंतु सर्वच काही सम्यक्‌ मार्गाकडे नेत नसतात.

३. सम्यक्‌ मार्ग हा केवळ थोडक्यांच्या सुखासाठी नाही. तो बहुजन सुखासाठी आहे.

४. तो प्रारंभी, मध्ये आणि शेवटीही कल्याणप्रद असला पाहिजे. 

५. सम्यक्‌ मार्गाचे अनुसरण म्हणजे बौद्ध जीवनमार्गाचे अनुसरण होय. 

६. अष्टांगमार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे. सर्वश्रेष्ठ सत्यांमध्ये सत्यचतुफ़्य आहे, श्रेष्ठ वैषयिक अनासक्ती हा सर्वश्रेष्ठ गुण आहे आणि ज्याला हे पाहण्याची दृष्टी आहे तो श्रेष्ठ पुरुष होय.

७. प्रज्ञाशुद्धीचा हा एकमेव मार्ग आहे. दुसरा नाही, याच मार्गाने जा. 

८. जर तुम्ही या मार्गाचे अनुकरण केले तर तुमच्या दुःखाचा निरास होईल. दुःखकंटक कसे काढून टाकता येतील हे कळल्यावर, मी या मार्गाचा उपदेश केला.

९. तथागत हे केवळ पथ-दर्शक आहेत. ( स्वोन्नतीचा ) प्रयत्न ज्याचा त्याने स्वतः करावयाचा असतो. 

१०. सर्व सृष्टपदार्थ हे विनाशाधीन आहेत, हे जो ओळखतो त्याला दुःख विचलित करू शकत नाही.

११. सर्व रूपे अनित्य आहेत. जो हे ओळखतो त्याला दुःख स्पर्श करीत नाही.

१२. जेव्हा जागे व्हायला पाहिजे तेव्हा जो जागा होत नाही, जो तरूण आणि बळकट असूनही सुस्तपणाच्या आहारी गेलेला असतो, ज्याची इच्छा आणि विचार झोपी गेलेले असतात, त्या आळशी मनुष्याला कधीही ज्ञान होणार नाही.

१३. भाषणात सावध असणे, विचारात संयम राखणे, कायेने कोणतेही पाप न करणे, हे काया-वाचा-मनसा आचरावयाचे तीन मार्ग अवलंबिल्यावर प्रज्ञावंतांनी निर्देशिलेल्या मार्गाने माणसाला जाता येते.

१४. वास्तविक ज्ञानाने लाभ होतो आणि त्याच्या अभावाने नाश होतो. लाभाचे आणि नाशाचे हे दुहेरी मार्ग ओळखून ज्ञान वाढेल असा माणसाने उद्योग करावा. 

१५. शरदक्रतूतील कमळाप्रमाणे माणसाने आत्मप्रीती खुडून काढावी. शान्तीचा मार्ग जवळ करावा. सुगताने निर्वाणाचा मार्ग निदिष्ट केला आहे.

१६. अधर्माने वागू नका. अविचाराने जगू नका. दुष्ट सिद्धान्ताचे अनुकरण करू नका.

 १७. जागे व्हा. सुस्त पडू नका. सद्वणाची कास धरा. सद्गणी इहलोकी सुखी असतात. 

१८. जो पूर्वी अविचारी होता आणि नंतर सुविचारी झाला तो घनविमुक्‍त चन्द्राप्रमाणे जग तेजस्वी करतो. 

१९. जो दुष्कृत्ये सोडून सत्कृत्ये करू लागला आहे तो घनविमुक्‍त चन्द्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो.

२०. एका धर्मनियमाचे उल्लंघन करून जो असत्य बोलतो तो कोणते दुसरे दुष्कृत्य करणार नाही, हे सांगवत नाही.

२१. जे सदैव सावधान असतात, जे रात्रंदिवस अभ्यास करतात जे निर्वाणासाठी आटोकाट प्रयत्न करीत असतात, त्यांचे दुविकार ( आसव ) शेवटी लोप पावतात.

२२. अशी एक जुनी म्हण आहे की, जो स्तब्ध बसतो, त्याला लोक दूषण लावतात. जो फार बोलतो त्याला लोक दूषण लावतात आणि जो अगदी थोडे बोलतो त्यालाही दूषण लावतात. खरोखर,नाही असा या जगात ज्याला दूषणच लावले जात कोणीच नाही.

२३. ज्याला सदैव दूषण देतात किंवा ज्याची सदैव स्तुती करतात असा पुरुष पूर्वी नव्हता, आता नाही, आणि पुढेही कधी होणार नाही.

२४. वाणीच्या क्रोधापासून सावध राहा आणि जिभेचा संयम करा. मानसिक पापांचा त्याग करा आणि आपल्या मनानेही सद्रणाचा आचार करा. 

२५. अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे. प्रमाद मृत्यूचा मार्ग आहे. जे अप्रमादी आहेत ते अमर आहेत आणि जे प्रमादी आहेत ते मृतवत्‌ आहेत. 

 

१३. सद्धर्म आणि असद्धर्म यांचा संकर करु नका

१. जे खोट्याला खरे आणि खर्याला खोटे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहचू शकत नाहीत.

२. जे खर्याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहचू शकत नाहीत.

३. जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून ओळखतात त्यांच्या ठिकाणी सम्यक्‌ दृष्टी आहे. त्यांना सत्य लाभते.

४. घर नीट शाकारलेले नसले तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी गळू लागते त्याप्रमाणेच असंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करते.

५. घर नीट शाकारलेले असले की, त्यात ज्याप्रमाणे पावसाचे पाणी शिरू शकत नाही त्याप्रमाणेच सुसंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करू शकत नाही.

६. उठा! प्रमादी राहू नका. धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागत राहा. जो त्याप्रमाणे वागतो तो इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतो. 

७. सन्मार्गाचा अवलंब करा. कुमार्गाचा अवलंब करू नका. सन्मार्गाने जाणारे लोक इहलोकी आणि इतर सर्व लोकी सखी होतात.

Previous page                                    Next Page


 The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!