Vinaya for the Laity

Vinaya for the Laity

Part V—Vinaya for the Laity

Vinaya for the Laity PDF in English

खंड ५ : संघ

भाग पाचवा: उपासकासाठी नियम

Vinaya for the Laity

Previous page                                    Next book

 

१. धनवंतासाठी विनय

(I)

१. दारिद्रयांत धन्यता मानावी असा कधीही भगवंतांनी दारिद्रयाचा गौरव केला नाही.

२. त्याप्रमाणेच दरिद्री माणसांनी आपल्या दारिद्रयात समाधान मानावे म्हणजे पुढे त्यांना सारी पृथ्वी लाभणार आहे असे कधीच शिकविले नाही. 

३. उलट संपत्ती ही स्वागतार्ह आहे असे ते म्हणतात. एका गोष्टीवर मात्र त्यांचा कटाक्ष होता आणि तो म्हणजे संपत्ती ही विनयशासित असली पाहिजे. 

(II)

१. एकदा अना्थपिडिक भगवानांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून सन्निध बसून म्हणाला, गृहस्थाला स्वागतार्ह, सुखकर आणि पथ्यकर परंतु त्याला दुष्प्राप्य अशा कोणत्या गोष्टी आहेत?”

२. भगवंतांनी उत्तर दिले, ‘ह्या गोष्टींपैकी सन्मानाने धन संपादन करणे हे प्रथम आहे.

३. ‘दुसरी गोष्ट म्हणजे, आपले आप्टेष्टसुद्धा सन्मार्गाने धन संपादन करीत आहेत याची काळजी घेणे. 

४. “तिसरी गोष्ट म्हणजे दीर्घायू होणे.

५. ‘या जगातील स्वागतार्ह सुखकर आणि पथ्यकर अशा या तीन दुष्प्राप्य गोष्टी मिळविताना सदगृहस्थाने चार अटी पाळल्या पाहिजेत. ह्या चार अटी म्हणजे श्रद्धा, सदाचार, औदार्य आणि प्रज्ञा-यांच्या सौभाग्याने संपन्न होणे.

६. श्रद्धारूपी धनाने संपन्न होण्यासाठी तथागतासंबंधीचे सर्वश्रेष्ठ असे ज्ञान झाले पाहिजे. ह्या ज्ञानाने त्याला हे भगवान अर्हत आहेत, सम्यक्‌ संबुद्ध आहेत, विद्या व सदाचरणसंपन्न आहेत. विश्वाचे जाणकार आहेत अतुलनीय आहेत, ते दुर्दमनीय मनुष्यांना वळण लावणारे सारथी देवमनुष्याचे गुरू आहेत असे उमगले पाहिजे. 

७. सदाचाराने अथवा शीलसौभाग्याने संपन्न होणे म्हणजे हिंसा, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, सुरापान यांपासून परावृत्त होणे. 

८. औदार्यरूपी सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे गृहस्थाने आपले मन कंजुषपणापासून मुक्‍त करून औदार्याने आणि मुक्तहस्ताने दान करण्यात आनंद मानावयास शिकणे, लोकांनी त्यांच्यासमोर हात पुढे करावा आणि त्याने सहजपणे दान द्यावे, अशी योग्यता त्याच्या अंगी आली पाहिजे. 

९. प्रज्ञारूपी सौभाग्याने संपन्न होणं म्हणजे काय ? तुला माहित आहे की ज्या गृहस्थाचे मन हावरेपणा, लोभ, द्वेष, आळस, तंद्री, अनवधान आणि धांदल यांनी ग्रस्त होते तो मनुष्य दुष्कृत्ये करतो. जे कर्तव्य केले पाहिजे त्याजकडे दुर्लक्ष करतो आणि अशा रीतीने सुख व सन्मान यांना पारखा होतो. 

१०. हावरेपणा, लोभ, द्वेष, आळस, तंद्री, अनवधान, धांदल, आणि शंकेखोरपणा हे मनाचे कलंक आहेत. जो गृहस्थ ह्या मानसिक कलंकापासून मुक्‍त होतो त्याला थोर आणि भरपूर प्रज्ञा लाभते. दोषरहित अशा प्रज्ञेने त्याची दृष्टी स्वच्छ होते. तो पूर्ण ज्ञानी होतो.

११. अशा रीतीने सन्मार्गाने, न्यायाने, थोर परिश्रमाने, मनगटाच्या जोरावर, निढळाच्या घामावर संपत्ती कमावणे, ही धन्यता मानण्याजोगी गोष्ट आहे. असा सदगृहस्थ स्वतःला सुखी, आनंदी करतो आणि सदैव सुखसमाधान भोगतो त्या-प्रमाणेच आपले आईबाप, पत्नी, मुलेबाळे, सेवक, कामकरी, मित्र आणि सहचारी यांना सुखी आणि आनंदी करतो आणि त्यांना सदैव सुखात ठेवतो. 

 

२. गुहस्थासाठी विनय

(ह्या विषयांवरील बुद्धाचे विचार सियालवाद सुत्तांत अंतर्भूत झाले आहेत.)

१. एकदा भगवान राजगृह येथील वेळूवनातील कलंदनिवासात विहार करीत होते.

२. त्या समयी एका गृहस्थाचा सियाल नावाचा तरुण पुत्र प्रातःकाळी उठून न राजगृहाच्या बाहेर गेला आणि ओल्या केसांनी आणि कपड्यांनी वर हात जोडून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, उर्ध्व, अधर अशा रीतीने आकाश-पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करू लागला. 

३. त्याच वेळी सकाळी भगवंतानी चीवर परिधान करुन, चीवर व भिक्षापात्र घेऊन राजगृहात भिक्षेसाठी प्रवेश केला. अष्ट दिशांची पूजा करणारा सियाल त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांनी विचारले, ‘ तू अष्टदिशांची पूजा का करीत आहेस?”

४. त्यावर सियालने उत्तर दिले, ‘ माझे वडील मृत्यूशय्येवर असताना मला म्हणाले, ‘ मुला, तू आकाश पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करीत जा.’ वडीलांच्या आज्ञेचा मान राखण्यासाठी, भगवान, मी अशा रीतीने पूजा करीत आहे.

५. भगवंतानी त्याला विचारले, ‘ व्यवहारी माणसाचा हा धर्म कसा ठरतो ?’ सियालने उत्तर दिले, ‘ याशिवाय व्यवहारी माणसाचा कोणता धर्म असणार? आणि जर असेल तर तो भगवंतांनी मला सांगावा.

६. ‘ तरुण गृहस्था, ऐक; मी तुला व्यवहारी माणसाचा धर्म सांगतो.’ तरुण सियाल म्हणाला, ‘ठीक आहे.’ मग भगवंत म्हणाले:

७. : माणसाच्या धर्माने माणसाला दुर्वर्तनपासून परावृत होण्यास शिकवले पाहिजे. जीवहत्य करणे, न दिलेले बलात्काराने घेणे, व्यभिचार करणे आणि असत्य बोलणे, हे चार दुर्गुण त्याने टाळले पाहिजेत. 

८. ‘ सियाल, हे लक्षात ठेव की, पापकर्मे ही पक्षपातीपणा, शत्रुत्व, मूर्खपणा आणि भय यामुळे घडतात. यांपैकी कोणताही हेतु त्याच्या कृत्याच्या मागे नसेल तर त्याच्या हातून पापकर्म घडणार नाही. 

९. ‘ माणसाच्या धर्माने माणसाला आपल्या संपत्तीची उधळपट्टी करु नये असे शकवले पाहिजे. मद्यपानाचे व्यसन, अवेळी रस्त्यावरुन भटकत राहणे, जत्रांतून परिभ्रमण करणे, जुगाराची सवय जडणे, कुमित्रांची संगत धरणे आणि आळशी सवयी अंगी लावून घेणे, यांमुळे संपत्तीची धूळधाण होते. 

१०. ‘मद्यपानाच्या सवयीने सहा प्रकारची संकटे उद्भवतात. संपत्तीचा खराखुर नाश, वाढती भांडणे, रोगाधीनता, शीलभ्रष्टता, अश्लील वर्तणूक आणि बुद्धीनाश ही ती सहा संकटे होत. 

११. : अवेळी रस्त्यावर भटकण्याने माणूस सहा प्रकारच्या संकटात पडतो. ती म्हणजे तो स्वत:, त्याची बायकामुले आणि त्याची मालमत्ता ही अरक्षित राहतात. त्याप्रमाणेच ज्या गुन्ह्यांचा तपास लागला नाही, त्यासंबंधी त्याचा संशय घेतला जातो. खोट्या अफवा त्याला चिकटतात आणि त्यांना तोंड देण्यात त्याला पुष्कळच त्रास सोसावा लागतो.

१२. ‘ जत्रेत भटकल्याने तो सहा प्रकारच्या संकटांत सापडतो. ती म्हणजे तो सारखा विचार करीत राहतो की, नाचणे, गाणे, बजावणे, काव्य गायन, झांजा, ढोलकी कुठे वाजत आहेत का?”

१३. ‘ जुगाराने मोहीत होणार्यावर येणारी सहा संकटे म्हणजे, खेळात जिंकला- तर त्याचे सहकारी त्याचा द्वेष करतात, हरला तर द्रव्यनाशाबद्दल तो स्वत: शोक करतो. त्याच्या जवळची नगदी संपत्ती व्यर्थ जाते, न्यायालयासमोर त्याच्या शब्दाला किमत उरत नाही, त्याचे मित्र आणि सहकारी त्याचा तिरस्कार करतात. लग्नासाठी त्याला कोणीच मागणी घालीत नाही. कारण लोक म्हणतात, जुगार्याला बायकोचे पालनपोषण कसचे करत येणार? 

१४. : कुसंगतीने सहा प्रकारची संकटे ओढवतात. ती म्हणजे त्याला कोणाही जुगारी, व्यभिचारी, दारुबाज, लबाड, पैसे खाऊ आणि हिंसक मन ष्याची मैत्री जडते. 

१५. ‘ आळशीपणाच्या सवयीने ओढवणारी सहा संकटे म्हणजे, तो म्हणतो, फार थंडी आहे म्हणून मी काम करीत नाही, फार गरमी आहे म्हणून काम करीत नाही, अद्यापि अवकाश आहे किंवा आता फार उशीर झाला, म्हणून मी काम करीत नाही; तो म्हणतो, फार भुक लागली आहे म्हणून काम करीत नाही. तो म्हणतो, हातात फारच काम आहे म्हणून काम करीत नाही. आणि अशा रीतीने जे करायला पाहिजे ते त्याच्य हातून घडत नाही. त्याच्या संपत्तीत भर पडत नाही आणि असलेली संपत्ती हळूहळू नाहीशी होऊ लागते. 

१६. ‘ व्यवहारी माणसाच्या धर्माने खर्या मित्राची पारख करण्यास त्याला शिकवले पाहिजे.

१७. ‘ मित्र म्हणून म्हणविणारे परंतु वस्तुतः शत्रू असणारे असे चार प्रकारचे लोक आहेत. लोभी पुरुष, बोलघेवडा परंतु कृतीने शून्य अस पुरुष, खुशामत्या पुरुष आणि उधळ्या वृत्तीचा पुरुष. 

१८. यांपैकी पहिल्या प्रकारचा मनुष्य बाहेरून मित्रत्व दाखवितो, परंतु आतून तो शत्रूसारखाच वागतो. कारण तो देतो थोडे व मागतो अधिक. केवळ भीतीने तो आपले कर्तव्य करीत असतो. परंतु त्याचा मूळ हेतू स्वार्थ साधणे हा असतो.

१९.  जो बोलघेवडा आहे आणि कृतीच्या नावाने शून्य आहे, असा मनुष्य कितीही मैत्री दाखवित असला तरी तो शत्रूच मानावा. कारण तो आपल्य गत किंवा भावी काळासंबंधी मोठ्या आत्मीयतेने बोलत असला तरी त्याचा हेतू पोकळ शब्दांनी तुमची कृपा संपादन करायची हा असतो. प्रसंग पडताच मात्र तो आपल्या अंगी साहाय्य करण्याचे सामर्थ्य नाही असे सांगून दगा देतो.

२०. खुशामती मनुष्य मित्रासारखा वाटत असला तरी तो शत्रूच समजावा. तो दुष्कृत्ये करण्याला संमती देतो आणि सत्कृती त्याला असंमत असते. तो तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतो परंतु तुमच्या पाठीमागे दुसर्याजवळ तुमची निदा करतो.

२१. त्याप्रमाणेच उधळ्या सोबती मित्रासारखा वाटत असला तरी शत्रूच मानावा. कारण तुम्ही अवेळी रस्त्यावर भटकत असताना तो तुम्हाला सोबत करतो. नाचतमाशा पाहताना तो तुम्हाला सोबत करतो. . तुम्ही द्यूतक्रीडेत त मग्न झाला असता तुम्हांला तो सोबत करतो.

२२. ‘ मनःपूर्वक मैत्री करणारे चार मित्र असतात, सहाय्यक, सुखादुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा, सद्धर्तनाचा सल्ला देणारा आणि सहानुभूती दाखविणारा. 

२३. ‘ सहाय्यक हा खरा मित्र समजा. कारण तुम्ही बेसावध असताना तो तुम्हाला सावध करतो. तुमचे आपल्या मालमत्तेवर लक्ष नसताना तो तिचे संरक्षण करतो. तुम्ही भयग्रस्त झाले असता तो तुम्हाला आश्रय देतो. तुम्हाला एखादे काम करावयाचे असले की, तुम्हाला ज्याची गरज असेल ते तुम्हाला दुपटीने न पुरवितो. 

२४. ‘ सुखदु:खामध्ये समान मैत्री ठेवणारा खरा मित्र मानावा. कारण तो आपली गुपिते तुम्हाला सांगतो. तुमची गुपिते तो गुप्त ठेवतो. तुमच्या अडचणींत तुमचा त्याग करीत नाही. प्रसंग पडला तर तुमच्यासाठी प्राणदान करायला तयार असतो. 

२५. ‘तुम्ही काय केले पाहिजे याचा सल्ला देणारा खरा मित्र मानावा कारण तो तुम्हाला दुष्कृत्यांपासून परावृत्त करतो. सत्कृत्याला प्रबृत्त करतो. जे पूर्वी कधी ऐकले नाही अशा चार गोष्टी तुम्हाला सांगतो आणि सन्मार्ग दाखवितो.

२६. ‘तुमच्याबद्दल सहानुभूति दाखविणारा खरा मित्र मानावा कारण तो तुमच्या दु:खाने दुःखी होतो. सुखाने आनंदित होतो. तुमची निदा करणार्यांना तो प्रतिबंध करतो आणि तुमची स्तुती करणार्यांची तो प्रशंसा करतो.’  असे भगवंत म्हणाले.

२७. जो धर्म मानवधर्म आहे तो मानवाला षडदिशांची पूजा करण्याऐवजी आपले आईबाप, शिक्षक, पत्नी, मुले, मित्र, सोबती, नोकरचाकर आणि धर्मगुरू यांचा मान राखायला शिकवितो. 

 

३. पुत्रांसाठी विनय

१. “मुलांनी वडिलांची सेवा करावी. त्यांनी असा विचार मनात आणावा की, माझ्या वडिलांनी माझे पालनपोषण केले आणि मी त्यांना पोसले पाहिजे. त्यांना जी कर्तव्ये करावी लागली ती आता मी केली पाहिजेत.  माझ्या कुळाची परंपरा मी चालवली पाहिजे. आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता मी माझ्या अंगी आणली पाहिजे. वडील मुलावर प्रेम करीत असतात. दुर्गृणापासून त्याला परावृत्त करतात. सद्रणाचा त्याला उपदेश करतात. आपल्या व्यवसायाचे त्याला शिक्षण देतात. त्याला साजेल असे त्याचे लग्न करून देतात आणि योग्य वेळी आपली सारी मालमत्ता त्याचावर सोपवतात.”

 

४. शिष्यासाठी विनय

१. शिष्याने पुढीलप्रमाणे आपल्या गुरूची सेवा करावी. ते आले असता आसनावरून उठून त्यांना मान द्यावा. त्यांना अभिवादन करावे. त्यांची सेवा करावी. ते शिकवतील ते उत्सुकतेने शिकावे. त्यांचे कोणते काम करावयास पडले तरी ते करावे आणि ते अध्यापन करीत असता एकाग्र चित्ताने ते ग्रहण करावे. कारण गुरु शिष्यावर प्रेम करतात. जे त्यांना ज्ञान आहे ते त्या शिष्याला देतात. जे एकदा शिष्याने ग्रहण केले आहे ते त्याचे ज्ञान गुरु अध्यापनाने दृढ करतात. ते सर्व विद्या आणि कला त्याला पूर्णपणे शिकवितात. त्याचे मित्र आणि सोबत्यांशी त्याच्यासंबंधी चांगले बोलतात आणि ते सर्व तर्हेने त्याच्या रक्षणाची काळजी वाहतात.

५. पति-पत्नीसाठी विनय

१. “ पतीने आपल्या पत्नीचा सन्मान राखून, आदरभाव प्रदर्शित करून, तिजशी एकनिष्ठतेने वागून, तिला सत्ता देऊन, तिला लागणारे दागदागिने पुरवून तिची सेवा करावी. कारण पत्नी त्याच्यावर प्रेम करते. ती सासर-माहेरच्या नातलगांचे आदरा- तिथ्य करून आपले कर्तव्य बजाविते. ती पातित्रत्याने वागते. आपल्या नवर्याच्या उपजिंत धनावर दक्षतापूर्वक लक्ष ठेविते. आणि उद्योगाने आणि कुशलतेने आपली कर्तव्ये पाळते.”

२. “ कुलपुत्राने औदार्याने, दाक्षिण्यानेने, दान धर्माने आपल्या मित्रांची आणि सहकार्यांची सेवा करावी. आपल्यासारखेच त्यांना वागवावे, आणि आपण स्वत: न्यांना दिल्या शब्दप्रमाणे वागावे. कारण त्याचे मित्र आणि परिचित त्याच्यावर प्रेम करतात. तो गैरसावध असताना त्याचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतात. संकटात ते त्याला आधार देतात. त्याच्या आपद्अवस्थेत त्याग करीत नाहीत, आणि त्याच्या परिवाराच्या हिताला जपतात.”

 

६. धनी व सेवक यांसाठी विनय

१. धन्याने नोकर-चाकरांना पुढील प्रमाणे वागवावे. त्याने त्यांच्या सामर्थ्याप्रमाणे त्यांना काम द्यावे. अन्न व मजुरी द्यावी. ते आजारी पडले अरताना त्यांची शुश्रूषा करावी. असाधारण स्वादिष्ट पक्वान्ने त्यांनी वाटून खावी. 

वेळ पडेल तेव्हा त्यांना रजा द्यावी. कारण नोकरचाकर हे धन्यावर प्रेम करतात. ते त्याच्यापूर्वी उठतात, आणि त्याच्या नंतर झोपतात. त्यांना जे द्यावे त्यात ते समाधान मानतात. ते आपले काम चोख बजावतात आणि त्याची किर्ती सर्वत्त वाढवितात.  कुलपुत्राने आपल्या धर्मगुरूची सेवा काया-वाचा-मनसा, त्याजवर प्रीती करून, आपल्या घराचे चे दार त्यांन सदैव मोकळे ठेवून व त्यांच्या ऐहिक गरजा भागवून करावी, कारण धर्मगुरू आपल्या शिष्याला दुष्कृत्यापासून पराडमुख करतात. त्याला सन्मार्गाचा उपदेश करतात. मायेने त्यांच्यासंबंधी विचार करतात. जे पूर्वी कधी कानी पडले नाही ते शिकवितात आणि पूर्वी जे कानी पडलेले असते ते चूक असेल तर त्याची सुधारणा करतात.

 

७. निष्कर्ष

१. भगवन्तांनी सियालाला वरीलप्रमाणे उपदेश केल्यवर तो म्हणाला, * सुंदर! फार सुंदर! एकदा स्थानभ्रष्ट झालेली वस्तु ज्याप्रमाणे परत स्थानावर बसवावी. किंवा जे गुपित होते ते उघड करावे किंवा पथभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा काळोखात दीप लावावा आणि डोळे असतील त्यांना सन्मार्ग दाखवावा, अगदी त्याप्रमाणे भगवन्तानी मला अनेक रीतीने सत्य विशद करून सांगितलेले आहे.

२. मी भगवन्तांना, त्यांनी सांगितलेल्या धम्माला आणि संघाला शरण जातो. आजपासून आमरण शरण आलेल्या या उपासकाचा स्वीकार करावा.

 

८. कन्येसाठी विनय

१. एकदा भगवान भद्दीय समीप असलेल्या जेतवनात राहात होते. तेथे मेण्डकाचा नातू उग्गह, याने त्यांना भेट दिली आणि अभिवादन करून तो त्यांच्या बाजूला बसला आणि भगवन्तांना म्हणाला, 

२. “भगवान, उद्या आपण माझ्या घरी भोजनास यावे.’

३. भगवन्तानी त्याला मूक संमती दिली. 

४. भगवन्तांनी आपले आमंत्रण स्वीकारले, हे पाहिल्यावर उग्गह आपल्या स्थानावरून उठला व भगवन्तांना अभिवादन करून तो त्यांच्या उजव्या बाजूने निघून गेला.

५. रात्र संपल्यावर भगवंतांनी चीवर परिधान करून आणि भिक्षापात्र व चीवर घेऊन ते उग्गहाच्या घरी आले. तेथे त्यांच्यासाठी सज्ज ठेवलेल्या आसनावर ते बसले. उग्गहाने स्वहस्ताने भगवंतांचे समाधान होईतोवर अन्न वाढले.

६. भगवन्तांनी भिक्षापात्रावरून आपला हात काढून घेतल्यावर उग्गह त्यांच्या बाजूला बसला आणि म्हणाला. 

७. “भगवान, या माझ्या मुली, त्या आता पतिगृही जाणार आहेत. भगवंतांनी त्यांना शहाणपणाचा सल्ला द्यावा आणि दीर्घकाळ त्यांना सुख मिळेल, त्यांचे हित साधेल असा त्यांना उपदेश करावा.’ 

८. यावर भगवंत त्या मुलींना उद्देशून म्हणाले, ‘मुलींनो, तुम्ही अशा प्रकारचे वर्तन ठेवावे की, आमचे आई-बाप आमचे सुख आणि हिति साधण्यासाठी प्रेमाने ज्या पतीच्या हाती आमचा हात देतील, त्या पतीविषयोींच्या प्रेमबुद्धीने आम्ही सकाळी लवकर उठू आणि सर्वांच्या शेवटी झोपू; मनःपूर्वक काम करू, कुठलीही गोष्ट करायला सांगताना ती गोडीगुलाबीने गु करायला लावू; नेहमी गोड आवाजात बोलू असे वागायला शिका. 

९. त्याप्रमाणेच आमच्या पतीचे आप्तेष्ट, आईबाप, संन्यासी अथवा पूजनीय माणसे या सर्वांना आम्ही मान देऊ; त्यांचा आदर करू. ते आमच्या पतीच्या घरी येताच त्यांना आसन आणि पाणी देऊन त्यांचा सत्कार करू’ असे वागायला शिका. 

१०. ‘त्याप्रमाणेच पतीगृहीची सर्व कृत्ये मग ती लोकर विणण्याची असोत किंवा कापूस विणण्याची असोत, मोठ्या कौशल्याने व चपळाईने करू. कोणत्याही कामाचे स्वरूप नीट समजावून घेऊ. म्हणजे ते आम्हांला सुलभतेने करता येईल किंवा करवून घेता येईल’ असे वागायला शिका. 

११. त्याप्रमाणेच दूत, कामगार हे आपली कामे कशी बजावतात, प्रत्येक जण काय करतो आणि काय करीत नाही, ह्या गोष्टी आम्ही ओळखायला शिकू. कोण किती सशक्‍त आहे, दुबळा आहे, हे आम्ही जाणून घेऊ आणि ज्याला जसे लागते तसे अन्न देऊ’ असे वागायला शिका. 

१२. त्याप्रमाणेच आपले पती जे धनधान्य, रूपे, सोने, कमाई करून घरी आणतील ते आम्ही सुरक्षित ठेऊ.  त्यांजवर पहारा आणि देखरेख ठेवू आणि जेणे करून चोर, दरोडेखोर, लुंगे, लफंगे यांच्या नजरेपासून जे सुरक्षित राहील असे सर्व काही करू’ असे वागायला शिका. 

१३. हा उपदेश ऐकताच उग्गहाच्या मुली अत्यंत प्रसन्न झाल्या आणि त्यांनी कृतज्ञतेने भगवंताना धन्यवाद दिले. 

Previous page                                    Next book


 The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!