What is Not Dhamma

What is Not Dhamma

Part IV — What is Not Dhamma

What is Not Dhamma PDF in English

तृतीय खंड: भगवान बुद्धाने काय शिकविले?

भाग चवथा: अधम्म म्हणजे काय ?

What is Not Dhamma

Previous page                                             Next Page

 

१. दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म !

१. जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली, त्याचे कारण काय आहे हे जाणण्याची मनुष्य मात्राला आवश्यकता वाटते.

२. कधी कधी कारण व कार्य ही एकमेकांच्या इतकी जवळ जवळ असतात की, कार्याच्या कारणाचा पत्ता लागणे अवघड नसते. ३. परंतु कधी कधी कार्य (परिणाम ) हे कारणापासून इतके दूर असते की, तेथे कार्यकारणाचा शोध लागत नाही. ढोबळ दृष्टीने पाहता असे वाटते की, या परिणामाला कारणच नव्हते.

४. तेव्हा असा प्रश्‍न उत्पन्न होतो की, ही घटना घडली कशी?

५. अशा वेळी सर्वसामान्य उत्तर असे असते की, ही घटना काही तरी दैवी कारणाने म्हणजे चमत्काराने घडली असावी.

६. भगवान बुद्धाच्या पूर्वजांनी ह्या प्रश्‍नाचे विविध प्रकारे उत्तर दिले आहे.

७. पकूद कच्चचान हा प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानीत नसे. तो म्हणत असे, घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडत असतात.

८. मक्‍खली घोशल मानीत असे की, घटनेला कारण असले पाहिजे, परंतु तो असा प्रचार करीत असे की, ते कारण मानवी शक्‍तीबाहेर कुठे तरी ‘प्रकृती’, ‘अनिवार्य आवश्यकता’, ‘वस्तुजातातील अंतर्गत नियम’, ‘पूर्वनियोजित दैव’ अशांसारख्या गोष्टींत शोधले पाहिजे. 

९. भगवान बुद्धाने अशा सिद्धान्ताचे खंडण केले. त्याचे म्हणणे असे की, प्रत्येक घटनेला कारण असते. एवढेच नव्हे तर प्रत्येक कारण हेही मानवी अथवा प्राकृतिक कारणांचा परिणाम आहे. 

१०, काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता इत्यादींना कोणत्याही घटनेचे कारण मानणे ह्याला त्याचा विरोधं होता. 

११. जर काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता हीच फक्त घटनेची एकमात्र कारणे असतील तर मग आमची स्थिती काय? 

१२. मनुष्य हा काळ, प्रकृती, आकस्मिकता, ईश्वर, दैव, अनिवार्य आवश्यकता यांच्या हातांतील एक बाहुले आहे काय? 

१३. जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? तो जर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय? 

१४. जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी प्राकृतिक कारण असले पाहिजे. कोणत्याही घटनेचा दैवी चमत्कृतीत उगम असणे शक्‍य नाही. 

१५. कदाचित हे संभवनीय आहे की, घटनेचे वास्तविक कारण सापडत नसेल, परंतु जर तो बुद्धिमान असेल तर कधी तरी एके दिवशी ते त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही. 

१६. दैवी चमत्कृतीवादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धाचे तीन हेतू होते. 

१७. त्याचा पहिला हेतू माणसाला बुद्धिवादी बनविणे. 

१८. त्याचा दुसरा हेतू माणसाला स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे. 

१९, त्याचा तिसरा हेतु ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्यांचे उगमस्थानच नष्ट करणे. 

२०. यालाच बुद्ध धम्माचा कम्मसिद्धान्त अथवा हेतूवाद म्हणतात. 

२१. हा हेतूवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धान्त आहे. तो बुद्धिवाद शिकवितो आणि बुद्ध धम्म बुद्धिवादापेक्षा वेगळा नाही.

२२. याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते. 

 

२. ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे 

१. हे जग कोणी निर्माण केले? हा एक सर्वसामान्य प्रश्‍न आहे. हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे.

२. ब्राम्हणीय योजनेत या ईश्वराला ‘प्रजापती’, ‘ईश्वर’, ‘ब्रम्ह’, ‘महाब्रम्ह’ इत्यादी नावे आहेत. 

३. हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला या प्रश्‍नाला तेथे उत्तर नाही.

४. जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्याचे वर्णन सर्वशक्तीमान, सर्वव्यापक आणि सर्वज्ञ असे करतात. 

५. ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगतात. असे म्हणतात की ईश्वर, शिव ( चांगला, कल्याणकारी ) न्यायी आणि दयाळू आहे. 

६. भगवान बुद्धाने ईश्वराचा सृष्टिकर्ता म्हणून स्वीकार केला आहे काय असा प्रश्‍न आहे. 

७. उत्तर आहे, “नाही.” त्याने स्वीकार केलेला नाही.” 

८. अशी अनेक कारणे आहेत की, ज्यांसाठी त्याने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धान्त मान्य केला नाही. 

९. कोणीही ईश्वराला पाहिलेले नाही. लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात. 

१०. ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे. 

११. कोणीही असे सिद्ध करू शकत नाही की, ईश्वराने हे सर्व जग रचले. जग हे रचलेले नसून विकास पावलेले आहे.

१२. ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे? काहीही लाभ नाही. 

१३. भगवान बुद्ध म्हणतो की, ईश्वराधीन धर्म हे कल्पनाश्रीत धर्म आहेत. 

१४. म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म हा काही उपयोगाचा नाही.

१५. त्याचा परिणाम म्हणून केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात.

१६. भगवान बुद्धाने हा प्रश्‍न येथेच सोडलेला नाही. त्याने या प्रश्‍नाच्या विविध पैलूंचा विचार केला आहे. 

१७. ज्या कारणांस्तव त्याने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धान्त अमान्य केला आहे ती अनेक आहेत.

१८. त्याने असा विचार मांडला आहे की, ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धान्त हा सत्यावर आधारलेला नाही. 

१९. हा विचार त्याने वासेट्ट आणि भारद्वाज या दोन ब्राम्हणांबरोबर केलेल्या संभाषणात स्पष्ट केलेला आहे. 

२०. वासेट्ट आणि भारद्वाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता यासंबंधी विवाद उत्पन्न झाला.

२१. या समयी तथागत आपल्या महान्‌ भिक्खु संघासमवेत कोशल जनपदामध्ये विहार करीत होते. तेथे मनसाकद्‌ नावाच्या ब्राम्हणगावी अचिरवती नदीच्या तटावरील एका आम्रवनात ते थांबले होते. 

२२. वासेट्ट आणि भारद्वाज दोघेही मनसाकद्‌ गावात राहात असत. जेव्हा त्यांनी ऐकले की, तथागत त्यांच्या गावी उतरलेले आहेत. तेव्हा ते त्यांच्याकडे गेले. आणि दोघांनीही तथागतांसमोर आपला दृष्टिकोन निवेदन केला.

२३. भारद्वाज म्हणाला, “तरुक्ख याने दाखविलेला मार्ग सरल मार्ग आहे. त्यात सरळ मुक्‍तीचा मार्ग आहे; आणि जो कोणी त्या मार्गाप्रमाणे वागतो त्याला तो मार्ग ब्रम्हसायुज्य मिळवून देतो.”

२४. वासेट्ट बोलला, “हे गौतम! पुष्कळसे ब्राम्हण पुष्कळसे मार्ग दाखवितात. अध्वर्य ब्राम्हण, तैत्तिरिय ब्राम्हण, कंछोक ब्राम्हण, त्याचप्रमाणे भीहुवर्गीय ब्राम्हण हे प्रत्येक जण आपण दाखविलेल्या मार्गाने ब्रम्हसायुज्य मिळते असे म्हणतात. 

२५. ज्या प्रकारे एखाद्या गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात तरीही ते सर्व रस्ते त्या गावाला आणून पोहचवितात. त्याप्रमाणेच या ब्राम्हणांनी दाखविलेले मार्ग शेवटी ब्रम्हसायूज्याकडे नेतात. 

२६. भगवान बुद्धाने त्याला विचारले, “वासूटु, तुझे म्हणणे असे आहे काय? की, सर्वच मार्ग बरोबर आहेत?” वासेट्ट बोलला, “श्रमण गौतम! होय, हेच माझे म्हणणे आहे.” 

२७. “पण वासेट्टू, या तीनही वेद जाणणार्या ब्राम्हणांपैकी एकाने ब्रम्हाचे साक्षात्‌ समोरासमोर दर्शन घेतले आहे काय?” 

२८. “नाही. गौतमा नाही.”

२९. “ह्या तीनही वेद जाणणार्या ब्राम्हनांच्या गुरुने तरी ब्रम्हाला समोरा समोर पाहिले आहे काय?”

३०. “ नाही, गौतमा, नाही.” 

३१. “कोणीही ब्रम्ह पाहिलेले नाही, कोणालाही ब्रम्हसाक्षात्कार झाला नाही.” वासेटु बोलला, “होय, असेच आहे.” “ तर मग तू असे कसे मानतोस की, हे जे ब्राम्हण सांगतात ते सत्यावर आधारलेले आहे?” 

३२. “वासेट्र, ज्या प्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्यांची माळ असते, त्यातील सर्वांच्या पुढे असलेल्यांना दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही, शेवटी असलेल्यांना दिसत नाही. त्याप्रमाणेच मला वाटते, ह्या ब्राम्हणांचे शब्द आंधळ्यांच्या शब्दासारखे आहेत. त्यांच्यापैकी पुढे असणार्याला दिसत नाही. मध्यभागी असणाराला दिसत नाही. अगदी शेवटी असणार्याला दिसत नाही. ह्या ब्राम्हणांचे शब्द उपहासास्पद आहेत; ते केवळ पोकळ, व्यर्थ शब्द असून त्यांत काही अर्थ नाही. 

३३. “ वासेट्टु, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखोद्या स्त्रीवर प्रेम करणार्या माणसासारखी नाही काय?” “ हो, तशीच आहे.” वासेट्ठाने उत्तर दिले.

३४. “ वासेट्ट मग मला सांग, जर लोकांनी तुला विचारले, मित्रा, ज्या अति सुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस, आणि जिची तू वांछा धरीत आहेस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रीय जातीची आहे, की ब्राम्हण आहे, की वैश्य जातीची आहे, की शूद्र जातीची आहे?” 

३५. सृष्टीचा तथाकथित निर्माता महाब्रम्ह याच्या उत्पत्तीसंबंधी चर्चा करीत असताना तथागत भारद्वाज आणि वासेट्ट॒ यांना उद्देशून म्हणाला. “ मित्रांनो, तो प्रथम जन्मास येणारा प्राणी म्हणतो, मी ब्रम्ह आहे, महाब्रम्ह आहे,विजेता आहे, अपराभूत आहे, सर्वद्रष्टा आहे, सर्वाधिकारी आहे, मालक आहे, निर्माता आहे, रचणारा आहे, मुष्य आहे, व्यवस्थापक आहे, मीच माझा स्वामी आहे; आणि जे आहेत आणि पुढे होणारे आहेत त्यांचा मी जनक आहे. माझ्याच पासून हे सर्व प्राणी जन्मास आले आहेत.” 

३६. याचा अर्थ असा की; जे आज आहेत आणि भविष्यकाळात होणारे आहेत त्यांचा ब्रम्ह हा पिता आहे.

३७. तुझे म्हणणे असे आहे की, “ पूज्य, विजेता, अपराभूत, जे आहेत आणि होणारे आहेत त्यांचा जनक, ज्यांच्यामुळे सर्वांची उत्पत्ती झाली असा जो ब्रम्ह, तो स्थायी आहे, सतत राहणारा आहे, नित्य आहे,अपरिवर्तनशील आहे. तो अनंत काळ असाच राहणारा आहे. तर मग त्या ब्रम्हाने उत्पन्न केलेले आम्ही इहलोकी येउन अस्थायी, अनित्य, परिवर्तनशील, अल्पजीवी, मरणधर्मी कसे झालो?” 

३८. ह्या प्रश्‍नाला वासेट्टाजवळ उत्तर नव्हते. 

३१. तथागतांचा तिसरा विचार हा ईश्वराच्या सर्व शक्‍तीमत्तेसंबंधी होता. “ जर ईश्वर सर्वशक्तीमान आहे आणि सर्व सृष्टीचे तो बलवत्तर कारण आहे, तर त्यामुळे माणसाच्या मनात काहीही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा असणे शक्‍य नाही. त्याला काही करण्याचीही ण्याचाहा आवश्यकता नाही. काही करण्याची त्याला इच्छा किंवा प्रयत्न करण्याचा संकल्पही स्फुरणार नाही. हा. यामुळे मुळ मनुष्यप्राणी म्हणजे जेया जगातील गाताल कोणतेही कार्य ये ज्याला करावे लागत नाही, असा एक निष्क्रिय प्राणी ठरेल. असे जर आहे, तर ब्रम्हाने माणसाला निर्माणच का केले? 

४०. यालाही वासेट्टाजवळ उत्तर नव्हते. 

४१. तथागताचा चवथा विचार असा होता की, जर ईश्वर शिवस्वरूप ( कल्याणकारी ) आहे, तर माणसे खुनी, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारी, निंदक; बकवा करणारी, लोभी, द्वेषी, विकृत अशी का होतात? याचे कारण ईश्वरच असला पाहिजे. शिवस्वरूप ईश्वराच्या अस्तित्वात हे कसे शक्‍य आहे? 

४२. तथागताचा पाचवा विचार ईश्वराची सर्वज्ञता, न्यायीपणा, दयाळूपणा या संबंधात होता. 

४३. जर कोणी महान सृष्टिकर्ता असेल आणि तो न्यायी व दयाळू असेल तर मग जगामध्ये इतका अन्याय का फैलावतो? असा प्रश्‍न तथागतांनी केला. ते पुढे म्हणाले, “ ज्याला दृष्टी आहे त्याला सभोवार किळसवाणे दृश्य दृष्टीस पडेल. . बम्ह आपली रचना का सुधारीत नाही? जिला मर्यादा नाही अशी त्याची शक्‍ती व्यापक असेल, तर त्याचे हात कल्याण करण्यासाठी पुढे का सरसावत नाहीत? त्याने निर्माण केलेली सृष्टी दु:खोपभोगात का बुडालेली आहे. तो सर्वांना का सुख देत नाही? अफरातफरा, चोरी, अज्ञान का फैलावत राहते? असत्य सत्यावर का मात करते? सत्य आणि न्याय पराभूत का होतात? माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा हा तुमचा ब्रम्ह परम अन्यायी ठरतो.” 

४४. ‘ सर्व प्राणिमात्रांना व्यापणारा तुमचा जो ईश्वर आहे, जो त्या प्राणिमात्रांना सुखी वा दुःखी बनवितो, त्यांच्याकडून पाप अथवा पुण्य करवितो, तो ईश्वर स्वत: पापाने कलंकित आहे. एक तर मनुष्य त्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा किंवा तो ईश्वर तरी न्यायी आणि चांगला नसावा, अथवा तो आंधळा असावा. 

४५. तथागताचा ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धान्तासंबंधीचा शेवटचा विचार असा होता की, ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धान्तासंबंधी चर्चा करण्यापासून काहीही लाभ नाही. 

४६. तथागतांच्या मते धर्माचे केंद्र हे मनुष्याचा देवाशी असणारा संबंध यामध्ये नाही. ते माणसामाणसांच्या संबंधात आहे. धर्माचा हेतू सर्व माणसे सुखी होतील अशा रीतीने माणसाशी कसे वागावे हा आहे. 

४७. तथागत देवाच्या अस्तित्वावरील विश्वासाविरुद्ध असण्याचे आणखीही एक कारण होते. 

४८. तथागत धार्मिक क्रियाकलापाच्या विरोधी होते. याविरुद्ध असण्याचे कारण म्हणजे हे क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुतीचे आगरच असते; आणि भ्रामक समजुती ह्या अष्टांग मार्गातील जे महत्वाचे तत्व सम्मादिठ्ठी तिचे शत्रू आहेत. 

४९. तथागताच्या दृष्टीने ईश्वरावरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट आहे. कारण ईश्वरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थना ह्यांचा उत्पादक आहे. पूजा आणि प्रार्थना यांच्या जरूरीतून पुरोहितपद उत्पन्न होते आणि पुरोहित हा असा दुष्टबुद्धी आहे की, तो सर्व प्रकारच्या खुळ्या समजुती निर्माण करतो व त्यामुळे सम्मादिठ्ठीचा विकास अशक्य होतो. 

५०. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासासंबंधीचे हे विचार व्यवहारी होते पण ते बव्हंशी सैद्धान्तिक होते. तथागत जाणत होते की, ते विचार ईश्वराच्या अस्तित्वा वरील विश्वासाला एकदम मारक असे नव्हते. 

५१. तथापि अशी मात्र कल्पना करू नये की, मारक असा विचार त्यांच्याजवळ नव्हता. त्यांनी एक असा विचार मांडला आहे की, तो नि:संदेह देवावरील विश्वासाचे खंडन करणारा आहे, हा विचार प्रतित्यसमुत्पाद या सिद्धांतात अंतर्भूत आहे. 

५२. ह्या सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्‍न महत्वाचा नाही. त्याचप्रमाणे ईश्वराने ही सुष्टी निर्माण केली किंवा नाही, हाही प्रश्‍न मुख्य नाही. खरा प्रश्‍न असा आहे की, निर्मात्यांनी ही सृष्टी कशी निर्माण केली? ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाचे समर्थन हे जग कसे निर्माण झाले ह्या प्रश्‍नाच्या उत्तराचा निष्कर्ष आहे. 

५३. महत्वाचा प्रश्‍न हा आहे की, ईश्वराने सृष्टी भाव (काही पदार्थ ) यातून उत्पन्न केली की अभाव ( शून्य ) यातून निर्माण केली?

५४. “काही तरी” हे “काहीच नाही” मधून उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे हे शक्‍य नाही. 

५५. जर तथाकथित ईश्वराने ‘काही तरी’ हे ‘काही तरी’ मधून निर्मिले असे म्हटले तर, ज्या ‘काही तरी’तून जे नवे ‘काही तरी” निर्मिले ते निर्मितीपूर्वच अस्तित्वात असले पाहिजे. म्हणून ईश्वराला त्याच्यापूर्वीच अस्तित्वात असलेल्या ‘काही तरी’ चा निर्माता म्हणता येणार नाही. 

५६. जर ईश्वराने काही वस्तु निर्माण करण्यापूर्वी ‘कोणी तरी” ‘काही तरी” निर्मिलेले असेल तर ईश्वराला निर्माता अथवा आदिकारण असे म्हणता येणार नाही. 

५७. ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीच्या विश्वासाविरुद्ध तथागताचा शेवटचा असा निर्विवाद विचार होता. 

५८. ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे, हा विश्वास तर्कदुष्ट असल्यामुळे तो अधर्म आहे. तो विश्वास म्हणजे केवळ असत्यावरील विश्वास ठरतो. 

 

३. ब्रम्ह-सायुज्यावर आधारित धर्म अधर्म आहे

१. जेव्हा भगवान बुद्ध आपल्या धर्माचा प्रचार करीत होते तेव्हा एक सिद्धान्त प्रचलित होता त्यास ‘वेदांत’ असे म्हणत. 

२. ह्या सिद्धान्ताची तत्वे थोडकी व सरळ होती. 

३. ह्या सर्व विश्वामागे एक सर्वव्यापक जीवन-तत्व विद्यमान असून त्याला ब्रम्ह अथवा ब्रम्हन्‌ म्हणतात.

४. हे ब्रम्ह एक वास्तविकता आहे.

५. आत्मन्‌ आणि ब्रम्हन्‌ एकच होत.

६. आत्मा आणि ब्रम्हन्‌ एकरूप करण्याने माणसाला मोक्ष मिळतो; हे या सिद्धांताचे दुसरे तत्व आहे. 

७. आत्मा आणि ब्रम्हन्‌ ही एकच आहेत. या ज्ञानाने आत्मा ब्रम्हाशी एकरूपता साधतो.

८. आत्म्याला आपण ब्रम्ह आहोत हे ज्ञान होण्यासाठी संसाराचा त्याग करणे आवश्यक आहे.

९. या सिद्धांताला वेद म्हणतात.

१०. भगवान बुद्धाच्या मनात या सिद्धांताबद्दल आदर नव्हता. त्याच्या मते या सिद्धांताचा आधार मिथ्या होता. त्याचा काही उपयोग नव्हता आणि त्यामुळे तो स्वीकारण्याजोगा नव्हता. 

११. हे आपले मत भगवान बुद्धाने भारद्वाज काणि वासेट्टु या दोन ब्राम्हणांसमोर झालेल्या संवादात स्पष्ट केले आहे. 

१२. भगवान बुद्धाचे म्हणणे असे होते की, कोणतीही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्याला तिला काही ना काही प्रमाण असले पाहिजे. 

१३. प्रमाणाचे ‘प्रत्यक्ष’ आणि ‘अनुमान’ असे दोन प्रकार आहेत. 

१४. भगवान बुद्धाचा प्रश्‍न असा होता, “कोणी ब्रम्ह प्रत्यक्ष अनुभवले आहे काय? तू ब्रम्ह पाहिले आहेस काय? तू ब्रम्हाबरोबर गोष्टी केल्या आहेस काय? तू ब्रम्हाचा वास घेतला आहेस काय?”

१५. वासेट्टाने उत्तर दिले, “नाही.”

१६. ब्रम्हाच्या अस्तित्याचे दुसरे प्रमाण अनुमानाचे. ते त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यास अपुरे आहे. 

१७. भगवान बुद्धाने प्रश्‍न केला, “कोणत्या एका गोष्टीच्या होण्यावरून आम्ही ब्रम्हाचे होणे ( अस्तित्व ) अनुमानायचे काय?” याचेही उत्तर मिळाले नाही. 

१८. काही लोक म्हणतात की, वस्तू अदृश्य असूनही तिला अस्तित्त्व असते. म्हणून ते म्हणतात की, ब्रम्ह अदृश्य असले तरी त्याला अस्तित्व आहे. 

१९, हे एक ढोबळ विधान असून ते असंभव स्थापन करण्यासाठी केलेले आहे. 

२०. तरीसुद्धा तर्कासाठी हे मान्य करू या की, वस्तु अदृश्य असली तरी तिला अस्तित्व असू शकते.

२१. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीज हे आहे. वीज अदृश्य असूनही तिला अस्तित्व आहे.

२२. परंतु हा तर्कही पर्याप्त नाही. 

२३. अदृश्थ वस्तुनेही आपले अस्तित्व दुसर्या कोणत्या तरी रूपाने प्रकट करणे जरूर आहे. तेव्हाच तिची वास्तविकता मान्य होऊ शकते. 

२४. परंतु जर अदृश्य वस्तु दुसर्या कोणत्याही रूपाने आपले अस्तित्व प्रकट करू शकत नसेल तर तिची वास्तविकता मान्य होऊ शकणार नाही. 

२५. वीज अदृश्य असली तरी तिजपासून उत्पन्न होणारे परिणाम पाहूनच आपण तिचे अस्तित्व मानतो. 

२६. वोजेपासून प्रकाश उत्पन्न होती. प्रकाश उत्पन्न होण्यावरूनच वीज अदृश्य ण्य असूनही आपण वीजेची वास्तविकता मान्य करतो. 

२७. परंतु हे अदृश्य ब्रम्ह दृश्य अशी कोणती वस्तु उत्पन्न करते? 

२८. उत्तर आहे की, कोणतीच नाही. 

२९. दुसरे एक उदाहरण देता येते. कायद्यामध्येही अशी पद्धत आहे की, काही एक निष्कर्ष स्थापन करण्यासाठी 

एक विधान मान्य केले जाते. ते सिद्ध करता येत नाही. ते केवळ कायद्यातील ‘कल्पना”  असते.

३०. आणि आपण अशा कायद्यातील कल्पनेला मान्यता देतो.

३१. पण आपण अशा कायद्यातील कल्पनेला का मान्यता देतो?

३२. कायद्यातील कल्पनेला मान्यता देण्याचे कारण या मान्यतेपासून न्यायाशी सुसंगत असे उपयुक्‍त परिणाम संभवतात हे आहे. 

३३. ब्रम्ह ही सुद्धा एक कल्पना आहे; परंतु त्यापासून कोणते उपयुक्‍त परिणाम संभवतात? 

३४. वासेट्ट आणि भारद्वाज यांच्याजवळ काही उत्तर नव्हते, ते स्तब्ध होते.

३५. आपली विचारप्रणाली त्यांना पूर्ण ग्रहण करता यावी म्हणून वासेट्ठाकडे वळून तथागताने विचारले, “तुम्ही ब्रम्ह पाहिले आहे काय?” 

३६. “तीनही वेद जाणणार्या क ब्राम्हणांमध्ये एक तरी ब्राम्हण असा आहे काय, की ज्याने ब्रम्ह प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे?” 

३७. “ ‘नाही गौतमा,’ निश्चित पाहिलेले नाही.” 

३८. “त्या तीनही वेद जाणणार्या ब्राम्हणांच्या एका तरी गुरूने ब्रम्ह प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे काय?” 

३९. “नाही. गौतमा, निश्चित पाहिलेले नाही.” 

४०. “वासेट्ट, त्या ब्राम्हणाच्या सात पिढ्यांत एक तरी ब्राम्हण असा झाला काय, की ज्याने ब्रम्ह समोरासमोर पाहिले?” 

४१. “नाही, गौतमा, निश्चित पाहिलेले नाही.” 

४२. “ठीक वासेट्ट॒ ! ब्राम्हणाच्या पुरातन क्ररषींनी तरी असे म्हटले होते काय, की आम्ही ब्रम्ह जाणतो, आम्ही ते कुठे आहे, इथे आहे की तिथे आहे ते पाहिलेले आहे.” 

४३. “नाही, गौतमा, नाही!” 

४४. तथागत त्या दोन ब्राम्हण तरुणांना प्रश्‍न विचारीत राहिला. 

४५. “मग वासेट्टा, तुला असे वाटत नाही काय, की यावरून त्या ब्राम्हणाच्या ब्रम्ह सायुज्याच्या गोष्टी मूर्खपणाच्या थापा होत्या?” 

४६. “वासेट्टा, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्यांची माळ असते, त्यातील सर्वांच्यापुढे असणार्यांना दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही, शेवटी असलेल्यांना दिसत नाही. त्याप्रमाणेच, मला वाटते, ह्या ब्राम्हणांचे शब्द आंधळ्यांच्या शब्दासारखे आहेत. त्यांच्यापैकी पुढे असणार्याला दिसत नाही, मध्यभागी असणार्याला दिसत नाही, अगदी शेवटी | असणार्याला दिसत नाही. त्या ब्राम्हणाचे शब्द उपहासास्पद आहेत. ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यांत काही अर्थ नाही.” 

४७. “वासेट्ट, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणार्या माणसासारखी नाही काय?” 

४८. आणि लोक त्याला विचारणार, “मित्रा, ज्या अति सुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि तिची वांछा करीत आहेस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे, की ब्राम्हण जातीची आहे, की वैश्य जातीची आहे, की शूद्र जातीची आहे?” 

४९. “आणि जेव्हा लोक त्याला असे विचारतील तेव्हा तो ‘नाही’ असेच उत्तर देणार.” 

५०. “ जेव्हा लोक त्याला पुन्हा विचारतील, बरे, मित्रा, ही सर्व प्रदेशातील स्त्री अति सुंदर स्त्री आहे. जिच्यावर तू प्रेम करतोस, जिची वांछा धरतोस, पण तिचे नाव तरी काय आहे? तिच्या कुळाचे नाव काय आहे? ती उंच आहे, को ठेंगणी आहे, की, मध्यम उंचीची आहे? ती कृष्ण वर्णाची आहे, की गव्हाळ वर्णाची आहे, की सुवर्ण वर्णाची आहे? ती कोणत्या खेड्यात, गावात अथवा शहरात राहते? परंतु हे सर्व प्रश्‍न विचारले असता प्रत्येक प्रश्‍नाला तो नाही असेच उत्तर देणार.” 

५१. “वासेट्टा, हे सर्व तुला आता कसे वाटते? तुला असे वाटत नाही काय, की त्या माणसाचे सर्व कथन मूर्खतापूर्ण आहे?” 

५२. ते दोन्हीही ब्राम्हण तरुण बोलले, “ होय, खरोखर तसेच आहे.” 

५३. यास्तव ब्रम्ह हेच वास्तव नसून त्यावर आधारलेला धर्म हा व्यर्थ आहे.

 

४. आत्म्यावरील विश्वास हा अ-धर्म आहे

१. भगवान बुद्धाने म्हटले आहे की, आत्म्यावर आधारलेला धर्म हा कल्पनाश्रित धर्म आहे.

२. . कोणीही आत्मा पाहिलेला नाही किंवा आत्म्याशी संभाषण केलेले नाही. . 

३. आत्मा अज्ञात आणि अदृश्य आहे. ,

४.जी गोष्ट वास्तव आहे ती गोष्ट आत्मा नसून मन आहे. मन हे आत्म्या पासून भिन्न आहे.

५. तथागत म्हणाले, “ आत्म्यावर विश्वास ठेवणे निरुपयोगी आहे.”

६ म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म आपल्याला योग्य नाही.

७.  असा धर्म केवळ भ्रामक समजुतींचा जनक ठरतो.

८. भगवान बुद्धाने हा प्रश्‍न येथेच सोडलेला नाही. त्याने त्या प्रश्‍नांची सांगोपांग चर्चा केली आहे.

९. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देखील विश्वासाइतकाच सर्व साधारण आहे.

१०. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हे ब्राम्हणी धर्माचे एक अंग होते.

११. ब्राम्हणी धर्मात जीवाला ‘आत्मा’ किंवा ‘आत्मन्‌’ संबोधितात.

१२-१३. ब्राम्हणी धर्मात आत्मा हे त्या तत्वविशेषाला नाव देण्यात आले आहे, की जे शरीरापासून वेगळे; परंतु शरीराच्या आत आणि जन्मापासून शरीरात वास्तव्य करते. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वासात तदनुषगिक दुसरेही विश्वास अंतर्भूत होतात. 

१४. आत्मा शरीराबरोबर मरण पावत नाही. तो दुसर्या जन्माच्या वेळी दुसर्या शरीरात जन्म घेतो. 

१५. शरीर हे आत्म्याचा एक पेहरावच आहे.

१६. भगवान बुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवीत असे काय? नाही, तो विश्वास ठेवीत नसे. आत्म्यासंबंधी त्याच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात.

१७. अशरीरी आत्मा मानला तर त्याच्यासंबंधाने अनेक प्रश्‍न उद्भवतात. आत्मा काय आहे? तो कोठून आला? शरीराच्या मृत्यूनंतर त्याचे काय होते? तो कोठे जातो? शरीराच्या मृत्यूनंतर तो परलोकात कोणत्या स्वरूपात राहतो? किती काळ तो तेथे राहतो? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व मानणार्या लोकांकडून मागितली.

१८. आपल्या फेरतपासणीत आत्म्याची कल्पना किती अस्पष्ट आहे हे त्याने आपल्या नेहमीच्या पद्धतीने दाखविले.

१९, जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवीत त्यांना आत्म्याचा आकार व आकृती कशी आहे हे विचारले. 

२०. आनंदाला त्याने सांगितले, ‘आत्म्यासंबंधी नानाविध मते आहेत. काही लोक म्हणतात, माझ्या आत्म्याला आकार आहे, आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे. दुसरे काही म्हणतात की, आत्म्याला रूप आहे आणि तो अनंत आहे आणि सूक्ष्मही आहे. आणखी काही असे म्हणतात की, तो निराकार आणि अनंत आहे.

२१. “आनंद, आत्म्यासंबंधी नानाप्रकारची मते आहेत.”

२२. “जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांची आत्म्यासंबंधी कल्पना काय आहे?” हाही बुद्धाचा दुसरा प्रश्‍न होता. कोणी म्हणतात आत्मा हा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया आहे. दुसरे कोणी म्हणतात की, नाही माझा आत्मा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया नाही, तो अननुभवशील आहे. आणखी दुसरे म्हणतात, नाही; माझा आत्मा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया असून अनुभवशीलता हा त्याचा धर्म आहे. आत्म्यासंबंधी अशा  विविध कल्पना आहेत.” 

२३. यानंतर बुद्धाने जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना शरीराच्या मरणोत्तर आत्म्याची काय स्थिती होते असा प्रश्‍न विचारला. 

२४. त्याने असाही प्रश्‍न विचारला की, शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा पाहता येतो काय? 

२५. त्याला अगणित उत्तरे अस्पष्ट मिळाली. 

२६. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा आपला आकार कायम राखू शकतो काय? यासंबंधी त्याला आठ भिन्न काल्पनिक उत्तरे मिळाली.

२७. आत्मा शरीराबरोबर मरण पावतो काय? यासंबंधीही त्याला अगणित कल्पना आढळल्या. 

२९. तथागताने शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो की दुःखी असतो, हाही प्रश्‍न विचारला, शरीराच्या मृत्यू नंतर आत्मा सुखी असतो काय? यासंबंधी श्रमण ब्राम्हणांची मते भिन्न होती. काही म्हणाले की? तो  अतिशय दुःखी असतो. काही म्हणाले, तो सुखी असतो. इतर काही म्हणाले की, तो सुखी व दु:खी असतो; व इतर म्हणाले, तो सुखी अथवा दु:खीही नसतो. 

२१. आत्म्याच्या अस्तित्वाच्या विश्वासावरील ह्या सर्व सिद्धान्ताला त्यांनी दिलेले उत्तर चुन्दाला त्यांनी दिलेल्या उत्तरासारखेच होते. 

३०. चुन्दाला तो म्हणाला “हे चुन्द, जे श्रमण ब्राम्हण या मतांपैकी कोणत्याही एका मतावर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे जाऊन मी त्यांना विचारतो, ‘मित्रांनो, हे तुमचे म्हणणे ठीक आहे काय?’ आणि ते उत्तर देतात, ‘ होय. माझेच मत खरे आहे. दुसरी मते मूर्खपणाची आहेत’ मी त्यांचे मत स्वीकारीत नाही. का? कारण, लोकांची या विषयासंबंधी भिन्न मते आहेत. त्यांची मते मी माझ्या मतापेक्षा श्रेष्ठ मानीत नाही. एवढेच काय, ती माझ्या मताच्या तोडीचीही मी मानीत नाही.” 

३१. आता एक महत्वपूर्ण प्रश्‍न पुढे येतो, तो असा की, आत्म्यावरील विश्वासाच्या सिद्धान्ताविरुद्ध भगवान बुद्धाची विचारसरणी काय होती? 

३२. आत्म्याच्याविरुद्ध भगवान बुद्धाने जी सर्वसामान्य विचारसरणी मांडली आहे, तीच त्याने ईश्वराचे अस्तित्त्व नाकारताना मांडलेली आहे. 

३३. त्याने असा विचार मांडला आहे की, आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ही देवाच्या अस्तित्वाच्या चर्चेइतकीच निरुपयोगी आहे. 

३४. देवाच्या अस्तित्वावरील विश्वास हा सम्मादिठ्ठीला जितका बाधक आहे, तितकाच आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास बाधक आहे. 

३५. त्याने असे विवेचन केले आहे की, देवावरील विश्वास हा ज्या प्रकारे भ्रामक समजुती निर्माण करतो, त्याच प्रकारे आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास भ्रामक समजुतींना कारणीभूत णाभूत होतो. त्याच्या मते तर आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देवाच्या अस्तित्वावरील विश्वासापेक्षा भयंकर आहे. कारण त्यामुळे पुरोहितवर्ग निर्माण होतो. भ्रामक समजुतींचा मार्ग मोकळा होतो. एवढेच नव्हे तर तो पुरोहित वर्गाला माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सत्ता गाजविण्याचा अधिकारही बहाल करतो. 

३६. ह्या सर्वसाधारण विचारसरणीमुळेच भगवान बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी काही दृढपूर्वक मत व्यक्‍त केलेले नाही असे म्हणतात. दूसरे काही म्हणतात की, त्याने आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताचे खंडन केले  नाही. आणखी दुसरे र काही म्हणतात, त्याने ह्या प्रश्‍नाच्या उत्तराला बगल दिलेली लला आहे. 

३७. ही सर्व मते चूक आहेत. कारण त्याने महालीला स्पष्टपणे आणि निश्चित शब्दात सांगितले आहे की, आत्मा काही वस्तू नाही. म्हणुनच त्याच्या सिद्धान्ताला अनात्मवाद असे म्हणतात. 

३८. आत्म्याच्याविरुद्ध या सर्वसामान्य विचारसरणीपेक्षाही भगवान बुद्धाने त्याविरुद्ध अगदी खास अशी खंडनकारक विचारसरणी मांडलेली आहे. 

३९. आत्म्याचे वेगळे असे अस्तित्व स्थापन करणार्या सिद्धान्ताविरुद्ध भगवान बुद्धाने आपला नामरूप सिद्धान्त मांडला. 

४०. हा नामरूप सिद्धान्त विभज्ज-वादाच्याद्वारे केलेल्या परीक्षणाचा परिणाम आहे. मानव व्यक्तित्वाचा अथवा मानवाच्या अतिशय सूक्ष्म, काटेकोर विश्लेषणाचा हा परिणाम आहे.

४१. नामरूप ही प्राण्याची सामूहिक संज्ञा आहे.

४२. भगवान बुद्धाच्या मतानुसार प्राणी हा काही भौतिक तत्वे आणि काही मानसिक तत्वे यांच्या संमिश्रणाचा परिणाम आहे. या भौतिक आणि मानसिक तत्वांना स्कंध म्हणतात.

४३. रूपस्कंध हे प्राधान्याने पृथ्वी, जल, अग्नी आणि वायु या चार तत्वांचा परिणाम आहे. हे स्कंधरूप अथवा शरीराचे घटक होत. 

४४. रूपस्कंधाशिवाय मानसस्कंध हीही एक गोष्ट आहे, तेही प्राण्यांच्या रचनेचे घटक आहेत. 

४५. ह्या नामस्कंधाला विज्ञान (चेतना) असे म्हणतात. या नामस्कंधात तीन मानसिक घटकतत्वे आहेत. वेदना (सहा इंद्रियांचा त्यांच्या त्यांच्या विषयाशी संपर्क झाल्यामुळे होणारी अनुभूती ), संय्या (संज्ञा ), संकार (संस्कार), विज्ञान (चेतना) या तीन नामस्कंधात समाविष्ट केले जाते. आधुनिक मानसशास्त्रज्ञ कदाचित असे म्हणेल की, विज्ञान हाच इतर मानसिक क्रियांचा मूळ स्त्रोत आहे. विज्ञान कोणत्याही प्राण्याचा केंद्रबिदु आहे. 

४६. पृथ्वी, जल, तेज आणि वायु या चार तत्वांच्या संमिश्रणाने विज्ञान उत्पन्न होते. 

४७. भगवान बुद्धाने प्रतिपादित केलेल्या या विज्ञानाच्या उत्पत्तीच्या सिद्धान्ता वर एक आक्षेप घेतला जातो.

४८. हे सिद्धान्ववरोधी असे विचारतात की विज्ञान (चित्त ) याची उत्पत्ती कशी होते?

४९. हे सत्य आहे की, माणसाच्या जन्माबरोबर विज्ञानाची (चित्ताची ) उत्पत्ती होते आणि त्याच्या मरणाबरोबर विज्ञानाचा विनाश होतो. तथापि विज्ञान हे चार भौतिक तत्वांच्या मिश्रणाचा परिणाम असे कसे म्हणता येईल?

५०. भगवान बुद्धाचे उत्तर असे नव्हते की, या चार भौतिक तत्वांच्या सद्य:स्थितीमुळे किवा त्याच्या संमिश्रणाने विज्ञानाची उत्पत्ती होते. भगवान बुद्धाने म्हटले आहे की, जेथे शरीर अथवा रूप-काया आहे तेथे त्याच्यासह नाम-कायाही ( विज्ञान ) राहात असते. 

५१. आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देता येईल. जेथे जेथे विद्युत क्षेत्र एशल्ल्पयल ]गलत) असते. तेथे तेथे त्याच्यासह आकर्षण क्षेत्र असते. हे आकर्षण क्षेत्र कसे निर्माण होते किंवा कोणत्या प्रकाराने अस्तित्वात येते हे कोणालाही ज्ञात नाही. परंतु ते नेहमीच विद्युतक्षेत्राबरोबर असते. 

५२. शरीर आणि विज्ञान यांच्यामध्ये अशाच प्रकारचा संबंध आहे, असे का म्हणू नये? 

५३. आकर्षण क्षेत्र हे विद्युत क्षेत्राच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र  असे समजले जाते. विज्ञान हेही रूप-कायांच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र का म्हणू नये? 

५४. भगवान बुद्धाची आत्म्याच्या विरुद्ध तर्कसरणी येथेच समाप्त होत नाही. ह्याशिवाय त्याला आणखी काही महत्वपूर्ण सांगायचे होते. 

५५. जेव्हा विज्ञानाचा ( चित्त अथवा चेतना यांचा ) उदय होतो तेव्हा मनुष्य जीवित प्राणी बनतो. म्हणूनच विज्ञान हे माणसाच्या जीवनातील प्रधान वस्तु आहे. 

५६. विज्ञानाची प्रकृती ज्ञानमूलक, भावनामूलक आणि क्रियाशील आहे. 

५७. विज्ञान जेव्हा ज्ञान प्रदान करते तेव्हा ते ज्ञानमूलक असते. हे ज्ञान सहज ग्रहण झालेले असेल किंवा समजून ग्रहण झालेले असेल, ते आपल्या आत घडणार्या घटनांचे असेल किंवा बाह्य घटनांचे असू शकेल. 

५८. सुखकर किंवा दु:खकर लक्षणांनी युक्‍त अशा चित्ताच्या अवस्थेत जेव्हा विज्ञान असते, तेव्हा त्याला भावनामूलक विज्ञान म्हणतात. भावनामूलक विज्ञान वेदनांची अनुभूती निर्मिते. 

५९. विज्ञान आपल्या क्रियाशील अवस्थेत माणसाला विशिष्ट उद्देश्य साध्य करण्यासाठी क्रियेची प्रेरणा देते. क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे जनक आहे. 

६०. यावरून असे स्पष्ट होते की, प्राणी जेवढी क्रिया करतो ती ही सर्व विज्ञानाच्या द्वारा अथवा त्याचा परिणाम म्हणून करतो.  म्हणून जी कार्ये मानली जातात, ती सर्व विज्ञानाच्या द्वारेच होत असतात. 

६२. ज्याचे काही कारण नाही. असा आत्मा मानणे तर्कविसंगत आहे. 

६३. या पद्धतीने भगवान बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वाचे खंडन केले आहे.

६४. याच कारणास्तव आत्म्याचे अस्तित्व हे धम्माचे अंग असू शकत नाही. 

 

५. यज्ञयागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे

(१)

१. ब्राम्हणी धर्म हा यज्ञावर आधारलेला होता.

२. काही यज्ञांना नित्य यज्ञ म्हणत. काहींना नैमित्तिक.

३. नित्य यज्ञ हे अनिवार्य कर्तव्य होते आणि त्यापासून फळ मिळो किवा न मिळो, ते करणे आवश्यक होते.

४. नैमित्तिक यज्ञ हे याजक संसारिकाच्या काही इच्छापूर्तीसाठी केले जात.

५. ब्राम्हणी यज्ञात सुरापान, पशुबलिदान आणि स्वच्छंद आचरण घडत असे.

६. तरीसुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्ये समजली जात.

७. अशा यज्ञावर आधारलेल्या गरलल्या धर्माला माला भगवान बुद्धाने ने मान्यता दिली ला नाही. 

८. जे अनेक नेक ब्राम्हण ठा भगवान बुद्धाजवळ जवळ यज्ञ हा धर्माचे माच अंग नव्हे, व्ह, या त्याच्या मताबद्दल ताबहल वाद घालण्यासाठी जात, त्यांना भगवान बुद्धाने आपल्या मताची आधारभूत कारणे सांगितलेली आहेत. 

९. असे लिहिलेले आहे की, तीन ब्राम्हणांनी त्यांच्याशी वाद केला.

१०. ते तीन ब्राम्हण म्हणजे-कूटदंत, उज्जय आणि उदायी.

११. कूटदंत ब्राम्हणाने भगवान बुद्धाला यज्ञाबाबत त्यांची मते विचारली.

१२. तथागत बोलले, “ ठीक आहे, ब्राम्हणा, मी बोलतो ते सावधान चित्ताने ऐक.”

१३. कूटदंत उत्तरला, ‘ ठीक आहे’ आणि तथागत खालीलप्रमाणे बोलले. 

१४. “ हे ब्राम्हणा, फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक पराक्रमी, धनसंपन्न राजा होऊन गेला. सोने, रुपे, उपभोगाच्या वस्तु, धान्य आणि इतर माल, यानेत्याची भांडारे आणि कोठारे भरून गेलेली होती.”

१५.  एकदा राजा महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला होता. त्याच्या मनात एक प्रबल विचार आला, माणसाच्या सुखोपभोगाला लागणार्या सर्व सामानाची माझ्याजवळ समृद्धी आहे. मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे. जर मी महायज्ञ करून माझे दीर्घकाल कल्याण निश्चित केले तर ठीक होईल.” 

१६. “ तेव्हा त्या राजाचा पुरोहित ब्राम्हण राजाला म्हणाला, ‘ राजन, या समयी आपली प्रजा अगदी हैराण आहे, लुटली जात आहे, डाकू नगरातून लुटमार करीत फिरत आहेत आणि त्यामुळे सर्व रस्ते असुरक्षित आहेत.  जोपर्यंत अशी अवस्था आहे तोपर्यंत महाराजांनी प्रजेवर यज्ञासाठी कर लागू केला तर ती खरोखर वाईट गोष्ट होईल.” 

१७. “ परंतु महाराजांनी जर असा विचार केला की,  मी तात्काळ या दुष्ट लोकांच्या सर्व कारवाया थांबवीन, त्यांना पकडून हद्दपार करीन, त्यांना दंड करीन, त्यांना शिक्षा करीन, त्यांना देहांत शासन करीन.’ तर या रीतीने या लोकांचा स्वेच्छाचार समाधानकारक रीतीने थांबविता येणार नाही. जे शिक्षा केल्याविना मागे राहातील ते प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाहीत.” 

१८. “ही दुरावस्था थांबविण्याचा एक मार्ग आहे तो असा. आपल्या राज्यात जो कोणी गुरे-ढोरे पाळतो, शेती करतो, त्यांना महाराज आपण भोजन द्यावे, शेती पेरण्याला बी-बियाणे द्यावे. आपल्या राज्यात जे कोणी व्यापार करणारे लोक आहेत त्यांना महाराजांनी ंनी व्यापार करण्यासाठी ण्यासाठी भांडवल द्यावे. जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी भोजन आणि वेतन द्यावे.” 

१९, “मग हे सर्व लोक आपापली कामे करीत राहतील आणि देशात उत्पात होणार नाही. राजाचा अधिकार होऊ लागेल. देश सुखाने शांती अनुभवू लागेल आणि जनता एकमेकांवर संतुष्ट राहून आपली मुले कडेखांद्यावर घेऊन नाचेल. आणि आपल्या घराची दारे उघडी ठेवून निर्धास्त वावरेल.” 

२०. तेव्हा राजा, महाविजेता याने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानून त्याप्रमाणे केले, लोक आपापल्या कामात मग्न झाले आणि देशात उत्पात करण्याचे त्यांनी सोडून दिले. राजाचा करभार वाढत राहिला. देश सुख, शांती, अनुभवू लागला आणि जनता एकमेकांवर संतुष्ट होऊन सुखी झाली; आपली मुले कडेखांद्यावर घेऊन नाचू लागली आणि दरवाजे उघडे ठेवून वावरू लागली. 

२१. जेव्हा सर्व उत्पात शांत झाला तेव्हा राजा महाविजेत्याने आपल्या पुरोहिताला बोलाविले आणि म्हटले, “सर्व उत्पात शांत झाला आहे. देश खुशालीत आहे, मला आता महायज्ञ करावयाचा आहे. तेव्हा माझे दीर्घकालीन कल्याण साधेल असा महायज्ञ कसा करावा हे आपण मला सांगावे.” 

२२. पुरोहिताने राजाला उत्तर दिले, “राजा, आपल्या राज्यात जे जे मांडलिक क्षत्रिय असतील त्याप्रमाणेच राज्यात जे जे मंत्री, अधिकारी, आणि प्रतिष्ठित ब्राम्हण असतील त्याप्रमाणेच जे जे संपन्न गृहस्थ असतील त्या सर्वांना आमंत्रणे पाठवून कळवावे की, मी एक महायज्ञ करू इच्छितो. तेव्हा माझे हित आणि कल्याण जो दीर्घकाळ राखू शकेल अशा त्या महायज्ञास अनुमती द्यावी.” 

२३. “ हे ब्राम्हण कूटदंता, त्या राजाने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केले. क्षत्रिय, मंत्री, ब्राम्हण आणि गृहस्थ या सर्वांनी असे उत्तर पाठविले की, ‘महाराज आपण यज्ञ करावा, यज्ञाला हीच वेळ योग्य आहे. 

२४. राजा विजेता हा सूज्ञ आणि गुणसंपन्न होता. त्याचा पुरोहितही तितकाच सूज्ञ आणि गुणसंपन्न होता. 

२५. ब्राम्हण हो, तो यज्ञ सुरू होण्यापूर्वी त्या पुरोहिताने त्या यज्ञासाठी काय करावे लागणार होते हे राजाला स्पष्ट करून सांगितले.” 

२६. तो पुरोहित बोलला, “महाराज, यज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वी किवा महायज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांना अनुताप वाटू लागला की, अरेरे! मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग या यज्ञात खर्च केला? तर ते योग्य होणार नाही. महाराजांनी असला विचार मनात येऊ देता कामा नये.” 

२७. हे ब्राम्हणहो, त्या पुरोहिताने यज्ञाचा प्रारंभ होण्यापूर्वी यज्ञात भाग घेणार्या लोकांच्यापुढे यज्ञानंतर मनःस्ताप होऊ नये यासाठी राजाला उद्देशून म्हटले, “ महाराज आपल्या या यत्रात जीवहिसक, त्याप्रमाणेच अहिंसक, चोर, त्याचप्रमाणे चोरी न करणारे, विषयोपभोगी, दुर्वर्तन करणारे, त्याचप्रमाणे त्यापासून परावृत्त असलेले, असत्यवादी, त्याचप्रमाणे सत्यवादी, १ निंदक, त्याचप्रमाणे निदेपासून परावृत्त असलेले, उद्धट, ,त्याचप्रमाणे उद्धटपणा न करणारे, व्यर्थ बडबडणारे, त्याचप्रमाणे व्यर्थ न बडबडणारे,द्रेष करणारे, त्याचप्रमाणे द्रेष न करणारे, लोभी, त्याचप्रमाणे निर्लोभी, दुष्ट दृष्टीचे,त्याचप्रमाणे सम्यक्‌ दृष्टीचे, असे नाना प्रकारचे लोक येतील. त्यांपैकी दुष्कृत्ये करणार्या दुर्जनांना दूर आपल्याच कार्यात मग्न राहू द्या; परंतु जे सत्कृत्य करणारे असतील त्यांच्यासाठी सर्व विधी महाराजांनी करावेत. त्यांना संतुष्ट राखवे. त्यांच्याच संतोषाने महाराजांना शांती लाभणार आहे.”

२८. “ आणि ब्राम्हण हो, त्या यज्ञात बैलांचे बळी दिले गेले नाहीत. बकर्यांची, कोंबड्यांची, पुष्ट डुकरांची किंबहुना कोणत्याही सजीव प्राण्याची हिंसा करण्यात आली नाही. यज्ञयूपासाठी झाडे तोडण्यात आली नाहीत. यज्ञभूमीवर पसरण्यासाठी दर्भाची कापणी झाली नाही. जे दास, दूत आणि कर्मचारी या यज्ञातील कार्यासाठी नेमले होते, त्यांना काम करायला लावण्यासाठी काठी वापरली गेली नाही, की भय दाखविले गेले नाही. आपले काम करताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रु ओघळले नाहीत. ज्याला काम करावेसे वाटले त्याने ते काम केले; ज्याला वाटले नाही त्याने काम केले नाही; ज्याला जे योग्य वाटले ते काम त्याने केले; ज्याला जे योग्य वाटले नाही ते काम केले गेले नाही. केवळ तूप, तेल, लोणी, दूध, मध आणि साखर यांच्याच आहुतीने तो यज्ञ तडीस गेला.” 

२१. “ जर तुम्हाला यज्ञ करावयाचा असेल तर त्या राजा विजेत्यासारखा यज्ञ करा; अन्यथा यज्ञ व्यर्थ आहेत. प्राण्यांचे बळी देणे ही निर्दयता आहे. यज्ञ हा धर्माचा भाग होऊच शकत नाही. जो धर्म जीवहिसेने तुम्हाला स्वर्गप्राप्ती मिळवून देईन म्हणतो, तो धर्म हीन धर्म आहे.” 

३०. कूटदन्ताने भगवान बुद्धाला प्रश्‍न केला, “ गौतमा! जीवहिंसेपेक्षा अधिक फळ देणारा, अधिक लाभदायक असा दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे काय?” 

३१. “ होय, ब्राम्हणा आहे.” 

३२. “असा तो यज्ञ कोणता?” 

३३. “तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंत:करणाने हिंसा, स्तोम, कामपूर्तीसाठी मिथ्याचार, असत्य भाषण आणि बेसावधपणाचे मूळ म्हणजे जे उत्तेजक मद्याचे पान, यांपासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे हा तो यज्ञ आहे. उदार दान, निरंतर दान, गृहदान आणि उपदेशग्रहण या सर्वाहुनही तो श्रेष्ठ प्रकारचा यज्ञ आहे.” 

३४. गौतमाने असे भाषण केल्यानंतर कूटदंत ब्राम्हण तथागतांना म्हणाला, “श्रमण गौतमा, तुझे शब्द सर्वश्रेष्ठ आहेत.”

(२)

१. उज्जय नावाचा ब्राम्हण तथागतांना म्हणाला, 

२.  “गौतमा, यज्ञ स्तुत्य समजतात काय?”

३. “नाही. ब्राम्हणा, मी यज्ञाची स्तुती करीत नसतो. तरीसुद्धा कुठल्याच यज्ञाबद्दल चांगले म्हणत नाही असे नाही. ब्राम्हणा, ज्या ज्या यज्ञामध्ये गोवध करतात, बकर्या आणि मेंढरांची कत्तल उडते, कोंबड्या आणि डुकरे कापली जातात आणि विविध प्रकारच्या सजीव प्राण्याचा नाश होतो, म्हणजे ज्या ज्या यज्ञात हिंसा घडते यज्ञ माझ्या मते स्तुतीस पात्र नाहीत.” “असे का?”

४. “ब्राम्हणा! कारण असल्या हिंसेपासून व हिसक यज्ञापासून सज्जन अथवा सन्मार्गगामी लोक दूर राहतात.” 

५. “परंतु हे ब्राम्हणा, ज्या यज्ञात गोवध होत नाही आणि सजीव प्राण्यांची हिसा घडत नाही असल्या अहिसक यज्ञाची मी स्तुती करतो. असले यज्ञ म्हणजे उदाहरणार्थ, प्राचिनकाळापासून रूढ असलेले दानधर्म आणि कुटुंबपरिवाराच्या हितासाठी केलेला त्याग.” 

६. “असे का?” “कारण हे ब्राम्हणा, सज्जन व सर्न्मागी लोक असल्या हिंसारहित यज्ञाच्या समीप जातात.” 

(३)

१. उदायन ब्राम्हणानेही गम्हणानहा उज्जयाने ज्जयान विचारलेल्या चारलल्या प्रश्‍नासारखेच एनासारखच प्रश्‍न तथागताला विचारले. चारल. 

२. तो म्हणाला, “श्रमण गौतमा, तुम्ही यज्ञाची स्तुती करता काय?” बुद्धाने उज्जयाला जसे उत्तर दिले, तसेच त्यालाही दिले. 

३. भगवान बुद्ध म्हणाले, “क्रतूत केलेले योग्य यज्ञ, ज्यात निर्दयता नाही अशा यज्ञाच्या जवळ ज्यांचे डोळ्यावरील इहलोकीचे अज्ञानपटल नाहीसे झालेले आहेत असे सत्प्रवृत्त लोक जात असतात. ज्यांची

जन्ममरणाची ये जा आता संपली आहे, तेही या यज्ञाजवळ जातात. प्रज्ञावान आणि पुण्यशील माणसे सांगतात, यज्ञात अथवा श्रद्धायुक्त कर्मकृत्यात श्रद्धाशील अंतःकरणाने आहुती दिली तर ते याजक पुण्यमार्ग चालू लागतात.अशा श्रेष्ठ मार्गगामी लोकांनी उदारपणे दिलेल्या आहुतीने देव संतुष्ट होतात. अशा आहुतीने विचारवान माणसे प्रज्ञावान बनतात आणि सर्व दु:खरहित होऊन आनंदमय जगात वावरू लागतात. 

 

६. काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म, हा धर्मच नव्हे.

(१)

१. असे प्रश्‍न नेहमी विचारले जात. (१) मी गतयुगात होतो काय?  (२) मी गतयुगात नव्हतो काय?  (३) मी तेव्हा काय होतो ? (४) मी काय होऊन काय झालो?  (५) मी भविष्यकाळातही असेन काय?  (६) मी भविष्यकाळात नसेन काय ?  (७) मी तेव्हा कोण असेन ? (८) मी तेव्हा कसा असेन ?  (९) मी कोठून कोठे जाईन ? अथवा कदाचित आज तो आपल्या स्वत्वासंबंधी साशंक होऊन विचारीत असेल (१) मी आहे काय ? (२) मी नाही काय?  (३) मी काय आहे? (४) मी कसा आहे? (५) माझे अस्तित्व कोठून आले ? (६) ते कोठे जाणार ?

२. विश्वासंबंधी विविध प्रश्‍न विचारले जात त्यांपैकी काही असे होते.

३. विश्व कसे निर्माण झाले? ते चिरंतन आहे काय?

४. पहिल्या प्रश्‍नाच्या उत्तरादाखल काही असे म्हणत की, विश्व ब्रम्ह याने निर्माण केले. दुसरे काही म्हणत, ते प्रजापतीने निर्माण केले आहे. 

५. दुसर्या प्रश्‍नाचे उत्तर असे दिले जाई की, विश्व चिरंतन आहे; काही म्हणत ते सान्त आहे ; तर काही म्हणत ते अनंत आहे.

६. असल्या प्रश्‍नांना भगवान बुद्धाजवळ थारा नसे. त्यांच्या मते केवळ असले प्रश्‍न विकृत बुद्धीचेच लोक विचारू शकतात. 

७. कारण अशा प्रकारच्या प्रश्‍नांची उत्तरे देणार्यांच्या ठिकाणी सर्वज्ञता असली पाहीजे आणि ती कोणाच्याही ठिकाणी नाही. 

८. तो म्हणत असे, “ या प्रश्‍नांची उत्तरे देण्याइतका मी सर्वज्ञ नाही. जे काही जाणण्याजोगे आहे ते आपण सर्व जाणतो असे कोणीच म्हणू शकणार नाही. किंवा एका विशिष्ट वेळी जे जाणण्याची आपण इच्छा करतो ते त्या वेळी आपण जाणलेले असतेच असे नाही. नेहमी काही तरी अज्ञातच राहते.” 

९. याच कारणास्तव भगवान बुद्धाने आपल्या धर्मात वरील प्रश्‍नविषयक सिद्धांताला स्थान दिलेले नाही. १०. जो धर्म असल्या सिद्धान्ताला आपल्या धर्माचा एक भाग समजतो तो भगवान बुद्धाच्या मते स्वीकारार्ह नाही.

(२)

१. भगवान बुद्धाच्या समकालीन आचार्यांनी ज्या सिद्धांताना आपल्या धर्माचे आधार बनविले होते ते आत्मा आणि विश्वोत्पत्ती यासंबंधीचे होत.

२. आत्म्यासंबंधी ते काही प्रश्‍न विचारीत ते असे : ( १ ) मी गतयुगात होतो काय? ( २ ) मी गतयुगात नव्हतो काय? ( ३) मी तेव्हा काय होतो ? ( ४) मी काय होऊन काय झालो? ( ५ ) मी भविष्यकाळातही असेन काय?(६) मी भविष्यकाळात नसेन काय? (७) मी तेव्हा कोण असेन? (८) मी तेव्हा कसा असेन? ( ९ ) मी कोठून कोठे जाईन? अथवा कदाचित आज तो आपल्या स्वत्वासंबंधी साशंक होऊन विचारीत असेल:- ( १ ) मी आहे काय? (२) मी नाही काय? ( ३ ) मी काय आहे? (४) मी कसा आहे? ( ५ ) माझे अस्तित्व कोठून आले ? आणि ते येथून कोठे जाणार? 

३. दुसरे काही आचार्य विश्वोत्पत्तीसंबंधीचा प्रश्‍न विचारीत.

४. काही म्हणत ब्रम्ह याने विश्व निर्मिले. 

५. काही म्हणत, प्रजापतीने आत्मयज्ञाने ते निर्मिले. 

६. इतर काही आचार्य दुसरेच प्रश्‍न विचारीत. जग चिरंतन आहे काय? चिरंतन नाही काय? ते सान्त आहे काय?

ते अनंत आहे काय? शरीर म्हणजे जीव आहे काय? शरीर एक वस्तु आहे आणि जीवही दुसरी वस्तु आहे काय? सत्य ज्ञात्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे काय? त्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहेही आणि नाहीही असे आहे काय? तो मृत्यु तर असत नाही व असत नाही असेही नाही. 

७. भगवान बुद्धाच्या मते असले प्रश्‍न फक्त विकृत मनाचे लोकच विचारू शकतात. 

८. तीन कारणास्तव बुद्धाने या धार्मिक सिद्धान्ताचा धिक्कार केला.

९. प्रथम या सिद्धान्तांना धर्माचा एक भाग मानण्याचे कारण नाही. 

१०. दुसरे असे, या प्रश्‍नांची उतरे द्यायला अंगी सर्वज्ञता पाहिजे आणि ती कोणाच्याही अंगी नसते. या गोष्टीवर त्याने आपल्या प्रवचनातून भर दिलेला आहे.

११. तो म्हणतो एकाच वेळेला कोणालाही सर्वच दिसत नाही किंवा जाणता येत नाही. ज्ञानाला अंत नाही. कारण नेहमीच अधिकाधिक जाणायचे बाकी राहाते. 

१२. भगवान बुद्धाचा या सिद्धान्तावरील तिसरा आक्षेप म्हणजे हे सर्व सिद्धान्त केवळ काल्पनिक अनुमानाच्या रूपाचे आहेत. त्यांची कधीच कसोटी घेतलेली नसते; आणि त्यांना कधीही कसोटी लावता येत नाही. 

१३. अनिर्बंध कल्पनेचे ते परिणाम आहेत. त्याच्यामागे वास्तवता अशी काहीच नाही.

१४. शिवाय या काल्पनिक अनुमानांचा माणसामाणसांच्या संबंधात काय उपयोग आहे? अर्थात काहीच नाही. 

१५. जगाची निर्मिती एकदम झाली आहे यावर भगवान बुद्धाचा विश्वास नव्हता. जगाची उत्क्रांती झाली आहे असे तो मानीत असे.

७. धर्मग्रंथांचे केवळ पठण म्हणजे धर्म नव्हे

१. ब्राम्हण विद्येवर भर देत असत. त्यांच्या मते विद्या हाच प्रारंभ; विद्या हाच अंत. विद्येव्यतिरिक्‍त गोष्टींचा विचार त्यांच्या मते अनावश्यक होता. 

२. उलटपक्षी भगवान बुद्ध हा सर्वांना शिक्षण असावे या मताचा होता.

३. मनुष्य आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो यालाच तो, केवळ विद्येपेक्षा अधिक महत्व देतो. आणि म्हणूनच जो विद्वान आहे त्याच्या ठिकाणी शीलही असले पाहिजे. कारण शीलरहित विद्या नाशकारक आहे. 

४. विद्या आणि शील यांपैकी शीलाचे महत्व कसे अधिक आहे हे भगवान बुद्धाने भिक्खु पटिसेनाला जे सांगितले त्यावरून स्पष्ट होते. 

५. प्राचीन काळी जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीत राहात होता, त्या वेळी तेथे स्वभावाने तिरसट आणि मठूठ, ज्याला एक गाथाही कधी पाठ करता आली नाही असा पटिसेन नावाचा म्हातारा भिक्खु होता. 

६. म्हणून भगवान बुद्धाने पाचशे अर्हतांना पटिसेनाला प्रतिदिनी शिक्षण द्यावे अशी आज्ञा केली; परंतु तीन वर्षानंतरही पटिसेनाला एकही गाथा पाठ म्हणता येईना. 

७. तेव्हा जनपदातील सर्व भिक्खू, भिक्खूणी, उपासक आणि उपासिका पटिसेनाचे हे अज्ञान पाहून त्याचा उपहास करू लागले. भगवान बुद्धाला त्याची द्या आली. त्याने पटिसेनाला आपल्याजवळ बोलाविले आणि सौम्यपणे त्याच्यापुढे पुढील गाथा म्हटली, “जो राखून बोलतो, विचारांचा संयम करतो, जो आपल्या देहाने दुसर्याला उपद्रव करीत नाही, असा मनुष्य निब्बाण मिळवू शकतो.” 

८. तथागतांनी दाखविलेल्या या सदभावनेने प्रेरित झाल्यामुळे त्याचे अंतःकरण प्रफुल्ल झाले. त्याने ती गाथा पाठ म्हणून दाखवली. 

९. तेव्हा भगवान बुद्धाने पुन्हा त्यास उद्देशून म्हटले, “वृद्ध मनुष्या ! आता तुला फक्त एकच गाथा पाठ म्हणता येते. हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा तुझा उपहास करू लागतील. म्हणून मी तुला त्या गाथेचा अर्थ समजावून सांगतो आणि तू तो नीट कान देऊन ऐक.”

१०. नंतर भगवान बुद्धाने तीन कायिक अकुशल कर्मे; चार मौखिक अकुशल कर्मे आणि तीन मानसिक अकुशल कर्मे, ज्यांच्या विनाशाने माणसाला निब्बाण साधता येते ती सांगितली. बुद्धाने केलेल्या विवेचनाचा अर्थ त्या भिक्खूला कक्‍्खूला समजला आणि लवकरच त्याला अर्हतपद तप प्राप्त झाले. 

११. या सुमारास एका विहारात पांचशे भिक्खूणी राहात होत्या. त्यांनी आपल्यापैकी एकीला भगवान बुद्धाकडे पाठवून तिच्यामार्फत बुद्धाला एक धर्मोपदेशक पाठविण्याची विनंती केली. 

१२. ही विनंती ऐकून भगवान बुद्धाने त्या म्हातार्या पटिसेनाला त्यांच्याकडे पाठविण्याचे ठरविले. 

१३. या व्यवस्थेची वार्ता त्या भिक्‍्खूणींच्या कानी येताच त्या सर्व हसू लागल्या आणि म्हातार्या भिक्खूसमोर गाथांचे पठण उलटे म्हणजे शेवटच्या अक्षरापासून करून त्यांनी त्याला गोंधळात टाकण्याचे आणि लज्जित करण्याचे ठरविले. 

१४. नंतर दुसर्या दिवशी सकाळी सर्व लहान थोर भिक्खूणी, पटिसेन येताच त्याला नमस्कार करण्यासाठी पुढे गेल्या. नमस्कार करीत असता त्या एकमेकींकडे पाहुन मिस्किलपणे हसत होत्या. 

१५. खाली बसल्यावर त्यांनी त्या भिक्‍्खूपुढे अन्न ठेविले. पटिसेनाने भोजन करूत हात आणि तोंड धुतल्यावर त्या भिक्युणींनी त्याला प्रवचनाला प्रारंभ करण्याची विनंती केली. तेव्हा तो वृद्ध भिक्खु व्यासपीठावर जाऊन  बसला आणि म्हणाला.

१६. “भगिनींनो ! माझी बुद्धी अल्प आहे. माझे शिक्षण अल्प आहे. मला फक्त एकच गाथा येते ती म्हणून दाखवून तिचा अर्थ मी तुम्हाला सांगेन. सावधान चित्ताने ऐका आणि त्याचा अर्थ समजून घ्या.” 

१७. तेव्हा भिक्खुंनींनी ही गाथा शेवटच्या अक्षरापासून उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला; परंतु आश्चर्य हे की, त्यांना तोंडसुद्धा उघडता येईना. लज्जित होऊन दु:खाने त्यांनी आपल्या माना खाली घातल्या. 

१८. पटिसेनाने ती गाथा म्हटली आणि भगवान बुद्धाने जशी त्याला स्पष्ट करुन सांगितली होती त्याप्रमाणेच त्याने त्या गाथेचा अर्थ विशद केला. 

१९. त्या सर्व भिक्‍्खूणी त्याचे प्रवचन ऐकताच आश्चर्यचकित झाल्या. एकाग्रचित्ताने आणि प्रमुदित मनाने त्यांनी ते प्रवचन ग्रहण केले आणि त्या अर्हत झाल्या. ( आणि त्यांना अर्हतपद प्राप्त झाले. )

२०. दुसर्या दिवशी प्रसेनजित राजाने भगवान बुद्धाला आणि त्यांच्या भिक्खू संघाला आदरातिथ्यासाठी आमंत्रण  दिले. 

२१. पटिसेनाची चर्या सर्व भिक्खूहन श्रेष्ठ प्रतीची आणि पवित्र दिसते हे ओळखून भगवान बुद्धाने आपले भिक्षापात्र त्याच्या हाती देऊन तो त्याच्यामागून चालू लागला. 

२२. परंतु जेव्हा राजवाड्याच्या दारी आले तेव्हा पटिसेनाला ओळखणार्या तेथील द्वारपालाने त्याला आत जाण्याची मनाई केली आणि म्हटले, “ज्याला फक्त एकच गाथा येते अशा भिक्खूसाठी येथे आदरातिथ्याचा समारंभ नाही. चल चालता हो आणि तुझ्या वरिष्ठांना आत येण्यासाठी जागा दे.” 

२३. तेव्हा पटिसेन राजवाड्याच्या द्वाराबाहेरच बसून राहिला. 

२४. नंतर भगवान बुद्ध व्यासपीठावर गेला आणि तेथे त्याने हात धुतले आणि आश्चर्य हे की, भिक्षापात्र धरलेला पटिसेनाचा हात त्या खोलीत दिसू लागला. 

२५. तेव्हा राजा आणि त्याचा प्रधान आश्चर्याने उद्गारले, “अरे हा कोण?” 

२६. तेव्हा भगवान बुद्धाने उत्तर दिले, “तो पटिसेनाचा हात आहे. त्याला नुकतीच बोधीस्थिती प्राप्त झाली आहे आणि माझ्यामागे भिक्षापात्र हाती धरण्यास मी त्यास सांगितले आहे; परंतु द्रारपालाने त्याला आत येऊ दिलेले नाही.” 

२७. हे भगवान बुद्धाचे शब्द ऐकल्यावर पटिसेनाला आत प्रवेश मिळाला आणि तो त्या सभेत सामील झाला. 

२८. तेव्हा प्रसेनजित भगवान बुद्धाकडे वळून म्हणाला, “मी तर ऐकत होतो. की पटिसेन हा एक अल्प बुद्धीचा, ‘एकच गाथा जाणणारा मनुष्य आहे. मग तो प्रज्ञावान केव्हापासून झाला?” 

२९. त्यावर भगवान बुद्धाने उत्तर दिले, “ विद्या अधिक नसली तरी चालते. कारण शील हीच सर्वोत्तम वस्तु आहे.” 

३०. ह्या पटिसेनाच्या अगदी मनोरंध्रात या गाथेचा अर्थ भरला आहे. त्याचे शरीर आणि मन ही पूर्ण शांत झाली आहेत. माणसाला ज्ञान असले तरी जोपर्यंत त्याचे ह्या ज्ञानानुसार आचरण होत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्याला अध:पातापासून वाचवू शकत नाही. 

३१. नंतर तथागत म्हणाला, 

३२. “माणसाला जरी हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी जोपर्यंत त्याला त्यातील ओळीचा अर्थ कळत नसेल तर त्याच्यापेक्षा एकच गाथा जाणून तदनुसार आपल्या विचारांचा जो संयम करू शकतो तो मनुष्य श्रेष्ठ आहे. हजारो शब्द न समजता पाठ म्हणण्यात काय अर्थ आहे ? ऐकलेले शब्द समजून त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे आपल्या मोक्षाचा मार्ग चोखाळण्यासारखे आहे.” 

३३. “ माणसाला पुष्कळशी पुस्तके पाठ येत असली तरी जोपर्यंत तो त्याचा आशय विशद करून सांगू शकत नाही तोपर्यंत त्या  पठणाचा   उपयोग काय? धर्माचे एकच वाक्‍य समजावून घेतले आणि जर त्याप्रमाणे आचरण ठेवले. वले, तर त्यायोगे याग सर्वोत्तम वात्तम प्रज्ञेच्या मार्गाची गगोचा वाटचाल होणार  आहे. 

३४. भगवान बुद्धाचे हे शब्द ऐकून तेथे जमलेले दोनशे भिक्खु, राजा, मंत्रिगण हे आनंदीत झाले. 

 

८. ‘धर्म पुस्तके’ प्रमादातीत आहेत असे मानणे म्हणजे अधर्म आहे. 

१. वेद हे केवळ पवित्र आहेत, एवढेच नव्हे तर, ते स्वत: प्रमाण आहेत असे ब्राम्हण उद्घोष करीत होते. 

२. वेद हे केवळ स्वतः प्रमाण आहेत एवढेच नव्हे तर ते प्रमादातीत आहेत. असे ब्राम्हण म्हणत.

३. ब्राम्हणांच्या त्या मुद्याला भगवान बुद्धाचा विरोध होता.

४. वेद पवित्र आहेत, स्वतः प्रमाण आहेत आणि वेद प्रमादातीत आहेत या तीनही गोष्टी भगवान बुद्धाने नाकारल्या आहेत. 

५. त्याच्यासारखी भूमिका पुष्कळ धर्मोपदेशकांनी घेतली होती. तथापि आपल्या तात्विक दर्शनाला ब्राम्हणांकडून संमती आणि सन्मान मिळावा यासाठी त्यांनी पुढे वेदविरोधी भूमिकेचा त्याग केला; परंतु भगवान बुद्धाने या बाबतीत कधीच पाऊल मागे घेतले नाही.

६. तेवीज्यसूत्तामध्ये भगवान बुद्धाने, वेद म्हणजे एक निर्जल वाळवंट, निष्पथ अरण्य आणि खरोखर एक नरकच आहे असे म्हटले आहे. बौद्धिक आणि नैतिक तृष्णेने आर्त झालेल्या कोणाही मनुष्याने वेदापासून आपल्या तृषेचे शमन होईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. 

७. वेद प्रमादातीत आहेत यासंबंधी त्याचे म्हणणे असे की, वेदच काय कोणतेही वाडमय प्रमादातीत नाही. प्रत्येक गोष्टीची परीक्षा आणि पुन्हा परीक्षा ही झालीच पाहिजे. 

८. कालाम लोकांच्यापुढे झालेल्या आपल्या प्रवचनात भगवान बुद्धाने हे मत स्पष्ट केले आहे. 

९. एकदा एका मोठ्या भिक्खू संघासमवेत कोसल जनपदातून जात असता भगवान बुद्ध कालामांच्या केसपुत्त या नगरात आला.

१०. जेव्हा कालामाला भगवान बुद्धाच्या आगमनाची वार्ता मिळाली, तेव्हा ते तथागताजवळ गेले आणि त्याच्या बाजूला बसून त्या केसपुत्त गावच्या कालामांनी तथागताला उद्देशून म्हटले, 

११. “भगवान ! केसपुत्त गावी येणारे काही श्रमण ब्राम्हण, आपापली मते मांडतात आणि ती सर्वश्रेष्ठ आहेत असा दावा सांगतात. ते दुसर्यांच्या मताचे खंडन करतात. त्यांचे मत हीन मत आहे अशी त्याची संभावना करतात. त्याप्रमाणेच दुसरेही श्रमण ब्राम्हण केसपुत्ताला येतात, आपापल्या धर्मसमजुतीचे प्रवचन करतात. त्यांचा महिमा गातात; परंतु त्याबरोबरच ते दुसर्यांच्या धर्मसमजुतीचे खंडण आणि निर्भत्सना करतात.” 

१२. “आणि म्हणून भगवान ! त्या श्रमण ब्राम्हणांपैकी कोणाचे सत्य मानावयाचे व कोणाचे असत्य मानावयाचे हे आम्हाला समजत नाही. त्यामुळे आमचे मत अनिश्चित आणि शंकाधीन झाले आहे.” 

१३. तथागताने उत्तर दिले, “तुमच्या मनात अनिश्चितता आणि शंका उद्भवावी याला योग्य कारण झाले आहे आणि ही अनिश्चिती आणि शंका खरोखर तुमच्या मनात योग्य वेळीच उत्पन्न झाली आहे.” 

१४. भगवान पुढे म्हणाले, “हे कालामांनो, तुम्ही जे केवळ ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ धर्मपुस्तकात लिहिलेले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ न्याय शास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ सकृद्दर्शनी पटण्यासारखे आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. ज्या समजुती आणि मते अनुकूल वाटतात म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ बाह्यात्कारी खर्यासारखे दिसते ते केवळ बाह्यात्कारी सत्य म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. एखादे वचन कोणा एका यतीने अथवा आचार्याने सांगितले एवढ्यानेच त्यावर विश्वास ठेवू नका.”

१५. कालामाने विचारले, “ मग आम्ही करावयाचे तरी काय? आम्ही कोणती कसोटी लावायची?” 

१६. तथागताने उत्तर दिले, “ कसोट्या ह्या स्वत:लाच विचारा. ह्या गोष्टी हितकर आहेत काय? शहाण्या माणसाने त्या टाकाऊ मानल्या आहेत काय? त्या केत्या असता कष्ट आणि दु:ख ओढवते काय?

१७. कालामांनो, यापुढेही जाऊन तुम्ही असे विचारले पाहिजे की, “ हे सिद्धांत तृष्णा, द्वेष, मूढता आणि हिंसा यांना सहाय्यक नाहीत ना?”

१८. “ एवढेच पुरे नाही तर कालामांनो, आणखीही पुढे जाऊन तुम्ही पाहिले पाहिजे की, सिद्धान्त माणसाला इंद्रियाधीन करणारे नाहीत ना ? हिंसेला प्रवृत्त करणारे तर नाहीत ना? चोरी करण्याला प्रेरणा देणारे नाहीत ना? कामेच्छापूर्तीसाठी मिथ्याचार शिकविणारे तर नाहीत ना? ते असंख्य भाषण करायला लावणारे तर नाहीत ना?” 

१९. “ आणि शेवटी तुम्ही त्या सिद्धान्ताबाबत असा प्रश्‍न विचारला पाहिजे की, या सिद्धान्ताचा परिणाम अहित आणि दु:खात तर होणार नाही ना?” 

२०. आता कालामांनो, सांगा-

२१. “ त्या श्रमण ब्राम्हणांचे सिद्धान्त हित साधणारे आहेत की अहित साधणारे आहेत?” 

२२. कालामांनी उत्तर दिले, ‘ भगवान, ते अहिताकडे नेणारे आहेत.’

२३. ‘ ते लाभकारक आहेत की हानिकारक आहेत?” 

२४. ‘ भगवान, ते हानिकारक आहेत. 

२५.’ते निद्य आहेत काय, कालामांनो ?’ 

२६. कालामाने उत्तर दिले, ‘ भगवान, ते निद्य आहेत.’ 

२७. ‘ शहाण्या माणसांना ते मान्य आहेत की त्यांच्या मते ते निषिद्ध आहेत?’ 

२८. ‘ शहाणी माणसे त्याना टाकाऊ समजतात.’ 

२९. ‘ त्यांचा आचार केला असता त्याचे पर्यवसान कष्टात आणि दु:खात होते काय?” 

३०. ‘ होय भगवान, त्यांचे पर्यवसान कष्टात आणि दु:खात होते.’ 

३१. ‘ जे धर्मग्रंथ असले सिद्वान्त शिकवितात ते तुमच्या मते स्वत:प्रमाण आणि प्रमादातीत ठरतात काय? 

३२. ‘नाही’, कालामाने उत्तर दिले, ‘ भगवान, ते स्वतःप्रमाण आणि प्रमादा तीत ठरत नाहीत.’ 

३३. “ आणि कालामांनो, मीही नेमके हेच म्हणतो आहे, मीही हेच म्हणालो आहे. जे केवळ ऐकीव आहे, परंपरागत आहे, ज्यात केवळ वादविवादाची कुशलता आहे किंवा तर्काची सूक्ष्मता आहे, तेवढ्यावरूनच त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ वरवर पाहता विश्वसनीय वाटते म्हणून मानू नका. ज्या समजुती आणि दृष्टिकोण केवळ अनुकूल वाटतात म्हणून स्वीकारू नका. ते केवळ श्रमण ब्राम्हणाचे शब्द आहेत म्हणून त्यावर भाळून जाऊ नका.” 

३४. “ जेव्हा तुम्हाला आत्मानुभवाने वाटेल की, ह्या गोष्टी अहितकर, दोषार्ह, सुज्ञांनी निषिद्ध ठरविलेल्या किवा परिणामी कष्टात आणि दु:खात नेणार्या आहेत, तेव्हा त्या गोष्टींचा तुम्ही त्याग केला पाहिजे.” 

३५. “भगवान ! फार छान, फार छान! आम्ही भगवन्ताला आणि त्याच्या धर्माला शरण आलो आहोत. आपले उपासक म्हणून भगवान, आमचा स्वीकार करावा. आजपासून आमरण आम्ही भगवन्तांना शरण आलो आहोत.’ 

३६. भगवान बुद्धाच्या ह्या विचारसरणीचा सारांश अगदी स्पष्ट आहे. कोणाचीही शिकवण ती अधिकारी आहे म्हणून स्वीकारू नका. ती धर्मग्रंथनिविष्ट आहे, त्यांत तर्काची सूक्ष्मता आहे, किंवा तिचे बाह्यरूप ग्राह्य आहे, उपदेशिलेले विचार किंबा दृष्टिकोन दिसतात म्हणून ती मानू नका. उपर्दाशलेले ववचार किवा दाष्टकान अनुकूल वाटतात, ते बाहेरून सत्यस्वरूप किंवा ते कोणा महान आचार्याचे आहेत म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका.

 ३७. उपदेशिलेले विचार किंवा दृष्टिकोन हितकर आहेत की निदनीय आहेत, सदोष आहेत की काय, ते कल्याणकारक आहेत चि की अकल्याणकारक आहेत याचा विचार करा. 

३८.या कसोटीवर उतरणारा कोणाचाही उपदेश मान्य करावयास प्रत्यवाय नाही. 

Previous page                                             Next Page


The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!