What is Saddhamma

Saddhamma

Part V — What is Saddhamma

What is Saddhamma PDF in English

तृतीय खंड: भगवान बुद्धाने काय शिकविले?

भाग पाचवा: सद्धम्म म्हणजे काय ?

What is Saddhamma

Previous page                                             Next book

१. मनाची मलिनता दूर करणे 

१. एकदा तथागत हे श्रावस्तीस वास करीत असताना कोसलराजा प्रसेनजित त्याच्या निवासस्थानी आला, आणि आपल्या रथातून उतरून भक्‍तीभावाने तो तथागतांच्या सन्निध गेला. 

२. सकाळी नगरात प्रवेश करून आपले आदरातिथ्य स्वीकारावे असे त्याने तथागताला विनविले. यामध्ये त्याचा हेतू लोकांना भगवान बुद्धाचे सर्वोत्तम दर्शन घडावे, त्याचा धर्म कळावा, त्याच्यावर श्रद्धा बसावी हा होता. 

३. भगवान बुद्धाने त्याचे आमंत्रण स्वीकारले, आणि दुसर्या दिवशी सकाळी आपल्या सर्व भिक्षु संघासह नगरात प्रवेश केला; आणि चौरस्ते ओलांडून पूर्वनियोजित स्थानी येऊन विराजमान झाला.

 ४. भोजन संपल्यानंतर राजाच्या विनंतीनुसार चौरस्त्यावर एका मोठया श्रोतृसमूहासमोर त्याने धर्मोपदेशाला प्रारंभ केला. 

५. या वेळी त्या श्रोतृवंदात दोन व्यापारी त्याचे भाषण ऐकत होते. 

६. त्यांपैकी एक मनात विचार करू लागला, असल्या धर्म-सिद्धान्वाचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडवून आणावा यात राजाचे किती थोर शहाणपण दिसते; किती सर्वव्यापी व शोधक बुद्धीचे सिद्धान्त आहेत हे! 

७. दुसर्याच्या मनात विचार आला, असल्या माणसाला धर्मोपदेशक करायला येथे आणणे यात राजाचा किती मूर्खपणा आहे! 

८. गाय जे वाहन ओढीत असते त्याला बांधलेले वासरू गाईच्या मागून जाते, आणि जात असताना हंबरत असते. त्याप्रमाणे भगवान बुद्ध ह्या राजामागून जात आहे. ते नगर सोडल्यानंतर ते दोघे व्यापारी ज्या सराईमध्ये उतरले होते तेथे एकत्र आले. 

९. मद्यपान करीत असताना जो व्यापारी भला होता त्याला चार्तुमहाराजिक देवतांनी संयमित आणि संरक्षित ठेवला. 

१०. उलट दुसरा मात्र पिशाच्चाने पिसाळल्याप्रमाणे एकसारखा पीत होता. शेवटी झोप आल्याने तो गुत्याच्या जवळच्या रस्त्यावर पहुडला. 

११. दुसर्या दिवशी सकाळी त्या पहिल्या व्यापार्याच्या गाडीखाली तो रस्त्यावर पडलेला व्यापारी, सारथ्याला न दिसल्यामुळे चिरडला गेला आणि मरण पावला. 

१२. पहिला व्यापारी एका दूर देशात आला असताना, त्या देशाचा एका पवित्र अश्वाने त्याच्यापुढे गुडघा वाकविल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि त्याला सिंहासनाधिष्ठित करण्यात आले. 

१३. त्यानंतर या आपल्या जीवनाला मिळालेली ही विलक्षण कलाटणी मनात आणून तो भगवान बुद्धाकडे गेला आणि आपल्या देशात शात येऊन ऊन आपत्या प्रजेला जला उपदेश पदश करण्यासाठी ण्यासाठी त्यांना आमंत्रण दिलि. 

१४. त्या वेळी त्या जगदृंद्य बुद्धाने त्या दुष्टबुद्धी व्यापार्याच्या मृत्यूचे आणि त्या सदबूद्धी व्यापार्याच्या भरभराटीचे कारण त्यांना सांगितले आणि म्हटले, 

१५. ‘मन सर्वाचे मूळ आहे, मन हे स्वामी आहे. मन हे कारण आहे.! 

१६. ‘मनात दुष्ट विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि कार्ये ही दुष्ट बनतात. पापोल्भूव दुःखे, ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा गवा करीत ]त असतात.’ 

१७. ‘मन हे सर्वाचे मूळ आहे. तेच आज्ञा करते आणि तेच घटना घडवून आणते.’ 

१८. ‘मनात सद्िचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्ये दोन्हीही चांगली असतात, आणि अशा सदाचारापासून उद्भवणारे सुख, पदार्थाच्या सावलीप्रमाणे सदोदित त्या माणसामागे जात असते.’ 

१९. हे शब्द ऐकून राजा, त्याचे प्रधान आणि इतर असंख्य लोकांनी भगवान बुद्धाची धर्मदीक्षा ग्रहण केली आणि ते त्याचे शिष्य झाले.

 २. जग हे धम्मराज्य बनविणे 

१. धम्माचे प्रयोजन काय?

२. याची भिन्न धर्मानी भिन्न भिन्न उत्तरे दिली आहेत. 

३. माणसाला ईश्वरप्राप्तीच्या मार्गी लावून त्याला आपल्या आत्म्याच्या मोक्षाचे महत्व शिकविणे, हे सामान्यत: वरील प्रश्‍नाला उत्तर येते. 

४. बहुतेक धर्म तीन प्रकारच्या राज्यासंबंधी बोलतात. 

५. एकाला स्वर्गाचे राज्य म्हणतात, दुसर्याला इहलोकीचे राज्य म्हणतात आणि तिसर्याला नरकाचे राज्य म्हणतात. 

६. असे म्हणतात की, स्वर्ग-राज्यात देवांचे शासन चालते. नरक-राज्यात दुष्टांचे राज्य चालते. इहलोकीच्या राज्यासंबंधी वाद आहेत. ते सैतानाच्या मांडलिकत्वाखाली नसते, त्याप्रमाणेच देवांचे सार्वभौमत्वही त्यावर पसरलेले नसते. एक दिवस ते पसरेल, अशी अपेक्षा मात्र असते. 

७. काही धर्मांमध्ये स्वर्गराज्य प्रत्यक्ष ईश्वराच्या शासनाखाली असल्याने तेथे धर्मराज्य असते. 

८. इतर काही धर्मात स्वर्गराज्य हे इहलोकी असत नाही. ते फक्त स्वर्गाचेच दुसरे नाव आहे. जो कोणी ईश्वर आणि त्याच्या प्रेषितावर श्रद्धा ठेवील त्यालाच तेथे पोहचता येते. स्वर्गलोकी पोहोचल्यावर त्या धर्मनिष्ठांना जीवनातील सर्व भोगविलास तेथे लाभतात. 

९. सर्व धर्म असे उपदेशीतात की, ह्या स्वर्गराज्याची प्राप्ती हे प्रत्येक माणसाचे साध्य असावे; आणि ते कसे साधावे हे सांगणे त्या सर्व धर्माचे कार्य असावे. 

१०. धर्माचा उद्देश काय? याला भगवान बुद्धाचे उत्तर अगदी वेगळे होते. 

११. जीवनाचा उद्देश काही तरी काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती आहे, असे त्याने लोकांना सांगितले नाही. त्याचे म्हणणे असे की, धर्माचे राज्य इहलोकीचे आहे आणि त्याची प्राप्ती धर्मशील आचारानेच घडते. 

१२. त्याने असे सांगितले आहे की, “दुःख निराकरणासाठी प्रत्येक माणसाने दुसर्या प्रत्येक माणसाशी धर्मानेच वागले पाहिजे; आणि अशा व्यवहारानेच इहलोकी धर्मराज्य स्थापन केले पाहिजे.” 

१३. यामुळेच त्याचा धर्म इतर धर्मापासून वेगळा पडतो. 

१४. त्याचा धर्म पंचशील, अष्टांगमार्ग आणि पारमिता यावर भर देतो. 

१५. भगवान बुद्धाने या त्रयीवरच आपला धर्म का आधारला? कारण जीवन-मार्गाचे हे तीन घटक असून त्यांच्या योगानेच मनुष्य सदाचारी बनू शकतो. 

१६. माणसाचे दुःख, हे माणसामाणसातील अनुचित व्यवहाराचाच परिणाम आहे. 

१७. हा अनुचित व्यवहार आणि त्यापासून उद्भवणारी दु:खे, ही धर्मानेच नाहीशी होऊ शकतात. 

18.म्हणूनच धर्माने नुसता उपदेश करून भागणार नाही. तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे, हे त्याच्या मनावर पूर्णपणे ठसविले पाहिजे. 

१९ ही सदाचाराची आवश्यकता माणसाच्या मनावर ठसविण्यासाठी धर्माला इतरही काही कार्ये करावी गवा लागतात, असे तो म्हणतो. 

२०. धर्माने माणसाला आचरण्यास योग्य कुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि त्या आधारे आचार करण्याचे शिकविले पाहिजे. 

२१. धर्माने आचरण्यास अयोग्य ( अकुशल कर्म ) कोणते हे ओळखण्याचे आणि टाळण्याचे शिकविले पाहिजे. शिकविले. 

२२. ह्याशिवाय अतिशय महत्वपूर्ण असे मानलेले धम्माचे दोन उपदेश भगवान बुद्धाने शिकविले. 

२३. धर्माचा पहिला उद्देश म्हणजे माणसाला प्रार्थना, धार्मिक विधी, यज्ञयमाजन शिकविण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे, म्हणजे सुसंस्कृत करणे. 

२४. देवदाह सूत्रात, जैन धर्माची चर्चा करताना भगवान बुद्धाने हा उद्देश स्पष्ट केला आहे. 

२५. जैन धर्माचा संस्थापक असे मानीत असे की, सर्व वैयक्तिक सुखकर अथवा दु:खकर अनुभव हे गतजन्मी केलेल्या कर्मांचे फळ आहे. 

२६. असे असल्यामुळे गतजन्मीच्या दुष्कर्मांचे विवेचन केले असता, आणि नवी दुष्कर्मे न केल्यास भविष्यकाळात भोगायचे काहीच राहात नाही. भविष्यकाळात भोगायला लावणारे दुष्कर्माचे परिणाम उरले नाहीत की दुष्कर्म क्षय पावते, आणि दुष्कर्म क्षय पावले की दु:खाचा क्षय होतो, आणि सर्व दु:खाचेच मुळापासून उच्चाटन होते. 

२७. असा जैन धर्माचा दृष्टिकोन आहे. 

२८. यावर भगवान बुद्धाने एसा प्रश्‍न केला, ‘ तुम्हाला असे सांगता येईल का? की, या इथे आता दृष्ट वृत्तीचा उच्छेद केला की त्या क्षणी तिथे सत्प्रवृत्तीची स्थापना होते?” 

२९. याचे उत्तर ‘नाही’ असेच आले. 

३०. तेव्हा भगवान बुद्धाने विचारले, ‘ जोपर्यंत तुम्ही दुष्टवृत्तीचा त्याग करून सत्परवृत्तींचा अंगिकार करण्याचे मनास शिक्षण दिले नाही, तोपर्यंत गत दुष्कर्माचे विरेचन आणि नव्या दुष्कर्माचा प्रारंभ न करणे या क्रियांना काय अर्थ आहे?” 

३१. भगवान बुद्धाच्या मते, हा त्या धर्मातील एक गंभीर दोष होता. सत्प्रवृत्ती हीच चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे. 

३२. म्हणूनच भगवान बुद्धाने चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला सुसंस्काराने वळण लावण्याला अगदी पहिले स्थान दिले आहे. 

३३. धर्माचा जो दुसरा उद्देश भगवान बुद्ध आत्यंतिक महत्वाचा मानतो, तो म्हणजे एखादे तत्व उचित म्हणून समजल्यावर, जरी कोणी साथी नसला तरी धैर्याने तत्वाच्या मार्गापासून विचलित न होणे. 

३४. सल्लेखसुत्तामध्ये भगवान बुद्धाने या मुह्यावर भर दिला आहे. 

३५. तेथे तो म्हणतो, 

३६. “जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करीत असले तरी. मी काही हानिकारक कृत्य करणार नाही; अशा निश्चयाने तुम्ही आपले मन निर्मल बनविले पाहिजे. 

३७. जरी दुसरे लोक हत्या करीत असले तरी तुम्ही हत्या करता कामा नये. 

३८. जरी दुसरे लोक चोरी करीत असले तरी तुम्ही चोरी करता कामा नये. 

३९. दुसर्या लोकांचे जीवन श्रेष्ठ नसले तरी तुमचे जीवन श्रेष्ठच असले पाहिजे. 

४०. दुसरे लोक खोटे बोलत असले, निदा करीत असले, जोरजोराने निषेध करित असले, बडबडत असले तरी तुम्ही तसे करता कामा नये. 

४१. जरी दुसरे लोक लोभी असले तरी तुम्ही लोभी असता कामा नये. 

४२. जरी दुसरे लोक द्वेष करीत असले तरी तुम्ही द्रेष करता कामा नये. 

४३. जरी दुसरे लोक मिथ्या दृष्टीचे, मिथ्या संकल्पाचे, मिथ्या वाणीचे, मिथ्या क्रियेचे, मिथ्या समाधीचे असले तरी मी मात्र सम्यक्‌ दृष्टी, सम्यक्‌ संकल्प, सम्यक्‌ वाणी, सम्यक्‌ कर्म, सम्यक्‌ आजीविका, सम्यक्‌ व्यायाम, सम्यक्‌ स्मृती आणि सम्यक्‌ समाधी या अष्टांग मार्गापासून विचलित होणार नाही. 

४४. जरी दुसरे सत्य आणि निर्वाण याबाबत चुकत असले तरी तुम्ही सत्य आणि निर्वाण यांच्या मार्गापासून विचलित होता कामा नये. 

४५. जरी दुसरे लोक आळस आणि तंद्री यांच्या आधीन असले तरी तुम्ही मात्र या दोषांपासून विमुक्त असले पाहिजे. 

४६. जरी दुसरे लोक गविष्ठ असले तरी तुम्ही मात्र विनम्र असले पाहिजे. 

४७. जरी दुसरे लोक शंकाकुल असले तरी तुम्ही मात्र निःशंक असले पाहिजे. 

४८. जरी दुसरे लोक क्रोध, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, निरबुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, दुष्टसंगत, आळशीपणा, अश्रद्धा, निर्लज्जपणा, सत्‌-असत्विवेकाचा अभाव, अडाणीपणा, निष्क्रियता, गोंधळ, शहाणपणाचा अभाव इ. दोषांनीयुक्‍त असले तरी तुम्ही मात्र या दोषांच्या विरोधी असलेले गुण अंगी बाणविले पाहिजे. 

४९. दुसरे लोक जरी लौकिक वस्तूंना चिकटून असले, त्यावरील आपली पकड सैल होऊ देत नसले तरी तुम्ही मात्र अशा वस्तूंना न चिकटता त्यागशील राहिले पाहिजे. 

५०. मी असे म्हणतो की, चेतनाशक्‍ती विकसित झाल्याने वाणी आणि कर्मच काय तर समग्र विज्ञान ( जाणीव) सुद्धा प्रभावित होते. म्हणून हे चुंद, माणसाने करावयाचे संकल्प, मी जे वर तपशिलाने सांगितले आहेत, ते करावयास लावणार्या चेतनाशक्‍तीचा विकास केला पाहिजे.”

 ५१. भगवान बुद्धाच्या मतानुसार धम्माचा उद्देश हा असा आहे. 

(ख) धर्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो.

 १. धम्माला सद्धम्माच रूप येण्यासाठी त्याने प्रजेला उत्तेजन दिले पाहिजे. जेव्हा धम्म विद्या सर्वांस मोकळी करतो तेव्हा तो सद्धम्म होय

 १. ज्ञानार्जनाची मुभा सर्वांस मोकळी ठेवता येत नाही, असा ब्राम्हणी सिद्धान्त होता. या सिद्धान्तानुसार ती फक्त थोडक्याच लोकांना असली पाहिजे. 

२. ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांनाच ब्राम्हणी सिद्धान्ताप्रमाणे ज्ञानार्जनाची अनुज्ञा होती; आणि त्या पैकीही ती फक्त या त्रैवर्णिकांतील पुरुषवर्गालाच होती. 

३. स्त्रिया ह्या ब्राम्हण, क्षत्रिय अथवा वैश्य असोत, त्याप्रमाणेच शूद्र पुरुष असो अथवा स्त्री असो त्या सर्वांना ज्ञानार्जजाचाच काय पण साक्षरतेचाही अधिकार नव्हता. 

४. ब्राम्हणांच्या ह्या भयंकर सिद्धान्ताविरुद्ध भगवान बुद्धाने बंड उभारले. 

५. ज्ञानमार्ग, मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, तो सर्वांना मोकळा असला पाहिजे, असे भगवान बुद्ध शिकवीत असे. 

६. पुष्कळ ब्राम्हणांनी त्याच्या मताल विरोध केला. लोहिच्च ब्राम्हणाबरोबर झालेला त्याचा वादविवाद त्याच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो. 

७. एकदा कोसल जनपदासून आपल्या संघातील अनेक भिक्षुंसह परिभ्रमण करीत, असता तथागत शालवाटिका या नावाच्या शालवृक्ष रांगांनी परिवेष्टित अशा एका खेडेगावी आले. 

८. या वेळी, शालवाटिकेत लोहिच्च नावाचा एक ब्राम्हण राहात असे. ही शालवाटिका चांगली गजबजलेली कुरणे, झाडी आणि धनधान्याने भरलेला प्रदेश होता. हा प्रदेश कोसलचा राजा प्रसेनजित याने त्या ब्राम्हणाला सर्वाधिकारासहित दान केलेला होता. 

९. जर एखाद्या श्रमणाने किंवा ब्राम्हणाने ज्ञानार्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये जसे त्या लोहिच्च ब्राम्हणाचे मत होते. 

१०. तथागत शालवाटिकेत राहात आहेत हे लोहिच्च ब्राम्हणाला कळले. 

११. हे कळल्यावर लोहिच्चाने आपला न्हावी भेसिक यास सांगितले, “भेसिका, इकडे ये, ऐक. तो श्रमण गौतम जेथे उतरला आहे तेथे जा, आणि नाव सांगून त्याला विचार, तुझा आजार आता बरा आहे ना? तुझे प्रकृतिस्वास्थ्य ठीक आहे ना?” हे कृशल प्रश्‍न झाल्यावर त्याला सांग, “उद्या आपण आपल्या भिक्खूसंघासह लोहिच्च ब्राम्हणाकडे भोजनास यावे.” 

१२. तो न्हावी म्हणाला, “ठीक आहे महाराज.” 

१३. लोहिच्चाच्या आज्ञेप्रमाणे त्याने तथागताकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे त्याला आमंत्रण दिले. तथागताने त्या विनंतीला मुक संमती दिली. 

१४. दुसर्या दिवशी सकाळी वस्त्र परिधान करून व आपले भिक्षापात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्खूसंघासह शालवाटिकेकडे निघाले. 

१५. भगवान बुद्धाला आणण्यासार्ठा लोहिच्चाने पाठविलेला दूत भगवान बुद्धाच्यामागे एक एक पाऊल टाकीत चालला होता. रसत्यात त्याने तथागताला लोहिच्चाचे ते दुष्ट मत म्हणजे श्रमण अथवा ब्राम्हणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री आणि शूद्रांना शिकवू नये, हे सांगितले. 

१६. तथागताने उत्तर दिले, “भेसिका, ठीक आहे, ठीक आहे.” 

१७. तथागत त्या लोहिच्च ब्राम्हणाच्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्यासाठी जे स्थान करून ठेवलेले होते त्या ठिकाणी जाऊन बसले. 

१८. त्या लोहिच्च ब्राम्हणाने बुद्ध संघप्रमुखाला आपल्या हाताने गोड, कठीण आणि मऊ प्रकारचे अन्न तो नको नको म्हणे पर्यंत वाढले. 

१९. तथागताचे भोजन संपल्यानंतर त्यांनी आपले भिक्षापात्र आणि हात धुतले. नंतर लोहिच्चाने एक ठेंगणे आसन आणून तो तथागताच्या बाजूला त्या आसनावर बसला. 

२०. लोहिच्च अशा रितीने बसल्यावर तथागताने विचारले, “ लोक म्हणतात की, श्रमण अथवा ब्राम्हणाने ज्ञान अथवा विद्या, स्त्री अथवा शूद्रांना शिकवू नये असे तुझे मत आहे ही गोष्ट खरी आहे काय?” 

२१. लोहिच्च म्हणाला, “ होय, गौतमा माझे मत तसेच आहे.” 

२२. “ लोहिच्च, तुला काय वाटते, तू शालवाटिकेत नांदत आहेस, नाही का?” “ होय गौतमा, मी शालवाटिकेत नांदत आहे.” 

२३. “ लोहिच्च, मग कल्पना कर, की जर कोणी असे बोलला, ‘ या शालवाटिकेत लोहिच्च ब्राम्हणाचे राज्य आहे. त्याला एकट्यालाच या शालवाटिकेचे उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा माल याचा उपभोग घेऊ द्या. दुसर्या कोणालाही काही देऊ नका. असे बोलणार्याला, तुझ्यावर अवलंबून असणार्यांना तो संकटात टाकणारा आहे असे तू मानशील की नाही?” 

२४. ‘ अर्थात गौतमा! मी त्याला संकटनिर्माताच समजेन.’ 

२५. ‘ अशा संकटनिर्मात्याला तू त्यांचा हितकर्ता मानशील काय?” 

२६. लोहिच्चाने उत्तर दिले, ‘ अर्थात नाही, गौतमा! मी त्याला त्यांचा हितकर्ता मानणार नाही.’ 

२७. ‘ अशा रीतीने त्यांच्या हिताची पर्वा न करणार्या माणसाचे अंतःकरण प्रेमभावयुक्‍त आहे की वैरभावयुक्‍त आहे असे तू म्हणशील?” 

२८. ‘ गौतमा, मी ते वैरभावयुक्‍त आहे असे मानीन. 

२९. पण ज्यामुळे माणसांचे अंत:करण वैरभावयुक्‍्त, होते तो सिद्धान्त तू चांगला का वाईट मानशील?’ 

३०. ‘ गोतमा, मी तो सिद्धान्त वाईट आहे असेच मानीन. 

३१. ‘ मग लोहिच्च! मला सांग, कोसलचा प्रसेनजित राजा काशी आणि कोसल प्रांताचा अधिपती नाही काय?” 

३२. ‘ होय. गौतमा! तो कोसल आणि काशीचा अधिपती आहे.’ 

३३. ‘ मग लोहिच्च कल्पना कर! कोणी तरी असे बोलला की, कोसल चा प्रसेनजित राजा याच्या छत्राखाली काशी आणि कोसल प्रांत आहेत. त्याला एकटयालाच त्या काशी कोशलचे उत्पन्न आणि तेथे उत्पन्न होणारा माल यांचा उपभोग घेऊ द्या. दुसर्या कोणाला काही देऊ नका. तर असे बोलणार्या मनुष्याला तू आणि जे इतर प्रसेनजिताचे आश्रित आहात, त्यांना संकटात टाकणारा मनुष्य म्हणून तू मानशील की नाही? 

३४. ‘ होय. गौतमा! मी त्याला संकट-कर्ताच समजेन.’ 

३५. ‘ अशा संकटकर्त्या माणसाला तू हितकर्ता मानशील काय?” 

३६. ‘ नाही गौतमा! तो त्यांचा हितकर्ता नव्हे. 

३७. ‘ आणि जर तो त्यांचा हितकर्ता नसेल तर त्याचे अंतःकरण लोकांसंबंधी प्रेमयुक्‍त आहे की वैरयुक्‍त आहे?” 

३८. ‘ गौतमा, ते वैरयुक्‍त आहे.’ 

३९. ‘ ज्या सिद्धान्ताने माणसाचे अंत:करण वैरयुक्‍त होते, तो सिद्धान्त तुझ्या मते वाईट की चांगला?” 

४०. ‘ गौतमा! तो सिद्धान्त वाईट आहे.’ 

४१. “मग लोहिच्चा, तू हे मान्य करतोस की, जर तुला कोणी सांगू लागले की, तू शालवाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्या उत्पन्नाचा आणि मालाचा तू एकट्यानेच उपभोग घ्यावा, दुसर्या कोणालाही त्यातील काही देऊ नये; त्याप्रमाणे कोणी असे बोलू लागला की, कोसलचा प्रसेनजित राजा काशी कोसलचा राजा असल्यामुळे त्याचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे, दुसर्या कोणाला त्याने काही देऊ नये, तर तो तुजवर अवलंबून असणार्या लोकांना आणि त्याप्रमाणेच तुला आणि तुझ्यासारख्या राजाच्या आश्रितांना संकटात टाकणारा ठरेल. असे जे दुसर्यांना संकटात टाकतात त्यांच्या ठिकाणी प्रेमभावनेचा अभाव आणि वैरभावाचा प्रभाव दिसतो आणि अंत:करणात वैरभावाचा प्रादुर्भाव करणारा सिद्धान्त हा गैर आहे.” 

४२. “तद्वत्‌ हे लोहिच्च, जो कोणी श्रमण अथवा ब्राम्हण विद्या आणि ज्ञान स्त्री-पुरुषांना देऊ नये असे म्हणतो, त्याचे ते मत, वैरभावावर आधारल्यामुळे तो संकट निर्माता ठरतो.”

 ४३. ‘ अशा प्रकारे जो कोणी स्त्री-शूद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असे म्हणतो तो दुसर्याच्या मार्गात अडचणी उभ्या करतो. तो त्यांचा हितर्चितक ठरत नाही. अशा प्रकारे जो मनुष्य दुसर्याचे हित चिंतीत नाही तो त्यांचा शत्रू ठरतो.’ 

४४. “ आणि जो सिद्धान्त एकाला दुसर्याचा शत्रू बनवितो तो सिद्धान्त गैर आहे.” 

२. धम्म जेव्हा केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते, असे शिकवितो तेव्हा त्याला सद्धम्मरूप प्राप्त होते 

१. एकदा भगवान बुद्ध कोसांबीच्या ‘सुस्वर’ विहारात राहात होता. तेथे जमलेल्या ज्या लोकांना तो उपदेश करीत होता, त्यांच्यामध्ये एक ब्रम्हचारी होता. 

२. त्या ब्रम्हचार्याला अभिमान वाटत असे की, वेदज्ञानात आपण अद्वितीय आहोत. वादविवादात हरविणारा कोणी न आढळल्यामुळे, तो ज्या ज्या ठिकाणी जाई त्या त्या ठिकाणी हातात एक मशाल घेऊन मिरवीत असे. 

३. एके दिवशी एका शहराच्या चौरसत्यावर त्याला एक मनुष्य भेटला. त्याने त्या ब्रम्हचार्याला त्याच्या त्या विक्षिप्त वर्तनाचे कारण विचारले. त्यावर तो ब्रम्हचारी म्हणाला, 

४. ‘जग अंधकारमय व लोक भ्रांत आहेत. त्यामुळे जितका प्रकाश करता येईल तितका करण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेत असतो. 

५. त्याला (जमलेल्या लोकात ) पाहिल्यावर भगवान बुद्धाने हाक मारून विचारले, ‘या मशालीने तू काय करीत आहेस?” 

६. त्या ब्रम्हचार्याने उत्तर दिले, ‘लोक (सर्व ) अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत असल्यामुळे, त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मी ही मशाल धारण केली आहे.’ 

७. नंतर तथागताने त्याला परत विचारले, ‘खरोखर तू इतका विद्वान आहेस? धर्मग्रंथांतील चार विद्या, म्हणजे शब्दविद्या, ज्योतिविद्या, राजविद्या आणि युद्धविद्या तू जाणतोस काय?” 

८. या विद्यांशी आपण अपरिचित असल्याचे त्या ब्रम्हाचार्याला कबूल करावे लागले. त्याने ती मशाल फेकून दिली. भगवान बुद्धाने त्याला उद्देशून म्हटले, 

९. “मनुष्य कितीही विद्वान असला तरी, तो जर इतरांचा तिरस्कार करण्याइतका स्वतःला मोठा मानू लागला, तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे. स्वतः आंधळा आणि इतरांना तो काय प्रकाश दाखविणार? 

३. धम्म जेव्हा प्रजेची आवश्यकता शिकवितो तेव्हा तो

सद्धम्मरूप पावतो 

१. ब्राम्हण, विद्या ही विद्या म्हणून महत्वाची मानीत. माणुस विद्वान असला आणि मग तो जरी सद्रणी नसला तरी ते त्यास पूजार्ह मानीत. 

२. ते म्हणत की, राजाला स्वदेशी पूज्य मानतात. परंतु विद्या ही सर्वत्र पूजजीय समजली जाते. त्यांना सुचवावयाचे असे की, विद्वान हा राजापेक्षा थोर आहे. 

३. भगवान बुद्धाने विद्या आणि प्रज्ञा यांत भेद केला आहे. तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपणा यांच्यामधील भेद आहे. 

४. असेही कोणी म्हणेल की, ब्राम्हणही प्रज्ञा आणि विद्या यांमध्ये भेद करीत आहे. 

५. ते कदाचित खरेही असेल. परंतु भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राम्हणाची प्रज्ञा यांत महदंतर आहे. 

६. अंगुत्तर निकायातील एका प्रवचनात भगवान बुद्धाने हा भेद फार चांगल्या रीतीने स्पष्ट केला आहे. 

७. एका प्रसंगी तथागत राजगृहाजवळच्या वेळूवनात रामाच्या कलन्दक निवासात उतरला होता. 

८. त्या वेळी मगधाचा एक मोठा अमात्य वर्षकार ब्राम्हण तथागतांना भेटण्या साठी आला. आदराने तथागतांना अभिवादन केल्यावर तो त्यांच्या समीप बसला आणि म्हणाला, 

९. “श्रमण गौतमा, जेव्हा पुरुषांच्या अंगी चार गुण असतात तेव्हा त्याला मोठा शहाणा आणि थोर मानतात. हे चार गुण कोणते?” 

१०. “पहिली गोष्ट म्हणजे तो विद्वान असला पाहिजे; म्हणजे कोणतेही वचन उच्च्चारताक्षणीच त्या वचनाचा तत्काळ अर्थ समजून त्याला तो सांगता आला पाहिजे. त्याशिवाय त्याची स्मरणशक्‍ती चांगली असली पाहिजे. पूर्वी घडलेल्या किंवा बोललेल्या गोष्टींचे स्मरण असले पाहिजे, आणि करता आले पाहिजे.” 

११. “गृहस्थी माणसाच्या सर्व कर्तव्यांत तो कुशल आणि तत्पर असला पाहिजे. कोणते करणे योग्य आणि कोणती कारणे उचित, हे ठरविण्यात तो तरबेज असला पाहिजे.” 

१२. “श्रमण गौतमा, माणसाच्या ठिकाणी हे गुण असले की आम्ही त्याला श्रेष्ठ पुर्ष समजतो. जर हे गुण गौतमांना प्रशंसनीय वाटत असतील तर याच गुणांच्या आधारे त्यांनी माझी प्रशंसा करावी. उलटपक्षी त्यांच्या मते मी जर दोषास्पद असेन तर ह्याच गुणांच्या आधारे त्यांनी मला दोष द्यावा.” 

१३. “ब्राम्हणा, या गुणांच्या आधारे मी तुझी स्तुतीही करू शकत नाही किंवा तुला दोषही देऊ शकत नाही.” 

१४. ‘तू सांगितलेस त्यापेक्षा अगदी वेगळे असे चार गुण पुरुषाच्या अंगी असले तरच मी त्याला प्रज्ञावान मानतो. हे चार गुण म्हणजे, प्रथम असा गुणसंपन्न मनुष्य बहुजनहितरत आणि बहुजनसुखरत असला पाहिजे. स्वभावत: रम्य आणि स्वभावत:च लाभदायक आहे, अशा आर्य मार्गाचे, त्याने पुष्कळशा माणसांना अनुयायी बनविलेले असले पाहिजे.’ 

१५. ‘ज्या विचारांशी समरस होण्याचे तो ठरवितो त्या विचारांशी त्याला समरस होता आले पाहिजे; आणि ज्या विचारांना मनात स्थान द्यायचे नाही असे ठरवितो त्या विचारांपासून त्याला दूर राहता आले पाहिजे. 

१६. ‘जे संकल्प, तो मनात उत्पन्न व्हावे असे म्हणतो, ते त्याला मनात उत्पन्न करता आले पाहिजेत किंवा जे संकल्प मनातून काढण्याचे तो इच्छितो, ते मनात उत्पन्न होणार नाहीत अशी खबरदारी त्याला घेता आली पाहिजे म्हणजे विचाराबाबतीत तो स्वत:च्या मनाचा पूर्णाधिकारी असला पाहिजे.’ 

१७. ‘त्याप्रमाणेच लोकोत्तर विचाराशी निगडित अशी जी चार ध्याने-ज्यांत रममाण होणे ह्या जीवनातही सुखकर आहे, ती त्याला स्वेच्छेने, सहजपणे विनासायास साधता आली पाहिजेत. 

१८. ‘तो जीवनाच्या संपूर्ण ज्ञानाने बंधनकारक अशा आसवांचा नाश करतो. अशा रीतीने चित्त विमुक्‍त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो. प्रज्ञेमळे लाभलेल्या ह्या विमुक्‍तीचा तो इहजन्मी उपभोग घेतो.’ 

१९, ‘म्हणून हे ब्राम्हणा, नाही. तू सांगितलेल्या गुणदोषांच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही. अथवा तुला दोष देऊ शकत नाही; परंतु मी सांगितलेले चार गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो.’

२०. ‘श्रमण गौतमा, हे खरोखर आश्चर्य आहे. किती चांगल्या रीतीने तू हे सांगितले आहेस.’

२१. ‘मी स्वतः गौतमाच्या अंगी हे चार गुण आहेत असे मानतो. तो बहुजनाच्या हितासाठी आणि सुखासाठी झटत असतो. तो त्यांना स्वभावत: सुंदर आहे आणि हितकारक आहे हे दाखविणार्या आर्यमार्गात आणून सोडतो.’

२२. खरोखर, गौतम हा ज्या विचारावर आपले चित्त एकाग्र करावे असे ठरवितो त्यावर तो आपले चित्त एकाग्र करू शकतो. तो आपल्या विचारांचा स्वामी आहे.

२३. खरोखर, गौतम हा इच्छेनुसार चार ध्याने करू शकतो. खरोखर तो आसवनाशाने आपले अंतःकरण विमुक्‍त करतो. ही विमुक्ती तो प्रज्ञेने साधतो, आणि त्या स्थितीत तो सदैव राहतो.

२४. या ठिकाणी भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राम्हणाची प्रज्ञा यांमधील भेद अगदी स्पष्ट शब्दात केला आहे.

२५. या ठिकाणी भगवान बुद्ध प्रज्ञेना अधिक महत्वाची का मानतो हे त्याने स्पष्ट केले आहे.

(ग) धम्माला सद्धम्मरूप प्राप्त व्हावयाला त्याने मैत्रीला

उत्तेजन दिले पाहिजे.

१. केवळ प्रजा ही पुरेशी नसून तिच्यासमवेत शीलही असले पाहिजे असे धम्म जेव्हा शिकवितो तेव्हाच तो सद्धम्मरूप पावतो

१. प्रज्ञा ही आवश्यक आहे; परंतु शील त्यापेक्षा धिक आवश्यक आहे. शीलाशिवाय प्रज्ञा भगकारक आहे.

२. केवळ प्रज्ञा ही भयकारक आहे.

३. प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे.

४. शीलवान माणसाच्या हाती, दुसर्याला वाचविण्यासाठी तिचा उपयोग केला जाईल.

५. परंतु शीलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठी होईल.

६. म्हणूनच प्रज्ञा ही शीलापेक्षा महत्वाची आहे.

७. प्रज्ञा हा विचारधम्म म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धती. शील हा आचारधम्म म्हणजे योग्य वागण्याची पद्धती.

८. शीलाविषयी भगवान बुद्धाने पाच मूलतत्वे सांगितली आहेत.

९. पहिले जीवहत्येसंबंधी.

१०. दुसरे चोरीसबंधी.

११. तिसरे वैषयिक अनीतीसंबंधी.

१२. चौथे खोटे बोलण्यासंबंधी.

१३. आणि पाचवे मद्यपानासंबंधी.

४. आणि ह्यांपैकी प्रत्येकासंबंधाने भगवान बुद्धाने असे सांगितले आहे की, हत्या करू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये, वैषयिक अनीती करू नये आणि मद्यपान करू नये.

१५. बुद्धाने प्रज्ञेपेक्षा शीलाला महत्व का दिले आहे याचे कारण स्पष्ट आहे.

१६. ज्ञानाचा उपयोग माणसाच्या शीलावर अवलंबून आहे. शीलाशिवाय ज्ञान मूल्यहीन आहे; असे तो एके ठिकाणी म्हणतो.

१७. दुसर्या ठिकाणी तो म्हणतो, ‘शीलासमान या जगात दुसरे काही नाही.

१८. शील हा प्रारंभ आणि शेवट आहे. सर्व कल्याणाचे ते उगमस्थान आहे. सर्व चांगल्या अवस्थांतील ती सर्वोत्तम अवस्था आहे, म्हणून आपले शील ‘शुद्ध करा.’

२. धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील ह्यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता प्रतिपादतो तेव्हाच तो सद्धम्मरूप पावतो

१. बुद्ध धम्माचे अधिष्ठान काय? यासंबंधी काही अशी मतभिन्नता आहे.

२. प्रज्ञा हीच केवळ त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे की, करुणा हीच त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे? ३. या वादामुळे बुद्धानुयायांत दोन शाखा उत्पन्न झाल्या. एक शाखा म्हणते की प्रज्ञा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे. दुसरी शाखा म्हणते की करुणा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे.

४. ह्या दोन्ही शाखा अद्यापिही एकमेकांपासून विभक्त झालेल्या आहेत.

५. भगवान बुद्धाच्या शब्दांची कसोटी ह्या दोन्हीही शाखांना लावली असता त्या दोन्हीही शाखा चुकीच्या वाटतात.

६. प्रज्ञा ही बुद्ध धम्माचा एक आधारस्तंभ आहे, याबद्दल मतभेद नाही.

७. वाद आहे तो हा की, करुणासुद्धा भगवान बुद्धाच्या धम्माची आधारस्तंभ आहे काय?

८. करुणा ही त्याच्या धम्माची आधारस्तंभ आहे हे संशयातीत आहे.

९. याचे समर्थन बुद्धवचनानेच करता येईल.

१०. पूर्वी गांधार नावाच्या देशात एका भयानक रोगाने पछाडलेला एक वृद्ध भिक्खु होता. तो ज्या ज्या ठिकाणी उठत अथवा बसत असे ती जागा मलिन होई.

११. तो गांधार देशातील एका विहारात राहात असे. कोणीही त्याच्याजवळ जात नसे किंवा प्याला संकटात सहाय्य करीत नसे.

१२. एकदा भगवान बुद्ध आपल्या अनुयायांसह तेथे गेला आणि आवश्यक पाने, भांडी, गरम पाणी घेऊन, तो म्हातारा भिक्खू जेथे पडलेला होता त्या ठिकाणी सर्व भिकक्‍खुंसह येऊन पोहोचला.

१३. त्या जागेला एवढी दुर्गंधी येत होती की, त्या सर्व भिक्खुंना त्या माणसासंबंधी घृणा वाटू लागली. परंतु तथागताने शुक्रदेवाला गरम पाणी ओतायला सांगून आपल्या स्वतःच्या हाताने त्या भिक्खूचे शरीर धुण्यास आणि त्याच्या रोगावर उपचार करण्यास प्रारंभ केला.

१४. असे म्हणतात की, तेव्हा धरणीकंप झाला आणि ते स्थान एका दिव्य प्रकाशाने इतके भरून गेले की, राजा, त्याचे प्रधान, देव आणि नाग लोक तेथे सत्वर धावत आले आणि भगवान बुद्धाची पूजा करू लागले.

१५. तथागताला उद्देशून त्यांनी विचारले, “इतक्या थोर, उदात्त, महापुरुषाने असले घाणेरडे काम का करावे?” यावर भगवान बुद्धाने आपल्या कृतीचे असे स्पष्टीकरण केले.

१६. या जगात जे गरीब आहेत, असाहाय्य आणि अनाथ आहेत त्यांचा तथागत मित्र आहे. शारीरीक व्याधींनी पछाडलेले आहेत, मग ते श्रमण असोत अथवा इतर कोणीही असोत त्यांची सेवा करण्यासाठी, जे दरिद्री, अरक्षित आणि वृद्ध आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि इतरांना आपल्यासारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागताचा जन्म आहे.

३. जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादतो तेव्हा सद्धम्मरूप पावतो

१. भगवान बुद्ध केवळ करुणा शिकवून थांबला नाही.

२. करुणा म्हणजे प्राणिमात्रासंबंधी दया. भगवान बुद्धाने यापलीकडे जाऊन मैत्री शिकविली. मैत्री म्हणजे अखिल जीव-जाती संबंधी प्रेम.

३. केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता, पूढे जाऊन अखिल जीव-जातीवर प्रेम केले पाहिजे अशी बुद्धाची शिकवण आहे.

४. श्रावस्ती येथे राहात असताना एका सूत्रात भगवान बुद्धाने हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे.

५. मैत्रीसंबंधी बोलताना भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाला,

६. “समजा, मनुष्य एक विहीर खणतो आहे. भूमी त्यामुळे रागावते काय?”

७. “नाही भगवान, नाही!” ते भिक्खू उत्तरले.

८. “समजा, एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्रे रंगवू लागला. तो चित्र रंगवू शकेल असे तुम्हांला वाटते काय!”

९. “नाही भगवान!”

१०. “का नाही?” भिक्खु म्हणाले, “कारण हवेत असे काळे फलक नाहीत की, ज्यावर रंग भरता येईल.”

११. “त्याप्रमाणेच तुमच्या मनातही काळे किल्मिष असता कामा नये. कारण किल्मिषे ही दुविचाराचीच प्रतिबिबे असतात.”

१२. “समजा, एखादा मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला, तर त्याला आग लावता येईल काय?”

१३. “नाही. नाही भगवान.”

१४. “का नाही?” “कारण गंगेच्या पाण्यात ज्वालाग्राहीपणा नाही.”

१५. आपले प्रवचन संपवीत भगवंत म्हणाले, “ज्याप्रमाणे भूमीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागावत नाही, ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीच प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि ज्याप्रमाणे अग्नीने विचलित न होता गंगाजळ सारखे वाहात राहते, त्याप्रमाणे भिक्खुंनो, तुम्ही दुसर्याने केलेल्या अपमान आणि अन्याय सहन करून त्याच्याशी मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे.”

१६. भिक्खूंनो ! मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे. आपले मन पृथ्वीसारखे खंबीर, हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे. असे जर तुम्ही कराल तर कितीही दुःसह गोष्ट घडली तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही. कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमून जातात.

१७. “तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासासारखा अमर्याद असावा, तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्यात द्रेषाचा लवलेश नसावा.”

१८. “माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही; त्यात मैत्रीने वागणे आवश्यक आहे.”

१९. या प्रवचनात भगवंतांनी भिक्खूंना एक कथा सांगितली ती संस्मरणीय आहे.

२०. पूर्वी एकदा श्रावस्ती नगरात विदेशिका नावाची एक कुलीन स्त्री राहात असे. ती सभ्यता, लीनता आणि सौम्यता या गुणांबद्दल प्रसिद्ध होती. तिची एक मोलकरीण होती. तिचे नाव काली. मोठी चलाख, सकाळी लवकर उठणारी आणि कामसू अशी मुलगी होती ती. कालीने स्वत:शी विचार केला, “माझ्या मालकिणीची ख्याती आहे की, तिला क्रोध असा येतच नाही; किंवा तो ती प्रकट करीत नाही, किंवा कदाचित मी आपले काम इतक्या चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध अप्रकट राहात असावा. मी तिला कसोटी लावून पाहते.”

२१. म्हणून ती दुसर्या दिवशी उशीरा उठली. तिच्या मालकिणीने तिला हाक मारून विचारले, ‘ तू इतक्या उशीरा का उठलीस?’ मोलकरीण म्हणाली, ‘त्यात काय बाईसाहेब?’ रागावून आणि चिडून ती मालकीण मनाशी म्हणाली, ‘ त्यात काही नाही काय? लबाड कुठली!’

२२. मोलकरणीने विचार केला, ‘ राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे तर! ती दाखवीत नाही एवढेच! मी माझे काम चोख बजाविते म्हणून ती रागावत नसावी. आणखी मी तिची कसोटी घेईन! म्हणून ती दुसर्या दिवशी अधिक उशीरा उठली. मालकिणीने विचारले, ‘काले, तू उशीरा का उठलीस!’ मोलकरणीने उत्तर दिले, ‘ त्यात काय आहे?’ आपला राग आणि चीड शब्दात व्यक्‍त करीत मालकीण म्हणाली, ‘ अस्सं ! त्यात काही नाही काय? लबाड कुठली!

२३. अस्सं तर, त्या मोलकरणीने विचार केला, ‘ राग हा विचार तिच्या ठिकाणी आहे; पण माझे काम नीट करते मी म्हणून ती तो दाखवित नाही. मी आणखी अधिक तिची कसोटी घेईन. म्हणून ती दुसर्या दिवशी फारच उशीरा उठली. मालकिणीने तिला हाक मारून विचारले, ‘इतक्या उशीरा का उठलीस?’ मोलकरणीने उत्तर दिले, * अं! त्यात काय आहे?’

२४. ‘ असं तर!’ इतक्या उशीरा उठणे म्हणजे काहीच नाही काय? लबाड मुली! असे उदगार काढून मालकिणीने चिडून रागाने एक अडसर उचलला आणि रक्‍त येईल इतक्या जोराने तो तिच्या डोक्यात घातला.

२५. खोक पडून रक्‍तबंबाळ झालेले आपले डोके धरून कालीने आरोळ्या ठोकून सर्व शेजारी जागे केले आणि ओरडत सुटली, ‘ पाहा बाई माझी मालकीण! किती लीन आहे, सौम्य आहे माझी मालकीण! हे एवढे कशासाठी! तर तिची एकुलती एक मोलकरीण उशीरा उठली म्हणून! ती इतकी रागावली, चिडली होती की, हातात अडसर घेऊन माझ्यावर झेप घेऊन तिने माझे डोके फोडले!

२६. याचा परिणाम असा झाला की, विदेशिका ही कोणी लीन आणि सौम्य स्त्री नसून ती अत्यंत चिडखोर स्वभावाची आहे अशी तिची खात्री झाली.

२७. याप्रमाणेच जोपर्यंत चीड आणण्याजोगे काही म्हटले नाही तोपर्यंतच, भिक्खू सौम्य, सभ्य आणि लीन असण्याचा संभव आहे. जेव्हा त्याला चीड  येण्यासारखे सारखे शब्द बोलले जातात तेव्हाच त्याच्या ठिकाणी मैत्री ग म्हणजे बंधुभाव आहे की नाही याची खात्री पडते.

२८. ही गोष्ट सांगून भगवंतांनी म्हटले, ‘केवळ वस्त्र आणि अन्न मिळविण्यासाठी भिक्खूने मैत्रीभाव व्यक्‍त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्री-भावना आहे असे मी समजत नाही. ज्याची मैत्री-भावना ही धम्म सिद्धान्तातून उगम पावते, त्यालाच मी खरा भिक्खू समजतो.’

२९. ‘पुण्यार्जनासाठी केलेली कृत्ये ही मैत्रीच्या एक षोडशांशाच्याही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता. ती आपल्यामध्ये सर्व पुण्य कृत्यांना समाविष्ट करून घेते. ती चमकते, प्रकाशते, ती प्रज्वलित होते.’

३०. ‘भिक्खुंनो! सर्व तार्यांचे तेज चंद्रप्रभेच्या एक षोडशांशही नसते. चंद्रप्रभा त्यांचे सर्व तेज आपणांत सामावून घेऊन स्वत: चमकते, प्रज्वलीत होते. त्याप्रमाणेच पुण्यार्जनासाठी केलेली कृत्ये मैत्रीच्या एक षोडशांशही  मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता; ती सर्व पुण्यकृत्यांना स्वत:मध्ये सामावून चमकते, प्रकाशते, प्रज्ज्वलीत होते.!

३१. त्याप्रमाणेच. भिक्खूंनो! जसा वर्षाक्रतूअखेर सूर्य स्वच्छ, निरभ्र अशा आकाशात उगवून सारे किल्मिष नाहीसे करतो आणि स्वत: चमकतो, प्रकाशतो आणि प्रज्वलीत होतो, अगदी त्याप्रमाणेच पुण्यार्जनासाठी योजलेली सर्व साधने ही मैत्रीच्या एक षोडशांश इतकीही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंत:करणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलीत होते.’

(घ) धम्माला सद्धम्मरूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत

१. धम्मालाला सद्धम्मरूप प्राप्त व्हायला त्याने माणसामाणसांत भेद करणारे अडसर मोडून काढले पाहिजेत

१. आदर्श समाज कोणता? ब्राम्हणांच्या मते वेदामध्ये ध्येयरूप समाजाची व्याख्या आहे, आणि वेद हे स्वतः प्रमाण असल्यामुळे, वेदप्रणीत श्रणात आदर्श समाज हाच एकमेव माणसाने मान्य करण्यासारखा आहे.

२. वेदप्रणीत आदर्श समाज म्हणजे चातुर्वर्ण्य.

३. वेदानुसार अशा समाजाने तीन अटी पाळल्या पाहिजेत.

४. पहिली अट म्हणजे ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे त्या समाजात चार वर्ण असले पाहिजेत.

५. या वर्गांचे परस्परसंबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत. दुसर्या शब्दात सांगावयाचे म्हणजे हे सर्व समान असता कामा नयेत. तर प्रतिष्ठा, अधिकार आणि विशेष हक्‍क यांच्या प्रमाणात ते एक दुसर्यावर अशा रीतीने आधारलेले असले पाहिजेत.

६. ब्राम्हण हे सर्वांच्या वरती. क्षत्रिय त्यांच्या खाली पण वैश्यांच्या वरती. वैश्य क्षत्रियांच्या खाली, परंतु शूद्राच्या वर आणि शूद्र हे सर्वांच्या खाली.

७. चातुर्वर्ण्याचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने त्याला विहित असाच व्यवसाय केला पाहिजे.

८ . ब्राम्हणांचा व्यवसाय म्हणजे अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे. क्षत्रियांचा शस्त्र धारण करणे आणि युद्ध करणे. वैश्यांचा  व्यवसाय व्यापार धंदा, शूद्राचा चा व्यवसाय वरील तीनही उच्च वर्णांची  सेवा.

९. कुठल्याही एका वर्गाने आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून दुसर्याच्या व्यवसायावर आक्रमण करावयाचे नाही.

१०. ह्या आदर्श समाजाच्या सिद्धान्ताचा आग्रह धरून ब्राम्हणांनी तो लोकांना शिकवला. या सिद्धान्ताचा आत्मा विषमता आहे हे स्पष्टच आहे. ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून ती ब्राम्हणी धर्माचा शास्त्रसम्मत सिद्धांत आहे.

११. भगवान बुद्धाचा ह्या सिद्धान्ताला आमूलाग्र विरोध होता.

१२. तो जातिसंस्थेचा सर्वश्रेष्ठ विरोधक असून, समतेचा सर्वात पहिला आणि अत्यंत खंबीर असा समर्थक होता.

१३. जाती आणि विषमता यांच्याशी संलग्न असा एकही विचार नाही, की ज्याचे त्याने खंडन केलेले नाही.

१४. या मुद्यावर भगवान बुद्धाला ब्राम्हणांनी पुष्कळच आव्हान दिले. परंतु बुद्धाने त्या सर्वांना पूर्णपणे गप्प बसविले.

१५. अश्वलायन सूक्तांत एक कथा आली आहे. एकदा ब्राम्हणांनी आपल्यापैकी अश्वलायन नावाच्या पुरुषाला बुद्धाकडे जाऊन, त्याच्या जात आणि विषमता या मताविषयी वाद घालण्यास प्रवृत्त केले.

१६. अश्वलायन भगवान बुद्धाकडे गेला आणि त्याने ब्राम्हणाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारा पक्ष मांडला.

१७. तो म्हणाला, ‘ हे गौतमा, ब्राह्मण असे मानतात की ते स्वत: सर्वश्रेष्ट वर्ण असून इतर सर्व कृष्ण वर्णातील आहेत. पावित्र्य हे केवळ ब्राम्हणात वसत असते. अब्राम्हणांत ते वसत नाही. केवळ ब्राम्हणच ब्रम्हाचे औरसपुत्र आहेत. ते त्याच्या मुखातून जन्मास आले. तेच त्याच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले आणि त्याचे वारस आहेत. यावर गौतमा, तुझे काय म्हणणे आहे?”

१८. भगवान बुद्धाच्या उत्तराने अश्वलायन अगदी गारठूनच  गेला.

१९, भगवान बुद्ध म्हणाले, ‘अश्वलायना, ब्राम्हणांच्या ब्राम्हण्या ह्या क्रतुमती होत नाहीत काय? त्या गर्भधारणा करीत नाहीत काय? त्या बाळंत होऊनच मुलाला जन्म देतात ना? असे असूनसुद्धा, म्हणजे स्त्रीपासून जन्मास येऊनसुद्धा तू जे काही म्हणतोस ते सर्व ब्राम्हण खरे मानतात का?”

२०. अश्वलायन निरुत्तर झाला.

२१. भगवान बुद्धाने अश्वलायनाला पुढे दुसरा प्रश्‍न विचारला.

२२. ‘अश्वलायना, समज, एखाद्या क्षत्रियाने ब्राम्हण स्त्रीशी संभोग केला तर काय जन्माला येईल? चतुष्पाद प्राणी येईल की, मनुष्य प्राणी?”

२३. अश्वलायनाने काहीच उत्तर दिले नाही.

२४. ‘नैतिक विकासाच्या शक्‍यतेसंबंधी बोलायचे तर ह्या देशात केवळ ब्राम्हणाच्याच अंत:करणात द्रेष आणि दुरिच्छा यांपासून दूर असलेली प्रेमभावना उत्पन्न होईल की इतर वरणिंयांच्याही हृदयांत ती उत्पन्न होईल?

२५. अश्वलायन म्हणाला, ‘ चारही वर्णांच्या अंतःकरणात प्रेमभावना उत्पन्न होऊ शकतात.

२६. भगवान बुद्धाने विचारले, ‘अश्वलायना, योन आणि कंबोज, आणि त्यांच्या सन्निध असलेल्या देशांत, स्वामी आणि दास हे दोनच वर्ण आहेत आणि तेथे स्वामीचा दास आणि दासाचा स्वामी असे स्थित्यंतर होऊ शकते, हे तू ऐकले आहेस काय?”

२७. अश्वलायनाने उत्तर दिले, ‘होय, मी ऐकले आहे.’

२८. “तुमचे चातुर्वर्ण्य ही आदर्श समाजरचना असेल, तर ती सर्व देशांत का आढळत नाही?”

२९. या कोणत्याही मुद्दयावर अश्वलायनाला जाती काणि विषमता यांविषयीच्या आपल्या सिद्धान्तांचे समर्थन करता येईना. तो पूर्णपणे निरुत्तर झाला आणि शेवटी त्याने भगवान बुद्धाचे अनुयायित्व पत्करले.

३०. वसिष्ठ नावाचा एका ब्राम्हणाने बुद्धधर्म स्वीकारलेला होता. ब्राम्हण त्याच्या या धर्मान्तराबद्दल त्याला शिवीगाळ करीत असत.

३१. एके दिवशी तो भगवान बुद्धाकडे गेला आणि ब्राम्हण त्याला काय म्हणत असतात हे त्याने बुद्धाकडे कथन केले.

३२. वसिष्ठ म्हणाला, “भगवान, ब्राम्हण म्हणतात की, ब्राम्हण हाच समाजातील सर्वांत उच्च थरातील असून इतर सर्व वर्ण नीच थरातील आहेत. ब्राम्हण फक्त शुक्कुवर्ण आहेत. इतरांचे वर्ण कृष्ण आहेत. फक्त ब्राम्हण हे शुद्ध वंशातील आहेत. अब्राम्हण शुद्ध वंशातील नाहीत. फक्त ब्राम्हणच ब्रम्ह्यचे खरेखुरे औरस पुत्र आहेत. ते त्याच्या मुखातून जन्मले आहेत. तेच त्याच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले त्याचे वारसपुत्र आहेत.’

३३. “आणि तू तर आपला अभिजात वर्गाचा त्याग करून त्या नीच वर्गाच्या शिरमुंड्या भिक्खुंच्या, त्या असंस्कृत श्रीमंताच्या, त्या कृष्णवर्णाच्या, ब्रम्ह्यच्या पायापासून जन्मलेल्या लोकांच्या वंशजात सामील झाला आहेस, हे चांगले नाही. हे काही उचित नव्हे. आपला अभिजात वर्ग सोडून त्या नीच, शिरमुंड्या, कृष्णवर्णीय गावंढळ आणि आमच्या पूर्वजांच्या पायापासून निर्माण झालेल्या लोकांत सामील झाला आहेस!

३४. ‘ भगवान, या शब्दांनी ते ब्राम्हण मला दोष देतात; शेलक्या, बेछूट शिव्या मला घालतात.

३५. यावर बुद्ध म्हणाला, ‘ वसिष्ठा, खरोखर ब्राम्हण जेव्हा असे बोलतात तेव्हा ते आपली प्राचीन परंपरा विसरलेले दिसतात. इतर वर्गांतील स्त्रियांप्रमाणे ब्राम्हणीही गर्भार राहतात, प्रसवतात, आपत्या अर्भकांचे संगोपन करतात, तथापि हे गर्भजात ब्राम्हण मात्र आपण ब्रम्ह्यच्या मुखातून जन्माला आलेली खरी मुले, त्यांच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले, त्याचे खरे वारसपुत्र म्हणून स्वत:ला म्हणवून घेतात. यामुळे ते ब्रम्ह्याची नालस्ती मात्र करतात.’

३६. एकदा येसुकारी हा ब्राम्हण भगवान बुद्धाजवळ तीन प्रश्‍नांवर वाद करण्यासाठी गेला.

३७. त्याने पहिला प्रश्‍न जो मांडला तो म्हणजे, कर्माची शाश्वत विभागणी. ह्या पद्धतीच्या समर्थनार्थ तो म्हणाला, ‘ मी तुला एक प्रश्‍न विचारण्यासाठी आलो आहे. ब्राम्हण म्हणतात, ते सर्वांहून श्रेष्ठ असल्यामुळे, ते कोणाचीच सेवा करणार नाहीत. इतर सर्व वर्ण सेवा करण्यासाठी जन्मास आले आहेत.

३८. हे गौतमा, सेवा ही चार वर्णात विभागलेली आहे. ब्राम्हणांची सेवा, क्षत्रियांची सेवा, वैश्यांची सेवा आणि शूद्रांची सेवा. शूद्रांची सेवा दुसरा शूद्रच करणार, दुसरे कोण करणार?

३९. भगवान बुद्धाने त्याच्या प्रश्‍नाला एक प्रश्‍न विचारून उत्तर दिले, ‘ब्राम्हणांनी केलेली ही सेवेची चतुविध विभागणी सर्व जगात मान्य आहे का?

४०. माझ्यासंबंधी विचारशील तर मी सर्व सेवा ( धंदा ) करायची किवा न करावयाची यांपैकी कशाचाच आग्रह धरीत नाही. सेवेचा परिणाम आपणाला वाईट बनविण्यात होत असेल आणि चांगले बनविण्यात होत नसेल तर ती सेवा करू नये. परंतु जर त्या सेवेने मनुष्य चांगला होत असेल, वाईट हात नसेल तर ती सेवा करावी.

४१. ‘क्षत्रियाचे, ब्राम्हणाचे, वैश्याचे अथवा शुद्राचे वर्तन या मार्गदर्शक तत्वानुसार झाले पाहिजे. ज्या सेवेने व्यक्‍तीला वाईटपणा येतो, ती सेवा तिने नाकारली पाहिजे. जिच्या योगे ती व्यक्‍ती अधिक चांगली होते तेवढीच सेवा तिने केली पाहिजे.’

४२. येसुकारीने दुसरा प्रश्‍न विचारला, ‘ माणसाचा सामाजिक दर्जा ठरविताना त्याचा वंश आणि कूळ यावरून का ठरवू नये?’

४३. या प्रश्‍नाला भगवान बुद्धाने उत्तर दिले, ‘वंशपरंपरेच्या अभिमानावरून माणुस ज्या घरात जन्माला येतो त्याचा नामनिर्देश केला जातो. ज्या पदार्थापासून अग्नी पेटवला जातो त्या पदार्थावरून तो ओंडक्याचा अग्नी आहे की, ढलप्याचा अग्नी आहे, काटयाकुटयाचा अग्नी आहे की, शेणीचा अग्नी आहे हे ठरविले जाते. त्या प्रमाणेच धम्माचा उदात्त सिद्धान्त हा प्रत्येक माणसाच्या खर्या संपदेचे उगमस्थान आहे. जन्मावरून माणूस कोणत्या वर्गात जन्मास आला याचा फक्त नामनिर्देश होतो.’

४४. ‘ कुळावरुन माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरत नाही. तीच गोष्ट स्वरूप व संपत्तीची आहे. कारण तुला असे आढळून येईल की, थोर कुळात जन्माला आलेला मनुष्य हाही कधी कधी खुनी, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारा, निंदक, शिवीगाळ करणारा, बडबड करणारा, लोभी, दीर्घद्रेपी, अथवा चुकीची मते असलेला आढळेल. म्हणून मी म्हणतो की, जन्म थोर कुळात झाला म्हणून मनुष्य सत्पुरुष होत नाही. त्याप्रमाणेच थोर कुळात जन्माला आलेला पुरुष ह्या दुर्गुणांपासून अलिप्त असलेलाही आढळेल. म्हणून मी म्हणतो, कुळामुळे मनुष्य वाईट होतो असेही नाही.

४५. येसुकारीने जो तिसरा प्रश्‍न विचारला तो वर्णप्राप्त कर्मानुसार उपजीविकेचा.

४६. येसुकारी तथागतांना म्हणाला, ‘ब्राम्हण उपजीविकेच्या साधनांचे चार प्रकार मानतात. दानापासून ब्राम्हणाची उपजीविका, क्षत्रियाची धनुष्यबाणापासून, कृषी आणि पशुपालनापासून वैश्याची, आणि खांद्यावर धान्याची कावड वाहून नेण्याने शूद्राची. .जर या चारांपैकी पै कोणाही एकाने आपला व्यवसाय सोडून डर दुसर्याचा व्यवसाय स्वीकारला तर त्याने जे करू नये ते केल्यासारखे होते. असे करणे म्हणजे रक्षकाने परक्‍्याच्या धनाचा अपहार करण्यासारखे आहे. यावर श्रमण गौतमाचे मत काय आहे?”

४७. ‘ ब्राम्हणांचे हे वर्गीकरण सर्व जगास मान्य आहे काय?” बुद्धाने विचारले

४८. येसुकारीने उत्तर दिले, ‘ नाही.

४९. वसिष्ठाला भगवान बुद्धाने सांगितले, ‘ उच्च कुळात जन्म घेण्यापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणे हे महत्वाचे आहे.’

५०. ‘जाती, विषमता, उच्चता, कनिष्ठता हे भेदभाव असूच शकत नाहीत. सर्व सारखेच आहेत.’ असा भगवान बुद्धाचा उपदेश होता.

५१. ‘ जसे दुसरे तसाच मी. जसे आम्ही तसेच दुसरे. या विचाराने दुसर्याशी समरस व्हा!* हा भगवान बुद्धाचा उपदेश होता.

२. धम्माला सद्धम्मरूप यावयाला त्याने माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर कार्यावरून ठरवावे, अशी शिकवण दिली पाहिजे

१. ब्राम्हणप्रणीत चातुर्वर्ण्याचा सिद्धान्त जन्मावर आधारलेला होता.

2. ब्राम्हण म्हणजे ब्राम्हण आईबापांच्याजन्माला येणारा मनुष्य. वैश्य म्हणजे वैश्य आईबापांच्यापोटी जन्माला येणारा मनुष्य, आणि शूद्र म्हणजे शूद्र आईबापांच्या पोटी जन्मास येणारा मनुष्य.

३. ब्राम्हणाच्या मते माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मापेक्षा दुसर्या कशावरही अवलंबून नाही.

४. चातुर्वर्ण्याप्रमाणे हा सिद्धान्तही भगवान बुद्धाला घृणास्पद वाटत असे.

५. त्याचा सिद्धान्त ब्राम्हणी सिद्धान्ताच्या अगदी विरुद्ध होता. त्याच्या सिद्धान्ताप्रमाणे माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावर अवलंबून नसून त्याच्या अंगच्या योग्यतेवर अवलंबून आहे.

६. ज्या प्रसंगी भगवान बुद्धाने आपला हा सिद्धान्त मांडला तो प्रसंग विशेष महत्वाचा आहे.

७. एकदा भगवान अनाथ पिंडीकाच्या जेतवनारामांत राहात होते. एके दिवशी दुपारी येण्यापूर्वी हातात भिक्षापात्र घेऊन त्यांनी श्रावस्ती नगरात भिक्षेसाठी प्रवेश केला.

8. त्यावेळी होमाग्री प्रज्वलित करून यज्ञाची तयारी चालली होती. भिक्षाटन न करता करता भगवान अश्निक नावाच्या ब्राम्हणाच्या दारी आले. त्याच्या घरात होमाग्री पेटला ला होता. आहुतीची तयारी चालू होती.

९. भगवंतांना आपल्या दाराशी येताना पाहून अश्रनिक रागाने म्हणाला, ‘ हे केशकुंचिता, थांब, तेथेच थांब. हे करंट्या भिक्खू, तेथेच थांब. हे दीनवृषला, बहिष्कृत माणसा, तेथेच थांब.

१०. ब्राम्हणाचे हे शब्द ऐकून भगवान म्हणाले, ‘ हे ब्राम्हणा, वृषल ( बहिष्कृत ) कोणाला म्हणावयाचे? माणुस कोणत्या कारणांनी बहिष्कृत ठरतो हे तुला माहित आहे काय?”

११. “नाही गौतमा, कोणाला वृषल ( बहिष्कृत ) म्हणावे आणि कोणत्या कारणांनी मनुष्य वृषल ( बहिष्कृत ) ठरतो हे मला काही माहिती नाही.’

१२. भगवान त्याला म्हणाले, ‘वृषल ( बहिष्कृत ) कोणाला म्हणावयाचे याचे ज्ञान तुला झाल्यास काही वावगे होणार नाही.’ यावर अग्निक ब्राम्हण म्हणाला, ‘ त्याचे ज्ञान मला व्हावे याचा जर आग्रहच तू धरीत आहेस तर सांग तुला काय सांगायचे आहे ते.

१३. ब्राम्हणाची संमती मिळताच भगवान म्हणाले,

१४. ‘ जो मनुष्य स्वभावाने रागीट, दीर्घद्रेषी, दुर्गुणी, निदाप्रिय, मिथ्यादृष्टी आणि वंचक आहे त्याला वृषल (बहिष्कृत ) समजावे.’

१५. ‘जो सजीव प्राण्यांना, पणुंना आणि पक्ष्यांना उपद्रव करतो, ज्याच्या ठिकाणी सजीव प्राण्यासबंधी अनुकंपा नाही तो वृषल ( बहिष्कृत) समजावा.’

१६. ‘ जो खेड्यापाड्यांना वेढा घालून त्यांचा नाश करतो आणि जो अत्याचारी म्हणून प्रसिद्ध आहे तो वृषल (बहिष्कृत ) समजावा.

१७. ‘ जो गावात अथवा जंगलात परक्‍याचे धन चोरीने हिरावून नेतो तो वृषल ( बहिष्कृत ) समजावा.’

१८. ‘जो त्रण घेऊन पळून जातो किंवा फेडीची मागणी केली असता मी तुमचे काही लागत नाही, असे म्हणतो तो वृषल (बहिष्कृत ) समजावा.

१९. ‘जो एखाद्या क्षुद्र वस्तुच्या वासनेने वाटसरूला लुबाडतो व प्रसंगी त्याची हत्याही करतो तो वृषल (बहिष्कृत ) समजावा.

२०. जो साक्षीच्या वेळी स्वत:साठी किंवा दुसर्यासाठी किंवा द्रव्यलाभाच्या आशेने खोटे बोलतो तो वृषल (बहिष्कृत ) समजावा.

२१. ‘जो संमतीने अथवा बलात्काराने आप्त अथवा मित्रांच्या स्त्रियांशी मर्यादाति क्रमण करतो, तो वृषल (बहिष्कृत ) समजावा.

२२. ‘जो संपन्न असूनही आपल्या गतयोवनात वृद्ध अशा मातापितरांचे पोषण करीत नाही, तो वृषल (बहिष्कृत ) समजावा.

२३. ‘जो चांगले कोणते म्हणून विचारले असता वाईटाचा सल्लामसलत देतो, आणि कपटीपणाने शिकवितो तो वृषल ( बहिकृत ) समजावा.’

२४. ‘ जन्माने कोणीच वृषल ( बहिष्कृत ) नसतो. त्याप्रमाणेच जन्माने कोणीही ब्राम्हण ठरत नाही.

२५. भगवंताचे हे शब्द ऐकून त्यांना केलेल्या शिवीगाळीबद्दल त्या अग्निकाला आपली लाज वाटू लागली.

३. धम्माला सद्धम्मरूप यावयाला त्याने ( धम्माने ) माणसामाणसांमधील समतेच्या भावनेची अभिवृद्धी केली पाहिजे

१. जन्माने माणसे विषम असतात.

२.काही बळकट तर काही दुबळी असतात. .

३.काहींना अधिक बुद्धी असते तर काहींना थोडी अथवा मुळीच नसते.

4.काहींच्या अंगी थोर कर्तृत्वशक्‍ती असते तर काहींच्या अंगी ती फारच थोड्या प्रमाणात असते. .

५.काही सधन असतात तर काही दरिद्री असतात.

६.यासर्व प्रकारच्या माणसांना जीवनसंघर्षात प्रवेश करावयाचा असतो. .

७.या जीवनसंघर्षात विषमता ही स्वाभाविक स्थिती आहे, असे मानले तर दुबळ्यांची स्थिती असाहाय्य होईल. .

८.विषमता जीवनाचा नियम करून चालेल काय? .

९.या नियमाचा परिणाम म्हणजे जीवन-संघर्षात जे योग्यतम ते टिकतील, असा असल्यामुळे काही लोक वरील प्रश्‍नाचे उत्तर होकारार्थी देतात.

१०. परंतु प्रश्‍न असा आहे की, संघर्षात जे योग्यतम ते समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम ठरतात काय?

११. याला कोणीही होकारार्थी उत्तर देऊ शकणार नाही.

१२. याच कारणास्तव धर्म समता शिकवितो. जरी श्रेष्ठतम मनुष्य योग्यतम नसला तरी समाजात समतेस मान्यता दिल्यास तो जगू शकेल.

१३. समाजाला जर कोणाची गरज असेल तर ती श्रेष्ठतम पुरुषाची, योग्यतम पुरुषाची नव्हे.

14. याच कारणास्तव मुख्यत: धर्म समतेच्या तत्वाचा पुरस्कार करतो.

१५. हा बुद्धाचा दृष्टिकोन आहे. यास्तव जो धर्म समता शिकवीत नाही तो स्वीकारणीय नाही असे त्याचे म्हणणे होते.

१६. स्वत:ला सुखी करण्यासाठी दुसर्याला दुःखी करा, अथवा दुसर्याला सुखी करण्यासाठी स्वतःला दुःखी करा, अथवा स्वत:ला आणि दुसर्यालाही दुःखी करा,-अशा तर्हेच्या कर्माचा उपदेश करणार्या धर्मावर तुम्ही विश्वास ठेवाल काय? त्यावर श्रद्धा ठेवाल काय?

१७. जो धर्म आपल्या सुखाबरोबरच दुसर्याच्याही सुखाची वाढ करण्याची आणि कोणताही अत्याचार सहन न करण्याचा उपदेश करतो तो श्रेष्ठतम धर्म नव्हे काय?

१८. जे ब्राम्हण समतेच्या तत्वाला विरोध करीत, त्यांना हे आणि अशासारखे मोठे खोचक प्रश्‍न बुद्ध विचारीत असे.

१९. भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे माणसाच्या सत्प्रवृत्तीतून उद्भवणारा अत्यंत न्यायप्रधान असा धर्म आहे. 

Previous page                                             Next book


The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar
error: Content is protected !!