Part III—The Duties of the Bhikkhu
The Duties of the Bhikkhu PDF in English
पंचम खंड: संघ
भाग तिसरा: भिक्खुची कर्तव्ये
The Duties of the Bhikkhu
भिक्खुची नवदीक्षितासंबंधित कर्तव्ये
१. यश आणि त्याच्या चार मित्रांच्या धर्मांतराची वार्ता सर्वत्र पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की, देशातील श्रेष्ठ कुळांतील अणि त्यांहून कमी प्रतीच्या कुळातील उपासक भगवंताकडे त्याच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्याचा धम्म यांना शरण जाण्यासाठी आले.
२. पुष्कळच लोक धम्मासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी त्याच्याकडे य्रेऊ लागले. त्यापैकी प्रत्येकाला व्यक्तिशः मार्गदर्शन करणे कठीण आहे, हे भगवंतांना माहीत होते, म्हणून प्रतिदिनी वाढणार्या परिव्राजकांच्या संख्येला संघ या नावाने धार्मिक संप्रदायाचे रूप देणे त्यांना आवश्यक वाटले.
३. तेव्हा परिव्राजकांना संघाचे सदस्य बनवून त्यांना शिस्त लावण्यासाठी विनयाचे नियम बनवून ते संघाच्या प्रत्येक सदस्याने पाळणे आवश्यक केले.
४. नंतर भगवंतांनी प्रत्येक शिष्याने भिक्खु होण्यासाठी ज्या दोन अवस्थांतून गेले पाहिजे त्या ठरविल्या. पहिली अवस्था म्हणजे प्रत्येक शिष्याने परिव्राजक होऊन कित्येक वर्षे एखाद्या भिक्खूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत राहणे. शिक्षणाच्या काळानंतर परिक्षक मंडळासमोर आपली लायकी सिद्ध करून त्याला उपसंपदा घ्यावी लागे. उपसंपदा ग्रहण केल्यावरच तो पूर्ण भिक्खु होईल आणि संघाचा सदस्य बनेल असे ठरविले.
५. धम्म परिवर्तनाच्या प्रारंभीच्या काळात अशी व्यवस्था करणे शक्य नव्हते, म्हणून भगवंत परित्राजकांना-भिक्खुंना आपला धम्म सर्वत्र प्रसृत करण्यासाठी धम्मदूत म्हणून पाठवीत असत.
६. धम्मदूत म्हणून पाठविताना भगवंत भिक्खुंना म्हणत, “भिक्खूहो, मी सर्व प्रकारच्या मानवी आणि दैवी बंधनांपासून मुक्त झालो आहे. भिक्खूहो, तुम्हीही अशा बंधनांपासून मुक्त आहात. आता तुम्ही बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या अनुकंपेने देवाच्या आणि माणसांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी फिरत राहा.
७. ‘कोणीही दोघांनी एकाच वाटेने जाऊ नये आणि जो धम्म प्रथम आणि अंती त्याप्रमाणेच तत्वत: आणि अक्षरश: कल्याणप्रद आहे तो धम्म शिकवा. पवित्र, शुद्ध आणि परिपूर्ण असे श्रेष्ठ जीवन प्रकाशित करा.
८. ‘सर्व देशांत जा आणि ज्यांनी धम्माचा स्वीकार केला नाही त्यांना धम्माचा स्वीकार करावयास शिकवा आणि दुःखाने ने दग्ध झालेल्या ल्या सार्या जगाला आपल्या उपदेशाने पदशान धम्माची चा ओळख करून द्या. अज्ञानी ननी माणसांना ज्ञान द्या.
९, ‘ज्या ठिकाणी महर्षी, राजर्षी, ब्रम्हर्षी वास करीत आहेत आणि आपापल्या संप्रदायांचा फैलाव करीत आहेत त्या त्या ठिकाणी जा आणि त्यांना आपापल्या मताप्रमाणे प्रभावित करा.
१०. ‘ एकटेच जा. करुणामय अंत:करणाने जा. लोकांना बंधनमुक्त करा आणि त्यांना दीक्षा द्या.
११. भगवंतांनी त्यांना असेही सांगितले,
१२. ‘धम्मदान हे कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहे. धम्माचा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे.
१३. ‘शेत तणाने बिघडते. प्रजा द्रेषामुळे बिघडते. म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे.
१४. ‘शेत तणाने बिघडते. प्रजा मोहामुळे बिघडते. म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे.
१५. ‘शेत तणाने बिघडते. प्रजा गर्वामुळे बिघडते म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे.
१६. ‘शेत तणामुळे बिघडते तर प्रजा तृष्णेमुळे बिघडते. म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे.
१७. ‘अशा रीतीने धम्मपदाचा आदेश घेऊन साठ भिक्खू धम्मप्रचारार्थ सर्व देशांत गेले.’
१८. धम्मपरिवर्तनासंबंधी काय करावे याविषयी भगवंतांनी त्यांना अधिक शिक्षण दिले.
२. धम्मदीक्षा ही चमत्काराने करावयाची नाही
१. एकदा भगवान मल्लांच्या अनुपिय या गावी राहात होते. तेव्हा एकदा आपली चीवरे परिधान करून भिक्षापात्र घेऊन त्या गावी ते भिक्षेसाठी गेले.
२-३. भगवंतांनी असा विचार केला, ह्या सकाळच्या वेळेला अनुपिय गावात भिक्षेसाठी जाणे योग्य नाही. तेव्हा ज्या उद्यानात परिव्राजक भग्गव्व राहात आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला भेटावे.
४. म्हणूने ते त्या उद्यानात गेले.
५. भग्गव्वाने त्यांना पाहिल्यावर त्यांना उद्देशून तो म्हणाला, ‘ भगवान् यावे, आपले मी स्वागत करीत आहे. फार दिवसांनी आपण इकडे येत आहात. इथे हे आपणासाठी आसन सज्ज आहे. यावर बसावे.
६. भगवान आसनावर बसल्यावर भग्गव त्यांच्या शेजारी एका ठेंगण्या आसनावर बसला आणि तो परिव्राजक त्यांना म्हणाला,
७. “काही दिवसांपूर्वी लिच्छवी कुळातील सुनक्खत मजकडे येऊन म्हणाला, मी भगवंताचा त्याग केला आहे. मी त्यांना गुरु मानीत नाही. ही खरी गोष्ट आहे का?”
८. ‘लिच्छवी कुळातील सुनक्खताने तुला जे सांगितले ते सर्व खरे आहे.
९. हे भग्गव, काही दिवसांपूर्वी लिच्छवी कुळातील सुनक्खत मजकडे आला आणि म्हणाला, ‘हे भगवान, मी आपला त्याग केला आहे. आजपासून मी आपणाला गुरु मानीत नाही. तेव्हा मी त्याला विचारले, ‘हे सुनक्खत, तू मला गुरु मान असे मी कधी म्हटले होते काय?’
१०. ‘सुनक्खताने उत्तर दिले, ‘नाही.’
११. ‘किंवा तू तरी मला कधी असे म्हटले होतेस काय ? भगवंत, मी आपणाला गुरु मानतो.
१२. सुनक्खत म्हणाला, ‘नाही, मी कसे कधीच बोललो नाही.’
१३. ‘जर मी तुला सांगितले नाही आणि तूही तशी इच्छा प्रदर्शित केली नाहीस तर मग मी तरी असा कोण आहे किंवा तू तरी असा कोण आहेस की, तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलाव्यास?”
१४. ‘पण भगवान, आपण सामान्य माणसापेक्षा काही अद्भूत चमत्कार करून मला दाखवीत नाही.’
१५. ‘सुनकक््खता, मी तुला कधी असे म्हटले होते काय, कौमी तुला अद्भूत चमत्कार करून दाखवीन, तू माझा शिष्य हो.’
१६. ‘नाही भगवान.’
१७. ‘किंवा तू तरी मला म्हणाला होतास का, की सामान्य माणसाच्या शक्ती पलीकडचा अद्भूत चमत्कार भगवान मला करून दाखवतील म्हणून मी त्यांचा शिष्य होईन?”
१८. “नाही, भगवान.
१९, ‘जर मीही असे बोललो नाही व तूही असे बोलला नाहीस तर मग तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलतोस त्याला अर्थ काय?”
२०. ‘माणसाला अद्भूत चमत्कार करता येतील किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी मी आपला धम्म शिकवीत नसतो. माझा धम्म हा माणसाला आपल्या दु:खाचा पूर्ण निरास करता येईल हे शिकवितो. हा त्याचा उद्देश नाही काय?”
२१. ‘अद्णूत चमत्कार दाखविले जावोत अथवा न दाखविले जावोत, तथागतांच्या धम्मोपदेशाचा उद्देश जो तथागतांच्चा धम्माचे अनुसरण करतो तो आपल्या दु:खाचा नाश करू शकतो हा आहे.!
२२. ‘परंतु भगवान,” सुनक्खत मला सारखा म्हणत राहिला, ‘वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला, हे भगवान मला सांगत नाहीत.
२३. अरे सुनक्खता, मी कधी असे म्हटले आहे काय की, ये आणि माझा शिष्य बन; आणि मी तुला वस्तुजाताचा प्रारंभ स्पष्ट करीन?”
२४. ‘नाही, भगवान्!
२५. ‘किंवा तू असे कधी तरी म्हणाला होतास काय की, वस्तुजाताचा प्रारंभ कसा होतो हे मला भगवान शिकवितील म्हणून मी त्यांचा शिष्य बनेन?’
२६. ‘नाही भगवान, असे मी म्हटले नाही.’
२७. ‘तूही असे म्हटले नाहीस आणि मीही तसे म्हटले नाही. मग तू त्याग करण्याची भाषा बोलतोस त्याचा अर्थ काय ? माणसाच्या सर्व दु:खांचा निरास करण्याचा जो धम्म तो मी शिकवितो. त्याचा हेतू, वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला हे शिकवीत नसतो.!
२८. ‘वस्तुजाताचा आरंभ कसा झाला हे शिकवो, अगर न शिकवो दुःखनिरासासाठीच भगवान आपला धम्म शिकवीत असतात.
२९. “मग सुनक्खत, वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला किंवा ते प्रारंभ रहित आहे हे तुला समजण्यात काय अर्थ आहे?”
३०. ‘सुनक्खता, वज्जी लोकात तू माझी अनेक प्रकारे प्रशंसा केली आहेस.
३१. ‘सुनक्खता, वज्जी लोकांत धम्माचीही तू अनेक प्रकारे प्रशंसा केलेली आहेस.
३२. ‘सुनक्खता वज्जी लोकांत तू अनेक प्रकारे संघाची प्रशंसा केली आहेस.
३३. ‘सुनक्खता, मी तुला असे सांगतो की, काही लोक तुजसंबंधी असे म्हणतील की, लिच्छवी कुळातील सुनक्खताला गौतमाच्या आदेशानुसार भिक्खूचे पवित्र जीवन जगता आले नाही, त्याचे नियम पाळता आले नाहीत. म्हणून विनय झुगारून देऊन तो दुर्वर्तन करू लागला आहे.
३४. “भग्गव्वा, अशा रीतीने लिच्छवी कुळातील सुनक्खताला मी बोललो. तो धम्म आणि विनय यांचा त्याग करून आता अधोगतीच्या मार्गाला लागला आहे.
३५. सुनक्खताने धम्म आणि बुद्धाचा विनय यांचा त्याग केल्यावर तो लोकांना असे सांगू लागला, बुद्धाच्या प्रज्ञा आणि बोधीमध्ये काहीच दैवी नाही. त्याने केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर असा एक वैयक्तिक सिद्धान्ताचा शोध लावला आहे आणि तो प्रतिपादिला आहे की, ऐकणार्याने आपले दुःख निवारण्यासाठी त्याचे परिपालन व आचरण करीत राहावयाचे. त्यांत दैवी असे काही नाही.
३६. सुनक्खत अशा रीतीने बुद्धाची निंदा करण्याच्या हेतूने बुद्धाच्या सिद्धान्तात गूढ अथवा दैवी असे काही नाही असे जे सांगत सुटे त्यात तथ्यांश होता. कारण बुद्धाने आपल्या धम्मपरिवर्ततात अलौकिक अथवा चमत्कार अशा कोणत्याही साधनांचा उपयोग केलेला नाही.
३. धम्मपरिवर्तन हे बळाने करावयाचे नसते
१. एकदा भगवान राजगृह आणि नालंदा यांना जोडणार्या णाया राजमार्गावरून जवळ जवळ पाचशे भिक्खूंसह जात होते. त्या वेळेला सुप्पिय नावाचा एक परिव्राजक भिक्खू, ब्रह्मदत्त नावाच्या आपल्या तरुण शिष्यासह त्याच मार्गावरून चालला होता.
२. परिव्राजक सुप्पिय बुद्ध, धम्म आणि संघ यांची निदा करीत होता. परंतु त्याचा तरुण शिष्य ब्रह्मदत्त मात्र बुद्ध,धम्म आणि संघ याची प्रशंसा करीत होता.
३. अशा रीतीने गुरू आणि शिष्य परस्परविरोधी मतांचे प्रतिपादन करीत भगवान आणि त्यांच्या भिक्खू संघामागून चालले होते.
४. भगवान रात्र होताच अंबलठिठका उद्यानातील राजाने निर्मिलेल्या एका विश्रांतिगृहात आपल्या भिक्खू संघासह थांबले. परिव्राजक सुप्पिय व तरुण ब्रह्मदत्त तेथेच उतरले आणि तेथेही त्यांनी आपली चर्चा चालू ठेवली.
५. पहाटेस काही भिक्खू उठले आणि सभागृहात जाऊन बसले. तिथे बोलता बोलता ते सुप्पिय आणि ब्रह्मदत्त ह्यांच्यामधील भाषणाची चर्चा करू लागले.
६. त्यांच्या भाषणाचा रोख कुणाकडे आहे हे जाणताच भगवान सभागृहात आले आणि त्यांच्यासाठी पसरलेल्या एका चटईवर बसले. त्यांनी भिक्खुंना विचारले, तुम्ही कशासंबंधी बोलत आहात? तुमच्या संभाषणाचा विषय काय आहे?’ भिक्खुंनी सर्व सांगताच भगवान म्हणाले.
७. ‘भिक्खू हो, कोणीही संघाबाहेरील मनुष्य माझ्याविरुद्ध, धम्माविरुद्ध अथवा संघाविरुद्ध बोलू लागला तरी त्यामुळे तुम्ही त्या माणसासंबंधी मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष धरता कामा नये.
८. असे कोणी बोलू लागले, आणि जर तुम्ही दुखावल्यासारखे होऊन त्याच्यावर रागावू लागलात, तर तुमचा राग तुमच्या आत्मविजयाच्या आड येईल. जेव्हा इतर लोक तुमच्याविरुद्ध बोलतात, त्या वेळी तुम्ही रागावलात आणि कष्टी झालात तर बोलणार्याचे शब्द कितपत योग्य आहेत अथवा अयोग्य आहेत हे तुम्हाला कसे ठरविता येईल?”
९. भिक्खू म्हणाले, “भगवान, आम्ही क्रोधाविष्ट झालो तर दुसर्याच्या भाषणाची योग्यायोग्यता आम्हाला ठरविता येणार नाही. ही खरी गोष्ट आहे.
१०. भगवान पुढे म्हणाले, ‘संघाबाहेरील लोक माझ्यासंबंधी, धम्मासंबंधी, अथवा संघासंबंधी काही कमीपणा आणणारे शब्द बोलू लागले तर तुम्ही म्हणावे, अमूक अमूक गोष्ट आमच्या संघात अथवा आमच्यामध्ये नाही आणि अशा रीतीने त्यांचे शब्द कसे खोटे अथवा चुकीचे आहेत हे व्यवस्थितपणे स्पष्ट करून दाखवावे.
११. “भिक्खूहो, परंतु संघाबाहेरील लोक जेव्हा माझी, धम्माची वा संघाची प्रशंसा करतील त्या वेळी तुम्ही त्यांना काय म्हणावे ते ऐका.
१२. ‘प्रशंसा करणारा म्हणेल, हिंसेचा त्याग केल्याने श्रमण गौतम हा जीवहत्येपासून दूर राहतो. त्याने दंड आणि तलवार हाती धरण्याचे सोडले आहे. दांडगेपणाची त्याला लाज वाटते. तो करुणामय असून सर्व जीवजातासंबंधी त्याच्या ठिकाणी मैत्री वसत आहे. ज्याचे धम्मपरिवर्तत झाले नाही तो तथागतासबंधी अशा प्रकारे प्रशंसा करण्याचा संभव आहे.
१३. ‘किंवा तो म्हणेल, न दिलेले असे कोणाचे काही घ्यावयाचे नाही हे व्रत-पालन करणार्या गौतमाने लोभ सोडलेला आहे. जे दिले तेवढेच तो घेतो. आपल्या गरजा भागविल्या जातील असा त्याला विश्वास असतो. आपले जीवन प्रामाणिकपणे आणि हूदयशुद्धीने व्यतीत करीत असतो.
१४. ‘किंवा तो संघाबाहेरील मनुष्य प्रशंसा करताना असे म्हणेल, व्यभिचाराचा त्याग करून गौतम हा ब्रह्मचर्य पाळीत आहे. संभोग आणि सामान्य माणसाच्या क्रिया यांच्यापासून तो दूर राहातो.
१५. ‘तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल, श्रमण गौतम असत्य भाषण करीत नाही. खोटेपणाचा आपणाला स्पर्श होऊ देत नाही. तो सत्य बोलतो. सत्यापासून विचलित होत नाही. तो इमान राखतो. तो विश्वसनीय आहे. दिलेला शब्द तो मोडीत नाही.
१६. “तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल, श्रमण गौतम निदाजनक शब्द उच्चारीत नाही. निदेचा त्याने त्याग केला आहे, तो जे इथे ऐकतो ते इथल्या लोकांच्याविरुद्ध भांडण उभे करण्यासाठी इथे बोलत नाही. अशा रीतीने भिक्खुंना एकत्र आणण्यात, मित्र असतील त्यांची मैत्री अधिक दृढ करण्यात आपले जीवन व्यतीत करतो. तो शांतिनिर्माता, शांतिप्रेमी, शांतीची मनापासून इच्छा करणारा आणि ज्याच्या योगे शांती वाढेल असेच शब्द उच्चारणारा आहे.
१७. ‘किंवा तो म्हणेल, श्रमण गौतमाने उद्धट भाषणाचा त्याग केल्यामुळे त्याच्या मुखांतून कठोर शब्द बाहेर पडत नाहीत. निर्दोष सुश्राव्य, ललित, हृदयाला जाऊन भिडणारे, लोकांना आल्हाद देणारे, लोकांचे प्रेम वृद्धिगत व्हावे असे शब्द तो बोलतो.
१८. “अथवा तो म्हणेल, चेष्टेखार भाषणाचा त्याग केल्यामुळे श्रमण गौतम निरर्थक संभाषणात कधीच गुंतत नाही. तो योग्य वेळी बोलतो, सत्याला धरून बोलतो, धम्म आणि संघ यावर तो समयोचित बोलतो. अंत:करणात साठविण्यासारखे शब्द बोलतो. समुचित उदाहरणे देतो. भेद स्पष्ट करतो आणि मुद्दयाला कधीही सोडीत नाही.
१९, ‘ किंवा तो म्हणेल, श्रमण गौतम बीजे किंवा रोप यांनासुद्धा इजा करीत नाही. तो दिवसा फक्त भोजन करतो रात्री अथवा मध्य-दिवसा नंतर अन्न सेवन करीत नाही. जत्रेतील नाच, तमाशा, संगीताचे जलसे अशा ठिकाणी तो कधीही जात नाही. फुलमाळा, सुगंधी द्रव्ये आणि उटणे यांनी तो आपणाला विभूषित करीत नाही. लांबलचक उंच बिछान्यावर तो कधीही पहुडत नाही. सोने, रुपे तो कधी स्वीकारीत नाही. विन शिजविलेले धान्य तो घेत नाही. स्त्रिया अथव युवती ह्यांचा तो स्वीकार करीत नाही. दासदासी यांचा तो स्वीकार करीत नाही. मेंढे, बकरी, बोकड, हे तो स्वीकारीत नाही. कोंबड्या अथवा डुकरे तो स्वीकारीत नाही. हत्ती, घोडे, गुरे तो स्वीकारीत नाही. तो दूताचे अथवा मध्यस्थाचे काम करीत नाही. तो क्रयविक्रय करीत नाही. लाचलुचपत, लांडीलबाडी ह्यांचा वाममार्ग तो आचरीत नाही. तो कोणाला विद्रुप करीत नाही. कोणाचा खून करीत नाही. कोणाला कडी घालून बांधीत नाही. वाटमारी, दरोडे आणि मारहाण करीत नाही.
२०. ‘ भिक्खुहो; तथागताची प्रशंसा करताना धर्मपरिवर्तन न झालेला मनुष्य अशा प्रकारच्या गोष्टी बोलेल, परंतु त्यामुळेसुद्धा आनंदित होता कामा नये, किंवा तुमचे हृदय उचंबळूनही जाता कामा नये. कारण असे घडणेसुद्धा तुमच्या साधनेच्या आड येईल. . संघाबाहेरील लोक जेव्हा अशा रीतीने माझी, धम्माची अथवा संघाची प्रशंसा करतील, तेव्हा तुम्ही जे सत्य असेल ते सत्य म्हणून मान्य केले पाहिजे. आणि म्हटले पाहिजे, त्या किंवा त्या कारणास्तव ही गोष्ट खरी आहे. अशी गोष्ट आमच्यामध्ये आढळते हे अगदी बरोबर आहे.
४. भिक्खु धम्मप्रचारासाठी झटले पाहिजे
१. भिक्खूंना उद्देशून भगवंत एकदा म्हणाले,
२. ‘ भिक्खुहो, मी जगाशी भांडत नाही. परंतु जग माझ्याशी भांडते. सत्याचा शिक्षक जगातील कोणाही माणसाशी भांडत नसतो.
३. ‘ भगवंत, आम्ही स्वत:ला, वीर असे संबोधितो. आम्ही कोणत्य प्रकारचे वीर आहोत?’
४. भिक्खूहो, आम्ही संग्राम करतो म्हणून आम्हांला वीर म्हणतात.
५. : भगवान, आम्ही कशासाठी संग्राम करतो ?”
६. ‘ श्रेष्ट शील, श्रेष्ठ ध्येय आणि श्रेष्ठ प्रज्ञा यांसाठी आम्ही युद्ध करतो. म्हणूनच आम्हाला वीर म्हणतात.
७. ‘ ज्य ठिकाणी शील संकटात असते त्या वेळी संघर्ष करण्याला घाबरू नका : दुबळेपणाने वागू नका.